ERIC LOMAX

About Author

Birth Date : 30/05/1919


ERIC LOMAX WAS BORN IN 1919. DURING THE SECOND WORLD WAR HE WAS CAPTURED AND TORTURED BY THE JAPANESE ARMY AND FORCED TO WORK ON THE NOTORIOUS BURMA-SIAM RAILWAY. HE MET AND FORGAVE HIS TORTURER IN 1995. HE DIED IN OCTOBER 2012.

एरिक सुदरलॅन्ड लोमॅक्सचा जन्म ३० मे 1919 रोजी झाला. सोळाव्या वर्षी तो सॉर्टिंग क्लार्क आणि टेलिग्राफिस्ट या पदावर पोस्ट ऑफिसात कामाला लागला. तीन वर्षे तेथे नोकरी करून वयाच्या १९ व्या वर्षी तो ब्रिटिश लष्कराच्या रॉयल कोर ऑफ सिग्नल्स मध्ये रुजू झाला. सेकंड लेफ्टलंट म्हणून त्याला सिंगापूरच्या मोहिमेवर पाठवण्यात आले. सिंगापूरमधील ब्रिटिश फौजाच्या शरणागतीनंतर जपानी सैन्याने त्याला युद्धकैदी म्हणून ताब्यात घेतले. बर्मा रेल्वेच्या बांधकामासाठी नेण्यात आलेल्या लाखो युद्धकैद्यांपैकी तो एक होता. त्याने स्वतःसाठी बनवलेला त्याच्या छावणी परिसराचा व एकूण सियाम बर्मा सरहद्दीचा नकाशा जपान्यांच्या हाती लागला. शिवाय त्याने चोरून बनवलेला एक रेडिओ देखील त्यांना सापडला. जपान्यांच्या विरुद्ध बंड करण्याच्या कारस्थानाचा व छावणी बाहेरील काही फुटीरवादी गटांशी संगनमताचा प्रयत्न केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला. जपान्यांनी त्याला बेदम मारहाण केली व त्याचा नृशंस छळ केला. त्यांनी अपेक्षित असलेले सत्य त्याच्याकडून वदवून घ्यायचे होते. पाण्यात गुदमरवून टाकण्याचा देखील त्यानी लोमॅक्सवर प्रयोग केला. त्यानंतर सिंगापूरच्या औटराम रोड जेल मध्ये त्याला पाच वर्षे कारावासाची शिक्षा एका जपानी मिलिटरी कोर्टाने केली. जपानच्या युद्धातील पराजयानंतर लोमॅक्स इंग्लंडला परतला व काही काळ कोलोनियल सव्र्हिसच्या अखत्यारीत त्याने धाना येथे नोकरी केली. ऐरिक लोमॅक्सचे लग्न १९४५ ला त्याच्या प्रथम पत्नीसोबत झाले. त्यांना तीन मुले झाली. १९८० मध्ये एरिकने वॅÂनेडियन नर्स पॅटीसोबत दुसरा विवाह केला. पॅटीच्या मदतीने एरिकची आपल्या जपानी छळकत्र्यांशी भेट घडून आली.
Sort by
Search by Discount
Show per page
Items 1 to 1 of 1 total
48 %
OFF
THE RAILWAY MAN Rating Star
Add To Cart INR 350 INR 182

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
मिना हरीश सहारे, नागपूर.

कुठल्याही पुस्तकावर अभिप्राय देण्याची माझी ही पहिलीच वेळ असली तरी `दुर्दम्य` पुस्तक मनाला भिडल्यामुळे त्यावर लिहीणे मला आवश्यक वाटले. मी पण चरित्रनायक एकनाथनच्या विभागात सेवा दिली आहे. आमच्या सारख्यांना एकनाथन एक कडक तानाशाह ऑफिसर होता इतकंच माित होतं. पण लेखकाच्या नजरेतून जेव्हा त्याचे चरित्र वाचले तेव्हा तो खरा काय होता हे समजले. चरित्र वाचताना पूर्ण होई पर्यंत उत्सुकता कायम होती. कार्यालयीन जीवनातला कालखंड डोळ्यासमोर जिवंत होतो. वाचकाला खिळवून ठेवण्याचं कसब लेखकाच्या लिखाणात आहे.एकनाथन सारख्या विक्षिप्त, हेकेखोर व्यक्तीचा व लेखकाचा नक्कीच काहीतरी ऋणानुबंध असला पाहिजे. निवृती नंतरफिरून तीनदा लेखकाच्याच शहरात येणे हा योगायोग वाटत नाही. कथानकातील काही भागातील प्रसंग व घटना मजेशीर, गमतीदार वाटतात. कथेचा शेवट मनाला भिडून जातो. एका करारी, खंबीर माणसाचा अंत वाचताना मन भरून आले. पुस्तक पूर्ण केल्यावर शेवटी एक विचार आला की त्याचं मरण सुखदच झाले असे म्हणावे लागेल कारण एकाकीपणा जरी त्यांनी स्वतः निवडला होता तरी मृत्यूच्या बाबतीत भाग्याने त्यांची साथ दिली होती. त्यांच्या सारखे ताठ कणा व दुर्दम्य व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तिला परावलंबी, असहाय आयुष्य कधीच रूचलं नसतं आणि त्या नंतर आलेल्या करोना काळात त्यांचे काय हाल झाले असते त्याची कल्पनाच न केलेली बरी. कथानक वाचकाच्या मनाला भिडले यातच लेखकाचे यश आहे. पुढील लिखाणा करता शुभेच्छा. बाकी माझ्याकडून पुस्तकाचा दर्जा - खूप छान, बढिया आणि सुपर्ब... ...Read more

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
अनिल सहजे, नाशिक.

`कुलामामाच्या देशात’ हे पुस्तक म्हणजे जंगलातील अनुभवकथांचा एक विलक्षण रम्य प्रवास आहे. रवींद्र वानखडे यांच्या वनाधिकारी म्हणूनच्या प्रत्यक्ष अनुभवातून या कथा जन्माला येतात. प्रत्यक्षात घडलेल्या या कथा इतक्या रंगतदार आहेत की त्या काल्पनिक वाटाव्यात, अी त्यांची गंमत आहे. वानखडे यांच्या अनुभवांमधील कथाबीज अचूकपणे हेरून जी. बी. देशमुख यांनी त्यांना आपल्या रसाळ आणि खुमासदार शैलीत शब्दरूप दिले आहे. देशमुखांची शैली इतकी प्रवाही आणि ओघवती आहे की वाचक कथांमध्ये अक्षरशः गुंगून जातो. एकदा पुस्तक हातात घेतल्यानंतर ते पूर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेवावेसे वाटत नाही. वन हे सामान्य माणसासाठी तसे अपरिचितच क्षेत्र. जंगलातील जीवन, तेथील नियम-कायदे आणि जंगली श्वापदांचे विश्व याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. वानखडे-देशमुख द्वयी केवळ या अनोख्या जगाची ओळख करून देत नाहीत, तर त्याविषयी वाचकाच्या मनात विलक्षण कुतूहलही निर्माण करतात. ‘खुश रहेना मेरे यार’ आणि ‘महाकाय आकांत’ या दोन क्रमशः कथा तर विशेषतः चटका लावून जातात. त्या केवळ थरारक आणि अविश्वसनीय वाटाव्या अशा अनुभवांनी भारलेल्या नाहीत, तर जंगली श्वापदांची एक हळवी, माणुसकीच्या जवळ जाणारी बाजूही त्या प्रभावीपणे उलगडून दाखवतात. जी. बी. देशमुखांची खुमासदार, मिश्कील आणि रसाळ लेखनशैली वाचकाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत गुंतवून ठेवते. रवींद्र वानखडे यांच्या प्रत्यक्ष अनुभवांची सत्यता आणि देशमुखांच्या कथनकौशल्याचा सुंदर मिलाफ ‘कुलामामाच्या देशात’ घडवतो. हे पुस्तक केवळ जंगलातील अनुभवकथांचे संकलन राहत नाही, ते वाचकाला जंगलाच्या एका अनोख्या, रोमांचक आणि हळुवार विश्वाची सफर घडवते आणि नकळत सांगून जाते, ‘वनस्य कथा रम्यः!’ ...Read more