BHARATI PANDE

About Author

Birth Date : 28/03/1944


BHARATI PANDE IS A FREE-LANCE WRITER & TRANSLATOR & EDITOR. HER SHORT STORIES, NOVELS & POEMS BOOKS ARE PUBLISHED & 27 TRANSLATED BOOKS ALSO PUBLISHED. SHE IS WORKING ON AN INDEPENDENT PROJECT. SHE IS M.A. IN MARATHI LINGUISTICS. HER THREE TRANSLATED BOOKS ARE IN LINE TO BE PUBLISHED….

शिक्षण : एम.ए., बी.जे., जपानी भाषेची पदविका. समुपदेशन अभ्यास वर्ग. भारती पांडे यांचे ‘अक्षरित’, ‘बिनमहत्त्वाच्या माणसांच्या गोष्टी’, नवलकथा असे कथासंग्रह, तसेच ‘मनवा’ हा कवितासंग्रह व ‘जाग’ ही एकांकिका असे साहित्य प्रकाशित झाले आहे. त्याचप्रमाणे ‘काळी, ‘व्यथित मनानं सांगावंसं वाटतं की..... ‘एक एक पाऊल’, ‘द वल्र्ड ऑफ फतवा’, ‘मजल-दरमजल’, ‘ब्लास्फेमी’, ‘इंटरप्रिटर ऑफ मॅलडीज’, ‘कहै कबीर दिवाना’, ‘कोर्टशिप अँड मॅरेज’,‘मर्यादा’, ‘गव्हर्नन्स’, ‘द स्पाय प्रिन्सेस’, ‘द रोड ऑफ लॉस्ट इनोसन्स’, ‘प्रिन्स ऑफ अयोध्या’ अशी पुस्तके त्यांनी अनुवादित केली आहेत. त्यांच्या माहेर, विपुलश्री, मेनका, प्रपंच, मिळून साऱ्याजणी इ. नियतकालिकांत कविता, लेख व कथा प्रकाशित झाल्या आहेत. तसेच ‘सकाळ’, ‘महाराष्ट्र टाईम्स’, ‘लोकसत्ता’, ‘पुढारी’ यांसारख्या दैनिकांमध्ये त्यांनी विपुल लेखन केले आहे. साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या संशोधन विभागाच्या त्या माजी कार्याध्यक्ष आहेत. मंडळाच्या ‘स्त्री साहित्याचा मागोवा’ या त्रिखंडात्मक ग्रंथामध्ये शोधनिबंध व संपादनात साह्य केले आहे. ‘स्वाधार’ या स्वयंसेवी संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थी समुपदेशनाचे कार्य त्यांनी केले आहे. आसपासच्या गोष्टी (कथासंग्रह) मतलय (कवितासंग्रह) ‘अ गोल्डन एज’,(अनु.) अ हाऊस (अनु.) डिव्हायडेंड, द मदर (अनु.) असे त्यांचे साहित्य प्रकाशनाच्या वाटेवर आहे.
Sort by
Search by Discount
Show per page
Items 1 to 12 of 17 total
48 %
OFF
AAHE KATTAR TARI Rating Star
Add To Cart INR 395 INR 205
33 %
OFF
BHAKTIT BHIJALA KABIR Rating Star
Add To Cart INR 160 INR 107
33 %
OFF
BLASPHEMY Rating Star
Add To Cart INR 260 INR 174
33 %
OFF
EK EK PAUL Rating Star
Add To Cart INR 250 INR 168
48 %
OFF
GOVERNANCE Rating Star
Add To Cart INR 320 INR 166
33 %
OFF
HA SHODH VEGALA Rating Star
Add To Cart INR 190 INR 127
33 %
OFF
KALI Rating Star
Add To Cart INR 450 INR 302
33 %
OFF
MAJAL DARMAJAL Rating Star
Add To Cart INR 140 INR 94
33 %
OFF
MAYADA - IRAQCHI KANYA Rating Star
Add To Cart INR 290 INR 194
TBC Classic Book
33 %
OFF
MAZE MAZYAPASHI KAAHI NAAHI Rating Star
Add To Cart INR 160 INR 107
33 %
OFF
MHANE KABIR DIWANA Rating Star
Add To Cart INR 195 INR 131
34 %
OFF
OSHO COMBO SET - 37 BOOKS Rating Star
Add To Cart INR 8670 INR 5705
12

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
मिना हरीश सहारे, नागपूर.

कुठल्याही पुस्तकावर अभिप्राय देण्याची माझी ही पहिलीच वेळ असली तरी `दुर्दम्य` पुस्तक मनाला भिडल्यामुळे त्यावर लिहीणे मला आवश्यक वाटले. मी पण चरित्रनायक एकनाथनच्या विभागात सेवा दिली आहे. आमच्या सारख्यांना एकनाथन एक कडक तानाशाह ऑफिसर होता इतकंच माित होतं. पण लेखकाच्या नजरेतून जेव्हा त्याचे चरित्र वाचले तेव्हा तो खरा काय होता हे समजले. चरित्र वाचताना पूर्ण होई पर्यंत उत्सुकता कायम होती. कार्यालयीन जीवनातला कालखंड डोळ्यासमोर जिवंत होतो. वाचकाला खिळवून ठेवण्याचं कसब लेखकाच्या लिखाणात आहे.एकनाथन सारख्या विक्षिप्त, हेकेखोर व्यक्तीचा व लेखकाचा नक्कीच काहीतरी ऋणानुबंध असला पाहिजे. निवृती नंतरफिरून तीनदा लेखकाच्याच शहरात येणे हा योगायोग वाटत नाही. कथानकातील काही भागातील प्रसंग व घटना मजेशीर, गमतीदार वाटतात. कथेचा शेवट मनाला भिडून जातो. एका करारी, खंबीर माणसाचा अंत वाचताना मन भरून आले. पुस्तक पूर्ण केल्यावर शेवटी एक विचार आला की त्याचं मरण सुखदच झाले असे म्हणावे लागेल कारण एकाकीपणा जरी त्यांनी स्वतः निवडला होता तरी मृत्यूच्या बाबतीत भाग्याने त्यांची साथ दिली होती. त्यांच्या सारखे ताठ कणा व दुर्दम्य व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तिला परावलंबी, असहाय आयुष्य कधीच रूचलं नसतं आणि त्या नंतर आलेल्या करोना काळात त्यांचे काय हाल झाले असते त्याची कल्पनाच न केलेली बरी. कथानक वाचकाच्या मनाला भिडले यातच लेखकाचे यश आहे. पुढील लिखाणा करता शुभेच्छा. बाकी माझ्याकडून पुस्तकाचा दर्जा - खूप छान, बढिया आणि सुपर्ब... ...Read more

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
अनिल सहजे, नाशिक.

`कुलामामाच्या देशात’ हे पुस्तक म्हणजे जंगलातील अनुभवकथांचा एक विलक्षण रम्य प्रवास आहे. रवींद्र वानखडे यांच्या वनाधिकारी म्हणूनच्या प्रत्यक्ष अनुभवातून या कथा जन्माला येतात. प्रत्यक्षात घडलेल्या या कथा इतक्या रंगतदार आहेत की त्या काल्पनिक वाटाव्यात, अी त्यांची गंमत आहे. वानखडे यांच्या अनुभवांमधील कथाबीज अचूकपणे हेरून जी. बी. देशमुख यांनी त्यांना आपल्या रसाळ आणि खुमासदार शैलीत शब्दरूप दिले आहे. देशमुखांची शैली इतकी प्रवाही आणि ओघवती आहे की वाचक कथांमध्ये अक्षरशः गुंगून जातो. एकदा पुस्तक हातात घेतल्यानंतर ते पूर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेवावेसे वाटत नाही. वन हे सामान्य माणसासाठी तसे अपरिचितच क्षेत्र. जंगलातील जीवन, तेथील नियम-कायदे आणि जंगली श्वापदांचे विश्व याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. वानखडे-देशमुख द्वयी केवळ या अनोख्या जगाची ओळख करून देत नाहीत, तर त्याविषयी वाचकाच्या मनात विलक्षण कुतूहलही निर्माण करतात. ‘खुश रहेना मेरे यार’ आणि ‘महाकाय आकांत’ या दोन क्रमशः कथा तर विशेषतः चटका लावून जातात. त्या केवळ थरारक आणि अविश्वसनीय वाटाव्या अशा अनुभवांनी भारलेल्या नाहीत, तर जंगली श्वापदांची एक हळवी, माणुसकीच्या जवळ जाणारी बाजूही त्या प्रभावीपणे उलगडून दाखवतात. जी. बी. देशमुखांची खुमासदार, मिश्कील आणि रसाळ लेखनशैली वाचकाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत गुंतवून ठेवते. रवींद्र वानखडे यांच्या प्रत्यक्ष अनुभवांची सत्यता आणि देशमुखांच्या कथनकौशल्याचा सुंदर मिलाफ ‘कुलामामाच्या देशात’ घडवतो. हे पुस्तक केवळ जंगलातील अनुभवकथांचे संकलन राहत नाही, ते वाचकाला जंगलाच्या एका अनोख्या, रोमांचक आणि हळुवार विश्वाची सफर घडवते आणि नकळत सांगून जाते, ‘वनस्य कथा रम्यः!’ ...Read more