* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: THE LAST GIRL
 • Availability : Available
 • Translators : SUPRIYA VAKIL
 • ISBN : 9789353173227
 • Edition : 1
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 324
 • Language : Translated From ENGLISH to MARATHI
 • Category : AUTOBIOGRAPHY
Quantity
THE LAST GIRL: MY STORY OF CAPTIVITY, AND MY FIGHT AGAINST THE ISLAMIC STATE IS AN AUTOBIOGRAPHICAL BOOK BY NADIA MURAD IN WHICH SHE DESCRIBES HOW SHE WAS CAPTURED AND ENSLAVED BY THE ISLAMIC STATE DURING THE SECOND IRAQI CIVIL WAR. THE BOOK EVENTUALLY LED TO THE 2018 NOBEL PEACE PRIZE BEING AWARDED TO MURAD.
नोबेल शांतता पुरस्कार विजेतीची कहाणी़...नादिया मुराद ही अत्यंत धाडसी यजिदी तरुणी आहे. तिनं इसिसची लैंगिक गुलामगिरी सोसली आहे. तिनं कल्पनातीत यातना आणि अपमान भोगला आहे. नादियाच्या सहा भावांना गोळ्या घालून ठार करण्यात आलं आणि त्यानंतर काही काळातच, तिच्या आईलाही ठार मारण्यात आलं. त्यांचे मृतदेह सामूहिक कबरींत लोटण्यात आले...पण तिनं लढा दिला...इराकमधील तिचे बालपणीचे शांततामय दिवस... घरच्यांचा कायमचा वियोग आणि अमानुषतेचा सामना... ते जर्मनीत लाभलेली सुरक्षितता यादरम्यानचा प्रवास या आत्मकथनातून उलगडत जातो.

Keywords
# द लास्ट गर्ल # नादियामुराद # जेन्नाक्रेजस्की #सुप्रिया वकील #नोबेलशांततापुरस्कार #आयसिस #NOBELPRIZE #THELASTGIRL #NADIAMURAD #SUPRIYAVAKIL #MEEMALALA #YAZIDI #IRAQ #ISLAMIKSTATES
Customer Reviews
 • Rating StarRashmi Thorat - Kute

  आज नादिया मुराद ह्यांचे सुप्रिया वकील ह्यांनी अनुवादित केलेले `द लास्ट गर्ल` हे पुस्तक वाचून झाले..वाचल्यानंतर मन सुन्न झाले..नादिया ह्यांच्या बंदीवासाची आणि इस्लामिक स्टेट विरुद्धच्या लढाई ची ही कहाणी आहे..2014 मध्ये जेव्हा इसिस ने नादिया ह्यांचे कोो गाव ताब्यात घेतलं तेव्हा त्यांनी गावातील सगळ्या यजीदी पुरुषांना ठार मारले आणि मुलींना आणि विवाहित स्रियांना गुलाम बनवले..नादिया च्या डोळ्यासमोर तिच्या सहा भावांना गोळ्या घातल्या..तिच्या वर इसिस ने लैंगिक अत्याचार केले, तिचा अमानुष छळ केला, तिला धर्मांतर करायला भाग पाडले. त्यानंतर नादिया तिथून पळून जाण्यात यशस्वी झाली..आणि परत नव्याने उभी राहिली.. आता `यजदा` ह्या यजीदींच्या हक्कासाठी लढणाऱ्या संघटनेसोबत ती काम करतीये..तिला नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून ती सयुंक्त राष्ट्रसंघाची पहिली सदिच्छादूत आहे..नादिया चा प्रेरणादायी संघर्ष नक्की वाचा.. ...Read more

 • Rating StarMedha Gulavani

  नादिया मुराद लिखित द लास्ट गर्ल हे पुस्तक सध्या मी वाचत आहे. ब-याच दिवसांनी असे पुस्तक मला वाचायला मिळाले. पुस्तक वाचनिय आहे. नोबेल शांतता पुरस्कार विजेती नादिया मुराद यांनी हे पुस्तक त्यांच्या बंदिवासाची आणि इस्लामिक स्टेट विरुध्दच्या लढ्याची आहे.पुस्तकातून प्रेरणा नक्कीच मिळते. ...Read more

 • Rating StarSangeeta Deshmukh-Deshpande

  इराकच्या छोट्याशा गावात राहणारी नादिया , समाधानी व आनंदी असते.यजुदी धर्माचे काही कुटुंब कोचो नावाच्या गावात राहात असतात.ती १३/१४वर्षांची असतानाच,इसिस ने त्यांचे गाव ताब्यात घेऊन पुरूषांना गोळ्या घालून ठार करतात.तर मुलींना सेक्स गुलाम म्हणून विकतात, ब्षीस देतात.अतोनात छळ केला जातो.या सगळ्या दुष्ट चक्रात , नादिया व तिच्या मैत्रिणी, बहिणी अडकतात, काय, किती भंयकर वास्तव बघायला आणि सहन करावे लागते.त्या सगळ्यातून सुटका कशी करून घेते.हा अंगावर काटा आणणारा ,तिचा प्रवास या पुस्तकात शब्दबद्ध केला आहे. ती संयुक्त राष्ट्रसंघाची सदिच्छा दूत आहे. मेहता पब्लिशिंग हाऊस ने ,हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. ...Read more

 • Rating Starसंदीप रामचंद्र चव्हाण

  कल्पनातीत अन्याय-अत्याचार सोसूनही खचून न जाता त्या अत्याचाराच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या एका तरुणीची ही कहाणी आहे.. द लास्ट गर्ल.. नादिया मुराद!! इराकचा हुकूमशहा सद्दाम हुसेनच्या पाडावानंतर इराकमधील सुन्नी गटाच्या अबू-बखर-अल-बगदादीने (जो नुकताच माला गेला) `इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया` (आयसिस) या दहशतवादी संघटनेची स्थापना केली. आयसीसीने इराक मधील मोठे तेल क्षेत्र ताब्यात घेऊन तेल आणि खंडणीवसुलीतून भरपूर पैसा आणि शस्त्र मिळवली. त्या जोरावर त्यांनी आतांकी दहशत माजवून संपूर्ण इराकमध्ये खलिफाची राजवट आणण्याचे स्वप्न पाहिले. या स्वप्नाच्या आड येणाऱ्यांचा क्रूरपणे खात्मा करण्याचा त्यांनी सपाटा लावला. २०१४ मध्ये इराकमधील मोसुल प्रांतातील त्यांच्या दृष्टीने `काफिर` असणाऱ्या आणि कोणताही धर्मग्रंथ नसणाऱ्या `यजीदींना` त्यांनी लक्ष बनवले आणि २०१४/१५ दरम्यान खूप मोठ्या संख्येने यजीदींचा नरसंहार घडवला. [त्याच काळात आयसिसने इराकमधील ३९ भारतीय बांधकाम मजुरांना बंदी बनवून ठार मारले होते.] जागतिक महासत्तांचे तेलाचे राजकारण, त्यांची शस्त्रस्पर्धा, दहशतवाद्यांना मिळणारे वेगवेगळ्या देशांचे छुपे किंवा उघड पाठबळ, दहशतवादी संघटनांची टोकाची धार्मिक कट्टरता, धर्माच्या नावाने त्यांनी चालवलेला नंगानाच इत्यादी जागतिक समस्या बनलेल्या अनेक गोष्टी सामान्यांच्या आयुष्याची कशी धूळधाण उडवतात याचे बोलके उदाहरण म्हणजे इराकमधील यजीदींचे झालेले हत्याकांड होय. I want to be the last girl in the world with a story like mine. अशी कहाणी असलेली मी जगातली शेवटचीच मुलगी असावी..२०१८ च्या शांतता नोबेल पुरस्काराची मानकरी नादिया मुराद हिच्या आत्मकथेतील हे शेवटचे वाक्य आहे. नादिया मुराद ही इराकमधील सर्वसामान्य यजीदी कुटुंबातील २१ वर्षाची तरुणी. मोठा कुटूंबकबिला आणि बेताचे उत्पन्न तरीही आनंदीत असणाऱ्या या कुटुंबावर आणि त्यांच्या `कोचो` गावावर २०१४ साली आयसिसची वक्रदृष्टी पडली. आयसिसने नादीयाच्या गावातील सगळ्या रहिवाशांना एका शाळेत नेऊन त्यांची पुरुष, लहान मुले, विवाहित तरुणी, अविवाहित तरुणी, वयस्कर स्त्रिया अशी विभागणी केली. सर्वच्या सर्व पुरुषांना आणि वयस्कर स्त्रियांना एकाचवेळी ठार मारून सामूहिक कबरीत त्यांचे दफन केले. लहान मुलांना ब्रेनवॉश करून आयसिसमध्ये सहभागी होण्यासाठी दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षण संस्थेत पाठवले. इराकमधील इतर ठिकाणी पकडलेल्या यजीदी तरुणींप्रमाणेच कोचोमधील विवाहित-अविवाहित तरुणींना सेक्स गुलाम (सेक्स स्लेव्ह) म्हणून विकायला आणि वापरायला त्यांनी सुरवात केली. फेसबुक आणि इंटरनेटवर या तरुणींची एखाद्या वास्तूप्रमाणे विक्रिची जाहिरात दिली. इराक आणि सीरिया येथील वेगवेगळ्या ठिकाणच्या दहशतवादी गटामध्ये भेट म्हणून त्यांना वाटले गेले. या काळात हजारो यजीदी तरुणींना रोजच्या रोज अनेकवेळा बलात्कार सोसावे लागले. कोचो गावामध्ये घडलेल्या हत्याकांडात आयसीसीने नादिया मुरादच्या सहा भावांना आणि आईलाही मारले, तिच्यासह सर्व बहिणींना, वहिनींना, भाच्याना सेक्स गुलाम (सबिया) बनवले आणि इराक, सीरियामधील वेगवेगळ्या दहशतवादी कँम्पमध्ये पाठवले. आणि एका आनंदी, मोठ्या कुटूंबाची त्यांच्या गावाबरोबरच पूर्ण वाताहत झाली. सुरुवातीला नादियाचा एकच मालक होता त्याचे नाव हाजी सलमान. तो पेशाने न्यायाधीश होता आणि त्याचा खूप दरारा होता. तो नादियाला प्रचंड मारहाण करत असे, बलात्कारापूर्वी मेकअप करायला लावत असे, मध लावलेले त्याचे तळवे तिला चाटायला लावत असे. नादियाने त्याच्या तावडीतून पळून जाण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आणि ती पकडली गेली तेव्हा त्यानं तिला चाबकानं फोडून काढलं आणि नग्न करून आपल्या सहा सुरक्षारक्षकांना बलात्कार करण्यासाठी तिच्यावर ‘सोडलं’ अगदी ती बेशुद्ध होईपर्यंत. या घटनेनंतर सलमानने तिला विकून टाकलं. ज्याने तिला विकत घेतले त्याने व त्याच्या ड्रायव्हरने तिच्यावर बलात्कार केला आणि तिला एका रस्त्यावरील चेकपोस्टवरच्या खोलीत बंद केलं.... चेकपोस्टवर येणाऱ्या-जाणाऱ्या कुणाही दहशतवाद्यासाठी! तिथे कोणीही तिच्यावर बलात्कार करू शकत होते. तीच्यावरच्या अत्याचाराचा हा प्रवास सतत तीन महिने सुरू होता. एके दिवशी चेकपोस्टवरून एक दहशतवादी तिला त्याच्या घरी घेऊन गेला आणि तिथून तिने धाडशी पलायन केले…!! यजीदी तरुणींवर झालेल्या पाशवी अत्याचारामुळे काही यजीदी तरुणींनी आत्महत्या केली. तर अनेकींची हत्या झाली. काही तरुणीं पळून जाण्याचा अनेकवेळा प्रयत्न करत असत परंतु त्यांच्या आजूबाजूला पसरलेला लालची, मुका, बहिरा आणि क्रूर समाज त्यांना पकडून पुन्हा आयसिसच्या ताब्यात देत असे. इराकमधील अशा भयानक वातावरणात सगळीकडे अराजकता माजली असताना, कौर्याची- छळाची परिसीमा गाठली असताना, आयसिसच्या ताब्यातील इलाख्यातील कोणीही व्यक्ती, सबियाला (सेक्स गुलामाला) मदत करेल याची तिळमात्र खात्री नसतानाही नादिया आयसिसच्या ताब्यातून पळून जाण्याचा दुसऱ्यांदा धाडशी प्रयत्न करते आणि एवढ्या बजबजपुरीत तिला आधार मिळतो तोही माणुसकीचा झरा- सहृदय मन असणाऱ्या एका सुन्नी कुटूंबाचा! या कुटुंबतील सर्वजण जीवावर उदार होउन नादियाला पळून जाण्यासाठी मदत करतात. तिला आसरा देतात, तिची खोटे ओळखपत्र बनवतात. पुढील प्रवासात पावलापावलावर असणारा धोका आणि पकडले गेलो तर क्रूरपणे ठार मारले जाण्याची शक्यता माहीत असूनही त्या कुटुंबातील `नासिर` तिचा खोटा `पती` बनतो आणि तिला सुरक्षितपणे कुर्दीस्तानमध्ये पोचवतो. या थरारक घटनाक्रमाची सविस्तर माहिती नादियाच्या आत्मचरित्रात वाचावयास मिळते. क्रूर आयसिसनं नादियाचा आवाज बंद करण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला... त्यांनी तिचं अपहरण केलं, तिला गुलाम बनवलं, तिच्यावर बलात्कार केला, तिचा अनन्वित छळ केला, आणि एका दिवसात तिच्या कुटुंबातील सात जणांचा जीवही घेतला. पण नादियानं गप्प राहण्यास नकार दिला. कोणत्याही स्त्रीवर लैंगिक अत्याचार झाल्यास त्याबद्दल वाच्यता करण्यास ती स्त्री किंवा तिचे कुटुंब घाबरते. समाज आपल्याला वाळीत टाकेल ही भीती त्यांना असते. विशेषतः आशियाई देशात हे प्रमाण जास्त दिसते. कारण समाजाचा आणि कायद्याचा धाक नसल्याने अत्याचार करणारा गुन्हेगार उजळ माथ्याने समाजात वावरत असतो आणि चुकी नसतानाही अत्याचारग्रस्त मात्र जगनिंदेला बळी पडतात. शिवाय अत्याचारग्रस्तांना न्याय मिळवण्यासाठीही अनेक त्रास सोसावे लागतात. त्रास सोसूनही न्याय मिळेल याची खात्री त्यांना नसते. यासारख्या अनेक कारणाने स्त्रिया मूकपणे अत्याचार सोसतात आणि त्यांचे कुटुंबीयही शांत राहण्यात धन्यता मानतात. त्याचा थेट फायदा गुन्हेगारांना मिळतो.. ते चेकळतात आणि नवीन गुन्हे करायला सिद्ध होतात. या उलट नादिया मुराद तिच्यावर झालेल्या अत्याचाराची जितकी होईल तितकी प्रसिद्धी करते. सगळ्या जगाला तिची (यजीदी तरुणींची) कहाणी समजावी म्हणून ती आत्मचरित्र लिहते. देशोदेशी जाऊन व्याख्यानातून तिची आपबिती सांगते. आयसिसने केलेला अत्याचारालाच त्यांच्याविरुद्धचे शस्त्र म्हणून ती वापरते आणि त्यांना आतंरराष्ट्रीय कोर्टात खेचते. शक्तिशाली राष्ट्रांना यजीदींना मदत करण्यासाठी आवाहन करते. अनाथ- बलात्काराची शिकार- गुलाम- निर्वासित असे आयुष्यानं नादियावर मारलेले सगळे शिक्के ती धुडकावते. त्याऐवजी तिनं स्वतःसाठी नवी बिरुदे तयार केली आहेत : ‘सर्वायवर’ म्हणजे भयानक आपत्तीतून वाचलेली व्यक्ती. यजिदींची नेता. स्त्रियांच्या हक्कांची पुरस्कर्ती. नोबेल शांतता पुरस्काराचे मानांकन मिळवणारी तरुणी. संयुक्त राष्ट्रसंघाची ‘सदिच्छा दूत’ आणि आता ‘लेखिका’. आज ती नरसंहाराचा बळी ठरलेल्या प्रत्येक यजिदीचा, दुर्वर्तनाची शिकार ठरलेल्या प्रत्येक स्त्रीचा, मागे उरलेल्या प्रत्येक निर्वासित व्यक्तीचा आवाज बनली आहे. छोट्या मोठ्या संकटांनी, कौटूंबिक- सार्वजनिक- शैक्षणिक अपयशाने, अन्याय-अत्याचारास बळी पडल्यास अनेकजण आत्महत्या करतात. वेगवेगळ्या कारणांनी होणाऱ्या आत्महत्या हा आज चिंतेचा विषय बनला आहे. नादियाने मात्र कधीही आत्महत्येचा विचार केला नाही, ना तिला कधी स्वत:विषयी घृणा किंवा करुणा वाटली. ती जिवंत राहिली स्वतःवरील अत्याचाराचा बदला घेण्यासाठी, आई-भावांच्या हत्येची दाद मागण्यासाठी आणि आयसिसच्या ताब्यातील हजारो यजीदी तरुणींना- लहान मुलांना सोडवण्यासाठी! कोणत्याही घटनेमुळे आलेल्या नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी आप्तांची साथ, वैद्यकीय उपचार, मोठे ध्येय आणि प्रेरणादायी चरित्रे उपयोगी पडतात. जगभरातील मोठ्या कर्तुत्ववान व्यक्तींनी असंख्य हालअपेष्टा सोसून यशाची शिखरे पादाक्रांत केली. अनेकांचा तिथपर्यंतचा मार्ग निश्चितच सुकर नव्हता. अशांचा जीवनप्रवास सर्वसामान्यांना नेहमीच प्रेरणादायी असतो. नादिया मुराद त्यापैकीच एक! ~संदीप रामचंद्र चव्हाण ...Read more

 • Read more reviews
Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

PARIGH
PARIGH by SUDHA MURTY Rating Star
Vaibhav Salunke

पैसा असताना आणि नसताना मानवी स्वभावाच्या दोन टोकांचं दर्शन बहुतांश वेळा घडतं. मानवी संबंधांमध्ये पैशाला महत्त्व नाही अशी माणसं क्वचितच आढळतात. पैसा आला की माणूस बदलताना दिसतो, त्याचे पूर्वी न पाहिलेले रंगढंग दिसायला लागतात. पैशामुळे खर्‍याखुर्‍या मानी संबंधांचं दर्शन घडतं. हेच परीघ कादंबरीमध्ये सुधा मूर्ती यांनी मांडलं आहे ...Read more

SECOND LADY
SECOND LADY by IRVING WALLACE Rating Star
Komal Jadhav

बर्याच दिवसांनी चांगली रहस्यमय कथा वाचायला मिळाली. शेवट विचार करायला लावणारा आहे .