* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
WE ARE UNABLE TO KNOW THE ACTUAL MEANING OF LIFE UNTIL WE FIND THE ACTUAL MEANING OF DEATH. ONLY TAKING A BIRTH IS NOT ENOUGH. WE SHOULD RISE AFTER DEATH ! ONLY THEN WE COULD FIND THE MEANING OF LIFE. I TRIED TO FACE DEATH THREE TIMES, BUT CAUGHT WITH A SPECIFIC SCENE EVERY TIME . I LOST MY SENSES, FELT LIKE WHELMED WITH WATER IN MY HEAD, AS I CAN’T EVEN BREATH YET CAN’T STEP OUT. AS I’M TRYING TO RISE AND SOMEBODY IS PULLING MY LEG DOWN, SURROUNDED WITH BLACKISH GREEN… GOING DEEP AND DEEP AND DEEP…… THAT’S TRUE. WE CAN’T KNOW THE IMPORTANCE OF LIFE UNTIL WE PAY FOR IT. I HAVEN’T FACED A SITUATION LIKE THIS YET. NOT UNDERGONE A TERRIBLE DISTRESS YET TO ATTEMPT A SUICIDE. THEN, DO I KNOW THE IMPORTANCE OF LIFE ?? CAN I SAY YES I’M AWARE OF IT ?? HOW MY MEDITATION WORKS ?? BY READING AND INTERPRETATING ‘CLASSIC’ LITERATURE. ! TAKING AN EVENING WALK WITH THE COLD BREEZES IN THE AIR…. COFFEE AND DISCUSSIONS ON THE CHARACTERS OF A RECENT BOOK WE READ….TRYING NOT TO HURT ANYONE….!! IS LIFE THIS SIMPLE ???? NOT AT ALL…….
मरणाचा अर्थ समजेपर्यंत जीवन समजत नाही. केवळ जन्मणं त्यासाठी पुरेसं नाही. मरून जन्माला आलं पाहिजे. त्यानंतरच जीवनाचा खरा अर्थ समजतो. तीन वेळा मरायचा प्रयत्न केला, तरी विशिष्ट प्रकारचाच अनुभव आला. शुद्ध गेल्यासारखं - डोक्यात पाणी भरल्यासारखं - श्वास कोंडून जीव गुदमरत असतानाही पाण्याबाहेर यायला जमू नये, तसं. चढायला धडपडत असताना कुणी तरी पुन्हा गर्तेत लोटून द्यावं, तसं. भोवताली काळपट हिरवेपणा भरून राहावा ... खोल बुडत जावं ... खरंय् हे. मरण समजल्याशिवाय जीवनाची किंमत समजत नाही. मला असा अनुभव कधीच आला नाही. आत्महत्या करावी. इतकं उत्कट दु:खही कधी आयुष्यात जाणवलं नाही. मग मला जीवनाची किंमत ठाऊक आहे काय? ठाऊक आहे, असं म्हणता येईल काय? माझं चिंतन कशा प्रकारे चालतं? साहित्य वाचणं - ते ‘क्लासिक’ आहे, याची काळजी घेत! पुस्तकं विकत घेणं, संध्याकाळच्या थंड सुखद हवेत फिरून येणं ... उत्तम कॉफीचे घुटके घेत साहित्यातील पात्रांवर आणि प्रसंगांवर चिंतन करणं, प्रत्यक्ष आयुष्यात शक्यतो कुणालाही न दुखवता जगत राहणं! जीवन म्हणजे एवढंच? अंहं ...
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #PARISHODH #ANVESHAN #परिशोध #FICTION #TRANSLATEDFROMKANNADATOMARATHI #UMAKULKARNI #उमाकुलकर्णी #BHAIRAPPA S.L. #भैरप्पा एस.एल. "
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    विश्वनाथ नावाच्या मनस्वी तरुणाची भ्रमण-गाथा, कंठी जोईस, देशपांडे वकील, जक्काजी मास्तर, रंगनाथ स्वामी, गंगण्णा, सुनंदा, हेडमास्तर– अशा अनेकांच्या जीवनात काही काळ विश्व येऊन जातो. यातला प्रत्येकजण आपापल्या दृष्टिकोनातून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो ही प्रत्येकाची आपापल्या जीवनाचा परिशोध घेण्याची धडपड आहे. त्यातून साकारलेली, जीवनातील गुंतागुंत दर्शवणारी ही कादंबरी. तत्त्वचिंतक भैरपांचा एक जीवन-स्पर्शी लेखनानुभव! ‘मरण समजल्याशिवाय जीवनाची किंमत समजत नाही. आत्महत्त्या करावी इतकं उत्कट दु:खही कधी आयुष्यात जाणवलं नाही. मग मला जीवनाची किंमत ठाऊक आहे असं म्हणता येईल काय?’ ‘केवळ क्लासिक साहित्य वाचणं... उत्तम कॉफीचे घुटके घेत त्यातील पात्रांवर आणि प्रसंगांवर चिंतन करणं... जीवन म्हणजे एवढंच? अंहं– एका जीवघेण्या संघर्षाचा चिरंतन परिशोध. मराठी अनुवाद सौ. उमा. वि. कुलकर्णी यांच्या ओघवती भाषेत! ...Read more

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    परिपूर्ण शोध… बिनीच्या कानडी कादंबरीकारांपैकी डॉ. शिवराम कारंथ, डॉ. यु. आर. अनंतमूर्ती यांच्याप्रमाणेच डॉ. एस. एल. भैरप्पा यांचेही नाव जाणकार मराठी वाचकाच्या परिचयाचे आहे. ‘गृहभंग’, ‘वंशवृक्ष’, ‘काठ’, ‘पर्व’ अशा त्यांच्या काही कादंबऱ्या मराठीत भाषांरित झाल्या आहेत. ‘परिशोध’ ही मराठीत येणारी त्यांची पाचवी कादंबरी. तत्वज्ञानाचे प्राध्यापक असलेल्या भैरप्प्यांच्या कादंबऱ्यांतही तत्त्वचिकित्सेचा अंत:प्रवाह वाहात असतो. त्यांच्या कादंबऱ्यातील पात्रांना पडणारे प्रश्न वाचकाला तत्त्वज्ञानाच्या खोल आणि चक्रावून सोडणाऱ्या प्रवाहात खेचत नेतात, अंतर्मुख बनवतात आणि एकंदर मानवी जीवनाच्या (आणि मृत्युच्या) अर्थाचा विचार करायला लावतात. शोध घ्यायला प्रवृत्त करतात. ‘परिशोध’ ही कादंबरीही याला अपवाद नाही. ‘परिशोध’ हा शब्द काही मराठीत रुढ आहे, असे म्हणता येणार नाही. पण मूळ ‘अन्वेषण’ या शीर्षकाचा प्रतिशब्द म्हणून भाषांतरकर्त्या उमा कुलकर्णी यांनी तो चपखलपणाने योजला आहे. ‘अन्वेषण’ म्हणजे शोध. पण ‘शोध’ला ‘परि’ या उपसर्गाची जोड देऊन कादंबरीचे सार त्यातून व्यक्त करण्याचा प्रयत्न उमा कुलकर्णी यांनी केला आहे. ‘परिशोध’ म्हणजे परिपूर्ण शोध, अनेक तऱ्हांनी घेतलेला सखोल शोध. या कादंबरीच्या केंद्रबिंदूच्या जागी असलेल्या विश्वनाथचा, त्याच्याशी संबंध आलेल्या सर्वांनी घेतलेला शोध म्हणजे ‘परिशोध’ ही कादंबरी. हा शोध आहे तो पूर्वघटनांचे निवेदन व विश्लेषण यांच्याद्वारा, त्यामुळे वाचकाचा विश्वनाथशी प्रत्यक्ष संबंध कधीच येत नाही. विश्वनाथ उर्फ विश्व (ह्या नावातील प्रतिकात्मता सहज लक्षात यावी.) ह्या केंद्राभोवतीच्या परीघावर असलेल्या सात व्यक्तींच्या जाणीवप्रवाहात लेखक उतरतो आणि त्या द्वारा विश्वच्या जीवनातील घटना आणि त्याचे काही गुणविशेष बुद्धिमत्ता, निर्भयता, शिक्षणाची आवड, नैतिकता, निष्ठा - यांचा वाचकाला प्रत्यय येत जातो. अस्थिर ‘विश्व’चे अनुभव विश्वची आई नजंम्मा हिची शोकांतिका भैरप्पांनी ‘गृहभंग’ या कादंबरीतच साकार केली आहे. खवीस बाप. आळशी व अप्पलपोटा नवरा, छळ करणारी सासू आणि भोवतीच्या समाजातील इतर अनेकजण नंजम्माचे विविध प्रकारे शोषण करतात. सर्व प्रकारच्या प्रतिकुलतेशी झगडत ‘घर’ उभे करू पाहाणाऱ्या एका दुर्दैवी गृहिणीची कहाणी ‘गृहभंग’ मध्ये येते. ‘परिशोध’मध्ये तिच्या मुलाची परवड होताना दिसते. अनेक गुण अंगी असूनही मनस्वीपणा, परखडपणा, नैतिकतेबद्दलच्या स्वत:च्या कल्पनेशी प्रामाणिक राहाण्याचा अट्टहास यामुळे विश्व कुठेच स्थिर होऊ शकत नाही. भिक्षांदेही’ करून त्याला जगवू व शिकवू पाहाणाऱ्या महादेवय्या या जंगमाच्या (संन्याशाच्या) मृत्यूनंतर विश्वचे जीवन धारेला लागल्यासारखे होते. आत्महत्येचे प्रयत्न, संभोगाच्या व पोहोण्याच्या अनुभवातून निर्माण झालेली जीवनेच्छा, एका वकिलाच्या घरी काम, नाटक वंâपनीतील नोकरी, मुंबईच्या वेश्यावस्तीतील मुक्काम, तत्त्वजिज्ञासेमुळे एका साधुच्या मठातील वास्तव्य, शिक्षण घेता येण्याच्या आशेने केलेले लग्न आणि सासऱ्याने केलेल्या फसवणुकीमुळे पत्नीच्या त्याग, आत्महत्या करण्याच्या तिच्या प्रयत्नात विश्वच्या मुलाचा मृत्यू - अशा क्रमाने विश्व भिरभिरत राहातो, त्यामुळे त्याच्याशी संबंध येणाऱ्या प्रत्येकाला तो एक गूढ वाटत राहातो. पण कादंबरीच्या सात प्रकरणांतील सात व्यक्तीच्या माध्यमातूनच आपण विश्वला भेटत असल्यामुळे विश्व प्रत्यक्षात कसा आहे, हे वाचकाला समजत नाही, त्यामुळे वाचकही त्याचा ‘ शोध’ घेत राहातो. जगणे, उपभोग घेणे, सुख मिळविणे, ‘यशस्वी होणे’ या सर्वसाधारण गोष्टी विश्वाला मोहवू शकत नाहीत, गुंतवून ठेवू शकत नाहीत. या सगळ्याच्या पलीकडे काय आहे हा प्रश्न त्याला पडतो आहे. शेवटच्या प्रकरणात त्याच्या दैनंदिनीतील काही उतारे हेडमास्तरांच्या माध्यमातून वाचकाला वाचायला मिळतात. कादंबरी संपते तीही प्रश्नचिन्हांवरच. विश्वला भेटायचं असं ठरणारे हेडमास्तर स्वत:लाच विचारतात : ‘‘समोर बोलत असतानाही तो कितपत सत्य सांगू शकेल? त्यातलं मी किती जाणू शकेन? संस्कृतीचा अडथळा नाही कादंबरीचा असा समर्थ प्रत्यय भाषांतरातूनही यावा, हे जेवढे लेखकाचे यश आहे, तेवढेच भाषांतरकर्तीचेही आहे. कन्नड नावे (व्यक्ती, स्थळे, खाद्यपदार्थ, वस्तू इ.), रीतीरिवाज, उपासनापद्धती, वेशभूषा, अशा अनेक गोष्टींतून आपल्याला कानडी संस्कृतीच्या अनेक वैशिष्टयांचा परिचय होतो, पण त्यांचा अडथळा मात्र वाटत नाही, हेही उमा कुलकर्णींच्या भाषांतराचे यश आहे. अर्थात काही ठिकाणी मराठीची थोडीशी मोडतोड झालेली दिसते. उदाहरणार्थ, ‘दुखणं उठलं होतं (पृ.१) ‘नतद्रष्ट नशिबावर शिव्यांची लाखोली वाहिली’ (पृ.८) ‘त्या क्षणी दोघांच्याही मनात परस्परांविषयी विश्वास जन्मून वाटल्याचं दोघांनाही जाणवलं. (पृ.२४) ‘नातू कुणाचा आणि वात्सल्य (•कळवळा) कुणाला ! (पृ.३७) ‘नादाला गेलं नाही’ (पृ. ३६) ‘बड्या देसायांच्या घरचे ते (•ती) लेक !’ (पृ.७१) ‘कुठल्याही प्रकारचं कन्सिडरेशन (•स्वार्थ, अपेक्षा) नसलेलं...’ (पृ.७३) ‘यानं वाचायला हवी, अशी आशा निर्माण झाली’ (•हा वाचेल / यानं वाचावी) (पृ.७६), ‘तरीही त्यानं वाचावं अशी आशा मनात निर्माण झाली’ (पृ.७६) (‘परिहार मिळाल्यासारखं वाटलं’ (•झाल्यासारखं) (पृ.२०२) प्रसिद्धी पूर्व संस्कारात अशी स्थळे सहजपणे सुधारून घेता आली असती. मुद्रितशोधनातही अनेक चुका राहून गेल्या आहेत. उदा. – ‘काड्यापेटी’, ‘साडेचार’, ‘पंचवीस’, ‘संन्यासी’, ‘मुळं’ (•मुलं). पण अलिकडील संगणकीय जुळणीच्या व पडद्यावर करावयाच्या मुद्रितशोधाच्या युगात अशा चुका अपिरहार्य ठरू लागल्या आहेत. कादंबरीचे मुखपृष्ठ कादंबरीला पूर्णपणे विशोभित आहे. त्यात कादंबरीच्या आशयाचे प्रतिबिंब नाही किंवा कादंबरीच्या सूत्राचेही सूचन नाही. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
Vaishali Dhande, Amravati.

Their is no doubt that G.B.Deshmukh`s writings are very well but when you come across the characters in this book which you had heard from the author himself then the reading felt like you are also part of that story.... the author deserves many cngratulations for this wonderful book "Durdamya ". Amazingly written balancing humor as well as seriousness... It also taught importance of learning the language of the state you work in otherwise Amravati will also have one Udhampur in it. ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
सि.एम. भागडे, नागपूर.

"दुर्दम्य" पूर्ण वाचुन झालं. लेखकाने एकनाथन साहेबांविषयी खुप छान लिहिलं आहे. ते माझे पहीले एसी होते. नवीन निरीक्षक असतांना, त्यांना व्हरांड्यात बसलेले पाहुन, लपुन छपुन रेंज ची डाक देऊन मी पळून जात असे. तेव्हा दर्शन घेऊन प्रत्यक्ष भेटलो असतो तर बे झाले असते, असं आता वाटते. ...Read more