* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: INSIDE THE GAS CHAMBERS-EIGHT MONTHS IN THE SONDERKOMMANDO OF AUSCHWITZ
  • Availability : Available
  • Translators : SUNITI KANE
  • ISBN : 9788184981940
  • Edition : 3
  • Publishing Year : JANUARY 2011
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 192
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS IS A UNIQUE, EYE-WITNESS ACCOUNT OF EVERYDAY LIFE RIGHT AT THE HEART OF THE NAZI EXTERMINATION MACHINE. SHLOMO VENEZIA WAS BORN INTO A POOR JEWISH-ITALIAN COMMUNITY LIVING IN THESSALONIKI, GREECE. AT FIRST, THE OCCUPYING ITALIANS PROTECTED HIS FAMILY; BUT WHEN THE GERMANS INVADED, THE VENEZIAS WERE DEPORTED TO AUSCHWITZ.
श्लोमो व्हेनेत्सिया हे सालोनिका येथील इटालियन ज्यू समाजातील. वयाच्या २१व्या वर्षी त्यांची ऑश्विट्झ-बिर्केनॉ या छळछावणीत रवानगी झाली आणि तेथील झाँडरकमांडो या नावाने ओळखल्या जाणा-या गटात त्यांना घालण्यात आले. तेथून ज्या काही मोजक्या लोकांनी आपली सुटका करून घेतली त्यापैकी ते एक आहेत. एस.एस. या जर्मन पोलीस दलाने गॅस चेंबर्स साफ करण्यासाठी व त्या चेंबर्समध्ये मारल्या जाणा-या माणसांचे मृतदेह जाळण्याकरता या ‘खास गटा’ची स्थापना केली होती.

No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #INSIDETHEGASCHAMBER #INSIDETHEGASCHAMBER #इनसाइडदगॅसचेंबर्स #BIOGRAPHY #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SUNITIKANE #सुनीतिकाणे #SHLOMOVENEZIA "
Customer Reviews
  • Rating StarAnil Udgirkar

    मी ते वाचलेले आहे ,फारच जबरदस्त

  • Rating StarSuhas Birhade

    नरकात जगलेला माणूस.. `इनसाईड द गॅस चेंबर्स` दुस-या महायुध्दाच्या काळात नाझींनी ज्यू लोकांच्या अमानुष कत्तली केल्या. त्यांना गॅस चेंबर्स मध्ये कोंडून मारण्यात आलं. लाखो ज्यू लोकांची अशाप्रकारे कत्तल करण्यात आली. गॅस चेंबर मध्ये तडफडून मरणा-या याप्रेतांना भट्टीत टाकून जाळण्यात आलं. अनेकदा जिवंत भट्टीत टाकले जात असे. हे काम देखील ज्यू लोकांकडून करून घेण्यात येई आणि नंतर त्यांना देखील ठार मारलं जात असे. त्यापैकी जे मूठभर लोकं जिवंत वाचले त्यापैकी सुदैवाने वाचलेला श्लोमो वेत्सानिया हा एक ज्यू तरुण. त्याने अनुभव कथन केलेल्या गॅस चेंबरचं वर्णन असलेलं हे पुस्तक. ``इनसाईट द गॅस चेंबर``... नरक म्हणजे काय असतो तो आपल्यासमोर येतं. लहान मुले, स्त्रिया, वृध्द महिला यांना ज्यावेळी आणलं जात होतं. तेव्हा त्यांचे कपडे काढून या गॅस चेंबर मध्ये पाठविण्यात येई. हे गॅस चेंबर्स कसे होतं, मृत्यूला सामोरे जाणाऱ्या लोकांच्या भावना काय होत्या हे सारं श्लोमो यांनी सांगितलं आहे. श्लोमो आणि त्याच्या कुटुंबाला ग्रीस मधून हद्दपार केल्यानंतर बिर्केनो येथील छळछावणीत आणण्यात आले. त्याची आई आणि दोन लहान बहिणी कधीच दिसल्या नाहीत. श्लोमोला `झॉंडरकमांडो` म्हणून ज्यू लोकांना गॅस भट्टीत टाकण्याचं, नंतर प्रेतांची विल्हेवाट लावण्याचं काम देण्यात आलं. हा नरकच होता. त्याचे वर्णन श्लोमो सांगत असताना अंगावर काटा येतो. आपल्याला मरणासाठी गॅस चेंबर मध्ये नेले जात आहे, हे समजल्यावर भयभीत झालेले, लहान मुलांना पोटाशी कवटाळणाऱ्या आया, रडणारे बालके, त्यांना गोळ्या घालणारे, विकृत छळ कऱणारे जर्मन, एक लहान बाळ गॅस चेंबर्स मधून जिवंत बाहेर पडतो कारण तो आईचं दूध पित असतो. ते पाहून संतापलेला जर्मन त्या बालकाला लागलीच गोळ्या घालतो.....सारंच भेसूर, सुन्न करणारं. पुस्तक सलग वाचता येत नाही. हात थरथरतात, छाती धडधडते. सैतानाही लाजवेल असे कृत्य पाहून संवेदना बधीर होतात. या विषयाकडे वळायचं असेल तर नाझी, ज्यू लोकांचा छळ याची पार्श्वभूमी माहिती असणं आवश्यक आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK AIKYA 1-5-2011

    ‘इनसाइड द गॅस चेंबर्स’ हे पुस्तक कोणाही वाचकाला अस्वस्थ करणारे आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिटलरने छळछावण्यांतून आणि गॅस चेंबर्समधून साठ लाख ज्यू लोकांना हालहाल करून अत्यंत क्रूरपणे ठार मारले हे सर्वांनाच माहीत आहे. त्यासंबंधी नवनवे तपशील गेल्य पन्नास साठ वर्षात उघड झाले आहेत आणि या होलोकास्टचे हत्याकांडाचे भीषण अमानुष स्वरुप जगापुढे उभे राहिले आहे. ‘शिंडलर्स लिस्ट’ या १९८३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या कादंबरीत ऑस्कर शिंडलर या जर्मन माणसाने पोलंडमधील क्रकोव्ह या गावात कारखाना काढून स्वस्तात मजूर मिळतात म्हणून ज्यू मजूरांचा वापर करायला सुरुवात केली. जर्मन सरकारचा कारखान्यांना स्वस्त मजूर पुरवण्यामागचा अंत:स्थ हेतू लक्षात आल्यावर ज्यूंना छळछावण्यांपासून वाचविण्याचे केंद्र म्हणून आपल्या कारखान्याचा वापर करून बाराशेवर ज्यूंचे प्राण वाचवले. थॉमस केनेली या लेखकाला लॉस एंजेलिस येथील एका प्रवासी सामानाच्या दुकानाचा मालक पेफरबर्ग भेटला. तो शिंडलरने वाचवलेल्या ज्यूंपैकी एक होता. त्याने शिंडलरच्या ‘ज्यू बचाव’ मोहिमेची माहिती दिली. केनेलीला शिंडलरने वाचवलेल्या आपल्या काही मित्रांचे पत्ते दिले. त्यावरून केनेलीने लिहिलेल्या ‘शिंडलर्स लिस्ट’ ला बुकर प्राइझ मिळाले. १९९४ मध्ये या कादंबरीवर चित्रपट निघाला. त्याला ऑस्कर मिळाले. एका सज्जन जर्मन माणसाची ही कामगिरी दुसऱ्या महायुद्धानंतर चाळीस-पन्नास वर्षांनी जगाला कळली, त्याचप्रमाणे ऑश्वित्झ येथील छळछावणीत हजारो ज्यूंना गॅस चेंबरमध्ये ठार मारून नंतर विद्युतदाहिनीत त्यांना जाळून भस्म करण्याच्या कामात गुंतलेल्या झांडरकमांडो या खास गटातील सालोनिका येथील इटालियन ज्यू समाजातील श्लोमो व्हेनेत्सिया या तरुणाने त्या छावणीतून सुटका करून घेऊन, युद्ध संपल्यावर नव्याने आयुष्याची घडी बसवली. साठ वर्षानंतर जीव माउटपा या पत्रकाराने त्याच्याशी संपर्क साधून दीड महिन्यात अनेक तास त्याच्या बरोबर घालवून, त्याच्या आठवणी टेप करून घेतल्या. त्या प्रश्नोत्तरांवरून श्लोमोच्या बालपणापासून ते छळछावणीतील ज्यूंचा हत्याकांडाच्या कार्यपद्धतीचा उलगडा होतो. त्या प्रश्नोत्तरांवरून तयार झालेले ‘इनसाइड द गॅस चेंबर्स ’ हे पुस्तक गॅस चेंबरमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीने लिहिलेले एकमेव पुस्तक आहे. मराठीत त्याचा अनुवाद होणे ही निश्चितच महत्त्वाची घटना मानायला हवी. श्लोमो हा ऑश्वित्झ येथील छळछावणीत आठ महिने होता. तो झोंडरकमांडो या तुकडीत होता. या तुकडीचे काम होते गॅसचेंबरमधील प्रेते विद्युतदाहिनीत नेऊन त्यांचे दहन करणे. त्याची आई, आईचे भाऊ, त्यांच्या बायका, मुले हे सर्व या हत्याकांडात मारले गेले. फक्त एक भाऊ, एक बहीण एवढेच वाचले. गॅसचेंबरमध्ये लोकांना विवस्त्र करून कोंबणे, ते मृत पावल्यावर त्यांची प्रेते वाहून नेणे, ती विद्युतदाहिनीत लोटणे हा रोजचा क्रम. सतत मृतदेहांचे सान्निध्य. त्याचे सावट मनावरून जात नाही. सर्वसाधारण आयुष्य जगणे त्याला शक्य होत नाही. ‘सारं काही छान होतं असं समजून इतरांप्रमाणे निष्काळजी, निर्भर, मोकळे आयुष्य जगायचे भाग्य आपल्या वाट्याला आलेच नाही’ असे त्याला वाटते. आपले प्राण वाचवण्यासाठी स्वत: ज्यू असून आपण ज्यू स्त्री पुरुषांना गॅस चेंबरमध्ये कोंबून मृत्यूच्या हवाली करत होतो आणि त्यांचे थंडगार मृतदेह, दुर्गंधी सुटलेले मृतदेह आपल्या हाताने विद्युतदाहिनीत लोटत होतो. या जबरदस्तीपुढे आपण हतबल होतो... याबद्दल त्याच्या मनात अपराधभावना आहे. अजूनही आपण खऱ्या अर्थाने क्रिमेटोतिरयममधून बाहेर आलो नाही अशी भावना श्लोमोला भेडसावत असते. रेल्वे स्टेशनवर उतरलेल्या युद्ध कैद्यांना जवळच्या लाकडी इमारतीत नेऊन नग्न केले जाई आणि गॅस चेंबरमध्ये नेऊन ठार मारले जाई. ज्यूंना मारण्यासाठी ज्यू मजुरांचीच नेमणूक करण्यात येई. या मजुरांनाही नंतर खलास केले जाई. विद्युत भट्टीत प्रेते जाळण्यात येत. ज्यू युद्ध कैदी मोठ्या प्रमाणावर येत. त्यापैकी काहींना जवळच्या जर्मन कारखान्यात कामगार म्हणून नेमण्यात येई. या कैद्यांना त्या परिसरातील कारखाने मजूर म्हणून काम देत. नव्वद बाय एकवीस फूट अशा एका गॅस चेंबरमध्ये १५०० कैदी कोंबले जात. गॅस चेंबरच्या छताला चार झडपा असत. त्यावर सिमेंटचे जड झाकण. दर कत्तलीनंतर भिंतींना नव्याने चुना फासला जाई. छतावरच्या झडपांमधून सोडलेल्या धातूंच्या तारांच्या नळकांड्यातून झायक्लॉन बी वायू (सायनहाड्रिक अ‍ॅसिड) सोडण्यात येई. त्याच्या स्फटिकांचा हवेशी संयोग झाला की विषारी वायू निघे. दर कत्तलीनंतर चेंबरची झटपट सफाई केली जाई. त्यानंतर झांडर कमांडो पथके प्रेते हलवू लागत. प्रेतांचे केस, सोन्याचे दात वगैरे काढून त्यांना लिफ्टने तळमजल्यावरील भट्टीकडे पाठवले जाई. १९४५ जानेवारी नंतर हा कॅम्प रिकामा करून ५८ हजार कैद्यांना येथून जर्मनीत व अन्यत्र धाडण्यात आले. कत्तलीचे नावनिशाणही राहू नये म्हणून इमारती पाडण्यात आल्या. अगदी आजारी जराजर्जर अशा ९ हजार कैद्यांना ऑश्वित्झ कॅम्पातच ठेवले गेले. त्यापैकी ७०० लोकांना पहारेकरयांनी ठार मारून टाकले. ऑश्वित्झच्या आणि बिर्केनाच्या परिसराचे रुप युद्धातील जर्मनीच्या पराभवाच्या शक्यतेबरोबर बदलण्याचा घाट घातला गेला. आपल्या अमानुष क्रौर्याचे पुरावे नष्ट करण्याबाबत जर्मनीचे नेते फार सावध होते. काही देह लालभडक दिसत, काही फिकुटलेले दिसत. कारण प्रत्येकाची प्रतिक्रिया वेगळी होत असे. पण त्या साऱ्यांनाच यातनामय मरण आलेलं असे. लोकांना बरेचदा वाटतं, की गॅस आत फेकला जाई आणि बस्स! माणसं मरत! पण तो कसला भीषण मृत्यू असे!.... एकमेकांना घट्ट पकडलेले देह आमच्या नजरेला पडत. प्रत्येकजण थोडीफार हवा मिळवण्याची अतीव धडपड करत असे. गॅस जमिनीवर ओतला जात असे आणि तो खालून अ‍ॅसिड पसरवत असे. त्यामुळे जरी त्यांना एकमेकांच्या अंगावर चढावं लागत असलं, तरी शेवटचं माणूस मरेपर्यंत प्रत्येकजण थोडीफार हवा मिळवण्याचा प्रयत्न करत राही. मी खात्रीनं म्हणू शकत नाही, पण मला वाटतं की अनेक लोक आत गॅस ओतला जाण्यापूर्वीच मरण पावत असत. त्यांना इतक्या दाटीवाटीनं आत कोंबलं जाई, की सर्वांत लहान आणि सर्वात अशक्त नक्कीच गुदमरून जात असणार. एका विवक्षित क्षणी त्या दडपणाखाली, त्या धास्तीपोटी माणूस स्वार्थी बनतो आणि तो फक्त एकाच गोष्टीचा विचार करतो स्वत:ला कसं वाचवायचं! गॅसचा असा परिणाम होत असे. आम्ही दरवाजा उघडल्यावर नजरेला पडणारं दृश्य भयानक असे, त्याची कुणी कल्पनाही करू शकणार नाही. जर्मन गार्ड या मरणासन्न माणसांचीही क्रूर चेष्टा करीत. दिव्यांची उघडमीट करून घाबरवत. गुदमरून माणसे मरावीत म्हणून गॅस चेंबरचे दिवे बंद करीत. प्रेतांचे तीनचार फूट उंचीचे ढीग लागत. भिंतीवर रक्ताचे डाग दिसत. व्हेंटिलेटर स्वच्छ करावा लागे. मृतांची काहीही खूण मागे राहू नये म्हणून प्रेतांची राखही भट्टीतून काढावी लागे. न जळलेली जाड हाडे बाहेर काढून त्यांचे चूर्ण करून राखेत मिसळावे लागे. ही राख नदीत टाकली जाई. गॅसने मारण्याची किंवा जाळण्याची प्रक्रिया २४ तास चालू राही. मृत्यूला सामोरे जायचे आहे, हे लक्षात आल्यावरही कोणाला काही करता येत नसे. काही माणसे अंगावरच कपडे किंवा अंतर्वस्त्रे काढायला आडकाठी घेत. सिक्रेट सर्विसची माणसे एकेकाच्या कवटीच्या ठिकऱ्या उडवत. मरणाऱ्या माणसाला जमिनीवर कोसळण्याआधी पकडून त्याचे डोके खाली करावे लागे. तसे न केले तर रक्ताचे कारंजे उसळत असे. सिक्रेट सर्विसच्या माणसाच्या अंगावर चुकूनही रक्त उडले तर तो झांडरकमांडोला गोळी घालायला कमी करत नसे. हे सर्व वाचताना आपल्या मनाची अवस्था सैरभैर व्हावी यात काही नवल नाही. हिटलरच्या क्रौर्याची ही झलक आजही अंगावर शहारे आणते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BACKSTAGE
BACKSTAGE by MONTEK SINGH AHLUWALIA Rating Star
महाराष्ट्र टाईम्स.. ६.९.२०२६

भारताच्या आर्थिक सुधारणांवर अनेक पुस्तके आजवर प्रसिद्ध झाली आहेत. काहींमध्ये आकडेवारीचे जंजाळ असते, काही धोरणांचे विश्लेषण करतात, तर काही विशिष्ट नेत्यांची जाहिरातबाजी करतात. मात्र माँटेकसिंग अहलुवालिया यांचे `बॅकस्टेज : भारताच्या उच्च वाढीच्या र्षांमागची कहाणी` हे पुस्तक या सगळ्यांपेक्षा वेगळे ठरते. कारण हे पुस्तक भारताच्या आर्थिक परिवर्तनाची कथा बाहेरून पाहणाऱ्या अभ्यासकाने नव्हे, तर त्या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी उभ्या असलेल्या व्यक्तीने सांगितलेली आहे. जी. बी. देशमुख यांनी मूळ इंग्रजी पुस्तकाचा केलेला मराठी अनुवाद सरस उतरला आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच माँटेकसिंग एक गोष्ट स्पष्ट करतात, ती म्हणजे, हे पुस्तक आत्मकथन नाही. आत्मप्रौढी मिरवण्यासाठी नव्हे, तर भारताच्या आर्थिक सुधारणांचा प्रवास समजावून सांगण्यासाठी अहलुवालिया हे पुस्तक लिहितात. विषयाच्या अनुषंगाने पुस्तकात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील संदर्भ येतात, पण ते आर्थिक आणि राजकीय घडामोडी समजावून सांगण्यापुरतेच. सिकंदराबादमधील मध्यमवर्गीय वातावरणातून सुरू झालेला त्यांचा प्रवास दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ऑक्सफर्ड, जागतिक बँक, अर्थ मंत्रालय, योजना आयोग आणि अखेर देशाच्या सर्वोच्च आर्थिक धोरणनिर्मितीच्या केंद्रापर्यंत पोहोचतो. हा प्रवास वाचताना स्वतंत्र भारताच्या आर्थिक विचारसरणीचा विकासक्रम उलगडत जातो. पुस्तकाचे केंद्रस्थान अर्थातच १९९१च्या आर्थिक संकटाचे आहे. त्यावेळी देशाकडे काही आठवड्यांच्या आयातीपुरताही डॉलर शिल्लक नव्हता. सोन्याचा साठा गहाण ठेवण्याची वेळ आली होती आणि आर्थिक दिवाळखोरीची शक्यता प्रत्यक्ष समोर उभी होती. अशावेळी सरकारने घेतलेले निर्णय, त्यामागील तणाव, राजकीय अनिश्चितता आणि प्रशासकीय संघर्ष यांचे वर्णन पुस्तकात अत्यंत जिवंतपणे आले आहे. नाणेनिधी किंवा जागतिक बँकेच्या दबावामुळे या सुधारणा झाल्याची धारणा माँटेकसिंग ठामपणे नाकारतात. हे पुस्तक आर्थिक सुधारणांना कोणत्याही प्रकारच्या विचारधारेच्या चष्म्यातून पाहत नाही. लेखक ना मुक्त बाजाराचे अंधसमर्थन करतात, ना राज्यनियंत्रित व्यवस्थेचे. त्यांचा दृष्टिकोन व्यवहारवादी आहे. भारतासारख्या लोकशाही देशात सुधारणा एका झटक्यात होत नाहीत; त्या राजकीय वास्तवाशी जुळवून घेत हळूहळू पुढे सरकतात, हे ते वारंवार. अधोरेखित करतात. पुस्तकात अनेक ठिकाणी `सुधारणा` हा आर्थिक नव्हे, तर राजकीय प्रक्रियेचाही विषय आहे, हे प्रकर्षाने जाणवते. अहलुवालिया या पुस्तकात अनेक व्यक्ती, अधिकारी, अर्थतज्ज्ञ आणि राजकीय नेत्यांच्या योगदानाचा उल्लेख करतात. नरसिंह राव, मनमोहन सिंग, पी. चिदंबरम, यशवंत सिन्हा, जसवंत सिंह यांच्यापासून ते विविध सनदी अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांची भूमिका ते प्रामाणिकपणे नोंदवतात. योजना आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम करताना अहलुवालिया यांनी जवळून अनुभवलेला काळ येथे उभा राहतो. सन २००४ ते २०११ या काळातील उच्च आर्थिक वाढ, दारिद्रयनिर्मूलनातील प्रगती, पायाभूत सुविधांमध्ये झालेली वाढ आणि ग्रामीण विकासाच्या कार्यक्रमांचे मूल्यमापन ते करतात. विशेषतः भारताने सलग अनेक वर्षे सात ते आठ टक्क्यांच्या दरम्यान वाढ नोंदवली, ती केवळ जागतिक परिस्थितीचा. परिणाम नव्हती; १९९० नंतरच्या सुधारणांनी घातलेल्या पायावर उभे राहून ती शक्य झाली, हा त्यांचा युक्तिवाद पटण्याजोगा वाटतो. मात्र पुस्तकाचे खरे सामर्थ्य यशोगाथेत नाही, तर आत्मपरीक्षणात आहे. यूपीए-२ दरम्यान निर्माण झालेली निर्णयप्रक्रियेतील अडचण, गुंतवणुकीतील वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक मंदी, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे निर्माण झालेले वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक थेट भाष्य करतात. अनुवादक जी. बी. देशमुख यांनी मूळ पुस्तकातील आर्थिक संकल्पना सहज आणि प्रवाही मराठीत मांडल्या आहेत. यात कृत्रिमता जाणवत नाही. आर्थिक विषयावरील पुस्तक असूनही भाषा जड वाटत नाही. आर्थिक सुधारणांच्या व्यापक सामाजिक परिणामांचा स्वतंत्र आणि सविस्तर ऊहापोह येथे अपेक्षेपेक्षा कमी आढळतो. मात्र, हे पुस्तक ज्या उद्देशाने लिहिले गेले आहे त्या उद्देशात ते अत्यंत यशस्वी ठरते. `बॅकस्टेज` हे केवळ पुस्तक नाही; ते भारताच्या आर्थिक परिवर्तनाचा प्रत्यक्षदर्शी दस्तऐवज आहे. १९९१ नंतर भारताने घेतलेल्या वळणाचा अर्थ समजून घ्यायचा असेल, उच्च वाढीच्या वर्षामागील वास्तविक कथा जाणून घ्यायची असेल आणि धोरणनिर्मितीच्या पडद्यामागे काय घडत असते याचा मागोवा घ्यायचा असेल, तर हे पुस्तक अभ्यासणे आवश्यक ठरते. भारतीय अर्थव्यवस्थेच्या आर्थिक सुधारणांचा इतिहास आणि त्यांचे परिणाम समजून घेण्यासाठी हे पुस्तक एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ म्हणून ओळखले जाऊ शकते. मराठीत उपलब्ध असलेला हा अनुवाद त्या दृष्टीने विशेष स्वागतार्ह आहे. ...Read more

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
Dinesh

This is a different planet. This is a different world. And this is a truly different book. I loved it. You should also buy it and read it. I’m sure you will love it too. Hachyukisunaski is a fantastic Book.