* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177663631
  • Edition : 13
  • Publishing Year : JUNE 1984
  • Weight : 100.00 gms
  • Pages : 148
  • Language : MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
  • Available in Combos :V. P. KALE COMBO SET-52 BOOKS.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
`CHEERS!` THE GLASSES CLINK ON EACH OTHER. OF COURSE, THAT IS NOT THE ONLY TIME FOR `CHEERS`. VAPU`S `CHEERS` TOUCHES EVERY SOUL AND PRODUCES THE RHYTHMIC CLINKING, RESULTING INTO CHEERING UP OF THE HEARTS TOGETHER, SPREADING HAPPINESS. VAPU, A PATRON OF HAPPINESS, A COLLECTOR OF HUMAN BEINGS, A FAN OF UNIQUE CHARACTERS; HELPING US TO MEET ALL THESE EXCLUSIVE AND EXQUISITE PEOPLE THROUGH HIS WORD-PORTRAITS, IN `CHEERS!` ANNA ADVISES VAPU, `DON`T EVER DISCARD THE OLD. WHILE PRACTISING IT, YOU WILL COME ACROSS NEW. THE FIRST LETTER THAT WE WRITE IS AT THE AGE OF THREE. THEREAFTER, WE KEEP ON WRITING TILL OUR LAST BREATH.` SOMEWHERE SOME NOBLE BHAUSAHEB IMPLANTS THE SEED OF CONFIDENCE, DEEP DOWN. WE COME ACROSS MANY SUCH `GLASSES`, TRANSPARENT IN THEIR ATTITUDE AND CLEAR IN THEIR MIND. THEY REMAIN FULL FOREVER. THEY REFRESH OUR MINDS WHILE CHEERING US UP. INTRODUCTION OF PERSONALITIES SHOULD ALWAYS CHEER UP PEOPLE. SOME GET THE OPPORTUNITY TO BE IN THE COMPANY OF SUCH NOBLE PEOPLE. VAPU HAD BEEN ONE OF THEM. HIS GREATNESS LIES IN HIS READING SKILLS WHICH HE FURTHER PEN-PORTRAYED FOR HIS READERS. THAT IS HOW WE READERS ARE TOUCHED WITH HIS `CHEERS!` IT IS INTOXICATING BUT NOT INTIMIDATING; IT IS ALCOHOLIC BUT NOT SEDUCING. THERE ARE GLASSES, BUT THEY ARE NOT EMPTY. THERE ARE COLOURS, BUT THEY DO NOT SPOIL THE BEAUTY. CHEERS!
‘चिअर्स’ फक्त पेल्याला पेला भिडल्यावर होत नाही. वपुंचं ‘चिअर्स’ हृदयाला भिडलेलं हृदय आणि त्यातून उमलणारी आनंदधून अधोरेखित करतं. ज्यांच्या सहवासात आयुष्य बहरुन जावं, अशी वपुंच्या आयुष्यातील विलक्षण माणसं या पुस्तकात भेटतात. एखादे अण्णा वपुंना सांगतात, ‘जुनं काहीही सोडायचं नाही, जुनं सगळं करता करताच नवं सापडेल.. वयाच्या तिसऱ्या वर्षी आपण श्री गिरवतो. ती श्री इतिश्री होईतो राहतेच.’ तर भाऊसाहेबांसारखा उमदा माणूस आत्मविश्वासाचं खोल बीज रुजवतो. असे अनेक पेले इथे भेटतात. रिते होत नाहीत तर रसिकांच्या मनोवृत्तीला चिअर्स करतात. आयुष्य असंही जगता येतं हे सांगून जातात. व्यक्तिपरिचय हा मनाला उभारी देणारा असावा, उत्तेजन देणारा असावा आणि त्यासाठी अशा व्यक्तींचा सहवास मिळावा. वपुंना सहवास मिळाला आणि म्हणून ते त्या व्यक्तींना वाचू शकले. चिअर्स म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवू शकले. नशा आहे पण धुंदी नाही. मद्य आहे पण ग्लानी नाही. पेले आहेत पण रितेपण नाही. रंग आहेत जे बेरंगी करत नाहीत. चिअर्स !
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
25TH MARCH #SANVADINI #VAPU 85 #NAVRA MHANAVA AAPALA #MODEN PAN VAKNAR NAHI #ONE FOR THE ROAD #ZOPALA #MAYABAJAR #CHATURBHUJ #INTIMATE #GULMOHAR #VAPURVAI #HUNKAR #MI MANUS SHODHATOY #BAI BAYKO CALENDER #SWAR #BHULBHULAIYA #KA RE BHULALASI #VALAY #KARMACHARI #AIK SAKHE #GOSHTA HATATLI HOTI #TAPTAPADI #GHAR HARAVLELI MANASA #DOST #MAHOTSAV #KAHI KHAR KAHI KHOTA #SAKHI #RANG MANACHE #AAPAN SARE ARJUN #THIKARI #TU BHRAMAT AAHASI VAYA #HI VAT EKTICHI #PARTNER #DUNIYA TULA VISAREL #PREMAMAYEE #FANTASY EK PREYASI #PANPOI#NIMITTA #MAZA MAZYAPASHI? #PLEASURE BOX BHAG 1 #PLEASURE BOX BHAG 2 #KATHA KATHANACHI KATHA #VAPURZA #RANGPANCHAMI #SANGE VADILANCHI KIRTI #CHEERS #MANASA #JAPUN TAK PAUL #LALITKALECHYA SAHAWASAT #DAHAVYA RANGETUN #२५ मार्च #संवादिनी #वपु# ८५ # नवरा म्हणावा आपला #मोडेन पण वाकणार नाही #वन फॉर द रोड#झोपाळा #मायाबाजार #चतुर्भुज #इन्टिमेट #गुलमोहर #वपुर्वाई #हुंकार #मी माणूस शोधतोय #बाई, बायको, कॅलेंडर #स्वर #भुलभुलैय्या #का रे भुललासी #वलय #कर्मचारी #ऐक सखे #गोष्ट हातातली होती! #तप्तपदी #घर हरवलेली माणसं #दोस्त #काही खरं काही खोटं #सखी #महोत्सव #रंग मनाचे #आपण सारे अर्जुन #ठिकरी #तू भ्रमत आहासी वाया #"ही वाट एकटीची #(राज्य पुरस्कार १९७०-७१)" #पार्टनर #दुनिया तुला विसरेल #प्रेममयी #फॅण्टसी एक प्रेयसी #पाणपोई #निमित्त #माझं माझ्यापाशी? #प्लेझर बॉक्स भाग-१ #प्लेझर बॉक्स भाग-२ #कथाकथनाची कथा #वपुर्झा #रंगपंचमी #सांगे वडिलांची कीर्ती #चिअर्स #माणसं #जपून टाक पाऊल! # ललितकलेच्या सहवासातून #दहाव्या रांगेतून
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    माणूसवेड्या माणसाने जमवलेली रंगतदार मैफल चिअर्स... चिअर्स म्हणून मैफलीला आरंभ केला की तिचा रंग मदहोश होता जातो. विख्यात कथाकथनकार व. पु. काळे अशा मैफली रंगवण्यात मातबर आहेत. मैफल रंगवायला माणसेही जबरदस्त लागतात. वैचित्र्यपूर्ण आयुष्य जगलेली, जीवनातल नाट्यपूर्ण चढ-उतार बघितलेली, खूप काही भोगलेली. सोसलेली. एरवीही माणसे आपल्या अनुभवाचे भांडार आपल्या मनाच्या गाभाऱ्यात ठेवून त्याची हळुवारपणे जपणूक करीत असतात. परंतु एखाद्या मैफलीत, दोन-चार पेग अंगांगात रिचल्यावर, थोडी फार बंधनमुक्त होतात आणि आपल्या त्या अद्भूतरम्य जंगी खजिन्यातल्या काही चित्रांची चुणूक दाखवण्याएवढी मोकळी होतात. असे मोकळे झाल्यावर मग मैफलीला बहार येते. अज्ञातावरचे आवरण दूर होते आणि मानवी मनाच्या गहन गूढतेचे अलौकिक दर्शन घडते. व.पु. काळे अशा या लौकिकातील अलौकिकाचे दर्शन घेण्यात रमतात आणि असे काहीतरी दिव्य भव्य समोर आल्यावर नतमस्तक होतात. आपल्या त्या अनुभवात ते मग आपल्या वाचकांनाही कधी कधी सामील करून घेतात. `चिअर्स` असे म्हणून, अनुभवाचा चषक उंचावून ते आपल्याला अशाच एका मैफलीत मनःपूर्वक सामील करून घेत आहेत. रसिकराज रामभूय्या दाते, जिंदादिल शायर– भाऊसाहेब पाटणकर, जाज्ज्वल्य हिंदुत्व निष्ठा जपणारे पु.भा.भावे अण्णा, शोधून न सापडणाऱ्या आणि मागून न मिळणाऱ्या आयुष्याचा जमेल तसा डाव मांडणारे गीतकार सुधीर मोघे, झोपेचा वेळ सोडला तर अखंड पुस्तक विक्रीचे व्रत चालवणारे आयडियलचे कांताशेठ नेरूरकर, तुम्हाला गाफील ठेवून तुमचा नेमका मूड कुशलतेने टिपणारे छायाचित्रकार राजदत्त, संगीतकारांच्या हुबेहुब नकला करणारे नकलाकार वि.र. गोडे, कुटुंबाच्या गरजा संपल्या की कर्तापुरुष कुटुंबाचं देणं लागत नाही; त्यानं चार भिंतीच्या बाहेर पडायला हवं तरच तो मोठा होईल, असे सांगणारे आणि त्याप्रमाणे वागणारे डॉ. श्रीखंडे, आपल्या हातचलाखीने बघता बघता हातातला रुपाया गायब करून चकित करणारे जादूगार अशोक अशा माणसांना `चिअ र्स` म्हणून मैफलीत आणून वपुंनी या मैफलीचा थाट खुलविला आहे. इतरही माणसांना वपुंनी या मैफलीत सामील करून घेतले आहे. त्यात इंदूरचे ज्योतिषी अण्णा पुराणिक आहेत. या पुराणिकांनी बॅ. महमद अली जीना यांनाही आपल्या ज्योतिषशास्त्राच्या बळावर काबीज केले. मोरारजीभार्इंनी मुख्यमंत्री असताना सचिवालयातील कार्यालयात बोलावले तेव्हा ``माफ करा. लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या इमारतीत देशाच्या भवितव्याचा विचार करायचा, स्वतःचा नव्हे.`` असे त्यांना सुनावण्याएवढा परखडपणाही अण्णा दाखवतात आणि `अपॉइंटमेंट शिवाय मला कुठल्याही दिवशी सकाळी चहाच्या वेळी भेटू शकता` असा कायमचा पास मिळवून ठेवतात. `हे अण्णा मैफलीच्या बादशहांचे बादशहा असतात. वेळ, काळ, रात्र, दिवस, वय, वर्ष कशाचाही हिशेब नसतो. वपुंच्या इंदौरच्या ट्रिपा अण्णांमुळे संस्मरणीय होतात आणि इंदौरच्या स्वागताच्या एकूणच खानदानीपणाच्या गोष्टी सांगण्यात मशगुल होतात. वपुंची कुंडली ते मागतात. वपु त्यांना सांगतात, ``अण्णा, तसा खूप गोष्टींचा कंटाळा आलाय. नोकरी, दौरे, लेखन, कथाकथन सगळी पळापळ फुकट आहे. सगळं चांगलं असून वैयर्थाची भावना छळत राहते. केव्हातरी हे सगळं थांबायला हवं. एकदम वेगळा, चिरंतन प्रवासाचा ट्रॅक हवाय.`` त्यावर अण्णा सांगतात– ``तुमचा कर्केचा गुरू आहे. रास तूळ आहे. वैराग्याचा सूर कायमच राहणार. काहीही करायचं नाही. काहीही सोडायचं नाही. जुनं सगळं करता करताच नवं सापडेल. वयाच्या तिसऱ्या-चौथ्या वर्षी आपण प्रथमच श्री गिरवतो. ती श्री इतिश्री होईतो राहतेच की नाही?`` `चित्रलेखा` नाट्यसंस्थेचे अध्वर्यू मोहन वाघ हे उत्तम छायाचित्रकारही आहेत. वपुंनी मोहन वाघ आणि पंजा नामक मासिक चालवणारा खराखुरा वाघ यांच्यातील सामना घडवून आणला आहे. या खऱ्याखुऱ्या वाघाला वाघीण नावाच्या नव्या मासिकासाठी मुखपृष्ठावर टाकण्याकरिता चित्र हवे आहे. संपूर्ण विवस्त्र अवस्थेतील चित्र वाटायला हवे आणि ते काढायला आपले सोज्ज्वळ मोहन वाघ तयार होत नाहीत. वाघांच्या रानटी दुनियेत वाघ मादीने कपडे घालणे हीच अश्लीलता समजली जाते. त्यामुळे डोक्यावरून पदर घेतलेला, हातात तबक असलेला नटीचा फोटो बघून हा पंजा मासिकाचा संपादक गर्जना करीत ओरडतो, ``तुम्ही सभ्य आहात असं समजत होतो. पण तुमच्याजवळ एवढा घाणेरडा फोटो?`` आणि तो सरळ मोहन वाघांवर उडी घेतो. अर्थात दोन वाघांची ही सगळी मुलाखत स्वप्नात होते असे दाखवून व.पु. काळे वाचकांना (आणि मोहन वाघांनाही) वाचवतात– हे अलाहिदा! नाहीतर मोहन वाघांना `ऑल दि बेस्ट` किंवा `रणांगण` सादर करण्याची संधी कशी लाभली असती? जिंदादिल शायर भाऊसाहेब पाटणकर यांच्यावरचा या पुस्तकातला लेख सर्वात जास्त लांबीचा आहे. त्यात अनेक शेरही उद्धृत केले आहेत. दुर्लक्षिले जेव्हा आम्ही साहित्यिकांना या अशा मैफलीही जागजागी रंगल्या जेव्हा अशा जेव्हा कुठे कीर्ती प्रियाही हासूनी आली पुढे नुसतीच ना आली तशी गालही केला पुढे.`` असा भाऊसाहेबांचा अनुभव. वपुंना ते समानधर्मी वाटावेत यात नवल काय? `चिअर्स` मधील सर्वात वाचनीय लेख कुठला असा प्रश्न पडला तर त्याचे उत्तर मिळेल– `निगुडकर.` तुम्हाला प्रश्न पडेल हे काय प्रकरण आहे? हे नाव तर काही आमच्या परिचयाचे नाही. मग या व्यक्तीवरचा लेख सर्वात वाचनीय असे का म्हणताय?... निगुडकर म्हणजे वपुंच्या सौभाग्यवती. आता कोणीही पुरुष आपल्या बायकोवर लिहितो तेव्हा तो मजकूर वाचनीय असणारच! तर वपु कधीकाळी म्हणे घरोघर जाऊन साड्या विकण्याचा व्यवसाय करीत होते. त्यात या `निगुडकर` ची गाठ पडली. ती म्हणे रोज एक साडी ठेवून घ्यायची आणि दुसऱ्या दिवशी हिचा रंग पसंत नाही, म्हणून दुसरी साडी बदलून घ्यायची. असा हा सिलसिला दीर्घकाळ चालू राहिला. वपुंनाही तिच्या घरी राजरोस रोजरोज जायला निमित्त मिळत राहिले. तिचे भाऊ डोळ्यांत तेल घालून पहारा करीत असतानाही वपुंनी हा किल्ला सर केला. ``निगुडकर वस्तादच. लग्न होईतो निगुडकरांच्या नावानं एकाही साडीसाठी आम्हाला पावती फाडता आली नाही``, वपु कबुली देतात. निगुडकर म्हणे, ``मी यांच्या केसावर भाळले.`` वपु म्हणत, ``मी हिच्या गाण्यावर भाळलो.`` कालांतराने वपुंचे केस गेले; निगुडकरचे गाणेही गेले. अशा खूप गमती-जमती या लेखात आहेत. वपु स्वतःच्या फिरक्या घेत त्या सर्व सांगतात. वपुंना-निगुडकरला सून येते; नातवंडांची चाहूल लागते. सव्वीस वर्षांच्या सहवासाने एकमेकांचे स्वभाव सही न् सही समजले आहेत. असे कोणालाही वाटते. पण निगुडकर बोलून जाते, ``तुमच्या काळ्यांच्या घरात टिकणं ही एक अवघड गोष्ट आहे.`` सव्वीस वर्षे काळ्यांच्या या घरात राहूनही `तुमचं काळ्यांचं घर` ही भाषा उरतेच. `चिअर्स`ची झिंग थोडीफार उतरायलाही अशी काही निरीक्षणे उपयोगी ठरतात. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

NADIMUKH
NADIMUKH by PERUMAL MURUGAN Rating Star
गार्गी म्हात्रे

पेरुमाल मुरुगन ह्या तामिळ लेखकाच " नदीमुख" हे अनुवादित पुस्तक वाचले. मराठी मध्ये दाक्षिणात्य भाषां मधल्या तामिळ भाषेच्या उत्तम साहित्याची वाचन संधी या पुस्तकाच्या निमित्ताने मिळाली. साठच्या दशकात जन्मलेल्या पिढीला वेगाने ,खर तर अती वेगाने बदलत जाणाऱ्ा तंत्रज्ञान व तरुण पिढीची मानसिकता यांचे सुंदर चित्रण या कादंबरी मध्ये करण्यात आले आहे. माणूस किंवा असुर पालक असला की मुलांच्या भविष्याची चिंता त्यामधून उद्भवणारा संघर्ष साध्या सोप्या पण प्रवाही भाषेमधून आपल्या समोर उभा राहातो. कुमारासुराच्या एकसुरु झापडे लावून घेतलेल्या आयुष्यात `नदीमुख` दर्शना नंतर झालेली तगमग व बदल यांचे खूप सुंदर वर्णन शेवटी आलेल आहे. डॉ. मानसी जयंत केळकर यांनी अतिशय प्रवाही भाषेत व उत्कृष्ट समर्पक शब्दात पुस्तक अनुवादित केल्यामुळे कांदबरीची मजा घेता येते. मराठी व्यतिरिक्त अन्य भाषेतील साहित्य वाचनाला उपलब्ध करुन दिल्या बद्दल मेहता पब्लिशिंग हाऊस व डॉ मानसी केळकर यांचे आभार ! ...Read more

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
साधना साप्ताहिक ३ ऑगस्ट २०२४ ... अशोक राणे

सुनंदा अमरापूरकर यांनी त्यांचं `खुलभर दुधाची कहाणी` हे आत्मकथन पाठवलं तेव्हा `आता हे वाचायचं केव्हा` असा प्रश्न सर्वप्रथम मनाशी आला. देणेकरी दाराशी ठाण मांडून बसावेत तशी अनेक पुस्तकं, कोणी कोणी पाठवलेल्या त्यांच्या फिल्म्स आणि माझे सतराशे साठ व्याप सोर असताना कसा वेळ काढायचा? माझं सबंध आयुष्य सिनेमा, तो आकाराला आणणारे दिग्दर्शक, कलावंत, तंत्रज्ञ, त्यांच्या निर्मितीमागच्या प्रेरणा आणि त्यांच्यातला माणूस याचा शोध घेण्यात गेलं. एका गोष्टीचं कुतूहल होतं आणि ते म्हणजे या सर्वांच्या पलीकडे असलेलं, परंतु क्वचितच कळलेलं असं त्यांच्या कुटुंबातल्याच व्यक्तीने वर्णिलेलं अमरापूरकरांचं चरित्र ! सगळी व्यवधानं बाजूला ठेवून सुनंदा अमरापूरकरांचं आत्मकथन वाचायला हे कुतूहल पुरलं. मनोगतातलं पहिलंच वाक्य आहे... `मी या आठवणी का लिहिल्या ?` ...आणि मला चट्‌कन थोर अभिजात अभिनेत्री इंग्रीड बर्गमन हिचं `माय स्टोरी` आठवलं. तिनेही अशीच सुरुवात केलीय. तिची मुलं म्हणाली, `तुझ्या आयुष्याविषयी कुणी तरी तिखटमीठ लावून काहीबाही लिहील, त्याआधी तूच सारं खरं मोकळेपणानं सांगून टाक. तिने जाडजूड ग्रंथात अभिनेत्री म्हणून तिचा सारा प्रवास कसलाही आडपडदा न ठेवता सविस्तर सांगितला. सुनंदाताईंचं पुस्तक आणि त्यातलं हे पहिलं वाक्य वाचताना मला हे का आठवावं? त्यांची पहिली ओळख म्हणजे नाट्य-चित्रसृष्टीतला एक मोठा अभिनेता, दिग्दर्शक सदाशिव अमरापूरकर यांच्या पत्नी आणि अलीकडचा परिचय म्हणजे एक उत्तम अनुवादकर्त्या. तर आता त्या आपल्या प्रसिद्ध नवऱ्याविषयी काय आणि कसं सांगतात, त्याचबरोबर त्यांचं वैवाहिक सहजीवन, एकूणच त्यांचं कौटुंबिक जीवन कसं उलगडून दाखवतात याचं कुतूहल होतं. मुख्य म्हणजे त्यांची मध्यमवर्गीय पार्श्वभूमी आणि सदाशिव अमरापूरकरांना मुंबईत स्थैर्य लाभेपर्यंत नगरसारख्या छोटया शहरातला त्यांचा वावर यातून पुढला सारा अचंबित करणारा प्रवास त्या का मांडतात याचीही उत्सुकता मनात होतीच, अमरापूरकर कुटुंबाचा प्रवास हा केवळ नगर ते मुंबई नव्हता. एखाद्या नवख्या नटाने रंगमंचाच्या अंधाऱ्या अवकाशात प्रवेश करावा आणि अचानक त्याच्यावर सर्व अंगांनी प्रखर प्रकाशझोत यावा, त्याचे डोळे इतके दिपून जावेत की त्याला ते नीट उघडून सभोवताल पाहता येऊ नये असाच काहीसा अनुभव या कुटुंबाने घेतला आहे. प्रायोगिक वे व्यावसायिक रंगभूमी हे स्थित्यंतर तसं फार तर कनिष्ठ ते उच्च मध्यमवर्गीय याच काहीशा परिचित अवकाशातलं; परंतु हिंदी सिनेमातली प्रसिद्धी तर भिरभिरावून टाकणारी. ते अंगावर घेत, वागवत या कुटुंबाने कशी वाटचाल केली हे जाणून घेण्याची उत्सुकता होती. एवढी प्रचंड प्रसिद्धी आणि वलय लाभूनही अमरापूरकर कधी फिल्मी झाले नाहीत हे वाटतं तितके सोपे नाही. `खुलभर दुधाची कहाणी यातून ते उलगडणार होते... वाचायला सुरुवात केल्यावर ते खूप तपशीलवार आणि पसरटही वाटलं. पण वाचत गेलो तसतसं लक्षात आलं की, सुनंदाताईंनी चितारलेला परिसर तप‌शिलातल्या काही फरकाने आपलाही आहे. आपणच प्रत्यक्ष जगलेले, पाहिलेल वाचतो आहोत. साठ-सत्तर वर्षांपूर्वीच्या आमच्या शाळकरी वयापासून वाचलेल्या साहित्यातून हेच सर्व पाहत आलोय. आपल्या मुलांच्या आणि नातवंडाच्या पिढीला तर हा काळ अवकाश सर्वस्वी अपरिचित. हे त्यांच्यासाठीही आहे. आजच्या नव्या पिढीला 2000 चा चित्रपट जुना वाटतो, तेव्हा त्याआधीच्या त्यांच्या आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा यांच्या सिनेमाशी आपण जसा त्यांचा परिचय करून देतो तसंच आहे हे. शिवाय या कथनाच्या नायिकेने पुढे अपरिहार्य असं जे वळण गाठलं आहे, त्यासाठी हे आवश्यकच आहे. संथ लयीत सुरू झालेलं आणि काहीसं रेंगाळल्यासारखं वाटणारं गाणं उत्तरोत्तर हलक्याशा द्रुत लयीत समेवर यावं असं हे आत्मकथन आहे. तरीही पूर्वार्धावर थोडे अधिक संपादकीय संस्कार झाले असते, तर आवश्यक असणाऱ्या संथ लयीला रेंगाळावं लागलं नसतं. `प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते` या प्रसिद्ध उक्तीच्या पलीकडे इथे काहीतरी आहे. ही नायिका इथे केवळ एवढ्याच भूमिकेत नाही. ही भूमिका पार पाडताना तिने सर्व प्रकारे गांगरवून टाकणाऱ्या परिस्थितीतही स्वतःला जपलं, स्वतःमधल्या गुणांना जमेल तसं आणि तेवढं खतपाणी घालत जोपासलं आणि आपली म्हणून एक ओळख निर्माण केली. ज्या संपूर्णतः अकल्पित, अनपेक्षित जबाबदाऱ्या येऊन पडल्या, त्या लीलया पार पाडत तिने आपलं व्यक्तिमत्त्व जपलं. `मीच एकटीने सारं पहायचं` असा सतत तक्रारखोर धोशा लावत एखादी कर्कशा झाली असती; परंतु सुनंदाताईंचं तसं झालं नाही. म्हणून पुस्तक वाचून झाल्यावर फोनवर मी त्यांना एवढंच म्हणालो, `माउली, कुठून गं इतकी ऊर्जा आणलीस?` 1950 चं दशक, त्याआधीचा आणि नंतरचाही काळ तसा गरिबीचा आहे. समाजाच्या सर्व थरांत अभावग्रस्तता आहे. कसला अभाव आहे याचीही त्या काळ अवकाशाला जाण नाही. आहे ते गोड मानून घेत जगण्याचा हा काळ. या सामाजिक स्तराखाली असाहाय्यपणे जगणारा एक वर्ग आहे. त्याचीही वास्तपुस्त करण्याची गरज या वातावरणात आहे. परंतु सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे संस्कारक्षम घडण्याची, घडविण्याची, अभावग्रस्तता तिथे महत्त्वाची भूमिका बजावते. आपल्या या नायिकेला हे पर्यावरण लाभलं आहे. त्यांचे वडील मुलं लहान असतानाच गेले. नंतर घरही गेलं आणि मुलांना घेऊन आईला देवळात राहावं लागलं. आहे त्या परिस्थितीतून वाट काढावी या धारणेत सभोवतालच्या सुसंस्कृत वातावरणाचाही मोठा आधार होता. ते सारं मुळातून वाचण्यासारखं आहे. यात गरिबीतले दिवस, हलाखी, अभावग्रस्तता यांपेक्षा हे संस्कार सर्वांत महत्त्वाचे आहेत हे सहजपणे अधोरेखित केलेले आहे. वर ज्या ऊर्जेचा उल्लेख केलाय ती इथूनच सुनंदाताईंना मिळाली आणि म्हणूनच यशस्वी नवन्याच्या पाठीशी उभ्या राहताना त्या स्वतः सर्वप्रकारे यशस्वी ठरल्या आहेत. त्यांच्या आणि अमरापूरकरांच्या कथेला कुठून कुठे नेऊन ठेवणारं वळण शाळा-कॉलेजच्या वयातच आलं. नाटक ! अमरापूरकर म्हणजे नाटक आणि नाटक म्हणजे अमरापूरकर असं हे रसायन होतं. सुनंदाताईही नगरच्या त्या छोट्या नाट्यअवकाशात मनापासून वावरत होत्या. सोबत, साथ होती अमरापूरकरांची. परंतु हा माणूस स्वतःमधल्या रंगकर्मीत इतका खोलवर बुडालेला होता की, जिच्या तो प्रेमात पडलाय; तिलाही नाटकाची आवड आहे; नोंद घेण्याजोगे कलागुण आहेत, तिच्यातला कलावंत घडविण्यात मात्र त्याने रस दाखविला नाही. इतकंच नाही तर पुढे मुंबईत यश मिळविल्यानंतर, बऱ्यापैकी स्थिरस्थावर झाल्यानंतरही सुनंदाताईंनी `यशस्वी पुरुषामागे...` ची सर्व प्रकारची भूमिका यशस्वीपणे पार पाडल्यानंतर जेव्हा ऑफिसच्या नाटकात काम करायचं ठरवलं, तेव्हा यांनी त्यास ठाम नकार दिला. इथे पुस्तकातला एक प्रसंग आठवतो. नगरमध्ये नाटकाची तालीम चालली होती. अमरापूरकर खूप सिगरेट्स ओढतात म्हणून पाकीट लपवून ठेवण्यात आलं होतं. पण जसजशी तलफ अनावर होत गेली, तसतसे ते अस्वस्थ होत गेले. नाटकावरून त्यांचं लक्ष उडत चाललं होत. तेव्हा सुनंदाताईनी आपल्या पर्समध्ये लपवून ठेवलेल्या पाकिटातून दोन सिगरेट्स आणून दिल्या. हीच लग्ना आधीची प्रेयसी नंतर पत्नी, गृहिणीच्या भूमिकेतही त्याला असंच सांभाळते. अमरापूरकरांची नाट्यवेडापायी अडलेली त्यांची पदवी या पद‌वीधारक मुलीशी लग्न ठरल्यानंतर ते पूर्ण करतात. इथे लग्न पार पडतं आणि हे भाऊ म्हणतात, `मला पुण्यात राहून एम.ए. करायच आहे. ही बाई हो ला हो करते. नववधू म्हणून तक्रार करत नाही. शिक्षण पूर्ण करून नोकरी करणारी ही मुलगी नोकरीधंदा न करणाऱ्या मुलाशी लग्न करते. तो काळ आणि लहान गाव हे लक्षात घेतलं, तर कदाचित कल्पना येईल की किती अवघड होतं ते. यांचं भांडवल काय तर पिढीजात वाडा आणि व्यवसाय. बरं त्या व्यवसायात तरी सहभाग तर तोही नाही. दिवसरात्र एकच ध्यास. एकच नाद... नाटक पुढे मिळणारे अमाप यश आणि वैभव यांची काही अंशी तरी शक्यता आणवली असेल, तर तसंही काही नव्हतं. आपलं मानलं आणि निभावलं. असेल तर एक विचार मनाशी असेल आधार द्यायला, याची कलानिष्ठा सोळा आपणे सच ! तिथे अन्य गोष्टीला थारा नाही. ते मात्र खरंच होतं. अमरापूरकरांमधला अस्वस्थ रंगकर्मी त्यांना कायमचा मुंबईत घेऊन आला आणि मग सर्वाच्या वाट्याला येतो तसा स्ट्रगल करत ते आधी व्यावसायिक रंगभूमीवर अभिनेता, दिग्दर्शक म्हणून यशस्वी होता होता अनपेक्षितपणे सिनेमात जाऊन पोहोचले आणि `अर्धसत्य` नंतर रेस्ट इज द हिस्टरी असा पुढला प्रवास घडला. या आत्मकथनात तो तपशीलवार वाचायला मिळेलच. परंतु त्यात महत्त्वाचं आहे ते भाड्याच्या घरात पितळी स्टोव्ह आणून मुंबईतल्या संसाराला केलेली सुरुवात ते नंतर ऑडीसारख्या महागड्या परदेशी गाड्यांपर्यंत झालेला प्रवास... आणि त्याहीपेक्षा हे घबाड सहजपणे घेणं, हाताळणं, स्वतः सुनंदाताईंनी, अमरापूरकरांनी आणि त्यांच्या तीन मुलींनीही. एकीकडे हे वैभव आणि दुसरीकडे मध्यमवर्गीय साध्या राहणीचे संस्कार ! दस्तुरखुद्द अमरापूरकर तसेच होते, परंतु त्यांच्या प्रचंड बिझी शेड्यूलमध्ये घरच्या आघाडीवर निगुतीने सांभाळलं, निभावून नेलं ते सुनंदाताईंनी. बरं हे करता करता आपली नोकरीही सांभाळली. मुलींची शाळा- कॉलेज, त्यांची जडणघडण, इतर साऱ्या सांसारिक बाबी, अमरापूरकरांच्या वाढत्या उत्पन्नाचं व्यवस्थापन, त्यासाठी नेमावयाचा चार्टर्ड अकाउंटंट वगैरे. आणि हे सारं करताना जे जग कालपरवापर्यंत आपल्यापासून दूर होतं तिथे सहज शिरकाव करण्याची, तिथल्या स्टार मंडळींमध्ये बावरण्याची संधी असताना ते स्वतःहून दूर ठेवणं, आपल्या मुलींनाही त्याचं आकर्षण वाटणार नाही याची काळजी घेणं हे अवघड काम या माउलीने सहज केलंय. अशीच कमाल त्यांनी केली ती त्यांच्या आई, सासू- सासरे आणि अमरापूरकरांच्या घरातच असलेल्या आत्याबाई ताई यांच्या व्यक्तिरेखा, त्यांच्याशी असलेलं नातं आणि रोजचा संबंध यांविषयी लिहिताना. त्यातून त्या वेळचा काळ अवकाश आणि बदलता कौटुंबिक सामाजिक - पोतही सहजपणे दिसून येतो. सासरे म्हणजे घरातला अखेरचा शब्द हे मनाशी कायम मानलेलं. स्वीकारलेलं. परंतु एक वेळ अशी येते की, मागल्या पिढीतलं कुणी दुखावलं तरी त्याची क्षिती न बाळगता, नव्या पिढीला आपली वाट काढावी लागते. कारण तिच्या काळ - अवकाशाचा तो रेटा आहे. तो मागल्या पिढीला कळणे शक्य नाही. स्वतःचा विचार करण्याची ही प्रेरणा खऱ्या अर्थाने मार्गदर्शक ठरते. आणखी एक नोंद घेण्याजोगी गोष्ट म्हणजे, स्वतंत्रपणे स्वतःचं आयुष्य घडवणारी तरुण मुलगी कट्टर पुरुषसत्ताक सासरी जाते, तेव्हा तो विरोधाभास पेलणं किती अवघड असतं याचंही उदाहरण इथे प्रस्तुत होतं. या दरम्यान वेगळा विचार करणारा, सर्वांना समजून घेणारा संवेदनशील नवराही मधूनच नवरेपणा गाजवतो, पण अशा वेळी `आम्ही यांच्यासाठी एवढं करतो ,पण आमच्याबद्दल काही वाटत नाही` असा तक्रारखोर विचार दूर सारत आपलं काम करत राहणं यासाठी साधनाच लागली असेल. `स्वतःची समजूत घातली यापेक्षा `परिस्थिती नीट समजून घेतली` हा मा हा मार्ग पत्करला की सोपं होतं. मन शांत होतं. कडवटपणा तर कणभर राहात नाही. सर्जनशीलता आणि मनाचा प्रसन्नपणा ताजा टवटवीत राहतो. आणि मग आपल्याला जे करावंस वाटते ते करता येतं. त्याचं व्यवस्थापन सुचतं, जस सुनंदाताईंना त्यांच्या अनुवादाच्या कामाच्या नियोजनात सुचलं. घर आणि एकूणच कुटुंबाचे सर्व करताना त्यांना त्यांच्या लेखनासाठी वेळच काढता येईना, तेव्हा पहाटे लवकर उठून त्यांनी निवांत दोन तास काढले आणि आपलं काम केलं. एवढंच नव्हे तर कॉलेज, अभ्यास हे चाळीसेक वर्षे मागे पडल्यानंतर पुन्हा त्या मुंबई विद्यापीठात हजर झाल्या आणि मायथोलॉजीवरच्या एक वर्षाच्या घनघोर अभ्यासक्रमात स्वतःला झोकून दिलं आणि त्यात उत्तम गुण मिळवून पासही झाल्या. वयाच्या या टप्प्यावर घरगुती जबाबदाऱ्यांत, लेकींच्या बाळंतपणाचीही एकीचं तिकडे अमेरिकेत भर पडली. आरंभी मी म्हटले तस `कुठून आणते ही ऊर्जा ही माउली...!` असं करता करता आता कुठे स्वतः साठी वेळ मिळतोय असं वाटेवाटेपर्यंत अमरापूरकरांचं शेवट गाठणारं आजारपण सुरू होतं. आता पुन्हा नव्याने सारं नियोजन, आता दिवसाचा प्रत्येक क्षण त्यांची सेवा करण्यासाठी आणि त्यांच्यासोबत राहण्यासाठी. अमरापूरकरांची कामं कमी होत चालली होती. जिथून आयुष्याची सुरुवात केली, तिथे जाऊन तिथल्या घरात दोघांनी पुढली वर्ष काढायची असं ठरवता ठरवता तोच सारा वेळ मुंबईत हॉस्पिटलमध्ये काढावा लागला. नगरला पोहोचला तो अमरापूरकरांचा निष्प्राण देह... `खुलभर दुधाची कहाणी` ही एका समजदार आणि कर्तृत्ववान स्त्रीची कहाणी आहे. त्या कहाणीतून मला जाणवलेलं तिचं व्यक्तिमत्त्व अतिशय महत्त्वाचं आणि मोलाचं आहे. सुनंदा अमरापूरकर यांना सलाम! ...Read more