* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SEX WORKER
  • Availability : Available
  • Translators : SUPRIYA VAKIL
  • ISBN : 9788177668414
  • Edition : 3
  • Publishing Year : JUNE 2007
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 140
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
WHY THE PATH OF LIFE IS SO ZIGZAGGED AND THORNY FOR SOMEONE BORN AS A WOMAN? THIS IS A TRUE AUTOBIOGRAPHY WHICH GIVES US THE EXPERIENCE OF `TRUTH IS STRANGER THAN FICTION`. THIS AUTOBIOGRAPHY IS UNIQUE AS IT IS NOT WRITTEN BY ANYONE WHO IS FAMOUS OR WHO IS SOMEBODY SOMEWHERE. IT IS THE STORY OF A COMMON WOMAN, BORN IN A NORMAL FAMILY. BUT HER LIFE AFTER THE DEATH OF HER HUSBAND BECAME HELL FOR HER. SHE HAD TO FACE MANY DREADFUL FACTS. SHE HAD TO KEEP HER HOUSE RUNNING AND HAD TO STRUGGLE FOR THE SURVIVAL OF HER CHILDREN. SHE HAD TO ACCEPT PROSTITUTION TO EARN ENOUGH MONEY TO KEEP HER AND HER CHILDREN`S LIVING GOING. SHE HAD TO ACCEPT THE LIFE-STYLE BEYOND THE MORAL NORMS, VIRTUES, AND CULTURE. NO WONDER, HER WORDS, WHICH ARE FULL OF TRUTH; LEAVE US SPELLBOUND.
स्त्री म्हणून जन्माला आल्यानंतर एखादीच्या आयुष्याची वाट इतकी वळणावळणाची आणि काटेरी का असावी? समाजाच्या रूढ, नैतिक चौकटीबाहेरचं जीवन स्वीकारावं लागलेल्या, देहविक्रय व्यवसायात येऊन जीवनाशी विलक्षण संघर्ष करत, करकरीत वास्तवाशी थेट नजर भिडवून वाटचाल करणा-या स्त्रीच्या प्रांजळ लेखणीतून उतरलेली ही आत्मकथा `ट्रूथ इज स्ट्रेंजर दॅन फिक्शन’चा अनुभव देते. अत्यंत वैचित्र्यपूर्ण घटना-प्रसंग कथन करत, समाजाच्या बेगडी नैतिकतेवर सहज शब्दांत पण भेदक प्रहार करत वाचकाच्या मनाचा ठाव घेते.

No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #SEXWORKER #SEXWORKER #सेक्सवर्कर #BIOGRAPHY #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SUPRIYAVAKIL #सुप्रियावकील #NALINIJAMEELA #नलिनीजमिला"
Customer Reviews
  • Rating StarNilesh Sathe

    सेक्स वर्कर हे नलिनी जमिला यांच आत्मकथन. एका वहित त्यांनी त्यांच नाव, जन्म, आणि वय लिहलं होतं हे लिहताना त्यांच वय होतं एकोणपन्नास. त्यानंतर एका गिर्हाईकानं ते वाचलं आणि त्यामुळं ते गिर्हाईक गमावलं. कारण त्यांनी त्या गिर्हाईकाला त्यांच वय सांगिलं होतं बेचाळीस. वाचून अंगावर काटा आला की नाही ? आहे की नाही हादरवून टाकनारी कहानी? नलिनी ही पाहिला नवरा कैंसरच्या आजाराने गेल्यावर आपल्या झालेल्या मुलीला जगवन्यासाठी सेक्स वर्कर म्हणून काम करू लागली. ही मुलगी तिच्या वडिलांच्या आइकडेच म्हणजे आज्जीकडेच राहत असते. एकटयाने आयुष्य कसं काडायचं म्हणून दुसरं लग्न करते. दुसऱ्या नवर्याकडून हिला एक मुलगी होते पन नवरा बायकोचं नात जास्त काळ टिकत नाही. म्हणून तिसरं लग्न करते तिसऱ्या नवर्याने मात्र नलिनाला जास्त काळ आधार दिला. तिसऱ्या नवर्याचं नाव ही स्वता बदलून त्याला जमीला म्हणत असते आणि स्वताच्या नावापुढे लावतही असते. शेवटी हेही नातं जास्त काळ टिकत नाही. तिला स्वताला वाटतं ही आपली मुलगी आता वयात आली आहे आणि आपल्या नवर्याच्या मनात भलतं सलतं आलं तर.? तसही ही त्याची मुलगी नव्हे. म्हणून तिच्या मुलीला घेवून निघुन जाते. पुढे तिच्या मुलीला शिक्षण देण्याची धडपड अडचणी येतात मुलीला आपल्याच वाटयाला आलेलं दुःख येवू नये म्हणून बऱ्याच संघर्ष्याला सामोरं जाते ही नलिनी. बऱ्याचदा नलिनीला फक्त मशिदित आसरा मिळाला आहे. तिथ मिळणाऱ्या भिक्षेवर ती जीवंत राहीली आहे. तरीही देवावर भाष्य करताना ती म्हणते देव नाही असं म्हंटल तर दैवी कोप होईल असं तिला वाटायचं. पन देव आहे असं खात्रिशिर सांगण्यासारखा एकही अनुभव तिच्याजवळ नाही. तरीसूद्धा देव अस्तित्वात नाही म्हणताला तिला कसलिच भीति वाटत नाही. तीन डिसेंबर हा दिवस सेक्स वर्कर्स डे म्हणून साजरा केला त्यावेळी नलिनी ह्या कोलकात्याला गेल्या होत्या त्यावेळी त्यांनी सेक्स वर्कर्सबद्दल मत मांडल त्या म्हणाल्या देहविक्रेत्या इतर महिलांपेक्षा वेगळ्या असतात. यांना स्वयंपाक करुण नवर्याची वाट पहायची नसते. आपल्या मुलांना कसं वाढवायचं याची परवानगी नवर्याकडून घ्यावी लागत नाही. असं अजुन बरच काही पुस्तकात सांगितलंय ते तुम्ही वाचाच. वर मी सेक्स वर्कर हाच शब्द वापरला आहे वैशा असा उल्लेख केला नाही त्याचं कारण वैशा हा संस्कृत शब्द आहे याचा अर्थ कुकर्मास प्रवृत्त करणारी बाई असा होतो. हा शब्द वाईट अर्थाने घेतला जात असल्याने यांना सेक्स वर्कर हा नवा शब्द घ्यावा लागलाय. जर पुस्तकात इतक्या व्यवस्थित पद्धतीने या शब्दाचा अर्थ सांगितलाय तर आपन तो शब्द वापरणं मूर्खपनाचं ठरेल नाही का.? असो. तुम्ही हे पुस्तक नक्की वाचा, यावर बोला, चर्चा करा अफाट पुस्तक आहे हे. हे पुस्तक वाचून गलबलुन येतं. मला हे पुस्तक वाचून वर्ष झालं पन पुस्तक वाचून मनात तयार झालेला कोलाहाल कधीतरी बाहेर काढावाचं लागतो. म्हणून हा लेखन प्रपंच. शेवटी या पुस्तकातलं मला फार पटलेलं एक वाक्य सांगतो आणि थांबतो. "समाजापासुन दूर पळालेली मानसंच फक्त शरीर सुखासाठी येतात" निलेश ...Read more

  • Rating Starडॉ.कृष्णा सुभाष सपाटे

    मानवी शरीराला जडलेल्या वासनेचे फुत्कार कोणाला क्षणिक सुख देऊन जातात तर कोणाचं आयुष्य गिळंकृत करून जातात त्याचीच ही कहाणी.गरिबीचा आगडोंब, पैशांची विवंचना आणि नात्याचं दुरावलेपण माणसाला कोणत्या खाईत घेऊन जाईल हे सांगता येत नाही. देह विक्रीच्या व्यवसाया कोणी स्वतःहून येत नाही तर त्याला परिस्थिती तस करायला भाग पाडते. ज्यावेळी सगळी शस्त्र आपल्या हातात नसतात त्यावेळी पोटापाण्यासाठी व भिकेला लागण्याआधी जो मार्ग समोर दिसत असतो तो म्हणजे वैश्याव्यवसाय. जगण्याची गरज माणसाला काहीही करायला भाग पाडते, जगभर कोणी कितीही वाईट कृत्ये केलेली असली तरी समाज नावाच्या नैतिकता निर्माण करणाऱ्या घटकाने या व्यवसायाला मात्र नेहमीच खालच्या थरात जागा दिली आहे. गरज म्हणून व्यवसायात शिरलेल्या नलिनीला कुटुंबापासून तुटलेपण भोगाव लागत, आईपण हिरावून घेतलं जातं. व्यवसायाबरोबर लागत गेलेली व्यसनांची गोडी त्याच जोडीला माणुसरूपी जनावरांच होणार दर्शन पुस्तकाच्या पानांपानात दिसत. मनात एखादया तप्त लाव्हाप्रमाणे उसळणारी खदखद कोणताच सहानुभूतीचा समुद्र शांत करू शकत नाही कारण आपलं माणूसपणच जिथं नाकारलं जात, तिथं अन्यायासाठी न्याय मागणं देखील अवघड असत. एकदा परतीचे दोर कापले की मागे फिरायचं नसत, जे वाट्याला येईल ते घोटत पुढे चालावं लागत. कधी तरी मनाला शांत करणारा छोटासा शिडकावा मिळतो तर इतरवेळी होरपळून काढणारी आग. नलिनीचा बंडखोर स्वभाव लहानपणापासून ते आजतागायत तिच्या आयुष्यात वेगवेगळी वळण आणतो. काही वेळा हतबल झाल्यामुळे जुळत घेणं तिला भाग पडलं. ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 10-07-2007

    केरळमधील वेश्येचे आत्मचरित्र मराठीत... स्वत: जगण्यासाठी आणि पोटच्या गोळ्यांना जगविण्यासाठी रूढता, नैतिकता ठोकरत वेश्याव्यवसायाच्या दाहकतेत उडी घेऊन तितक्याच बेधडकपणे आपली करुण कहाणी शब्दबद्ध करणाऱ्या मल्याळी नलिनीची आत्मकथा आता मराठीत उपलब्ध झाली आह. ‘सेक्स वर्कर’ नावाने सुप्रिया वकील यांनी अनुवादित केलेले हे पुस्तक मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केले आहे. ‘ओरू लैंगिक कोझिलालियुते आत्मकथा’ (एका देहविक्रेतीची आत्मकथा) हे नलिनी जमीला यांचे आत्मचरित्र. या मल्याळी भाषेतील पुस्तकाच्या १० आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या. त्यांच्या २१ हजार प्रती विकल्या गेल्या. डी.सी. बुक्स या केरळमधील प्रकाशन संस्थेने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. तमीळ, कानडी, बंगाली, इंग्रजी, फ्रेंच, मराठीसह सहा भाषांत हे पुस्तक अनुवादित झाले आहे. तिसरीपर्यंत शिकलेल्या नलिनी जमीला हिने तिच्या जीवनाविषयी लिहावे, असा आग्रह अनेकांनी केला. अखेर मुक्त पत्रकार आय. गोपीनाथ यांनी तिचे आत्मकथन शब्दबद्ध केले. कोणतीही ओळख न लपविता लिहिलेले हे पुस्तक आहे. देहविक्री करणाऱ्या महिलेने लिहिलेले हे पहिले पुस्तक असल्याचा दावा सुप्रिया वकील यांनी पत्रकार परिषदेत केला. मेहता पब्लिशिंग हाऊसचे सुनील मेहता याप्रसंगी उपस्थित होते. घरातील दारिद्र्यामुळे नलिनीला या व्यवसायात येणे भाग पडलं. उपेक्षित बालपण गेलेल्या नलिनीचा एका दादाशी विवाह झाला. तीन वर्षांतच त्याने आजारपणाला कंटाळून आत्महत्या केली. त्यानंतर दोन मुलांचे पालनपोषण करण्याची जबाबदारी तिच्यावर पडली. त्यात खाष्ट सासू, त्यामुळे नाइलाजास्तव ती या व्यवसायात आली. तिचं पहिलं गिऱ्हाईक होतं एक वरिष्ठ पोलीस अधिकारी! त्यानंतर तिने मेंगलोरच्या एकाशी लग्न केले. एक मुलगी झाल्यानंतर त्याने तिला सोडले. मग तामिळनाडूमधील एकाशी तिने विवाह केला. त्याच्याबरोबर तिने १२ वर्षे संसार केला. ती आजारी पडली. त्यानंतर तिसरा नवराही तिला सोडून गेला. माहेरचा आधार नाही. तारुण्यात पदार्पण केलेल्या मुलीसह नलिनी पुन्हा रस्त्यावर आली. स्वत:च्या मुलीला मात्र तिने यापासून दूर ठेवले. रोजच्या जगण्याशी दोन हात करत असतानाच मुलीच्या संरक्षणाचेही आव्हान तिने पेलले. टूथ इन स्ट्रेजर द फिक्शनची प्रचिती देणारी ही आत्मकथा वाचताच वाचक सुन्न होतात, असे वकील यांनी सांगितले. ‘ज्वालामुखी’ या स्वयंसेवी संस्थेत नलिनी सहभागी झाली. देहविक्री करणाऱ्या महिला नुसत्या प्रश्नावर चर्चा करतात; पण त्यावर उत्तर शोधत नाहीत. त्यामुळे त्यांच्या प्रश्नासंदर्भात सक्रिय होऊन तिने माहितीपट बनविला. देहविक्री करणाऱ्या महिलांचे प्रश्न ती सोडवित आहे. या पुस्तकातून समाजाच्या बेगडी नैतिकतेवर प्रहार करताना सुन्न करणारे प्रश्न विचारते. सध्या नलिनी तिची मुलगी आणि रिक्षावाला जावई यांच्यासमवेत राहते. तिचा जावई व विहिण यांना तिच्या पूर्वआयुष्याबद्दल कल्पना आहे, असे वकील यांनी सांगितले. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 07-09-2007

    देहाची परवड, मनाची तडफड… नलिनी जमीला यांचे जगणे आपल्या सरळमार्गी आयुष्याला ठेच पोचविणारे आहे. केवळ स्त्रीत्वाचा बाजार मांडून नव्हे, तर माणूस म्हणून जगायचे असे तिचे जाणीवपूर्वक प्रयत्न दिसतात. ‘सेक्स वर्कर’ हे नलिनी जमीला यांचे आत्मचरित्र एखाद्या ादंबरीसारखे आहे. व्यापक जीवनपट, अद्भुतता, घटनावैचित्र्य या दृष्टीने मी या पुस्तकाला कादंबरीसारखे ठरवत नाही, तर कादंबरीत ज्याप्रमाणे परिस्थिती व नायक-नायिका यांचा संघर्ष, काळ्या-पांढऱ्या रंगातील प्रवृत्ती रेखाटलेल्या असतात, त्याप्रमाणेच त्या नलिनी जमीला यांच्या जीवनपटात प्रत्यक्ष घडतात. आपल्या सरळमार्गी आयुष्याला ठेच पोचविणारे हे जगणे आहे. काही वर्षांपूर्वी मी स्वत:ही अशा एका विलक्षण बाईला भेटलो आहे. चांगल्या घरातील मुलगी नवस म्हणून देवीला सोडली गेली होती. तिथूनच तिच्या आयुष्याची परवड सुरू झाली. मुलगा झाल्यावर त्याला शिकवून मोठा करण्यासाठी तिची धडपड सुरू झाली. ती वेश्या व्यवसायातून बाहेर पडली व आज चांगले जीवन जगते आहे. या बाईशी आणि या व्यवसायातील तिच्या काही परिचित महिलांशी बोलताना त्यांच्या देहाची परवड व प्रत्येक क्षणी होणारी मनाची तडफड दिसत होती. त्या पार्श्वभूमीवर नलिनी जमीला यांचे आत्मचरित्र मी तोलत होतो. ते आहे तरी कसे? नलिनी ही एका चांगल्या घरातील मुलगी. पण वडिलांचे विचित्र वागणे आणि आईची हतबलता यामुळे या मुलीला खाणकामगार व्हावे लागले. धुणी-भांडीवाली म्हणून काम करावे लागले. एका घरी ती मुले सांभाळायला लागली. तिने लग्न केले आणि तिच्या आजपर्यंतच्या आयुष्याच्या वळणावळणाच्या वाटेवर काटेही पसरले गेले. नवरा मेल्यानंतर मुलांना वाढविण्यासाठी नाइलाजाने ती देहविक्रय करू लागली आणि मुलांनाच गमावून बसली. नंतर पुन्हा एका वळणावर धर्मांतर व दुसरा विवाह. पण परवड संपली नाही. दुसऱ्या विवाहानंतर झालेल्या मुलीला गमवावे लागू नये आणि तिच्यावर आपल्या अभद्र व्यावसायिक जीवनाची सावली पडू नये यासाठी धडपडणारी आई इथे दिसते. समाजाने आखलेल्या नैतिक चौकटीबाहेरचे जीवन तिला जगावे लागत आहे; पण त्यातही ती एक चौकट स्वत:ला घालून घेताना दिसते. त्यातूनच एक विलक्षण संघर्षमय आयुष्य तिच्या वाट्याला येते. केवळ परिस्थिती म्हणून ते आयुष्य ती निमूटपणे स्वीकारीत नाही, तर त्याला ती खंबीरपणे सामोरी जाते, हे या ‘नायिके’चे वैशिष्ट्य आहे. केवळ स्त्रीत्वाचा बाजार मांडून नव्हे, तर माणूस म्हणून जगायचे असे तिचे जाणीवपूर्वक प्रयत्न दिसतात. या पुस्तकाचे महत्त्व यातच आहे. नलिनीच्या वाट्याला आलेले आयुष्य मात्र खूपच दु:खाचे आहे. पुरुषी वृत्तीची कितीएक रूपे येथे दिसतात. देहविक्रय व्यवसायाच्या तNहा, तेथील व्यवहार उलगडतो. वेगळे जग समोर येते. पण येथे हे पुस्तक कमी पडते. या सगळ्या निवेदनातून देहविक्रय करणाऱ्या स्त्रीच्या देहाची परवड दिसते. त्या प्रत्येक क्षणी तिच्या मनाची जी तडफड झालेली असेल ती ओझरती जाणवते. कित्येकदा तर स्त्रीला केवळ देह असतो; मन नसतेच असे वाटावे इतके सपक निवेदन येते. नलिनी स्वत: अल्पशिक्षित आहे; पण तिला लेखनास साह्य करणाऱ्या व्यक्तींनी ही त्रुटी तिच्याकडून दूर करून घ्यायला हवी होती. नलिनी एका कम्युनिस्ट कार्यकर्त्याची मुलगी आहे. खाणीत काम करतानाही एकदा तिच्या नकळत तिने एका संपाचे नेतृत्व केले होते. हे कार्यकर्तेपण तिच्यामध्ये नैसर्गिक आहे. ती आपल्या आयुष्याच्या करकरीत वास्तवाला थेट नजर भिडवूनच जगते. त्यामुळेच देहविक्रय करणाऱ्यांच्या संघटनेशी तिचा परिचय झाल्यावर तिचे हे कार्यकर्तेपण सहज फुलते. तिच्याकडे काही प्रमाणात नेतृत्व येते. त्या वेळी ती समाजाच्या नैतिकतेतील बेगडीपणा फाडून दाखवते. आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून घेण्याची संधी मिळताच आपल्या भावना माहितीपटातून व्यक्त करते. संघटनेसाठी लढते, ‘इव्हेंट’ आयोजित करते, चर्चासत्रे गाजवते. हा सगळा भाग आणखी विस्ताराने, तपशिलात नोंदवायला हवा होता. कित्येक ठिकाणी परिच्छेदाचे पहिले वाक्य व शेवटचे वक्य आशयदृष्ट्या एकच आहे. परत-परत तेच वाचणे थोडे कंटाळवाणे होते. अनुवाद करताना हे टाळता आले असते. बाकी अनुवादही खूपच प्रवाही व प्रभावी झाला आहे. -संतोष शेणई ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more