* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: IACOCCA
  • Availability : Available
  • Translators : ASHOK PATHARKAR
  • ISBN : 9789386745088
  • Edition : 2
  • Publishing Year : AUGUST 2017
  • Weight : 475.00 gms
  • Pages : 376
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Print Books:
"IACOCCA: AN AUTOBIOGRAPHY IS THE STORY OF LEE IACOCCA. HE IS AN AMERICAN BUSINESSMAN IN THE CAR INDUSTRY AND IS KNOWN WORLDWIDE AS THE FAMOUS MAN WHO ENGINEERED VARIOUS FAMOUS FORD CARS. HE IS ALSO FOR HIS PERSONAL SKILLS, DETERMINATION AND ACUMEN IN REVIVING CHRYSLER CORPORATION FROM THE BRINK OF BANKRUPTCY, IN SUCH A WAY THAT THE WORLD WAS LEFT ASTOUNDED AT THE AFTER EFFECTS. THE BOOK CONTAINS DIFFERENT PHASES OF LEE IACOCCA`S LIFE STARTING FROM HIS CHILDHOOD TO THE VARIOUS STRUGGLES AND DECISIONS HE WAS FACED WITH. IACOCCA WAS FROM AN ITALIAN-IMMIGRANT FAMILY. HIS DREAMS OF JOINING THE ARMY DURING THE SECOND WORLD WAR WAS LOST DUE TO THE RHEUMATIC FEVER. BEING A SMART STUDENT, IACOCCA JOINED THE LEHIGH UNIVERSITY AND FINISHED THE COURSE IN EIGHT SEMESTERS. AFTER GETTING A UNIVERSITY DEGREE, HE WAS OFFERED A JOB IN THE ARMY. BUT SOON AFTER, HE CAME INTO CONTACT WITH THE FORD COMPANY AND BEGAN WORKING THERE DILIGENTLY, ONLY TO BE KICKED OUT ON HIS 54TH BIRTHDAY. THE BOOK ALSO TELLS YOU ABOUT THE NUMEROUS CHALLENGES THAT IACOCCA HAD TO FACE WHEN THE CHRYSLER CORPORATION WAS ON THE BRINK OF BANKRUPTCY AND HOW HE MANAGED TO GET A LOAN FROM THE GOVERNMENT UNDER VARIOUS CONDITIONS IN ORDER TO SAVE CHRYSLER AND THE WAY HE TURNED AROUND CHRYSLER ON TO THE PATH OF SUCCESS. "
"सदर पुस्तक हे ‘फोर्ड कंपनी’चे माजी अध्यक्ष आणि ‘क्रायस्लर’ कंपनीचे अध्यक्ष ली आयकोका यांचे आत्मचरित्र आहे. या आत्मचरित्रात त्यांचे बालपण कौटुंबिक, शैक्षणिक वातावरण याबरोबरच त्यांचे व्यावसायिक जीवन यांचं त्यांनी वर्णन केलं आहे. हाडाचे व्यावसायिक असणाऱ्या ‘ली आयकोका’ यांना फोर्ड मोटार कंपनीत बऱ्याच संघर्षानंतर अध्यक्षपद मिळाले. कणखर व्यक्तिमत्त्व, चतुराई, योग्य निर्णयक्षमता, उच्च व्यावसायिक क्षमता यांच्या जोरावर त्यांनी अमाप यश मिळवले. त्यांनी त्यांच्या व्यावसायिक व वैवाहिक जीवनात अनेक चढ-उतार अनुभवले. फोर्ड मोटार कंपनीला यशाच्या शिखरावर पोहचवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. आपल्या आत्मचरित्रात त्यांनी ‘फोर्ड’विषयी त्यांना वाटणारे प्रेम आणि विक्षिप्त स्वभाव असणारा हेन्री फोर्ड याचाही उल्लेख केला आहे. ‘हेन्री फोर्ड’च्या या विक्षिप्त स्वभावाचा मोठा फटका ‘आयकोका’ यांना बसला. कोणतेही कारण नसताना अचानकच त्यांना कंपनीतून काढून टाकण्यात आले. त्या वेळी ‘क्रायस्लर’ कंपनीने त्यांना आपल्याबरोबर काम करण्याची संधी दिली. परंतु लवकरच ‘क्रायस्लर’ डबघाईला आली. ‘क्रायस्लर’सारख्या दिवाळं निघालेल्या कंपनीला सुस्थितीत आणून ‘आयकोका’ खऱ्या अर्थाने ‘हिरो’ झाले. या आत्मचरित्रातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू पुढे येतात. आपल्या कुटुंबावर नितांत प्रेम करणारे आयकोका तत्त्व, निष्ठा, मूल्य यांचा आदर करतात. प्रामाणिकपणाला महत्त्व देणारे आयकोका एक अजब रसायन आहेत. आयकोका यांना मिळालेल्या प्रचंड यशाबद्दल जेव्हा विचारले जाते, तेव्हा ते आपल्या आई-वडिलांनी दिलेल्या शिकवणुकीबद्दल सांगतात. ते म्हणतात, ‘‘मन लावून काम करा. जितके शिकता येईल तितके शिका; पण काहीतरी करा. नुसते उभे राहू नका. काहीतरी करून दाखवा. ते काही सोपे नाही; पण प्रयत्न करत राहिलात, तर मुक्त समाजात तुमची इच्छा असेल तेवढे तुम्ही मोठे होऊ शकता, हे आश्चर्यकारक आहे! आणि अर्थात देवाने जे काही दिले असेल त्याबद्दल कृतज्ञ राहा!’’ "

No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #IACOCCA #IACOCCA #आयकोका #AUTOBIOGRAPHY #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #ASHOKPATHARKAR #LEEIACOCCA "
Customer Reviews
  • Rating StarVikram Kaduskar

    ली आयकोका,यांचे आत्मचरित्र असलेले हे पुस्तक, अक्षरशः खिळवून ठेवणारं, ज्या फोर्डमध्ये एक कामगारापासुन सुरुवात करुन त्या कंपनी चा अध्यक्ष होईपर्यंत सुवर्ण 32 वर्षे त्या कंपनीत घालवली, आपल्या 8 वर्षांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत त्यांनी mastyang, koogr, markvis इ गाड्या बनवून फोर्ड ला प्रगतीच्या शिखरावर बसवलं, फोर्डसाठी 32 वर्षे दिवसरात्र एक करून, नंतर तोच माणुस हेन्री फोर्ड ने कटकारस्थान करून त्यांना काढलं,54 व्या वर्षी, ते बाकी आयुष्य आनंदाने घालवू शकत होते, पण नाही,त्यांच्यातल्या उद्योजकाने त्यांना गप्प बसु नाही नाही दिले,अन ते craysler मध्ये रूजू झाले,ते रुजु झालेल्या पहिल्याच दिवशी craysler ने त्यांचा आतापर्यंतचा सगळ्यात मोठा तोटा दाखवला होता, कंपनी मरण पंथाला लागली होती,दिवाळे जाहीर करण्याच्या काठावर होती,म्हणजे पहिल्या दिवशीपासुनच त्यांचं अग्निदिव्या सुरु झालं, पण त्यांनी प्रचंड मेहनत करून ,संघटन करून,वेळप्रसंगी कामगार कपात करून,स्वतः वर्षाला 1 डॉलर पगार घेऊन,डायरेक्टर इ चे पगार कमी केले,पण खालच्या स्तरावरच्या लोकांचें आहे तेच ठेवले, प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये असलेली गडबड फोर्ड मधली ,इथली तिथली माणसे हाताशी धरून तिथली व्यवस्था नीट केली,100 लाख कोटी डॉलर्स च्या कर्जाची गरज होती, कंपनीचे सगळे पैसे संपले होतें, सहा लाख कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न होता,100 लाख डॉलर च्या हमीकर्जासाठी सरकारकडे गेले, पण गेले न मंजूर केले असे ते सरकार कुठले, शिवाय दिवाळखोरीला आलेल्या कंपनीसाठी कोण कर्ज देणार?प्रचंड दमछाक, बॅंकांची देणेदारी, दररोजचा विमानाने प्रवास,मोठ्या मोठ्या लोकांना भेटून फक्त आश्वासने घेऊन, मोकळ्या हातानें परत येऊन,बँकांशी बोलून ,सरकारशी बोलून,लढून झगडून शेवटी हमीकर्ज मिळवले, पण कागदपत्रे जुळवल्यानंतर अक्षरशः त्यांचा ढीग 7 मजले इमारतीएवढा किंवा त्यापेक्षा मोठा,होता, फोर्ड मध्ये 32 वर्षात एवढे शिकले नाही, तेव्हढे ते kraysler मध्ये 3 वर्षात शिकले होते, लोकांचा craysler वरचा विश्वास उडाला,तो मिळवला,के कार, मिनीं व्हॅन, इ गाड्या बनवून प्रचंड नफा कमवून 7 वर्षासाठी घेतलेलं कर्ज 3 वर्षात फेडले, न craysler लाअमेरिकेची 3 नंबर ची कार कंपनी बनवले, लोक फक्त ली आय कोका चा फोटो पाहून कार बुक करायला लागले, त्यांना अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होण्यासाठी जोर होऊ लागला, पण त्यांनी ते नाही स्वीकारल,मला आय कोकाशी जोडुन द्या, फोर्ड ने डिअर ली, प्लिज परत ये,सगळं maf केलंय, असे मथळे वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले,स्वतःही राखेतून उभे राहिले, न craysler ला सुद्धा त्यांनी राखेतून उभ केलं,अशी झपाटून गेलेली ,अन धेयवेडी माणसे खिजगणतितच,सर्वांनी नक्की वाचावे असे हें ध्येयवेड्या लढाऊ बाण्याच्या ली आय कोका यांचं पुस्तक, लिहु तेवढ कमीच.................................. ...Read more

  • Rating StarVijayshree Agiwal

    Great Book

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 22-04-2018

    प्रेरणादायी जीवनप्रवास... शालेय जीवनात घडलेल्या एका घटनेमुळे, ‘हे जीवन जगत असताना सत्याने चालतानाही यश मिळेलच असे नाही’ अशी खूणगाठ मनात बांधली असली तरी सत्याच्याच मार्गाने चालत राहून एका स्थलांतरिताचा मुलगा म्हणून जीवनप्रवास सुरू करून वाहन उद्योगात च्च पदे भूषविणारे ‘ली आयकोका’ यांनी त्यांचे सहलेखक विल्यम नोव्हाक यांच्या सहयोगाने लिहिलेल्या ‘आयकोका - एक आत्मचरित्र’ या पुस्तकातून आपल्या संपूर्ण जीवनप्रवासाचे वर्णन केले आहे. आयकोका यांनी आपला जीवनप्रवास उलगडताना त्याची चार भागांत विभागणी केली आहे. प्रथम कौटुंबिक व शालेय जीवन, नंतर फोर्ड कंपनीत केलेली सेवा, ‘क्रायस्लर’ या कंपनीमधील दिवस आणि शेवटी ‘सीधी बात’ या भागातून सामाजिक प्रबोधनपर कार्य आणि अमेरिकेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी केलेले प्रयत्न अशा बाबींचा परामर्श घेतला आहे. ली आयकोको यांनी आत्मकथनातून मांडलेली कौटुंबिक स्थिती आणि इंजिनिअर होण्यापर्यंत केलेला प्रवास यामधून त्यांनी शिक्षणादरम्यान आलेल्या अनुभवांचे चित्रण केले आहे. ‘फोर्डची कहाणी’ या भागामधून, सर्वसामान्य कामगार म्हणून फोर्ड कंपनीमध्ये रुजू झाल्यानंतर अगदी कमी अवधीत सर्वच आघाड्यांवर आपला ठसा कसा उमटवला, हे सांगताना हितशत्रूंशी दिलेल्या त्रासाची वर्णने येथे केली आहेत. यातून ‘मॅस्टंग नावाची कार बाजारात आणून वाहन उद्योगाचा चेहरामोहरा कसा बदलून टाकला याची वर्णने येथे केली आहेत. ‘हेन्री फोर्ड’ यांच्यासह काम करताना त्यांना आलेल्या अनेक विदारक अनुभवांची जंत्री येथे दिली आहे. यश मिळवण्यासाठी त्यांना खूप मोठ्या प्रमाणात मानसिक संषर्घ करावा लागला आहे हे यातून दिसून येते. ‘क्रायस्लरची कथा’ या भागामधून ‘ली आयकोका’ फोर्डमधून बाहेर पडल्यानंतर, त्यांनी बाहेर पडलेल्या अन्य व्यक्ती आणि काही निवृत्त अधिकारी यांना एकत्र घेऊन ‘क्रायस्लर’ या डबघाईला आलेल्या कंपनीला उर्जितावस्था प्राप्त करून देण्याचे प्रयत्न करताना सरकारला साकडे घालून आणि स्वत:मधील जिद्द आणि कल्पकता यांना परिश्रमाची जोड देऊन प्राप्त केलेल्या यशाची गाथा सांगितली आहे. वाहन उद्योगातील तत्कालीन महत्त्वाच्या ‘फोर्ड’ आणि ‘क्रायस्लर’ या दोन्ही कंपन्यांचे अध्यक्षपद भूषविण्याचे भाग्य लाभल्याचे नमूद करून आयकोका यांनी व्यवसायातील त्रुटी, सरकारी नियंत्रणाचा अतिरेक, ऊर्जेचे संकट आणि बाजारातील मंदी या कारणांमुळे तोट्यात गेलेल्या क्रायस्लर कंपनीला उभारी देण्यासाठी सुचविलेल्या उपाययोजनांच्या वर्णनातून त्यांची कामावर असलेली निष्ठा व दूरदृष्टी दिसून येते. ‘सीधी बात’ या शेवटच्या भागातून रस्ता सुरक्षेची उपाययोजना, समाजप्रबोधनासाठी केलेले कार्य आणि अमेरिकेला दिलेले आर्थिक सल्ले अशा विषयांचा ऊहापोह येथे केला आहे. सरकारने वेगवेगळ्या उद्योगांना दिलेली कर्जमाफी, संरक्षण क्षेत्रात होत असलेला खर्च, नासाचा अंतराळ कार्यक्रम, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अशा सर्व बाबी सविस्तरपणे स्पष्ट करून सरकारने करावयाच्या उपाययोजना सांगितल्या आहेत. आयकोका यांच्या या चरित्रातून कोणत्याही प्रसंगाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन, परिस्थिती हाताळण्याचे त्यांचे कसब आणि व्यवसाय करण्याचे त्यांचे तंत्र यांची मिळत असलेली माहिती उद्योजकांना प्रेरणादायी ठरेल अशीच आहे. आयकोका यांचे व्यक्तिमत्त्व ठळकपणे साकार होणाऱ्या या आत्मकथनाचा मराठी अनुवाद अतिशय वाचनीय आहेच परंतु स्वत: आयकोका रसिक वाचकांशी संवाद साधीत आहेत असे वाटणे यातच या अनुवादाचे यश आहे. -कमलाकर राऊत ...Read more

  • Rating Starसकाळ २५ फेब्रुवारी 2018

    क्रायस्लर कंपनीला दिवाळखोरीपासून वाचवल्याबद्दल ‘मीडिया स्टार’ बनलेले त्या कंपनीचे तत्कालीन अध्यक्ष, फोर्ड मोटर कंपनीचे तत्कालीन अध्यक्ष ली आयकोका यांचे हे आत्मचरित्र. उद्योगांतल्या घडामोडी ,त्यातले खाचखळगे ,युक्त्या अशा अनेक गोष्टी आयकोका यांनी अगदी िनधास्तपणे मांडल्या आहेत. उद्योगांमधली सत्तास्पर्धा ,आशा –निराशेचे हिंदोळे, चुका, कायदेशीर-तांत्रिक बाबी ,संघर्ष ,नेतृत्वाचा आदर्श अशा अनेक गोष्टींवर त्यांनी प्रकाश टाकला आहे. योग्य त्या ठिकाणी त्यांनी आपलं खास तत्वज्ञान ,विचारही मांडले आहेत. विल्यम्स नोव्हाक त्यांचे सहलेखक आहेत .अशोक पाथरकर यांनी अनुवाद केला आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more