* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: THOUGHT LEADERS
 • Availability : Available
 • Translators : SUPRIYA VAKIL, VILAS WADKAR
 • ISBN : 9788177664300
 • Edition : 6
 • Publishing Year : NOVEMBER 2003
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 418
 • Language : Translated From ENGLISH to MARATHI
 • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
 • Ebooks:
 • Print Books:
WHAT IS THERE IN THIS BOOK `THOUGHT LEADERS?` IT EXPRESSES TREMENDOUS NECESSITY OF BRINGING NEW IDEAS INTO REAL LIFE, ACCEPTING CHALLENGES, BECOMING FREE AND AUTONOMOUS, AND INCREASING THE STANDARD OF LIVING. THIS BOOK PRESENTS THE GRAPH OF 22 OF INDIA`S VISIONARIES WHO WERE VERY SUCCESSFUL MANAGERS TOO. ALL THESE PEOPLE ARE FROM DIFFERENT BUSINESSES, THEY ALL HAVE DIFFERENT BACKGROUNDS. THIS BOOK TRIES TO FIND THE ANSWER FOR THE QUESTION HOW THEY GOT TO THE TOPMOST POSITIONS? THIS BOOK IS THE COLLECTION OF THE FUNDAMENTALS OF THE EXCEPTIONAL BUSINESSMEN. THIS IS BASICALLY BASED ON THE INTERVIEWS WITH THESE PEOPLE. THESE INTERVIEWS HAVE REVEALED THESE PEOPLE AS SUCCESSFUL MANAGER, LEADERS AND HUMAN BEINGS TOO. THEY ALSO REVEAL THE UPS AND DOWNS IN THEIR LIVES, THE TURNING POINTS OF THEIR CAREERS, THE MOMENTS OF THEIR INSPIRATIONS AND THEN THEIR JOURNEY TOWARDS A THOUGHTFUL LEADERSHIP AND SUCCESS. THESE THOUGHT LEADERS WILL SURELY IMPRESS YOU, IGNITE YOU AND INSPIRE YOU TO ACHIEVE YOUR GOAL WHILE WALKING TOWARDS IT, CROSSING THE HURDLES, MEETING ALL THE EXPECTATIONS ON THE WAY, AND SINCERELY REACHING THE MINUTEST OF OUR FEELINGS, RELIGIOUSLY. THIS BOOK INCLUDES THE INTERVIEWS WITH THE FOLLOWING HIGHLY INTELLIGENT PEOPLE: ANU AAGA, DHANANJAY BAKHALE, PRAMOD CHOUDHARY, RAJABHAU CHITALE, HUMAYUN DHANRAJGIR, BHANWARLAL JAIN, DEEPAK KANEGAONKAR, BHAUSAHEB KELKAR, RAVI KHANNA, VARGIS KURIYAN, RAGHUNATH MASHELKAR, KIRAN MUJUMDAR, NARAYAN MURTI, DEEPAK PAREKH, PRATAP PAWAR, PRAKASH RATNAPARAKHI, RONY SCREWWALA, SARTAJ SINGH, ASHOK SUTA, VIKRAM TANNON, SUDHIR TILLU, MANOJ TIRODKAR.
थॉट लीडर्स` या पुस्तकात आहे तरी काय? ``नव्या कल्पना प्रत्यक्षात आणणं आणि आव्हान स्विकारणं, स्वतंत्र होण्याची अथवा स्वायत्ततेची गरज आणि जीवनाचा दर्जा सुधारणं, या गोष्टींची अत्यंतिक निकड ... या पुस्तकात भारतातील २२ दृष्ट्या व्यवस्थापकांच्या कार्याचा आलेख आहे. या व्यक्ती निरनिराळ्या व्यवसायातील आहेत, यांची पार्श्वभूमीही भिन्न-भिन्न आहे. या भारतीय व्यक्तींना असं खास स्थान कशामुळे मिळालं त्यावर दृष्टीक्षेप टाकण्याचा प्रयत्न या पुस्तकात करण्यात आला आहे. या पुस्तकात व्यवस्थापक व नेते यांच्या जीवनातील महत्वपूर्ण वळणं, त्यांना प्रेरक ठरणारे घटना-प्रसंग यांचं चित्रण आहे... या सगळ्यातून सुरु झालेला हा वैचारिक नेतृत्वांचा प्रवास आणि त्यांची यशोगाथा यावर या पुस्तकात प्रकाश टाकण्यात आला आहे. आपल्या जाणीवेच्या सूक्ष्म, सखोल थरांपर्यंत पोचून, समृद्ध आणि दैदिप्यमान कामगिरी घडविण्यासाठी सहाय्यभूत ठरणा-या घटकांविषयी `थॉट लीडर्स` आपल्याला मोलाचे मार्गदर्शन करते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #BIOGRAPHY #THOUGHT LEADERS #SHRINIV PANDIT #SUPRIYA VAKIL #थॉट लीडर्स #VILAS WADKAR
Customer Reviews
 • Rating Starसौ. शकुंतला जोशी, पुणे

  मी आपले नुकतेच `थॉट लीडर्स` हे पुस्तक वाचले. श्रीनिवास पंडित व आपले पुस्तक खूपच छान आहे. उत्तम रेखाटलेली व्यक्तिचित्रे वाचायला मिळाली. मार्गदर्शक व उपयुक्त अशा विविध गुणवैशिष्ट्यांमुळे आपले थॉट लीडर्स खूपच छान आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठही आकर्षक आहे.

 • Rating StarDAINIK TARUN BHARAT 01-08-2004

  विचार समृद्ध थॉट लीडर्स… नव्या कल्पना प्रत्यक्षात आणणं आणि आव्हानं स्वीकारणं, स्वतंत्र होण्याची किंवा स्वायत्ततेची गरज आणि जीवनाचा दर्जा सुधारणं अशा गोष्टींची निकड आजच्या आधुनिक युगात भासते आहे. अशी निकड असणारे स्वत:चा मार्ग शोधतातच; पण त्यांना एखाद पाऊलवाट जरी मिळाली, तरी त्यावरून चालण्याचे समाधान त्यांना लाभू शकते. अशा प्रयत्नशीलांसाठी ‘थॉट लीडर्स’ हे श्रीनिवास पंडित यांचे पुस्तक सुप्रिया वकील आणि विलास वाडकर यांनी अनुवादित केले आहे. यात भारतातील एकूण बावीसजणांची व्यक्तिचित्रणे वा कार्याचा आलेख आला आहे. अन् जागा, धनंजय बखले, प्रमोद चौधरी, राजाभाऊ चितळे, हुमायून धनराजगीर, भ्ंवरलाल जैन, दीपक कानेगावकर, भाऊसाहेब केळकर, रवी खन्ना, वर्गीस कुरीयन, रघुनाथ माशेलकर, किरण मुजुमदार, नारायण मूर्ती, दीपक पारेख, प्रताप पवार, प्रकाश रत्नपारखी, रॉनी स्क्रूवाला, सरताजसिंग, अशेक सुना, विक्रम टन्नन, सुधीर टिल्लू आणि मनोज तिरोडकर या नामावलीकडे बघूनच त्यांची व्यक्तित्वे काही अशी स्मरू लागतात. मिठाई उत्पादनापासून ते माहिती तंत्रज्ञान, डेअरी, जैव रसायनं, सॉफ्टजेल्स, औषधे उत्पादने, प्रतिमानिर्मिती, इंजिनिअरिंग, विज्ञान अशा क्षेत्रांतली ही सारी मंडळी आहेत. केवळ महाराष्ट्रापुरत्या यांच्या सीमा नसून ही मंडळी इतरही ठिकाणची आहे. पस्तीस वर्षांपासून ते ७९ वर्षांपर्यंतच्या वयोगटातील हे उद्योजक आदर्शत्वाचा नमुना म्हणता येतील. विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या मतांची नोंद घेऊन या ‘लीडर्स’ची निवड केल्याचे दिसते. कार्यक्षेत्रातली अत्त्युत्तम कामगिरी. भविष्यकाळात उज्ज्वल प्रगतीची आशा, इतरांसाठी स्फूर्ती व चैतन्यदायी आणि सर्जनशीलता हे निकष यासाठी लावले गेलेले दिसतात. एकंदर दोन भागांपैकी पहिल्यात त्यांची जडणघडण, त्यांच्यावरचा अनुभवी सल्लागारांचा प्रभाव, आपल्याला कलाटणी देणारी महत्त्वाची वळणं आहेत. त्यांचे वैशिष्ट स्वभावविशेष, त्यांची विचारप्रक्रिया, त्यांची कौशल्ये-कार्यक्षमता आणि आगळेपण सिद्ध करणारे घटक या साऱ्यांचे वर्णन आहे. ‘‘ग्राहकाची स्वादिष्ट पदार्थांची भूक आम्हाला प्रेरणा देते.’’ -राजाभाऊ चितळे. ‘‘उपयोगात आणता येण्याजोगं संरक्षित ज्ञानच फक्त, संपत्तीनिर्मिती करू शकते.’’ -रघुनाथ माशेलकर ‘‘ग्राहकाला चोवीस तासांच्या आत प्रतिसाद देणं हे धार्मिक कायं आहे.’’ -अन् आगा. या तिघांची ही वाक्य त्यांच्या जीवनाचे सार दर्शवितात. अशी वाक्य प्रत्येकाच्या चित्रणात लिहिलेली दिसतात. जणू प्रत्येकाच्या यशाचा तोच मूलमंत्र आहे. दुसऱ्या भागात या यशस्वी उद्योजकांच्या जडणघडणीत आढळणाऱ्या समान घटकांचं तुलनात्मक विवेचन केलेलं दिसतं. यांच्यातले समान स्वभावविशेष आणि सोर्स कोड रेखाटले आहेत. त्यांच्या कार्यक्षेत्रातली त्यांची व्यक्तिमत्त्वे-प्रतिमा यांचाही विचार यात एकत्रितपणे केला आहे. शेवटी असलेल्या परिशिष्टात त्रोटक महितीचा तक्ता दिलेला आहे. यशस्वी नेते उद्योजकांच्या मुलाखतीवर आधारलेल्या या लेखनातून त्यांच्या अंतरंगाचं दर्शन घडतं. जवळपास तीन वर्षे चाललेला एक प्रयत्न या पुस्तकाद्वारे शब्दबद्ध झालेला दिसतो. मात्र अनुवादात वापरलेली भाषा त्यामानाने ग्रांथिक अधिक वाटते. आजच्या पिढीला इंग्रजीचा सराव असल्याने तेच शब्द वापरले असते तरी फारसे बिघडले नसते. काही वेळा वाक्यरचना, शब्दप्रयोग हे मराठीनुसार न करता इंग्रजीच्या धर्तीवर रचलेले वाटतात. आपण जे होऊ शकतो असं आपल्याला वाटतं असतं, तसं होण्यासाठी आपल्याला कुणीतरी स्फूर्तिदायी व्यक्ती असणं ही आपली मुख्य गरज असते. असं राल्फ वाल्डी इमर्सन म्हणतो. म्हणूनच जाणिवेच्या सूक्ष्म सखोल थरापर्यंत पोचून, समृद्ध आणि देदीप्यमान कामगिरी घडवण्यासाठी साहाय्यभूत ठरणाऱ्या घटकांविषयी सहाय्यभूत ठरणाऱ्या घटकांविषयी ‘थॉट लीडर्स’ आपल्याला मोलाचे मार्गदर्शन करते. -राधिका कुंटे ...Read more

 • Rating StarCHATURA MASIK - FEB 2006

  Winners not do different things they do things differently असं म्हणतात. आज आपण जे पुस्तक पाहणार आहोत ते जरा वेगळं आहे. अतिशय माहितीपूर्ण पण रंजक. आपल्याला सगळ्यांना स्फूर्ती देईल असं. अतिशय माहितीपूर्ण श्रीनिवास पंडित यांनी लिहिलेलं सुप्रिया वकील आणिविलास वाडेकर यांनी अनुवाद केलेलं ‘थॉट लीडर्स’ अर्थात वैचारिक नेतृत्व, अथक परिश्रम आणि बुद्धिमत्ता यांचा कस लावून गगनाला गवसणी घातलेल्या विविध क्षेत्रांतल्या २२ जणांच्या कर्तृत्वाचा हा वेध. असं म्हणतात की गरज ही शोधांची जननी असते. या मंडळींना गरज कशाची होती? तर त्यांच्यामधल्या सुप्त गुणांना वाव देण्याची, नव्या कल्पना प्रत्यक्षात आणण्याची आणि मग सुरुवात झाली ती या वैचारिक नेतृत्वाला. या २२ द्रष्ट्या व्यवस्थापकांच्या खरोखर देदिप्यमान कार्याचा हा आलेख आहे. या सर्वांची पार्श्वभूमी भिन्न आहे. व्यवसाय वेगळे वेगळे आहेत. विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. समान धागा आहे तो म्हणजे धडपड. त्यांच्या वैयक्तिक नेतृत्वाचा प्रवास. या पुस्तकात २० पुरुष आणि २ स्त्रिया अशा २२ नेतृत्वांचा विचार केला आहे. त्यांची जडणघडण, त्यांच्यावर असणारा इतरांचा प्रभाव, कलाटणी देणारी वळणं, त्यांचे स्वभावविशेष, विचार, कौशल्य, कार्यक्षमता या सगळ्यांचं वर्णन पुस्तकात आहे. यात सात नवउद्योजक आहेत. सहा नवउद्योजक व्यवस्थापक आहेत. तीन नवव्यवस्थापक उद्योजक आहेत. तीन नवउद्योजक कुटुंब आहेत. तीन अपवादात्मक व्यावस्थापक आहेत. नारायण मूर्ती, प्रताप पवार, वर्गीस कुरियन, अनू आगा, रघुनाथ माशेलकर, किरण मुजुमदार, रॉनी स्क्रूवाला ही त्यातील काही नावे. पुण्यातील थरमॅक्स या ऊर्जा आणि पर्याव्रण क्षेत्रातल्या अतिशय यशस्वी उद्योगसमूहाच्या अनू आगा म्हणतात की, ग्राहकाला चोवीस तासाच्या आत प्रतिसाद देणं हे धार्मिक कार्य आहे. त्यांचे वडील उद्योजक होते ते संस्कार, पतीनं दिलेलं सहकार्य व्यक्ती म्हणून विकसित होण्याची आणि व्यावसायिक सहचारिणी बनण्याची क्षमता ओळखून त्यांच्या पतीनं केलेली जडणघडण या गोष्टींनी त्यांच्या आयुष्यावर ठळक प्रभाव पाडला. वैयक्तिक आयुष्यात पराकोटीची दु:ख सोसून त्यांनी बदलांना समर्थपणे तोंड दिलं. मनुष्यबळ विकास विभागात आज थरमॅक्सचं वेगळं स्थान आहे. नोवर्तिस इंडिया लि. मुख्य वैद्यकीय अधिकारी धनंजय बखले यांची कारकीर्द ही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. इतरांनी न चोखळलेल्या वाटा तुडविल्या जाव्यात यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. भारतीय औषध उत्पादन क्षेत्रात नव्या पर्वाचा आरंभ त्यांनी केला आहे. दर्जेदार मिठाई, दूध आणि खाण्याचे पदार्थ म्हणजे चितळे बंधू मिठाईवाले हे समीकरणच आहे. चितळे उद्योगसमूहाची उलाढाल कोट्यवधी रुपयांची आहे. राजाभाऊ चितळे यांनी नोकरी करणं हा विचारच कधी केला नाही. राजस्थानी आणि पंजाबी मिठाई व्यावसायिकांमध्ये घट्ट पाय रोवून स्वत:ला सिद्ध करणारे राजाभाऊ चितळे म्हणतात की, तंत्रज्ञाना आणि बाजारपेठ या आम्हाला समस्या नाहीत. वृद्धीचा वेग व्यवस्थापनाचा अभाव या चिंता आहेत. जागरुकतेनं कृती घडवायला हवी. थांबला तो संपला. धवलक्रांतीचे जनक डॉ. वर्गीस कुरियन यांनी आणंद पॅटर्न सुरू केला. संघटनकौशल्य, कणखर वृत्ती, व्यूहरचना यांनी हा पॅटर्न यशस्वी केला. सी.एस.आय.आर. या विज्ञानसंस्थेचे प्रमुख संचालक उत्तम पॉलिमर शास्त्रज्ञ व्यवस्थापक डॉ. रघुनाथ माशेलकर यांचा कर्तृत्व आलेख अक्षरश: थक्क करणारी आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वत:ला सिद्ध केलेलं हे नेतृत्व. इन्फोसिसचे संस्थापक अध्यक्ष नारायण मूर्ती हे एक विलक्षण व्यक्तिमत्व. त्यांचं तत्वज्ञान म्हणजे कबूल करताना थोडं कमी कबूल करणं आणि देताना थोडं जास्त देणं. विशिष्ट व्यूहरचना, टीमवर्क, पुन:पुन्हा येणारे ग्राहक, कदर, कायद्याचं पालन या काही महत्त्वाच्या गोष्टी नारायण मूर्ती मानतात. इन्फोसिसचे संस्थापक अध्यक्ष नारायण मूर्ती हे एक विलक्षण व्यक्तिमत्व. त्यांचं तत्वज्ञान म्हणजे कबूल करताना थोडं कमी कबूल करणं आणि देताना थोडं जास्त देणं. विशिष्ट व्यूहरचना, टीमवर्क, पुन:पुन्हा येणारे ग्राहक, कदर, कायद्याचं पालन या काही महत्त्वाच्या गोष्टी नारायण मूर्ती मानतात. अवघ्या वीस वर्षांपूर्वी सुरू झालेल्या ‘ग्लोबल एंटरप्राइजेस’चे संस्थापक मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज तिरोडकर (वय ४०) वल्र्ड यंग बिझिनेस अचिव्हर हे बक्षीस मिळवलेले. संपत्ती निर्मिती वृद्धीचं अर्थकारण, लोकव्यवस्थापन आणि अथक शिकत राहणं हे त्यांच्या यशाचं गमक आहे. यापैकी बहुतेकांनी वयाची पन्नाशी ओलांडली असली तरी ते जणू चाळिशीचेच आहेत. कुटुंबव्यवस्थेचा भक्कम पाया, त्यांचे कवच, ऊब याच्या खुणा या नेत्यावर आहेत. बहुतेक सर्वांनी आपल्या अभ्यासक्षेत्राशी संबंधित व्यवसाय निवडला आहे. बहुतेक या सगळ्यांच्या आयुष्यात अशी घटना प्रसंग प्रेरणा झाली आहे. सर्वांमध्ये चिकाटी, एकाग्रता, ऊर्जा, सतत ज्ञानग्रहण, मूल्य, धोका पत्करण्याची तयारी हे गुण सर्वांमध्ये समान आहेत. अशी ही वैचारिक नेतृत्व. यांना या पुस्तकात स्थान मिळालं कारण कामगिरीचा चढता आलेख, अत्युत्तम कामगिरी, प्रगती साधण्याची गुणवत्ता, नवीन उपक्रम घडविण्याची क्षमता सकारात्मक मनोवृत्ती, क्षमता हे पुस्तक सर्वांनी जरूर वाचावं. या नेत्यांमधल्या चैतन्याचा स्पर्श त्यांच्या सहवासात आपण नसलो तरी होतो. आपल्यामधूनही अशी अनेक वैचारिक नेतृत्व जन्मतील जी स्वत:बरोबर इतरांचा विकास घडवतील. इतिहास घडवतील. एक सुंदर वाक्य आठवतंय. If vision is one year cultivate flowers. But if vision is eternally cultivate people. ...Read more

 • Rating StarMUMBAI MAHANAGAR 10-04-2004

  नेतृत्त्वाची यशोगाथा... उद्योग हा उद्योगसारखा करावा, त्यात कोणतही इतर तत्त्वज्ञान आणू नये, असं एका प्रसिद्ध उद्योगपतीने म्हटलंय. पण उद्योगाचं असं वेगळं एक तत्त्वज्ञान असतंच, तेच तत्त्वज्ञान मांडणारं हे पुस्तक थॉट लीडर्स. एकूण बावीस उद्योजक व्यवस्थपकांच्या वाढीचा, वृत्तीचा, वैचारिकतेचा या तपशील यात आहे. प्रस्तावनेतच या पुस्तकाने लेखक श्रीनिवास पंडित म्हणतात, ‘विलक्षण यशप्राप्तीसाठी कारणीभूत ठरलेल्या या व्यक्तींच्या स्वभाव, वृत्ती, त्यांची कार्यक्षमता या सर्व गोष्टींची मी नोंद केली आहे. या गोष्टी अनुसरायला अगदी साध्या, पचायला आणि अवलंबायला अतिशय सोप्या आहेत.’ कोणताही आविर्भाव न आणता सांगितलेल्या आणि लिहिलेल्या या गोष्टी आणि ती माणसं आपलीशी आणि आपल्यासाठीच वाटतात. एका अर्थाने हे पुस्तक म्हणजे उद्योजकाच्या प्रगतीचा आलेख आहे. तर दुसऱ्या आजूने व्यवस्थापनाची भगवद्गीताच आहे. बावीसपैकी दोन स्त्रियांच्या कार्यकर्तृत्वाचा समावेश या पुस्तकात आहे. त्यांच्यापैकी अनू आगा म्हणतात, ‘संस्था चालवण्यासाठी सर्वात लायक असणाऱ्या व्यक्ती म्हणजे व्यावसायिक व्यक्ती. अशाच व्यक्ती संस्था चालवतात. संस्थेचं यश गृहीत धरून चालत नाहीत. ‘पुण्याच्या ‘थरमॅक्स’ या उद्योग समूहाच्या त्या अध्यक्षा आहेत. पतीच्या निधनानंतर त्यांनी उद्यागाची धुरा यशस्वीपणे सांभाळली. करिअरच्या सुरुवातीलाच ‘टॅन्झॅक्शनल अ‍ॅनॅलिसिस’चा केलेला अभ्यास त्यांना पूरक ठरला, कारण त्यात त्या शिकल्या होत्या की, तुम्हाला तुमचे हक्क आहेत. स्वत:च्या कृत्यांना तुमचे तुम्हीच जबाबदार असता, आणि तुम्ही इतरांच्या कृत्यांची जबाबदारी आपल्या शिरावर घेऊ शकत नाही. नोवार्तीस इंडिया लिमिटेडचे वैद्याकीय अधिकारी असलेले धनंजय बखले यांनी तरूण वयातच केलेली प्रगती अचंबित करणारी आहे. ते म्हणतात. ‘बहुविध क्षेत्रातल्या शिस्तबद्ध कार्यपद्धतीसोबत उच्च दर्जाची कार्यक्षमता अंगी असावी लागते. आपल्याकडे प्रचंड आध्यात्मिक शहाणपण आहे. खूप ज्ञानसंचय आहे. पण संशोधनाबाबतची सुज्ञता आपल्याकडे नाही. मध्यमवर्गीय सुखासिन वृत्तीमुळे लोक सामानय दर्जाचे बनतात.’ असंही त्यांचं निरीक्षण आहे. सुरुवातीला हाताखालच्या लोकांच्या हाताखाली काम शिकत शिकत ‘प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड’ या ६० करोड वार्षिक उलाढाल असलेल्या कंपनीचे मालक प्रमोद चौधरींनी आधीच ठरवलं होतं की, ३३व्या वर्षापर्यंत आपण स्वत:चा उद्योग सुरू करायला मोकळं असलं पाहिजे. ‘ग्राहकांशी उद्धटपणे वागणं आणि उर्मट बोलणं यासाठी आपण महाराष्ट्रीयन माणसं कुप्रसिद्ध आहोत, ग्राहकांशी नम्रपणानं कसं वागायचं, हे मी गुजराती माणसांकडून शिकलो.’ असं पुण्याचे मिठाईवाले चितळे यांनी कबूल केलंय. आपल्या उद्योगवाढीसाठी लागणारं अद्ययावत तंत्रज्ञान त्यांनी वेगवेगळ्या देशांतून आणलं, आणि पुण्यात बसून आपल्या उत्पादनाला विशेषत: बाकरवडीला जगाच्या बाजारात मानाने बसवलं. जैन समूह कृषी उद्योगाचे भवरलाल जैन, एस.एच. केळकर आणि कंपनीचे भाऊसाहेब केळकर, ‘कंट्रोल ग्रुप’ चे रवी खन्ना ही माणसं म्हणजे कल्पकता, परिश्रम, धाडस आणि दक्षता यांची चालती-बोलती उदाहरणं आहेत. ‘माझा आशावाद कधीही न थकणारा आहे, तो खचवता येणं कठीण आहे,’ असा दुर्दम्य विश्वास असलेले दीपक कानेगावकर. खरं तर या उद्योजकाला संगीत आणि सुगंधाचं वेड. रसायन उद्योगात पाय घट्ट रोवल्यानंतर, आता आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्याची वेळ आली आहे, असं वाटल्यानंतर त्यांनी जगाला एक अनमोल भेट दिली, ती म्हणजे लता मंगेशकर यांचया नावाचा बॅन्ड असलेला ‘लता’ नावाचा सुगंध. १९७०च्या दशकातल्या ‘दुधाचा महापूर’ या जगातल्या सर्वांत मोठ्या डेअरी विकास कार्यक्रमाने भारतात धवलक्रांती घडवली. या धवलक्रांतीचे शिल्पकार वर्गीय कुरीयन. ते म्हणतात, ‘बारीकसारीक वाटणाऱ्या गोष्टींकडे डोळसपणे पाहण्याची वृत्ती, अशा बारीकसारीक गोष्टींतूनच मोठे प्रयत्न घडत असतात तपशिलांचे बारकावे अतिशय महत्त्वाचे असतात.’ आज व्यवस्थापनाच्या क्षेत्रात मानाचं स्थान असलेलं नाव म्हणजे रघुनाथ माशेलकर. त्यांनी सहाव्या वर्षीच वडील गेल्यावर अधनमधनं दुकानांतून नोकऱ्या केल्या. त्याची आई ही त्यांच्यासाठी प्रेरणा होती. ‘द कौन्सिल ऑफ सायंटिफिक अ‍ॅण्ड इंडस्ट्रीयल रिसर्च’ या संस्थेचे ते प्रमुख संचालक आहेत. आपल्या ३६व्या वर्षी पद्मश्री पुरस्कार मिळालेला किरण मुजुमदार, १०० कोटीची उलाढाल असलेला ‘बायकॉन’ या उद्योगसमूहाच्या त्या अध्यक्षा आहेत. त्यांनी व्यवसायाला सुरुवात केली तेव्हा त्यांचं वय २५ होतं. त्या म्हणतात. ‘प्रामाणिकपणा हेच सर्वोत्तम धोरण’ हे वचन मी प्रत्यक्ष व्यवहारात वापरलं. मी माझ्या सहकाऱ्यांना बायकॉनचं स्वप्न आणि माझं व्यक्तिमत्त्व पटवून दिलं.’ १९८१ मध्ये सात जणांनी १०-१० हजार रुपये जमा करून सुरू केलेली ‘इन्फोसिस ही कंपनी. यात सर्वांत पुढे होते नारायण मूर्ती. त्यांची एका गोष्टीवर श्रद्धा आहे. ती म्हणजे शब्द देताना थोडं कमीच कबूल करणं आणि देताना त्याहून जास्त देणं अधिक चांगलं. ते म्हणतात, ‘अधिकाधिक लोकांना संपत्तीनिर्मितीसाठी प्रोत्साहित करणं हा गरिबीवर मात करण्याचा एकमेव उपाय आहे. तुम्ही संधी निर्माण करायला हव्यात. वैध मार्गाने संपत्ती निर्मिती करायला हवी. मध्यमवर्गीय वस्तीत साधेपणानं राहत असलेल्या या माणसाच्या गरजाही साध्याच आहेत. वार्षिक उलाढाल २५०० कोटींची आहे. एच.डी.एफ.सी. चे व्यवस्थापक दीपक पारेख, सकाळ पेपर्स लि. चे प्रताप पवार, इलेक्ट्रॉनिक ग्रूप ऑफ कंपनीजचे प्रकाश रत्नपारखी, युनिलेजरचे रॉनी स्क्रूवाला, एफ.एम.सी.चे सरताज सिंग, माइंडट्री कन्सल्टिंग प्रा. लि. चे अशोक सुता, बॅनर फॉमॉकॅप्स प्रा. लि चे विक्रम रन्नम, हिताची मेटलचे सुधीर टिल्लू, गोबल एन्टरप्राइजेसचे मनोज तिरोडकर या माणसांच्या कथाही नवीन उद्योजकाला प्रेरणादायी ठरतील अशाच आहेत. मराठी माणसाच्या रक्तात व्यावयायिकता नाही असं आपण म्हणतो-ऐकतो. पण या पुस्तकात निवडलेल्या २२ व्यक्तीपैकी महाराष्ट्रातले १६ तर १० व्यावयायिक मराठी आहेत हे विशेष. पुस्तकाच्या पहिल्या भागात उद्योजकांच्या यशोगाथा आणि दुसऱ्या भागात पहिल्या भागाचं सार ही रचना चांगली आहे. ‘समान गुणवैशिष्ट्यं प्रकट होतात’ हा लेख व्यवस्थापनाच्या विद्यार्थ्यांसाठी संदर्भ ठरावा असे आहे. श्रीनिवास पंडित यांनी इंग्रजीत लिहिलेल्या या पुस्तकाचा सुप्रिया वकील, विलास वाडकर यांनी मराठीत सहज अनुवाद केली आहे. हे पुस्तक वाचणारा प्रत्येक प्रत्येकजण त्यांचे आभारच मानील. उद्याग-व्यवसाय या संबंधी मराठी माणसाची असलेली संकुचित वृत्ती खोडून काढण्यासाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल, याज शंकाच नाही. लेखकाने एके ठिकाणी म्हटलंय मला भरपूर पैसा मिळवायचा आहे असं सांगणारा माणूस भेटली, की मला फार आनंद होतो. अशा प्रकारची माणसं भारतात अगदी दुर्मिळ आहेत. पैसा मिळवणं हे आपल्या समाजात अनैतिक असल्यासारखं मानलं जातं. धनवान बनणं म्हणजे काहीतरी पावित्र्य भ्रष्टता आणि गरीब राहणं म्हणजे सद्वर्तन असं आपल्यावर ठसलेलं. एखाद्या माणसानं श्रीमंत व्हायची, पैसे मिळवायची, धनाढ्य बनायची किंवा स्टाईलमध्ये राहण्याची इच्छज्ञ प्रकट केली तर आपल्याला धक्का बसतो.’ ही वृत्ती सोडण्यासाठी तरी हे पुस्तक प्रत्येकाने वाचायला हवं. ...Read more

 • Read more reviews
Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

ASHI MANASA : ASHI SAHASA
ASHI MANASA : ASHI SAHASA by VYANKATESH MADGULKAR Rating Star
Krishna Diwate

सुलभा प्रभुणे कोवळे दिवस, सत्तांतर, करूणाष्टके अशी अनेक पुस्तके लिहिणारे, जंगल वाटांबद्दल अतिशय आत्मीयतेने लिहिणारे व्यंकटेश माडगूळकर यांची वेगळी ओळख करुन द्यायला पाहिजे असे अजिबात नाही. कॉलजच्या त्या अधाशासारख्या वाचण्याच्या वयात माडगूळकर एकदा हातातपडल्यावर आपण त्यांच्या लेखनाच्या प्रेमात कधी पडलो हे समजतच नाही. अतिशय बारकाईने केलेले निरिक्षण, प्रत्येक अनुभव अतिशय मनापासून घेतलेला, अतिशय साधी सरळ पण थेट हृदयाला हात घालणारी त्यांची भाषा, ह्या त्यांच्या सगळ्याच गोष्टी अतिशय सुरेख आहेत. त्यांनीच लिहिलेले हे आणखी एक पुस्तक म्हणजे अशी माणसे : अशी साहसं. माडगूळकर स्वतः कायमच वेगळ्या वाटांनी चालत राहिले. त्यामुळे स्वतःच्या पावलांनी नव्या वाटा पाडणारे, कितीही कष्टदायक प्रवास असला तरी आपल्याला हवे ते मिळविण्याचा ध्यास घेतलेली माणसे हा त्यांच्या आवडीचा भाग. अशा अनेक लोकांची पुस्तके त्यांच्या संग्रहात असल्याने त्यांच्या वर वेळोवेळी लेख लिहिले. ते वाचकांना अतिशय भावले. त्यामुळे ही पुस्तके कुठे मिळतील? लेखकांबद्दल अधिक माहिती विचारणारे प्रश्न वाचक करत असत. तेव्हा श्री. ह.मो. मराठे हे किर्लोस्कर मासिकाचे संपादन करत होते. त्यांनी माडगूळकरांना अशा साहसी संशोधकांवर लेख लिहिण्याची विनंती केली. त्यानुसार सामान्य वाचक, वन्य प्राण्यांवर प्रेम करणार्‍या, वेगळेच साहस करण्याची आवड असणार्‍यांना ओळख व्हावी म्हणून हे लेख लिहिले आहेत. ह्या पुस्तकात एकूण 8 लेख आहेत. जिम कॉर्बेट, सलीम अली, जेन गुडाल, फर्ले मोवॅट, मारूती चितमपल्ली वगैरे नावे आपल्या सर्वांच्याच परिचयाची आहेत. पण तरीही सगळेच फक्त जंगलात हिंडणारे नाहीत. तर नाईल नदी एकट्यानेच पार करणारा कूनो स्टुबेन आहे, सिंदबादसारखा सात सफरी करणारा टिम सेव्हरिन आहे. प्रत्येकाची गोष्ट वेगळी, प्रत्येकाचे त्यामागची कारणे वेगळी पण झपाटलेपण हे सगळ्यांमध्ये सारखॆच आहे. आपण एखादी अत्यंत अवघड गोष्ट ठरविणे आणि मग त्याचा न कंटाळा करता पाठपुरावा करणे हे सोपे नाही. ते ‘येरा गबाळ्याचे काम’ नाही. पहिला लेख टिम सेव्हरिनवरचा आहे. स्वतः आयरिश. भूगोल विषयाचा अभ्यासक, त्याने सिंदबादच्या सात सफरी वाचल्यावर ह्या गोष्टी खर्‍या आहेत का हे शोधण्यासाठी वयाच्या बेचाळीसव्या वर्षी आपणही असा प्रवास करू या हे ठरविले. त्याप्रमाणे तयारीला लागला. त्यासाठी त्याने नवव्या शतकातील जहाजे कशी असत, अरबी व्यापाराचे स्वरुप काय होते हे सर्व अभ्यासायला सुरुवात केली.बरीच शोधाशोध केल्यावर त्याला सोळाव्या शतकाच्या सुरुवातीचा नकाश मिळाला. एकही खिळा ना वपरता अरबी जहाजे तयार होत असत ही माहीती मिळल्यावर तो त्याच्या शॊधासाठी ओमानला गेला. बरेच निरिक्षण केले. या मध्ये बहुधा त्याची इच्छाशक्ती फार जबर असणार त्यामुळे ओमानच्या सुलतानाने ह्या त्याच्या संपूर्ण सफरीचा खर्च करण्याची तयारी दाखवली. मग तिथंपासून ते जुन्या पध्दतीने जहाज बांधणे व ते प्रत्यक्ष पाण्यात उतरवणे हा अतिशय रोमहर्षक प्रवास पुस्तकातूनच वाचायला हवा. नंतर त्या सोहर जहाजातून पुढचा केलेला प्रवास हा खरोखरच सिंदबादच्या सफरीइतकाच विलक्षण आहे. 3 नोव्हेंबर 1980 ला निघालेले जहाज 1 जुलैला 1981 ला चीनला पोहचले. ‘द सिंदबाद व्हॉयेज’ हे प्रवासवृत्तावर लिहिलेले टिम सेव्हरिनचे पुस्तक 1982 मध्ये प्रसिध्द झाले. ते मोठ्या आकाराचे व 20 पानांचे आहे. त्याचा संक्षिप्त अनुवाद म्हणजे हा पहिला लेख आहे. त्यानंतरचा लेख चिंपाझींचा अभ्यास करून पीएच.डी मिळवलेल्या जेन गुडाल बद्दल आहे. पण तिने पुढे ह्युगो ह्या छायाचित्रकाराशी लग्न केल्यावर दोघांनी मिळून टांझानियातील गोरोंगारो इथे राहून रानकुत्री, तरस, कोल्ही यांचा अभ्यास केला. त्यावर ‘इनोसंट किलर्स’ हे पुस्तक लिहिले त्याची ओळख ह्या लेखातून करून दिली आहे. त्यांनी बरोबर आपला नऊ महिन्यांचा मुलगा नेला होता. हे वाचताना आपल्याच छातीत धडधडायला लागते. दोघांनी केलेले निरिक्षण, न कंटाळता तासनतास बारकाईने पहाण्यात घालवलेले दिवस हे वाचताना तर थक्कच व्हायला होते. इतक्या लहान मुलाला सोबत घॆऊन जंगलात राह्यचे हे सुध्दा आपल्या सारख्यांना किती कठीण वाटते मग अशा कोणत्या प्रेरणांमुळे असे साहस करावेसे वाटते हे कळत नाही. पुढचा लेख ‘हरिण पारधी’ नावाचा असून तो फर्ले मोवॅट बद्दल आहे. त्याने उत्तरध्रुवाकडील ओसाड प्रदेशात केलेला प्रवास ही एक अदभूत वाटावी अशी कथा आहे. मूळ पुस्तक 1952 मधले आहे. 1935 मध्ये फर्ले जेव्हा पंधरा वर्षांचा होता तेव्हा आपल्या काका बरोबर त्याने आर्क्टिकचा पहिला प्रवास केला होता. तेव्हा त्याने रेल्वेने जाताना अर्धामैल रुंदी असलेला आणि सुमारे तासभर संथ गतीने रेल्वे रूळ ओलांडून पलिकडे जाणारा कॅरिबू हरिणांचा कळप पाहिला. त्याची आठवण त्याच्या मनातून कधीच पुसली गेली नाही. पण त्यानंतर 1946 मध्ये सक्तीने सैनिक म्हणून महायुध्दात सामिल व्हावे लागले, त्यामध्ये भयंकर संहार पाहिल्यावर युध्द संपल्यावर आता कुठेतरी शांत ठिकाणी जावे म्हणून तो परत 1947 मध्ये अगदी जुजबी तयारी करून हडसन बे च्या किनार्‍यावरच्या चर्चील बंदरावर रेल्वेने गेला. नंतर तिथून तो बॅरन्स येथे संशोधनासाठी गेला. अत्यंत प्रतिकूल परिस्थित तो तिथे काही काळ राहून एस्किमो लोकांचा इतिहास शिकला,त्यांची भाषा शिकला, त्यांच्या देवदेवता त्यांच्या ष्रध्दा , सुख-दुःख, त्यांच्या समस्या याबद्दल त्याने आपल्या पुस्तकात अतिशय प्रभावी वर्णन केले आहे. ते पुस्तक म्हणजे The country of the people of the deer. पुस्तकाविषयी माडगूळकरांनी अतिशय रसाळ भाषेत, प्रेमाने लिहिले आहे. खरंतर यावर आपण ही ते मूळ पुस्तकच वाचलं पाहिजे अगदीच शक्य नसेल तर निदान व्यंकटेश माडगूळकारांनी सविस्तरपणे करून दिलेला हा परिचय तरी वाचलाच पाहिजे. ह्याच फर्ले मोवॅट बद्दल अजून दोन दिवसांनी आपण परत वाचणार आहोत. ‘हत्तींच्या कळपात’ ह्या लेखात ओरिया या विलक्षण तरूणीची कहाणी आहे. ती आफ्रिकेतील जंगली हत्तींच्या कळपात चार-पाच वर्षे राहिली. टांझानियातील मन्यारा नॅशनल पार्कमध्ये जिथे 450 हत्ती, सिंह, मस्तवाल रानरेडे, म्हशी होत्या विषारी सर्प होते अशा ठिकाणी राहिली तिथेच जोडीदार मिळाला, ती आईही झाली. ह्या सगळ्या जगावेगळ्या अनुभवांचे चित्रण तिने आपल्या वाचकांसाठी केले आहे. तिचे अनुभव वाचता वाचताना आपल्या तोंडाचा विस्फारलेला ‘आ’ खरोखरच मिटत नाही. कशी ही जगावेगळी माणसे असतील!! दोन तीन महिन्याच्या लहान बाळाला पाठीला बांधून हिंडणारी, अनेक प्राणी सहजपणे पाळणारी, हत्तींबद्दल अतिशय प्रेम असणारी, त्यांच्यांशी मैत्री करणारी अशी तिची विलक्षण रुपे म्हणजे थक्क करणारी आहेत. हे जोडपे तिथे पाच वर्षे हत्ती सोबत राहिले. हत्तींचा सखॊल अभ्यास केला, शंभरहून अधिक हत्तींशी मैत्री केली. अनेक चित्तथरारक अनुभवांना सामोरे गेले. वाचताना तो थरार आपल्याला केवळ शब्दांतून ही जाणवतो. जिम कॉर्बेट् या धाडशी शिकार्‍यावर माडगूळकरांनी लिहिलेला लेख तर अप्रतिम आहे. जिम कॉर्बेट् च्या पुस्तकातून म्हणजे मॅन इटर्स ऑफ कुमाऊं, मॅन इटींग लेपर्ड ऑफ रुद्रप्रयाग, माय इंडीया अशा अनेक पुस्तकातून आपल्याला त्याचा परिचय तर झालेला आहेच. जिम कॉर्बेट् हा निष्णात शिकारी असूनही सहृदय होता. शेवटपर्यंत तो एकटाच राहिला, तो कधीच पोशाखी बनला नाही, तो अक्षरशः आदिवासींसारखेच आयुष्य जगला. अतिशय काटक असलेला जिम निरिक्षण करण्यात निष्णात होता, तो जंगलात असताना कोणत्याही डबक्यातील पाणी न शंका बाळगता पीत असे. लेखक म्हणून जागतिक कीर्ती मिळवून दिलेली त्याची पुस्तके त्याने केवळ स्मरणावर लिहिली आहेत. त्याने कधीच त्याच्यासाठी डायरी ठेवून त्याच्या नोंदी केल्या नाहीत. आपल्या हयातीत त्याने एकूण पंचेचाळीस नरभक्षक वाघ मारल्याची नोंद आहे. कुमाऊ आणि गढवाल इथल्य़ा लाखो लोकांची त्याने मरणाच्या भयानक भीतीपासून सुटका केली. पण असे असले तरी जंगलाला आग लावणे, पाण्यावर बसून शिकार करणे, कारण नसताना जनावर मारणे या गोष्टीचा त्याला अतिशय राग होता. तो शिकारी असला तरीही निसर्गाचा समतोल बिघडणार नाही इतकीच शिकार करणारा, नियम पाळणारा शिकारी होता. शाळा, कॉलेज, हॉस्पिटल अशा ठिकाणी तो जंगलावर व्याख्याने देत असे. त्यामध्ये तो जंगलातील जनावरे कोणता आवाज काढून एकमेकांशी बोलतात, वाघ उठला की पाखरं कसे इशारे देतात ह्याचे प्रात्यक्षिक तो दाखवे. वाघ झाडाझुडूपात दिसेनासा होताना त्याचे आवाज कसे बदलत जातात हे तो दाखवत असे. पण व्याख्यानाच्या शॆवटी वने, आणि त्यातील जीव यांचा संभाळ करणे आपल्या सगळ्याच्या हिताचे आहे हे तो आवर्जून सांगत असे. तराईतील प्राण्यांची, पक्ष्यांची छायाचित्रे त्याने काढली आहेत. तोंडाने आवाज काढून वाघाला जवळ बोलावायचे विलक्षण कसब त्याच्याकडॆ होते. 1955 मध्ये प्रसिध्द झालेले ‘ट्री टॉप्स’ हे त्याचे शेवटचे पुस्तक. पुस्तकाच्या शेवटी पक्षीतज्ञ डॉ. सलीम अली आणि मारूती चितमपल्ली यांच्या वरचे दोन छोटे लेख आहेत. सगळेच लेख आपल्याला भारावून टाकणारे. कोणत्या मूशीतून अशी माणसे जन्माला येत असतील. अशी कोणती प्रेरणा असेल की ज्यामुळे ती असे आपल्या दृष्टीने वेडे साहस करायला धजत असतात, आपल्या सारख्यांना हे कळणं ही कठीण आहे आणि जरी कळले तरी आपली रोजची रुळलेली वाट सोडून आपण अशा अनवट वाटांवर जायला तयार तरी होऊ का? असे अनेक प्रश्न आपल्या मनात नक्कीच तयार होतात हीच त्या पुस्तकाची ताकद आहे असे मला वाटते. ...Read more

MAHASAMRAT ZANZAVAT
MAHASAMRAT ZANZAVAT by VISHWAS PATIL Rating Star
वाचक

🚩शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा🚩 महासम्राट या सिरीज मधील खंड पहिला झंजावात आज वाचून पूर्ण झाला. विश्वास पाटील यांचे संभाजी वाचले होते तेव्हा मला वाटून गेले होते की याच लेखकांनी शिवरायांबद्दल पण लिहिले पाहिजे. मध्यंतरी ही जेव्हा बातमी कळली तव्हा खूप आनंद झाला. छत्रपती शिवरायांवरील अशा मालिकेची मराठीत नितांत आवश्यकता होतीच. पुस्तक सुरू होते ते थोरले महाराज शहाजीराजे यांच्या घोडदौडीपासून. अधे-मध्ये भोसले परिवाराचा इतिहास सुद्धा अनुभवायला मिळतो. दख्खन मध्ये वावरत असणाऱ्या जुलमी परकीय सत्ता त्यांनी ,माजवलेला हल्लकल्लोळ शहाजी महाराज यांची धावपळ येणारे कठीण प्रसंग यानंतर वाचक प्रवेश करतो तो छत्रपती शिवरायांच्या आयुष्यात. प्रतिकूल परिस्थितीत झालेला जन्म बंगलोर मधील दिवस पुण्यातील दिवस स्वराज्य स्थापना लोकप्रशासन. उत्तम करव्यवस्था सैनिकांचे प्रशिक्षण या बाबी हायलाईट केलेल्या आहेतच शिवाय पाठ्यपुस्तकातून वगळलेले अनेक प्रसंग संदर्भ या पुस्तकात वाचायला मिळतात पुरंदर बद्दलचे वेगळे संदर्भ त्यांचे महत्त्व जावळीचे प्रकरण आणि पुस्तकाचा शेवट होतो तो अफजलखानाचा वध या प्रकरणाशी. यानंतर आता याच सिरीजचा दुसरा खंड Rankhaindal वाचणार आहे. ऐतिहासिक पात्रे त्यांचे वर्णन आजूबाजूचा परिसर आणि घटना लेखकांनी जिवंत केल्या आहेत. त्यामुळे इतिहासाचा रियल आस्वाद घ्यायची संधी मिळते ...Read more