* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MAN VS OCEAN
  • Availability : Available
  • Translators : MOHAN GOKHALE
  • ISBN : 9788195970933
  • Edition : 1
  • Publishing Year : NOVEMBER 2023
  • Weight : 250.00 gms
  • Pages : 264
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
  • Discount : OCTOBER EXHIBITION 2026(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Print Books:
AN UNSATISFIED ADAM WHO WAS FAILING IN HIS MARITAL AND PROFESSIONAL LIFE, WANTED TO TURN HIS LIFE UPSIDE DOWN. HE WANTED TO GIVE SOME MEANING TO HIS LIFE. BUT HE COULDN`T FIND HIS PURPOSE UNTIL ONE DAY ON A PLANE RIDE. ON THAT RIDE, HE SAW THE FILM `ON A CLEAR DAY`, BASED ON A SWIMMER`S ATTEMPT TO CROSS ENGLAND’S CREEK, AND FOUND HIS PURPOSE. LATER, WHILE SURFING THE INTERNET HE FOUND SEVEN CHALLENGING SWIMMING SPOTS IN THE OCEAN, SOME OF THE MOST DIFFICULT IN THE WORLD, LAID DOWN BY AN AMERICAN SWIMMER ‘STEVE MUNATONES`, WHICH HE CHOSE BASED ON HIS KNOWLEDGE AND EXPERIENCE, WHICH CAN BE COMPARED TO CLIMBING THE SEVEN HIGHEST PEAKS IN THE FIELD OF MOUNTAINEERING, AND ADAM FOUND HIS EXACT GOAL. THIS IS THE STORY OF ADAM WALKER`S PERSEVERANCE, HIS SEVEN THRILLING SEA ADVENTURES, AND A UNIQUE EXPERIENCE.
"वैवाहिक आणि व्यावसायिक जीवनात अपयशी, असमाधानी असणार्या ॲडमला आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याची ईर्ष्या होती. जीवनाला काहीतरी अर्थ द्यायचा होता; पण त्याला त्याचे ध्येय सापडत नव्हते आणि एका विमान प्रवासामध्ये अचानक त्याला ते सापडले. विमानप्रवासामध्ये ‘ ON A CLEAR DAY’ हा एका जलतरणपटूच्या इंग्लंडची खाडी पोहून जाण्याच्या प्रयत्नावर आधारित सिनेमा त्याच्या बघण्यात आला आणि त्याला त्याचे ध्येय सापडले. त्यानंतर इंटरनेटवर शोध घेत असताना ‘स्टीव्ह मुनाटोन्स’ या अमेरिकन जलतरणपटूने त्याच्या ज्ञानाच्या आणि अनुभवाच्या जोरावर निवडलेल्या जगातील सर्वांत अवघड अशा, ज्याची तुलना गिर्यारोहणाच्या क्षेत्रातील सात उत्तुंग शिखरे चढून जाण्याशीच होऊ शकेल, अशा समुद्रातील सात आव्हानात्मक पोहण्याच्या जागांचा त्याला शोध लागला आणि त्याला त्याचे नेमके ध्येय सापडले. ही ॲडम वॉकरच्या जिद्दीची, सात समुद्री साहसांची, उत्कंठावर्धक आणि एक वेगळाच अनुभव देणारी कहाणी आहे. "
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#मराठी साहित्य # आत्मकथन #मॅन VS ओशन # ऍडम वॉकर #अनुवादित #मोहन गोखले #मराठी पुस्तक # मेहता पब्लिशिंग हाऊस #MARATHI LITERATURE #AUTOBIOGRAPHY #MAN VS OCEAN #ADAM WALKER #TRANSLATED #MOHAN GOKHALE #MARATHI BOOK # MEHTA PUBLISHING HOUSE "
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
मिना हरीश सहारे, नागपूर.

कुठल्याही पुस्तकावर अभिप्राय देण्याची माझी ही पहिलीच वेळ असली तरी `दुर्दम्य` पुस्तक मनाला भिडल्यामुळे त्यावर लिहीणे मला आवश्यक वाटले. मी पण चरित्रनायक एकनाथनच्या विभागात सेवा दिली आहे. आमच्या सारख्यांना एकनाथन एक कडक तानाशाह ऑफिसर होता इतकंच माित होतं. पण लेखकाच्या नजरेतून जेव्हा त्याचे चरित्र वाचले तेव्हा तो खरा काय होता हे समजले. चरित्र वाचताना पूर्ण होई पर्यंत उत्सुकता कायम होती. कार्यालयीन जीवनातला कालखंड डोळ्यासमोर जिवंत होतो. वाचकाला खिळवून ठेवण्याचं कसब लेखकाच्या लिखाणात आहे.एकनाथन सारख्या विक्षिप्त, हेकेखोर व्यक्तीचा व लेखकाचा नक्कीच काहीतरी ऋणानुबंध असला पाहिजे. निवृती नंतरफिरून तीनदा लेखकाच्याच शहरात येणे हा योगायोग वाटत नाही. कथानकातील काही भागातील प्रसंग व घटना मजेशीर, गमतीदार वाटतात. कथेचा शेवट मनाला भिडून जातो. एका करारी, खंबीर माणसाचा अंत वाचताना मन भरून आले. पुस्तक पूर्ण केल्यावर शेवटी एक विचार आला की त्याचं मरण सुखदच झाले असे म्हणावे लागेल कारण एकाकीपणा जरी त्यांनी स्वतः निवडला होता तरी मृत्यूच्या बाबतीत भाग्याने त्यांची साथ दिली होती. त्यांच्या सारखे ताठ कणा व दुर्दम्य व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तिला परावलंबी, असहाय आयुष्य कधीच रूचलं नसतं आणि त्या नंतर आलेल्या करोना काळात त्यांचे काय हाल झाले असते त्याची कल्पनाच न केलेली बरी. कथानक वाचकाच्या मनाला भिडले यातच लेखकाचे यश आहे. पुढील लिखाणा करता शुभेच्छा. बाकी माझ्याकडून पुस्तकाचा दर्जा - खूप छान, बढिया आणि सुपर्ब... ...Read more

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
अनिल सहजे, नाशिक.

`कुलामामाच्या देशात’ हे पुस्तक म्हणजे जंगलातील अनुभवकथांचा एक विलक्षण रम्य प्रवास आहे. रवींद्र वानखडे यांच्या वनाधिकारी म्हणूनच्या प्रत्यक्ष अनुभवातून या कथा जन्माला येतात. प्रत्यक्षात घडलेल्या या कथा इतक्या रंगतदार आहेत की त्या काल्पनिक वाटाव्यात, अी त्यांची गंमत आहे. वानखडे यांच्या अनुभवांमधील कथाबीज अचूकपणे हेरून जी. बी. देशमुख यांनी त्यांना आपल्या रसाळ आणि खुमासदार शैलीत शब्दरूप दिले आहे. देशमुखांची शैली इतकी प्रवाही आणि ओघवती आहे की वाचक कथांमध्ये अक्षरशः गुंगून जातो. एकदा पुस्तक हातात घेतल्यानंतर ते पूर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेवावेसे वाटत नाही. वन हे सामान्य माणसासाठी तसे अपरिचितच क्षेत्र. जंगलातील जीवन, तेथील नियम-कायदे आणि जंगली श्वापदांचे विश्व याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. वानखडे-देशमुख द्वयी केवळ या अनोख्या जगाची ओळख करून देत नाहीत, तर त्याविषयी वाचकाच्या मनात विलक्षण कुतूहलही निर्माण करतात. ‘खुश रहेना मेरे यार’ आणि ‘महाकाय आकांत’ या दोन क्रमशः कथा तर विशेषतः चटका लावून जातात. त्या केवळ थरारक आणि अविश्वसनीय वाटाव्या अशा अनुभवांनी भारलेल्या नाहीत, तर जंगली श्वापदांची एक हळवी, माणुसकीच्या जवळ जाणारी बाजूही त्या प्रभावीपणे उलगडून दाखवतात. जी. बी. देशमुखांची खुमासदार, मिश्कील आणि रसाळ लेखनशैली वाचकाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत गुंतवून ठेवते. रवींद्र वानखडे यांच्या प्रत्यक्ष अनुभवांची सत्यता आणि देशमुखांच्या कथनकौशल्याचा सुंदर मिलाफ ‘कुलामामाच्या देशात’ घडवतो. हे पुस्तक केवळ जंगलातील अनुभवकथांचे संकलन राहत नाही, ते वाचकाला जंगलाच्या एका अनोख्या, रोमांचक आणि हळुवार विश्वाची सफर घडवते आणि नकळत सांगून जाते, ‘वनस्य कथा रम्यः!’ ...Read more