* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177661903
  • Edition : 3
  • Publishing Year : FEBRUARY 1999
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 212
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :VIJAYA RAJADYAKSHA COMBO-3 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
UTTARARDH BY VIJAYA RAJADHYAKSHA- SHORT STORIES
‘उत्तरार्ध’ हा विजया राजाध्यक्ष यांच्या पूर्वप्रकाशित वाचनीय कथांचा संग्रह. यात त्यांच्या एकूण चौदा कथांचा अंतर्भाव आहे. आयुष्याच्या उत्तरार्धात येणारं अटळ एकाकीपण (मग ते शरीराने येणारं असेल किंवा मनाने) या एका सूत्रात या सर्व कथा गुंफलेल्या आहेत. कथेतील मध्यवर्ती पात्रांच्या आयुष्यातील ‘उत्तरार्ध’ वेगळे संदर्भ, वेगळी पाश्र्वभूमी आणि वेगळे नातेसंबंध अशा वेगवेगळ्या रूपाने आपल्या समोर येतो. आपल्या ओघवत्या भाषेने विजयाताई वाचकांना त्या त्या व्यक्तिरेखेच्या भावविश्वात घेऊन जातात. मग ती व्यक्तिरेखा परिचयाची किंवा कदाचित आपल्या घरातील वाटू लागते. तिच्या भावभावनांशी, सुख-दु:खाच्या आंदोलनांशी वाचक एकरूप होतो. या व्यक्तिरेखा आयुष्यातील संधिकालाच्या उंबरठ्यावर असलेल्या प्रातिनिधिक वाटू लागतात. खरेतर इतरांकडून (घरातल्या आणि बाहेरच्या) बाळगलेल्या अपेक्षांचे ओझे सुख-दु:खाशी निगडित असते. आशा-निराशेचे चढ-उतार त्यामुळेच निर्माण होतात. ‘उत्तरार्ध’मधील कथांमध्ये आयुष्यातील विविध रंगांची सर्वसमावेशकता वाचायला मिळते. या कथा विजयाताईंच्या प्रगल्भ जीवनचिंतनाचा प्रत्यय देणाऱ्या आहेत. वाचनातला आनंद आपण सारेच या अशा पुस्तकातून अनुभवत असतो.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #UTTARARDH #UTTARARDH #उत्तरार्ध #SHORTSTORIES #MARATHI #VIJAYARAJADYAKSHA #विजयाराजाध्यक्ष "
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
ॲड. प्रशांत यावले, अमरावती

आज "दुर्दम्य" वाचुन पुर्ण झाले. मराठी साहित्याचा एक अप्रतिम अविष्कार. एक व्यक्तीचित्रण पण अत्यंत प्रभावी लेखन. एकाच व्यक्तीचे वेगवेगळे गुण वेगवेगळ्या कलात्मक वर्णनाने ईतक्या समर्थपणे मांडण्याचे कौशल्यपूर्ण लिखाण. शेवटच्या प्रकरणाने ईतक्या कठोर व्यक्तमत्वा बदल देखील भावना चाळवल्या. त्या व्यक्तीचे खरे नाव माहीती असुन देखील पुस्तक वाचुन संपवल्यावर ते आठवतच नव्हते ईतका प्रभाव "एकनाथन"चा राहीला. खुप सुंदर. ...Read more

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
शंतनू

ही एक थ्रिलिंग गोष्ट आहे. या पुस्तकाचा सिक्वेल वाचायला आवडेल.