* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: FEAR IS THE KEY
  • Availability : Available
  • Translators : ASHOK PADHYE
  • ISBN : 9788177661781
  • Edition : 2
  • Publishing Year : AUGUST 2001
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 240
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :ALISTAIR MACLEAN COMBO SET- 14 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
A CLASSIC NOVEL OF RUTHLESS REVENGE SET IN THE STEEL JUNGLE OF AN OIL RIG IN THE GULF OF MEXICO – AND ON THE SEA BED BELOW IT. NOW REISSUED IN A NEW COVER STYLE.A SUNKEN DC-3 LYING ON THE CARIBBEAN FLOOR. ITS CARGO: TEN MILLION, TWO HUNDRED AND FIFTY THOUSAND DOLLARS IN GOLD INGOTS, EMERALDS AND UNCUT DIAMONDS GUARDED BY THE REMAINS OF TWO MEN, ONE WOMAN AND A VERY SMALL BOY. THE FORTUNE WAS THERE FOR THE TAKING, AND READY TO GRAB IT WERE A BLUE-BLOODED OILMAN WITH HIS OWN OFFSHORE RIG, A GANGSTER SO COLD AND INDEPENDENT THAT EVEN THE MAFIA COULDN`T DO BUSINESS WITH HIM AND A PSYCHOPATHIC HIRED ASSASSIN.AGAINST THEM STOOD ONE MAN, AND THOSE WERE HIS PEOPLE, THOSE SKELETONS IN THEIR WATERY COFFIN. HIS NAME WAS TALBOT, AND HE WOULD BURY HIS DEAD – BUT ONLY AFTER HE HAD AVENGED THEIR MURDERS.
प्रथम ते नाट्य हजारो फूट उंच हवेत सुरू झाले. नंतर हा हवेतला रंगमंच जमिनीवर आला, समुद्रात गेला व अखेर समुद्रतळावर पोचला. त्या समुद्रतळावरील रंगमंचावरती शेवटी रोमहर्षक नाट्याने कळस गाठला. अब्जावधी डॉलर्सची संपत्ती, गुन्हेगार व एक झपाटलेला माणूस. यात घडणारे हे नाट्य आजवर मराठी माणसाने कधी कल्पनेतही आणले नसेल. ‘गन्स ऑफ नॅव्हरॉन्स’चा कादंबरीकार अ‍ॅलिस्टर मॅक्लीन याच्या ‘फिअर इज द की’ या जगभर गाजलेल्या कादंबरीचा अनुवाद मराठीत प्रथमच श्री. अशोक पाध्ये यांनी त्यांच्या खिळवून टाकणा-या शैलीत केला आहे. एकदा हे पुस्तक हातात पडले की, वाचून संपेपर्यंत कोणताही वाचक ते दुसNया कोणाला देत नाही. अतिशय उत्कंठावर्धक, थरारक आणि अजोड मानवी बुद्धिकौशल्य दाखविणारी कादंबरी.

No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #SOUTHBYJAVAHEAD #THEDARKCRUSADER #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #SEAWITCH #PUPPETONACHAIN #MADHAVKARVE #THE SATAN BUG # # THE LAST FRONTIER ##अलीस्टर मैकलिन # अशोकपाध्ये #ASHOK PADHYE # THE DARK CRUSADER #THEGOLDEN GATE #फिअरइजदकी #FEARISTHEKEY #
Customer Reviews
  • Rating StarShubham Subhash Chougale

    फियर इज द की मूळ इंग्रजी लेखक एलिस्टर मेक्लीन मराठी अनुवाद अशोक पाद्धे ही एक समुद्रात घडणारी रहस्यकथा आहे पुस्तकातील प्रत्येक प्रसंग वाचताना समोर पाहत आहोत असे वाटते 👏 पुस्तक वाचायला सुरू केल्यावर ठेवावेसेच वाटत नाही एवढे भारी आहे टालबोटयाची ही कथा खरोखरच स्फूर्तिदायक आहे कथेची सुरुवात कोर्टात होते जिथे टालबोट हा एक गुन्हेगार म्हणून आपल्यासमोर येतो न्यायाधीशांसमोर त्याने केलेला युक्तिवाद खरोखरच वाचनीय आहे 👏 नंतर त्याने कोर्टातून केलेले पलायन लेखकाने खूपच थरारक पद्धतीने लिहलय या पलायनासाठी तो जिचा वापर करतो तिच्यामुळेच सुरू होतो तो थरारक प्रवास 👏 कथेत खून. मारामारी. रोमांस. खजिना. असे अनेक ट्विस्ट आहेत पुस्तकातून लेखकांचा समुद्र अभ्यास दिसून येतो कारण वेळोवेळी चकित करणारे पुस्तकातील सर्वच प्रसंग 👏 पुस्तकाचा शेवट कल्पनेपलीकडचा व अतिशय थरारक आहे टालबोट नक्की कोण असतो? तो वाचतो की मरतो? नायिकेचे शेवटी काय होते? असे अनेक प्रश्न व त्यांची योग्य उत्तरे देणारे हे अतिशय स्फूर्तिदायक पुस्तक वाचायलाच पाहिजे 👏 ©शुभम सुभाष चौगुले ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 16-09-2001

    प्रथम ते नाट्य हजारो फूट उंच हवेत सुरू झाले. नंतर हा हवेतला रंगमंच जमिनीवर आला. समुद्रात गेला व अखेर समुद्रतळावर पोहोचला. त्या समुद्रतळावरील रंगमंचावरती शेवटी रोमहर्षक नाट्याने कळस गाठला. अब्जावधी डॉलर्सची संपत्ती, गुन्हेगार व एक झपाटलेला माणूस यात घणारे हे नाट्य आजवर मराठी माणसाने कधी कल्पनेतही आणले नसेल. ‘गन्स ऑफ नॅव्हरॉन्स’चा कादंबरीकार अ‍ॅलिस्टर मॅक्लीन याच्या ‘फिअर इज द की’च जगभर गाजलेल्या कादंबरीचा अनुभव मराठीत प्रथमच श्री. अशोक पाध्ये यांनी त्यांच्या खिळवून टाकणाऱ्या शैलीत केला आहे. एकदा हे पुस्तक हातात पडले की, वाचून संपेपर्यंत कोणताही वाचक ते दुसऱ्या कोणाला देत नाही. अतिशय उत्कंठावर्धक, थरारक आणि अजोड मानवी बुद्धिकौशल्य दाखवणारी कादंबरी. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more