* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
 • Ebooks:
 • Print Books:
N/A
‘...शान्ताबार्इंची कविता मला आवडते; आणि मनापासून आवडते. तिच्यामध्ये जी सहजता आणि प्रसन्नता आहे, ती आजकालच्या इतर काव्यात क्वचितच पाहावयास मिळते. तीमध्ये त्यांच्या मनातील अर्थ अगदी स्वच्छपणे प्रतिबिंबित झालेला असतो. तो मजावून घेण्यासाठी तिजबरोबर झटापट करावी लागत नाही. आजकालचा प्रतीकवाद आणि त्यामुळे निर्माण होणारे गूढगुंजन तीमध्ये मुळीच नाही. त्याचप्रमाणे आणखीही एक गोष्ट मला त्या कवितेमध्ये आवडली. ती अशी, की कवयित्रीच्या मनात वाचकाला काहीही शिकवावयाचे नाही. म्हणजेच कोणत्याही प्रकारचे प्रेषिताचे अवसान तिने आणलेले नाही. तिसरी समाधानाची गोष्ट अशी, की शान्ताबार्इंना आपल्या कवितेमध्ये कोणत्याही प्रकारचा क्रांतिकारकत्वाचा अधिकार सांगावयाचा नाही, की वाचकाला धक्के देऊन त्याला जागृत करण्याची महत्त्वाकांक्षाही त्यांनी धरलेली नाही. आणखीही एका गोष्टीचा उल्लेख करावयाचा, म्हणजे मराठी वाङ्मयात डोकावू पाहणाया विकट (GROTESQUE) पूजेचा या कवितेवर काहीही परिणाम अद्यापि झालेला नाही. या कवितेत मोकळा शृंगार पुष्कळच असला, तरी नव्याने येऊ पाहणारा लिंगसंप्रदाय तीमध्ये मुळीच नाही. आहे, तो केवळ, सरळ, शुद्ध, निरागस आत्माविष्कार!...’ –रा. श्री. जोग
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#VARSHA #SHANTA #J #SHELAKE #KAVITA #SANGRAH #MI #VIFAL #AAS #PAUS #SRUSHTI #ANI #MI #HIRVAL #PRABHAT #SWAPNA #ANI #JAGRUTI #SHRADDHA #DUPAR #वर्षा #शान्ता #ज. #शेळके #कवितासंग्रह #मी #विफल #आस #पाऊस #सृष्टि #आणि #मी #हिरवळ #प्रभात #स्वप्न #आणि #जागृति #श्रद्धा #दुपार
Customer Reviews
 • Rating StarDAINIK TARUN BHARAT 20-07-2001

  शांत, सौम्य, संयत... शांताबाई शेळके हे नाव मराठी वाचकाला अत्यंत परिचित आहे. शांताबार्इंची कविता असो वा लेख, आपल्याला प्रसन्न, टवटवीत, शैलीदार आणि सकस असं काहीतरी वाचायला मिळणार याची वाचकाला खात्रीच असते. प्रस्तुत ‘वर्षा’ हा शांताबार्इंचा प्रकाशित झलेला पहिला काव्यसंग्रह. १९४७ साली त्याची पहिली आवृत्ती निघाली होती. त्यानंतर तब्बल त्रेपन्न वर्षांनी आता ही दुसरी आवृत्ती निघते आहे. शांताबार्इंवर ‘रविकिरण मंडळा’चा नि त्यातही माधव ज्युलियन यांच्या कवितेचा फार प्रभाव तेव्हा होता. प्रस्तुत काव्यसंग्रहाच्या सुरुवातीच्या मनोगतात त्यांनी स्वत:च ही गोष्ट सांगून टाकली आहे. प्रत्यक्षात कविता वाचतानाही आपल्याला जाणवतं की, ‘कवयित्री अद्याप माधव ज्युलियन यांच्या प्रभावाखाली आहे. माधव ज्युलियनांच्या काव्याचं विशिष्ट वळण इथे ठायी ठायी डोकावतं. पण त्याचवेळी कवयित्रीचं आपलं असं काही खास वळणही दिसून येतं. माधवरावांच्या काव्यातला फारसीचा वापर इथे जराही नाही. काव्यसंग्रहाच्या ‘वर्षा’ या नावावरूनच लक्षात येईल की, कवयित्री निसर्गवेडी आहे. निसर्गाच्या सौम्य, शांत, सुंदर रूपाचं वर्णन करणाऱ्या बऱ्याच कविता इथे आहेत. ते ते विशिष्ट निसर्गचित्र रसिकांसमोर नुसतं उभं राहत नाही तर आपण स्वत:च त्या निसर्गचित्रातले एक आहोत; काव्यात वर्णिलेला तो प्रसन्न, हिरवाकंच निसर्ग आपल्याच हृदयात कुठेतरी फुलतो आहे असा रम्य अनुभव वाचकाला येतो आणि हेच तर शांताबार्इंच्या शब्दकळेचं सामर्थ्य आहे. त्यावेळी उदयोन्मुख असलेल्या एका कवयित्रीच्या पहिल्याच काव्यसंग्रहाला प्रा. रा. श्री. जोगांसारख्या दर्दी समीक्षकाची प्रस्तावना लाभते यात बरंच काही आलं. प्रा. जोगांची ही प्रस्तावना अगदी नेमक्या शब्दांत शांताबार्इंच्या लेखनातली सारी सौंदर्यस्थळं, सारी सामर्थ्य वाचकांसमोर ठेवते. प्रा. जोग लिहितात, ‘शांताबार्इंची कविता मला आवडते आणि मनापासून आवडते. तिच्यामध्ये जी सहजता आणि प्रसन्नता आहे, ती आजकालच्या इतर काव्यात क्वचितच पाहायला मिळते. तीमध्ये त्यांच्या मनातील अर्थ अगदी स्वच्छपणे प्रतिबिंबित झालेला असतो. तो समजावून घेण्यासाठी तिजबरोबर झटापट करावी लागत नाही. या कवितेत प्रतीकवाद आणि गूढगुंजन मुळीच नाही. कवयित्रीच्या मनात वाचकाला काहीही शिकवावयाचे नाही. म्हणजेच कोणत्याही प्रकारचे प्रेषिताचे अवसान तिने आणलेले नाही. या कवितेत मोकळा शृंगार खूप असला तरी नव्याने येऊ पाहणारा लिंगसंप्रदाय तीमध्ये मुळीच नाही. आहे, तो केवळ सरळ, शुद्धा, निरागस आत्माविषकार!’ १९४७ साली लिहिलेली ही प्रस्तावना आणखी शंभर टक्के समर्पक आहे. प्रा. जोगांनी वर्णिलेले गुण शांताबार्इंच्या लेखणीने आजही जसेच्या तसे जपलेले आहेत किंबहुंना व्यासंग, चिंतन आणि अनुभव यांनी ते गुण अधिकच तेजाळले आहेत. त्याचप्रमाणे दुर्बोधता, प्रेषिताचा आव, गूढगुंजन आणि लिंगसंप्रदाय आदी गुणांचा (!) वाराही शांताबार्इंनी आपल्या लेखणीला लागू दिलेला नाही. वरील सर्व गुणांनी (!) युक्त असलेल्या काव्याचं मराठी साहित्यात सध्या मोठंच प्रस्थ आहे. पण् साहित्यिक, समीक्षक, प्राध्यापक आणि विद्यार्थी (कारण करणार बिचारे? त्यांना पास व्हायचं असतं.) यांच्याखेरीज कुणीही त्या काव्याच्या वाटेला फिरकत नाही. आणि शांताबार्इंचं काव्य सर्वसामान्य मराठी माणूस वाचतो, गुणगुणतो, गातो; त्याच्या रसिकतेचं पोषण त्यातून होतं, यातच सारं काही आलं. मेहता प्रकाशनाची निर्मिती सुबक. चंद्रमोहन कुलकर्णीचं मुखपृष्ठ आल्हाददायक. ...Read more

 • Rating StarDAINIK SAKAL (NASIK) 29-07-2001

  वर्षा : सरळ, शुद्ध, निरागस आत्मविष्कार प्रकट करणारी कविता… शांताबार्इंच्या ‘वर्षा’ या कवितासंग्रहाची ही द्वितीयावृत्ती आहे. १९४७ मध्ये प्रसिद्ध झालेल्या या काव्यसंग्रहाची ५३ वर्षांनी दुसरी आवृत्ती निघावी, यातच शांताबार्इंच्या कवितेचे ताजेपण प्रतीत ोते. प्रा. रा. श्री. जोग यांच्यासारख्या अभ्यासू समीक्षकांची प्रस्तावना या काव्यसंग्रह लाभली आहे. नवकवितेच्या काळातील शांताबार्इंची कविता सरळ, शुद्ध निरागस आत्मविष्कार प्रकट करणारी आहे. ‘मी साधीभोळी तुळशीची मंजिरी’ असे एका कवितेत शांताबाई लिहितात. हेच वर्णन त्यांच्या कवितेच्या संदर्भात सर्वार्थाने समर्पक वाटते. या संग्रहातील अनेक कवितातून शांताबाई निसर्गाशी सतत संवाद साधताना दिसतात. ‘पाऊस’ ‘सृष्टी आणि मी’, ‘हिरवळ’, ‘लिंब’, ‘संध्याकाळ’, ‘पावसाळी रात’, ‘पावसानंतर’, ‘माझा प्राजक्त’, ‘निसर्ग’ ही कवितांची शीर्षके याचे प्रत्यंतर देतात. निसर्गात त्या हरवतात, भान विसरतात. ‘‘अशी निसर्गासान्निध वसतां जीवनसरिता संथ वाहते, कितीक गेला काळ, तरीही भान मुळी ना मना राहते’’ अशी त्यांची तन्मयता त्यांनी शब्दात प्रकट केली आहे. हृदयातील मधुरभाव, दु:ख, उन्माद, लाजऱ्या भावना त्यांनी या कवितेत ग्रंथित केल्या आहेत. कधी कधी हृदयातील औदासिन्य व अकारण लागलेली हुरहूरही त्यांच्या कवितेतून व्यक्त होते. उदासवाणे शेवाळे, पारव्याचे आक्रंदन, निबीड तरूच्या सावल्या उदासवाण्या प्रतिमाही काही काही कवितांतून डोकावतात. याला कारण कवयित्रीची स्वप्नाळू वृत्ती हेच आहे. अमूर्त ध्येयांचा घेतलेला ध्यास त्यांना निराश करतो. ‘माझे मीच घेतले’, हो, मरण हे ओढवून! ध्येये दूरच राहिली आयु चालले सरून’ अशा ओळी यामुळेच त्यांच्या कवितेत डोकावतात. परंतु परमेश्वरावरील श्रद्धा हा त्यांच्या जीवनाचा आधार आहे. उत्कट भावना प्रकट करणाऱ्या या कवितेस बाह्यरचनेचे कोंदणही त्याला अनुरूप असे अतिशय सुंदर लाभले आहे. सहजता व प्रसन्नता या गुणांमुळे कवितेतील अर्थ अगदी स्पष्टपणे त्यांच्या कवितेत प्रकट होतो. हेच शांताबार्इंच्या कवितासंग्रहाचे वैशिष्ट्य आहे. प्रा. सौ. निशा पाटील ...Read more

 • Rating StarNEWSPAPER REVIEW

  शांताबार्इंच्या आशावादी कविता… या कवितासंग्रहात जवळजवळ १०० कविता आहेत. कोठलाही अनुभव कवयित्रीला वर्ज्य नाही, त्यामुळे विविध अनुभव व वेगवेगळे विषय त्या साकार करतात. या संग्रहातील सर्व कविता १९४७ पूर्वीच्या आहेत. सर्वसाधारणपणे १९३५ पर्यंतचा ‘रविकिरण’ ंडळाच्या कवितांचा प्रभाव असण्याचा कालखंड. ‘विशाखा’ प्रकाशनानंतर कुसुमाग्रजांचा प्रभाव मराठी कवितेवर पडला. त्यांची कविता रविकिरण मंडळाच्या कवितेपेक्षा वेगळी होती, आणि नवनव्या भावनांनी ती समृद्ध झाली होती. रविकिरण मंडळाने हाताळलेली आणि बरीच गुळगुळीत झालेली प्रीतीची भावना कुसुमाग्रजांच्या कवितेतून झळाळून उठली. आवाहनाबरोबरच आव्हानही त्या कवितेत होते. त्यावेळी पोवळे, चिंधळे, निकुंब वगैरेसारखे कवी त्याच प्रकारची कविता लिहीत होते. त्यावेळी लिहिल्या गेलेल्या कवितांना ‘अग्नी संप्रदायी’ कविता हे नाव पडले. यज्ञवेदी, ऐरण, वेदी बळी, समिधा अशा जोरकस शब्दात ती व्यक्त होत होती. रविकिरण मंडळाच्या कालखंडानंतर व कुसमुमाग्रजांच्या ऐन बहरात शांता शेळके यांनी कविता लिहिल्या. १९४७ पूर्वी जे काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले त्याचे स्वरुप सर्वसाधारणपणे एकसारखेच असे. काही प्रेमविषयक, निसर्ग वर्णनपर, परमेश्वरविषयक तर गूढ असे विविध विषय जरी असले तरी या कविता ‘आत्मनिष्ठ’ असत. त्या काळातील कवितेचा अनुभव घेता शांताबार्इंच्या कवितेवर रविकिरण मंडळ, कुसुमाग्रज व थोडासा, इंदिरा संत यांच्या काव्याचा परिणाम झाला आहे. आपल्या एका लेखात शांताबार्इंनी या परिणामाची नोंद स्वतच केली आहे. काव्यविषयक कविता लिहिणे, ‘मी’ विषयक कविता लिहिणे, हा या काळातील विशेष होता, जीवनानुभव उत्कटतेने अनुभवावा, त्याला चिंतनाची जोड द्यावी, अशा शब्दात आकार द्यावा असे सर्वसाधारणपणे या काळातील निर्मिती प्रक्रियेचे स्वरुप. शांताबार्इंच्या काव्यसंग्रहात अशा कविता आहेत. भोवतालचे विराट वास्तव आणि त्या मानाने आपली लघुता त्यांनी आपल्या ‘मी’ कवितेत व्यक्त केली आहे. या काळात परमेश्वविषयक कविताही लिहिल्या गेल्या. त्यात शांताबार्इंच्या कवितेतून त्यांची परमेश्वर शरणता दिसून येते. ‘हे अधिराज, विफल आस’, शांताबार्इंनी परमेश्वराचे रुप निसर्गात पाहिले आहे, त्यामुळे शुद्ध निसर्ग कविता फारशी आढळत नाही. (रातराणी) सहवासाचे सुख रात्रभर अनुभवल्यावर पहाटे तिला सोडून जाणार नायकही त्यांच्या कवितेत येतो. अशा वेळी ‘स्वप्नाची समाप्ती’ ची आठवण झाल्याखेरीज राहत नाही. याप्रमाणेच ‘तुझी माझी दृष्टादृष्ट’ ह्या कवितेत रंगणारा शृंगार पाहण्यासारखा आहे. दोघे एकत्र आल्यावर ते तर भान विसरतातच पण चराचर स्थिर होते, जगाचा विसर पडतो अन् गोड गीत झंकारते. आकाशातील वीज सुद्धा मेघाला बिलगून हा मीलनाचा सोहळा पाहत असते. तरल कल्पना, उत्कंट भावना, त्यांच्या कवितेते पुष्कळदा व्यक्त होतात. ‘पावसाळा राती’ सारखी कविता इंदिरा संतांची आठवण करुन देते. इंदिरा संतांची नायिका जशी चौकटीवर हात ठेवून उभी राहून ‘त्या’ ची प्रतीक्षा करते तशीच चौकटीवर हात ठेवून उभी राहिलेली शांताबार्इंची नायिका असते. ‘भेट हवी जर’ ह्या इंदिरा संतांच्या कवितेशी काही साम्य असलेली कविता ‘पावसाळी रात’ आहे. तर ‘प्रभात’ सारखी शुद्ध निसर्ग कविताही आहे. माधव ज्युलियनांच्या ‘विरह तरंग’ ह्या खंडकाव्याचा प्रभावही जाणवल्याखेरीज राहत नाही. प्रीतीची स्वप्ने पाहणे, रंगून जाणे, भान येताच दचकणे, उदास होणे, असा काही कवितांचा विशेष आहे. प्रत्यक्ष नायक- नायिकांचा शृंगार व त्या अनुषंगाने व्यक्त होणाऱ्या तरल भावना, मनोज्ञ स्वप्नरंजन अधिक आहे, पण विप्रलंभ शृंगारही आहे. आपण जगतो ते वास्तव आणि आपण निर्मिती करतो त्या कविता यामध्ये खूपच अंतर आहे. याची जाणीव ज्यावेही शांताबार्इंना होते त्यावेळी ‘जा जा कविते’ असे म्हणून कवितेला दूर लोटण्याचा त्या प्रयत्न करतात. कवितेच्या स्वप्नाळू जगाला वास्तवाच्या झळा लागतात तेव्हा कवितेतील भावना फिक्या वाटतात. हा त्यांचा अनुभव आहे, पण त्या निराश होत नाहीत. सर्व कवितांचा आशय आशावादी आहे बहुतेक रोमँटिक कवींना असणारी कलंदर जीवनाची आसक्ती त्यांच्याही कवितेत व्यक्त होते. रोमॅन्टिक कवितेचे सर्व विशेष ह्या कवितेत आहेत. सौंदर्याने भारावून जाणे निसर्गात रमणे, स्वप्नरंजन व क्वचित तात्विक चिंतन इ. सौंदर्यवादाचे विशेष त्यांच्या कवितेत पदोपदी दिसतात. शांताबार्इंनी रविकिरण मंडळाचे विशेष घेतले तरी आंधळे अनुकरण न करता स्वानुभव उत्कंटतेने मांडले म्हणून ही कविता सौंदर्यवादी झाली, त्यातून ‘हर्षलासे फार नाचे वनी मोर....’ अशा संकेतिक ओळी काही कवितेत दिसतात तर ‘सृष्टी व मी’ या काव्यात ‘हाय ओदासीन्य मग’... अशी अनुभूती येते, सौंदर्य पाहून, भव्यता पाहून उदासीन होणे व सौदर्यवादाचा विशेष आहे. यातूनच थोडीशी गूढता निर्माण होते. त्यांच्या काही कविता निसर्गाशी असलेले आपले भावबंध स्पष्ट करतात (‘लिंब’). रिवकिरण मंडळाची प्रेमकविता आणि गोविंदाग्रजांची बरीच स्पष्टोक्ती करणारी कविता त्यांच्या कवितांवर परिणाम करते. गोविंदाग्रजांच्या ‘प्रेम आणि मरण’, ‘फुले वेचली पण’ अशा कवितांचा परिणाम स्पष्ट जाणवतो. एकाकी झुरणारी नायक व नायिका परिपूर्तीसाठी धडपडताना दिसतात. असा उदासीनतेचा सूर ह्या कवितेतून आळवला जातो. या कविता भावगीतासारख्या जबरदस्त आशावाद कुसुमाग्रजांनी मराठीत आणला. त्याचा काही परिणाम शांताबार्इंच्या कवितांवर झालेला दिसतो. बऱ्याच कवितेत स्वप्नरंजन असून नंतर उदासिनतेच्या छाया दाटून आलेल्या दिसतात. माधव ज्युलियन यांच्या ‘गजलांजली’ चा परिणाम त्यावर स्पष्ट दिसतो. हा त्यांचा आवडता कवी आहे. त्यांनी हा काव्यसंग्रह त्यांनाच अर्पण केला आहे. सहाजिकच माधव ज्युलियनांच्या सर्व प्रकारच्या कवितेसारख्या कविता लिहिण्याची त्यांची कांक्षा आहे म्हणूनच ज्युलियनांच्या द्राक्ष कन्येतील रुबायासारखा तर कुसुमाग्रजांच्या जीवनलहरीसारख्या कवितांच्या रचनेचा त्यांनी आधार घेतला आहे. भावकणिकेतही जीवनातील सूक्ष्म तरल अनुभव त्यांनी व्यक्त केला आहे. कधी कधी विरहात जळणाऱ्या नायिकेची मनीषा, ‘माझ्या अंतरंगी सखे तुझ्या भेटीची रे आस’ असे म्हणणारी नायिका आणि रातराणीच्या सुगंधासवे रात्र गेली हे समजताच व्याकूळ झालेली नायिका आपल्याला दिसते. काव्यप्रवाहात शांताबार्इंचे स्वतंत्र स्थान आहे, त्यांची बरीच कविता भावगीते, नाट्यगीते यासारखी असली तरी नावीन्य धारण केलेली आहे. संस्कृत साहित्य व इंग्रजी स्फूट कविता यांच्या मुशीतून ही कविता बाहेर पडली आहे. दोन्ही कवितांचे उत्तम विशेष पचवलेले आहेत. म्हणून ‘वर्षा’ संग्रह वाचताना तो कंटाळवाणा होत नाही. ...Read more

Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KAR HAR MAIDAN FATEH
KAR HAR MAIDAN FATEH by VISHWAS NANGRE PATIL Rating Star
Pankaj Kharade, Vachanveda Group

` मन में हैं विश्वास ` नंतर विश्वास नांगरे सरांचे पुढील पुस्तक म्हणजे ` कर हर मैदान फतेह` . विद्यार्थ्यांना आणि नवयुवक यांना अतिशय मार्गदर्शन पर असे हे पुस्तक विद्यार्थ्यांनी तर नक्की वाचावेच पण पालकांनीही ते जरूर वाचायला हवे . सरांचे न में हैं विश्वास हे पुस्तक आणि त्याविषयी माहिती मी या ग्रूपवर शेअर केली होती त्याविषयी अनेक उलट सुलट किंवा नकारात्मक आणि विरोधी कमेंट काही वाचकांच्या आल्या होत्या . नांगरे पाटील यांनी या पुस्तकात स्वतःची आत्मप्रौढी वगैरे मिरवली आहे असा काहीसा त्यांचा स्वर होता. हे त्यांचे आत्मचरित्र आहे , आणि त्यात त्यांनी केलेले संघर्ष आणि त्यांच्या अथक परिश्रमातून त्यांना मिळालेले यश त्यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर पोल वॉल्ट सारखी उंच उडी त्यांनी मारली आणि त्याचे वर्णन केले तर ती आत्मप्रौढी होऊ शकत नाही. एखाद्या लेखकाने स्वतःच्या गरिबीचे आत्मकथन केले की आपल्याला त्यांच्याविषयी सहानुभूती वाटते पण जर तशाच एखाद्या लेखकाने स्वतःच्या संघर्षाचे आणि मिळालेल्या यशाचे वर वर्णन केले की ती आत्मप्रौढी होते काय? .. असो या गोष्टीवर अनेक वादविवाद असू शकतात पण आधीचे पुस्तक हे खूप सकारात्मक ऊर्जा देणारे होते विषेतः कॉलेज आणि काहीतरी बनू इच्छिणाऱ्या युवकांसाठी . यूपीएससी झाल्यानंतरचा विश्वास सरांचा पुढील प्रवास हा तितकाच प्रेरक आणि मार्गदर्शन पर आहे . फक्त विद्यार्थीच नाही तर प्रत्येक पालक , नागरिक ,महिला आणि अबालवृद्ध यांना मार्गदर्शन करणारे उद्बोधक नियम आणि कायदे सरांनी अनेक उदाहरणे , अनेक थोर व्यक्तींची सुभाषिते आणि विचार मांडून पटवून दिले आहेत . शरीर आणि मन निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी कोणते व्यायाम किंवा योग करावे , महिलांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी काय करावे किंवा काय करू नये, लहान मुलांच्या हाती मोबाईल देताना पालकांची कोणती कर्तव्ये आहेत . किंवा डिजिटल बँकिंग वापरताना कोणती खबरदारी घ्यावी . अगदी आपले डिजिटल पासवर्ड कसे असावे आणि कधी बदलावे या विषयी अगदी कळकळीने विश्वास सर व्यक्त झाले आहेत . विपरीत परिस्थिती कशी हाताळावी , आलेल्या संकटसमयी त्याला धैर्याने कसे सामोरे जायला हवे , सर्व काही असताना डिप्रेशन का येते आणि त्यातून कसे सावरावे हे सर सांगूच शकतात कारण जिया खान किंवा सुशांत राजपूत सारखी अनेक प्रकरणे त्यांनी हाताळली आहेत . वर्दीच्या आतला प्रत्येक पोलिस हा एक नागरिक असतो आणि प्रत्येक नागरिक हा बिन वर्दीचा पोलिस असतो . किती अर्थपूर्ण आहे हे विधान . अशा अनेक गोष्टी आणि प्रसंग वाचताना खूप आत्मविश्वास निर्माण होतो . म्हणून प्रत्येकाने हे पुस्तक जरूर वाचावयास हवे असे मला वाटते.🙏 ...Read more

MANDRA
MANDRA by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
Darshana Chaphekar

कला आणि कलाकार यामधील अनाकलनीय नात्याचा परखड शोध... डॉ. एस.एल.भैरप्पा यांच्या प्रतिभासंपन्न नजरेतून !