* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: INFIDEL MY LIFE
  • Availability : Available
  • Translators : NEELA CHANDORKAR
  • ISBN : 9788184982510
  • Edition : 1
  • Publishing Year : JUNE 2011
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 470
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
  • Available in Combos :NEELA CHANDORKAR COMBO SET - 11 BOOKS
  • Discount : OCTOBER EXHIBITION 2026(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Print Books:
THE ASTONISHING AND BESTSELLING LIFE STORY OF THE RENOWNED CAMPAIGNER FOR RELIGIOUS TOLERANCE AND WOMEN`S RIGHTS, AYAAN HIRSI ALI.
आयान हिरसी अली– एक झुंझार वृत्तीची इस्लामधर्मीय स्त्री... आईवडिलांकडून झुंजार वृत्तीचं बाळकडू मिळालेली आयान वडिलांच्या पसंतीच्या तरूणाशी लग्न करायला नकार देते. तिच्या अनुपस्थितीत झालेल्या निकाहला ती जिवाच्या आकांतानं विरोध करते तो हॉलंडमधील निर्वासितांच्या छावणीत. मुस्लिमांच्या धर्मपंचायतीसमोर ती धीटपणे सांगते, ‘‘मला हा निकाह मंजूर नाही. कारण माझे मन तो मान्य करत नाही.’’ या तिच्या निर्भीड जबाबाला धर्ममार्तंड थोर मनानं स्वीकारतात आणि तिला या बेडीतून मुक्तता मिळते... हॉलंडमध्ये राज्यशास्त्र विषयातील पदव्युत्तर शिक्षणानंतर तेथील नागरिकत्व... आयानचा निवडणुकीच्या रिंगणातून प्रवेश. तिच्या दुर्दैवानं तिच्या राजकीय अस्तित्वालाच धोका निर्माण होतो आणि नागरिकत्वही रद्द होण्याची भीती समोर ठाकते... त्यातून सहीसलामत सुटका झाल्यानंतर आता आयाननं अमेरिकेत राहाण्याचा निर्णय घेतला आहे... परंपरावादी इस्लामनं स्त्रीच्या तनमनावर आणि स्वातंत्र्यावर ज्या बेड्या ठोकल्या आहेत त्या तोडण्यासाठी प्राणपणानं लढणाऱ्या आधुनिक लढवय्या स्त्रीची कहाणी म्हणजेच इन्फीडेल. तिनं अशा धर्माचा त्याग केला जो तिच्या समाजातील पन्नास टक्के लोकांना कुठलंही स्वातंत्र्य देऊ इच्छित नाही... त्या झुंजार स्त्रीला जाणून घेण्यासाठी प्रत्येक स्त्रीनं हे पुस्तक वाचायलाच हवं...

No Records Found
No Records Found
Keywords
Customer Reviews
  • Rating StarSwati Joshi

    आयान हिरसी अली या मुस्लिम मुलीचे हे मनोगत. सोमालियात परंपरावादी मुस्लीम कुटुंबात जन्मलेली ही मुलगी. अफ्रिकन देशांमधल्या अंतर्गत यादवीमुळे अनेक देश फिरावे लागलेली. अघोरी FGM सारख्या अन्यायी प्रथेला सामोरे जावे लागलेली. धर्माच्या असाधारण पगड्यमुळे सच्ची मुसलमान होण्यासाठी आधी दिवसातून पाच वेळा नमाज न् नकाब आपणहून अंगीकारून धर्मावर विलक्षण प्रेम करणारी. पण हळूहळू स्त्रियांवरचा जुलूम, त्यांना सतत दिली जाणारी दुय्यम आणि अपमानास्पद वागणूक, फक्त त्यांच्यावर लादल्या जाणाऱ्या जाचक अटी आणि अपमानास्पद नियम, अन्याय, आणि दुसरीकडे त्याच धर्मातल्या पुरूषांची बेजबाबदार आणि अहंकारी वृत्ती, त्यांना अनेक पत्नी करायची मुभा असल्याने स्त्रिया आणि मुलांचे होणारे हाल, पुरुषांच्या मनमानी बेबंद आणि दुटप्पी वागणुकीला मिळणारे धर्माचे अधिष्ठान यांमुळे आलेल्या विविध अनुभवांमुळे ती चिंतन करू लागली. आधी तर ती आपलंच काही चुकलं असेल असं वाटून अधिकाधिक कट्टर धार्मिक होण्याचा प्रयत्न करत गेली. पण तिला हळूहळू विषमता आणि अन्याय अधिकाधिक बोचत राहिला. सुरूवातीला तिने मतं मांडायचा प्रयत्न केला, मग विरोध करू लागली न् मग मात्र हळूहळू चक्क बंड करून ऊठली. जीवावर उदार होऊन ती धर्माची शिकवण आणि धर्ममार्तंडांचं प्रत्यक्षातलं वागणं त्यातल्या विसंगतीवर बोट ठेवू लागली. जगातल्या बहुतांश दहशतवादी कारवायांमधला मुस्लीम सहभाग पाहून ती व्यथित झाली. बहुतांश मुस्लिमबहुल देश हे गुन्हेगारीत फसलेले आणि अंतर्गत यादवीने गांजलेले आहेत हे बहुमोल निरीक्षण ती नोंदवते. कायमच राजकीय अस्थैर्य असल्याने हे देश प्रगती करू शकत नाहीत याबद्दल ती खंतावते. विचारस्वातंत्र्य नाकारणारा, सतत कुणावर तरी दोषारोप करत द्वेष शिकवणारा, हत्येला प्रोत्साहन देणारा, अनेक विवाह व जास्त मुले यांमुळे दारिद्र्य, बेरोजगारी व गुन्हेगारी यांच्या दलदलीत फसणारा धर्म अखेर तिने चक्क झुगारून दिला. (तिचे हे धर्मविरोधी बंड सहन न झाल्याने साहजिकच तिला मारण्याचा फतवा निघाला. तिने युरोपियन देशात आश्रय घेतला. पण दुर्दैवाने अखेर तिची हत्या झाली.) या पुस्तकात तिचे बारीक निरीक्षण आणि त्यावर आधारित सखोल चिंतन आहे. यातली अनेक वाक्ये आणि तिचे चिंतन आपल्यालाही विचार करायला लावतात. तिच्या देशात आधी नकाब आणि हिजाब आजिबात सक्तीचे नव्हते. मुली आणि स्त्रिया मोकळेपणाने हिंडायच्या. पण मूलतत्त्ववादी पगडा वाढू लागल्यावर मात्र ही सक्ती अमलात आली. त्याबद्दल तिच्या एका भावाने प्रामाणिकपणे आपले विचार मांडताना सांगितलं की, "स्त्रीची मान हा काही फार लक्ष वेधून घेणारा अवयव आहे असं मला पूर्वी कधीच वाटलं नव्हतं. मी लहानपणापासून माझी आई, काकू, आत्या, बहिणी यांना मोकळ्या डोक्याने वावरताना पहात आलो. पण कॉलेजमधे गेल्यावर मात्र कट्टरतावादाने आपले पाय रोवायला सुरूवात केली आणि काही वर्षातच हिजाब सक्तीचा झाला. आता मोकळ्या केसांची किंवा ऊघड्या मानेची एकही मुलगी अथवा स्त्री दिसणे मुश्कील. पण त्याचा परिणाम असा झाला की चुकून एखादीची चुकार बट भुरभुरु लागली की माझे हृदयाचे ठोके वाढायला लागले आणि चुकून वाऱ्याने कुणाचा हिजाब सरकून जराशी मान जरी दिसली तरी माझा श्वास अनियमित होऊ लागला. आता मला नकळत चाळाच लागला अशी मान पहायचा. मी अगदी निरखून निरखून पाहू लागलो. प्रत्यक्षात मात्र अशी मान दिसली की ती स्त्री कितीही वयाची असो. तिच्यावर रागावून वसकन् ओरडायची संधी मात्र मी सोडत नाही. मी असा ओरडलो की वाईट न वाटता उलट मला माझ्याच अपराधाचं परिमार्जन झाल्यासारखं वाटतं. " अशा रितीने या कडक नियमांचा होणारा ऊलटाच परिणाम, वागण्यातली विसंगती, स्त्री-पुरुषांच्या मधल्या सहजीवनात नैसर्गिक प्रेमाचा अभाव, त्यामुळे पुरूषांच्याही मानसिकतेत वाढत जाणारी अस्वस्थता आणि या सर्वांचा एकूणच समाजावर पडणारा वाईट प्रभाव याचं फार सुंदर चित्रण या पुस्तकात आहे. या झुंजार स्त्रीचा लढा आणि धर्माच्या बाबतीतले तपशीलवार चिंतन जाणून घेण्यासाठी प्रत्येकाने वाचायलाच हवे असे पुस्तक. *स्वाती प्रताप जोशी* ...Read more

  • Rating StarKalpana Mahadik

    पुस्तक अतिशय सुंदर आहे. नक्की. वाचा.

  • Rating StarShrinivas Ranjanikar

    एका कर्मठ आणि सनातनी देशातील संघर्ष करणाऱ्या स्त्री ची कथा,नक्की वाचा सकारात्मक आत्मकथा...

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
मिना हरीश सहारे, नागपूर.

कुठल्याही पुस्तकावर अभिप्राय देण्याची माझी ही पहिलीच वेळ असली तरी `दुर्दम्य` पुस्तक मनाला भिडल्यामुळे त्यावर लिहीणे मला आवश्यक वाटले. मी पण चरित्रनायक एकनाथनच्या विभागात सेवा दिली आहे. आमच्या सारख्यांना एकनाथन एक कडक तानाशाह ऑफिसर होता इतकंच माित होतं. पण लेखकाच्या नजरेतून जेव्हा त्याचे चरित्र वाचले तेव्हा तो खरा काय होता हे समजले. चरित्र वाचताना पूर्ण होई पर्यंत उत्सुकता कायम होती. कार्यालयीन जीवनातला कालखंड डोळ्यासमोर जिवंत होतो. वाचकाला खिळवून ठेवण्याचं कसब लेखकाच्या लिखाणात आहे.एकनाथन सारख्या विक्षिप्त, हेकेखोर व्यक्तीचा व लेखकाचा नक्कीच काहीतरी ऋणानुबंध असला पाहिजे. निवृती नंतरफिरून तीनदा लेखकाच्याच शहरात येणे हा योगायोग वाटत नाही. कथानकातील काही भागातील प्रसंग व घटना मजेशीर, गमतीदार वाटतात. कथेचा शेवट मनाला भिडून जातो. एका करारी, खंबीर माणसाचा अंत वाचताना मन भरून आले. पुस्तक पूर्ण केल्यावर शेवटी एक विचार आला की त्याचं मरण सुखदच झाले असे म्हणावे लागेल कारण एकाकीपणा जरी त्यांनी स्वतः निवडला होता तरी मृत्यूच्या बाबतीत भाग्याने त्यांची साथ दिली होती. त्यांच्या सारखे ताठ कणा व दुर्दम्य व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तिला परावलंबी, असहाय आयुष्य कधीच रूचलं नसतं आणि त्या नंतर आलेल्या करोना काळात त्यांचे काय हाल झाले असते त्याची कल्पनाच न केलेली बरी. कथानक वाचकाच्या मनाला भिडले यातच लेखकाचे यश आहे. पुढील लिखाणा करता शुभेच्छा. बाकी माझ्याकडून पुस्तकाचा दर्जा - खूप छान, बढिया आणि सुपर्ब... ...Read more

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
अनिल सहजे, नाशिक.

`कुलामामाच्या देशात’ हे पुस्तक म्हणजे जंगलातील अनुभवकथांचा एक विलक्षण रम्य प्रवास आहे. रवींद्र वानखडे यांच्या वनाधिकारी म्हणूनच्या प्रत्यक्ष अनुभवातून या कथा जन्माला येतात. प्रत्यक्षात घडलेल्या या कथा इतक्या रंगतदार आहेत की त्या काल्पनिक वाटाव्यात, अी त्यांची गंमत आहे. वानखडे यांच्या अनुभवांमधील कथाबीज अचूकपणे हेरून जी. बी. देशमुख यांनी त्यांना आपल्या रसाळ आणि खुमासदार शैलीत शब्दरूप दिले आहे. देशमुखांची शैली इतकी प्रवाही आणि ओघवती आहे की वाचक कथांमध्ये अक्षरशः गुंगून जातो. एकदा पुस्तक हातात घेतल्यानंतर ते पूर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेवावेसे वाटत नाही. वन हे सामान्य माणसासाठी तसे अपरिचितच क्षेत्र. जंगलातील जीवन, तेथील नियम-कायदे आणि जंगली श्वापदांचे विश्व याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. वानखडे-देशमुख द्वयी केवळ या अनोख्या जगाची ओळख करून देत नाहीत, तर त्याविषयी वाचकाच्या मनात विलक्षण कुतूहलही निर्माण करतात. ‘खुश रहेना मेरे यार’ आणि ‘महाकाय आकांत’ या दोन क्रमशः कथा तर विशेषतः चटका लावून जातात. त्या केवळ थरारक आणि अविश्वसनीय वाटाव्या अशा अनुभवांनी भारलेल्या नाहीत, तर जंगली श्वापदांची एक हळवी, माणुसकीच्या जवळ जाणारी बाजूही त्या प्रभावीपणे उलगडून दाखवतात. जी. बी. देशमुखांची खुमासदार, मिश्कील आणि रसाळ लेखनशैली वाचकाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत गुंतवून ठेवते. रवींद्र वानखडे यांच्या प्रत्यक्ष अनुभवांची सत्यता आणि देशमुखांच्या कथनकौशल्याचा सुंदर मिलाफ ‘कुलामामाच्या देशात’ घडवतो. हे पुस्तक केवळ जंगलातील अनुभवकथांचे संकलन राहत नाही, ते वाचकाला जंगलाच्या एका अनोख्या, रोमांचक आणि हळुवार विश्वाची सफर घडवते आणि नकळत सांगून जाते, ‘वनस्य कथा रम्यः!’ ...Read more