* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789353172480
  • Edition : 1
  • Publishing Year : JUNE 2019
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 172
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Sub Category : CRIME & MYSTERY, THRILLER / SUSPENSE
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
‘MAGARDOH’ IS A COLLECTION OF ELEVEN STORIES REVOLVING AROUND THE MENTAL-PHYSICAL METAMORPHOSIS THAT HAPPENS IN A WHIRLPOOL OF MYSTERIOUS AND MYTHOLOGICAL REALMS. THE FIRST OF THESE STORIES, ‘GHATCHAKRA’, DEALS WITH THE CONCEPT OF REBIRTH. SHAMKANT IS TRAVELLING ON A TRAIN WITH HIS WIFE, AND THE CONVERSATION BRINGS UP JULIE PARERA, HIS ERSTWHILE SECRETARY. SHAMKANT IS DISTURBED BY THE MEMORY AND EVENTUALLY GOES MISSING DURING THE JOURNEY. ‘GHATCHAKRA’ DEPICTS THE MYSTERY BEHIND HIS SUDDEN DISAPPEARANCE AND THE EVENTFUL SEARCH FOR HIM. THE PROTAGONIST OF THE STORY ‘SUN 1860CHAA RUPAYA’ ACCIDENTALLY FALLS INTO A DITCH, AND WHEN HE COMES TO HIS SENSES, HE FINDS HIMSELF IN THE YEAR 1860. THE STORY NAMED ‘CHAKVAA’ TALKS ABOUT SANJAY GITE WHO HAS LEFT HIS HOMETOWN VERY EARLY IN HIS LIFE. HE COMES BACK TO HIS HOME IN THE TWILIGHT OF HIS LIFE, AND GETS A FEELING THAT HIS HOUSE IS STILL BEING INHABITED BY HIS FAMILY MEMBERS. BUT UPON NOT SEEING A SINGLE HUMAN BEING, HE DECIDES THAT HIS VENGEFUL NATURE HAS CAUSED HIS FAMILY TO BECOME INVISIBLE. THE DEPTH OF THIS MYSTERY HOLDS THE READERS SPELLBOUND. THE STORIES ‘REKHACHA AARSA’ AND ‘RANJANACHI PRATIMA’ TOO PORTRAY THEIR HEROINES ENTANGLED WITH SOME INEXPLICABLE VIBES. THE VERY IDEA OF REKHA GIFTING A MIRROR TO HER BOYFRIEND, AND THEN MATERIALIZING OUT OF THE SAME MIRROR EVERY NIGHT TO MEET HIM, GIVES GOOSE-BUMPS. AND RANJANA, FROM ‘RANJANACHI PRATIMA’ TOO HOLDS YOU WONDERSTRUCK WITH HER MYSTERIOUS PERSONA. FINALLY ABOUT ‘MAGARDOH’, THE STORY THAT FORMS THE TITLE OF THE COLLECTION. IT TAKES YOU TO THE SHEER CRESCENDO OF SUSPENSE. THIS STORY IS ALL ABOUT THE MYSTERIOUS AURA THAT A PARTICULAR PAINTING APPEARS TO CREATE AROUND ITSELF. THE OTHER STORIES, NAMELY ‘PAHELI’, ‘ARUNDHATICHA DABA’, ‘BAND PAAKIT’, ‘DOKEDUKHI’, ‘UJAALI’ TOO WEAVE AN ENIGMATIC WEB OF HUMAN PSYCHE, ITS MYSTERIES AND THE MERCURIAL NATURE OF LIFE ITSELF. THE AUTHOR LOOKS AT THE DAY-TO-DAY, ROUTINE INCIDENTS AND TURNS THEM INTO A MAZE OF PUZZLES WITH HIS IMAGINATION. THE WHOLE EFFECT, GIVES THE READER A READING EXPERIENCE TO REMEMBER.
रहस्यं आणि मिथकांच्या चक्रव्यूहात बदलणारी मनोदैहिकता टिपणाऱ्या अकरा गूढकथांचा संग्रह म्हणजे मगरडोह होय. पुनर्जन्मावर आधारित पहिलीच कथा ‘घातचक्र’..पत्नीसह रेल्वेप्रवासाला निघालेल्या श्यामकांतच्या गप्पांमध्ये त्याची गतकाळातील स्टेनो कम सेक्रेटरी असलेल्या ज्यूली परेराचा विषय निघतो आणि श्यामकांत अस्वस्थ होतो. त्याच प्रवासात श्यामकांत अचानक गायब होतो..श्यामकांतच्या या गायब होण्यामागचं रहस्यं आणि त्याच्या शोधाचा थरार यांची विलक्षण गुंफण ‘घातचक्र’मध्ये अनुभवास येते. ‘सन १८६०चा रुपया’ या कथेतील नायक एका लहानशा अपघातात एका खड्ड्यात पडतो. पण त्याला जाग येते तेंव्हा तो थेट १८६० सालात पोहोचलेला असतो. तर ‘चकवा’ ही कथा आहे घरदार सोडलेल्या संजय गितेची. हा गिते उतारवयात आपल्या मूळ गावी भेट देतो, त्या घरात माणसांच्या वावराच्या खुणा असतात; पण एकही माणूस त्याच्या दृष्टीला पडत नाही. त्यामुळे ते आपल्या मनाची अशी समजूत करून घेतात, की आपल्या मनातील सूड भावनेमुळे आपलं कुटुंब नाहीसं झालं आहे. संजय गितेभोवतीचं हे गूढवलय वाचकांनाही गुंगवून सोडतं. ‘रेखाचा आरसा’ आणि ‘रंजनाची प्रतिमा’ या कथांच्या नायिकाही अशाच विस्मयकारक जाणिवांशी जोडलेल्या आहेत. आपल्या मित्राला आरसा भेट देणारी रेखा, त्या आरशातूनच रोज रात्री त्याला भेटायला येते ही कल्पनाच थरारक वाटते. तर ‘रंजनाची प्रतिमा’ कथेतली रंजना एखाद्या गूढ नायिकेसारखी स्तंभित करते. कथासंग्रहाचं शीर्षक असणारी ‘मगरडोह’ही कथाही उत्कंठेचा शिरोबिंदू गाठायला लावणारी आहे. एका चित्राभोवती फिरणारी गूढता या कथेत रहस्यमयरीत्या साकारलेली आहे. ‘पहेली’, ‘अरुंधतीचा डबा’, ‘बंद पाकीट’, ‘डोकेदुखी’, ‘उजाली’या कथाही माणसाचे मनोव्यापार...त्या मनोव्यापारांतील गूढता...मानवी जीवनातील अतर्क्यता...याचं रंजकतेने चित्रण करतात. लेखक दैनंदिन जीवनातील साधे प्रसंग घेऊन अशा प्रसंगांनाही एका अनामिक गूढवलयाशी जोडतो. आणि वाचकाला नवी वाचनानुभूती देतो.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MAGARDOHA #WHODUNITS #MYSTERY #SHASHIKANTWAMANKALE #RATNAKARMATKARI #MARATHIBOOKS #BABURAOARNALKAR #GURUNATHNAIK #MARATHILITERATURE #मगरडोह #शशिकांतवामनकाळे #रहस्यकथा #गूढकथा #मराठीसाहित्य #रत्नाकरमतकरी #मराठीपु्स्तके #बाबूरावअर्नाळकर #गुरूनाथनाईक
Customer Reviews
  • Rating StarEknath Marathe

    ईबुक वाचायला लागलेला एकूण वेळ 3 तास. .... लेखकाचा हा गूढकथा संग्रह आहे. या सर्वच गोष्टी आधी प्रकाशित झाल्या आहेत व या पुस्तकात संकलित केल्या गेल्या आहेत. यातले गूढ अगदी साध्या साध्या गोष्टीतून आकार घेवू लागते व सावकाश उकल करून गोष्ट संपते. धक्का ंत्र,कलाटणी, प्रसंगाचे भयानक वर्णन .. असे साचेबद्ध गूढ कथानक कोठेही नाही पण सर्वच कथा परिणाम मात्र करतात. गोष्टीत असलेली पात्रे सुद्धा अगदी साधी, रोज भेटणारी आहेत. भूताशी किंवा भयाशी थेट लढत नाही. भूत इथे तुम्हाला घाबरवण्यासाठी येत नाही. मुद्दाम वाचकांना भूतावर विश्वास ठेवा असे सुद्धा सांगितलेले नाही. अनेक गोष्टीत मानसशास्त्र सुद्धा विचारात घेतले आहे. कथेत तीव्र चढ उतार नाहीत. पण गूढ प्रत्येक ओळी बरोबर पकड घेत जाते, अगदी संथपणे ! वेगळ्या बाजाच्या या गूढकथा जरूर वाचायला हव्यात. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 01-08-2019

    गूढकथांच्या डोहातला थरार... हुलकावण्या, चकवा, उत्कंठा, नाट्यमयता, अनाकलनीय, अमानवी पात्र, भयावह प्रसंग यांच्या समग्र भट्टीत जन्म घेते ती एखादी रहस्यमय, गूढ कथा. दृश्यमाध्यमातून ते प्रेक्षकांसमोर मांडताना संगीत, कॅमेरा यांची भूमिका विशेष असते. मात्र ुस्तकातून ज्यावेळी एखादी कथा तुम्ही वाचकांच्या हाती सोपवली जाते ते काम कर्मकठीण. कारण प्रसंग, संवाद, पात्र यांची पकड मजबूत असावीच लागते, पण तुमची कल्पनेची बैठकदेखील तितकी मजबूत असणे गरजेचे असते. लेखक शशिकांत काळे यांनी ‘मगरडोह’ या कथासंग्रहात गूढ कथेच्या सर्व कक्षांना सामावण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. यातील घातचक्र, मगरडोह, अरुंधतीचा डबा, बंद पाकीट, उजाली यांसारख्या कथा वाचकांना थरार आणि भीतीच्या प्रांतात मुक्त संचार करून आणतात. ...Read more

  • Rating StarSHIVMARG - AUGUST 2019

    रंजक गूढकथांचा वाचनीय संग्रह... कथा हा वाङ्मय प्रकार सर्वसाधारणपणे वाचकाच्या आवडीचा असतो. गूढकथा हाही तसा वाचकप्रिय प्रकार. ‘मगरडोह’ या कथासंग्रहातून शशिकांत काळे यांनी एकूण अकरा गूढकथा वाचकांच्या भेटीला आणल्या आहेत. रत्नाकर मतकरींची अभ्यासपूर्ण प्स्तावना या गूढकथासंग्रहाला लाभली आहे. ‘घातचक्र’ ही कथा पुनर्जन्मावर आधारित आहे. श्यामकांत हा एका कंपनीचा मालक आपली पत्नी सुमनसह अमावस्येच्या दिवशी रेल्वेतून प्रवास करत असतो. त्यावेळी बोलता बोलता सहज त्याच्या कंपनीत पूर्वी (श्यामकांत व सुमनच्या विवाहापूर्वी) स्टेनो कम सेक्रेटरी असलेल्या ज्यूली परेराचा विषय निघतो आणि श्यामकांत अस्वस्थ होतो. त्यानंतर श्यामकांत त्या प्रवासात सुमनच्या नकळत मध्येच कुठेतरी उतरतो. सुमन पोलिसांच्या साह्याने त्याच्यापर्यंत पोहोचते. कुठे गेलेला असतो श्यामकांत? तिथे गेल्यावर त्याच्या पूर्वजन्माचं स्मरण त्याला कोण करून देतं? पूर्वजन्मात ज्यूलीशी आणि सुमनशी त्याचा काय संबंध असतो? ‘सन १८६०चा रुपया’ या कथेतील प्रल्हाद घाटगे त्याची पत्नी अरुणाबरोबर लोणावळ्याला वर्षासहलीसाठी गेलेला असतो. लोणावळ्यात एका ठिकाणी ते दोघं फिरायला गेलेले असताना अचानक तो एका खड्ड्यात पडतो आणि त्याच्या अंगावर बरीच माती पडते. त्याला जेव्हा जाग येते तेव्हा तो एका तंबूत असतो. काही दिवसांनी त्याच्या असं लक्षात येतं, की त्या अपघातानंतर तो २००७ सालातून १८६० सालामध्ये पोचला आहे. आता त्याच्यासमोर प्रश्न असतो, २००७मध्ये कसं परतायचं? ‘चकवा’ ही कथा आहे संजय गिते ऊर्फ S.G. ची. S.G. नी लहानपणीच आई-वडिलांवर रागावून त्यांच्या नकळत जुनापाडा येथील त्यांचं घर सोडलेलं असतं. त्यानंतर त्यांचा घराशी काहीच संपर्क नसतो. आता डहाणूत बायको आणि बावीस वर्षाचा मुलगा रंजन याच्यासह ते सुखनैव जगत असतात; पण रंजनच्या आग्रहावरून आपलं गाव, आपले कुटुंबीय याविषयी ते रंजनला सांगतात. रंजन त्यांच्या गावी जाऊन येतो आणि आजी, काका-काकू यांचे फोटो काढून आई-वडिलांना दाखवायला आणतो; पण S.G. ना त्या फोटोत एका मध्यमवयीन अनोळखी बाईशिवाय कोणीच दिसत नाही. एकदा ते कुणाला न सांगता आपल्या गावी स्वत:च्या घरी जातात. त्या घरात माणसांच्या वावराच्या खुणा असतात; पण एकही माणूस त्यांच्या दृष्टीला पडत नाही. त्यामुळे ते आपल्या मनाची अशी समजूत करून घेतात, की आपल्या मनातील सूड भावनेमुळे आपलं कुटुंब नाहीसं झालं आहे. काय असतो हा प्रकार? ‘रेखाचा आरसा’ या कथेत एक तरुण मुंबईहून कारवारला ‘आयनापूर’ नावाच्या गावात ऑफिसच्या कामासाठी गेलेला असतो. त्याच्या प्रकाश नावाच्या मित्राच्या घरी त्याची राहायची सोय केलेली असते. प्रकाश स्वत: नोकरीनिमित्त बाहेरगावी असतो. त्याच्या अनुपस्थितीत त्याची बहीण रेखा आणि त्याची आई या तरुणाचा पाहुणचार करतात. त्या वास्तव्यात त्या तरुणाची आणि रेखाची चांगली मैत्री होते. रेखाने त्याला एक मोठा आरसा भेट म्हणून दिलेला असतो. तो मुंबईला आल्यावर आपल्या बेडरूममध्ये तो आरसा लावतो. त्या आरशातून रेखा रोज रात्री त्याला भेटायला यायला लागते. पुढे काय होतं? ‘रंजनाची प्रतिमा’ या कथेतील तरुण चंदनपूर या गावी त्याच्या वडिलांनी बांधलेलं घर विकण्याच्या दृष्टीने गेलेला असतो. त्याच्या त्या घरात रंजना सामंत नावाची विधवा तरुणी एकटीच राहत असते. त्या तरुणाच्या वडिलांकडून विकत घेतलेली शेती ती कसत असते. हा तरुण तिच्यासमोर घर विकत घेण्याचा प्रस्ताव ठेवतो, तेव्हा ती दोन-तीन वर्षांची मुदत मागून घेते. पहिल्या वेळेस त्याच्याशी मोकळेपणाने वागलेल्या रंजनाबाबत नंतरच्या दोन-तीन वर्षांत त्याच्या मनात एका बाबतीत शंका उत्पन्न होते. रंजना घर विकत घेते का? त्याचं शंकानिरसन होतं का? ‘मगरडोह’ या कथेत डॉ. कर्वे या मानसोपचारतज्ज्ञांच्या मुंबईतील क्लिनिकच्या रिनोव्हेशनच्या दरम्यान एक धबधब्याचं चित्र त्यांच्या केबिनमध्ये लावलं जातं. S.G. (संजय गिते) या त्यांच्या मित्राला त्या चित्रात काहीतरी विचित्र वाटत असतं. पौर्णिमेच्या दिवशी ते चित्र प्रकाशमान होत असतं. ते चित्र लावल्यापासून दोन-तीन वेळा कर्व्याच्या हाताला जखम झालेली असते आणि ज्या ज्या वेळेला त्यांच्या हाताला जखम झालेली असते, त्यावेळी अमावस्या असते. कर्व्याना त्याबाबतीत वेगळं काही वाटत नाही; पण S.G. आणि लेखक यांना मात्र त्या चित्राबाबत काहीतरी गूढ वाटत असतं. उकलतं का ते गूढ? तर ही आहे या कथासंग्रहातील काही कथांची झलक. अगदी साध्या निवेदनातून या कथा पुढे सरकत राहतात. गूढकथांप्रमाणे गूढ किंवा भयप्रद वातावरणनिर्मिती काळे करत नाहीत. सर्वसामान्य माणसाच्या भावभावनांना थोड्याशा गूढातून भिडतात; पण त्यांचं निवेदन वाचकाला खिळवून ठेवतं. तेव्हा रंजक अशा या कथा वाचकांनी आवर्जून वाचाव्या अशा आहेत. रत्नाकर मतकरींची प्रस्तावना नवोदितांसाठी मार्गदर्शक ठरणारी आहे. -अंजली पटवर्धन ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more