* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: VAPURWAI
  • Availability : Available
  • ISBN : 9788177663433
  • Edition : 15
  • Publishing Year : JANUARY 1986
  • Weight : 140.00 gms
  • Pages : 140
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :V. P. KALE COMBO SET-52 BOOKS.
    V.P. KALE BIRTHDAY OFFER
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
I CARE MORE FOR THE SHADOW A TREE CASTS ON US. IT IS TRUE THAT IF WE CUT THE TREE, WE WILL GAIN A LOT OF MONEY BY SELLING THE WOOD, BUT WE WILL BE BENEFITTED MORE BY ITS SHADOWS FOR GENERATIONS TO COME. IT IS MANY TIMES VALUABLE THAN THE MONEY WE MIGHT GET FROM ONE TIME SELL OF THE WOOD.` "VAPURVAI` THIS TITLE IS BASED ON THE MARATHI WORD APURVAI, WHICH MEANS NOVEL, OR SOMETHING UNPRECEDENTED. VA PU PROVES TRUE TO IT. ALL HIS STORIES ATTRACT THE READERS WITH THEIR SIMPLICITY; THERE IS NOT JUST ONE QUALITY OF HIS WRITING WHICH CAPTIVATES A MIND. IT IS A COMBINATION OF MANY GOOD THINGS UNDER ONE ROOF, OR ON ONE PAGE. HE CAPTURES THE BEAUTY OF ALL THE INCIDENTS IN HIS SUPERB STYLE. HE REVEALS THE SECRETS OF THE ROUTINES. HE FINDS THE VERY UNIQUENESS IN EVERY CHARACTER, UNDER EVERY OR ANY CIRCUMSTANCES. LIFE IS FULL OF DIFFERENT PHASES; THOSE OF SORROW, HAPPINESS, STRUGGLE, BROODING, AND MANY MORE. VA PU HANDLES THEM ALL WITH EQUAL CAPACITY REVEALING THE BEAUTY FOR US, AND CONQUERING OUR MINDS ONCE AGAIN; AS ALWAYS.
‘‘....महाकाय वटवृक्ष तोडून त्याच्या लाकडाचे पैसे नक्कीच भरपूर येतील; पण त्याच्या कितीतरी पट अधिक, पिढ्या न् पिढ्या पुरणारी संपत्ती त्याची सावली असते. मला सावलीचं महत्त्व पटतं....’’ — लोकप्रिय कथाकार वपु काळे आपल्या कथेत अशा अनोख्या प्रतिमांमधून सतत माणूसपणाचा उद्घोष करताना दिसतात. वेगवेगळ्या परिस्थितीत सापडलेली, संघर्ष करणारी, हसणारी, रडणारी, कुढणारी सर्वसामान्य माणसं रंगवताना, ते त्यांच्यातल्या असामान्यत्वाचा नेमका वेध घेतात आणि आपल्या प्रसन्न, खुमासदार, मिस्किल शैलीत त्याचा आविष्कार करतात. वपुंच्या लेखनातील हा पैलूच वाचकांना अपूर्वाईचा वाटतो. यामुळेच वपुर्वाई वाचकांचं मन सहज जिंकून घेते...

No Records Found
No Records Found
Keywords
25TH MARCH #SANVADINI #VAPU 85 #NAVRA MHANAVA AAPALA #MODEN PAN VAKNAR NAHI #ONE FOR THE ROAD #ZOPALA #MAYABAJAR #CHATURBHUJ #INTIMATE #GULMOHAR #VAPURVAI #HUNKAR #MI MANUS SHODHATOY #BAI BAYKO CALENDER #SWAR #BHULBHULAIYA #KA RE BHULALASI #VALAY #KARMACHARI #AIK SAKHE #GOSHTA HATATLI HOTI #TAPTAPADI #GHAR HARAVLELI MANASA #DOST #MAHOTSAV #KAHI KHAR KAHI KHOTA #SAKHI #RANG MANACHE #AAPAN SARE ARJUN #THIKARI #TU BHRAMAT AAHASI VAYA #HI VAT EKTICHI #PARTNER #DUNIYA TULA VISAREL #PREMAMAYEE #FANTASY EK PREYASI #PANPOI#NIMITTA #MAZA MAZYAPASHI? #PLEASURE BOX BHAG 1 #PLEASURE BOX BHAG 2 #KATHA KATHANACHI KATHA #VAPURZA #RANGPANCHAMI #SANGE VADILANCHI KIRTI #CHEERS #MANASA #JAPUN TAK PAUL #LALITKALECHYA SAHAWASAT #DAHAVYA RANGETUN #२५ मार्च #संवादिनी #वपु# ८५ # नवरा म्हणावा आपला #मोडेन पण वाकणार नाही #वन फॉर द रोड#झोपाळा #मायाबाजार #चतुर्भुज #इन्टिमेट #गुलमोहर #वपुर्वाई #हुंकार #मी माणूस शोधतोय #बाई, बायको, कॅलेंडर #स्वर #भुलभुलैय्या #का रे भुललासी #वलय #कर्मचारी #ऐक सखे #गोष्ट हातातली होती! #तप्तपदी #घर हरवलेली माणसं #दोस्त #काही खरं काही खोटं #सखी #महोत्सव #रंग मनाचे #आपण सारे अर्जुन #ठिकरी #तू भ्रमत आहासी वाया #"ही वाट एकटीची #(राज्य पुरस्कार १९७०-७१)" #पार्टनर #दुनिया तुला विसरेल #प्रेममयी #फॅण्टसी एक प्रेयसी #पाणपोई #निमित्त #माझं माझ्यापाशी? #प्लेझर बॉक्स भाग-१ #प्लेझर बॉक्स भाग-२ #कथाकथनाची कथा #वपुर्झा #रंगपंचमी #सांगे वडिलांची कीर्ती #चिअर्स #माणसं #जपून टाक पाऊल! # ललितकलेच्या सहवासातून #दहाव्या रांगेतून
Customer Reviews
  • Rating StarVishakha Kulkarni

    व पू म्हणतात माणसाला कोणतेतरी वेड असायला हवे. असे वेड जे त्याला झपाटून टाकेल... असे वेड जे त्याला शांत बसू देणार नाही... वाचनाच्या असाच वेडापायी हातात घेतलं व पूंच वपूर्वाई...... खरं तर वाचकांसाठी हि अपूर्वाईच!! व पू काळे यांचे अनेक विचार नेहमीच ाचनात येतात. विचार करायला लावतात. आणि त्यामुळेच अनेक दिवसांपासून व पुंच एखादं पुस्तक वाचव असं मनात होतं. म्हणून हे पुस्तक हाती घेतलं आणि वाचायला सुरुवात केली. अगदी साधे शब्द, साधे अनुभव त्यांनी अत्यंत सुंदर भाषेत मांडले आहेत. अनेकदा आपल्या आजू बाजूच्या माणसांच्या हालचाली, त्यांचे हावभाव आपण गृहीत धरतो... ते ही फार विचार न करता.... पण पुढे त्या हालचालींमागे काही कारण असते हे आपल्याला जेव्हा लक्षात येते तेव्हा त्यामागील कारण खरंच आपल्याला अचंबित करणारे असते. आणि हेच व पुंनी आपल्या भाषेत मांडले आहे. बरं केवळ अनुभवच मांडले नाहीत तर प्रत्येक गोष्ट आपल्याला एक नवा विचार, एक नवी शिकवण देऊन जाते. तसं पाहिलं तर अनेकदा आपण ज्या गोष्टी "taken for granted" घेत असतो त्या आपल्या स्वभावाला, व्यक्तिमत्त्वाला नवा पैलू देत असतो. तो पैलू कसा पडला जातो याची जाणीव करून देणारा एक उत्तम कथा संग्रह! - विशाखा ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA 30-11-1986

    सुरेख कथासंग्रह… वपुच्या आजवरच्या लेखन लौकिकात भर टाकणारा आणखी एक कथासंग्रह आहे - वपूर्वाई. वपुंची कथाकथनाची हातोटी त्यांच्या लेखनातही समर्थपणे जाणवते. लेखन आणि कथाकथन ह्या दोन्ही क्षेत्रात वपुंनी आपलं असं एक विशिष्ट स्थान निर्माण केलं आहे हे निर्विाद. ओघवत्या आणि सोप्या भाषेतून वाचकांच्या समोर प्रसंग उभा करण्याचे सामर्थ्य, मानवी भावभावनांचे वेगवेगळे पदर दाखवण्याचे वपुंचे कसब ह्या कथांतून ठायीठायी जाणवते. पुलंच्या अपुर्वाई नावाप्रमाणे वपुर्वाई हे कथासंग्रहाचे नाव असले तरी बाकी कुठल्याही प्रकारचे दोहोत साम्य नाही. अपुर्वाईमध्ये पुलंनी परदेशवर्णन, तेथील अनुभवकथन केले आहेत तर वपुर्वाईमध्ये वपुनी ७ कथांमधून कलाकाराच्या समाजाकडून अपेक्षा, स्त्रीमुक्तीचा सोपा अर्थ, माणसाची प्रेम करण्याची स्वार्थी रीत इ. कथाबीजं फुलवली आहेत. सर्वच कथा चांगल्या आहेत. त्यातल्या त्यात डावे-उजवे करायचे झाले तर ‘झापड’, ‘ठिणगी’ आणि ‘नॉट सो स्ट्रेज’ या तीन कथांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. कलावंत समाजाचं ज्याप्रमाणे काही देणं लागतो त्याप्रमाणे समाजही कलावंताचे काही देणं लागतो ह्याचं समाजानं भान ठेवावं हे आहे ‘झापड’ कथेचं सूत्र. कलाकारांच्या बाबतीत समाज फार टोकाची भूमिका घेत असतो. एखाद्या कलाकाराचे कौतुक केले तर इतके करतील की चाहत्यांच्या प्रेमाने तो गुदमरून जाईल, नाहीतर जरा कुठे त्या कलाकाराचा तोल ढळतो असे वाटले तर त्याला टोचून टोचून जीव नकोसा करून टाकतील. कलेच्या प्रांतात गरुड-भरारी घेताना जरा कुठे तोल गेला तर त्याला घसरणे हे नामाभिधान न देता कलाकाराला आलेली ती द्वाणिक झापड समजून, ‘सुबह का भुला शाम को घर लौटा तो उसे भुला नही कहते’ ह्या उक्तीप्रमाणे, समाजाने त्या कलावंताला भक्कम आधार द्यायला हवा. हे ह्या कथेतील कलावंत नायिकेचा पती स्वत:च्या कृतीने पटवून देतो. आपली पत्नी क्षणिक मोहाला बळी पडली हे कळल्यावरही तिला झालेला खराखुरा पश्चाताप अनुभवून धीरोदात्त मनाने तो तिला स्वीकारतो. इथे संसाराची व्याख्या वपु फार छान देतात- ‘‘एकमेकांचे वाभाडे काढण्यासाठी किंवा वर्मावर चोची मारण्यासाठी संसार करायचा नसतो. जिथं जोडीदार कमी पडेल तिथं आपण उभं राहायचं’’ मान गए उस्ताद! ‘‘नवऱ्याच्या नजरेत ज्या क्षणी प्रथम पशुत्वाची ठिणगी दिसते त्याच क्षणापासून स्त्रीनं बंडांच निशाण उभारायला हवं. प्रत्येक ठिणगीची चितेची ज्चाला होईल तोवर वाट बघायची नाही.’’ ‘ठिणगी’ या कथेतील नायिका सुप्रियाच्या तोंडून वपुच स्त्रीमुक्तीचा अर्थ वाचकांना सांगत आहेत असं वाटतं. स्वाभिमानी, बाणेदार वकील सासऱ्याच्या विरोधात उभी राहून एका सासुरवाशिणीच्या खुनाची हायकोर्टात दाद मागते आणि त्या खुनी नवऱ्याला फाशीची आणि सासऱ्याला जन्मठेपेची शिक्षा देववते, ही सर्वच कथा रोमांचक आहे. ‘नॉट सो स्ट्रेंज’ कथेत एक मांजर उर्फ कुत्रा, माणसाची व्यवहारी रीत सांगतो - ‘‘समोरचा माणूस जितका आपल्या मनाप्रमाणे वागेल तितकेच त्याच्यावर आपण प्रेम करतोय.’’ अपघातानंतरच्या ऑपरेशमुळे मांजर-कुत्र्यासारखं वागायला लागल्यावर त्याला मांजरंही आपलं म्हणत नाहीत आणि मांजराचे रुप असल्यामुळे कुत्रीही त्याला आपल्यात सामावून घेत नाहीत. शेवटी हा टू इन वन प्राणी म्युनिसिपालिटीच्या कुत्री पकडण्याच्या गाडीत आपणहून चढून जातो. वपु व्यवसायाने आर्किटेक्ट असल्यामुळे त्या कामाची वर्णनही ‘प्रिटेंड सर्किट’ ह्या कथेत आली आहेत. ‘हसरे दु:ख’ ही कथा मनोविश्लेषणात्मक वाटते. ‘एम.वाय. आर. ६९०’ या कथेत सर्वार्थाने मुक्त स्त्रीचं वर्णन येतं. स्त्री-पुरुष मैत्रीचे विविध पदर दाखविणारी ही कथा आहे. ‘हव्या हव्या क्षणांसह’ या कथेत दोन थरातील मित्र-मैत्रिणीच्या दोन जोड्या आहेत. एकमेकांच्या सहवासासाठी आतुरलेल्या क्लार्क जोडीतील मैत्रिणीला वाटतं - आपण दोघं मोठ्या हुद्द्यावर असतो तर उघड-उघडपणे बरोबरीने वावरता आलं असतं. मोठ्या हुद्द्यावरील जोडीतील मैत्रिणीला वाटतं, आपण सामान्य असतो तर एकमेकांच्या सहवासात मजेत राहिलो असतो. लोकांचं आपल्याकडे लक्षही गेलं नसतं. मानवी स्वभावाच्या बारक्याशा कंगोऱ्यातूनही वपु कथा फुलवतात, त्यामुळे वाचकांना त्यांच्या कथा एक आगळाच आनंद देऊन जातात. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more