* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: AGNIDIVYA
  • Availability : Available
  • ISBN : 9788184989106
  • Edition : 2
  • Publishing Year : NOVEMBER 2015
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 472
  • Language : MARATHI
  • Category : BIOGRAPHY
  • Available in Combos :KALYANIRAMAN BENNURWAR BIRTHDAY OFFER
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
N\A
हिंदवी स्वराज्याचे सरनौबत नेताजी पालकर यांचे मोगलांना सामील होणे, दुर्दैवाने धर्मांतरित होणे आणि प्रदीर्घ काळानंतर परत येणे; महाराजांनी त्यांना कौल देणे व शुद्ध करवून हिंदू धर्मात परत घेणे वगैरे मराठा इतिहासातील घटना अचानक किंवा दैवदुर्विलासाने घडून आलेल्या दु:खद घटना नाहीत तर महाराजांनी गनिमी काव्याच्या राजकारणाचा एक भाग म्हणून खेळलेल्या एका धाडसी डावपेचाचा आणि सतत सावध राहून धूर्त, चपळ राजकीय खेळी करणाऱ्या औरंगजेब बादशहामुळे फसलेल्या व अंगलट आलेल्या राजकारणाचा अनिवार्य परिपाक होता असा श्रीकल्याणीरमण बेन्नुरवार यांचा ठाम विश्वास आहे. अनेक गुप्त मसलतींचे पुरावे कागदोपत्री नोंदवले जात नाहीत; त्यामुळे त्यांचा धांडोळा कागदपत्रांमध्ये घेणे शक्य नसते. परिस्थितीजन्य संदर्भ, पुसटसे उल्लेख व सूचक सूत्रे यांच्या मदतीने तर्कावर आधारित कल्पनेतून अशा मसलतींचा उलगडा करता येतो. इतिहासाचे लेखक अत्यंत क्लिष्ट व महत्त्वाच्या घटना किंवा प्रदीर्घ कालखंड केवळ एक-दोन वाक्यांमध्ये सांगतात पण त्या प्रसंगामध्ये अनेकांचे अपार कष्ट, भाव-भावना, इतकेच नव्हे तर आयुष्ये गुंतलेली असतात. उपलब्ध तुटपुंज्या साधनांचा वापर व तर्क यांच्या आधारावरच त्या रसिकांसमोर मांडता येतात. अशा प्रकारेच वास्तवांचा वेध घेण्याचा प्रयत्न लेखकाने केलेला आहे. शिवरायांची स्वराज्यसाधनेवर आणि स्वधर्मावर असलेली अव्यभिचारी निष्ठा, साध्य व साधन याबाबतची स्पष्टता, सहकाऱ्याबद्दल प्रेम आणि विश्वास यामुळे त्यांचे अनुयायी त्यांच्या इच्छेखातर, शब्दाखातर, एका इशाऱ्यासरशी मती गुंग करणारी अतक्र्य साहसे करून अवघडातील अवघड कामे लीलया पार पाडताना दिसतात. सर्वस्वावर निखारे ठेवण्यास सहज सिद्ध होतात.

No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #AGNIDIVYA #AGNIDIVYA #अग्निदिव्य(नेताजी पालकर) #BIOGRAPHY #MARATHI #KALYANIRAMANBENNURWAR "
Customer Reviews
  • Rating StarBhawari Chandrakant

    स्वराज्याचे सरनोबत छञपती शिवरायांचा डावा हात तसेच प्रतीशिवाजी म्हणून ओळखले जाणारे सरनोबत नेताजी पालकर स्वराज्यातून तडकाफडकी निघून प्रथम आदिलशाही नंतर मुघलांना जाऊन मिळतात. परंतू छञपतींच्या एवढ्या जवळचा माणूस त्यांच्याशी व स्वराज्याशी गद्दारी करेलच कस आणि त्यांना परत स्वराज्यात आणण्यासाठी महाराज एवढी धडपड कशाला करतील.महाराजांनी खेळलेला हा एक गनिमी कावा तर नसेल?या सर्व प्रश्नांची उत्तरे कल्याणीरमण बैन्नुरवार यांच्या अग्निदिव्य या कादंबरीतून मिळतात. ...Read more

  • Rating Starहेंबाडे चंद्रभान

    पुस्तक खूप छान आहे.त्यामध्ये महारांजाची दुरद्रुष्टी आणि नेताजींचा कणखर पणा आणि सहनशीलता खूप छान वर्णन केलेली आहे.

  • Rating StarDAINIK AIKYA 03-01-2016

    हिंदवी स्वराज्याचे सरनोबत नेताजी पालकर यांचे मोगलांना सामील होणे, दुर्दैवाने धर्मातरित होणे आणि प्रदीर्घ काळानंतर परत येणे, महाराजांनी त्याला कौल देणे आणि शुद्ध करवून हिंदू धर्मात परत घेणे वगैरे मराठा इतिहासातील घटना अचानक किंवा दैवदुर्विलासाने घडून लेल्या दु:खद घटना नाहीत तर महाराजांनी गनिमी काव्याच्या राजकारणाचा एक भाग म्हणून खेळलेल्या एका धाडसी डावपेचाचा आणि सतत सावध राहून धूर्त, चपळ राजकीय खेळी करणाऱ्या औरंगजेब बादशहामुळे फसलेल्या आणि अंगलट आलेल्या राजकारणाचा अनविार्य परिपाक होता, असा कल्याणीरमण बेन्नुरवार यांचा ठाम विश्वास आहे. अनेक गुप्त मसलतीचे पुरावे कागदोपत्री नोंदवले जात नाहीत. त्यामुळे त्यांचा धांडोळा कागदपत्रांमध्ये घेणे शक्य नसते. परिस्थितीजन्य संदर्भ, पुसटसे उल्लेख आणि सूचक सुत्रे यांच्या मदतीने तर्कावर आधारित कल्पनेतून अशा मसलतींचा उलगडा करता येतो. इतिहासाचे लेखक अत्यंत क्लिष्ट आणि महत्त्वाच्या घटना किंवा प्रदिर्घ कालखंड केवळ एक दोन वाक्यांमध्ये सांगतात पण त्या प्रसंगामध्ये अनेकांचे अपार कष्ट, भाव-भावना, इतकेच नव्हे तर आयुष्ये गुंतलेली असतात. उपलब्ध तुटपुंज्या साधनांचा वापर आणि तर्क यांच्या आधारावरच त्या रसिकांसमोर मांडता येतात. अशा प्रकारेच वास्तवांचा वेध घेण्याचा प्रयत्न लेखकाने केलेला आहे. शिवरायांनी स्वराज्यसाधनेवर आणि स्वधर्मावर असलेली अव्याभिचारी निष्ठा, साध्य आणि साधन याबाबतची स्पष्टता, सहकाऱ्यांबद्दल प्रेम आणि विश्वास यामुळे त्यांचे अनुयायी त्यांच्या इच्छेखातर, शब्दाखातर, एका इशाऱ्यासरशी मती गुंग करणारी अतर्क्य साहसे करून अवघडातील अवघड कामे लीलया पार पाडताना दिसतात. सर्वस्वावर निखारे ठेवण्यात सहज सिद्ध होतात. ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 07-02-2016

    छत्रपती शिवाजी महाराज हे आपले प्रेरणास्थान! हे दैवत आपल्या आदराचे आणि श्रद्धेचे आहे. तसेच त्यांनी ज्यांना आपले म्हटले त्यांचा योग्य तो त्याग महाराजांनी यथोचित सत्कार करून, मानाच्या पदव्या देऊन श्रेष्ठत्व बहाल केले. स्वराज्याचे सरनोबत नेताजी पालकर हे क श्रेष्ठव्यक्तीमत्व! अफझल खान वधासाठी निघताना महाराजांनी त्यांच्यावर स्वराज्य निरविले होते. वैऱ्यांच्या गोटात प्रतिशिवाजी म्हणून पालकरांचा जबरदस्त दरारा होता. अफाट पराक्रमी शिवसैनिक उच्च पदावर असताना मानमरातबासाठी मुसलमान झालच कसा? या सत्याचा शोध घेता घेता कल्याणीरमण बेन्नुरवार यांनी जे लेखन केले तेच हे ‘अग्निदिव्य.’ शिवराय हे रत्नपारखी होते. त्यांचा लोकसंग्रह मोठा होता. त्यांचे सहकारी बुद्धीमान, पराक्रमी होते. सरदार येसाजी कंक, तानाजी मालुसरे, बाजी पासलकर असे विश्वासू मर्द मावळे त्यांच्या सेवेत होते. आबाजी सोनदेव कल्याणचा सुभेदार होता. त्याचा भाऊ निळोजी हा मुजुमदार झाला. माणकोजी दहातोंडे हा सरनोबत होता. तो वारला म्हणून नेताजी पालकर यांना ती जागा महाराजांनी दिली. पालकरांनी फौज वाढविली. राघोबल्लाळ कोरडे याजकडे फौजेची सबनिशी होती. छत्रपवती शिवरायांना भेटले. स्वराज्य सेवेत पुन्ह हिंदू होऊन रुजू झाले ते कसे? याचे उत्तर या कादंबरीतून मिळते. उत्तम संवाद, सुरस समरप्रसंग, ओघवती भाषा आणि उत्कृष्ट वर्णने हे सारेच शिवप्रेमींना आवडेल, इतके स्फूर्तिदायक आहे. सतीश भावसारांचे झकास मुखपृष्ठ या कादंबरीला लाभले आहे. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book