* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: WHETHER JUSTICE
  • Availability : Available
  • Translators : PRIYANKA KULKARNI
  • ISBN : 9788184983425
  • Edition : 1
  • Publishing Year : FEBRUARY 2012
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 120
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
  • Print Books:
THIS BOOK GIVES THE SILENT A VOICE, THE FORGOTTEN A NAME AND THE ABUSED, THE JUSTICE THAT THEY CRAVE. WHITHER JUSTICE IS A DAUNTING AND DISTURBING LOOK AT WOMEN IN INDIAN PRISONS; THESE ARE STORIES OF THEIR BATTLE AGAINST VARIOUS FORCES: THE GOVERNMENT, FAMILY AND POVERTY. NANDINI OZA, COMPLETED HER POST-GRADUATION IN SOCIAL WORK FROM BARODA. SHE WAS PLACED IN CENTRAL JAIL AS A PART OF HER FIELD WORK, AND LATER, AS A FULL-TIME ACTIVIST IN THE NARMADA BACHAO ANDOLAN. SHE WAS IMPRISONED SEVERAL TIMES - EXPERIENCES THAT EXPOSED HER TO THE STORIES OF WOMEN PRISONERS. SHE CURRENTLY WORKS WITH A TRUST.NANDINI OZA, COMPLETED HER POST-GRADUATION IN SOCIAL WORK FROM BARODA. SHE WAS PLACED IN CENTRAL JAIL AS A PART OF HER FIELD WORK, AND LATER, AS A FULL-TIME ACTIVIST IN THE NARMADA BACHAO ANDOLAN. SHE WAS IMPRISONED SEVERAL TIMES - EXPERIENCES THAT EXPOSED HER TO THE STORIES OF WOMEN PRISONERS. SHE CURRENTLY WORKS WITH A TRUST.
अनेक शतके परीघाबाहेर राहिल्यानंतर आज भारतीय स्त्रियांनी सार्वजनिक क्षेत्रात आघाडीवर स्थान मिळवलं आहे. स्वतंत्र अन् निर्भय झाल्यामुळे आज स्त्रिया दररोज नवनवीन अडथळे ओलांडताहेत, अधिकाधिक सबल बनताहेत. ह्या पुस्तकात अशा स्त्रिया नाहीत. हे पुस्तक मूक स्त्रियांचे बोल मांडते, विस्मृतीत गेलेल्यांच्या नावांना उजाळा देते आणि शोषित स्त्रिया ज्यासाठी झुरतात तो न्याय त्यांना देते. ‘व्हिदर जस्टिस’ हा भारतातील तुरूंगातील स्त्रियांवर टाकलेला एक भयभीत आणि अस्वस्थ दृष्टिक्षेप आहे. ह्यात हकीकती आहेत त्यांनी दिलेल्या विवीध कढ्यांच्या - सरकारविरुद्ध, कुटुंबियांविरुद्ध, गरीबीविरुद्ध. समाज स्वत:च खलप्रवृत्तींना जन्मास घालतो. अन् त्यांना विनाविलंब सजाही देतो. ह्या बिनचेह-याच्या, बिनआवाजाच्या आणि विस्मृतीत गेलेल्या स्त्रिया अशा समाजात राहून लढा देत राहतात. चूरचूर झालेली स्वप्ने आणि तरीही मागे रेंगाळणा-या आशा यांच्या हकीकती येथे कथारूपात मांडलेल्या आहेत. ही मांडणी झाली आहे एका अशा व्यक्तीच्या दृष्टिकोनातून जी प्रत्यक्ष त्यांच्यासोबत राहिलेली आहे. लेखकाने त्यांची हताशा आणि सामथ्र्य यांचे हुबेहूब वर्णन केलेलं आहे. नंदिनी ओजा यांनी बरोड्यातून समाजकार्यात पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं आहे. त्यावेळी कार्यक्षेत्रात काम करण्याच्या अनुभवाचा एक भाग म्हणून त्या मध्यवर्ती कारागृहात राहिल्या होत्या आणि नंतर ‘नर्मदा बचाव आंदोलना’ची पूर्ण वेळ कार्यकर्ती म्हणून कैक वेळा तुरूंगवास भोगावा लागला. ह्या दोन अनुभवांदरम्यान कैदी स्त्रियांच्या हकीकती त्यांना भिडल्या. सध्या त्या एका न्यासासमवेत काम करतात.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #NANDINI OZA #PRIYANKA KULKARNII #MYNAMEISSALMA #WHITHERJUSTICE #व्हिदरजस्टिस
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKPRABHA 01-05-2015

    स्त्री-पुरुष समानता, स्त्री सक्षमीकरण, स्त्रीवाद अशा अनेक मुद्यांवरून महिलांबाबत चर्चासत्र, मतमतांतरे हे सुरुच असतं स्त्रीवादी साहित्यही मराठीमध्ये मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. त्यातली सक्षम, स्वावलंबी, सुशिक्षित स्त्रिया या पुस्तकात नाहीत. खरंतर बऱ्ाच गोष्टी सकारात्मकदृष्ट्या बदलल्यामुळे अनेक क्षेत्रांत स्त्रिया आघाडीवर आहेत. पण अशा निर्भय स्त्रियांची कहाणी इतर काही पुस्तकांमधून वाचायला मिळाली असेल, पण `व्हिदर जस्टीस` हे पुस्तक स्त्रियांचं वेगळं रूप समोर आणते. भारतातील तुरुंगातील स्त्रियांवर टाकलेला एक भयभीत आणि अस्वस्थ दृष्टिक्षेप या पुस्तकातून समोर येतो. लढा हा स्त्रिच्या आयुष्याचा अविभाज्य भाग, मग तो कुटुंबाविरुध्दचा असो, गरिबीविरुद्धचा, सरकारविरुद्धचा किंवा समाजातल्या घटनांविरुद्धचा. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर दिलेल्या लढ्यांमधून नेहमीच काही मिळतं असं नाही, पण लढणं त्यांच्यासाठी महत्वाचं असतं. अशाच काही लढ्यांची कथा या पुस्तकात मांडली आहे. त्यांनी पाहिलेली स्वप्नं पूर्ण झाली नसली तरी आशेवर रेंगाळणाऱ्या त्यांच्या या कथा मांडलेल्या आहेत. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
श्री. दिपक भगवंत पांडे... पुणे

` *दुर्दम्य` : अजब ऑफिसरची गजब गोष्ट* जी. बी. देशमुख लिखित `दुर्दम्य` हे पुस्तक शासकीय सेवेत असलेल्या एका अत्यंत वेगळ्या आणि प्रभावी व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देते. लेखकाने रेखाटलेली ही व्यक्तिरेखा जितकी रुक्ष, कडक शिस्तीची आणि विक्षिप् वाटते, तितकीच ती आतून त्याच्यात असलेल्या प्रामाणिकपणाची साक्ष देते. एका तत्त्वनिष्ठ आयुष्याचा हा जीवनपट आदर्शवत वाटणारा आहे. भ्रष्टाचार आणि तडजोडीच्या राजकारणापासून स्वतःला `दोन हात दूर` ठेवणारी त्या अधिकाऱ्याची वृत्ती आजच्या सामाजिक परिस्थितीत अत्यंत बोधक ठरेल. स्वतःच्या प्रामाणिकतेच्या मूल्यांशी कधीही तडजोड न करणारी ही व्यक्तिरेखा नक्कीच प्रदीर्घ काळ स्मरणात राहण्याजोगी आहे. पुस्तकातील `दोन रूपये चाळीस पैसे`, `दूध का दूध, पानी का पानी`, `मजेदार प्रायश्चित्त` हे लेख पुस्तकातील व्यक्तिरेखेकडून धडा घेण्यासारखे आहे. `एकटा जीव` हे प्रकरण मनाला चटका देऊन जाते. जी. बी. देशमुख यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील सहकारी एकनाथन या व्यक्तिमत्त्वाशी संबंधित २५ वर्षांच्या कालावधीतील आलेल्या अनुभवांचे चपखल निरीक्षण करून ते पुस्तकात आरेखित केले आहे. लेखकाच्या निरीक्षणशक्तीला सलाम ! त्यांची लेखनशैली अतिशय प्रवाही, संयत आणि मार्मिक आहे. त्यांनी त्या व्यक्तिमत्त्वाच्या स्वभावातील हा `विक्षिप्तपणा` किंवा रुक्षपणा दाखवताना, त्यामागील त्यांची नैतिकता आणि बाणेदारपणा अतिशय बारकाव्यांसह रेखाटला आहे. प्रत्येक प्रकरणाखालील सारांश (CONCLUDING PARAGRAPH) खूपच उत्कृष्ट ! कोणत्याही अनावश्यक भावनिकतेचा पसारा न मांडता, थेट आणि वास्तववादी शैलीत केलेले हे व्यक्तिचित्रण पुस्तकाची रंगत कमालीची वाढवते. जी. बी. देशमुख यांना पुढील लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा ! ...Read more

THE CASE OF THE HOWLING DOG
THE CASE OF THE HOWLING DOG by ERLE STANLEY GARDNER Rating Star
प्रमोद कडवे

हे पुस्तक खूपच चांगले आहे.वाचत असताना आपले देहभान विसरून जाते.