D.T.BHOSALE

About Author

Birth Date : 08/05/1935


NA

भोसले यांच्या लहानपणीच, त्यांचे आई-वडील वारल्याने पडेल ती कामे करून शिष्यवृत्त्या मिळवून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. १९५६ साली एस.एस.सी. परीक्षेत (जुनी मॅट्रिक) ते पंढरपूर केंद्रात सर्वप्रथम आले. त्यानंतर १९६० साली त्यांनी सोलापूर येथील संगमेश्वर कॉलेजमधून बी.ए.ची पदवी प्रथम श्रेणीत संपादित केली. निमित्ताने त्यांना एक सुवर्णपदक, चार पारितोषिके आणि दोन शिष्यवृत्त्या मिळाल्या. १९६२ साली पुणे विद्यापीठातून उच्च द्वितीय श्रेणीत एम.ए.ची पदवी घेतल्यानंतर, त्यांनी १९७७ साली शिवाजी विद्यापीठातून पी.एचडी. केली. रविकिरण मंडळाची कविता’ या विषयावर त्यांचा प्रबंध होता.भोसले यांनी सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेत मराठी विषयाचे प्राध्यापक म्हणून नोकरी केली. त्यानंतर उपप्राचार्य, पदव्युत्तर विभाग प्रमुख, तसेच प्रभारी प्राचार्य म्हणून मंचर (जिल्हा - पुणे) आणि पंढरपूर येथे काम केले. १९९५ साली त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
GRAMIN BOLICHA SHABDAKOSH Rating Star
Add To Cart INR 260

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
ॲड. प्रशांत यावले, अमरावती

आज "दुर्दम्य" वाचुन पुर्ण झाले. मराठी साहित्याचा एक अप्रतिम अविष्कार. एक व्यक्तीचित्रण पण अत्यंत प्रभावी लेखन. एकाच व्यक्तीचे वेगवेगळे गुण वेगवेगळ्या कलात्मक वर्णनाने ईतक्या समर्थपणे मांडण्याचे कौशल्यपूर्ण लिखाण. शेवटच्या प्रकरणाने ईतक्या कठोर व्यक्तमत्वा बदल देखील भावना चाळवल्या. त्या व्यक्तीचे खरे नाव माहीती असुन देखील पुस्तक वाचुन संपवल्यावर ते आठवतच नव्हते ईतका प्रभाव "एकनाथन"चा राहीला. खुप सुंदर. ...Read more

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
शंतनू

ही एक थ्रिलिंग गोष्ट आहे. या पुस्तकाचा सिक्वेल वाचायला आवडेल.