* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
A UNIQUE COMBINATION OF MIND-BLOWING SIMPLE INCIDENTS AND THE SWEETNESS OF THE LANGUAGE IS A UNIQUE FEATURE OF THIS BOOK. SIMPLE THINGS IN DAILY LIFE, BUT EVEN IN THEM SOMETIMES THE TRANSPARENT FORMULA OF LIVING IS FELT. SOMETIMES THE CORNERS OF THE EYES GET WET WHILE READING AND LAUGHING. SOMETIMES THE MIND REVISES THE PAGES THAT HAVE BEEN TURNED IN OUR OWN LIFE, WHILE READING G.B. DESHMUKH`S COLLECTION OF UNIQUE STORIES. THIS COLLECTION IS ONE THAT YOU WON`T WANT TO PUT DOWN ONCE YOU PICK IT UP. BE IT THE SMALL FAMILY FUN OR THE MAGIC OF OFFICE LIFE, DESHMUKH KEEPS YOU SMILING IN EVERY PAGE.
मनाला साद घालणाऱ्या साध्या साध्या घटना आणि वैदर्भीय भाषेचा गोडवा यांचा अनोखा मिलाफ म्हणजे हा अनोखा गप्पांचा फड. दैनंदिन जगण्यातल्या साध्यासुध्या गोष्टी, पण त्यातही कधीकधी जगण्याचं निर्मम सूत्र जाणवून जातं. कधीकधी वाचता वाचता आणि हसता हसताच डोळ्यांच्या कडा ओलावून जातात. तर कधी आपल्याच आयुष्यातील पलटून गेलेल्या पानांची मन उजळणी करतं, असा हा जी.बी. देशमुखांचा अनोखा गोष्टुल्यांचा संग्रह. हाती घेतल्यावर खाली ठेवू वाटणार नाही असाच हा संग्रह. कुटुंबातल्या छोट्या-मोठ्या गमती असोत की कार्यालयीन आयुष्यातल्या करामती, देशमुख हसवत, हसवत कोपरखळ्या मारत राहतात.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीसाहित्य#मेहतापब्लिशिंगहाऊस#मराठीपुस्तके#कथासंग्रह#छाटितोगप्पा#जी.बी.देशमुख#MEHTAPUBLISHINGHOUSE#MARATHIBOOKS#STORYCOLLECTION#CHHATITOGAPPA#G.B.DESHMUKH
Customer Reviews
  • Rating Starवैशाली देशमुख (पांडे), अमरावती.

    काल लायब्ररीतून `छाटीतो गप्पा` हे लेखक जी.बी.देशमुखांचं पुस्तक घेतलं. एका बैठकीत वाचून संपवलं. साध्या, सोप्या, हलक्याफुलक्या भाषेत सांगितलेल्या रंगतदार गोष्टी वाचताना खूप मजा आली. जीवनाची लज्जत वाढवणाऱ्या आणि त्याचबरोबर अंतर्मुख करणाऱ्या या गप्पा लावाब आहेत! मनाला उभारी देणार असं हलकफुलकं पुस्तक क्वचितच हाती येतं. लेखकाला धन्यवाद. ...Read more

  • Rating Star...ए.के.देशमुख, पेनसिल्वेनिया (यु.एस.ए.)

    `छाटितो गप्पा` हे मी वाचलेलं जी.बी.देशमुखांचं पाचवं पुस्तक. अमेरिकेत मुलीकडे मुक्कामी आलो असता मिळालेल्या निवांत वेळेत मी हे पुस्तक वाचलं. पुस्तक वाचताना खुप मजा वाटली. लेखकापेक्षा मी वयाने ज्येष्ठ असल्यामुळे मला अमरावती शहराची रचना, तिथली संस्कती आणि इतर संदर्भात त्या काळी झालेला विकास लेखकाच्या आधी अनुभवण्याची संधी मिळाली होती. राजेंद्र कॉलनी अस्तित्वात आल्यापासूनच माझ्या परिचयाची होती आणि तिथल्या घर क्र. १० मधे काही काळ माझा निवास देखील होता. `छाटितो गप्पा` वाचताना अंबागेट ते राजेंद्र काॅलनी दरम्यान अनेक वेळा सायकल किंवा सायकल-रिक्षाने केलेल्या येरझारा आठवल्या. त्या वेळी अमरावतीचा बहुचर्चित रेल्वे पुल देखील बांधला गेला नव्हता. "छाटितो गप्पा " हे पुस्तक मला अमरावती मधील माझ्या महाविद्यालयातील मोरपंखी दिवसात घेऊन गेले. त्या दिवसात अनेक जागी दिलेल्या भेटिंची पुन्हा एकदा उजळणी झाली. तेव्हाची व आजची अमरावती नजरेसमोर तरळू लागली. आयुष्यात अशा लहान सहान गोष्टी आपण सर्वच अनुभवत असतो पण लेखकाने त्या पुस्तक रुपात अत्यंत खुमासदार पद्धतीने वाचकांसमोर आणल्या. म्हणून लेखकाचे विषेश अभिनंदन व आगामी लेखनाकरीता खुप खुप शुभेच्छा. ...Read more

  • Rating Starराजेंद्र देशमुख, अमरावती.

    जी. बी. देशमुख यांनी लिहीलेले "छाटितो गप्पा " हे पुस्तक वाचायला घेतले. थोडा वेळ वाचन करु हा उद्देश होता. पुस्तक वाचण्यास सुरूवात केली. या पुस्तकामध्ये ४५ वेगवेगळ्या गोष्टी आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये लेखकाने केलेली मांडणी वाखाणण्या जोगी आहे. प्रत्येक ोष्ट वाचण्यास सुरूवात केल्या पासुन ती संपेपर्यंत तिच्या मधील उत्कंठा क्षणोक्षणी वाढत जाते. विषयाचा शेवट होईपर्यंत वाचन बंद करण्याची इच्छा होत नाही. प्रत्येक गोष्ट वेगळी आहे. एका गोष्टीचा दुसऱ्या गोष्टीशी काहीही संबंध नाही. लेखकाने शब्दांची अशी मांडणी केली आहे की प्रत्येक घटना आपला समोर घडत आहे व आपण त्याचे साक्षीदार आहोत अश्या प्रकारचा जिवंतपणा जाणवतो. `तोंडाचा कुंचला` ह्या गोष्टितील खर्रा व पान खाऊन, पीचकारी मारून रस्ते रंगवण्याच्या गुणाचे असेही वर्णन होऊ शकते हे कल्पनेच्या पलिकडचे आहे. ४५ गोष्टी पूर्ण होईपर्यंत वाचन सोडण्याची माझी इच्छा झाली नाही. मधे काही कामानिमीत्य ब्रेक घ्यावा लागला, तरी पण `ब्रेक के बाद` परत वाचन सुरू करून पुस्तक पूर्ण होई पर्यंत सोडले नाही. शब्दांमधे जिवंतपणा आणल्याबद्दल लेखकाचे अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा. ...Read more

  • Rating Starहेमंत कान्हे, अमरावती.

    `छाटीतो गप्पा` पुस्तक माझ्यासाठी खूप प्रेरणादायी आहे ,तसेच त्यात दिलेले अनुभव अविस्मरणीय आहेत. एकदम मस्त.

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
श्री. दिपक भगवंत पांडे... पुणे

` *दुर्दम्य` : अजब ऑफिसरची गजब गोष्ट* जी. बी. देशमुख लिखित `दुर्दम्य` हे पुस्तक शासकीय सेवेत असलेल्या एका अत्यंत वेगळ्या आणि प्रभावी व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देते. लेखकाने रेखाटलेली ही व्यक्तिरेखा जितकी रुक्ष, कडक शिस्तीची आणि विक्षिप् वाटते, तितकीच ती आतून त्याच्यात असलेल्या प्रामाणिकपणाची साक्ष देते. एका तत्त्वनिष्ठ आयुष्याचा हा जीवनपट आदर्शवत वाटणारा आहे. भ्रष्टाचार आणि तडजोडीच्या राजकारणापासून स्वतःला `दोन हात दूर` ठेवणारी त्या अधिकाऱ्याची वृत्ती आजच्या सामाजिक परिस्थितीत अत्यंत बोधक ठरेल. स्वतःच्या प्रामाणिकतेच्या मूल्यांशी कधीही तडजोड न करणारी ही व्यक्तिरेखा नक्कीच प्रदीर्घ काळ स्मरणात राहण्याजोगी आहे. पुस्तकातील `दोन रूपये चाळीस पैसे`, `दूध का दूध, पानी का पानी`, `मजेदार प्रायश्चित्त` हे लेख पुस्तकातील व्यक्तिरेखेकडून धडा घेण्यासारखे आहे. `एकटा जीव` हे प्रकरण मनाला चटका देऊन जाते. जी. बी. देशमुख यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील सहकारी एकनाथन या व्यक्तिमत्त्वाशी संबंधित २५ वर्षांच्या कालावधीतील आलेल्या अनुभवांचे चपखल निरीक्षण करून ते पुस्तकात आरेखित केले आहे. लेखकाच्या निरीक्षणशक्तीला सलाम ! त्यांची लेखनशैली अतिशय प्रवाही, संयत आणि मार्मिक आहे. त्यांनी त्या व्यक्तिमत्त्वाच्या स्वभावातील हा `विक्षिप्तपणा` किंवा रुक्षपणा दाखवताना, त्यामागील त्यांची नैतिकता आणि बाणेदारपणा अतिशय बारकाव्यांसह रेखाटला आहे. प्रत्येक प्रकरणाखालील सारांश (CONCLUDING PARAGRAPH) खूपच उत्कृष्ट ! कोणत्याही अनावश्यक भावनिकतेचा पसारा न मांडता, थेट आणि वास्तववादी शैलीत केलेले हे व्यक्तिचित्रण पुस्तकाची रंगत कमालीची वाढवते. जी. बी. देशमुख यांना पुढील लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा ! ...Read more

THE CASE OF THE HOWLING DOG
THE CASE OF THE HOWLING DOG by ERLE STANLEY GARDNER Rating Star
प्रमोद कडवे

हे पुस्तक खूपच चांगले आहे.वाचत असताना आपले देहभान विसरून जाते.