* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788184988772
  • Edition : 3
  • Publishing Year : 1983
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 232
  • Language : MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
  • Discount : OCTOBER EXHIBITION 2026(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE AUTHOR WHO IS NOW AN ASSOCIATE PROFESSOR IN THE DEPARTMENT OF EDUCATION AND SOCIAL SCIENCES IN NASHIK BELONGS TO THE NOMADIC JOSHI (ASTROLOGERS LOW IN THE CASTE HIERARCHY) TRIBE IN MAHARASHTRA. GABAL IS HIS AUTOBIOGRAPHY WHICH COVERS HIS CHILDHOOD AND EARLY YOUTH. AS HIS FAMILY HAD NO PERMANENT RESIDENCE, DADASAHEB HARDLY HAD AN OPPORTUNITY TO ATTEND SCHOOL, AND UNTIL THE AGE OF ALMOST SEVEN, HE TOOK TO THE FAMILY TRADITION OF BEGGING AND EARNING HIS LIVELIHOOD. AGAINST ALL ODDS SUCH AS ABJECT POVERTY, SUPERSTITION, DISCOURAGEMENT FROM THE ELDERS IN THE COMMUNITY, DADASAHEB CONTINUED HIS EDUCATION UNTIL GRADUATION. AFTER COMPLETING HIS HIGHER SECONDARY, HE SUPPORTED HIS EDUCATION INITIALLY BY DOING MENIAL JOBS AND LATER ACTING, AND BY SCHOLARSHIP. THE TITLE OPENS A WINDOW ON THE LIFE OF THE DOWNTRODDEN, AND PARTICULARLY THEIR DIALECT.
मानव समाजातीलच एक घटक, ज्याला स्वत:चे असे अस्तित्व नाही अशा घटकाचे- `कुडमोडे जोशी` या जातीचे- जीवन विस्तारित स्वरूपात येथे आले आहे. या पुस्तकातील प्रत्येक पात्र आज या सत्य परिस्थितीला तोंड देत आहे. भटक्या जमातीची दु:खे, त्यांच्या व्यथा, वेदना, स्त्रियांचे पशुतुल्य जीवन, त्यांच्या रूढी, परंपरा, चालीरीती, अंधश्रद्धा, अशिक्षितपणा याविषयीचा सत्य वृत्तान्त यात सादर केला गेला आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #GABAL #GABAL #गबाळ #AUTOBIOGRAPHY #MARATHI #DADASAHEBMORE "
Customer Reviews
  • Rating StarSrikant Birajdar

    वाचून डोकं सुन्न करणारा पुस्तक. लेखक दादासाहेब मोरे त्यांना जेव्हा पासून समजायला लागलं, तेव्हा पासून ते ज्या जमातीत जन्मला आले त्या भटक्या जमातीची दुःखी व्यथा, त्यांची समाजात होत असलेली उपेक्षा, त्याचं जीवन हे या पुस्तकात उभं करण्याचं प्रयत्न केलाआहे. मिरज तालुक्यातील बाजार सलगरे शहरवजा खेडेगाव असलेल्या ठिकाणी एका कोंडिबा कुंभाराच्या शेतात ही भटकी जात वर्षातून एकदा नोव्हेंबर ते डिसेंबर एक महिना मुक्कामाला असायचा, दोन काठ्यावर पोती टाकून तयार केलेलं पाल म्हणजेच त्यांच घर. पालासमोर तीन दगड आणून ठेवायचे, रानातून लांकड गवऱ्या गोळा करून आणायचा. आणि आपली चूल पेटवायची. पाला समोर एक मोठा दगड आणून ठेवायचे, आणि त्यावर बसून अंघोळ करायची. बायकांनी देखील तिथंच अंघोळ करायची. त्याना लाज वाटायची नाही, बहुतेक त्यांच्या जीवनाच्या हिशोबात राजेच खातं उघडलं नसावं. त्या पाच एकरात जत्रा भरवल्या सारखी असायची. फक्त दुःख आणि लाचारी यांची देवघेवचं या जत्रेत चालत होती.अश्या पालाच्या जमातीत लेखक जीवन जगत मोठे झाले. दुसऱ्यांना खोटं सांगून त्याच्या कडून एखादं कोंबडी घेऊन खोटं म्हणजे तुझ्या घरात सूख निर्माण करतो, तुझ्या मुलांनी तु़झ ऐकांव असं करतो, तुझ्या संपत्तीत बरकत निर्माण करतो. असे खोटे सांगून त्या बदल्यात एखादी कोंबडी घ्यायची. या समाजाला समजत नाही का..? आम्हाला संपत्तीच्या शिखरावर उंभ करणारा माणूस भाकरीच्या तुकड्यासाठी दारोदार भीक का मागत फिरतो ? सुखी होण्याच्या खोठ्या आशेने समाज अश्या लोकांना कोंबड्या देतो. हे नवलच आहे. ...Read more

  • Rating StarPROF. DATTA JADHAV

    आदरणीय दादासाहेब, आपलं आत्मचरित्र वाचलं. थक्क झालो. मनाला विश्वास बसत नव्हता. एखादा काल्पनिक, जीवनपट वाटत होता. हे सर्व काल्पनिक नसून वास्तविक आहे, याने जगण्याला बळ व अस्तित्व नसणाऱ्याना आत्मभान मिळते. आपल्या सहचरिणी सौ. विमल मोरे यांचे आत्मकथन प्रमतः वाचले, तद्नंतर पुढील आयुष्याबद्दल अगम्य राहिला असता. अशा समाजातील व्यक्ती शिकून स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो. स्वाभिमानाने हे केवळ भारतीय संविधानामुळेच स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ही आपल्या समाजाला इतका संघर्ष करावा लागतो, हालअपेष्टा सहन कराव्या लागतात, त्या केवळ भारतीय संविधानाची योग्य व पूर्णता अंमलबजावणी न केल्यामुळेच. तुमच्या जीवनातील मानका आईचे स्थान अनन्यसाधारण असे आहे. देव दगडात नसतो, तो माणसात असतो. अशिक्षित असूनही आपल्या वडिलांनी तुमच्या शिक्षणासाठी खूप त्याग केला. स्वतःच्या मुलीच्या लग्नात ते नवीन कपडेही घेऊ शकले नाहीत, हा त्याग पराकोटीचा आहे. जतला शिक्षणाला असताना तुम्ही जत ते इंचलकरंजी केलेला प्रवास आई मुलाचे निस्सिम व प्रखर प्रेम व्यक्त करते. आपल्या आयुष्यात गुरुचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असते. लाड, पाटील यांनी तुम्हास आत्मबळ दिले असे गुरुजण आज तुरळक आहेत. घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा स्नेहजिव्हाळा, नकोत नुसती नाती. आपल्या घरांना मातीच्या भिंती कदाचित त्या काळात नव्हत्या पण प्रेम, स्नेह, जिव्हाळा, त्याग, विश्वास यांच्या भिंती अभेद्य होत्या. या भिंतीच आज जागतिकीकरणाच्या काळात धूसर झाल्या आहेत. सर्वकाही असूनही जे लोक नशिबाला दोष देतात त्यांच्यासाठी आपले आत्मचरित्र एखाद्या मार्गदर्शकासारखे आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 5-6-2016

    मराठी साहित्यात आत्मकथन हा एक प्रमुख प्रवाह आहे. आत्मकथन हे कित्येकदा आयुष्याच्या एका टप्प्यावर मागे वळून पाहण्याच्या इच्छेने केलेले असते तर कधी गत आयुष्यातील घटनांच्या स्मृतींचा, त्यांच्या अवलोकनाचा पट असतो. कधी समाजातील उपेक्षित, शोषित वर्गाचे वेदनमय कथन असते. ‘गबाळ’ हे दादासाहेब मोरे लिखित आत्मकथन म्हणजे ‘कुडमुडे जोशी’ या जमातीचे भटक्या अस्तित्वहीन, पीडित वर्गाच्या पशुतुल्य जीवनाची वेदनामय करुण कहाणी आहे. ‘गबाळ’मध्ये लेखकाच्या बालपणापासून दु:खाची परिसीमा नसलेले जे उपभोग वाट्याला आले व आजही ती जमात तेच दारुण जीवन जगत आहे त्याचे वास्तव चित्रण आहे. भटक्या जीवनाचा अनुभव घेत पोटापाण्याचा कोणताही व्यवसाय न करणारी ही जमात भीक मागून पोट भरते. गावकुसाबाहेर पालं टाकून गावागावातून भीक मागत फिरणे हेच प्राक्तन. समाजातील इतर जमाती यांच्याकडे चोर म्हणून बघून त्यांना पशुतूल्य वर्तणूक देतात. पिंगला पक्ष्याच्या माध्यमातून लोकांना भविष्यकथन करणे व त्याबद्दल भाकरीचे तुकडे मिळवणे हा त्यांचा उद्योग. हे भविष्यकथन म्हणजे समाजातील अंधश्रद्धा, अज्ञान, रुढी, अशिक्षितपणाचे वास्तव कथन. लेखकाचे वडिलांना आपल्या मुलाने शाळेत जावे, शिकावे व या लाजिरवाण्या अवस्थेतून बाहेर पडावे असे वाटत होते. वडिलांच्या खंबीर पाठिंब्यामुळे लेखक शाळेत जाऊ शकला. लेखक म्हणतात,‘‘मी भीक मागायला जात होतो व अभ्यासही करत होतो. माझ्या जीवनाचे दोन रस्ते निर्माण झाले होते. मी कोणत्या रस्त्यावरून जाणार होतो ते मलाच माहीत नव्हतं.’’ शिकत असताना लेखकाला अनेक शिक्षकांची, सहृदय व्यक्तींची, आजीची मोलाची मदत मिळत गेली - निंबोणी गावचे गुरुजी, पाटील गुरुजी - पण अनेक वेळा पैशाअभावी शाळा सोडण्याची पाळी आली व ‘हाडप’हाती आलं. भाकरी मागण्यासाठी कधी भगुली घेऊन दारोदार फिरत होतो. शालेय जीवनातून लाचार जीवनात प्रवेश केला होता. आत्महत्या करावी असं वाटत होतं. एस.एस.सी.ला फर्स्ट क्लास मिळवून लेखकाने जिद्दीने यश मिळवलं होतं. महाविद्यालयीन शिक्षणासाठी ग्रामपंचायतीत बोटींग मशीनवर, गटार साफ करणे ही कामे केली. महाविद्यालयीन काळात लेखकाच्या जीवनात एक वेगळं वळण आलं. गॅदरिंगमध्ये नाटकात कामे करणे, कलापथकात काम करणे यामुळे एका सहृदय व्यक्तीमुळे तेथील गणेशोत्सवात काम व पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. महाविद्यालयातील देवधर सरांमुळे होस्टेलची सोय झाली. शिक्षणाचा व कलेचाही विकास होत होता. अत्यंत बिकट परिस्थितीशी सामना करत, कित्येकदा उपाशीपोटी राहूनही लेखकाने शिक्षण पूर्ण केले. पण त्यांच्या जमातीची परिस्थिती मात्र तशीच होती व आहे. लेखकाने एक दाहक सत्य सांगितलं, गबाळ घेऊन गावोगाव फिरण्याचं. ‘आमच्या जमातीतील प्रत्येक माणूस, रानातच जन्माला येत होता व रानातच मरत होता.’ कुडमुड्या जोशींचं हे निराशादायक चित्र लेखकाने उभं केलं आहे. तरीही त्याच्या मनात एक आशादायक चित्र उभारताना दिसलं. ‘मनात अनेक पहाटा उजाडल्या होत्या. वाट पहात होतो प्रत्यक्ष जीवनात पहाट उगवण्याची.’ ...Read more

  • Rating StarDAINIK AIKYA 2-7-2016

    मानव समाजातीलच एक घटक, ज्याला स्वत:चे असे अस्तित्व नाही अशा घटकाचे- ‘कुडमोडे जोशी’ या जातीचे- जीवन विस्तारित स्वरूपात येथे आले आहे. या पुस्तकातील प्रत्येक पात्र आज या सत्य परिस्थितीला तोंड देत आहे. भटक्या जमातीची दु:खे, वेदना, स्त्रियांचे पशुतुल्य जीन, त्यांच्या रूढी, परंपरा, चालीरीती, अंधश्रद्धा, अशिक्षितपणा याविषयीचा सत्य वृत्तान्त यात सादर केला गेला आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

PRATIKSHA
PRATIKSHA by RANJEET DESAI Rating Star
Mahesh Muley

अतिशय सुंदर पुस्तक, आयुष्य जगताना खूप काही हरवले आहे वाटते पण हे पुस्तक नव्याने जगायला आणि आहे ती परिस्थिती स्वीकारायला वाटा शोधायला नवीन प्रेरणा देते, सध्या समाजाची स्थिती बदलली असताना स्त्रियांना आणि त्यांच्या भावनांचा विचार करण्यासाठी नैतिकता जागेकरण्याला हे रणजीत देसाई लिखित पुस्तक खूपच महत्त्वाचे ठरेल... ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
विजय भास्कर, अमरावती

*दुर्दम्य : दहा कोटीत एक असा अजब ऑफिसर* *प्रामाणिकपणाचा दर्प, माणुसकीचा स्पर्श आणि एकाकी आयुष्याची कहाणी. काही माणसं आपल्या आयुष्यात येतात, आपल्या कामाचा आणि जगण्याचा ठसा उमटवतात; पण त्यांना एका शब्दात चांगलं किंवा वाईट ठरवणं कठीण अतं. त्यांच्या स्वभावातील विरोधाभासच त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवतात. ‘दुर्दम्य – अजब ऑफिसरची गजब गोष्ट’ हे जी. बी. देशमुख यांचं पुस्तक अशाच एका विलक्षण व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देतं. केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात सुमारे पंचवीस वर्षे सहकारी म्हणून अनुभवलेले सी. व्ही. कृष्णन एकनाथानन, म्हणजेच एकनाथन, यांचं व्यक्तिचित्र लेखकाने कोणताही कृत्रिम मुलामा न देता रेखाटलं आहे. त्यांच्या कठोर शिस्तीमागची तत्त्वनिष्ठा, विचित्र वाटणाऱ्या सवयींमागची भूमिका आणि एकाकीपणाच्या आड दडलेली माणुसकी उलगडत जाते. त्यामुळे हे केवळ एका अधिकाऱ्याचं चरित्र राहत नाही; ते माणसाला समजून घेण्याचा प्रयत्न ठरतं. *पहिली भेट : हात मागे घेतला!* ४ जुलै १९८८. चंद्रपूरहून अमरावतीला बदली होऊन आलेल्या लेखकाची एकनाथन यांच्याशी पहिली भेट. उंच, धिप्पाड आणि गंभीर व्यक्तिमत्त्वाच्या या अधिकाऱ्यांसमोर लेखकाने हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत एवढंच म्हटलं— “So you are reporting today. Okay.” या कोरड्या प्रतिसादातून त्यांच्या स्वभावाची पहिली झलक दिसते. मात्र, पुढे लेखकाने दिलेल्या टंकलेखनाच्या कामाची अचूकता पाहून आणि तो मेजर पी. के. बापट यांच्याकडे काम करून आल्याचं समजल्यावर एकनाथन म्हणाले— “Only a military man can carve out such workers. I am impressed.” कडक शिस्तीचा आग्रह धरणारा हा अधिकारी गुणवत्तेची दखल घ्यायलाही तितकाच तत्पर होता. पहिल्या भेटीत हात मागे घेणारा माणूस कामातील गुणवत्तेसमोर मात्र मनमोकळेपणाने दाद देतो. इथूनच या व्यक्तिमत्त्वातील विरोधाभासांची रंजक ओळख सुरू होते. *दोन रुपये चाळीस पैशांतून दिसलेलं तत्त्वज्ञान* एका व्यापाऱ्याकडून चुकून दोन रुपये चाळीस पैसे जास्त घेतले गेल्याचं लक्षात आल्यानंतर एकनाथन यांनी ती रक्कम परत करण्यासाठी स्वतःचे शंभर रुपये खर्च करून माणूस पाठवला. रक्कम छोटी होती; पण हिशेबातील तत्त्व मोठं होतं. त्यांच्या दृष्टीने पैशाची किंमत त्याच्या रकमेवर नव्हे, तर तो योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचण्याच्या प्रामाणिकपणावर ठरत होती. नियम पाळताना ते कोणतीही तडजोड करत नसत. मात्र, कर्मचाऱ्याचा न्याय्य लाभ असेल, तर त्याला मंजुरी देण्यासही ते मागेपुढे पाहत नसत. नियमभंग करणाऱ्यांसाठी कठोर आणि हक्कासाठी पात्र असणाऱ्यांसाठी तत्पर, ही त्यांच्या कार्यपद्धतीची दोन टोकं होती. त्यांची वक्तशीरपणाची कल्पनाही विलक्षण होती. उशिरा येणं चुकीचं; पण वेळेच्या खूप आधी येणंसुद्धा शिस्तीच्या चौकटीबाहेरचं! “Before time is also not the right time.” या भूमिकेतून त्यांच्या नियमप्रियतेचा अतिरेक जाणवतो; पण त्याच वेळी प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःची एक काटेकोर चौकट असणारा माणूसही दिसतो. *शिस्तीच्या पोलादी चौकटीमागचा माणूस* एकनाथन यांची शिस्त कधी कधी इतरांना विक्षिप्तपणाच्या जवळ जाणारी वाटे. स्फोटक कारखान्यातील सुरक्षानियमांचं काटेकोर पालन असो किंवा बंदुकीच्या हाताळणीतील खबरदारी, नियम म्हणजे केवळ कागदावरचे शब्द नव्हेत, अशी त्यांची धारणा होती. पण या कठोरतेला दुसरी बाजूही होती. कार्यालयातील शिपाई पत्नी-मुलांसह त्यांच्या वातानुकूलित दालनात झोपलेला आढळला. अशा वेळी कारवाई होईल, अशी अपेक्षा असताना एकनाथन यांनी त्याला विचारलं, “तुम हमारे चेंबर मे सोता?” या प्रश्नात नियम मोडल्याची जाणीव होतीच; पण त्याहून आधी दुसऱ्या माणसाच्या परिस्थितीची जाणीव होती. त्यांच्या स्वभावातली ही माणुसकी मोठ्या भाषणांतून नव्हे, तर अशा छोट्या प्रसंगांतून व्यक्त होते. म्हणूनच त्यांचं व्यक्तिचित्र एकरेषीय होत नाही. *एकटेपणाचा स्वीकार की त्याची किंमत?* एकनाथन यांनी अविवाहित राहणं, मोजक्याच वस्तूंमध्ये आयुष्य घालवणं, दूरचित्रवाणी-रेडिओपासून दूर राहणं आणि सामाजिक समारंभ टाळणं पसंत केलं. स्वतःच्या अवकाशाबाबत ते अत्यंत आग्रही होते. नातेसंबंधांच्या गर्दीपेक्षा एकांत त्यांना अधिक जवळचा वाटत होता. मात्र, आयुष्याच्या उत्तरार्धात आजारपणाने त्यांची शारीरिक स्वायत्तता हिरावून घेण्यास सुरुवात केली. कर्करोगावरील उपचारांसाठी केरळला गेल्यानंतर भावाच्या घरी राहणंही त्यांना अवघड वाटलं. आपल्यामुळे भावाच्या कुटुंबाला गैरसोय होऊ नये, या विचाराने त्यांनी हॉटेलमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. स्वाभिमान आणि स्वावलंबन यांची ही भूमिका समजण्यासारखी असली, तरी तिची किंमत एकटेपणाच्या रूपाने मोजावी लागते. लेखकाने दिलेल्या वडिलांच्या जुन्या पलंगावर अखेरच्या काळात त्यांना आधार मिळाला, हा तपशील मनाला स्पर्शून जातो. आयुष्यभर व्यवहारात काटेकोर राहिलेल्या एकनाथन यांनी त्या पलंगाचा स्वीकार केला. काही नाती शब्दांनी नव्हे, तर अशा साध्या कृतींनी व्यक्त होतात. २०१९ मध्ये मोठ्या शस्त्रक्रियेनंतर त्यांनी लेखकाला म्हटलं— “Is this life, Deshmukh? I have to struggle for reaching even upto toilet.” आणि त्यानंतरची त्यांची विनंती अधिक बोलकी होती— “Try to come more frequently. I know it is a long distance. But I need to talk to someone like you with whom I can interact.” जगापासून अंतर राखणाऱ्या माणसालाही अखेरीस संवादाची गरज भासते. दुसऱ्या दिवशी त्यांचं निधन झालं. आयुष्यभर स्वावलंबनाचा आग्रह धरणाऱ्या या माणसाच्या शेवटच्या शब्दांत मात्र सोबत हवी असल्याची साधी, मानवी ओढ होती. *दहा कोटीत एक हीच खरी ओळख* एकनाथन यांच्यात दोष नव्हते, असं लेखक सांगत नाही. त्यांच्या कठोरतेचा अतिरेक, सामाजिक अलिप्तता आणि विचित्र वाटणाऱ्या सवयी लपवण्याचाही प्रयत्न करत नाही. यामुळेच हे व्यक्तिचित्र अधिक विश्वासार्ह बनतं. एखाद्या माणसाचं मोठेपण सिद्ध करण्यासाठी त्याला निर्दोष ठरवण्याची गरज नसते. निवृत्तीपूर्वी एकनाथन यांनी लेखकाला विचारलं होतं, आपण गेल्यानंतर लोक आपल्याला चांगलं म्हणतील की वाईट? त्यावर लेखकाने दिलेलं उत्तर या पुस्तकाच्या शीर्षकाचा अर्थ उलगडतं— “I won`t tell people as to whether he was a good man or bad man, but whenever such reference comes I would certainly say that he was a man one in ten crore!” ‘दहा कोटीत एक’ ही उपाधी म्हणजे एखाद्या माणसाला देवत्व देणं नव्हे. ती त्याच्या असामान्य व्यक्तिमत्त्वाची, तत्त्वांशी असलेल्या निष्ठेची आणि सहज वर्गीकरणात न मावणाऱ्या स्वभावाची नोंद आहे. एकनाथन यांचं व्यक्तिमत्त्व समजून घेताना ‘अंतरंगीचे आभाळ : एक काव्यवर्तुळ’ या काव्य संग्रहातील ‘माणसातले सुंदर गुण’ ही कविता आठवते. “संकट येता कुणाचा हात पुढे सरतो; नाव न विचारता माणूस माणसाला धरतो.” एकनाथन यांच्या आजारपणात लेखकाने केलेली मदत आणि चंदूभाऊ पवार यांनी दाखवलेली माणुसकी या ओळींना जगण्याचा संदर्भ देतात. माणुसकी नेहमी गोड शब्दांतूनच व्यक्त होते असं नाही. कधी ती एखाद्याच्या हक्कासाठी ठामपणे उभी राहते, कधी चुकीच्या गोष्टीला विरोध करते, तर कधी आजारी माणसाच्या एकटेपणात त्याला संवादाची सोबत देते. एकनाथन यांच्यातील गुण आणि मर्यादा दोन्ही समजून घेताना ही कविता माणसाकडे पाहण्याची एक खिडकी उघडते. कारण माणसातले सुंदर गुण गाजावाजा करून येत नाहीत; ते एखाद्या कृतीतून, एखाद्या स्पर्शातून किंवा दुसऱ्याच्या दुःखापाशी थांबण्यातून प्रकट होतात. कवितेच्या शेवटच्या ओळींत म्हटल्याप्रमाणे— “माणूस जपता माणूस— अंतरी उघडे आभाळ.” कदाचित एकनाथन यांच्या आयुष्याकडे पाहण्याची हीच एक दृष्टी असू शकते. त्यांच्या सगळ्या स्वभाववैशिष्ट्यांशी सहमत न होताही त्यांच्यातील माणूस समजून घेणं, हीच या पुस्तकाची आणि त्यातून मिळणाऱ्या अनुभवाची खरी कमाई आहे. जी. बी. देशमुख यांनी आठवणींच्या आधारे उभं केलेलं हे व्यक्तिचित्र वाचकाला एका प्रश्नासमोर उभं करतं—माणसाला त्याच्या गुणदोषांच्या बेरजेतून समजून घ्यायचं, की त्याच्या संपूर्ण जगण्याच्या संदर्भात? ‘दुर्दम्य’ हे पुस्तक एका अजब अधिकाऱ्याची गजब गोष्ट सांगतं; पण त्याचबरोबर शिस्त, स्वाभिमान, माणुसकी आणि एकटेपणा यांच्या सीमारेषांवरही विचार करायला लावतं. काही माणसं आपल्याला आवडतात म्हणून लक्षात राहत नाहीत; ती आपल्याला विचार करायला भाग पाडतात म्हणून लक्षात राहतात. एकनाथन हे त्यापैकीच एक. माणसाला समजून घेण्याची, त्याच्या गुणदोषांसह त्याच्याकडे पाहण्याची आणि माणुसकीच्या अर्थाचा नव्याने शोध घेण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकाने ‘दुर्दम्य – अजब ऑफिसरची गजब गोष्ट’ हे पुस्तक अवश्य वाचावं. कारण काही पुस्तकं केवळ एका व्यक्तीची ओळख करून देत नाहीत; ती आपल्याला माणसांकडे पाहण्याची नवी दृष्टी देतात. हे पुस्तक त्यापैकीच एक. ..... विजय भास्कर , अमरावती ...Read more