SNEHALATA JOSHI

About Author

Birth Date : 19/07/1954


SNEHALATA JOSHI HAS EXPERIENCE OF TWENTY-FIVE YEARS IN THE FIELD OF TEACHING. SHE RETIRED IN JULY 2012 FROM JUNIOR COLLEGE H.H.C.P. VERY FOND OF READING AND WRITING. HER STORIES WERE PUBLISHED IN MANY DIWALI MAGAZINES. IN 2012, A COLLECTION OF STORIES CALLED UMAJ WAS PUBLISHED AND IT RECEIVED A VERY GOOD RESPONSE FROM THE READERS. ANOTHER COLLECTION OF STORIES IS ON THE WAY FOR PUBLICATION.

स्नेहलता वि.जोशी या एम.ए.इंग्रजी, एम.ए.मराठी व बी.एड. असून पुण्याच्या एच.एच.सी.पी.(हुजूरपागा) ज्युनिअर कॉलेजमध्ये पंचवीस वर्षे अध्यापन करून निवृत्त झाल्या. त्या अनेक वर्षे कथालेखन करीत असून मेनका, माहेर अनुराधा अशा अनेक मासिकातून व दिवाळी अंकातून त्यांच्या कथा प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यातील ‘से नो’ ‘साकव’ अशा कथांना उत्कृष्ठ कथालेखनाची पारितोषिके मिळाली आहेत. त्यांच्या ‘उमज’ या कथासंग्रहाला वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. त्यांच्या प्रत्येक कथेचा विषय आणि आशय वेगळा असतो. ग्रामीण, शहरी, कौटुंबिक, विज्ञान-तंत्रज्ञानाशी निगडीत, विनोदी,सामाजिक अशा भिन्न भिन्न प्रकारच्या कथा त्या लिहितात. अर्थातच वैशिष्ट्यपूर्ण शैलीतून प्रत्येक कथा शेवटपर्यंत उत्कंठापूर्ण होते. स्नेहलता जोशी यांना इंग्रजी मराठी भाषांतर करण्याची आवड आहे. त्यांनी अनुवाद केलेली दोन पुस्तके; दडलेला इतिहास (हिडन हिस्ट्री) आणि ‘द मॅजिक ऑफ गेटिंग व्हॉट यू वॉन्ट’ मेहता प्रकाशनकडून प्रकाशित झाली आहेत. कोविड साथीच्या काळात WHATS UP माध्यमातून लहान मुलांना गोष्टी सांगण्याचा त्यांचा उपक्रम सुरु आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 3 of 3 total
AJUN NAHI JAGI RADHA Rating Star
Add To Cart INR 210
DADLELA ITIHAS Rating Star
Add To Cart INR 650
THE MAGIC OF GETTING WHAT YOU WANT Rating Star
Add To Cart INR 295

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book