* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: WHEN I DIE
  • Availability : Available
  • Translators : DR. AJEY HARDIKAR
  • ISBN : 9789353171902
  • Edition : 1
  • Publishing Year : FEBRUARY 2019
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 144
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Print Books:
PHILIP GOULD WAS A VERY CLOSE FRIEND OF TONY BLAIR, THE EX-PRIME MINISTER OF ENGLAND. IN 2008, AT THE AGE OF 58, PHILIP WAS DIAGNOSED WITH EASOPHAGEAL CANCER. THEREAFTER, FOR CONTINUOUS THREE YEARS HE GAVE A TOUGH FIGHT TO THE DREADFUL DISEASE. HE WAS CURED BUT THEN THE DISEASE RELAPSED CLAIMING THE LIFE OF THE STATESMAN. HIS DISEASE MADE HIM INTROVERT. A STRATEGIST BY NATURE, HE DECIDED TO GIVE A TOUGH FIGHT TO THIS DISEASE, AS IF IT WAS AN ELECTION GAME. HIS HEALTH STARTED DETERIORATING. IT WAS THEN HE DECIDED TO GO PUBLIC WHILE SHARING HIS THOUGHTS REGARDING CANCER. “WHEN I DIE”- AYUSHYACHA ANTIM SANSKAR IS THE RESULT OF HIS STRONG INTENTIONS TO CONVEY HIS THOUGHTS. A VERY TOUCHING JOURNEY, THE BOOK WILL ALSO BE A GREAT HELP TO THE CANCER PATIENTS. THE AUTHOR’S PERSPECTIVE ABOUT LIFE PRESENTS AN IMPORTANT DIMENSION OF HUMAN RELATIONSHIP AND LIFE IN GENERAL.
फिलिप गूल्ड म्हणजे इंग्लंडचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांचे निकटवर्तीय, आणि त्यांचे प्रमुख ‘स्ट्रेटेजिस्ट’. २००८ साली, वयाच्या अठ्ठावन्नाव्या वर्षी त्यांना अन्ननलिकेचा कॅन्सर झाला असल्याचं निदान केलं गेलं. त्यांच्यातल्या स्ट्रेटेजिस्टने निवडणूक डावपेच रचण्याच्या हिरिरीनेच या भयानक रोगाशी सामना करायचं ठरवलं. जसजशी त्यांची प्रकृती ढासळत गेली तसतसं आपल्या कॅन्सरविषयी आणि मनातल्या विचारांविषयी लोकांना सांगण्याची त्यांना अनिवार इच्छा झाली. ‘आयुष्याचा अंतिम संस्कार...’ म्हणजे या तळमळीचाच परिपाक आहे. वाचकाला हेलावून सोडणारी ही कथा स्फुर्तिदायक ठरेल यात शंका नाही. शिवाय मानवी आयुष्य आणि नातेसंबंधांचे मर्मही यात दडले आहे, जे प्रत्येकाला विचार करायला लावेल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #PHILIPGOULD #DR.AJEYHARDIKAR #BIOGRAPHY #आयुष्याचाअंतिमसंस्कार #AAYUSHYACHA ANTIMSANSKAR"
Customer Reviews
  • Rating StarDIVYA MARATHI 30-11-2019

    आयुष्याचा अंतिम संस्कार एका कॅन्सरग्रस्ताचे हेलावून सोडणारे अनुभव ...कॅन्सर या नावानेसुद्धा कोणत्याही माणसाच्या हृदयाचा थरकाप होतो. दुर्दैवाने जेव्हा एखादया व्यक्तीला कॅन्सर झाल्याचं निदान होतं, तेव्हा त्याचं भावविश्व ढवळून निघतं. त्याच्या नातेवाइकांीही ती सत्त्वपरीक्षा असते. फिलिप गूल्डनाही कॅन्सरचं निदान झालं आणि सुरू झालं उपचारांचं सत्र आणि वेदनांचा प्रवास; पण या वेदनामय प्रवासातही सकारात्मक राहून त्यांनी त्यांच्या उपचारांविषयी, त्यांच्या त्यावेळच्या मन:स्थितीविषयी वर्तमानपत्रात लेखमाला लिहिली आणि त्याच लेखमालेचं नंतर पुस्तक झालं `व्हेन आय डाय`. त्यात त्यांच्या मुलीने आणि पत्नीनेही गूल्ड यांचं आजारपण ते त्यांच्या मृत्यूपर्यंतच्या प्रवासाविषयी लिहिलं आहे. या पुस्तकाचं मराठीत भाषांतर केलं आहे. डॉ. अजेय हर्डीकर यांनी `आयुष्याचा अंतिम संस्कार` या शीर्षकासह. इंग्लंडचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांचे निकटवर्तीय आणि त्यांचे प्रमुख स्ट्रेटेजिस्ट असलेल्या फिलिप गूल्डला २९ जानेवारी २००८ रोजी कॅन्सर झाला असल्याचं समजतं. या आजाराला धीरोदात्तपणे सामोरं जाण्याचा निर्धार त्यानं केला. यामध्ये त्याला पत्नी गेल रेबक आणि जॉर्जिया व ग्रेस या त्याच्या दोन मुलींचा तसेच मित्र परिवार आणि नातेवाइकांचा आधार मिळाला. दोन वर्षांच्या काळात शस्त्रक्रिया आणि क्लेशकारक केमोथेरपीनंतर, सर्व चाचण्यांमधून कॅन्सर लुप्त झाल्याचं आढळलं; पण जेमतेम सहा महिन्यांनंतर कॅन्सरचं पुनरागमन झाल्याचं निष्पन्न झालं. मत्यूच्या दिशेनं एका प्रदीर्घ आणि यातनापूर्ण प्रवासाची सुरुवात झाली; परंतु हा प्रवास आशेवर आधारित होता. या काळात त्यानं स्वत:च्या आयुष्याचा, कार्याचा आणि नातेसंबंधांचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न केला. आयुष्यातल्या शेवटच्या काही महिन्यांत लिहिल्या गेलेल्या या पुस्तकामध्ये फिलिप त्याच्या आजाराचं वर्णन करतानाच मृत्यूकडून शिकलेले धडे उलगडून दाखवतो. फिलिपच्या विचारांबरोबरच त्याच्या कुटुंबीयांचं मनोगतही समोर येतं. अत्यंत सुंदर शब्दांत लिहिलेलं आणि मनाला उभारी देणारं असं हे पुस्तक हेलावून सोडणारं आणि प्रेरणादायीसुद्धा आहे. मृत्यूच्या समीप असताना आपल्या भावना, अनुभव शब्दबद्ध करणं अवघड आहे; पण फिलिप यांनी ते अवघड काम करून कर्करोगाच्या रुग्णांना सकारात्मकतेचा संदेश दिला आहे. कर्करोगग्रस्त रुग्णाच्या नातेवाइकांनाही किती यातनामय स्थितीतून जावं लागतं, याचंही वास्तव चित्रण या पुस्तकात आलं आहे. गुल्ड यांच्या सकारात्मकतेचा प्रत्यय देणाऱ्या या काही ओळी - मृत्यूमुळे जीवनाला अर्थ प्राप्त होतो. यात तुम्ही जर नजीकच्या काळात मरणार असाल तर उरलेल्या आयुष्याला जास्तच उत्कटता प्राप्त होते. जीवन कल्पनातीत मौल्यवान बनतं. केवळ तुमचे थोडेच दिवस शिल्लक असतात म्हणून नव्हे, तर या काळातले अनुभव तुम्हाला परिपूर्ण असल्याचं जाणवतं म्हणून. हे अनुभव तुमचं आयुष्य व्यापणारे आणि उजळून टाकणारे ठरतात. फिलिप यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या भावना डॉ. अजेय हर्डीकरांच्या कुशल अनुवादामुळे वाचकांपर्यंत परिणामकारकतेने पोचतात. प्रत्येकाने आवर्जून वाचावं असं हे पुस्तक आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 12-05-2019

    एका कॅन्सरग्रस्ताचे हेलावून सोडणारे अनुभव… कॅन्सर या नावानेसुद्धा कोणत्याही माणसाच्या हृदयाचा थरकाप होतो. दुर्दैवाने जेव्हा एखाद्या व्यक्तीला कॅन्सर झाल्याचं निदान होतं, तेव्हा त्याचं भावविश्व ढवळून निघतं. त्याच्या नातेवाइकांचीही ती सत्त्वपरीक्षा असे. फिलिप गूल्डनाही कॅन्सरचं निदान झालं आणि सुरू झालं उपचारांचं सत्र आणि वेदनांचा प्रवास; पण या वेदनामय प्रवासातही सकारात्मक राहून त्यांनी त्यांच्या उपचारांविषयी, त्यांच्या त्यावेळच्या मन:स्थितीविषयी वर्तमानपत्रात लेखमाला लिहिली आणि त्याच लेखमालेचं नंतर पुस्तक झालं ‘व्हेन आय डाय’. त्यात त्यांच्या मुलीने आणि पत्नीनेही गूल्ड यांचं आजारपण ते त्यांच्या मृत्यूपर्यंतच्या प्रवासाविषयी लिहिलं आहे. या पुस्तकाचं मराठीत भाषांतर केलं आहे डॉ. अजेय हर्डीकर यांनी ‘आयुष्याचा अंतिम संस्कार’ या शीर्षकासह. इंग्लंडचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांचे निकटवर्तीय आणि त्यांचे प्रमुख स्ट्रेटेजिस्ट असलेल्या फिलिप गूल्डला २९ जानेवारी २००८ रोजी कॅन्सर झाला असल्याचं समजतं. या आजाराला धीरोदात्तपणे सामोरं जाण्याचा निर्धार त्यानं केला. यामध्ये त्याला पत्नी गेल रेबक आणि जॉर्जिया व ग्रेस या त्याच्या दोन मुलींचा तसेच मित्र परिवार आणि नातेवाइकांचा आधार मिळाला. दोन वर्षांच्या काळात शस्त्रक्रिया आणि क्लेशकारक केमोथेरपीनंतर, सर्व चाचण्यांमधून कॅन्सर लुप्त झाल्याचं आढळलं; पण जेमतेम सहा महिन्यांनंतर कॅन्सरचं पुनरागमन झाल्याचं निष्पन्न झालं. मृत्यूच्या दिशेनं एका प्रदीर्घ आणि यातनापूर्ण प्रवासाची सुरुवात झाली; परंतु हा प्रवास आशेवर आधारित होता. या काळात त्यानं स्वत:च्या आयुष्याचा, कार्याचा आणि नातेसंबंधांचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न केला. आयुष्यातल्या शेवटच्या काही महिन्यांत लिहिल्या गेलेल्या या पुस्तकामध्ये फिलिप त्याच्या आजाराचं वर्णन करतानाच मृत्यूकडून शिकलेले धडे उलगडून दाखवतो. फिलिपच्या विचारांबरोबरच त्याच्या कुटुंबीयांचं मनोगतही समोर येतं. अत्यंत सुंदर शब्दांत लिहिलेलं आणि मनाला उभारी देणारं असं हे पुस्तक हेलावून सोडणारं आणि प्रेरणादायीसुद्धा आहे. मृत्यूच्या समीप असताना आपल्या भावना, अनुभव शब्दबद्ध करणं अवघड आहे; पण फिलिप यांनी ते अवघड काम करून कर्करोगाच्या रुग्णांना सकारात्मकतेचा संदेश दिला आहे. कर्करोगग्रस्त रुग्णाच्या नातेवाइकांनाही किती यातनामय स्थितीतून जावं लागतं, याचंही वास्तव चित्रण या पुस्तकात आलं आहे. गुल्ड यांच्या सकारात्मकतेचा प्रत्यय देणाऱ्या या काही ओळी - मृत्यूमुळे जीवनाला अर्थ प्राप्त होतो. यात तुम्ही जर नजीकच्या काळात मरणार असाल तर उरलेल्या आयुष्याला जास्तच उत्कटता प्राप्त होते. जीवन कल्पनातीत मौल्यवान बनतं. केवळ तुमचे थोडेच दिवस शिल्लक असतात म्हणून नव्हे, तर या काळातले अनुभव तुम्हाला परिपूर्ण असल्याचं जाणवतं म्हणून. हे अनुभव तुमचं आयुष्य व्यापणारे आणि उजळून टाकणारे ठरतात. फिलिप यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या भावना डॉ. अजेय हर्डीकरांच्या कुशल अनुवादामुळे वाचकांपर्यंत परिणामकारकतेने पोचतात. प्रत्येकाने आवर्जून वाचावं असं हे पुस्तक आहे. -अंजली पटवर्धन ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 14-04-2019

    कॅन्सर लढ्याची हेलावणारी कथा... इंग्लंडचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांचे निकटवर्तीय आणि त्यांचे प्रमुख स्ट्रॅटेजिस्ट फिलिप गूल्ड यांच्या ‘व्हेन आय डाय’ या पुस्तकाचा ‘आयुष्याचा अंतिम संस्कार’ हा मराठी अनुवाद प्रसिद्ध झाला असून, हे पुस्तक राजकारणाबददल नाही, तर कॅन्सर आणि मृत्यूबद्दल भाष्य करते. सन २००८ मध्ये वयाच्या ५८व्या वर्षी फिलिप यांना अन्ननलिकेचा कॅन्सर असल्याचं निदान झालं. पुढच्या तीन वर्षात स्ट्रॅटेजिकच्या भूमिकेतून त्यांनी या भयानक रोगाशी सामना करायचं ठरविलं. या प्रवासातील शारीरिक आणि मानसिक अनुभव लोकांना सांगण्याची त्यांना अनिवार इच्छा झाली. प्रस्तुत पुस्तक त्या तळमळीतूनच अवतरले आहे. लेखक, त्यांचे कुटुंबीय, त्यांचे डॉक्टर्स आणि नर्सेस यांची ही कथा असून, ती लेखकाची पत्नी गेल आणि कन्या जॉर्जिया व ग्रेस या तीन व्यक्तींभोवती फिरते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
Vaishali Dhande, Amravati.

Their is no doubt that G.B.Deshmukh`s writings are very well but when you come across the characters in this book which you had heard from the author himself then the reading felt like you are also part of that story.... the author deserves many cngratulations for this wonderful book "Durdamya ". Amazingly written balancing humor as well as seriousness... It also taught importance of learning the language of the state you work in otherwise Amravati will also have one Udhampur in it. ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
सि.एम. भागडे, नागपूर.

"दुर्दम्य" पूर्ण वाचुन झालं. लेखकाने एकनाथन साहेबांविषयी खुप छान लिहिलं आहे. ते माझे पहीले एसी होते. नवीन निरीक्षक असतांना, त्यांना व्हरांड्यात बसलेले पाहुन, लपुन छपुन रेंज ची डाक देऊन मी पळून जात असे. तेव्हा दर्शन घेऊन प्रत्यक्ष भेटलो असतो तर बे झाले असते, असं आता वाटते. ...Read more