* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789353170233
  • Edition : 2
  • Publishing Year : JULY 2018
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 268
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS IS A STORY ABOUT A DYNAMIC IAS OFFICER WHO IS STRICT AND DOESN’T FUNCTION UNDER ANYONE’S PRESSURE. THAT IS THE REASON HE FACES LOT OF PROBLEMS IN HIS DAY TO DAY FUNCTIONING. WHEN FUNCTIONING AS A COLLECTOR OF BANDRA, HE NOTICES SOME CORRUPTION ACTIVITIES AND MULTI CRORE SCAMS. MANY BIG POLITICIANS, SENIOR OFFICERS AND POWERFUL BUILDERS HAVE THEIR VESTED INTERESTS IN THESE ACTIVITIES. THE BRAVE COLLECTOR IS PRESSURIZED BY THE WHOLE LOBBY AT ADMINISTRATIVE LEVEL. BUT HE IS FIRM ON HIS DUTIES , RESPONSIBILITIES & DECISIONS. THE COLLECTOR SHAKES HANDS WITH MEDIA TO STOP THESE KINDS OF CORRUPTION ACTIVITIES. THIS SENSATIONAL BOOK ‘RED TAPE’ PORTRAYS HIS HARD STRUGGLE OF FIGHTING AGAINST A CORRUPT SYSTEM IN AN EXCITING WAY.
सरकारी अधिकारी ही उपाधी भारदस्त वाटत असली तरी सत्ताधारी, विरोधक, प्रसार माध्यमे, पुढारी, सामाजिक कार्यकर्ते अशा अनेक घटकांसाठी खरे तर ते ‘सॉफ्ट टार्गेट’ असते. कारण, कोणत्याही चांगल्या कामाचे श्रेय जाते सरकारकडे आणि काम बिघडले तर खापर मात्र फोडले जाते प्रशासनावर. संबंधित निर्णय किंवा योजना चांगली होती, पण प्रशासन कुचकामी ठरल्याने त्याची वाट लागली असा सर्वसाधारण मतप्रवाह असतो. अशी टिप्पणी करणे सोपे असले तरी प्रत्यक्षात विविध प्रकारच्या दबावांना, राजकारणाला, हितसंबंधियांच्या कट-कारस्थानांना तोंड देत आणि अनेकविध लाभांना तसेच आमिषांना दूर लोटत निर्णयाची अंमलबजावणी करणे महामुष्किल काम. शिवाय हे करताना सतत प्रशासनाच्या मजबूत पोलादी चौकटीचे भानही बाळगावे लागते. साहजिकच बहुतेकजण प्रवाहप्रतीत होत सत्ताधाऱ्यांचे वा वरिष्ठांचे ‘होयबा’ होणे पसंत करतात आणि स्वत:चे उखळही पांढरे करून घेतात. मात्र काही जिगरबाज अधिकारी प्रशासकीय यंत्रणेत राहूनच या अ-व्यवस्थेविरोधात झगडा पुकारतात. व्यापक जनहीत डोळ्यासमोर ठेवून न्याय्य हक्कांसाठी झगडणाऱ्या अशा मोजक्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जिवावरच प्रशासनाचा गाडा पुढे सरकत असतो. दोन दशकांहून अधिक काळच्या पत्रकारितेत या सगळ्याची जवळून झालेली ओळख आणि सुमारे पावणेदोन वर्षे मंत्रालयात राजपत्रित अधिकारी म्हणून काम करताना ‘आतून’ घेतलेला प्रत्यक्ष अनुभव याची गुंफण करत एका वेगळ्या विषयाची केलेली ही मांडणी..
सार्वजनिक वाचनालय, नाशिकतर्फे धनंजय कुलकर्णी पुरस्कार.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#रेड टेप #अभिजित कुलकर्णी #करप्शन #लाल फितीचा कारभार #प्रशासकीय चौकाट #संघर्ष #राजपत्रित अधिकारी #भ्रष्टाचाराशी लढा #जिल्हाधिकारी #कमिशनर #लाभार्थी #विरोधक #पत्रकार #दलाल #माफिया #आय.ए.एस. #अधिकारी #आय.पी.एस अधिकारी # झुंजार अधिकाऱ्याची उत्कंठावर्धक संघर्षगाथा #जया देशमुख #आरोग्यमंत्री #महेश #अभिषेक #RED TAPE #ABHIJIT KULKARNI #CORRUPTION #RED RULE #ADMINISTRATOR #CONFLICT #GAZETTED OFFICER #FIGHTING CORRUPTION #COLLECTOR #COMMISSIONER #BENEFICIARY #OPPONENT #JOURNALIST #BROKERS #MAFIA #OFFICER #IPS OFFICER #EXCITED FIGHT FOR THE OFFICER #JAYA DESHMUKH #HEALTH MINISTER #MAHESH #ABHISHEK
Customer Reviews
  • Rating StarOnkar Pardeshi

    Hello Abhijeet Sir, I have recently read your "Red Tape" Novel. It is really really good and the structure of the language is very good. You Emphasised on the corruption and dark side of our Administration and Government is really really good. I hopethe second part of the novel will come soon! ...Read more

  • Rating StarVaibhav Salunke

    दैनिक दिव्य मराठी, नाशिकचे डेप्युटी एडिटर श्री. अभिजित कुलकर्णी यांच्या लेखणीतून उतरलेली ‘रेड टेप’ ही कादंबरी, २६४ पृष्ठांची ही कांदबरी मेहता पब्लिशिंग हाऊस, (पुणे) यांनी प्रकाशित केली आहे. काल्पनिक कथानकावर बेतलेली ही कादंबरी वाचकांच्या पातळीवर कालपनिक राहत नसून आजूबाजूला घडणारी घटनाचं बनून जाते. क्षणाक्षणाला कथानकातील उत्कंठा वाढवत जाते. बांद्रयाचे कर्तव्यदक्ष, प्रामाणिक व धडाडीचे जिल्हाधिकारी महेश राऊत हे या कादंबरीचे नायक आहेत. तर ‘प्रखर’ या दैनिकाचा झुंझार, निर्भीड मुख्य बातमीदार जया देशमुख हे सहनायक आहेत. आजूबाजूचे पात्र आपसूकच मग ओघाने येतात. गोरगरीब रूग्णांवर सवलतीच्या दरात उपचार व्हावेत म्हणून सरकातर्फे बांद्रयाला मध्यवस्तीत उभारायच्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी राखीव असलेला कोट्यावधी रूपयांचा भूखंड गिळून टाकण्याचा घाट घातला जातो. यात राजकारणी, मंत्री, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, बिल्डर, ठेकेदार व दलाल या सर्वांच्या ‘अभद्र युती ’चा समावेश असतो. या अभद्र युतीचा लोकहित विरोधी असलेला डाव उधळून लावण्याचा चंग जिल्हाधिकारी महेश राऊत करतात. त्यांना जया देशमुख या निर्भीड पत्रकाराची साथ-संगत लाभते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूलमंत्री, बांधकांममंत्री, आरोग्यमंत्री आणि मंत्री मंडळातील अजून एक-दोन मंत्री, मुख्यसचिव, महसूल सचिव, सचिव दर्जाचे अजून एक-दोन अधिकारी, बिल्डर, ठेकेदार आणि कार्यालयातील काही घरभेदी अधिकारी/कर्मचारी अशी सर्व फौज एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला जिल्हाधिकारी महेश राऊत व त्यांना आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून मदत करणारा पत्रकार जया देशमुख यांचा जबरदस्त असा दुहेरी संघर्ष या कादंबरीत पत्रकार, संपादक अभिजित कुलकर्णी यांनी उभा केला आहे. या कथानकावर निश्चित एखादा चित्रपट होऊ शकतो. सामान्य माणासाला कायमच मुख्यमंत्री व त्यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांचा रूबाब-आब व व्यक्तीमत्त्वाचे आकर्षण राहिले आहे. या आकर्षणाबरोबरच त्यांच्या वर्तुळात घडणाऱ्या आतील घडामोडी, लफडी याविषयी ‘चवितचर्ण’ करण्यात एका विशिष्ट गटाला रस असतो. ही सर्वसामान्य वाचकांची नस नेमकी हेरत कुलकर्णी यांनी संपूर्ण कादंबरीत मंत्रीमंडळातील मंत्री, प्रशासनातील अधिकारी यांच्याशी संबंधित खुसखुसीत चर्चा कादंबरीत ठिकठिकाणी पात्रांच्या तोंडून उदधृत केल्या आहेत. मुख्यमंत्री, मंत्री, सचिव, जिल्हाधिकारी, पत्रकार यांचा एकमेकांशी प्रत्यक्ष व दूरध्वनीच्या माध्यमातून होणार संवाद अभिजित कुलकर्णी यांनी आपल्या ओघवत्या शैलीत कादंबरीत शब्दब्ध केला आहे. यामुळे वाचक म्हणून आपण या संवाद शैलीच्या प्रेमात अधिक पडत जातो. जिल्हाधिकारी महेश राऊत यांना अडकविण्यासाठी विदेश दौऱ्यांत त्यांच्यावर लावण्यात आलेला ‘हॅनी ट्रॅप’ बाबत आपली उत्कंठा वाढत जाते. जिल्हाधिकारी या ‘हॅनी ट्रॅप’ मध्ये फसतील का ? याची क्षणा-क्षणाला उत्कंठा वाढत जाते. व काळजी पण वाटत जाते. मंत्रालयात महेश राऊत यांची बदली झाल्यानंतर राऊत हताश, निराश होतात. प्रसंगी नोकरी सोडण्याचा निर्धार करतात. मात्र त्यांचा पत्रकार मित्र त्यांची समजूत घालतो. आणि त्यांना मंत्रालयात रूजू होण्याचा सल्ला देतात. महेश राऊत मंत्रालयात रूजू झाल्यानंतर आपणास वाटते. हा संघर्ष आता संपला ; पण मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून राऊत ‘बांद्रा’ तील भूखंड हळपण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव उघळून लावतात की ते त्यात अपयशी ठरतात ? हा संघर्ष कादंबरीत वाचण्यासारखा आहे. कादंबरी एकूणच उत्कंठावर्धक, वाचकांची अभिरूचीची भूक सांभाळणारी, खुसखुसीत, खुमासदार झालेली आहे. ‘रेडटेप !’. ...Read more

  • Rating StarShrikant Adhav

    दैनिक दिव्य मराठी, नाशिकचे डेप्युटी एडिटर श्री. अभिजित कुलकर्णी यांच्या लेखणीतून उतरलेली ‘रेड टेप’ ही कादंबरी, २६४ पृष्ठांची ही कांदबरी मेहता पब्लिशिंग हाऊस, (पुणे) यांनी प्रकाशित केली आहे. काल्पनिक कथानकावर बेतलेली ही कादंबरी वाचकांच्या पातळीवर काल्निक राहत नसून आजूबाजूला घडणारी घटनाचं बनून जाते. क्षणाक्षणाला कथानकातील उत्कंठा वाढवत जाते. बांद्रयाचे कर्तव्यदक्ष, प्रामाणिक व धडाडीचे जिल्हाधिकारी महेश राऊत हे या कादंबरीचे नायक आहेत. तर ‘प्रखर’ या दैनिकाचा झुंझार, निर्भीड मुख्य बातमीदार जया देशमुख हे सहनायक आहेत. आजूबाजूचे पात्र आपसूकच मग ओघाने येतात. गोरगरीब रूग्णांवर सवलतीच्या दरात उपचार व्हावेत म्हणून सरकातर्फे बांद्रयाला मध्यवस्तीत उभारायच्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी राखीव असलेला कोट्यावधी रूपयांचा भूखंड गिळून टाकण्याचा घाट घातला जातो. यात राजकारणी, मंत्री, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, बिल्डर, ठेकेदार व दलाल या सर्वांच्या ‘अभद्र युती ’चा समावेश असतो. या अभद्र युतीचा लोकहित विरोधी असलेला डाव उधळून लावण्याचा चंग जिल्हाधिकारी महेश राऊत करतात. त्यांना जया देशमुख या निर्भीड पत्रकाराची साथ-संगत लाभते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूलमंत्री, बांधकांममंत्री, आरोग्यमंत्री आणि मंत्री मंडळातील अजून एक-दोन मंत्री, मुख्यसचिव, महसूल सचिव, सचिव दर्जाचे अजून एक-दोन अधिकारी, बिल्डर, ठेकेदार आणि कार्यालयातील काही घरभेदी अधिकारी/कर्मचारी अशी सर्व फौज एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला जिल्हाधिकारी महेश राऊत व त्यांना आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून मदत करणारा पत्रकार जया देशमुख यांचा जबरदस्त असा दुहेरी संघर्ष या कादंबरीत पत्रकार, संपादक अभिजित कुलकर्णी यांनी उभा केला आहे. या कथानकावर निश्चित एखादा चित्रपट होऊ शकतो. सामान्य माणासाला कायमच मुख्यमंत्री व त्यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांचा रूबाब-आब व व्यक्तीमत्त्वाचे आकर्षण राहिले आहे. या आकर्षणाबरोबरच त्यांच्या वर्तुळात घडणाऱ्या आतील घडामोडी, लफडी याविषयी ‘चवितचर्ण’ करण्यात एका विशिष्ट गटाला रस असतो. ही सर्वसामान्य वाचकांची नस नेमकी हेरत कुलकर्णी यांनी संपूर्ण कादंबरीत मंत्रीमंडळातील मंत्री, प्रशासनातील अधिकारी यांच्याशी संबंधित खुसखुसीत चर्चा कादंबरीत ठिकठिकाणी पात्रांच्या तोंडून उदधृत केल्या आहेत. मुख्यमंत्री, मंत्री, सचिव, जिल्हाधिकारी, पत्रकार यांचा एकमेकांशी प्रत्यक्ष व दूरध्वनीच्या माध्यमातून होणार संवाद अभिजित कुलकर्णी यांनी आपल्या ओघवत्या शैलीत कादंबरीत शब्दब्ध केला आहे. यामुळे वाचक म्हणून आपण या संवाद शैलीच्या प्रेमात अधिक पडत जातो. जिल्हाधिकारी महेश राऊत यांना अडकविण्यासाठी विदेश दौऱ्यांत त्यांच्यावर लावण्यात आलेला ‘हॅनी ट्रॅप’ बाबत आपली उत्कंठा वाढत जाते. जिल्हाधिकारी या ‘हॅनी ट्रॅप’ मध्ये फसतील का ? याची क्षणा-क्षणाला उत्कंठा वाढत जाते. व काळजी पण वाटत जाते. मंत्रालयात महेश राऊत यांची बदली झाल्यानंतर राऊत हताश, निराश होतात. प्रसंगी नोकरी सोडण्याचा निर्धार करतात. मात्र त्यांचा पत्रकार मित्र त्यांची समजूत घालतो. आणि त्यांना मंत्रालयात रूजू होण्याचा सल्ला देतात. महेश राऊत मंत्रालयात रूजू झाल्यानंतर आपणास वाटते. हा संघर्ष आता संपला ; पण मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून राऊत ‘बांद्रा’ तील भूखंड हळपण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव उघळून लावतात की ते त्यात अपयशी ठरतात ? हा संघर्ष कादंबरीत वाचण्यासारखा आहे. कादंबरी एकूणच उत्कंठावर्धक, वाचकांची अभिरूचीची भूक सांभाळणारी, खुसखुसीत, खुमासदार झालेली आहे. शेवटी जाता-जाता ऐवढेच म्हणावे वाटते की, ‘मुंबई दिनांक’ व ‘सिंहासन’ या अरूण साधूंच्या मराठी कादंबरीनंतर बऱ्याच दिवसांनी एका पत्रकाराने लिहलेली दर्जेदार मराठी कादंबरी वाचण्यात आली ती म्हणजे ‘रेडटेप !’ ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 03-02-2019

    सरकारी अधिकाऱ्याची संघर्षगाथा... साधारणपणे पुस्तकाचं बाह्यरूप, लेखक असं बघून पुस्तक वाचायचं की नाही, हे मी ठरवतो. पुस्तकांच्या दुकानात नवीन काय हे चाळताना ‘रेड टेप’ समोर आलं. लेखक नवीन असल्यानं मला प्रश्न पडला. मुखपृष्ठ खूपच लक्षवेधक असल्यानं त्यावरं फाइलचा लाल बंध असलेलं छान चित्र पाहून ही सरकारी कारभारावरची कादंबरी असली पाहिजे, असा अंदाज बांधला. या लाल फितीचा जाच सर्वसामान्य माणसाला फार होत असतो. काही व्यक्ती त्याविरुद्ध, त्यातल्या अन्यायकारक गोष्टींविरूद्ध लढतात हे आपण अधूनमधून वर्तमानपत्रांतून वाचतो, बघतो. कधीकधी अनुभवतोसुद्धा; पण आपण थंड बसतो. या पार्श्वभूमीवर ‘रेड टेप’ वाचावी अशी ऊर्मी आली. ते पुस्तक वाचायला घेतलं आणि एकहाती वाचून संपवून टाकलं. प्रथमपासून सुरू होणारं सूत्र शेवटपर्यंत टिकवण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. त्या लेखनात पत्रकाराचं वृत्तलेखन सतत जाणवत राहतं. अनेक प्रसंगांची गुंफण विशिष्ट शैलीत सलगपणे केलेली असल्यानं आपण प्रथम चकित होतो. नंतर विचारप्रवृत्त होतो. चीड येते आणि मनापासून प्रस्थापित चुकीच्या गोष्टींविरुद्ध लढणाऱ्या माणसाच्या बाजूनं उभा राहतो. समाजकारण, राजकारण, सरकारी कारभार आणि सर्वसामान्य माणूस या सर्वांचं एक वेगळं दर्शन, एक वेगळा पैलू पुस्तक वाचताना जाणवत राहतं. सुमारे २६४ पानांचं हे पुस्तक ओघवत्या भाषेत आणि वास्तवाच्या पातळीवर असल्यानं मनाला भावतं. भिडतं. महेशसारख्या अधिकारी सद्य:स्थितीत खूप आवश्यक आहे, असं वाटतं. अशा अधिकाऱ्यांची फळी निर्माण झाली, तर परीवर्तन होऊ शकेल. समाजात, सरकारमध्ये, प्रशासनात, पत्रकारितेत सारंच वाईट नाही. ‘सब घोडे बारा टक्के’ असं आपण समजतो तसं नाही. काही अधिकारी, पत्रकार, राजकारणी, इतर माणसं चांगली आहेत हे समजतं. मात्र, सन्मार्गी आणि कर्तबगार अधिकाऱ्याच्या वाटेत कसे पेरले जातात, याचं उत्कृष्ट वर्णन पुस्तकात केलेलं आहे. उच्चपदस्थ अधिकारी, मंत्री, कायदा खातं इत्यादी जर भ्रष्ट असेल, तर त्यातले लागेबांधे कसे घट्ट असतात यावर लेखकानं छान झोत टाकला आहे. महेशसारख्या अधिकाऱ्याचं प्रशासकीय कौशल्य, काटेकोरपणे कायदा पाळणं आणि आपलं काम करत राहणं हे किती जिकीरीचं हे लक्षात येते. वाचकामध्ये कधीकधी विषण्णता, कधी खेद, कधी उत्कंठा, कधी चीड अशा अनेक वेगवेगळ्या भावना उचंबळून येतात. शेवटी बुद्धी विचार करू लागते. असं विचारप्रवृत्त करणं हेच लेखकाचं कौशल्य आहे. नवेदित असूनही त्याला ते जमलं आहे. आयएएस दर्जाचे अधिकारी एकमेकांशी कसे वागतात, किती ताणतणावात असतात, त्यांचे कुटुंबीय कशाकशाला तोंड देतात, ते या कादंबरीत समर्थपणे रेखाटण्यात आलं आहे. समाज जडणघडणीच्या वाटचालीत अशी पुस्तकं मोठा वाटा उचलतात. एकूण सजग वाचकांनी, स्पर्धा, परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी, समाजकारण्यांनी, पत्रकारांनी आणि अधिकाऱ्यांनीसुद्धा वाचावं असं हे पुस्तक आहे. प्रथम अपत्याचं इतकं छान रूपडं रेखाटण्यात लेखक अभिजित कुलकर्णी यशस्वी झाले आहेत. त्यांनी असंच शोधपत्रकारितेतलं लेखन करावं यासाठी शुभेच्छा. – डॉ. हिरेन निरगुडकर ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more