* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE BOY IN THE STRIPED PYJAMAS
  • Availability : Available
  • Translators : MUKTA DESHPANDE
  • ISBN : 9788184981414
  • Edition : 1
  • Publishing Year : AUGUST 2010
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 172
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
  • Available in Combos :JOHN BOYNE BIRTHDAY OFFER
Quantity
Buying Options:
  • Print Books:
BERLIN 1942- WHEN BRUNO RETURNS HOME FROM SCHOOL ONE DAY, HE DISCOVERS THAT HIS BELONGINGS ARE BEING PACKED IN CRATES. HIS FATHER HAS RECEIVED A PROMOTION AND THE FAMILY MUST MOVE FROM THEIR HOME TO A NEW HOUSE FAR FAR AWAY, WHERE THERE IS NO ONE TO PLAY WITH AND NOTHING TO DO. A TALL FENCE RUNNING ALONGSIDE STRETCHES AS FAR AS THE EYE CAN SEE AND CUTS HIM OFF FROM THE STRANGE PEOPLE HE CAN SEE IN THE DISTANCE. BUT BRUNO LONGS TO BE AN EXPLORER AND DECIDES THAT THERE MUST BE MORE TO THIS DESOLATE NEW PLACE THAN MEETS THE EYE. WHILE EXPLORING HIS NEW ENVIRONMENT, HE MEETS ANOTHER BOY WHOSE LIFE AND CIRCUMSTANCES ARE VERY DIFFERENT TO HIS OWN, AND THEIR MEETING RESULTS IN A FRIENDSHIP THAT HAS DEVASTATING CONSEQUENCES.
ब्रूनोच्या पोटात एक कळ उठली. आतमध्ये, अगदी खोल मोठी खळबळ माजली आहे, हे त्याला जाणवलं... हे जे चाललं आहे; त्याचे परिणाम भविष्यकाळात कुणाला न कुणाला भोगावे लागणार आहेत हे जगाला मोठ्यानं ओरडून सांगावसं त्याला तीव्रतेनं वाटलं. ही गोष्ट दुस-या महायुद्धाच्या सुमाराची-जर्मनीत घडणारी. या युद्धाचे जगावर झालेले भीषण परिणाम आपल्याला माहीतच आहेत; परंतु या युद्धाशी निगडित छोट्या छोट्या गोष्टींनी एका लहान मुलाच्या भावविश्वात किती मोठी उलथा-पालथ झाली त्याची ही गोष्ट. ही संपूर्ण कहाणी ब्रूनो या नऊ वर्षांच्या मुलाच्या नजरेतून आपल्यापुढे उलगडत जाते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #THE BOYINTHESTRIPPEDPAYJAMAS #MUKTADESHPANDE #JOHNBOYNE
Customer Reviews
  • Rating StarAdv. Kaveri Patil

    "#द_बॉय_इन_द_स्ट्राईप्ड_पायजमाज्" मुक्ता देशपांडे यांचं मराठी अनुवादित पुस्तक. मूळ लेखक जॉन बायेन आयरिश कादंबरीकार आहेत. प्रौढांसाठी अकरा आणि तरुण वाचकांसाठी सहा कादंबऱ्यांचं लेखन त्यांनी केलेलं आहे .त्यांच्या कादंबऱ्या 50 हून अधिक भाषांमध्य प्रकाशित झालेल्या आहेत. #2006_मध्ये_प्रकाशित_झालेल्या_द_बॉय_इन_द_स्ट्राईप्ड_पायजमाज्_या_कादंबरीला #त्याच_नावाने_2008_मध्ये_चित्रपटात_रूपांतरित_केलेले_आहे. हे एक उत्तम पुस्तक आहे. शेवट थोडा अनपेक्षित आणि दुःखी आहे परंतु एकूणच ही एक उत्तम कथा आहे. ब्रूनोला एक निरागस मूल म्हणून चित्रित केले गेले आहे, ज्याला संशोधन करायला आणि संशोधनाची पुस्तकं वाचायला आवडते. बेचाळीस भाषांमध्ये भाषांतरे प्रकाशित झालेली दुसऱ्या महायुद्धातील, नऊ वर्षाच्या ब्रूनो नावाच्या लहान मुलाच्या भावविश्वात होणाऱ्या उलथा-पालथीची ही रहस्यमय कथा. बर्लिन शहर ,बर्लिन मधील गजबजलेल्या वस्तीमधील ब्रूनोचे वैभवशाली मोठे घर ते आउट-विथ हे एकमेव छोटे घर आणि तेथील शांतता असा ब्रूनोच्या जीवनातील घडामोडीचा प्रवास . पुस्तकातील महत्वाचा भाग म्हणजे "कुंपण". आउट-विथ हे सीमा दर्शविणाऱ्या कुंपण विभागणीचे एक शक्तिशाली प्रतीक आहे. भौतिकदृष्ट्या, कुंपण युरोपीय यहुद्यांना कैद करण्याचे काम करते, त्यांना गैर-यहुदी लोकसंख्येपासून शारीरिकरित्या वेगळे करते. कुंपण यहुद्यांच्या निकृष्ट दर्जाच्या वैचारिक श्रद्धाचे प्रतीक आहे. अशा या कुंपणाच्या पलीकडे काय आहे, तिकडची माणसं कोण असावीत हे जाणून घेण्याची ब्रूनोला लागलेली उत्सुकता!! त्याच शोध मोहिमेत कुंपणाच्या पलीकडचा ब्रूनोला भेटलेला आणि भेटीनंतर त्याला तो खूप आवडलेला ब्रूनोचा कुरूप दिसणारा मित्र #शम्यूल. #आणि_पुढे_काय_होत_हे_जाणून_घ्यायला_पुस्तक_वाचायला #पाहिजे. -अ‌‍ॅड.कावेरी राख पाटील🖋️ ...Read more

  • Rating StarUmesh Ghode

    छानच आहे ही छोटेखानी कादंबरी

  • Rating Star‎Suhas Birhade

    हेलावून टाकणारी निरागस मैत्री लहान मुले ही निष्पाप, निरागस असतात. ही गोष्ट आहे ९ वर्षांच्या दोन लहान मुलांची आणि त्यांच्या भावविश्वाची..पण ज्या पार्श्वभूमीवर ही गोष्ट घडते ती आपल्याला हेलावून टाकते. दुसऱ्या महायुध्दात नाझींकडून ज्यू लोकांचा नरंहार सुरू असतो. ज्यू लोकांचे शिरकाण करण्यासाठी छळछावणी बांधली जाते. या कामासाठी नाझी कमांडर कुटुंबासह रहायला येतो. त्याचा ९ वर्षांचा मुलगा असतो ब्रुनो. ब्रुनोला घरापलिकडे ती छळछावणी दिसते. पण ते काय असतं ते माहित नसतं. तो एकदा कुतूहल म्हणून कुंपणाजवळ जातो आणि तेथे त्याची त्याच्याच वयाच्या श्मूल या ज्यू मुलाशी मैत्री होती. लहान मुलांच्या नजरेतून एक एक प्रसंग उलगडत जातात. मात्र त्यामागची दाहकता आपल्याला अस्वस्थ करत रहाते. ही छळळावणी म्हणजे खूप सुखी जागा असे ब्रुनोला वाटत असते. ब्रुनो दररोज श्मूलसाठी काहीतरी खायला आणतो. पण श्मूल दिवसेंदिवस खंगत असतो, त्याचे नातेवाईक एक एक करून नाहिसे होत असतात. श्मूलच्या बेपत्ता वडिलांना शोधण्यासाठी साहस करून ब्रुनो कुंपणापलिकडे जातो. पुढे उत्कंठावर्धक आणि अनपेक्षित प्रसंगांनी आपल्याला हेलावून सोडलं जातं. क्रूर, निष्ठूर जगात दोन चिमुकले मैत्रीचा संदेश देऊन जातात. लेखक जॉन बायेन यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचे जगातील अनेक भाषात भाषांतर झाले आहे. याच नावाने २००८ मध्ये निघालेला सिनेमाही तितकाच गाजला होता. ...Read more

  • Rating StarSakal Saptarang 27-8-17

    काही काही पुस्तकं खोल जखम करून जातात. बराच काळ ती भळभळत कायम राहते. कालांतरानं बरी होते; पण व्रण मात्र कायम राहतो. थंडी वा-याच्या दिवसांत ती उगीचच दुखते. आपलं अस्तित्व जाणवून देते. ‘मीसुद्धा तुझ्या भूतकाळाचा एक भाग आहे, याची आठवण करून देत. माणसाला वेदनेची स्मृती राहत नाही म्हणतात. ते एक वरदानच. मात्र, या असल्या जखमांच्या वेदना मात्र कशा काय कोण जाणे, कायम राहतात. `द बॉय इन द स्ट्राइप्ट पायजमाज’ ही अशीच कादंबरी. दुस-या महायुद्धातल्या हिटलरप्रणीत यहुदी छळछावण्यांबद्दल आजवर लाखो पृष्ठं लिहिली गेली. शेकडो चित्रपटही निघाले. हा आपला कोडगेपणा आहे. इतक्या भयंकर अमानुषतेला फक्त दु:स्वप्न मानायचं? हिटलरच्या नाझी वरवंट्याखाली हजारो लाखो यहुद्यांना किडा-मुंगीपेक्षाही वाईट हालहाल होऊन मरावं लागलं. तरणेताठे कसेबसे तगले. आजारी, वृद्ध आणि लहान लहान मुलं थेट गॅसचेम्बरमध्ये गेली. धूर होऊन वातावरणात मिसळली. माणूस म्हणवून घेण्याची शरम वाटावी, असा हा प्रकार. पण कालौघात या जखमाही भरल्याच. ‘होलेकॉस्ट’ या विषयावर आता काही नको, असं वाटत असतानाच २००३ मध्ये एक जॉन बॉइन नावाचा एक आयरिश तरुण लेखक उठतो काय, अवघ्या अडीच दिवसांत एक चिमुकली कादंबरी लिहितो काय आणि अवघ्या रसिकांना पुन्हा मुळासकट हादरवतो काय.... सगळंच अतक्र्य. बॉइननं ही कादंबरी लिहिली, तेव्हा तो अवघ्या ३२ वर्षांचा होता. म्हणजे त्यानं महायुद्धातला ‘म सुद्धा पाहिलेला नव्हता. शिवाय कहर म्हणजे त्यानं ही कादंबरी लिहिली ती मुलांसाठी! होलेकॉस्ट हा विषय बालवाङमयात नेण्याचा त्याचा हा अट्टाहास कुठल्या खात्यात टाकायचा? तुम्हीच ठरवा. पण बॉइनची कादंबरी कुमारवाङ्मय म्हणून गाजलीच; पण प्रौढांनाही तिनं अस्वस्थ केलं. कादंबरी लहान मुलाच्या नजरेतूनच सांगितलेली आहे. त्यामुळं वर्णनं अंगावर येतात. मृत्यूच्या अगदी कडेकडेनं जाणारा हा निरागसतेचा प्रवाह अगदी हलवून सोडतो. ब्रूनो आणि श्मूएल दोघं चिमुकले गोड मित्र. अमानुषतेचं काटेरी कुंपण त्यांना रोखू शकलं नाही. दोघांनी आपापलं आभाळ एकमेकांना देऊ केलं आणि खरंच देऊनही टाकलं. त्यांच्या निरागस जगात कोरडी आश्वासनं नसतातच. ती ‘मिरास’ आपल्यासारख्या अमानुषतेची कुंपण घालत फिरणाऱ्या प्रौढ जगाची. - प्रवीण टोकेकर ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book