* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
DR.UMA KULKARNI DURING THE LAST FOUR DECADES, HAS PUBLISHED MORE THAN 55 TRANSLATED TITLES, COVERING A FEW THOUSAND PAGES. THESE TITLES PERTAIN TO SHORT STORIES, NOVELS, DRAMA, CRITICISM, ETC. ALLMOST ALL MAJOR AUTHORS IN KANNADA LITERATURE HAVE BEEN COVERED.. SHE IS ONE OF THE LEADING PERSONS TRANSLATING CREATIVELY THE LITERARY WORKS FROM KANNADA INTO MARATHI. SHE IS THE AUTHOR OF THE WIDELY READ NOVEL ‘KETKAR VAHINI’, BASED ON REAL LIFE STORY. SHE HAS WRITTEN MANY ARTICLES ON VARIOUS SUBJECTS IN DAILIES, MAGAZINES AND DIVALI SPECIAL SSUES AS WELL. SHE IS THE FIRST CENTRAL SAHITY AKEDEMI TRANSLATION AWARD-WINNER INCLUDING MANY MAJOR AWARDS TOTALING TWENTYSIX. “SAMVADU-ANUVADU” (“COMMUNICATION-TRANSLATION”) IS HER AUTOBIOGRAPHY, MAINLY COVERING HER PERSONAL LIFE AS WELL AS HER VARIED WIDE EXPERIENCES IN THE FIELD OF TRANSLATION. . THIS WORK STARTS WITH HER CHILDHOOD, HER PARENTS, BROTHERS AND SISTER, HER EDUCATION, AND THE SURROUNDING ATMOSPHERE IN BELAGAV TOWN THEN. SHE MARRIED VIRUPAX IN 1970 AND HER NEW LIFE STARTED AT PUNE, A PROGRESSIVE AND CULTURALLY RICH CITY. SHE CONTINUED HER EDUCATION AFTER THE LAPSE OF ABOUT ELEVAN YEARS AFTER HER MARRIAGE AND GOT MASTER’S DEGREE IN ARTS AND PAINTING SUBJECT AND DOCTOR OF LITERATURE DEGREE IN 1992, FOR THE RESEARCH ON DRAVIDIAN TEMPLE ARCHITECTURE AND ITS AESTHETICS. SHE IS A PROFESSIONAL ABSTRACT PAINTER AS WELL. UMA STARTED HER TRANSLATION CAREER SIMULTANEOUSLY IN 1981, WITH THE HELP OF HER HUSBAND, SINCE SHE DID NOT KNOW KANNADA PROPERLY. DURING BOTH OF HER CAREERS UMA WAS EXPOSED TO VARIETY OF KANNADA LITERARY WORKS, DIGNITARIES IN BOTH THE FIELDS. SHE HAD TRAVELED EXTENSIVELY FOR HER RESEARCH FIELD-WORK. SHE NARRATES INTENTLY HER HEART-TOUCHING EXPERIENCES, SIMULTANEOUSLY SHE COMMENTS ON THE LIGHTER SIDE OF HER LIFE AND MAKES THE READERS SMILE. HER RICH CONTEMPLATION OF VARIOUS SUBJECTS IS EXPRESSED VIVIDLY IN THIS AUTOBIOGRAPHY. THIS AUTOGRAPHY HAS NO COMPLAINING TONE. IT CONTAINS NO HURT-FEELINGS AND NO MURMURS. THERE IS NO SELF-JUSTIFICATION ANYWHERE. THE AUTOBIOGRAPHY DOES NOT REST AT HER LIFE-EXPERIENCES ALONE. BUT IT PERSUADES THE READERS TO INTROSPECT. IT THROWS A FRESH LIGHT ON THE HUMAN RELATIONSHIPS, THIS BOOK WITH ITS RICH VIEW-POINT OF LIFE ENRICHES ITS READERS AS WELL.
अनुवादाच्या क्षेत्रात उमाताईंचा अनुभव खूपच दांडगा आहे. लग्नापर्यंतचा काळ बेळगावात गेल्याने कन्नड भाषा कळत होती, मात्र ती त्यांची बोली भाषा नव्हती. पती विरुपाक्ष मात्र कन्नड बोलणारेच होते. त्यांच्या नोकरीमुळे लग्नानंतर पुण्याच्या वास्तव्यात मित्र परिवारात सकाळ -संध्याकाळ फिरणे, बाहेर जेवणखाण आणि आपसात भरपूर गप्पा, हाच उद्योग होता. या वेळी एकमेकांच्या साहित्यप्रेमाची ओळख पटली. त्याच वेळी कन्नड साहित्यातील शिवराम कारंतांच्या कादंबरीला तिसरा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. मराठी साहित्यापेक्षा कन्नड भाषेत निराळे काय आहे, याविषयी त्यांना औत्सुक्य होते. विरुपाक्षांनी कारंतांची ही कादंबरी वाचण्यासाठी मागवून घेतली, व त्यातील आशय जमेल तसा उमाताईंचा ते सांगू लागले. सहजच उमाताई त्याचं भाषांकन मराठीत कागदावर उतरवू लागल्या आणि हाच त्यांच्याकडून घडलेला पहिला अनुवाद. लहानपणच्या बेळगावातील वास्तव्याविषयी, तसेच नातेसंबंध, सामाजिक घडामोडी, याविषयीच्या अनुभवाविषयीचे कथन येते. आजूबाजूचा परिसर, मित्रमंडळी यांच्या प्रेमळ आठवणी, थोर साहित्यिकांच्या सहवासाचा, त्यांच्या स्वभावाचा समृद्ध करणारा अनुभवही कधी मिस्कीलतेने, कधी गंभीर भाष्य करून त्या सांगतात. आयुष्यात त्यांना भेटलेल्या विविध व्यक्तिरेखांच्या सवयी, स्वभाव बारकाईने सांगून त्यांची आपल्याशीही सहज भेट घडवतात. यात साहित्यिक लेखन, खाद्य पदार्थांची देवाणघेवाण, त्यांचा चित्रकलेचा छंद, नवीन गोष्ट शिकणे या सगळ्याची ओळख होते. नेहमीच्याच ओघवत्या शैलीतील हे वर्णन कन्नड संस्कृतीशी जोडून घेणारे, वाचकांना पुस्तकाशी गट्टी करायला लावणारे आहे. लेखिकेने आयुष्याच्या पूर्वार्धातील बेळगावातील वास्तव्याविषयी, नातेसंबंधांविषयी, सामाजिक घडामोडींविषयीचे कथन; तसेच, आजूबाजूचा परिसर, मित्रमंडळी यांच्या प्रेमळ आठवणी, थोर साहित्यिकांच्या सहवासाचा, त्यांच्या स्वभावाच्या समृद्ध करणाऱ्या अनुभवाविषयी केलेले मिस्कील, तर कधी गंभीरही भाष्य.
1) मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचा सर्वोत्कृष्ट आत्मकथानाचा पुरस्कार मिळाला आहे. * म.सा.प.,मंगळवेढा- सर्वोत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार २०१७ . * अ.भा.म.सा.प., बडोदा - उत्कृष्ट आत्मकथन २०१७. * अश्वमेध ग्रंथालय व वाचनालय, सातारा तर्फे कै. भास्करराव ग. माने अक्षरगौरव साहित्य पुरस्कार २०१७ * साहित्यप्रेमी भगिनी मंडळ , पुणे तर्फे उत्कृष्ट आत्मकथन पुरस्कार २०१७.

No Records Found
No Records Found
Keywords
#KANNADAMARATHITRANSLATOR# #KANNADAMARATHITRANSLATOR #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
  • Rating Starराजश्री गायकवाड साळगे

    डाॅ. उमा कुलकर्णी यांची अनेक अनुवादित पुस्तके वाचल्यानंतर त्यांचे `संवादु अनुवादु` हे आत्मकथन वाचण्याची तीव्र इच्छा होती. पुस्तक हातात पडले नि मुखपृष्ठावरील लेखिकेच्या निरागस चेहऱ्याप्रमाणेच त्यांच्या मनाची निरागसता पुस्तकभर जाणवत राहिली. अतिशय समर्प शीर्षक असलेल्या या आत्मकथनात प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे लेखिकेला असलेली साहित्याविषयीची उपजत जाण व प्रेम . म्हणूनच कदाचित त्यांचे जीवन साहित्यमय होऊन गेले असावे. `संवादु अनुवादु` या आत्मकथनाचे वैशिष्ट्य म्हणजे लेखिकेची संयतशैली. दुसऱ्याला सहज मोठेपण देणाऱ्या या अनुवादिकेला मूळ लेखकांइतकीच लोकप्रियता लाभली. जवळपास पंचावन्नपेक्षा जास्त पुस्तकांचा अनुवाद करून सलग साडेतीन दशके त्या सर्जनशील अशा अनुवाद क्षेत्रात रमल्या. बेळगावातील परंपरावादी घरात उमा कुलकर्णी यांचे बालपण गेले. बालपणापासूनच कला, संगीत व वाचनाची त्यांना मनस्वी आवड. लग्नानंतर पती विरूपाक्ष कुलकर्णी यांच्या नोकरीनिमित्त त्यांच्यासोबत त्या पुण्यात आल्या. पुण्याच्या शहरी वातावरणात त्यांच्या सहजीवनाला सुरुवात झाली. रोज संध्याकाळी फिरायला जाण्याच्या नेमातून झालेल्या गप्पांमधून त्यांना एकमेकांच्या साहित्यप्रेमाची कुणकुण लागली. विरूपाक्ष यांना कन्नड साहित्य वाचण्याची विशेष आवड. कोणतेही पुस्तक वाचले की त्यातील कथानक पत्नीला रंगवून सांगणे हा त्यांचा शिरस्ता. उमा कुलकर्णी यांच्या अनुवाद लेखनाची सुरुवातही काहीशी गंमतीशीरच झाली. प्रसिद्ध कन्नड साहित्यिक डाॅ. शिवराम कारंत यांच्या `मुकज्जीची स्वप्ने` या ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कादंबरीविषयी विरूपाक्ष सांगत असताना उमा यांनी त्यांना कादंबरी वाचून दाखवायचा आग्रह धरला व स्वतःला समजावी यासाठी त्या ती मराठीत लिहू लागल्या. अशाप्रकारे त्यांचा पहिला अनुवाद लिहून झाला! स्वतःला समजावे यासाठी कन्नड कादंबरीचा केलेला मराठी अनुवाद, त्यानंतर ती कादंबरी इतरांपर्यंत पोचवण्यासाठी केलेला अनुवाद व पुढे जीवनाचा अविभाज्य व अपरिहार्य भाग म्हणून केलेला अनुवाद, असा त्यांचा अनुवादलेखनाचा विलक्षण असा प्रवास! विरूपाक्ष कुलकर्णी मराठी भाषेतील उत्तमोत्तम साहित्याचे कन्नडमध्ये तर उमा कुलकर्णी कन्नडमधील साहित्य मराठीत अनुवादित करीत असत. दोघेही अनुवादाच्या दुनियेत इतके रममाण झाले की साहित्य व अनुवाद हा त्यांच्या सहजीवनाचा जणू साथीदार झाला. अनुवादलेखन करत असताना पत्नीच्या नावाने कन्नड लेखकांशी पत्रव्यवहार करणे, त्यांना कानडी भाषा येत नसल्यामुळे रोज पुस्तकाची काही पाने वाचून दाखवणे, ते रेकॉर्ड करून ठेवणे, एखादवेळी एखादा कन्नड शब्द अडला तर तो शब्दकोशात बघून त्याचा अर्थ शोधून ठेवणे या गोष्टी विरूपाक्ष आवडीने करीत. जीवनाच्या जोडीदाराच्या वयाचे मोठेपण मान्य केल्यावर त्यांनीही वयाने लहान असलेल्या आपल्या पत्नीचे लाड पुरवणे (दोघांमध्ये दहा- साडेदहा वर्षांचे अंतर) हे त्यांच्या समंजस सहजीवनाचे गुपित. संध्याकाळी नित्यनियमाने फिरायला जाणे, साहित्यिक कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावणे व समाजकारण, राजकारण यांसारख्या विषयांवर मोकळेपणानेे गप्पा मारणे यातून त्यांच्यातील वैचारिक वीण घट्ट होत गेली. कधी कधी या गप्पांमधूनच लेखकाच्या वाक्यांमधला दडलेला अर्थही त्यांना उमगत गेला. दिवसातील जास्तीत जास्त वेळ लिखाणात घालवणे हा या लेखक दाम्पत्याचा आवडता छंद. लिखाणाला पुरेसा वेळ मिळावा म्हणून विरुपाक्ष यांनी नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेणे ही बाब अजबच. निवृत्तीनंतर सकाळच्या चहा व नाश्त्याची जबाबदारी त्यांनी घेतल्यामुळे रात्रीच्या शांत झोपेनंतर लेखिकेला सर्जनशील लेखनासाठी सकाळचा मिळालेला वेळ महत्वाचा ठरत असे. डाॅ. शिवराम कारंत यांच्या कांदबरीपासून सुरू झालेला अनुवादलेखनाचा प्रवास एस. एल. भैरप्पा, यु.आर.अनंतमूर्ती, पूर्णचंद्र तेजस्वी, गिरीश कर्नाड, सुधा मूर्ती आणि अगदी अलीकडच्या काळातील वैदेही यांच्यापर्यंत अगदी सहजतेने झाला. कोणत्याही कलाकृतीचा अनुवाद करत असताना अनुवादिका, `त्या लेखकाच्या विचारधारेचे बोट धरून काही पावले पुढे गेलो की नाही`, एवढाच विचार करतात. एक उत्तम वाचक या नात्याने त्या वाचकांच्या बाजूच्या अनुवादिका आहेत. अनुवादात्मक लेखनातून आनंद मिळवणे हेच या लेखकद्वयीचे जीवनध्येय. म्हणूनच सलग साडेतीन दशके लेखिका अनुवादासारख्या वेगळ्या क्षेत्रात रमू शकल्या. पतीच्या आग्रहाखातर त्या कन्नड भाषा शिकल्या. सुरुवातीला वाटणारी धाकधूक आणि नंतर हळूहळू मनातील भीती जाऊन जिभेवर रूळलेली कानडी भाषा त्यांना अनुवादासाठी उपयुक्त ठरली. या लेखनाच्या निमित्ताने कन्नड साहित्यिकांसह मराठीतील प्रसिद्ध साहित्यिक व विचारवंत यांच्याशीही त्यांचे स्नेहबंध जुळले. सुधाकर देशपांडे, डाॅ. द. दि. पुंडे, पु. ल. देशपांडे, कमल देसाई, अनिल अवचट, कविता महाजन यांचा साहित्यिक व कौटुंबिक सहवास त्यांना लाभला. या आत्मकथनात आत्मप्रौढी, कटुता वा दुराग्रह नाही. उलट अतिशय नितळपणा, मोकळेपणा व पारदर्शकता आहे. मिळालेल्या पुरस्काराने झालेला आनंद उमा कुलकर्णी अगदी निरागसतेने व्यक्त करतात. पण त्याचवेळी मूळ लेखकापेक्षा अनुवादकाला दिले जाणारे दुय्यम स्थान व समीक्षकांनी `अनुवाद` या साहित्य प्रकाराकडे केलेले जाणीवपूर्वक दुर्लक्ष, ही खंत मात्र त्या व्यक्त करतात. त्यांच्या मते `अनुवादकाला साहित्याची जाण असणं आवश्यक आहे. त्याला वेगळ्या प्रकारची साहित्यिक दृष्टी असणं गरजेचं आहे. ही दृष्टी समीक्षकापेक्षा वेगळी असली पाहिजे. त्यात कलाकृतीविषयीचं ममत्व आवश्यक आहे.` याच ममत्वाने त्या लिहीत राहिल्या. त्यामुळेच कदाचित लेखकाला वा त्याच्या कलाकृतीला त्यांनी कोणतेही प्रश्न विचारले नाहीत. म्हणूनच देव- धर्माची कल्पना, सामाजिक विकृतीसंदर्भातील भाष्य, स्त्री सामर्थ्याबाबत प्रश्नचिन्ह वा सामाजिक क्लिष्टता यासंदर्भातील संबंधित लेखकांच्या मतमतांतरांमुळे लेखिकेची मते कठोर वा कडवट झाली नाहीत. उलट निःपक्षपातीपणे ती त्या मांडत राहिल्या आणि एका वेगळ्या प्रकारचा सर्जनात्मक आनंद स्वतःबरोबर वाचकांनाही मिळवून देत गेल्या. आत्मकथन वाचताना एक उणीव जाणवते ती म्हणजे अनेक प्रसिद्ध साहित्यिकांच्या अनुभव कथनासोबत प्रसंगानुरूप त्यांची काही छायाचित्रे पुस्तकात असती तर वाचकांसाठी ती पर्वणी ठरली असती. उमा कुलकर्णी या स्वतः उत्तम चित्रकारही आहेत. या सर्जनशील छंदाविषयी व त्यातील निर्मितीच्या अनुभवाविषयी त्यांनी थोडे सविस्तर लिहिले असते तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील आणखी एका विलोभनीय पैलूची वाचकांना ओळख झाली असती. साध्या, सरळ निवेदन शैलीतील या आत्मकथनातून त्यांनी अनुवादकलेचे अनेक पैलू वाचकांपुढे उलगडले आहेत. सुधा मूर्ती यांच्या कलाकृतीचा अनुवाद करताना त्या म्हणतात की, `स्त्रियांचे लेखन हा चिंतेचा नसून चिंतनाचा विषय आहे.` हे चिंतन समजून घेण्यासाठी व पुन्हा एकदा स्वतःशी आंतरिक संवाद साधण्यासाठी सर्वांनीच जरूर वाचावे, असे हे कथन आहे. धन्यवाद. ...Read more

  • Rating Starविद्या मक्तल

    स्त्रियांची आत्मचरित्रे मराठी साहित्याचा अनमोल ठेवा आहे. प्रसिद्ध अनुवादक उमा कुलकर्णी त्यांनी `संवादु - अनुवादु` हे आत्मकथन लिहून त्यात मोलाची भर घातली आहे. परत एकदा लक्ष्मीबाई टिळकांच्या `स्मृतिचरित्रे` ची आठवण करून देणारे प्रांजळ, प्रामाणिक, पारदरशी, प्रवाही, असे पुस्तक आहे. पंचधाराच्या वाचकांसाठी उमा कुलकर्णी हे नाव नवीन नाही. ह्यापूर्वी के. पी. पूर्णचंद्र तेज ह्या कन्नड लेखकांची उमाताईंनी अनुवादित केलेली `कार्वालो` ही कादंबरी पंचधारातून प्रकाशित झाली होती. विशेष म्हणजे कै. द. प. जोशींनीच त्यांना हि कादंबरी अनुवादासाठी पाठवली होती. पुढे गिरीश कार्नाडांशी त्यांचा परिचय होण्यासाठी कै. द. प. जोशीच कारणीभूत झाले होते. उमाताईंचे पती श्री. विरुपाक्ष कुलकर्णी ह्यांनीही ज्ञानपीठ विजेते श्री. शिवराम कारंथ ह्यांची कानडी मुलाखात मराठीत अनुवाद करून पंचधारासाठी उपलब्ध करून दिली होती. एवढेच नाही तर हॆद्राबाद मराठी साहित्य परिषदेने आयोजित केलेल्या `अनुवादा` वर आधारित एका चर्चासत्रासाठी उमाताईंच्या पर्व आणि `कार्वालो` ह्या दोन अनुवादित कादंबऱ्यांवर चर्चा झाली होती आणि ह्या सर्व गोष्टींचा उल्लेख उमाताईंनी ह्या पुस्तकात आवर्जून केला आहे. उमाताईंनी पुस्तकाच्या मनोगतात म्हटले आहे की, "माझ्या अनुवादांपासून माझे जीवन मला वेगळे करता येणार नाही." आणि खरोखरच हे पुस्तक म्हणजे त्यांच्या फक्त कौटुंबिक जीवन प्रवासाचे कथन नाही तर त्यांनी केलेल्या समृद्ध, संपन्न विपुल अशा `अनुवादांच्या` प्रवासाचे पण कथन आहे. त्यांचे सुविद्य पती श्री. विरुपाक्ष कुलकर्णी ह्यांच्या प्रेरणेने व मदतीने उमाताईंनी वाङमयाच्या क्षेत्रातील अनुवादांची वाटचाल केली. त्या उभय पतीपत्नींनी एकमेकांच्या ज्ञानाचा, मतांचा व आवडीनिवडीचा विचार व आदर ठेवून केलेला शांत, सुखी, समाधानी संसार आणि कौटुंबिक जीवन प्रवास ह्या दोन्हींचे लालित्यपूर्ण शैलीत केलेले आत्मकथनपर लेखन म्हणजे `संवादु-अनुवादु` हे पुस्तक होय. सुरुवातीला बेळगावातील बालपण ते लग्नापर्यंतचा काळ म्हणजे रम्य ते बालपण म्हणावे असेच दिवस होते. आईवडिलांची प्रेमळ शिस्त व सुसंसार बहीण -भावंडांशी घट्ट नाते,आत्या, मावशी, काका, काकू व इतर नातेवाईकांचा सुखद सहवास, मैत्रिणींची निखळ मैत्री, शाळा-कॉलेजमधील रम्य दिवस ह्या सर्वांच्या संस्मरणीय आठवणी आहेत. त्या बरोबरच बेळगावचा परिसर - ठळकवाडी, राहते घर, आजूबाजूचा परिसर, प्रसंगानुसार घटना, लोकांची मनोवृत्ती वगैरेचे मनोज्ञ चित्रण केले आहे. आई वडिलांसह सहवासात आलेल्या अनेक व्यक्तींची सुंदर छोटी छोटी शब्दचित्रे त्यांनी रेखाटली आहेत. लग्नानंतर उमाताई पती बरोबर पुण्यात आल्या व पुढे काही वर्षातच त्यांच्या वाङमयीन कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यांचा हा वाङमयीन प्रवास वाचकाला गुंगवून ठाकणार आहे. कानडी साहित्य विश्वातील प्रतिभावंत अशा दिग्गज लेखकांची पुस्तके मराठीत अनुवादित करून त्यांनी मराठीतील अनुवादित साहित्याचे दालन समृद्ध केले. ज्ञानपीठ विजेते शिवराम कारंथ, भैरप्पा, अनंतमुर्ति, कार्नाड, वैदेही, तेजस्वी, सुद्धा मूर्ती वगैरे नामवंत कन्नड लेखकांच्या जवळ जवळ पन्नास ते साठ साहित्यकृती त्यांनी मराठीत अनुवादित केल्या आहेत. लेखनातील ही विपुलता व सातत्य थक्क करणारे आहे. ह्या अनुवादाच्या निमित्ताने झालेल्या ह्या मान्यवर लेखकांच्या भेटी, त्याचा लाभलेला मौलिक सहवास, जुळत गेलेले जिव्हाळयाचे, आत्मयितेचे नाते बऱ्याच साहित्यिक कार्यक्रमासाठी केलेला कानडी मुलुखाचा भरपूर प्रवास, प्रवासातील गमती - जमती, ह्या सर्वांचे रोचक निवेदन केले आहे. कारंथ, भैरप्पा अनेक वेळा त्यांच्या पुण्याच्या घरी येऊन राहिलेले आहेत. भैरप्पांना मराठी वाचकांत लोकप्रिय करण्याचे श्रेय उमाताईंनाच जाते. उमाताईंनाचा स्वभाव शांत, सोज्वळ, समाधानी व अजिबात दुराग्रही नसणारा असल्यामुळे त्यांचा लोकसंग्रही भरपूर आहे. अनुवादाच्या कामगिरीमुळे त्यांचे मराठीत मान्यवर साहित्यिकांशी स्नेहबंध जुळले आहेत. पु.ल. पती-पत्नी, पाध्ये पती-पत्नी, अनिल अवचट, कमल देसाई, माधवी देसाई व अशा अनेकांशी त्यांच्या गाठीभेटी होत. काही जणांशी तर वारंवार भेटी होऊन त्यांच्याशी स्नेहबंध अधिक दृढ झाले. घरातल्या कामवालीशीही त्या आत्मयितेने वागतात. त्यांच्याही आयुष्यात अडचणी आल्या, सुख-दुःखाचे प्रसंग तर प्रत्येकाच्याच जीवनात येत असतात. त्यांनाही मनाविरुद्ध घडणाऱ्या छोट्या-मोठ्या प्रसंगांना तोंड द्यावे लागेल, पण त्यामुळे कुणाविषयीही कटुता नाही किंवा आकस मानत नाही. एकदा एक लेखिकेने त्यांच्या एका अनुवादित पुस्तकावर खूप कठोर टीका केली. उमाताई अस्वस्थ झाल्या. त्यांनी सुनीताबाईंना सांगितले. सुनीताबाईंनी त्याकडे लक्ष न देण्यास समजावले. पु.ल. हसत म्हणाले, ` अहो दगड यायला लागेल कि आपले आंबे पिकायला आले समजावे.` उमाताईंचे समाधान झाले. अशा छान, भावमधुर अनेक आठवणी त्यांनी कथन केल्या आहेत. मधल्या काळात त्यांनी एम.ए. पीएचडी. डी. हि केले. एम.ए. ला त्यांनी त्यांचा आवडता `चित्रकारी` विषय निवडला व पीएचडी. डी. साठी मंदिरावरील शिल्पकलेसंबंधीचा विषय घेतला. त्यांच्या अभ्यासू स्वभावानुसार त्यांनी दोन्हीतही प्राविण्य मिळविले. आपल्या चित्रांची प्रदर्शने भरवली. शिल्पकला पाहण्यासाठी त्यांनी भारतभर भ्रमण करून अनेक मंदिरांना भेटी दिल्या. या कलांमधील मातब्बर लोकांना भेटण्याची संधी मिळाली. त्या संबंधीच्या अनुभवांचेही सरस वर्णन आहे. त्यांच्या अनुवादित कादंबऱ्यांवर टी. व्ही. मालिका व चित्रपट मराठी व कानडी दोन्ही भाषेत काढले आहेत. त्यापैकी `सोनियाचा उंबरठा` हि मालिका खूप प्रसिद्ध झाली. त्यामुळे त्यांचा टी. व्ही. चित्रपट क्षेत्रातील दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ ह्या सर्वांशी जवळून संबंध यायचा. अनेकांची ओळख झाली. शूटिंग, तेथील वातावरण, कधी त्यांच्या बरोबर प्रवास, वगैरे तेव्हा आलेल्या अनुभवांनाही त्यांनी रंजकतेने मांडले आहे. उमाताईंनी `अनुवाद` या साहित्य प्रकाराला व अनुवादकांना मान-सन्मान मिळवून दिला आहे. साहित्य अकादमी दिल्लीचा पुरस्कार, महाराष्ट्र गौरव पुरस्कार व याशिवाय इतर अनेक कानडी व मराठी भाषेतील पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. अनुवादाला दुय्यम दर्जा देणाऱ्यांना किंवा दुय्य्यम मानणाऱ्या मानसिकतेला त्या छान समजवतात . त्या लिहितात, "अशावेळी उस्ताद झाकीर हुसेन यांच्या तबल्याची आठवण येते. बहुतेक वेळा साथीसाठी असलेलं तबला हे वाद्य आहे ;पण झाकीर हुसेन किंवा इतर अनेक प्रतिभावान तबलानवाज वाजवायला बसले की, बघता बघता तबला हेच मैफिलींच प्रमुख वाद्य बनून जातं." आणि खरचं आहे, अनुवादक जेव्हा आपल्या कामाविषयी आस्था बाळगतो व निष्ठेने आपले काम करतो तेव्हा त्यांची मानसिकता उत्तमच बनते व तो अधिक जास्त काम करत राहतो. विपुल लेखन करणाऱ्या उमाताई त्याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे. अनुवादाविषयी असणारी तळमळ, निष्ठा आणि त्यांच्या अभ्यासू वृत्तीचे आणि मेहनतीचे दर्शन वाचकाला या पुस्तकात प्रकर्षाने होते. अनुवादाच्या या प्रवासात उमाताईंचे पती विरुपाक्ष ह्यांची त्यांना मिळालेली साथ खूप मोलाची आहे आणि हे उमाताईही मानतात. हे दोघे पती-पत्नी एकमेकांना मदत करण्यास सदैव तयार आहेत. कुठेही अहं नाही की तक्रार नाही. सुनीता देशपांडे ह्यांच्या `आहे मनोहर तरी` चा अनुवाद श्री. विरुपाक्ष यांनी कानडीत केला, पण प्रकाशकाने ते उमाताईंच्या नावावर छापण्याची अट घातली. त्यांनी ती पटकन मान्य केली व सुनीताताईंच्या कानावर घातले. त्यांनीही मान्यता दिली. उमाताईंनी हे सर्व प्रांजळपणे पुस्तकात लिहिले आहे. पुस्तकात कुठेही आत्मप्रौढीचा सूर नाही की एकमेकांची उणीदुणी काढणारी भावना नाही. दिसते ते फक्त त्या उभयतांचे एकमेकांवरील निर्व्याज प्रेम ! एवढेच नाही तर जगाकडे त्याच प्रेम भावनेतून पाहण्याची निर्मळ वृत्ती ! पुस्तकाची अर्पणपत्रिकाही हृद्य आहे. मुलंबाळं नसल्यामुळे आपण एवढं लेखन करू शकलो असेही त्या सहजपणे लिहितात. लेखनात अनेक ठिकाणी त्यांची चिंतनशीलता दिसते. अगदी गंभीर भाष्य करण्यातही त्यांची सहजता जाणवते. स्वभावातील मिस्किलपणाची झलकही पुस्तकात पाहायला मिळते. एकूणच अनुवादाच्या भरीव कामगिरीमुळे विस्तारित झालेल्या आपल्या सुखद अनुभवविश्वाचे अतिशय प्रामाणिकपणे उमाताईंनी कथन केले आहे. अतिशय रंजकपणे व लालित्यपूर्ण शैलीत लिहिलेले `संवादु-अनुवादु` हे उमाताईंचे पुस्तक एकदा हातात घेतले की खिळवून ठेवणारे आहे. पूर्ण होईपर्यंत खाली ठेवावे वाटत नाही; इतकेच नाही तर दीर्घकाळ मनात रेंगाळत राहते. प्रत्येकाने वाचावे असे हे वाचनीय व लक्षणीय पुस्तक आहे.. ...Read more

  • Rating StarPoornima Deshpande

    उमा कुलकर्णी यांचे आत्मकथन संवादु अनुवादु वाचन करत आहे. पुस्तक अतिशय सुंदर, मिश्कील विनोदी वाचकांना अंतर्मुख करते.

  • Rating StarRajeshree Salage

    अनुवादाशी आंतरिक संवाद डाॅ. उमा कुलकर्णी यांची अनेक अनुवादित पुस्तके वाचल्यानंतर त्यांचे `संवादु अनुवादु` हे आत्मकथन वाचण्याची तीव्र इच्छा होती. पुस्तक हातात पडले नि मुखपृष्ठावरील लेखिकेच्या निरागस चेहऱ्याप्रमाणेच त्यांचया मनाची निरागसता पुस्तकभर जाणवत राहिली. अतिशय समर्पक शीर्षक असलेल्या या आत्मकथनात प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे लेखिकेला असलेली साहित्याविषयीची उपजत जाण व प्रेम . म्हणूनच कदाचित त्यांचे जीवन साहित्यमय होऊन गेले असावे. `संवादु अनुवादु` या आत्मकथनाचे वैशिष्ट्य म्हणजे लेखिकेची संयतशैली. दुसऱ्याला सहज मोठेपण देणाऱ्या या अनुवादिकेला मूळ लेखकांइतकीच लोकप्रियता लाभली. जवळपास पंचावन्नपेक्षा जास्त पुस्तकांचा अनुवाद करून सलग साडेतीन दशके त्या सर्जनशील अशा अनुवाद क्षेत्रात रमल्या. बेळगावातील परंपरावादी घरात उमा कुलकर्णी यांचे बालपण गेले. बालपणापासूनच कला, संगीत व वाचनाची त्यांना मनस्वी आवड. लग्नानंतर पती विरूपाक्ष कुलकर्णी यांच्या नोकरीनिमित्त त्यांच्यासोबत त्या पुण्यात आल्या. पुण्याच्या शहरी वातावरणात त्यांच्या सहजीवनाला सुरुवात झाली. रोज संध्याकाळी फिरायला जाण्याच्या नेमातून झालेल्या गप्पांमधून त्यांना एकमेकांच्या साहित्यप्रेमाची कुणकुण लागली. विरूपाक्ष यांना कन्नड साहित्य वाचण्याची विशेष आवड. कोणतेही पुस्तक वाचले की त्यातील कथानक पत्नीला रंगवून सांगणे हा त्यांचा शिरस्ता. उमा कुलकर्णी यांच्या अनुवाद लेखनाची सुरुवातही काहीशी गंमतीशीर झाली. प्रसिद्ध कन्नड साहित्यिक डाॅ. शिवराम कारंत यांच्या `मुक्कजीची स्वप्ने` या ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कादंबरीविषयी विरूपाक्ष सांगत असताना उमा यांनी त्यांना कादंबरी वाचून दाखवायचा आग्रह धरला व स्वतःला समजावी यासाठी त्या ती मराठीत लिहू लागल्या. अशाप्रकारे त्यांचा पहिला अनुवाद लिहून झाला! स्वतःला समजावे यासाठी कन्नड कादंबरीचा केलेला मराठी अनुवाद, त्यानंतर ती कादंबरी इतरांपर्यंत पोचवण्यासाठी केलेला अनुवाद व पुढे जीवनाचा अविभाज्य व अपरिहार्य भाग म्हणून केलेला अनुवाद, असा त्यांचा अनुवादलेखनाचा विलक्षण असा प्रवास!! विरूपाक्ष कुलकर्णी मराठी भाषेतील उत्तमोत्तम साहित्याचे कन्नडमध्ये तर उमा कुलकर्णी कन्नडमधील साहित्य मराठीत अनुवादित करीत असत. दोघेही अनुवादाच्या दुनियेत इतके रममाण झाले की साहित्य व अनुवाद हा त्यांच्या सहजीवनाचा जणू साथीदार झाला. अनुवादलेखन करत असताना पत्नीच्या नावाने कन्नड लेखकांशी पत्रव्यवहार करणे, त्यांना कानडी भाषा येत नसल्यामुळे रोज पुस्तकाची काही पाने वाचून दाखवणे, ते रेकॉर्ड करून ठेवणे, एखादवेळी एखादा कन्नड शब्द अडला तर तो शब्दकोशात बघून त्याचा अर्थ शोधून ठेवणे या गोष्टी विरूपाक्ष आवडीने करीत. जीवनाच्या जोडीदाराच्या वयाचे मोठेपण मान्य केल्यावर त्यांनीही वयाने लहान असलेल्या आपल्या पत्नीचे लाड पुरवणे (दोघांमध्ये दहा- साडेदहा वर्षांचे अंतर) हे त्यांच्या समंजस सहजीवनाचे गुपित. संध्याकाळी नित्यनियमाने फिरायला जाणे, साहित्यिक कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावणे व समाजकारण, राजकारण यांसारख्या विषयांवर मोकळेपणानेे गप्पा मारणे यातून त्यांच्यातील वैचारिक वीण घट्ट होत गेली. कधी कधी या गप्पांमधूनच लेखकाच्या वाक्यांमधला दडलेला अर्थही त्यांच्या समोर येत गेला. दिवसातील जास्तीत जास्त वेळ लिखाणात घालवणे हा या लेखक दाम्पत्याचा आवडता छंद. लिखाणाला पुरेसा वेळ मिळावा म्हणून विरुपाक्ष यांनी नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेणे ही बाब अजबच. निवृत्तीनंतर सकाळच्या चहा व नाश्त्याची जबाबदारी त्यांनी घेतल्यामुळे रात्रीच्या शांत झोपेनंतर लेखिकेला सर्जनशील लेखनासाठी मिळालेला तो वेळ महत्वाचा ठरत असे. डाॅ. शिवराम कारंत यांच्या कांदबरीपासून सुरू झालेला अनुवादलेखनाचा प्रवास एस. एल. भैरप्पा, यु.आर.अनंतमूर्ती, पूर्णचंद्र तेजस्वी, गिरीश कर्नाड, सुधा मूर्ती आणि अगदी अलीकडच्या काळातील वैदेही यांच्यापर्यंत अगदी सहजतेने झाला. कोणत्याही कलाकृतीचा अनुवाद करत असताना अनुवादिका, `त्या लेखकाच्या विचारधारेचे बोट धरून काही पावले पुढे गेलो की नाही`, एवढाच विचार करतात. एक उत्तम वाचक या नात्याने त्या वाचकांच्या बाजूच्या अनुवादिका आहेत. अनुवादात्मक लेखनातून आनंद मिळवणे हेच या लेखकद्वयीचे जीवनध्येय. म्हणूनच सलग साडेतीन दशके लेखिका अनुवादासारख्या वेगळ्या क्षेत्रात रमू शकल्या. पतीच्या आग्रहाखातर त्या कन्नड भाषा शिकल्या. सुरुवातीला वाटणारी धाकधूक आणि नंतर हळूहळू मनातील भीती जाऊन जिभेवर रूळलेली कानडी भाषा त्यांना अनुवादासाठी उपयुक्त ठरली. या लेखनाच्या निमित्ताने कन्नड साहित्यिकांसह मराठीतील प्रसिद्ध साहित्यिक व विचारवंत यांच्याशीही त्यांचे स्नेहबंध जुळले. सुधाकर देशपांडे, डाॅ. द. दि. पुंडे, पु. ल. देशपांडे, कमल देसाई, अनिल अवचट, कविता महाजन यांचा साहित्यिक व कौटुंबिक सहवास त्यांना लाभला. या आत्मकथनात आत्मप्रौढी, कटुता वा दुराग्रह नाही. उलट अतिशय नितळपणा, मोकळेपणा व पारदर्शकता आहे. मिळालेल्या पुरस्काराने झालेला आनंद उमा कुलकर्णी अगदी निरागसतेने व्यक्त करतात. पण त्याचवेळी मूळ लेखकापेक्षा अनुवादकाला दिले जाणारे दुय्यम स्थान व समीक्षकांनी `अनुवाद` या साहित्य प्रकाराकडे केलेले जाणीवपूर्वक दुर्लक्ष, ही खंत मात्र त्या व्यक्त करतात. त्यांच्या मते `अनुवादकाला साहित्याची जाण असणं आवश्यक आहे. त्याला वेगळ्या प्रकारची साहित्यिक दृष्टी असणं गरजेचं आहे. ही दृष्टी समीक्षकापेक्षा वेगळी असली पाहिजे. त्यात कलाकृतीविषयीचं ममत्व आवश्यक आहे.` याच ममत्वाने त्या लिहीत राहिल्या. त्यामुळेच कदाचित लेखकाला वा त्याच्या कलाकृतीला त्यांनी कोणतेही प्रश्न विचारले नाहीत. म्हणूनच देव- धर्माची कल्पना, सामाजिक विकृतीसंदर्भातील भाष्य, स्त्री सामर्थ्याबाबत प्रश्नचिन्ह वा सामाजिक क्लिष्टता यासंदर्भातील संबंधित लेखकांच्या मतमतांतरांमुळे लेखिकेची मते कठोर वा कडवट झाली नाहीत. उलट निःपक्षपातीपणे त्या ती मांडत राहिल्या आणि एका वेगळ्या प्रकारचा सर्जनात्मक आनंद स्वतःबरोबर वाचकांनाही मिळवून देत गेल्या. आत्मकथन वाचताना एक उणीव जाणवते ती म्हणजे अनेक प्रसिद्ध साहित्यिकांच्या अनुभव कथनासोबत प्रसंगानुरूप त्यांची काही छायाचित्रे पुस्तकात असती तर वाचकांसाठी ती पर्वणी ठरली असती. उमा कुलकर्णी या स्वतः उत्तम चित्रकारही आहेत. या सर्जनशील छंदाविषयी व त्यातील निर्मितीच्या अनुभवाविषयी त्यांनी थोडे सविस्तर लिहिले असते तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील आणखी एका विलोभनीय पैलूची वाचकांना ओळख झाली असती. साध्या, सरळ निवेदन शैलीतील या आत्मकथनातून त्यांनी अनुवादकलेचे अनेक पैलू वाचकांपुढे उलगडले आहेत. सुधा मूर्ती यांच्या कलाकृतीचा अनुवाद करताना त्या म्हणतात की, `स्त्रियांचे लेखन हा चिंतेचा नसून चिंतनाचा विषय आहे.` हे चिंतन समजून घेण्यासाठी व पुन्हा एकदा स्वतःशी आंतरिक संवाद साधण्यासाठी सर्वांनीच जरूर वाचावे, असे हे कथन आहे. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more