* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: I AM MALALA
  • Availability : Available
  • Translators : SUPRIYA VAKIL
  • ISBN : 9788184987256
  • Edition : 3
  • Publishing Year : MAY 2015
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 316
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
"I COME FROM A COUNTRY THAT WAS CREATED AT MIDNIGHT. WHEN I ALMOST DIED IT WAS JUST AFTER MIDDAY." WHEN THE TALIBAN TOOK CONTROL OF THE SWAT VALLEY IN PAKISTAN, ONE GIRL SPOKE OUT. MALALA YOUSAFZAI REFUSED TO BE SILENCED AND FOUGHT FOR HER RIGHT TO AN EDUCATION. ON TUESDAY, OCTOBER 9, 2012, WHEN SHE WAS FIFTEEN, SHE ALMOST PAID THE ULTIMATE PRICE. SHE WAS SHOT IN THE HEAD AT POINT-BLANK RANGE WHILE RIDING THE BUS HOME FROM SCHOOL, AND FEW EXPECTED HER TO SURVIVE. INSTEAD, MALALA`S MIRACULOUS RECOVERY HAS TAKEN HER ON AN EXTRAORDINARY JOURNEY FROM A REMOTE VALLEY IN NORTHERN PAKISTAN TO THE HALLS OF THE UNITED NATIONS IN NEW YORK. AT SIXTEEN, SHE BECAME A GLOBAL SYMBOL OF PEACEFUL PROTEST AND THE YOUNGEST NOMINEE EVER FOR THE NOBEL PEACE PRIZE. I AM MALALA IS THE REMARKABLE TALE OF A FAMILY UPROOTED BY GLOBAL TERRORISM, OF THE FIGHT FOR GIRLS` EDUCATION, OF A FATHER WHO, HIMSELF A SCHOOL OWNER, CHAMPIONED AND ENCOURAGED HIS DAUGHTER TO WRITE AND ATTEND SCHOOL, AND OF BRAVE PARENTS WHO HAVE A FIERCE LOVE FOR THEIR DAUGHTER IN A SOCIETY THAT PRIZES SONS. I AM MALALA WILL MAKE YOU BELIEVE IN THE POWER OF ONE PERSON`S VOICE TO INSPIRE CHANGE IN THE WORLD.
"निसर्गसौंदर्याचं लेणं लाभलेल्या स्वात खोऱ्याचा तालिबानने ताबा घेतला तेव्हा एका मुलीनं आवाज उठवला. ती मुलगी म्हणजे – मलाला युसूफजई. तिने तिच्या शिक्षणाच्या हक्कासाठी लढा द्यायचं ठरवलं... पण, मंगळवार, दिनांक ९ ऑक्टोबर २०१२ रोजी तिला याची किंमत मोजावी लागली. शाळेतून बसने घरी परतत असताना, वाटेत तिच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. आणि एकाएकी तिचं आयुष्य जीवन-मरणाच्या खोल दरीत लोटलं गेलं... पण ती या हल्ल्यातून आश्चर्यकारकरीत्या वाचली, आणि तिच्या ध्येयासाठी त्याच निर्धारानं कार्य करत राहिली... ही आहे मलालाची कहाणी – एक कोवळा आवाजसुद्धा परिवर्तनाची पहाट जागवू शकतो याची साक्ष देणारी...!"
महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था पुरस्कार २०१६-राधाबाई हरीभाई देशपांडे पारितोषिक
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #MIMALALA #IAMMALALA #मीमलाला #AUTOBIOGRAPHY #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SUPRIYAVAKIL #सुप्रियावकील #MALALAYOUSAFZAI "
Customer Reviews
  • Rating StarHemant Thakut

    मी मलाला पुस्तक वाचले,अतिशय छान,एकदा वाचायाला हातात घेतले,आणि वाचून झाल्यावर खाली ठेवले, अतिशय सहज सुंदर ओघवती भाषा मनाची पकड घेते,कुठेही कंटाळवाण नाही,आपल्याला,आणि मलालाला पणभेटायला आवडेल,असेच लिहीत राहा,आणि आमच्या ज्ञानात भर टाका, पुन्हा एकदा अभिंदन हेमंत ठाकूर गोरेगाव,मुंबई ...Read more

  • Rating StarSANDEEP GAIKWAD

    या पुस्तकातून सविस्तर माहिती मिळाली. आपण छान अनुवाद केला आहे.

  • Rating Starकेदार धुमाळी

    कमल चिखलात जन्मले, म्हणून तसेच ते चिखलात पडून बसत नाही. ते आपल्या नैसर्गिक सौंदर्याने अनेकांचे मन प्रेमाने भरते. तशी मला मलाला वाटली. जग विसाव्या शतकात जगत आहे. प्रत्येक मुलाला शिक्षणाचा हक्क आहे. आज आमच्या रत्नागिरीत सर्व मुले व मुली खांद्याला खांदालावून शिकतात. आज मुलींचे क्षेत्र हे चूल आणि मूलपर्यंत मर्यादित न राहता, ते नभ ते जलापर्यंत व्यापले आहे. परंतु तुमचे पुस्तक वाचून समजले, की हा एक चश्म्याने जरी स्त्रियांच्या समस्या कमी झाल्या असल्या, तरी दुसऱ्या चश्म्याने पाहिल्यास आजही काही प्रदेशात समाज हा जुन्या पिढींना चिकटून बसला आहे. त्याचे उदाहरण म्हणून तुमचे अनुवाद केलेले पुस्तक. मलाला ही आजच्या प्रत्येक तरुण-तरुणींसाठी ‘आदर्श’ म्हणून पुढे आली आहे. बोलायला काय जातय. ‘मुलगी हवी’ पण ती जस-जशी मोठी होत जाते. तसे समाजाच्या बघण्याचा दृष्टिकोन बदलतोय. त्यातूनच आज कितीतरी घटना आपल्याला पहायला मिळतात. प्रत्येक देशात असो वा धर्मात स्त्री ही दुय्यम मानली गेली आहे; परंतु इस्लाम धर्मात स्त्रियांवर अधिकच बंधने आहेत, पण मलाला त्यामधील नव्हती. त्याचे खरे श्रेय त्यांच्या वडिलांना दिलेच पाहिजे. जर एखाद्या मुलीच्या पाठीशी कुटुंब खंबीरपणे उभे असेल तर मुलगीदेखील मुलाइतकेच कर्तृत्व गाजवू शकते. हे मलालाने सिद्ध केले. का? फक्त मुलांनीच शिक्षण घ्यावे. मुलींनी फक्त चार भिंतीत राहून आधी आई-बाबांचे ऐकायचे नंतर आपल्या पतीचे. तिला स्वातंत्र्य आहे की नाही? त्यासाठी मलाला हे एक उदाहरण ठरेल. आपल्या हक्कासाठी तालिबानच्या गोळ्या झेलणारी मलाला व तिच्या मैत्रिणीच्या जिद्दचे व धाडसाचे कौतुक करावे तेवढे कमीच! तुमचे पुस्तक वाचून मला सावित्रीबाई फुले यांची आठवण झाली. मॅडम तुमचे पुस्तक वाचून खूप आनंदही झाला आणि त्यामधून खूप काही शिकता आले. मॅडम तुम्हाला मिळालेल्या अनेक पुरस्कारांसाठी हार्दिक शुभेच्छा! पुढील वाटचालीसाठी ‘बेस्ट ऑफ लक’! मला तुमच्या पत्राची अपेक्षा राहीलच त्यापेक्षा तुमच्या पुढील पुस्तकाची प्रतिक्षा राहील. कळावे, आपला आज्ञार्थी, केदार धुमाळी ...Read more

  • Rating StarSandesh Thorave

    अप्रतिम पुस्तक आहे...

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RESHIMREGHA
RESHIMREGHA by SHANTA J SHELAKE Rating Star
मीना कश्यप शाह

शांता शेळके या कवयित्री म्हणून आपल्या सर्वांच्या माहितीच्या आहेतच. गीतकार म्हणूनही त्यांचे मोठे नाव झाले. रेशीमरेघा हे त्यांनी रचलेल्या गीतांचे पुस्तक. मुख्यतः त्यांनी चित्रपट आणि नाटक यासाठी गीते लिहिली आहेत. प्रस्तावनेत शांताबाई म्हणतात, गीते लििणे त्यांना अतिशय आकर्षक वाटत गेले आणि म्हणून केवळ चित्रपट आणि नाटकांसाठीच नाही, तर स्वानंदासाठीही, त्या गीतं लिहित राहिल्या. चालीवर गीते लिहिणे त्यांना आव्हानात्मक वाटायचे, बंधनकारक नाही. पुढे बंगाली, गुजराती अशा काही गीतांच्या चाली आवडल्या, तर त्या, त्या चालींवरही छंद म्हणून गीते लिहू लागल्या. त्यांच्या गीतांमध्ये लावण्या, गवळणी, नृत्यगीते आणि युगुलगीते (त्यांनी द्वंद्वगीते हा शब्द वापरला आहे, जो मला आवडत नाही) जास्त आहेत. ह्या पुस्तकात त्यांचे संकलन आढळून येतं. पुस्तकातील काही गीतांपेक्षा मला त्यांची प्रस्तावनाच जास्त आवडली. आपल्या गीतांबद्दल त्यांनी हळुवार होत लिहिलं आहे. प्रत्येक गाणं ध्वनिमुद्रीत होतानाचे क्षण त्यांना आठवतात. आणि ही गीतं प्रसिद्ध होण्यासाठी संगीतकार, गायक यांचा हातभार नक्कीच आहे याची त्या आठवण काढतात. गीतांचा अर्थ रसिकांपर्यंत पूर्णपणे पोहोचवण्यासाठी गायक-गायिकांचा खूपच मोठा वाटा आहे, त्यांच्याबद्दल त्या अपार कृतज्ञता व्यक्त करतात. हे पुस्तक त्यांनी लावणेसम्राज्ञी यमुनाबाईंना अर्पित केलेले आहे. त्यान्नी लिहिलेल्या "रेशमाच्या रेघांनी" या सर्वात जास्त प्रसिद्ध पावलेल्या लावणीच्या नावावर ह्या पुस्तकाचे नाव आधारित आहे. अनेक प्रसिद्ध गाणी या गीत संग्रहात आढळतात. रेशमाच्या रेघांनी, काय बाई सांगू, मनाच्या धुंदीत लहरीत, हे श्यामसुंदर, राजसा, शालू हिरवा पाच नि मरवा, चाल तुरू तुरू, मनाच्या धुंदीत लहरीत येना आणि अशी अनेक. शांताबाईंचं काव्य सामर्थ्य ह्या लावण्या/गीतांमध्ये देखील दिसून येतं... कळ्या आजच्या, शिळ्या उद्याला, ओठांशी न्याल का, आल्यावर जवळ मला घ्याल का.... अशी अनेक उदाहरणं! पुस्तकातील बहुतेक गाणी ही लावण्यांच्या स्वरूपातली आहेत. त्यामुळे त्याच त्याच भावना सारख्या सारख्या आढळून येतात. बोलावणे किंवा नको जाऊ म्हणणे, भेटी (गिफ्ट्स) घेणे, वाट पाहणे, विरह, सौंदर्याचे वर्णन, शृंगाराचे वर्णन, म्हणजे तुम्हाला काय मिळू शकेल याची कल्पना गीतातून देणे (उदा. कंबरपट्टा रेखून दावी, देहाचा आकार!!) अशा प्रकारचे विषय पुन्हा पुन्हा येत राहतात, पण (शांताबाई बीइंग शांताबाई) कुठेच तोचतोचपणा कंटाळवाणा होत नाही (वाचकाने जरा रोमँटिकपणा दाखवून वाचली ही गीतं तर फारच बहार!) शांताबाई नथ फारच आवडते असं दिसतं... नथ सर्जाची नाकी घालता हसेल डावा गाल किंवा सलगी करते नथ ओठांशी, तो तुमचा अधिकार अशा प्रकारे ती खुलून देखील दिसते ह्या गीतांमधे!! अनेकविध लावण्या आहेत ह्या पुस्तकात. पाडव्याची, रंगपंचमीची, श्रावणाची, अशा विविध दिवसांच्या लावण्या तर हिरव्या रंगाची लावणी देखील आहे. पाडव्याची लावणी म्हणजे पाडव्याला शालू मागते आहे, कारण ती रात्री एकांतात उभारणार आहे. 🙂 "मी सुंदर आहे तर आता मी काय करू?" अशी तक्रारही दिसून येते. "माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा" सांगणारीला स्वतःच्या सौंदर्याची पुरेपूर जाणीव आहे आणि त्यापेक्षाही, फक्त शारीरिक सौंदर्यावर विसंबून न राहता, त्याबरोबर तोरा दाखवत भुरळ पाडणे ह्यात ती माहीर आहे. पण त्याचबरोबर ती धोक्याची सूचना पण देते आहे... घटकाभर संग बसून घालवा वेळ, जमल्यास मनांचा जमून येईल मेळ, नाहीतर यायचा अंगाशी हा खेळ, पाय टाकण्याआधी इथे, विचार पुरता करा, माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा!! एका लावणीत एका पुरुषाने फसवलंय अशा स्त्रीचे रूप आहे. जत्रेत एक जण भेटला आणि त्याने आपल्याशी फ्लर्ट केलं, जत्रा उलगडल्यावर दुसऱ्या दिवशी मात्र तो डोळ्याला डोळा भिडवत नाही, तोंड चुकवून पुढे जातो, ह्याची तक्रार ह्या लावणीत येते. किती विविधता! अशा लावणी कलाकाराच्या आयुष्याचं विदारक दृश्य देखील शांताबाईंनी दाखवले आहे. तिथे येणारा आज एक, तर उद्या दुसराही असू शकेल किंवा तिथे असणारी आज एक, तर उद्या दुसरीही असू शकेल. हे सांगून त्या म्हणतात... प्रीतीचे नीतीचे व्यर्थ सांगणे, भुकेल्या देहाचे सारे मागणे, जन्माच्या नात्याचे फुका बहाणे, कुणाला सतत इथे राहणे? इथल्या महाली घडीची वस्ती, सुखाचे हिंदोळे आभाळी चढती, घडीत वरती घडीत खालती ऐन विशीतल्या स्त्रीचं सौंदर्याचं अत्युत्तम वर्णन एका गीतात केलं आहे. अनेक गीतांमध्ये पुरुषांनी स्त्रीच्या देहाचे आणि मनाचे केलेले वर्णन दिसून येते. त्यातही नुसता देहच नाही तर स्त्रीचा तोरा (attitude) देखील पुरुषाला कशी भुरळ पाडतो हे दिसतच. "ही चाल तुरुतुरु" आपल्या सगळ्यांच्या आवडीचे आणि माहितीचे आहे. असंच "मनाच्या धुंदीत लहरीत ये ना" हे देखील. गीतांमध्ये श्रावण, पाऊस, विरह, वाट बघणे हे सर्व हमखास येतं. एक गीत आहे "लहरी सजण कुणी दावा" - मीना खडीकर यांचे संगीत, उषा मंगेशकर यांचा आवाज. हे गीत मला ना वाचायला आवडलं ना ऐकायला आवडलं 🫣 श्रीकृष्ण राधेच्या कथा तर आपण गवळणींमधे अनेक वेळा ऐकल्या आहेत. कृष्णाची धून ऐकल्यानंतर अगदी काहीही न सुचता तशीच्या तशी निघालेली राधा! त्यातही तिच्या शृंगारचं वर्णन येतंच. सजण्याची आवड असलेल्या स्त्रीचे वर्णन अतिशय खुबीने शांताबाईंनी केले आहे. मला स्वतःला नटण्या मुरडण्याची अतिशय हौस असल्यामुळे हे सगळं वर्णन वाचून, "हे पुस्तक आपण आधी का नाही वाचलं" याचं दुःख मात्र झालं. ही उदाहरणं बघा ना... माथ्यावर मोतियाची जाळी, भांगेत मोती सर, चंद्रकोर भाळी, कानात झुमके, केसांमध्ये वेल, नाकात नथ, नथित हिरे, बिल्वदळे, वज्रटिक, `बोलताना पाठीवर जिचे रेशमाचे गोंडे खालीवर होतील अशी` पाच पदरी मोहन माळ!! दंडात वाकी रुताव्या, शिंदेशाही तोडे असावेत आणि पायी सांध्यात सोनसळी, गळ्यात तन्मणी, कमरेला कंबरपट्टा, पायी पैंजण.... "शालू हिरवा, पाच नि मरवा, वेणी तीपेडी घाला" हे गीत तर फारच प्रसिद्ध झाले. शृंगार आणि सौंदर्य यांचे वर्णन या सगळ्या गीतांमध्ये अगदी खुलून आलेलं आहे. आणि प्रेम! त्याविषयी किती लिहावं आणि कशाप्रकारे लिहावं असा मोठाच प्रश्न पडला आहे. तरीही एका स्त्रीच्या मनाने वाचलेल्या ह्या चार ओळी लिहीतेच... काय वाजले प्रिय ते पाऊल, तो तर वारा तिची न चाहूल, भास हो फसवा वरचेवरी, शोधितो राधेला श्रीहरी!! ...Read more

MRUTYUNJAYEE
MRUTYUNJAYEE by RATNAKAR MATKARI Rating Star
मीना कश्यप शाह

भयकथा हा रत्नाकर मतकरींच्या लेखनाचा हातखंडा. मी दहावीच्या सुट्टीत असताना भयकथा वाचायला सुरुवात केली आणि त्यांनी मला पुरात झपाटून टाकलं होतं. ही पुस्तकं असायचीही सुटसुटीत जाडीची. त्यामुळे जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी पुस्तक लागणाऱ्या मला सगळीकडे ती घेऊनजात येत असत. क्लास मध्ये लवकर पोहोचले - वाच पुस्तक, बससाठी उभी आहे, वाच पुस्तक; झोप येत नाही, वाच (हे बहुदा चक्राकार रित्या सुरु राहायचं, झोप नाही म्हणून वाचायचं आणि वाचत असायचे म्हणून झोप नाही... त्या वयात असं सगळं चालायचं - लहानपण देगा देवा...) मृत्युंजयी सुरु केली तेव्हा आधीच खेकडा, रंगांधळा वाचून झालं होतं. अजूनही एक संपवलं होतं, पण नाव नाही आठवत (बहुतेक कबंध). त्या पार्श्वभूमीवर मृत्युंजयी फार आवडलं नाही, आणि खरं तर त्यामुळे रत्नाकर मतकरींच्या भयकथा वाचणं थांबलं. अलीकडेच हे इ-बुक मिळालं किंडल वर, पुन्हा वाचलं - आतासुद्धा शेवटच्या परिच्छेदात काय वळण मिळतं त्याची उत्सुकता होती, पण एकूणच माझा patience खूपच कमी झालाय त्यामुळे skip reading, quick reading करत पुस्तक पटकन वाचून संपलं. मृत्यू, अखेर, शेवट ही भावना प्रत्येकासाठी भीतीदायकच. त्या भीतीवर बेतलेल्या कथा ह्या संग्रहात आहेत. अतिमानवीय, फँटसी, भुताटकी अशा धक्कातंत्राचा उपयोग अनेक लेखक करतात. पण मतकरीचं वैशिष्ठय असं, की ते जळमटं सारखी कथा लिहून जातात. मृत्युंजयी मधील कथांमध्ये मृत्यूची अनेक रूपं दिसतात, कथा जिवंत माणसांच्या - पण मृत्यूची चाहूल, त्याची भीती, कधी त्याचं हवेहवेपण, कधी त्याच्याकडे आपणहून जाणे, अशा अनेक रंगढंगांनी मतकरी गूढता कायम ठेवतात. ह्या पुस्तकातील, मृत्यू अवतीभवती असलेल्या प्रत्येक कथेत, आपणा सर्वांना नक्कीच सुप्त आकर्षण वाटत असलेल्या अनेक गूढ गोष्टी येतातच... मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी करण्याची अतिमानवीय साधना... स्त्री-पुरुषातील शारीरिक आणि मानसिक ओढ... पूर्वी केलेल्या चुका आणि त्याबद्दलचा सल... जुलमाचा प्रतिशोध... अतिमानवीय शक्तींनी झपाटणे... भूतबाधा, भूतांशी गाठभेट... मृत्यूच्या अनेकविध तऱ्हा... मानसिक संतुलन ढळणे... आणि तत्सम. ह्या कथाप्रकारात महत्वाचं असतं, ते शेवटच्या काही वाक्यांमधे कथेला दिलेलं वळण आणि त्यामुळे वाचकाला बसलेला धक्का. रत्नाकर मतकरींच्या गूढकथा म्हणूनच खूप प्रभावी ठरतात. आता मात्र हे धक्का तंत्र बऱ्याच जागी पाहायला मिळतं - OTT वरच्या अनेक चित्रपट किंवा नाट्यमालांमधे हे तंत्र कथाकार वापरतात, आणि लोकांना हे पहायला खरंच खूप आवडतं, म्हणूनच त्या प्रसिद्ध होतात. अलीकडचं उदाहरण "वाळवी" चित्रपट! मृत्युंजयी मधे देखील काही कथा असा आनंद देऊन जातात. पण असं आहे ना "अति सर्वत्र वर्जयेत" - त्यामुळे बऱ्याच कथांच्या शेवटचा अंदाज लागतो आणि त्यांचा प्रभाव कमी होतो. सुरुवातीला जी गूढकथांची पुस्तकं मी वाचली, तेव्हा हे धक्कातंत्र मला नवीन होतं, त्यामुळे त्यात हा अंदाज लागत नव्हता. कदाचित मृत्युंजयी तेव्हा वाचलं आणि आताही वाचलं ते ह्या तंत्राचा अति वापर झाल्यावर वाचलं गेलं म्हणून असेल, पण कमी प्रभावी वाटलं हे खरं. अर्थात प्रत्येक गोष्टीत (सध्या इतर कथांमधे फारसे न सापडणारे) एक समान सूत्र आहे - ते म्हणजे, *वाईटाचं कधीच भलं होत नाही*. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, कधीही उचलून वाचायला सुरुवात करून काही मिनिटात एक गोष्ट संपते. सध्याच्या व्यग्र काळात हे पुस्तक पुन्हा वाचायला सोपे गेले, नक्कीच. आणि मी पुन्हा एकदा ह्या कथाप्रकाराकडे आकर्षितही झाले आहे... पुन्हा सगळी गूढकथांची पुस्तकं वाचायला हवीत. ...Read more