* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: NAGASAKI
 • Availability : Available
 • Translators : Jayashree Godase
 • ISBN : 9789353171193
 • Edition : 1
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 360
 • Language : Translated From ENGLISH to MARATHI
 • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
THIS IS THE FIRST BOOK TO PIECE TOGETHER THE STORY OF THE JAPANESE CITY PULVERIZED BY THE GREATEST LETHAL FORCE EVER UNLEASHED BY MAN THE EVENTS OF A FEW DAYS IN AUGUST 1945 BROUGHT WWII TO AN END. THEY ALSO DESTROYED THE CITY OF NAGASAKI AND KILLED 80,000 OF ITS INHABITANTS, HALF OF THEM INSTANTLY. CRAIG COLLIE IS THE FIRST PERSON TO INTERVIEW ELDERLY SURVIVORS AND DESCENDANTS OF THE VICTIMS AND TO STITCH TOGETHER THEIR RECOLLECTIONS WITH CONTEMPORARY DIARIES AND LETTERS AND DETAILS FROM OFFICIAL DOCUMENTS. THE RESULT IS A UNIQUE, UNPRECEDENTED WORK OF NARRATIVE RECONSTRUCTION THAT FOLLOWS ORDINARY JAPANESE IN THE HOURS AFTER THE BLAST TO PROVIDE A GRIPPING ACCOUNT OF THE DECISION-MAKING, THE DENIALS, THE DEVASTATION AND THE LOSS.
नागासाकी ही कादंबरी म्हणजे १९४५मध्ये अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकला, त्याच्या पार्श्वभूमीची, परिणामांची आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या अनेक बाबींची विस्तृत कहाणी आहे. १६ ते २९ जुलै आणि ५ ऑगस्ट १९४५ ते १० ऑगस्ट १९४५ या दिवसांतील राजकीय घडामोडींचं आणि हिरोशिमा, नागासाकीतील लोकांच्या दैनंदिन जीवनाचं चित्रण, असं सर्वसाधारणपणे या कादंबरीचं स्वरूप आहे. क्रेग कोली यांनी संशोधन करून, खूप संदर्भ अभ्यासून, प्रत्यक्षदर्शींच्या मुलाखती घेऊन ही कादंबरी सिद्ध केली आहे. जपानने पर्ल हार्बरवर केलेल्या हल्ल्याचा सूड म्हणून अमेरिकेने हा बॉम्बहल्ला केला. त्या हल्ल्यानंतर या शहरांमध्ये झालेल्या मृत्यूच्या तांडवाचं आणि जखमी लोकांच्या वेदनांचं प्राधान्याने चित्रण करणारी ही कादंबरी जरूर वाचली पाहिजे.
Video not available
Keywords
HIROSHIMA#NAGASAKI$6AUGUST1945#
Customer Reviews
 • Rating StarMILUN SARYAJANI MASIK JULY 2019

  सोमवार, ६ ऑगस्ट १९४५. सकाळी ८.०५ला ‘लिटल बॉय’ हिरोशिमाच्या दिशेनं झेपावला. हिरोशिमातील हानीचे वृत्त सर्व जपानला कळण्याआधीच ९ ऑगस्ट १९४५ रोजी सकाळी ११वाजता नागासाकी शहरावर ‘फॅट मॅन’ हा दुसरा अणुबाँब टाकण्यात आला. दोन्ही हल्ल्यात निरपराध अज्ञातांचा निंकुश संहार झाला. ६ ऑगस्ट ते ९ ऑगस्टपर्यंतच्या कालावधीत हिरोशिमा व नाकासाकीतील प्रत्यक्ष घटनांचा अभ्यास करून क्रेग कोली यांनी पुस्तक लिहिले. क्रेग कोली हे ऑस्ट्रेलियन दूरचित्रवाणी निर्माता व दिग्दर्शक आहेत. दैनंदिन व्यवहारात मग्न असणाऱ्या यामागुची निशिओका, टाकिगाव, मिस्त्यू, सातोषी नाकामुरा, फादर तमाया, फादर सायमन, डॉ. नागाई, डॉ. आकिझुकी, युद्धकैदी मॅकग्रथ-कर, चीक या व अशा असंख्य लोकांना या स्फोटांचा चटका बसला. असंख्या जीव गमावले तर अनेकांनी मरणयातना भोगल्या. जवळजवळ एक लाख लोक मरण पावले. प्रत्यक्षदर्शींच्या मुलाखती, डायऱ्या, पत्र यांच्या आधारे क्रेग कोली यांनी ही ऐतिहासिक सत्यकथा अनेक पातळ्यांवर लिहून त्या भयंकर दिवसांचे यथार्थ चित्रण केले आहे. लेखकाने अनेक व्याqक्तरेखा खूप समरसतेने उभ्या केल्या आहेत. सामान्य लोक नरकयातना भोगत असताना जगाच्या पटावरील अमेरिकन, रशियन व इतर नेते मात्र एकमेकांवर कुरघोडी करण्यात मग्न होते. अनुवादक डॉ. जयश्री गोडसे यांना असे वाटते की, हिरोशिमा स्फोटानंतर जपानने लगेच शरणागती पत्करली असती तर नागासाकी वाचले असते. अमेरिकेच्या अधिकाऱ्याची वृत्ती, शास्त्रज्ञांची हुशारी अशी संहारक शस्त्र तयार करण्यासाठी वापरली गेली आणि मानवतेला लाजवणारी घटना घडली. मुखपृष्ठावरील मशरूम आकाराचा ढग, चेहऱ्यावर साकळलेले दु:ख व लाल रंगातील ‘नागासाकी’ अक्षरे हा अनुभव गडद करतात. जगाला कलाटणी देणाऱ्या संहाराविषयीचे हे पुस्तक आवर्जून वाचावे, संग्रही ठेवावे असे आहे. - सुनीता भागवत, प्रतिनिधी पुणे ...Read more

 • Rating StarLOKPRABHA 01-02-2019

  भयावह आणि वेदनादायक!... जगातील सर्वाधिक भयावह नरसंहारक दिवस असे ६ ऑगस्ट आणि ९ ऑगस्ट १९४५ या दोन्ही दिवसांचे वर्णन केले, तर ते वावगे ठरणार नाही. सुप्रसिद्ध दूरचित्रवाणी निर्माता क्रेग कोली यांनी त्यांच्या ‘नागासाकी’ या कादंबरीत या नरसंहाराचे अंगावर कटा आणणारे वर्णन केले आहे. डॉ. जयश्री गोडसे यांनी या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे. जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांवर झालेल्या अणुबॉम्ब हल्ल्यानंतर तिथे निर्माण झालेल्या भयावह परिस्थितीचे दर्शन ही कादंबरी घडवते. अमेरिकेच्या पर्ल हार्बर या शहरावर आणि लष्करी तळावर जपानने सागरी मार्गाने हल्ला केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर अमेरिकेकडून अणुबॉम्ब हल्ला करण्यात आला. कोली यांच्या कादंबीत अणुबॉम्ब हल्ल्यानंतर या दोन्ही शहरांतील भयानक विध्वंसाची कथा आहे. १६ ते २९ जुलै आणि ५ ऑगस्ट १९४५ ते १० ऑगस्ट १९४५ या दिवसांतील राजकीय घडामोडींचे आणि हिरोशिमा व नागासाकीतील जनतेच्या दैनंदिन जीवनाचं चित्रण या कादंबरीत करण्यात आलेले आहे. कादंबरीला प्रत्यक्षदर्शीच्या मुलाखती, डायऱ्या, पत्र यांचा आधार आहे. मात्र ही कादंबरी वाचताना आपणच या घटनांचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहोत की काय असे वाटायला लागते. ६ ऑगस्ट १९४५ रोजी हिरोशिमावर पहिला बॉम्बहल्ला झाल्यानंतर या कादंबरीला सुरुवात होते. या बॉम्बहल्ल्याचे वर्णन करताना लेखक म्हणतो, ‘शहरामध्ये असलेल्या सिमेंट काँक्रीटच्या इमारती सोडल्यास सर्व काही क्षणार्धात नष्ट झाले. जणू काही स्वच्छ केलेले, सपाट पण जळून गेलेले वाळवंट!’ कादंबरी वाचताना अशा अनेक वर्णनावरून त्या भयावह परिस्थितीची जाणीव होते. हिरोशिमामध्ये बॉम्बमुळे झालेला संहार भयानक असला तरी त्या वेळच्या वृत्तपत्रांमध्ये त्याबाबत त्रोटक माहिती होती. एकतर बातम्या देण्यासाठी वृत्तपत्रांवर बंदी होती, त्याशिवाय काही वृत्तपत्रांनी ही घटना गांभीर्याने घेतली नाही. हिरोशिमावर हल्ला होतो, त्या वेळी नागासाकीतील ‘मिनयू’ या वृत्तपत्राचा पत्रकार नाकामुरा तिथे उपस्थित असतो, मात्र या घटनेची बातमी देण्यासाठी या शहराचे राज्यपाल परवानगी देत नाहीत. एकूण हिरोशिमावरील हल्ल्यानंतर मोठी जीवितहानी होऊनही प्रसारमाध्यमांना ही घटना प्रभावीपणे पोहोचवता आली नाही, असे या कादंबरीतून दिसते. त्यामुळे ही कादंबरी लिहिताना लेखकाला मदत झाली ती केवळ जे जिवंत राहिले, त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आणि त्या काळी असणारी पत्रे, डायऱ्या यांची. लेखकाने या कादंबरीत अनेक व्यक्तिरेखा खूप समरसतेने उभ्या केल्या आहेत. त्यांचे परस्परसंबंध, स्वभाव, कृती याचे वर्णन आणि घटना डोळ्यांसमोर उभ्या राहतात. ‘तो प्रकाशाचा लोट बघितल्यानंतर जुन्जी सातो अंत:स्फूर्तीने सायकल टाकून स्वत:ला जमिनीवर झोकून एका अरुंद बोळात शिरला. आपला चेहरा सुरक्षित राहावा म्हणून त्याने तो जमिनीत अक्षरश: दाबून धरला. त्याची जी कातडी उघडी होती, ती त्या मोठ्या आवाजानंतर आलेल्या धक्क्यामुळे सुजली. तो आवाज एखाद्या राक्षसासारखा धडधडत त्याच्या डोक्यावरून गेला आणि नंतर हळूहळू कमी कमी होत शांतता पसरली...’ अशी वर्णने पुस्तकात वाचायला मिळतात. रशिया-अमेरिका-ब्रिटन यांनी पोस्टडॅम येथे घेतलेली परिषद, त्यानंतर जारी केलेला जाहीरनामा, हिरोशिमावर आणि नागासाकीवर बॉम्ब टाकण्याआधी अमेरिकेने केलेली तयारी, बॉम्ब टाकल्यानंतरची अमेरिकेची प्रतिक्रिया, जपानची राजकीय भूमिका या राजकीय घटनांचा तपशील या कादंबरीत सातत्याने येतो. नागासाकीवर बॉम्बहल्ला झाल्यानंतर जपानी नागरिकांची माणुसकी आणि देशप्रेम याचे दर्शन अशा अनेक घटनांमधून घडते. माणसातील क्रौर्य, नरसंहार दाखवणाऱ्या या कादंबरीत दुसऱ्या बाजूला माणसांमधील मानवतावाद सेवाभावी वृत्तीही दिसून येते. दुसऱ्या महायुद्धातील ही घटना या युद्धाला कलाटणी देणारी, युद्धाचं पारडं पूर्णपणे फिरवणारी किंबहुना महायुद्ध समाप्तीकडे नेणारी होती. पण त्याच बरोबर हे कृत्य अतिशय क्रूर आणि नृशंस असे होते. मानवाने विज्ञानाच्या आधारे तयार केलेल्या या संहारक अस्त्राचे दुष्परिणाम किती खोलवर जाऊ शकतात हेच यातून दिसून आले. या भयावह घटनेनंतर जग बदलले आणि त्यानंतर अद्याप अणुबॉम्बचा वापर झालेला नाही. जपान जणू काही राखेतून झेप घेणाऱ्या फिनिक्स पक्ष्याप्रमाणे पुन्हा उभा राहिला. पण हा नरसंहार किती भयावह आणि मानवतेला काळिमा फासणारा होता, हे जाणून घेण्यासाठी ही कादंबरी महत्त्वाचा हा दस्तावेज आहे. –संदीप नलावडे ...Read more

 • Rating StarAnjali Patwardhan

  काही चित्रं पाहिली की मन कळवळून जातं. वेदनेचा गहिवर मन पोखरत जातो. अशीच मानवी इतिहासात चिरंतन राहिलेली वेदना म्हणजे हिरोशिमा आणि नागासाकीवरचा अणुबॉम्ब हल्ला..या हल्ल्याची क्षणचित्रं पाहिली तरी थरकाप उठतो. पण इतिहासातल्या चुका पुन्हा होऊ नयेत म्हणून जन्या वेदनांचं स्मरण होत राहिलं पाहिजे. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने हिरोशिमा आणि नागासाकी या जपानमधील दोन शहरांवर अणुबॉम्ब टाकला, ही जागतिक इतिहासातील सर्वांत भीषण आणि मानवतेला काळिमा फासणारी घटना होती. या दोन शहरांवर बॉम्ब टाकल्यानंतर तिथे मृत्यूचं जे तांडव झालं आणि जखमी लोकांना ज्या वेदनांना तोंड द्यावं लागलं, त्याचं साद्यंत वर्णन करणारी कादंबरी आहे ‘नागासाकी.’ या वर्णनाबरोबरच १६ ते २९ जुलै आणि ५ ऑगस्ट १९४५ ते १० ऑगस्ट १९४५ या दिवसांतील राजकीय घडामोडींचं आणि हिरोशिमा, नागासाकीतील लोकांच्या दैनंदिन जीवनाचं चित्रणही या कादंबरीत केलं आहे. क्रेग कोली यांनी संशोधन करून, खूप संदर्भ अभ्यासून, प्रत्यक्षदर्शींच्या मुलाखती घेऊन ही कादंबरी सिद्ध केली आहे. अनुवाद केला आहे डॉ. जयश्री गोडसे यांनी. अमेरिकेने हिरोशिमावर बॉम्ब टाकला तो दिवस होता, ६ ऑगस्ट १९४५. हा बॉम्ब पडल्यानंतर हिरोशिमात जो हलकल्लोळ माजतो, इथून या कादंबरीतील नाट्याला सुरुवात होते. मृत्यूच्या तांडवाचं, जखमी लोकांचं वर्णन वाचताना अंगावर शहारे येतात. उदा. हिरोशिमामध्ये कामानिमित्त आलेला नागासाकीचा यामागुची बॉम्बहल्ल्यामुळे जखमी होतो. तो नागासाकीला जाण्यासाठी रेल्वेस्टशनवर चाललेला असतो, त्यावेळचं हे वर्णन - ‘नदीत तरंगणाऱ्या प्रेतांवरून रांगतच त्याने नदी ओलांडण्याचा प्रयत्न केला. त्या प्रेतांवरून तो हात आणि गुडघे टेकत पुढे निघाला होता. एक मृतदेह त्याच्या वजनाने बुडाला आणि त्याच्या पाठोपाठ यामागुचीसुद्धा पाण्यात पडला. त्यामुळे त्याची भाजलेली त्वचा ओली होऊन वेदनांचा डोंब उसळला. मग परत कोरड्या जमिनीवर येऊन तो तसाच प्रवाहाच्या वरच्या बाजूने चालत राहिला. मग त्याला पूल सापडला. पूल फक्त एका खांबावर पण शाबूत होता. हळूहळू त्यावरून जाऊन त्याने दुसरा किनारा गाठला. प्रेतांचे ढीग रचण्याचे काम काही माणसे करत होती. त्यांच्यावर पेट्रोल, तेल टाकून ती जाळून टाकण्यात येत होती. त्यामुळे त्या धुळीच्या ढगात या जळणाऱ्या तेलाचा धूरही मिसळत होता.’ हिरोशिमावर बॉम्ब पडतो, तेव्हा नागासाकीतील ज्या व्यक्ती हिरोशिमामध्ये असतात, त्यात नागासाकीमधील ‘मिनयु’ या वर्तमानपत्राचे संपादक ताकेजिरो निशिओका यांचा आणि पत्रकार नाकामुरा यांचा समावेश असतो. नाकामुरा ओकायामाच्या डोमेई वर्तमानपत्राला हिरोशिमावर झालेल्या बॉम्बहल्ल्याच्या संदर्भात छोटा अहवाल पाठवतो आणि हिरोशिमावरील बॉम्बहल्ल्याची घटना निशिओका, नागासाकीचे राज्यपाल वाकामात्सु नागानो यांच्या कानावर घालतात; पण राज्यपाल त्यांच्यावर विश्वास ठेवत नाहीत. एकूणच, हिरोशिमावर बॉम्बहल्ला झाल्यावर अपरिमित भौतिक आणि जीवितहानी होऊनही प्रसारमाध्यमांपर्यंत ती घटना प्रभावीपणे पोहोचली नाही. हिरोशिमावर बॉम्ब टाकण्याआधी आणि नंतरही अमेरिकेने जपानला शरण येण्याचे आवाहन वारंवार केले होते; पण जपानने त्याकडे दुर्लक्ष केले आणि अमेरिकेने नागासाकीवर बॉम्ब टाकला. हिरोशिमापेक्षाही भयंकर हानी या बॉम्बमुळे झाली. असंख्य माणसे मृत्युमुखी पडली. असंख्य जखमी झाली. त्या संदर्भातील वर्णनं वाचताना मनाला खूप यातना होतात. उदा. ‘या स्फोटाच्या केंद्रापासून जवळजवळ एक किलोमीटर परिसर संपूर्णतः उद्ध्वस्त झाला होता. हिरोशिमाला याच अंतरावरच्या काही इमारती पडल्या नव्हत्या. पण येथे भूकंपातही पडू नयेत म्हणून विशिष्ट पद्धतीने बांधलेल्या काँक्रीटच्या इमारतीदेखील भुईसपाट झाल्या. माणसे आणि प्राणी तत्क्षणी मेले. माणसांच्या शरीरातील पाणी त्या उष्णतेच्या लाटेमुळे सुकून गेले. एक मुलगा एका विटांच्या वेअरहाउसच्या सावलीत उभा होता. जवळजवळ एक किलोमीटर अंतरावर त्याने उघड्यावर असलेली आई आणि तिचा मुलगा यांचा अक्षरशः धूर झालेला बघितला.’ अशा प्रकारची वर्णनं या कादंबरीत वारंवार येतात आणि इतका भीषण संहार झालेला असतानाही जपानच्या राज्यकत्र्यांपर्यंत तो पोहोचत नाही आणि जपानच्या राज्यकत्र्यांची ही अनभिज्ञता वाचकाला आश्चर्यचकित करते. रशिया-अमेरिका-ब्रिटन यांनी पोस्टडॅम येथे घेतलेली परिषद, त्यानंतर जारी केलेला जाहीरनामा, जपानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी रशियाला मध्यस्थी करण्याची केलेली विनंती, ती विनंती फेटाळून रशियाने जपानवर केलेला हल्ला, हिरोशिमावर आणि नागासाकीवर बॉम्ब टाकण्याआधी अमेरिकेने केलेली तयारी, बॉम्ब टाकल्यानंतरची अमेरिकेची प्रतिक्रिया, जपानची राजकीय भूमिका या राजकीय घटनांचा तपशील या कादंबरीत साकल्याने आला आहे. नागासाकीवर बॉम्बहल्ला झाल्यानंतर एवढ्या विपरीत परिस्थितीतही डॉक्टर नागाई, परिचारिका सुगाको मुराई, अन्य डॉक्टर्स आणि काही नागरिक जखमींना जमेल तशी मदत करत असतात. या लोकांची माणुसकी आणि जपानमधील लोकांचं देशप्रेम या सकारात्मक बाबींचं दर्शन या कादंबरीतून घडतं. हिरोशिमा आणि नागासाकीवर झालेला बॉम्बहल्ला या ऐतिहासिक घटनेतील वेदनामय नाट्य ‘नागासाकी’ या कादंबरीतून अधोरेखित झालं आहे. एका बाजूला माणसाची क्रूरता, अहंमन्यता, उदासीनता, तर दुसऱ्या बाजूला मानवता, सेवाभाव, परोपकार अशा दोन्ही बाजूंचं दर्शन या कादंबरीतून घडतं. बॉम्बहल्ल्याच्या विनाशकारी परिणामांचं प्राधान्यानं चित्रण करणारी ही कादंबरी वाचलीच पाहिजे. ...Read more

 • Rating Starलोकमत २१.१०.१८

  निरपराध अज्ञातांची संहारकथा - सुप्रसिद्ध दूरचित्रवाणी निर्माता आणि दिग्दर्शक असलेल्या क्रेग कोली यांचे नागासाकी हे पुस्तक म्हणजे जपानच्या नागासाकी या दुसऱ्या महायुद्धकाळात होरपळलेल्या शहराचे वर्णन आहे. लेखकाने याबाबतच संशोधन करून, खूप संदर्भ अभ्यासून प्रत्यक्षदर्शींच्या मुलाखती घेऊन हे पुस्तक साकारले आहे. यात जपानी माणूस त्याचं जाज्वल्य राष्ट्रप्रेम आणि त्याची महत्वाकांक्षा यांचे सुरेख दर्शन घडते. ते घडवताना लेखकाने यातल्या अनेक व्यक्तिरेखा खूप समरसतेने साकारल्या आहेत. त्यांचे स्वभाव-विभाव आणि परस्परसंबंध एखाद्या चित्रकारासारखे चित्रित केले आहेत. त्यातून जपानी माणसांची शिस्त आणि संकटकाळी न डगमगता एकमेकांना मदत करण्याचा स्वभाव यांचे मनोज्ञ दर्शन घडते आणि बुद्धाला मानणाऱ्या या देशाबद्दल वाचकाच्या मनात करुणा जागी होते. ...Read more

Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SWARGACHA SAKSHATKAR
SWARGACHA SAKSHATKAR by TODD BURPO AND LYNN VINCENT Rating Star
DAINIK LOKMAT 21-07-2019

स्वर्गाचं दार ठोठावलेल्या चिमुरड्याचा प्रवास... प्रत्येकाची स्वर्गाची संकल्पना वेगवेगळी आहे. पण ती जिवंतपणे अनुभवण्याची संधी या पुस्तकातून लेखकाने वाचकांना उपलब्ध करून दिलेली आहे. टॉड बर्पो या लेखकाच्या कोल्टन नावाच्या चार वर्षांच्या मुलाची अ‍ॅपेडिकसची शस्त्रक्रिया झाल्यावर त्याला आलेल्या विलक्षण अनुभवांचा संचय ज्यात आपल्या कल्पनेतच सामावलेल्या स्वर्गाची गाठभेट घडवून देणारं हे पुस्तक. त्यात लेखकाने या चिमुरड्याचा मृत्यू जवळ आला असता त्याला अ‍ॅनेस्थेशिया दिल्यावर आलेल्या अनुभवांचं हे सुंदर पुस्तक. वाचता-लिहिता न येणारा हा चार वर्षांचा बालक ज्या पद्धतीने स्वर्गाची वर्णने आणि त्याचे तपशील यांची बायबलशी सांगड घालतो तो प्रकार त्याच्या कुटुंबीयांना विस्मयकारक असाच आहे. ...Read more

MICRO
MICRO by MICHAEL CRICHTON, RICHARD PRESTON Rating Star
DAINIK LOKMAT 21-07-2019

विद्यार्थ्यांची चित्तथरारक कहाणी... आपल्याकडे एखाद्या विशिष्ट वर्गाला गृहीत धरून पुस्तके लिहिण्याचे प्रमाण तसे विरळच आहे. पण इतर देशात अशा प्रकारचे साहित्य विपुल प्रमाणात लिहिले जाते आणि विशेष म्हणजे या लिखाणाला जगभरात प्रसिद्धी मिळते. जास्तीत जास्तभाषांमध्ये या पुस्तकाचे अनुवाद होतात. अशाच प्रकारचे मायक्रो नावाची मायकेल क्रायटन आणि रिचर्ड प्रेस्टन या इंग्रजी लेखकांनी लिहिलेली मायक्रो कादंबरी. त्याचा मराठीत अनुवाद डॉ. प्रमोद जोगळेकर यांनी केला आहे. या कादंबरीचे कथानक हे केम्ब्रिज, मॅसॅच्युसेट्स येथील सात पदवीधारक विद्यार्थ्यांच्या भोवती फिरणारे आहे, या विद्यार्थ्यांना वैज्ञानिक जगातली विलक्षण भरारी पाहायला मिळते. पण त्याचसोबत या मुलांचा साक्षात मृत्यूच्या कक्षेत प्रवेश होताना त्यांच्या हवाईच्या घनदाट अरण्याशी संबंध येतो आणि तिथे त्यांना आक्रमक मानवी हितसंबंधावर मात करून जगण्यासाठी निसर्गाच्याच विघातक शक्तीचा वापर करावा लागतो त्यचे वास्तववादी वित्रण, अंगावर शहारा आणणारी ही कादंबरी. ...Read more