* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: CHICKEN SOUP FOR THE SOUL TOUGH TIMES, TOUGH PEOPLE BHAG 1
 • Availability : Available
 • Translators : SHYAMLA PENDSE
 • ISBN : 9789386745149
 • Edition : 1
 • Publishing Year : AUGUST 2017
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 240
 • Language : Translated From ENGLISH to MARATHI
 • Category : SHORT STORIES
 • Available in Combos :CHICKEN SOUP SERIES COMBO OFFER-61 BOOKS
Quantity
Buying Options:
 • Print Books:
"CHICKEN SOUP FOR THE SOUL IS THE “GO TO” BOOK LINE FOR EMOTIONAL SUPPORT DURING CHALLENGING TIMES. THESE ARE ALL NEW STORIES, COLLECTED IN 2009, ON AN ALL NEW TOPIC NEVER COVERED BEFORE IN CSS’ 16-YEAR HISTORY. 3. TOPICAL, MUCH ASKED FOR BOOK. READERS ARE LOOKING FOR STORIES THAT SHOW THEM THEY ARE NOT ALONE IN THESE DIFFICULT TIMES. 4. CSS IS A POPULAR PUBLISHER OF BOOKS ON CHALLENGES, OVERCOMING OBSTACLES, GRIEF, WITH MANY BESTSELLING BOOKS ON THESE TOPICS. 5. PEOPLE LOVE READING ABOUT OTHER PEOPLE’S PROBLEMS IN ORDER TO PUT THEIR OWN IN PERSPECTIVE AND ALSO GET SOME VALUABLE ADVICE FROM OTHER PEOPLE’S EXPERIENCES. 6. CONTAINS 10 BONUS STORIES OF FAITH ABOUT PEOPLE USING THEIR FAITH TO HELP THEM THROUGH TOUGH TIMES. TOUGH TIMES WON’T LAST, BUT TOUGH PEOPLE WILL. MANY PEOPLE HAVE LOST MONEY AND MANY ARE LOSING THEIR JOBS, HOMES, OR AT LEAST MAKING CUTBACKS. MANY OTHERS HAVE FACED LIFE-CHANGING NATURAL DISASTERS, SUCH AS HURRICANES AND FIRES, AS WELL AS HEALTH AND FAMILY DIFFICULTIES CHICKEN SOUP FOR THE SOUL: TOUGH TIMES, TOUGH PEOPLE IS ALL ABOUT OVERCOMING ADVERSITY, PULLING TOGETHER, MAKING DO WITH LESS, FACING CHALLENGES, AND FINDING NEW JOYS IN A SIMPLER LIFE. INCLUDES 10 BONUS STORIES OF FAITH. "
कोणतंही दु:ख पचविण्यासाठी माणसाला आवश्यक असते सकारात्मकता. केवळ दु:ख पचविण्यासाठी नाही तर आहे त्या आर्थिक परिस्थितीत सुख मानणे, आनंदात राहणे यासाठीही सकारात्मकतेची गरज असते. प्रत्येकाच्या अंगी अशी सकारात्मकता असेलच नाही. त्यामुळे ज्या माणसांकडे अशी सकारात्मकता असते त्या व्यक्तींचं वेगळेपण जाणवतं. तर अशा होकारात्मक लोकांच्या कथा त्यांनी स्वत:च कथन केल्या आहेत ‘चिकनसूप फॉर द सोल टफ टाइम्स टफ पीपल भाग १’मधून. थोड्या पैशांतून समाधान कसं मिळवायचं इथपासून घराला आग लागून वस्तूंसहित सगळं घर जळालेलं असताना स्वत:चं मन शांत कसं ठेवायचं, आईला कॅन्सर झालेला असताना केमोथेरपीमुळे तिचे केस गळतील म्हणून तिचे केस कापताना कसं हसायचं आणि आईलाही हसवायचं यांसारख्या प्रसंगांतूनही हे पुस्तक मन:शक्तीचा प्रत्यय देतं. कोणत्याही गोष्टीची कमतरता किंवा त्या गोष्टीचं प्रमाण कमी असताना, कोणताही दु:खद प्रसंग ओढवल्यावरही आनंदी राहण्याचा संदेश या पुस्तकातून मिळतो. तर खऱ्या अर्थाने जगायला शिकवणारं आणि जगण्यासाठी ऊर्जा देणारं हे पुस्तक अवश्य वाचायला पाहिजे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #CHICKENSOUPFORTHESOULTOUGHTIMESTOUGHPEOPLEBHAG1 #CHICKENSOUPFORTHESOULTOUGHTIMESTOUGHPEOPLEBHAG1 #चिकनसूपफॉरदटफटाइम्सटफपीपल-भाग १ #SHORTSTORIES #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SHYAMLAPENDSE #JACKCANFIELDMARKVICTORHANSEN "
Customer Reviews
 • Rating StarShruti Bhagyashri Bhaskar

  Jarur Vacha.

 • Rating StarShruti Bhagyashri Bhaskar

  Jarur Vacha.

 • Rating StarLOKPRABHA - 22-06-2018

  माणसांतल्या ‘फिनिक्स’चा शोध... जगताना आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या स्फूर्तिदायी माणसांच्या कथा चिकन सूप फॉर द सोल – टफ टाइम्स, टफ पीपल या पुस्तकातून आपल्या भेटीला येतात. ‘जगण्याची ऊर्मी देणाऱ्या सकारात्मक कथां’चे संपादन, संकलन जॅक कॅनफिल्ड, मार्क व्िक्टर हॅन्सन आणि अमी न्यूमार्क यांनी केले आहे. मूळ इंग्रजी भाषेतल्या या पुस्तकाचा मराठी अनुवाद श्यामला पेंडसे यांनी अत्यंत खुमासदार शैलीत केला आहे. ‘जीवन अत्यंत साधं असतं, परंतु आपणच त्याला क्लिष्ट बनवतो’ या ज्येष्ठ, प्रसिद्ध तत्त्ववेत्ता कन्फ्युशिअसच्या वाक्याने पुस्तकाच्या पहिल्या भागाची सुरुवात होते. आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरीही त्या हसतमुखाने स्वीकारून, त्यातून मार्ग काढून आपलं आयुष्य नेमक्या कशा प्रकारे जगायचं, हे आपणच ठरवायचं, हे या पुस्तकातलं समग्र तत्त्वच या एका वाक्यात सामावलेलं आहे. पूर्वी अत्यंत सधन आणि सुरळीत आयुष्य जगणाऱ्या कुटुंबावर अचानक आर्थिक संकट ओढवतं. चार मुलांचा संसार निभावून नेणारं हे जोडपं या आर्थिक संकटामुळे खचून न जाता त्याही परिस्थितीत एक कुटुंब म्हणून जगण्यातला निखळ आनंद घेत राहतं. मिशेल रॉकर यांच्या ‘चिंताच नाही’ या कथेतलं जोडपं म्हणतं की, पगारापोटी मिळालेल्या एका धनादेशापासून दुसऱ्या धनादेशापर्यंतच्या काळात आम्ही फक्त ‘जगत’ होतो. ओढवलेल्या परिस्थितीतही असं हसत जगणं महत्त्वाचं असतं आणि कुटुंब म्हणून मुलांनाही हा सकारात्मक, आशादायी दृष्टिकोन देणं पालक म्हणून किती गरजेचं असतं, अडचणीच्या वेळी कुटुंब हीच आपल्या आनंदाची ताकद कशी ठरते, हे या कथेतून कळतं. लेखिका म्हणते की, दिवसाच्या अखेरीला मुलांना कळेल की, कुणीतरी आपल्यावर खूप प्रेम करत आहे आणि त्यासाठी ‘पैसा’ लागत नाही. ‘कठीण काळातले चांगले दिवस’ या जोहाना स्टेन यांच्या काव्यरूपी कथेचेही हेच सार आहे. ‘जगातील उत्तम पेय म्हणजे पाणी, यावर आमचं नाही दुमत... आम्ही ते ऑन द रॉक्स घेतो आणि स्वत:चीच पाठ थोपटतो’ या दोनच ओळीतून साध्या साध्या गोष्टीतला आनंद मोठा करून कसं हसता येतं, हे लेखिकेने खूपच मार्मिकपणे सांगितलं आहे. शारीरिक आजारांनी, त्यातून येणाऱ्या नैराश्याने माणसं खचतात. पण जॅनेट एच. टेलर यांच्या ‘केसाला मिळणारं अवास्तव महत्त्व’ या कथेतल्या मायलेकी मात्र कर्करोगासारख्या आजारालाही आपल्या सुंदर हास्याने हरवतात. विदारक दु:खातही असा आनंद शोधणारी माणसं आपल्यासोबतच आजूबाजूच्या वातावरणातही आनंद पसरवत असतात, आजारपण किंवा अन्य कोणतेही संकट त्यांच्या धैर्याला हरवू शकत नाही. ‘जिथे सारं संपतं, तिथेच तर सुरुवात होते’ या खिस्तीन एबरहार्ड यांच्या कथेचे शीर्षकच खूप समर्पक आहे. कथेच्या सुरुवातीलाच रॉबर्ट फ्रॉस्ट यांच्या दोन ओळी आहेत. ‘आयुष्यात मी जे काही शिकलो, ते दोन शब्दांत मी सांगेन – पुढे चला’. कितीही आणि कोणत्याही अडचणी आल्या, तर आयुष्य प्रवाही ठेवणं आपल्या हाती असतं आणि त्यासाठी लागतो फक्त सकारात्मक, आशादायी दुष्टिकोन, हेच यातून समजतं. या पुस्तकाची खासियत अशी आहे, की प्रत्येक कथेच्या सुरुवातीला काही तत्त्ववेत्त्यांच्या किंवा प्रसिद्ध व्यक्तीच्या उक्ती देण्यात आल्या आहेत. ही सगळीच वाक्ये त्या-त्या कथेचे किंवा एकूणच पुस्तकाच्या विषयाचं सार सांगतात. मनाला सगळ्यात जास्त भिडणारं आणि या कथासंग्रहाचा कोळ पुरून आलेलं वाक्य म्हणजे, ‘एका स्मितहास्यासाठी.’ या कथेच्या सुरुवातीलाच अर्ल नायटिंगेल म्हणतात, ‘आपण परिस्थितीला शरण जाऊ शकतो किंवा तिच्यावर स्वार होऊन स्वत:ला घडवू शकतो.’ या वाक्यातला उत्तरार्ध अधिक महत्त्वाचा आणि सकारात्मक आहे. अर्धांगवायूसारखा आजार झाल्यानंतर मूळात दिसायला सुंदर असलेली मुलगी प्रथम खचते, पण नंतर तिच्या आजारासकट असलेलं तिचं अंतरिक सौंदर्य तिला जाणवतं आणि आपल्या ‘चेहऱ्याची हसरी बाजू’ तिला अधिक महत्त्वाची वाटू लागते. संकटाच्या वेळी हा सकारात्मक दृष्टिकोनच माणसाला जिवंत राहण्याची प्रेरणा देत असतो हे, ही नायिका दाखवून देते. अपयशामुळे मनात दाटलेली भीती, त्यातून येणारं नैराश्य माणसाला खंगवून टाकतं. पण जी माणसं त्याच भीतीवर मात करून तिचा शस्त्र म्हणून वापर करतात, ती आयुष्यात यशस्वी होतात. राखेतून जन्म घेणाऱ्या फिनिक्स पक्ष्यासारखी ही माणसं नकारात्मकतेच्या गर्तेतून बाहेर पडून मोठे पंख पसरतात आणि उंच आकाशात भरारी घेतात. ‘चिकन सूप फॉर द सोल - टफ टाइम्स, टफ पीपल’ या पुस्तकातल्या ‘थोडीशी अडचण’, ‘आपत्काल, संधी आणि बदल’, ‘हास्य, प्रार्थना आणि सगळ्याच उमलणाऱ्या गोटी’, ‘खाली पडल्यानंतर’ यांसारख्या सगळ्याच कथांमधून ही कणखर, आयुष्याला एक आव्हान समजून पेलणारी आणि स्वत:बरोबरच आसपासच्या परिसर आणि माणसांनाही सोबत घेऊन पुढे चालत राहणारी माणसं आपल्याला भेटतात. सगळ्याच कथांशी आपण स्वत:ला जोडून घेऊ शकतो, असं हे पुस्तक वाचकांना वाचक म्हणून जाणवतं.. हीच या कथांची, त्यांच्या आशयाची, अभिव्यक्तीची आणि अनुवादाची ताकद म्हणावी लागेल. –चारुता बापट ...Read more

Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
तेजस यादव

वाचला तो कर्ण ! आवडला तो कर्ण ! भावला तो कर्ण ...! दोन वर्षापुर्वी मृत्युंजय कादंबरी वाचून झालती . त्या कादंबरीने कित्येक जणांच आयुष्य कायापालट केल , हे मराठी साहित्य विश्व जाणून आहे . आता नुकतीच राधेय वाचून पुर्ण झाली . लेखक रणजित देसाई सुरवातीच ्हणतात .... " राधेय हे कर्णचरित्र नव्हे . प्रत्येकाच्या मनात दडलेला कर्ण असतो . माझ्या मनातल्या कर्णाची ही कहाणी . भावकहाणी . याची सत्यता शोधायची झाली , तर त्यासाठी महाभारताची पाने चाळण्याचे काहीच प्रयोजन नाही , कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत , तर त्यात हा कर्ण दिसेल ." मला कादंबरीत एक विशेष गोष्ट आवडली , ती म्हणजे कर्ण कुठेच वरचढ , रंगवून दाखवला नाही. त्याचे गुण दाखवले तसे त्याचे दोष ही दाखवले . नदीच्या प्रवाहावर वाहत जाणार त्याचं आयुष्य , त्याच दातृत्व , त्याच मित्रप्रेम , त्याचा मनाचा गाभारा , त्याचा आयुष्यी आलेली अहवेला वाचकांसं खुप काही शिकवून जाते . देसाईंची लेखणी इतकी प्रभावशाली आहे की ते कुरुक्षेत्राची युध्दभुमीही जिवंत झालेला भास होतो . मी जेवढा कर्ण वाचला तो मला सर्व आठवला ! मग तो ` शिवाजी सावंतांचा ` असो अथवा नटसम्राट मधील ` वि.वा.शिरवाडकर ( कुसुमाग्रजांचा ) . कादंबरी वाचून झाल्यावर कुसुमाग्रजांची ती ओळ आठवली कृष्ण - " अरे वेड्या तुझ्यासारखे कर्मयात्री ह्या धरेवरच्या माणसांचे दिपस्तंभ.! तुमचे जीवन हे केवळ जळण्यासाठी , ह्या प्रकाशात आम्हाला आमच्या वाटा सापडतात . खुप सुंदर वाचनीय , आणि भरभरुन शिकवनारी कादंबरी .... ...Read more

MAHASAMRAT ZANZAVAT
MAHASAMRAT ZANZAVAT by VISHWAS PATIL Rating Star
Abhiram Bhadkamkar

महा-सम्राट "इतिहास वाचून माणूस बेभान होतो, भानावर येतोच असं नाही" हे (बहुधा) वि ग कानेटकर यांचे विधान मला कायमच महत्वाचे वाटते। प्रकाशनास काही महिने लोटले असले तरी निवांत ऐसपैस वेळ काढून वाचायची म्हणून बाजूला ठेवलेली ज्येष्ठ कादंबरीकार विश्वा पाटील ह्यांची महासम्राट ही कादंबरी हातात घेतली आणि तिने झपाटून गेलो। ही कादंबरी बेभानही करते आणि एक भानही देते हे तिचे वैशिष्ट्य आहे. विश्वासरावांची शैली आणि त्यांची शब्दसंपत्ती ह्यावर नवे काय बोलणार? पण ही कादंबरी उभ्या देशाचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातील घटनांचे केवळ चमकदार कथन यापुरती मर्यादित न राहता तत्कालीन सामाजिक व राजकीय परिसराचे भान देणारी ठरते। तेव्हाचा काळ बारीकसारीक तपशिलांसह उभा करते. ती छत्रपतींच्या तेजस्वी कर्तृत्वाला मुजरा तर करतेच पण त्यासोबत त्यांच्या जन्मापूर्वीची राजकीय परिस्थिती, त्यातून आईसाहेबांच्या मनात उगवलेल्या हिंदवी स्वराज्याच्या अत्यंत अवघड, जवळजवळ अशक्यप्राय स्वप्नाच्या पाठलागाची वेगवान घडामोड चितारते. मुघलांचे डावपेच, खेळया नेस्तनाबूत करण्यामागची `अत्यंत योजनाबद्ध आखणी` मांडत जाते। ही कादंबरी माझे त्याकाळाबद्दलचे आकलन वाढवते. मऱ्हाटी मुलाखातला तत्कालीन निसर्ग यात येतो, तत्कालीन नातेसंबंध, समाजधारणा आणि परचक्राच्या दडपणाखालची उलघाल यातून त्या काळाचा पट मांडला जातो आणि इथेच कादंबरी केवळ एका युगपुरुषांचे चरित्रकथन न रहाता एका शतकाचा लेखाजोखा होऊन जाते। वेगळेपण आहे ते हेच की ही कहाणी महाराक्षसी लाटांविरुद्ध पोहून जात महासागरालाच बांधून घालणाऱ्या चिवट आशावादाची आणि या स्वप्नाला प्रत्यक्षात उतरवणाऱ्या बुद्धीचातुर्याची होत जाते। म्हणूनच ती एकाच वेळी बेभानही करते आणि भानही देते। कादंबरी संपते एक स्वल्पविराम देत... आता पुढचे भाग... त्याची अधीरता आणि उत्सुकता... डोळे दिपून जावेत अशा थोर व्यक्तिमत्वाचे चित्रण हे शिवधनुष्य होते, जे लिलया पेलले आहे... यात रेखाटलेली चित्रे अप्रतिम आहेत... घराघरात भक्तिभावाने ठेवावा आणि `अभ्यासावा` असा हा `झंझावात` आहे... ...Read more