BETTY MAHMOODY

About Author

Birth Date : 09/06/1945


BETTY MAHMOODY IS AN AMERICAN AUTHOR AND PUBLIC SPEAKER BEST KNOWN FOR HER BOOK, NOT WITHOUT MY DAUGHTER, WHICH WAS SUBSEQUENTLY MADE INTO A FILM OF THE SAME NAME.

नॉट विदाऊट माय डॉटर ही बेस्टसेलर ठरलेली आणि पुलित्झर पुरस्कारासाठी नामांकन झालेली कादंबरी लिहिणारी बेट्टी महमूदी ही एक अमेरिकन लेखिका आहे. त्यांच्या या कादंबरीवर त्याच नावाने चित्रपटही प्रदर्शित झाला आहे. वन वल्र्ड : फॉर चिल्ड्रन या संस्थेच्या त्या अध्यक्षा आणि सहसंस्थापिका आहेत. विविध संस्कृतींमधील परस्पर सामंजस्य वाढविण्यास ही संस्था मदत करते. आंतरसांस्कृतिक विवाहांतून जन्माला आलेल्या मुलांमध्ये सुरक्षिततेची भावना आणि निर्भयता वाढविण्यासही ही संस्था मदत करते. इराणमधून पतीच्या कचाट्यातून आपल्या मुलीसह स्वत:ची सुटका करून घेऊन बेट्टी महमूदी अमेरिकेत परत आल्या. या जिवावर बेतलेल्या संकटातून सुटून आल्यावर त्यांच्या असे लक्षात आले की, अशा संकटांना तोंड देणाऱ्या त्या एकट्या नाहीत. मग ज्या पतींनी आपल्या पत्नीला मुलांपासून बळजबरीने दूर केले आहे, अशा स्त्रियांच्या अनुभवांचे संकलन करून त्यांनी फॉर द लव्ह ऑफ अ चाइल्ड हे पुस्तक लिहिले. १९९० साली ऑकलंड विद्यापीठातर्फे आउटस्टँडिंग वुमन ऑफ द इयर हा किताब देऊन त्यांना गौरविण्यात आले. तसेच जर्मनीकडून मोस्ट करेजियस वुमन ऑफ द इयर हा किताब मिळाला.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
NOT WITHOUT MY DAUGHTER Rating Star
Add To Cart INR 360
TBC Classic Book

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
अनिल सहजे, नाशिक.

`कुलामामाच्या देशात’ हे पुस्तक म्हणजे जंगलातील अनुभवकथांचा एक विलक्षण रम्य प्रवास आहे. रवींद्र वानखडे यांच्या वनाधिकारी म्हणूनच्या प्रत्यक्ष अनुभवातून या कथा जन्माला येतात. प्रत्यक्षात घडलेल्या या कथा इतक्या रंगतदार आहेत की त्या काल्पनिक वाटाव्यात, अी त्यांची गंमत आहे. वानखडे यांच्या अनुभवांमधील कथाबीज अचूकपणे हेरून जी. बी. देशमुख यांनी त्यांना आपल्या रसाळ आणि खुमासदार शैलीत शब्दरूप दिले आहे. देशमुखांची शैली इतकी प्रवाही आणि ओघवती आहे की वाचक कथांमध्ये अक्षरशः गुंगून जातो. एकदा पुस्तक हातात घेतल्यानंतर ते पूर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेवावेसे वाटत नाही. वन हे सामान्य माणसासाठी तसे अपरिचितच क्षेत्र. जंगलातील जीवन, तेथील नियम-कायदे आणि जंगली श्वापदांचे विश्व याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. वानखडे-देशमुख द्वयी केवळ या अनोख्या जगाची ओळख करून देत नाहीत, तर त्याविषयी वाचकाच्या मनात विलक्षण कुतूहलही निर्माण करतात. ‘खुश रहेना मेरे यार’ आणि ‘महाकाय आकांत’ या दोन क्रमशः कथा तर विशेषतः चटका लावून जातात. त्या केवळ थरारक आणि अविश्वसनीय वाटाव्या अशा अनुभवांनी भारलेल्या नाहीत, तर जंगली श्वापदांची एक हळवी, माणुसकीच्या जवळ जाणारी बाजूही त्या प्रभावीपणे उलगडून दाखवतात. जी. बी. देशमुखांची खुमासदार, मिश्कील आणि रसाळ लेखनशैली वाचकाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत गुंतवून ठेवते. रवींद्र वानखडे यांच्या प्रत्यक्ष अनुभवांची सत्यता आणि देशमुखांच्या कथनकौशल्याचा सुंदर मिलाफ ‘कुलामामाच्या देशात’ घडवतो. हे पुस्तक केवळ जंगलातील अनुभवकथांचे संकलन राहत नाही, ते वाचकाला जंगलाच्या एका अनोख्या, रोमांचक आणि हळुवार विश्वाची सफर घडवते आणि नकळत सांगून जाते, ‘वनस्य कथा रम्यः!’ ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
ॲड. प्रशांत यावले, अमरावती

आज "दुर्दम्य" वाचुन पुर्ण झाले. मराठी साहित्याचा एक अप्रतिम अविष्कार. एक व्यक्तीचित्रण पण अत्यंत प्रभावी लेखन. एकाच व्यक्तीचे वेगवेगळे गुण वेगवेगळ्या कलात्मक वर्णनाने ईतक्या समर्थपणे मांडण्याचे कौशल्यपूर्ण लिखाण. शेवटच्या प्रकरणाने ईतक्या कठोर व्यक्तमत्वा बदल देखील भावना चाळवल्या. त्या व्यक्तीचे खरे नाव माहीती असुन देखील पुस्तक वाचुन संपवल्यावर ते आठवतच नव्हते ईतका प्रभाव "एकनाथन"चा राहीला. खुप सुंदर. ...Read more