SUDHA MURTY

About Author

Birth Date : 19/08/1950


SUDHA MURTY IS AN INDIAN EDUCATOR, AUTHOR AND PHILANTHROPIST WHO IS CHAIRPERSON OF THE INFOSYS FOUNDATION. SHE IS MARRIED TO THE CO-FOUNDER OF INFOSYS, N. R. NARAYANA MURTHY. MURTY WAS AWARDED THE PADMA SHRI, THE FOURTH HIGHEST CIVILIAN AWARD IN INDIA, FOR SOCIAL WORK BY THE GOVERNMENT OF INDIA IN 2006.

सुधा मूर्ती यांचा जन्म १९५० साली कर्नाटक राज्यातल्या शिग्गावि येथे झाला. त्यांनी कॉम्प्युटर सायन्स या विषयातील एम.टेक. ही पदवी प्राप्त केली आहे. पुणे येथे टेल्को कंपनीत निवडल्या गेलेल्या त्या पहिल्या स्त्री अभियंता होत्या. त्या विख्यात सामाजिक कार्यकर्त्या आणि कुशल लेखिका आहेत. सुधा मूर्ती या इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा आहेत. या फाउंडेशनतर्फे करण्यात येणाऱ्या समाजोपयोगी कार्यासाठी त्या विख्यात आहेत. कर्नाटकातल्या सर्व सरकारी शाळांना संगणक आणि ग्रंथालय सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या चळवळीच्या त्या प्रणेत्या आहेत. १९ नोव्हेंबर, २००४ मध्ये त्यांना समाजकार्याच्या क्षेत्रातील त्यांच्या असामान्य योगदानाबद्दल राजलक्ष्मी पुरस्कार मिळाला. २००६ मध्ये त्यांना भारत सरकारतर्फे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सुधा मूर्ती यांना सामाजिक कार्य आणि साहित्यसेवेसाठी सहा डॉक्टरेट्स मिळाल्या आहेत. यापैकी दोन डॉक्टरेट्स महाराष्ट्रातील एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठ यांच्यातर्फे देण्यात आल्या. कर्नाटकातील गुलबर्गा विद्यापीठाकडून साहित्य क्षेत्रातील कार्यासाठी एक आणि कर्नाटक विद्यापीठाकडून एक अशा दोन डॉक्टरेट्स त्यांना बहाल करण्यात आल्या. तमिळनाडूतील सत्यभामा विद्यापीठाने आणि आंध्रप्रदेशातील श्री पद्मावती विश्वविद्यालयानेही त्यांना डॉक्टरेट्स देऊन सन्मानित केले. त्यांच्या सामाजिक कार्यासाठी त्यांना 2020 सालीच्या 21व्या लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. २०२३ मध्ये पद्मभूषण या नागरी सन्मानाने सन्मानित करण्यात आले.
Sort by
Show per page
Items 1 to 12 of 32 total
AAJI AAJOBANCHYA POTADITALYA GOSHTI Rating Star
Add To Cart INR 280
AAJICHYA POTADITALYA GOSHTI Rating Star
Add To Cart INR 220
AAJOBANCHYA POTADITLYA GOSHTI Rating Star
Add To Cart INR 230
ASTITVA Rating Star
Add To Cart INR 150
AYUSHYACHE DHADE GIRAVTANA Rating Star
Add To Cart INR 200
BAKULA Rating Star
Add To Cart INR 220
COMBO SET OF - HARAVALELYA MANDIRAC... Rating Star
Add To Cart INR 660
DOLLAR BAHU Rating Star
Add To Cart INR 220
DON SHINGE ASALELA HRUSHI Rating Star
Add To Cart INR 220
GARUDJANMACHI KATHA Rating Star
Add To Cart INR 220
GOPICHI DIARY Rating Star
Add To Cart INR 495
GOPICHI DIARY- EK UNAD DIWAS Rating Star
Add To Cart INR 225
123

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
मिना हरीश सहारे, नागपूर.

कुठल्याही पुस्तकावर अभिप्राय देण्याची माझी ही पहिलीच वेळ असली तरी `दुर्दम्य` पुस्तक मनाला भिडल्यामुळे त्यावर लिहीणे मला आवश्यक वाटले. मी पण चरित्रनायक एकनाथनच्या विभागात सेवा दिली आहे. आमच्या सारख्यांना एकनाथन एक कडक तानाशाह ऑफिसर होता इतकंच माित होतं. पण लेखकाच्या नजरेतून जेव्हा त्याचे चरित्र वाचले तेव्हा तो खरा काय होता हे समजले. चरित्र वाचताना पूर्ण होई पर्यंत उत्सुकता कायम होती. कार्यालयीन जीवनातला कालखंड डोळ्यासमोर जिवंत होतो. वाचकाला खिळवून ठेवण्याचं कसब लेखकाच्या लिखाणात आहे.एकनाथन सारख्या विक्षिप्त, हेकेखोर व्यक्तीचा व लेखकाचा नक्कीच काहीतरी ऋणानुबंध असला पाहिजे. निवृती नंतरफिरून तीनदा लेखकाच्याच शहरात येणे हा योगायोग वाटत नाही. कथानकातील काही भागातील प्रसंग व घटना मजेशीर, गमतीदार वाटतात. कथेचा शेवट मनाला भिडून जातो. एका करारी, खंबीर माणसाचा अंत वाचताना मन भरून आले. पुस्तक पूर्ण केल्यावर शेवटी एक विचार आला की त्याचं मरण सुखदच झाले असे म्हणावे लागेल कारण एकाकीपणा जरी त्यांनी स्वतः निवडला होता तरी मृत्यूच्या बाबतीत भाग्याने त्यांची साथ दिली होती. त्यांच्या सारखे ताठ कणा व दुर्दम्य व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तिला परावलंबी, असहाय आयुष्य कधीच रूचलं नसतं आणि त्या नंतर आलेल्या करोना काळात त्यांचे काय हाल झाले असते त्याची कल्पनाच न केलेली बरी. कथानक वाचकाच्या मनाला भिडले यातच लेखकाचे यश आहे. पुढील लिखाणा करता शुभेच्छा. बाकी माझ्याकडून पुस्तकाचा दर्जा - खूप छान, बढिया आणि सुपर्ब... ...Read more

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
अनिल सहजे, नाशिक.

`कुलामामाच्या देशात’ हे पुस्तक म्हणजे जंगलातील अनुभवकथांचा एक विलक्षण रम्य प्रवास आहे. रवींद्र वानखडे यांच्या वनाधिकारी म्हणूनच्या प्रत्यक्ष अनुभवातून या कथा जन्माला येतात. प्रत्यक्षात घडलेल्या या कथा इतक्या रंगतदार आहेत की त्या काल्पनिक वाटाव्यात, अी त्यांची गंमत आहे. वानखडे यांच्या अनुभवांमधील कथाबीज अचूकपणे हेरून जी. बी. देशमुख यांनी त्यांना आपल्या रसाळ आणि खुमासदार शैलीत शब्दरूप दिले आहे. देशमुखांची शैली इतकी प्रवाही आणि ओघवती आहे की वाचक कथांमध्ये अक्षरशः गुंगून जातो. एकदा पुस्तक हातात घेतल्यानंतर ते पूर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेवावेसे वाटत नाही. वन हे सामान्य माणसासाठी तसे अपरिचितच क्षेत्र. जंगलातील जीवन, तेथील नियम-कायदे आणि जंगली श्वापदांचे विश्व याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. वानखडे-देशमुख द्वयी केवळ या अनोख्या जगाची ओळख करून देत नाहीत, तर त्याविषयी वाचकाच्या मनात विलक्षण कुतूहलही निर्माण करतात. ‘खुश रहेना मेरे यार’ आणि ‘महाकाय आकांत’ या दोन क्रमशः कथा तर विशेषतः चटका लावून जातात. त्या केवळ थरारक आणि अविश्वसनीय वाटाव्या अशा अनुभवांनी भारलेल्या नाहीत, तर जंगली श्वापदांची एक हळवी, माणुसकीच्या जवळ जाणारी बाजूही त्या प्रभावीपणे उलगडून दाखवतात. जी. बी. देशमुखांची खुमासदार, मिश्कील आणि रसाळ लेखनशैली वाचकाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत गुंतवून ठेवते. रवींद्र वानखडे यांच्या प्रत्यक्ष अनुभवांची सत्यता आणि देशमुखांच्या कथनकौशल्याचा सुंदर मिलाफ ‘कुलामामाच्या देशात’ घडवतो. हे पुस्तक केवळ जंगलातील अनुभवकथांचे संकलन राहत नाही, ते वाचकाला जंगलाच्या एका अनोख्या, रोमांचक आणि हळुवार विश्वाची सफर घडवते आणि नकळत सांगून जाते, ‘वनस्य कथा रम्यः!’ ...Read more