* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: RAVIPAR
 • Availability : Available
 • Translators : Mohan Velhal, Vijay Padalkar
 • ISBN : 8177662597
 • Edition : 6
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 195
 • Language : Translated From HINDI to MARATHI
 • Category : SHORT STORIES
 • Available in Combos :GULZAR BIRTHDAY COMBO OFFER
Quantity
THIS IS A COLLECTION OF SHORT STORIES BY THE INTERNATIONALLY FAMOUS, GULJAR, WHO IS NOT ONLY AN AUTHOR BUT IS A POET AND DIRECTOR TOO. THE STORIES WRITTEN BY HIM ARE VERY EXCLUSIVE. EACH IS A CULTURED PEARL WITH ITS OWN SHINE AND LUSTRE. HE USES WORDS MISERLY, BUT EACH WORD IS FULL OF MEANINGS PRESENTING THE SITUATIONS LIKEWISE. HIS STYLE NOT ONLY ELABORATES AN INCIDENT BUT IT ALSO GOES BEYOND IT AND DESCRIBES THE PSYCHOLOGICAL STATE OF MIND AT THE TIME. EACH OF HIS STORIES HAS THE CAPACITY TO SEEK INTERNATIONAL RECOGNITION. HE PRESENTS THE PERFECT PICTURE OF THE STORY WITH ITS BACKGROUND AND THE DIALOGUES TOUCH THE CORE OF OUR HEART. UNTRADITIONAL WAYS OF WRITING AND PICTURESQUE STYLE ARE THE CHARACTERISTICS OF GULJAR`S. VERY HONESTLY AND SENSITIVELY, HE PRESENTS US WITH THE TRUTH AND FACTS OF LIFE. HIS STORIES HAVE ALL THE TOUCHES; SADNESS, SERIOUSNESS, HUMOUROUS, SARCASTIC,THEY ALL MAKE US AWARE OF GULJAR AS A PERSON WITH A BALANCED MIND AND THOUGHTS, WITH A VERY UNDERSTANDING NATURE, FULL OF COMPASSION, FRAGRANCE AND A NEVER-ENDING FRESHNESS.
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कवी, लेखक, दिग्दर्शक गुल़जार यांचा हा पहिलाच लघुकथा-संग्रह. या चतुरस्र लेखकाच्या अभिजात सर्जनशक्तीचा हा निळ्या मखमलीवर ठेवलेल्या पाणमोत्यासारखा विलक्षण मनोज्ञ असा आविष्कार आहे. त्यांच्या मिताक्षरी शैलीतल्या निवेदनात घटनांश, प्रत्यक्ष घटना आणि मनोवस्था यांप्रमाणे बदल घडत राहतो. अभिजात प्रतिभेच्या बळावर गुल़जार वैश्विक पातळीवर जाऊ शकतील, अशी कथासूत्रं गुंफतात, आपल्या दृष्टीसमोर घडणा-या दैनंदिन घटनांची विलक्षण वास्तव पाश्र्वभूमी उभी करतात आणि संवादपूर्ण शैलीने वाचकांच्या थेट काळजाला हात घालतात. अपारंपरिक कथनशैली, चित्रदर्शी स्मरण आणि अभिजातता ही त्यांची वैशिष्ट्यं आहेत. जगण्यातील भेदक सत्य आणि वास्तव ते अत्यंत संवेदनशीलतेनं आणि प्रामाणिकपणानं मांडतात. कधी या कथा गंभीर वाटतात, कधी हलवून सोडतात, कधी हास्याचा शिडकावा करतात, तर कधी औपरोधिक वाटतात. या कथांतून जगाकडं अत्यंत समतोल दृष्टीनं आणि कणवेनं पाहणा-या गुल़जारांच्या समृद्ध आकलनशक्तीची प्रचीती येते. म्हणूनच सोनटक्क्याच्या फुलांसारख्या त्या सतत टवटवीत वाटतात.
Video not available
Keywords
Customer Reviews
 • Rating Starगौरी दाभोळकर

  युवाभारतीमधील ‘रावीपार’ ही सुप्रसिद्ध लेखक व कवी गुलजार यांची कथा वाचली अन कितीतरी दिवस त्या कथेतील बापाचा चेहरा माझ्या डोळ्यांसमोर येत होता. फाळणीसंबंधी कित्येक सिनेमे-कादंबऱ्या झाल्या असतील, पण या कथेत जाणवणारी संवेदनशिलता वेगळीच होती. माझे हिंदी वचन जवळजवळ शून्य असले तरी सुट्टीत मुंबईत आयडीयलमध्ये मराठी पुस्तके चालताना मराठीतले रावीपार हातात आले. आणि तत्क्षणी मी त्या कथांच्या प्रेमात पडले. २६ कथांचा हा छोटेखानी संग्रह जीवन-मृत्यूविषयीचे मोठे तत्त्वज्ञान सांगून जातो. काही कथा केवळ ३-४ पानांत बरेच काही शिकवून जातात. गुलजारांनी आदिमानव, प्राणी, फाळणीतील बेघर यांपासून ते अगदी मायकेल एंजेलोपर्यंत विविध स्थल-कालाच्या पलीकडे जाऊन सर्वांची भावना लेखणीत बद्ध केली आहे. मराठी भाषांतरही चांगले झाले आहे. ...Read more

 • Rating StarDAINIK SAMANA 17-6

  फाळणीच्या वेदनांची कथारूपे ... ‘गुलजार’ हे नाव हिंदी चित्रपटासृष्टीशी चांगलेच निगडित असल्याने ते सर्वपरिचित आहे. गीतकार, संवादलेखक आणि दिग्दर्शक या तिन्ही नात्यांनी त्यांची त्या क्षेत्रातील कामगिरी आहे. पण याहून एक वेगळा असा त्यांचा पैलू प्रथम उर्दूभाषकांना आणि नंतर इंग्रजी वाचकांना परिचित झाला, तो म्हणजे कथालेखनाचा! ‘रावीपार’ या नावाने मराठीत या कथा आणण्याचे महत्त्वाचे काम केले आहे विजय पाडळकर आणि मोहन वेल्हाळ यांनी. गुलजार यांच्या कथांचा हा मराठीतील पहिलाच अनुवाद. ‘रावीपार’मध्ये एकूण सत्तावीस कथा आहेत. यातली कोणती कथा कोणत्या अनुवादकाने अनुवादित केली, ते नमूद करण्यास हरकत नव्हती. या अनुवादित कथासंग्रहाचे श्रेय जरी दोघांचे असले तरी त्यांच्या वैयक्तिक कौशल्याची ओळख वाचकांना झाली असती आणि ती प्रतिमा निश्चितपणे चांगलीच उमटली असती. कारण या सगळ्याच कथा समर्थपणे अनुवादित केल्या गेल्या आहेत. सनसेट बुलेवार्ड, रावीपार, फाळणी, हाबूची आग, बखर एका जंगलाची मायकेल एंजेला या कथा विशेष उल्लेखनीय आहेत. एक गोष्ट मात्र जाणवते. की चित्रपट या दृश्यमाध्यमासाठी आवश्यक असलेली ‘नजर’ या कथालेखनात प्रभाव गाजवते. नुसता लिखित शब्द आणि दृश्यात्मक परिणाम साधणार लिखित शब्द यांमधील अंतर गुलजार चांगलेच जाणतात. या कथालेखनात काही ठिकाणी कळत-नकळत चित्रपटासाठी आवश्यक असणारा दृश्यात्मक परिणाम साधलेला दिसतो. ‘रावीपार’ ही कथा किंवा त्यातील मूळ घटना ही कुठेतरी वाचलेली किंवा त्यातील दृश्य कुठल्याही चित्रपटात पाहिलेले आहे, असे आठवते. फाळणी ही हिंदुस्थानच्या हृदयावरची फार मोठी जखम आहे. त्याची वेदना यातील कथांमध्ये विविध रूपांत व्यक्त झालेली आहे. भय, धूर, रावीपार, फाळणी, जांभळाचे झाड या कथांमध्ये फाळणीमुळे मानवी मनांची झालेली होरपळ, त्यावेळी घडलेल्या धक्कादायक घटना कलात्मकतेने व्यक्त झालेल्या आहेत. काही राजकीय निर्णयांमुळे माणुसकी, जिव्हाळा, करुणा या शब्दांचे अर्थच कसे उलटेपालटे होऊन जातात. सामान्य जीवांची कशी ससेहोलप होते, याचे मन व्याकूळ करणारे दर्शन या कथा घडवितात. सनसेट बुलेवार्ड, सीमा, बिमलदा, दहा पैशाचं नाणं आणि आजी या कथा वेगवेगळ्या पद्धतींनी चित्रपटसृष्टीशी नाते सांगणाऱ्या आहेत. व्यक्तिचित्रण, संवाद, दृश्यात्मकता हे प्रभावी घटक यात दिसतात. गुड्डो ही तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या, उमलत्या यौवनाची नुकतीच जाणीव झालेल्या, चित्रपटसृष्टीचे आकर्षण असलेल्या मुलीची कथा मानसशास्त्रीयदृष्ट्याही परिणामकारक आहे. पु. भा. भावे यांची ‘सतरावे वर्ष’ ही कथा येथे आठवते. (शिरीष पै यांचीही याच विषयावरची एक कथा आहे.) अद्धा, पुरुष, कागदाची टोपी या कथा तरुण मुलांच्या मनाची विविध स्पंदने व्यक्त करणाऱ्या कथा आहेत. या कथांमधून लेखकाचे व्यक्तिदर्शनाचे सामर्थ्य जाणवते. चारूजी, डलिया, अद्धा, गुड्डो, बिमलदा या व्यक्तिरेखा लक्षात राहणाऱ्या आहेत. रावीपार, मायकेल एंजेलो, दहा पैशाचं नाणं आणि आजी; परंतु जीवन आणि मृत्यू या कथांमध्ये धक्कातंत्राचा वापर केलेला आहे. वाचकांची उत्सुकता टिकवून ठेवून कथेची एक वेगळेची अखेर परिणामकारकरितीने साधण्याचे कसब येथे दिसते. बखर एका जंगलाची आणि हाबूची आग या लेखकाच्या प्रतिभासामर्थ्याचे, कल्पनाशक्तीचे दर्शन घडविणाऱ्या विलक्षण कथा आहेत. जंगले, पशुपक्षी याकडे पाहण्याचा एक निराळाच दृष्टिकोन येथे व्यक्त होतो. पर्यावरणासंबंधीची चर्चा आपण नित्य ऐकतो. पण प्रत्यक्षात माणूस आपल्या बुद्धिसामर्थ्याने निसर्गातील पशुपक्ष्यांवर वर्चस्व गाजवू पाहतो. त्यामुळे त्यांचे विश्व कसे उद्ध्वस्त होते, ते कसे विस्थापित होतात याचे अतिशय नावीन्यपूर्ण चित्रण ‘बखर एका जंगलाची’ मध्ये दिसते. प्राणीविश्वात खूप उलथापालथ होते आणि पक्षीप्रेम सलिम अली एक फलक लावतात. यातील कारुण्य, उपरोध, विसंगती मनाला भिडणारी आहे. आगीबद्दलच्या हाबूच्या कल्पना विलक्षण आहेत. टोळ्यांनी राहणाऱ्या आदिमानवांना पंचमहाभूताविषयीचे कुतूहल कसे झपाटून टाकीत असेल, त्याचा कल्पनासामर्थ्यावर मांडलेला खेळ या कथेत दिसते. या दोन कथांची, त्यांच्या वेगळेपणाबद्दल विशेष नोंद घेतली पाहिजे. एकूण गुलजार यांचे भावविश्व, मानवी जीवनातील आणि निसर्गातील विविध घटना, माणसामाणसांतील तसेच निसर्ग आणि माणूस यांच्यातील नातेसंबंध, त्यांचे व्यक्तिगत आणि सामाजिक परिणाम अशा मूलभूत गोष्टींनी व्यापून गेलेले दिसते. या सगळ्यांतून मानवी मनाची स्पंदने, माणसाच्या जगण्याला असलेले विविध कंगोरे ते उलगडून पाहतात. जीवन जगण्यातील व्यापक आशय शोधू पाहतात. मानवाच्या आदिम प्रेरणांचा मूलस्त्रोत दृष्टीआड न करता आदिमानवापासून संस्कृतीच्या उच्च स्तरांपर्यंत प्रगती करीत गेलेला मानव पुन्हा आपल्या मूलस्वरूपाकडेच कसा जातो, स्वनिर्मित उच्च मूल्यांचा त्याला कसा विसर पडतो याचे भेदक दर्शन या लेखनात घडते. कथांचे विषय, आशय, तंत्र आणि व्यक्तिचित्रणे यातील विविधता लक्षणीय आहे. अवश्य वाचायला हवा, असा हा कथासंग्रह आहे. -डॉ. मेधा सिधये ...Read more

 • Rating StarMeghagauri Ghodke

  खुप वाचण्या सारखं व विचार करायला लावणारं...

 • Rating StarMAHARASHTRA TIMES 29-07

  कवितेचा स्पर्श असलेल्या कथा... गुलजार हे दिग्दर्शक, गीतकार, लेखक अशा अनेक नात्यांनी आपल्याला परिचित असले, तरी त्यांच्या विविधांगी आविष्काराचा मूलस्रोत कविवृत्तीचा आहे. कविता मिताक्षरी असते आणि जनसामान्यांपासून विदग्ध रसवृत्तीपर्यंत, सर्वांना मोहीत कण्याचे सामर्थ्य तिच्यात असते. गुलजार यांचे चित्रपट जसे सर्वांना भावतात, तशीच त्यांची कविता. आणि आता कथादेखील! ‘रावीपार’ हा गुलजार यांचा मूळ उर्दू भाषेत प्रकाशित झालेला संग्रह. त्याचा मराठी अनुवाद विजय पाडळकर आणि मोहन वेल्हाळ यांनी केला आहे. अनुवाद अतिशय सहज आणि मूळ कथांमधली काव्यात्मता जपणारा झाला आहे. मराठीत अशा प्रकारची कथा फारशी लिहिली गेली नाही आणि आज तर अशा प्रकारची कथा लिहिण्यासारखे मराठी साहित्यात वातावरणदेखील दिसत नाही. या संग्रहावरचे गुलजार हे नाव काढून टाकले, तर कदाचित या कथांची संभावना कृत्रिम आणि तंत्राच्या आहारी गेलेल्या म्हणूनही केली जाईल! अर्थातच या कथांमध्ये लघुकथेचे तंत्र असले,रूपकथेत शोभावी अशी चमत्कृती आणि प्रतिकात्मता असली आणि रंजक साहित्यातील भावपूर्णता असली, तरी त्याहीपलीकडे जाणारी एक मूल्यात्मक जाणीव आहे. तीन-चार कथांचे अपवाद सोडले, तर यातील बहुतेक कथा त्यातील सौंदर्यपूजक अभिजाततेमुळे कलात्मक उंची गाठतात. भोवतालचे भेसूर आणि कंगाल वास्तवदेखील गुलजार यांच्या कथेत कलाकृतीचा एक आर्त, पण आस्वाद्य घटक म्हणून येते. या संग्रहात एकूण सत्तावीस कथा आहेत. सीमा किंवा ‘जांभळाचे झाड’ यासारख्या शेवटच्या तीन-चार कथा सोडल्या, तर बहुतेक कथा चार-पाच पानांच्या छोट्या कथा आहेत. फाळणीच्या काळात झालेली ताटातूट, स्त्री-पुरुषांमधील बदलती नाती, जीवन आणि मृत्यु यांच्यातील निवड, चित्रपट, नज्ञटकाचे आभासी विश्व असे या कथांचे विषय आहेत. कधी व्यक्तिचित्रणाच्या माध्यमातून, तर कधी चमत्कृतीचा आधार घेऊन गुलजार या कथा सांगतात. बरेच वेळा या कथांमध्ये वास्तवाला कलाअणी देणारी एखादीच घटना अथवा साक्षात्काराचा क्षण असतो. कधी कधी एखादे सनातन सत्य सांगण्यासाठी गुलजार वास्तवाचाच प्रतिकात्म वापर करतात. ‘सातरंग्या’, कथेतील खैरू किंवा ‘हाबूची आग’ मधील हाबू यांची निर्मिती मानवी जीवनातील कलेची महती आणि जिज्ञासा यांना मूर्तरूप देण्यासाठी झालेली आहे. ‘जांभळाचे झाड’ देखील भोवताली घडणाऱ्या जीवनसंघर्षाचे साक्षीदार आहे. ‘रावीपार’ ही या संग्रहातील सर्वांत उत्कृष्ट कथा आहे. गुलजार यांच्या शैलीची सारी वैशिष्ट्ये तिच्यात आहेत. एकाच वेळी फाळणीचे भीषण वाज्ञतव सांगणारी आणि नियतीपुढे माणसाची निर्णयशक्ती फोल ठरवणारी रूपककथा म्हणून तिचे महत्त्व आहेच पण एकूण मानवी जीवनाबद्दल ती काही सांगू पाहते. या कथेत दर्शनसिंह, या पत्नी आणि दोन तान्ह्या मुलांसह, गाडीच्या टपावर बसून, निर्वासितांच्या लोंढ्यासह भारतात चालला आहे. हा एक जीवनमूल्याचा संघर्ष आहे. त्यात एक मूल मृत्यू पावले. अंधारात रावी नदीच्या ....वरून गाडी जाऊ लागते, तेव्हा दर्शनसिंह जड अंत:करणाने त्या मुलाला खाली फेकून देतो. पण मुलाला मुक्ती दिल्याचे समाधान क्षणभरच टिकते; कारण दर्शनसिंहने चुकून जिवंत पोरालाच जलसमाधी दिलेली असते! या कथेतील प्रत्येक तपशील अर्थवाही प्रतिमा बनलेला आहे. मेलेल्या मुलाला कवटाळून बसलेली शाहनी आणि जिवंत मुलाला गफलतीने टाकून देणारा दर्शनसिंह दोघांच्याही नशिबी जगण्याऐवजी मृत्यूचे कलेवर हाती येते. रावीपार ही फक्त निर्वासितांची आस राहत नाही, ती अंधाऱ्या जीवनसरितेची उत्कट प्रतिमा बनते. तान्ही मुले हीसुद्धा या जोडप्याच्या वाट्याला येणारे भीषण वास्तव अधोरेखित करतात. जीवनप्रवासात माणसापुढे अनेक पर्याय असतात, पण निवडीचे स्वातंत्र्य असतेच असे नाही. अटळ प्रवासातला तो एक भासही असू शकतो, असे सांगणारी ही कथा. कलांचे स्वायत्त विश्व आणि वस्तुनिष्ठ वास्तव यांच्यातील संवादी आणि विरोधी वातावरण टिपणे, हा गुलजार यांच्या कथेचा एक प्रमुख धागा आहे. माणसांच्या नात्यांमधील अज्ञात आणि अगम्य ओढ हेदेखील त्यांच्या कथांमधून आढळणारे समान सूत्र आहे. काळ हा या नात्यांचा एक अविभाज्य आहे. कधी तो फाळणीसारख्या सामाजिक घटनांच्या भूतकाळाचे रूप घेऊन येतो. (‘फाळणी’), कधी व्यक्तिगत आयुष्यातील जुन्या, पुसता न येणाऱ्या प्रेमबंधाच्या स्वरुपात येतो (‘सीमा’), तर कधी मृत्यूच्या अंतिम सत्याचे रूप घेऊन येतो. (बिमलदा’ आणि ‘दहा पैशाचं नाणं आणि आजी’), ‘मायकेल एंजेलो’ किंवा ‘हाबूची आग’ मधील कथांमधील काळ निवेदनाच्या पातळीवर रेनेसान्स किंवा प्रागैतिहासिक असा असला, तरी त्याचा रोख सनातन काळाकडे आहे. ‘फाळणी’ आणि ‘बिमलदा’ या कथांमध्ये खऱ्या व्यक्ती आणि कल्पितांचे मिश्रण आहे. ‘फाळणी’ कथेतील हरभजनसिंग यांना शोध लागतो की, कथेचा निवेदक, म्हणजेच गुलजार फाळणीच्या दिवसांत ताटातूट होऊन हरवलेला त्यांचा मुलगा आहे. परोपरीने ‘मी तुमचा मुलगा नाही,’ असे गुलजार यांनी सांगूनही हरभजनसिंग यांचा विश्वास बसत नाही. आपल्या ताटातूट झालेल्या मुलांना शोधणारे आई-बाप आणि समांतर आयुष्यांना जोडणाऱ्या अनामिक नात्यांचे बंध या कथेत हळुवारपणे आले आहेत. ‘सीमा’ ही कथा इतर कथांच्या तुलनेत दीर्घकथा आहे. त्यातील सुधीर आणि सीमा विभक्त होऊन वर्ष झालेले आहे. टी. के. शी तिने संसार थाटला आहे. पण मन अबोध पातळीवर सुधीर मध्ये गुंतलेले आहे. सुधीरला आता आपली गरज नाही हे उमजते, तेव्हाच ती सुधीरच्या स्मृतिपाशांतून मुक्त होते. ‘फाळणी’मधील आई-वडील आपल्या मुलांना आपण परत मिळवल्याच्या भ्रामक आनंदात राहू पाहतात, सीमाला मात्र भूतकाळ आणि वर्तमान यांच्यातल्या सीमारेषेचे भान येते. ‘बिमलदा’ कथा बिमल रॉय यांच्या अखेरच्या दिवसांचे चित्रण करणारी आहे. ‘सीमा’ कथेत नाटक आणि वास्तव जीवन यांचे रंग एकमेकांत मिसळलेले आहेत. ‘बिमलदा’मध्ये ते करीत असलेला कुंभमेळ्यावरचा चित्रपट आणि बिमलदांचा मृत्यूकडे चाललेला प्रवास यांचे धागेदोरे एकमेकांत गुंतलेले आहेत. मृत्यूची भयग्रस्त करणारी जाणीव आणि कलात्मक तसेच वास्तव पातळीवर येणारी मृत्यूची अनुभूती हा या कथेचा विषय आहे. ‘दहा पैशांचं नाणं आणि आजी’ या कथेत चकूला म्हातारीच्या मृत्यूने बाहेरच्या जगाचे जे दर्शन घडते, ते असेच त्याला अंतर्बाह्य बदलून टाकणारे आहे. गुलजार यांच्या कथेत चमत्कृती, अनपेक्षित कलाटणी अशा युक्त्यांचा वापर अनेकदा येतो. ‘मायकेल एंजेलो’ कथा या रेनेसान्सकालीन प्रसिद्ध चित्रकारावर असली, तरी गुलजार यांनी म्हटले, तर काल्पनिक, म्हटले तर ऐतिहासिक गोष्टीचा वापर इथे जीवनातील सनातन सत्य सांगण्यासाठी केला आहे. ज्या लहान मुलाचा येशूचे चित्र काढण्यासाठी मॉडेल म्हणून वापर केला, त्याचीच निवड मोठेपणी मायकेल एंजेलो नकळतपणे करतोख्, ती ज्युडासचे चित्र काढण्यासाठी! माणसामधली निर्व्याजता कालांतराने निबर होते, ती परिस्थितीने तामसी बनतो, हे गुलजार यांना कलात्मक पद्धतीने सांगितले आहे. जीवनातील सत्य सांगण्यासाठी कल्पनेचा कधी कधी आश्रय घ्यावा लागतो. गुलजार यांनी अनेकदा तो घेतलेला आहे. भोवतालच्या निबर वास्तवाच्या मुळाशी दडलेली निर्व्याजता टिपणे हे त्यांच्या कथेचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळेच त्यांच्या कथांना कवितेचा स्पर्श झालेला आहे. ...Read more

 • Read more reviews
Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BETTER
BETTER by DR.ATUL GAWANDE Rating Star
DAINIK LOKMAT 18-08-2019

शल्यविशारदाचं चिंतन... वैद्यकीय क्षेत्रातील कामाचा दर्जा सुधारण्याबाबत बरेचदा नामवंत लोक क्रीडापटूंचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवतात. चिकाटी, परिश्रम, मेहनत, सराव आणि अचूकपणा यांचे यथोचित समतोल या क्रीडापटूंमध्ये पाहायला मिळतो. पण प्रत्येक गोष्टीचं ज्ञान े केवळ कुठल्यातरी परिणामावर अवलंबून राहून कसे मिळवता येईल. त्यासाठी अवचित अतिप्रसंगाचे होणारे आगमनदेखील तितकाच महत्त्वाचा भाग असतो. जीवन-मरणाच्या सीमारेषेवर असलेल्या जीवाची घालमेल अत्यवस्था यांना सामोरे जाताना तुम्हाला अचूक आणि तितकाच विनाविलंब निर्णय घ्यायचा असतो. तो अनुभव थरारक व जीवनाच्या परिभाषेवर डॉक्टरांचे महत्त्व अधोरेखित होते. अतुल गवांदे लिखित ‘बेटर’ हे पुस्तक एका शल्यविशारदाचं गुणवत्तेबाबतचं चिंतन आहे. ...Read more