* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: BREAKING OUT:AN INDIAN WOMANS AMERICAN JOURNEY
  • Availability : Available
  • Translators : SUNANDA AMRAPURKAR
  • ISBN : 9789387789012
  • Edition : 1
  • Publishing Year : APRIL 2018
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 248
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
  • Discount : SPECIAL OCTOBER DISCOUNT 33/50 PERCENT(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Print Books:
PADMA DESAI GREW UP IN THE 1930S IN THE PROVINCIAL WORLD OF SURAT, WHERE SHE HAD A SHELTERED AND STRICT UPBRINGING IN A TRADITIONAL GUJARATI ANAVIL BRAHMIN FAMILY. HER ACADEMIC BRILLIANCE WON HER A SCHOLARSHIP TO BOMBAY UNIVERSITY, WHERE THE FIRST HEADY TASTE OF FREEDOM IN THE BIG CITY LED TO TRAGIC CONSEQUENCES???SEDUCTION BY A FELLOW STUDENT WHOM SHE WAS THEN COMPELLED TO MARRY. IN A FAILED ATTEMPT TO END THIS DISASTROUS FIRST MARRIAGE, SHE CONVERTED TO CHRISTIANITY. A SCHOLARSHIP TO AMERICA IN 1955 LAUNCHED HER ON HER LONG JOURNEY TO LIBERATION FROM THE BURDENS AND CONSTRAINTS OF HER LIFE IN INDIA, WITH A GROWING SELF-AWARENESS AND TRANSFORMATION AT MANY LEVELS, AS SHE MADE A NEW LIFE FOR HERSELF, MET AND MARRIED THE CELEBRATED ECONOMIST JAGDISH BHAGWATI, BECAME A MOTHER, AND ROSE TO ACADEMIC EMINENCE AT HARVARD AND COLUMBIA. HOW DID SHE NAVIGATE THE TUMULTUOUS ROAD TO ASSIMILATION IN AMERICAN SOCIETY AND CULTURE? AND WHAT DID SHE RETAIN OF HER INDIAN UPBRINGING IN THE PROCESS? THIS BRAVE AND MOVING MEMOIR, WRITTEN WITH A NOVELIST???S SKILL AT EVOKING PERSONALITIES, PLACES AND ATMOSPHERE, AND A SCHOLAR???S INSIGHTS INTO CULTURE AND SOCIETY, COMMUNITY AND FAMILY.
बंधमुक्त होताना हे आत्मकथन आहे अर्थतज्ज्ञ आणि पद्मभूषण पुरस्कारप्राप्त पद्मा देसाई यांचे. लेखिकेचा जन्म १९३१ साली गुजरातमधील सुरत या ठिकाणी झाला. २०व्या शतकात एक सामान्य स्त्री ते संशोधक हा प्रवास त्यांच्यासाठी खूपच आव्हानात्मक आणि खडतर ठरला. आज एक अर्थतज्ज्ञ म्हणून परिचित असणाऱ्या पद्मा देसाई लहानपणापासूनच शालेय अभ्यासात हुशार होत्या. घरी कडक शिस्त असली तरी शिक्षणासाठी मात्र खूप पाठिंबा होता. त्यामुळे त्यांची शिक्षणातली रुची उत्तरोत्तर वाढत गेली. परंतु वैयक्तिक आयुष्य मात्र संकटे आणि वादळांनी व्यापलेले होते. मुंबई विद्यापिठातून त्यांनी एम.ए.ची पदवी संपादित केली आणि त्याच वेळी त्यांना लग्न करण्याचा निर्णय घ्यावा लागला. हा प्रेमविवाह होता. त्यातून त्यांच्या वाट्याला आली ती केवळ फसवणूक. हे लक्षात यायला त्यांना बराच वेळ लागला. त्या दरम्यान त्यांना शिक्षणानिमित्त अमेरिकेला जाण्याची संधी मिळाली. त्यांनी या संधीचे सोने केले. भारतीय संस्कृतीत वाढलेल्या लेखिकेला सुरुवातीला अमेरिकेतील संस्कृतीशी जुळवून घेणे खूपच कठीण गेले; परंतु लवकरच लेखिका त्या `ठिकाणी सरावली. तिथल्या संस्कृतीनेच लेखिकेला तिच्या वैवाहिक आयुष्याविषयी विचार करण्यास भाग पाडले. डॉक्टरेट करत असताना केब्रिज युनिव्हर्सिटीत राहत असताना, तसेच कोलंबिया कॉलेजमध्ये आलेले अनेक अनुभव लेखिकेने सांगितले आहेत. लेखिकेवर तिचे वडील, आई आणि काकी यांचा आयुष्यभर प्रभाव होता, हे जाणवते. विसाव्या शतकात भारतासारख्या देशात स्त्री म्हणून वैयक्तिक स्वातंत्र्यासाठी काही निर्णय घेणे तेवढे सोपे नव्हते. परंतु समाजाला, परंपरांना न जुमानता लेखिकेने अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले. त्यांपैकी पहिला धर्मांतराचा आणि दुसरा अर्थतज्ज्ञ जगदीश भगवती यांच्याशी दुसरा विवाह करण्याचा. परंपरांच्या बंधनातून मुक्त होऊन स्वतःला सिद्ध करणाऱ्या या विदुषीचे आत्मचरित्र प्रत्येक स्त्रीसाठी प्रेरणादायक ठरेल.

No Records Found
No Records Found
Keywords
"#BREAKING OUT# PADMA DESAI# SUNANDA AMRAPURKAR# FAMILY# FATHER# MOTHER# CHILDHOOD# ADOLESCENCE# SEDUCTION# DELHI# CONVERSION TO CHRISTIANITY# JAGADISH# ANURADHA# SURAT# MARRIAGE# DIVORCE# AMERICA# PADMA DESAI# ECONOMIST# COLUMBIA# BOMBAY UNIVERSITY# CAMBRIDGE UNIVERSITY #TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #बंधमुक्त होताना# अनुवादित आत्मकथन# सुनंदा अमरापूरकर#गुजराती कुटंब# पद्मा देसाई# सुरतेत जन्म# कुशाग्र बुद्धी# सविता# हंसा : बहिणी# दिनकर : भाऊ# विधवा काकी# मॅट्रिकमध्ये दुसरी# शिक्षणासाठी मुंबई# ‘आरबी’शी ओळख# शारीरिक फसवणूक# अमेरिकेची पेÂलोशिप# दिल्ली स्वूÂल ऑफ इकॉनॉमिक्स# हॉर्वर्ड युनिव्हर्सिटी# घटस्फोट# खिचन धर्म# रशियाचा दौरा# अर्थव्यवस्थेचा अभ्यास# जगदीशशी लग्न# अनुराधाचा जन्म# अमेरिकेत स्थायिक... # "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAMANA 21-03-2021

    स्त्रीमुक्तीची गाथा... स्वत:च्या निराळेपणाची, ‘स्व’त्वाची प्रखर जाणीव अभिव्यक्त करणे ही विद्यमानकालीन समाज आणि संस्कृतीमधील महत्त्वाची जीवनकेंद्रीय संकल्पना आहे. ‘स्व’त्व-जाणीव’ ही दुहेरी असते. स्वत:चे स्वेतरांशी असणारे सारखेपण आणि इतरांकडून असणारे ेगळेपण जाणवते तेव्हा विकसनशील स्त्री बंधमुक्त होऊ पाहते. वस्तुत: मनुव्यवस्थाशरण समाजात कोणत्याही स्त्रीला ‘स्व’त्वाची जाणीव फारशी नसते. जी असते ती पुरुष संस्कृतीला शरण जाण्यासाठी. स्त्रियांच्या जीवन-जाणिवांमधील वेगळेपण शोधणे म्हणजे त्यांच्या ‘स्व’त्वाचा (स्त्रीत्वाचा नव्हे) शोध घेणे होय. ‘पद्मा देसाई’ यांच्या ‘बंधमुक्त होताना’ या स्वकथनाच्या यादृष्टीने विचार करता येणे शक्य आहे. त्यांच्या ‘ब्रेकिंग आऊट’ या इंग्रजी स्वकथनाचा उत्तम अनुवाद मान्यवर अभ्यासक सुनंदा अमरापूरकर यांनी मराठीत केला आहे. पुरुषसत्ताक घटितातून स्त्रीला सहजपणे बंधमुक्त होता येत नाही. त्यात यश मिळतेच असे नाही, परंतु मनसामर्थ्याच्या जोरावर किमान बंधमुक्तीची जाणीव तरी स्त्रीला जोपासावी लागते. पद्मा देसाई यांच्या स्वकथनात विशिष्ट विषय, समस्या, बंध यांचे तपशील येतात. इतकेच नव्हे, तर पारंपरिक हतबल स्त्री आणि बंधमुक्तीचा संघर्ष करणारी स्त्री यांच्या दृष्टिकोनातील मूलभूत फरक या स्वकथनाच्या तळाशी आहे. यात कालिक प्रभाव या घटकाला महत्त्व आहे म्हणून हे लेखन कथा, गोष्ट, कहाणी ठरत नाही. तर ते ‘स्त्रीवादी’ जाणिवेचे दर्शन आहे. ‘एक विचार’ आहे. स्त्री ही समाजात पुरुषांच्या आक्रमक सत्तेशी अनेक प्रकारच्या नात्यांनी अडकलेली आहे. तिची ‘मानुषता’ दग्ध केली गेली आहे. हे जीवशास्त्रीय नसून संस्कृतीनिर्मित आहे. नैसर्गिक शारीरिक रचनेतील भेदामुळे स्त्रीला दुय्यम स्थानी ठेवले गेले आहे. या स्वकथनाच्या रूपाने समाजातील सांस्कृतिक घटकांचा अन्वयार्थ स्पष्ट होतो. ‘माणूस’ म्हणून स्त्रीला समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर ठेवू पाहणाऱ्या कुटुंबाचेही येथे विश्लेषण आहे. सुरत प्रांतातील एका पारंपरिक गुजराती ब्राह्मण कुटुंबात १९३० तीसच्या आसपास पद्मा देसाईचा जन्म आहे. सुरक्षित - कर्मठ वातावरणात या वाढल्या तरी शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारावर त्यांना विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळाली. मुंबई विद्यापीठात शिकत असताना त्या एका परिचित तरुणाच्या मोहजालात पूर्णपणे फसतात. देसाई यांना परिचिताशी परिस्थितीवश लग्नही करावे लागते. पण पुढे हे वैवाहिक जीवन दु:खाची ‘काहिली’ बनते. त्यांना संबंधातून गुप्तरोग होतो. स्त्री म्हणून तिचे स्वत्व मारले जाते. याविषयी लग्नबंधनातून सुटण्यासाठी पद्मा देसाई खिश्चन धर्मही स्वीकारतात. तथापि इच्छास्वातंत्र्य असूनही त्यांना ‘घटस्फोट’ मिळत नाही. दरम्यान, त्यांना अमेरिकन शिष्यवृत्ती मिळते. हा अंधारातील एक प्रकाश किरणच. जागृत मनाच्या शिक्षणामुळे त्यांना आपल्या स्वत्वाची-सत्त्वाची जाणीव होते. लेखिकेवर तिचे वडील, आई आणि काकी यांचा आयुष्यभर प्रभाव होता. हे जाणवते. विसाव्या शतकात हिंदुस्थानसारख्या देशात स्त्री म्हणून वैयक्तिक स्वातंत्र्यासाठी काही निर्णय घेणे तेवढे सोपे नव्हते. परंतु समाजाला, परंपरांना न जुमानता लेखिकेने अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले. याच वाटेने जाताना त्यांना एक समंजस अर्थतज्ज्ञ व्यक्त भेटते. दोघे विवाहबद्ध होतात. याबरोबरच हार्वर्ड आणि कोलंबियासारख्या विद्यापीठातून पद्मा देसाई यांना नावलौकिक प्राप्त होतो. अमेरिकेत वास्तव्य केल्यामुळे तेथील जीवनशैली, संस्कृती-समाजाशी एकरूप होतात. तरीही विशेष म्हणजे न विसरता येणारे हिंदुस्थानीत्व. परंपरांच्या बंधनातून मुक्त होऊन स्वत:ला सिद्ध करणाऱ्या या विदुषीचे आत्मचरित्र प्रत्येक स्त्रीसाठी प्रेरणादायक ठरेल. – शशिकांत लोखंडे ...Read more

  • Rating StarSAPTAHIK SAKAL 25-08-2018

    विस्तारलेल्या जाणिवांचे कथन... अनेक शतकं कौटुंबिक-सामाजिक दडपणाखाली वावरणाऱ्या भारतीय स्त्रिया साधारणपणे एकोणिसाव्या शतकापासून लिहित्या झाल्या आणि कविता-कथांच्या बरोबरीनं आपल्या आयुष्याचा ताळेबंद जगासमोर मांडण्याइतक्या धीटही झाल्या. स्त्रियांच्या आतमकथनांचा हा प्रवाह गेलं दीडेक शतक भारतीय साहित्यात आपलं स्वतंत्र आणि ठळक अस्तित्व राखत आला आहे आणि स्त्रीलिखित साहित्याची धारा अतिशय बळकट आणि समृद्धही करत आला आहे. याचं कारण ही आत्मकथनं म्हणजे दबलेपण दूर सारणाऱ्या स्त्रियांची एकसुरी अभिव्यक्ती नाही. स्वत:ला ठामपणे व्यक्त करणाऱ्या या प्रत्येकीचं जगणं वेगळं, जगण्याला सामोरं जाण्याची ताकद वेगळी, अनुभव वेगळे, जीवनधारणा वेगळ्या आणि स्वत:ला शोधण्यासाठी प्रत्येकीनं निवडलेली वाटही वेगळी. कुणी पारंपरिक भारतीय चौकटीत राहून आपलं अवकाश शोधू पाहिलं आहे, कुणी व्यवस्थेला थेट आव्हान दिलं आहे, तर कुणी आपल्या प्रखर बुद्धीची, कलागुणांची हाक ऐकत प्रवास करताना स्वत:ला सामाजिक चौकटीपासून पुष्कळ उंच नेलं आहे. ‘बंधमुक्त होताना’ हा पद्मा देसाई यांच्या ‘ब्रेकिंग आउट’ या आत्मकथनाचा मराठी अनुवाद हे याच प्रकारचं लेखन असलं, तरी ते फक्त ‘स्त्रियांचं आणखी एक आत्मकथन’ नाही. जागतिक स्तरावर नावाजलेल्या अर्थतज्ज्ञ आणि पद्म पुरस्काराने सन्मानित झालेल्या या विदुषीच्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक संघर्षाचा / यशापयशाचा आलेख म्हणून केवळ या लेखनाकडे पाहता येणार नाही. या संपूर्ण लेखनात एखाद्या कादंबरीसारखी नाट्यमयता असली तरी पद्मा देसाई यांनी अतिशय कसून आणि धीटपणे घेतलेला हा आत्मशोधही आहे. शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रात उत्तुंग यश मिळवलेल्या एखाद्या स्त्रीने निर्भीडपणे केलेलं हे आत्मपरिक्षण स्वातंत्र्य, परंपरा, कौटुंबिक संस्कार अशा अनेक मूल्यांचीही व्यक्तिगत संदर्भात सखोल चिकित्सा करणारं आहे. पारंपरिक गुजराथी कुटुंबातला पद्मा देसाई यांचा १९३१चा जन्म. मुळातच बुद्धिमान असलेल्या पद्माला पदव्युत्तर शिक्षणासाठी मुंबई विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळते आणि कडक बंधनं असलेल्या घरातून ती प्रथमच स्वातंत्र्य अनुभवण्यासाठी मुंबईमध्ये होस्टेलवर राहू लागते. मात्र या स्वातंत्र्याचं आयुष्यभर त्रस्त करणारं मोल तिला चुकवावं लागतं. बरोबर शिकणाऱ्या एका तरुणाच्या मोहजालात अडकून त्याच्याशी लग्न करणं तिला भाग पडतं. या लग्नाने दिलेल्या शारीरिक, मानसिक, भावनिक वेदना पद्मा देसार्इंना पुढची अनेक वर्षं छळत राहिल्या. पुढे जगदीश भगवती यांच्यासारख्या उच्च विद्याविभूषित, समजूतदार जोडीदारासोबत अमेरिकेत त्यांचं सहजीवन सुरू झालं. हार्वर्ड, कोलंबियासारख्या नामांकित विद्यापीठातून शैक्षणिक मान्यता आणि लौकिकही मिळाला आणि वयाच्या चाळिशीत कन्यारत्नाची प्राप्ती झाली. हा सगळा जीवनप्रवास ‘बंधमुक्त होताना’मध्ये पद्मा देसाई यांनी रेखाटला आहे. मात्र हा प्रवास एकरेषीय नाही. वडील, आई, काकी या लहानपणी जीवनात आलेल्या तीन मोठ्या माणसापासून पती जगदीश आणि मुलगी अनुराधा या पाच व्यक्तींविषयीच्या पाच प्रकरणातून पद्मा देसाई यांचं कौटुंबिक आयुष्य समोर येतं. ज्या फसवणुकीमुळे त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर खोल परिणाम घडवला त्या फसवणुकीला आपण कसे बळी पडलो, तरुण वयातल्या भावनांना आवरू न शकल्यामुळे एका चुकीच्या माणसाच्या जाळ्यात आपण कसे अडकलो, आपण त्याच्यावर प्रेम करतो आहोत, भविष्यात आपल्या आयुष्यात हाच पुरुष राहणार आहे, असा विचार करत अपराधीपणाच्या भावनेपासून स्वत:ला दूर ठेवायचा कसा प्रयत्न करत राहिलो अणि गुप्तरोगासारख्या भयानक आजाराला एकटीने तोंड देताना झालेल्या शारीरिक-मानसिक यातनांतूनही उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत जाण्याकरिता कसा प्रयत्न करत राहिलो या सगळ्याची स्पष्ट आणि थेट मांडणी पद्मा देसाई यांनी केली आहे. मुळातली विलक्षण बुद्धिमत्ता आणि आईकडून मिळालेली जबरदस्त महत्त्वाकांक्षा यांच्या जोरावर विद्येच्या प्रांतात मिळालेलं यश आणि आधी जगदीश भगवती यांची सोबत मिळाल्यामुळे आणि नंतर मुलगी झाल्यामुळे आयुष्यात आलेला आनंद यांचं विवेचनही या आत्मकथनात आहे. विसाव्या शतकाच्या मध्यात कुटुंब, समाज, लग्नसंबंध अशी सगळी बंधनं तोडून स्वत:ला प्रस्थापित करण्यासाठी अमेरिकेत गेलेल्या आणि तिथल्या भूमीत सापडलेला स्वातंत्र्याचा कंद जपणाऱ्या पद्मा देसाई यांच्या व्यक्तिगत संघर्षाची, अनेक अडथळे पार करून मिळालेल्या त्यांच्या शैक्षणिक-व्यावसायिक यशाची ही कहाणी नुसती वाचनीय नाही, ती विचार करायला लावणारी आहे. पारंपरिक भारतीय कुटुंबातल्या चालीरीती, विधवा स्त्रियांकडे पाहण्याचा बदलत गेलेला दृष्टिकोन, कौटुंबिक नातेसंबंध, आई होण्याची जबरदस्त आकांक्षा आणि अमेरिकेत स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठीची धडपड, तिथे राहून भारतीय जीवनधारणांकडे, आपल्या आई-वडिलांकडे पाहण्याच्या दृष्टीत झालेला बदल, अमेरिकन जीवनशैलीशी, तिथल्या संस्कृतीशी जुळलेले नातं आणि तरीही भारतीय संस्कृतीतल्या काही गोष्टींची वाटणारी अथार्थता वाचताना एका भारतीय स्त्रीचा सीमोल्लंघनाचा प्रवास तर उलगडत जातोच, पण तिच्या विस्तारत गेलेल्या जाणिवांचा प्रवासही समोर येतो. स्वत:ला कठोरपणे तपासून पाहणारं हे आत्मकथन भारतीय स्त्रियांच्या आत्मचरित्रांमध्ये वेगळं उठून दिसणारं आहे. सुनंदा अमरापूरकर यांनी या मूळ इंग्रजी पुस्तकाचा उत्तम अनुवाद केला आहे. – वर्षा गजेंद्रगडकर ...Read more

  • Rating Starसकाळ, ३ मे, २०१८

    रशियन अर्थकरण, जागतिक आर्थिक समस्या आदी विषयांतल्या तज्ज्ञ पद्मा देसाई यांचं हे आत्मचरित्रं. पारंपारिक गुजराती कुटुंबात जन्मलेल्या पद्मातार्इंचं आयुष्यच विलक्षण. एका तरुणाच्या मोहजालात फसल्यानं लग्न झालं, नंतर त्यातून बाहेर पडण्यासाठी खिस्ती धर्म त्ांनी स्वीकारला. अशातच त्यांना अमेरिकेतली शिष्यवृत्ती मिळाली. या वाटेवर त्यांना एक अर्थतज्ज्ञ भेटले. त्यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या आणि पुढं हार्वर्ड, कोलंबियासारख्या विद्यापीठांत त्यांनी लौकिक मिळवला. या सगळ्या आयुष्यावर त्यांनी आत्मचरित्रात लिहिलं आहे. बे्रविंâग आउट या मूळ इंग्लिश पुस्तकाचा अनुवाद सुनंदा अमरापूरकर यांनी केला आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MI GALIB BOLTOY
MI GALIB BOLTOY by SHABBIR ROMANI Rating Star
Arvind deshpande

Mirza Ghalib is the Jewel in the Urdu literature. He is the pioneer in setting new trend in it. Authar Shabbir Romani excellently explained it. Everyone who is not acquainted with urdu literature should go throw it. The socio political and historicalenviorn of that time is skillfully reflected in his poetry and was narrated by author shabbir Romani. ...Read more

NADIMUKH
NADIMUKH by PERUMAL MURUGAN Rating Star
गार्गी म्हात्रे

पेरुमाल मुरुगन ह्या तामिळ लेखकाच " नदीमुख" हे अनुवादित पुस्तक वाचले. मराठी मध्ये दाक्षिणात्य भाषां मधल्या तामिळ भाषेच्या उत्तम साहित्याची वाचन संधी या पुस्तकाच्या निमित्ताने मिळाली. साठच्या दशकात जन्मलेल्या पिढीला वेगाने ,खर तर अती वेगाने बदलत जाणाऱ्ा तंत्रज्ञान व तरुण पिढीची मानसिकता यांचे सुंदर चित्रण या कादंबरी मध्ये करण्यात आले आहे. माणूस किंवा असुर पालक असला की मुलांच्या भविष्याची चिंता त्यामधून उद्भवणारा संघर्ष साध्या सोप्या पण प्रवाही भाषेमधून आपल्या समोर उभा राहातो. कुमारासुराच्या एकसुरु झापडे लावून घेतलेल्या आयुष्यात `नदीमुख` दर्शना नंतर झालेली तगमग व बदल यांचे खूप सुंदर वर्णन शेवटी आलेल आहे. डॉ. मानसी जयंत केळकर यांनी अतिशय प्रवाही भाषेत व उत्कृष्ट समर्पक शब्दात पुस्तक अनुवादित केल्यामुळे कांदबरीची मजा घेता येते. मराठी व्यतिरिक्त अन्य भाषेतील साहित्य वाचनाला उपलब्ध करुन दिल्या बद्दल मेहता पब्लिशिंग हाऊस व डॉ मानसी केळकर यांचे आभार ! ...Read more