* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: LEADING LADIES
  • Availability : Available
  • Translators : SUMITA BORSE
  • ISBN : 9788184985382
  • Edition : 2
  • Publishing Year : FEBRUARY 2014
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 276
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
LEADING LADIES IS AN INSPIRATIONAL BOOK THAT FOLLOWS THE JOURNEYS OF SOME OF INDIA’S MOST-ADMIRED WOMEN ACHIEVERS WHO HAVE MADE A DIFFERENCE TO SOCIETY WITH THEIR STELLAR WORK AND OTHER PURSUITS THAT TOUCH OUR LIVES, IN MORE WAYS THAN ONE. THIS VOLUME BRINGS ALIVE THEIR UNIQUE STORIES WITH PERSONAL ANECDOTES THAT WILL SERVE AS A BEACON FOR MANY OF US. WHILE A LOT HAS BEEN WRITTEN ABOUT HOW THESE WOMEN HAVE ACHIEVED SUCCESS, THE BOOK AIMS TO HIGHLIGHT THE GUIDING PRINCIPLES OF THEIR LIVES, THE PERSONAL AND PROFESSIONAL BELIEFS THAT DRIVE THEM, THE LIFE AND MANAGEMENT PRACTICES THAT HAVE ALWAYS STOOD THEM IN GOOD STEAD, AND THE NONNEGOTIAB1ES THAT HAVE GUIDED THEM ON THEIR PATH TO SUCCESS. WHAT MAKES THE WOMAN PROFESSIONAL/ ENTREPRENEUR/ACHIEVER/LEADER TICK? WHAT IS IT THAT DRIVES THEM? WHAT ARE THE RULES BY WHICH THEY PLAY THE GAME? IS THERE A LEVEL PLAYING FIELD FOR WOMEN? DO WOMEN NEED A LEVEL PLAYING FIELD? IS THERE SOMETHING MALES CAN LEARN FROM THEIR FEMALE COLLEAGUES? ARE WOMEN LEADERS ALSO FROM VENUS ALONG WITH THE REST OF THEIR CLAN OR DO THEY BELONG TO MARS TOO? THESE INFLUENCERS ARE WELL-EQUIPPED TO PROVIDE THE RIGHT INSIGHTS. THE AUTHOR BORROWS FROM HER JOURNALISTIC EXPERIENCE TO ELICIT A FRESH VIEW FROM SOME OF INDIA`S BRIGHTEST MINDS; TRENDSETTERS WHO HAVE NOT JUST CARVED A NAME FOR THEMSELVES IN THEIR CHOSEN PATH, BUT HAVE BECOME THE TORCH BEARERS FOR COUNTLESS OTHERS IN URBAN AND RURAL INDIA WHO WANT TO FOLLOW THEIR DREAMS, REACH THEIR GOALS, AND GIVE BACK TO SOCIETY. THE LIST OF WOMEN INCLUDED ARE AMRITA PATEL, ANU AGA, KALPANA MORPARIA, KIRAN MAZUMDAR-SHAW, LILA POONAWALLA, MALLIKA SARABHAI, MALLIKA SRINIVASAN, MEHER PUDUMJEE, NAINA LAL KIDWAI, PRIYA PAUL, PT USHA, SHAHEEN MISTRI, SHIKHA SHARMA, SHUBHA MUDGAL, VINITA BALI
आता ती केवळ... राबणारी बिनचेह-याची बाई राहिलेली नाहीतर ती स्वत:चे हक्क असलेली स्वतंत्र नागरिक आहे. केवळ घरकाम, मोलमजुरीच नव्हेतर उद्योगसमूहाची अध्यक्षा... बँकेची व्यवस्थापिका... प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ती... ते उत्कृष्ट कलाकार अशा विविध कार्यक्षेत्रांत तिने आपल्या कर्तृत्वाचा ‘कॅन्व्हॉस’ चितारला आहे. अनु आगा... लीला पूनावाला... मेहेर पद्मजी... किरण मुझुमदार-शॉ... यांच्यासारख्या प्रथितयश उद्योजिका! शुभा मुद्गल, मल्लिका साराभाई यांच्यासारख्या कलाकार! शिखा शर्मा... नैना गिडवाई... प्रिया पॉल... यांच्यासारख्या यशस्वीता आणि सुवर्णकन्या पीटी उषा... यांच्या यशोगाथांचा हा आलेख!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLIN EMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #BIOGRAPHY #सुधा मेनन #SUDHA MENON #SUMITA BORSE #आघाडीचे महिला नेतृत्व #LEADING LADIES #AAGHADICHE MAHILA NETRUTVA
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    आघाडीचे महिला नेतृत्व भारतातील प्रेरणादायी महिला... आज प्रत्येक स्तरावर महिला आघाडीचे नेतृत्व करत आहेत. राजकारण, समाजकारण, शिक्षण, सेवाक्षेत्रे सर्वच क्षेत्रात महिलांनी आपली योग्यता किंबहुना श्रेष्ठता सिद्ध केली आहे. त्यांच्या आयुष्यातील शाश्वत बाब ्हणजे परिवर्तन होय. मुलगी म्हणून नको असलेल्या घरात मोठी होते. नवऱ्याच्या घरी जाणे व तेथील परिस्थितीशी जुळवून घेणे. संपूर्णत: अनोळखी व्यक्तीसोबत नवे आयुष्य सुरू करणे, या सर्व अवस्थामधून जाताना नातेसंबंध जोपासणे, त्याचे संवर्धन करणे ही अवघड जबाबदारी ती सहज पार पाडते. या पुस्तकाच्या मूळ लेखिका सुधा मेनन आहेत आणि मराठी अनुवाद सुमिता बोरसे यांनी केला आहे. भारतातील कर्तृत्ववान महिलांच्या जीवनालेख, त्यांची प्रेरणा, त्यांचे योगदान या पुस्तकामध्ये मांडले आहे. सहकार क्षेत्रात ग्रामीण महिलासाठी काम करणाऱ्या अम्रिता पटेल मानवाधिकार क्षेत्रात काम करणाऱ्या अनु भागा, व्यवस्थापन क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या कल्पना मोरपारिया, सुवर्णकन्या पी.टी. उषा या आणि इतर पंधरा कर्तृत्ववान महिलांचे कार्य या पुस्तकातून मांडले आहे. महिलांसाठी महत्त्वाचे म्हणजे आयुष्य प्रामाणिकपणे, प्रेमाने, सन्मानाने आणि निष्ठेने जगणे होय. समाजातील सर्वच घटकांनी हे पुस्तक वाचून त्यातून योग्य ते बोध घेण्याची गरज आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

A-AMITABHCHA
A-AMITABHCHA by G.B. DESHMUKH Rating Star
प्रा. डॉ . वैशाली रवी देशमुख, अमरावती

वाचनाचे फायदे सांगताना प्रसिद्ध इंग्रजी लेखक फ्रान्सिस बेकन म्हणतो `रीडिंग मेकेथ अ फुल मॅन`. वाचनामुळे माणूस परिपूर्ण होतो. क्वचित एखादं असं पुस्तक हाती येतं जे वाचल्यानंतर ह्या परिपूर्णतेची , आत्यंतिक समाधानाची जाणीव होते . नुकतंच जी. बी. देशुख यांचं `अ- अमिताभचा` हे पुस्तक हाती पडलं एका बैठकीत ते वाचून संपवलं आणि काहीतरी माहितीपर तरीही दर्जेदार आणि साहित्यिक मूल्य असणारं पुस्तक वाचण्याचा आनंद प्राप्त झाला. सीमा आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात काम करून निवृत्त झालेल्या जीबी देशमुखांनी २०२० मध्ये अमिताभ बच्चनच्या कारकिर्दीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या विविध ५० सिनेमातील भूमिकांचे विश्लेषण करणारे साप्ताहिक सदर दैनिक सकाळ मध्ये प्रकाशित केले. कोरोना काळात लिहिलेल्या या लेखमालेला त्यावेळी प्रचंड प्रतिसाद मिळाला. केवळ ज्येष्ठच नाही तर तरुण वाचकांनीही या लेखमालिकेला पसंतीची पावती दिली. २०२२ मध्ये मेहता पब्लिकेशनने अमिताभ बच्चनच्या एकूण ६२ सिनेमांवर आधारित लेख `अ अमिताभचा` या पुस्तक रूपाने प्रकाशित केले. १९६९ पासून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीला पाच दशकांपेक्षा अधिक काळ लोटला तरीही त्याचे सिनेरसिकांच्या भावविश्वावर असलेले अधिराज्य कायम आहे. ती जादू कमी ओसरण्याचं नावच घेत नाही तर ती दिवसेंदिवस वाढत आहे . किरकोळ शरीरयष्टी, भरमसाठ उंची आणि सौंदर्याच्या साचेबंद व्याख्येत न बसणारा चेहरा असलेला अमिताभ आणि त्याला मिळालेली अफाट लोकप्रियता याची सांगड घालणे सर्वसामान्य व्यक्तीच्या आकलनापलीकडचे आहे. अमिताभ बच्चनचे प्रचंड चाहते असलेले जी . बी देशमुख यांच्यासाठी `अ` हा अमिताभचाच आहे. परंतु केवळ एक चाहते म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं नाही तर अमिताभ बच्चनचे जे गारुड कित्येक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर आहे त्यामागची नेमकी कारणे कोणती असू शकतात हे अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकात केलेला आहे. एक रसिक, चोखंदळ प्रेक्षक, अभ्यासक आणि समीक्षक म्हणून या पुस्तकात लेखक आपल्या समोर येतात. `बेमिसाल` पासून `झुंड` या चित्रपटा पर्यंत अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीतील उत्तमोत्तम ६२ सिनेमांचा लेखकांनी या पुस्तकात परामर्ष घेतलेला आहे. या चित्रपटांमधील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित सर्व बाबींचे अत्यंत अभ्यास पूर्वक रसग्रहण केलेले आहे. `अमिताभ बच्चन चांगला कलाकार आहे` किंवा `अमुक अमुक चित्रपट चांगला आहे` असं जेव्हा एखादा सर्वसामान्य प्रेक्षक म्हणतो त्यावेळेस हे आवडणं किंवा चांगलं असणं नेमकं का आहे याची उत्तरं देण्याचा प्रयत्न लेखकाने प्रत्येक लेखात केलेला आहे. प्रत्येक चित्रपटातील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित हायलाइट्स जसे की, एखादा उत्कट प्रसंग, गाणे, नृत्य, मारामारीचे दृश्य यावर लेखकाने प्रकाश टाकलेला आहे. आपण जर तो चित्रपट पाहिला असेल तर लेखकाने वर्णन केलेले प्रसंग जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात आणि बघितला नसेल तर तो चित्रपट आपण पाहिलाच पाहिजे अशी तीव्र इच्छा मनात निर्माण होते. उदाहरणार्थ, शोले या चित्रपटातील रसग्रहणात ,चेहऱ्यावरचे रेषाही ढळू न देता अमिताभने फेकलेले वन लाइनर्स, बुद्धीची चमक दाखवणारे शांतपणे केलेले विनोद, हळुवार प्रेमासाठी त्याचं आतल्या आत झुरणं , मित्राच्या मांडीवर प्राणत्यागाचे उत्कट दृश्य, आणि पिढ्यानपिढ्या लक्षात राहिलेला मावशी लीला मिश्रा सोबतचा विनोदी संवाद यांचे परिणामकारक वर्णन करून त्यांनी अमिताभची उत्तुंग अभिनय क्षमता उलगडून दाखवली आहे. या पुस्तकाला वाचनीय बनवणारा एक घटक म्हणजे लेखकाने वापरलेली भाषा. अत्यंत साध्या, सोप्या आणि अनुभवातून आलेल्या शब्दातून लेखकाने अमिताभ बच्चन भूमिकांचा उत्तरोत्तर चढत जाणारा आलेख शब्दांकित केला आहे. लेखकाच्या भाषा प्रभुत्वाचे साक्ष देणारी अनेक वाक्य पुस्तकांमध्ये जागजागी आढळतात. एका ठिकाणी ते लिहितात, `अमिताभने सिनेमातील विनोदाची सूत्र हाती घेतली तेव्हापासून विनोदी कलाकारांवर जणू बेकारीचं संकट कोसळलं होतं. प्रेक्षकांना दिलेल्या मनोरंजनाच्या वचनाशी `नमक हलाली` करणाऱ्या प्रकाश मेहरा आणि अमिताभ या जोडीने प्रेक्षकांना `और हम नाचे बिन घुंगरू के` असा आनंद दिला होता. असेच एक सुंदर वाक्य- `अमिताभचा उंट मनोरंजनाचा अख्खा तंबू व्यापून बसला होता`. लेखकाच्या ओघवत्या आणि मनाला भिडणाऱ्या भाषा शैलीचं एक उदाहरण मिली चित्रपटाच्या रसग्रहणातील या परिषदेतून दिसून येत: "शेखरच्या मनावर चढलेली उदासीची पुटं अमिताभच्या कसदार अभिनयामुळे आपल्याला अस्वस्थ,उदास करून सोडतात. दारूच्या नशेतील अमिताभचं एक दृश्य मस्त जमलं होतं . मोबाईल, टीव्ही इत्यादी आधुनिक साधनं व्यवहारात येण्याच्या आधीचा तो काळ होता. मिली आजारामुळे घरात बंदिस्त झाल्यानंतर त्या दोघात नोकराच्या माध्यमातून जो पत्र व्यवहार होतो तो आजच्या मोबाईल चॅटिंग पेक्षाही प्रभावी वाटतो. रोज मिलीला वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यावर गुलदस्ता पाठवणारा अमिताभ एका चिठ्ठीत लिहितो `जो गुलदस्ता बनके खुद आ जाऊ तो कहा रखुं . ` हे रोमँटिसिझम खूप वरच्या स्तराचं होतं. अमर्याद दुःखाची वीण घट्ट करत जाताना किशोर कुमारच्या दर्दभऱ्या स्वरात `बडी सुनी, सुनी है जिंदगी ये जिंदगी` आणि `आये तुम याद मुझे गाने लगी हर धडकन` ही दोन गाणी वातावरण औदासिन्यानं भरून टाकतात. मनाचा चांगला पण लहानपणी आई वडिलांच्या बाबतीत घडलेल्या घटनेने आणि लोकांनी त्याकरिता डिवचल्यानं कच खाल्लेला, प्रेमाची आस लागलेला एक तरुण अमिताभने लाजवाब रंगवला होता. या पुस्तकाच्या रंजकतेत भर टाकणारा आणखी एक घटक म्हणजे लेखकाचे आत्मचरित्रात्मक निवेदन. प्रत्येक चित्रपटाच्या बाबतीत तो चित्रपट त्यांनी केव्हा पाहिला, कुणाबरोबर पाहिला,त्यावेळी ते किती वर्षांचे होते आणि त्या चित्रपटाचा त्यांच्या भावविश्वावर कसा परिणाम झाला याचा उल्लेख जागजागी केलेला आहे. लेखकाच्या पिढीतील वाचकांना यातून पुनः प्रत्ययाचा आनंद मिळतो. आणि आजच्या पिढीतील इतर वाचकांसाठीही ही बाब रंजक ठरते. पुस्तकाच्या मलपृष्ठावर लेखक म्हणतात, `1973 साली आम्ही पाचवीत असताना आम्हाला प्रथमच हिंदी सिनेमातील नायकाची `ये पोलीस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नही`, अशी आगळीवेगळी मिजास पडद्यावर बघायला मिळाली आणि आता निवृत्तीला आलो तर हाच अद्भुत माणूस आम्हाला `पिंक` या महिलाप्रधान सिनेमात `ना का मतलब सिर्फ ना होता है`, असं ठणकावतो, `बदला` ह्या रहस्यपटात तितक्याच जोरकसपणे `सबका सच अलग अलग होता है ,` असं तत्वज्ञान मांडतो आणि अगदी अलीकडच्या `झुंड` मध्ये झोपडपट्टीतील धटिंगण मुलांच्या घोळक्याला `झुंड नाही, टीम... `म्हणायची शिकवण देतो तेव्हा आजही त्याचं म्हणणं आमच्या हृदयात थेट उतरतं .` पुस्तक वाचत असताना लेखकाच्या अफाट निरीक्षणशक्तीचे आणि अभ्यासू वृत्तीचे दर्शन घडते . विविध दिग्दर्शकांनी अमिताभच्या अभिनयक्षमतेचा केलेला वापर , अमिताभच्या डोळ्यातून सशक्तपणे व्यक्त झालेले हृदयस्पर्शी भाव, वेगवेगळ्या चित्रपटात त्याने केलेला लाथेचा उपयोग, त्याची वैशिष्ट्यपूर्ण नृत्य, आणि भारदस्त आवाजातील संवाद आणि गाणी यांचं वर्णन वाचत असताना लेखकाची संशोधक वृत्ती तर जाणवतेच परंतु आपणही हे चित्रपट पाहून हा रसास्वाद घ्यायलाच हवा ही इच्छा वाचकांच्या मनात प्रकर्षाने निर्माण होते.यातच या पुस्तकाचे फार मोठे यश सामावले आहे हे नक्की! ...Read more

SAAD GHALATO KALAHARI
SAAD GHALATO KALAHARI by MARK & DELIA OWENS Rating Star
मोहन देशपांडे नागपुर

cry of kalahari ह्या पुस्तके अनुवाद हिंदी सर्वोत्तम (RD) मध्ये कित्येक वर्षापूर्वी वाचले होते. माझ्याजवळ, जपून ठेवलेल्या पुस्तकामधे ते पुस्तक गहाळ झाले. मग 4 वर्षापूर्वी हे पुस्तक मिळाले व विकत घेतले. ते अनेक वेळा वाचून काढले, तरी प्रत्येकवेळी वेगळा नंद होतो. ती तुमची रसाळ भाषेची किमया. ह्या मुळेच Deceiption valley एकदा तरी बघता यावी ही इच्छा तुमचे अभिनंदन व धन्यवाद... ...Read more