* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: NIRBACHIT KABITA
  • Availability : Available
  • Translators : MRUNALINI GADKARI
  • ISBN : 9788177660306
  • Edition : 2
  • Publishing Year : AUGUST 2000
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 120
  • Language : Translated From BENGALI to MARATHI
  • Category : POEMS
  • Available in Combos :TASLIMA NASREEN COMBO SET - 12 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
A YOUNG LADY WHO WANTS TO BE A POET WRITES ROMANTIC POEMS BASED ON LOVE OR SADNESS IN LIFE. BUT TASLIMA IS DIFFERENT. AT THE SAME AGE, SHE WRITES ABOUT THE INEQUALITY AND DIFFERENCE IN THE LIFE OF MAN AND WOMAN. SHE WRITES ABOUT THE DECEIT IN THE NAME OF LOVE. SHE MENTIONS THE LUST IN RETURN OF TRUE LOVE. SHE THROWS A LIGHT ON THE DISDAIN IN RETURN OF SELFSURRENDER. HER POETRY IS BASED ON THESE TOPICS. SHE DOES NOT WRITE TO GAIN NAME AND FAME BUT SHE WRITES TO PROTEST THE WOMEN WHO HAVE BEEN SHUT UP BY THE SOCIETY. SHE WRITES WITH JUST ONE AIM, TO BRING EQUALITY TO MEN AND WOMEN. HER POEMS DO NOT SHOW ANY BITTERNESS, OPPOSITION OR HATRED. THEY HAVE PAIN, THEY HAVE DIGNITY, THEY ARE HUNGRY FOR LOVE MUCH HAVE BEEN WRITTEN ABOUT THE DECEIT THAT A WOMEN FACES, THE MALE CHAUVINISM, BUT TASLIMA`S BLUNTNESS IS NOT SEEN IN ANY OF THOSE POETRIES OR BOOKS. SHE VERY TRUTHFULLY WRITES ABOUT THE TORTURE THAT SHE WAS SUBJECTED TO IN A VERY ARTISTIC AND PERFECT LANGUAGE.
कवयित्री म्हणून नावलौकिक मिळवू इच्छिणारी युवती ज्या वयात गुलाबी प्रेमाच्या किंवा दु:ख व्यक्त करणाया अत्यंत रोमँटिक अशा कविता लिहील, त्या वयात तसलिमा नासरिन स्त्रीपुरुषांच्या जीवनांतील असमानता, प्रेमाच्या नावावर होणारी प्रतारणा, निखळ प्रेमाच्या बदल्यात मिळणारी भोगलालसा, आत्मसमर्पणाच्या बदल्यात वाट्याला येणारी अवहेलना अशांसारख्या विषयांवर कविता लिहिते. ‘अतले अन्तरीण’ किंवा ‘बालिकार गोल्लाछुट’ ह्यांतील कविता वाचल्यावर आपल्या लक्षात येते, की तसलिमा केवळ नावलौकिकाच्या लोभाने हातात लेखणी धरीत नाही, तर अतिशय सहिष्णू असणा-या आणि ज्यांचा आवाजच दाबून टाकला गेला आहे, अशा स्त्रीजातीच्या बाजूने उभी राहून, ती समाजाच्या विरोधात आपला निषेध नोंदविते, आपल्या कवितांमधून. स्त्रीपुरुषांत समानता आणणे हेच तिचे लक्ष्य आहे. ह्या लक्ष्यासाठीच तिला हातात लेखणी धरावी लागली आहे. असे असूनही तिच्या कवितेत फक्त संताप, विरोध किंवा कडवटपणा नाही. उलट, काही कवितांत वेदना आहे, काहींत आत्मसन्मानाची भावना आहे, तर काहींमध्ये प्रेमासाठी व्याकुळता आहे. जरी ती आपल्या एका कवितेत म्हणते, ‘पाहून पुरुषाची पराकोटीची अश्लीलता जळते मनातल्या मनात नरकाच्या आगीत पतिव्रता साध्वी स्त्री.’ तरी दुसया एका कवितेत ती म्हणून जाते, ‘एकदा जरी घातली साद एकदा प्रेम केल्यावर सर्व विसरून आसू ढाळते निष्पाप पोर.’ स्त्रीच्या वाट्याला येणारी फसवणूक आणि पुरुषांचे तिच्यावर असलेले वर्चस्व ह्यांसारख्या विषयांवर ह्याआधी काही कथा, कविता लिहिल्या गेल्या असल्या, तरी तसलिमाप्रमाणे अगदी उघडपणे, स्पष्टपणे कोणीही लिहिलेले नाही. स्वत:च्या शरीरावर झालेल्या अत्याचारांच्या कथा तिच्याइतक्या समर्पक शब्दांत, कलात्मक भाषेत कोणीही मांडलेल्या नाहीत, हेच तर आहे तिचे वेगळेपण.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#TASLIMANASRIN #PHERA #NIRBACHITKALAM #NIRBACHI #LEENASOHONI #MEHTAPUBLISHINGHOUSE #TRANSLATEDBOOKS #MARATHIBOOKS#
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    परवा पुस्तकांच्या शोधात तसलिमा नासरिनचा काव्यसंग्रह ‘निर्बाचित कविता’ हाती आला. माझ्याकडे तिची सर्व पुस्तके तिच्या सहीने भेट मिळालेली आहेत, पण याच एका पुस्तकावर मात्र तिने स्वहस्ताक्षरात `With Love` अशी मोहर उठविलेली आहे. याचा इतकाच अर्थ आहे की, ते तचे आवडते पुस्तक आहे, बाकी काही नाही. ‘निर्बाचित’ शब्द बंगाली. मराठीत त्याचा अर्थ होतो ‘निवडक’. सन १९८० च्या सुमारास त्या कविता लिहू लागल्या. १९८२-१९९३ या दशकांत त्यांचे सहा काव्यसंग्रह प्रकाशित झाले. त्यांचे समग्र साहित्य म्हणजे स्त्रीत्वाचा घेतलेला शोध होय. तशाच कविताही! काहींना त्या पुरुषविरोधी वाटतात. वाटतं त्या सतत पुरुषास आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या करतात. पण वस्तुस्थिती अशी आहे की, आजवर पुरुषाने स्त्रीस वस्तू, पशू, उपभोगाचे साधन म्हणून तिच्याकडे पाहिले आहे. तिची कविता स्त्रीस मनुष्य बनविण्याची विनवणी नसून मागणी आहे. तो जोगवा खचितच नाही. असेल तर अन्यायाला फोडलेली वाचा आहे नि ती स्त्री हक्काचा जाहीरनामा आहे. तो पुरुषी मानसिकतेविरुद्ध स्त्रीने पुकारलेला जिहाद आहे. ‘निर्बाचित कविता’ (१९९३) शिवाय ‘निर्बासित बहिरे अंतर’ (१९८९), ‘आमार किछु जाय असे ना’ (१९९०), ‘अतले अंतरिण’ (१९९०), ‘बलिकार गोल्लाछूट’ (१९९२) असे अन्य कवितासंग्रह आहे. प्रतिनिधिक कवितासंग्रह म्हणून ‘निर्बाचित कविता’ चे महत्त्व असून, प्रसिद्ध बंगाली मराठी अनुवादक मृणालिनी गडकरी यांनी या कवितांचा समर्पक मराठी अनुवाद केला आहे. या सर्व कवितांमधून स्त्रीची तगमग स्पष्ट होते. स्त्रियांवर होणारे अन्याय, स्त्रियांची होणारी प्रतारणा, कुचंबणा, घुसमट बंधने या सर्वांना या कवितांमधून वाचा फोडण्यात आल्याने सर्व स्त्रियांनी या कविता वाचायला हव्यात. ज्याला पुरुषाने स्त्री सुखाची संज्ञा दिली ते सुख नसून मतलबी शोषण आहे, याची जाणीव या कविता करून देतात. पुरुषांना त्या आपल्या अपराधांबद्दल अंतर्मुख करतात. म्हणून त्यांनी पण वाचल्याच पाहिजे अशा उभयपक्षी वाचन व्यवहारातूनच स्त्री-पुरुष ऐकमेकांना मनुष्य मानून व्यवहार करणार, करतील अशी आशा करीत तसलिमा नासरिन यांनी त्या लिहिल्यात, त्या विचारतात - ‘एखाद्याच्या सहवासात संबंध आयुष्य घालविलं, तरी खंरच माणूस ओळखता येतो का?’ ‘शुभ विवाह’ कवितेत त्या समजावतात विवाहाच्या नावावर हिडीस पुरुष एका जिवावर कब्जा मिळतात नि तिनं सोनेरी मेणबत्तीसारखं प्रेमात विरघळून जावं अशी अपेक्षा करतात. व त्यांची अपेक्षा असते स्त्रीनं पातिव्रत्य राखावं. पुरुषी पातिव्रत्याची हमी नाही का मागायची स्त्रीनं? सर्व पुरुष सभ्यच असतात, त्यांना नाही लागत पातिव्रत्याची सनद. पुरुषांनी स्त्रीला हरतऱ्हेने दुबळी करून ठेवले आहे. तिने मैदान ओलांडायचं नाही. तिने तळ्यात पोहायचं नाही. तिनं एकटीनं उंबरा ओलांडायचा नाही. तिला नाही का वाटत....चांदण्यात फिरावं, नौकाविहार करावा, पावसात भिजावं.... पण नाही. ती नाजूक, तिला सर्दी, तिलाच ताप. क्षणासाठी घराचा उंबरठा ओलांडू देत नाही कोणी स्वप्नात नाही तर जागेपणीच पहाते, विषारी साप, सुरवंट,राक्षसाचं घर आणि रानटी रेडा समाजात स्त्रीला घेरणारा फक्त पुरुष नाही. समजांनी तिच्याभोवती जात, धर्म, लिंग, भाषा, प्रांत अशी कितीतरी काटेरी कुंपणं उभा केलीत. शिवाय देवे, दैव भविष्याचं ललाट लेख सटवाईने लिहून ठेवलेले नि कर्म म्हणून आलेले ते वेगळेच. म्हणून ती प्रश्न करते - धर्मानं आवळलंय आपल्या पंजात अवघ्या जगाला एकानं विरोध करून किती मोडणार हाडं? आणि दूरवर पसरलेलं हे विषमतेचं जाळं, कितीसं तुटणार? फाटणार? स्त्री सौख्याची भुकेली असते. लक्ष लक्ष स्वप्नं उरी सांभाळत ती बोहल्यावर चढते. तीन दिवसांत हाका मारण्याचा प्रसंग येतो, नि अवघ्या तीन महिन्यांत तिनं सर्वस्व गमावलेलं असतं - स्त्रीला फसवून भोगल्याशिवाय, भोगाची तृप्ती नाही, तृप्तीचा सुवासिक ढेकर नाही भोगपूर्ण समाजानं स्त्रीचं विरुप वेश्या रुपात परिवर्तीत करून टाकलं. वेश्या फक्त स्त्रीच असते - सगळ्या वेश्या स्त्रियाच असतात, पुरुष कधीही वेश्या नसतात. अंस जळजळीत अंजन डोळ्यात घालणाऱ्या कविता आपणास आतून, बाहेरून उसवतात; विचार करायला भाग पाडतात आणि स्त्रीस माणूस म्हणून स्वीकारण्याचा संस्कार देतात म्हणून त्या वाचायच्या. पुरुषांना परकाया प्रवेश करण्यास भाग पाडणाऱ्या या कविता स्त्रीस तिचं सामाजिक स्थान दाखवून भानावर आणतात. जगात आजवर अनेक कवी, लेखक, कलाकार, विचारक यांनी असे मूलभूत प्रश्न विचारले नि समजांनी त्यांना बहिष्कृत ठरवलं. पूर्वी गॅलिलिओ, सॉक्रेटिसच्या पदरी तुरुंगवास, विष प्रयोग, क्षमायाचना त्यांच्या पदरी आली. आज अशांना बहिष्कृतांचं जीवन जगावं लागत आहे. तसलिमा नासरिन मूळ बांगला देशी. त्यांचं लेखन धर्मविरोधी मानलं गेलं नि त्यांना आपला देश सोडून युरोप, अमेरिकेत राहावं लागलं. सध्या त्या ‘बहिष्कृत’ विस्थापित होऊन भारताच्या आश्रयाखाली सुरक्षित जीवन जगत असल्या तरी एकटेपणा खायला उठतोय. मध्यंतरी त्यांना मानसोपचाराची गरज निर्माण झाली होती. दर तीन-पाच वर्षांनी त्यांना देशाकडे आश्रयासाठी याचना करावी लागते. जग प्रगल्भ केव्हा होणार? विचार स्वातंत्र्य केव्हा अजरामर होणार? जात, धर्म, लिंग, निरपेक्ष समाज मानव समाज, मानवधर्म कसा अवतरणार असा प्रश्न करणारी ही कवयित्री कवितांतून माणसांच्या मनात खरं तर ठाव घेऊ इच्छिते - पण नाही थांग एकाला दुसऱ्याच्या मनाचा, कोणाचं मन भराऱ्या मारतं, तर कोणाचा जणू बंद पिंजरा, कोणी झोपतं, तर कोणाला पडतो प्रश्न, झोपलेली रात्र सरायची कशी? ...Read more

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 16-12-2001

    कवयित्री म्हणून नावलौकिक मिळवू इच्छिणारी युवती ज्या वयात गुलाबी प्रेमाच्या किंवा अत्यंत रोमँटिक अशा दु:ख व्यक्त करणाऱ्या कविता लिहिली, त्या वयात तसलिमा नासरीन स्त्री-पुरुषांच्या जीवनातील असमानता, प्रेमाच्या नावावर होणारी प्रतारणा, निखळ प्रेमाच्या बदलयात मिळणारी भोगलालसा आत्मसमर्पणाच्या बदलात वाट्याला येणारी अवहेलना अशासारख्या विषयांवर कविता लिहिते. ‘अतले अन्तरीण’ किंवा ‘बालिकार गोल्लाछुट’ यातील कविता वाचल्यावर आपल्या लक्षात येते की, तसलिमा केवळ नावलौकिकाच्या लोभाने हातात लेखणी धरीत नाही, तर अतिशय सहिष्णू असणाऱ्या आणि ज्यांचा आवाजच दाबून टाकला गेला आहे, अशा स्त्री जातीच्या बाजूने उभी राहून, ती समाजाच्या विरोधात आपला निषेध नोंदविते, आपल्या कवितांमधून, स्त्री-पुरुषांत समानता आणणे हेच तिचे लक्ष्य आहे. या लक्ष्यासाठीच तिला हातात लेखणी धरावी लागली आहे. असे असूनही तिच्या कवितेत फक्त संताप, विरोध किंवा कडवटपणा नाही. उलट काही कवितांत वेदना आहे, काहीत आत्मसन्मानाची भावना आहे, तर काहींमध्ये प्रेमासाठी व्याकुळता आहे. जरी ती आपल्या एका कवितेत म्हणते, ‘पाहून पुरुषाची पराकोटीची अश्लीलता जळते मनातल्या मनात नरकाच्या आगीत पतिव्रता साध्वी स्त्री. तरी दुसऱ्या एका कवितेत ती म्हणून जाते. एकदा जरी घातली साद एकदा प्रेम केल्यावर सर्व विसरून आसू ढाळते निष्पाप पोर स्त्रीच्या वाट्याला येणारी फसवणूक आणि पुरुषांचे तिच्यावर असलेले वर्चस्व यांसारख्या विषयांवर याआधी काही कथा, कविता लिहिल्या गेल्या असल्या तरी तसलिमाप्रमाणे अगदी उघडपणे, स्पष्टपणे कोणीही लिहिलेले नाही. स्वत:च्या शरीरावर झालेल्या अत्याचारांच्या कथा तिच्याइतक्या समर्पक शब्दांत, कलात्मक भाषेत कोणीही मांडलेल्या नाहीत, हेच तर आहे तिचे वेगळेपण. ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 14-10-2001

    स्त्रीवादी लेखिका-कवयित्री म्हणून तस्लिमा नासरिनची नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही. धर्मांध मुस्लिमांविरुद्ध त्यांनी पुकारलेल्या लढ्यांमुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या. त्यांचा ‘निर्बाचित कविता’ हा १९९३मध्ये प्रकाशित झालेला कवितासंग्रह मृणालिनीगडकरी यांनी अनुवादित केला आहे. पुस्तकाच्या मुखपृष्ठावरूनच घराच्या चौकटीत बंधनात असलेली स्त्री हा कवितांचा विषय असल्याचे ध्यानात येते. स्त्री-सौख्य या कवितेत पुरुषाची स्त्रीशी ओळख झाल्यापासून तिचा उपभोग घेईपर्यंत प्रवास किती झपाट्याने होतो आणि प्रत्येक स्त्रीकडे उपभोग्य विषय म्हणूनच पाहिले जाते याविषयी संताप आहे. चाकोरी या कवितेत मर्यादांची चाकोरी सोडून पळून जाण्याची उर्मी येते. हातापायात बेडी असली तरी मनाला मात्र कुणी बेडी घालू शकत नाही याचे समाधान सोन्याची बेडीमध्ये आहे. ‘अभिमान’, ‘शरीरशास्त्र’, ‘स्वाद’, ‘पाणीच पाणी’, ‘प्रफुल्लचं घर’, अशा कवितांमधून तिचे अस्वस्थ मन, फाळणीचे विदारक वास्तव व्यक्त होते. यांतील कवितांमध्ये संताप, विरोध जसा आहे तसा स्त्रियांच्या सोशिकपणावरही ती हल्ला चढवते. ...Read more

  • Rating StarSAMANA 14-10-2001

    निर्बाचित कविता… स्त्रीवादी लेखिका-कवयित्री म्हणून तस्लिमा नसरीनची नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही. धर्मांध मुस्लिमांविरुद्ध त्यांनी पुकारलेल्या लढ्यांमुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या. त्यांचा ‘निर्वाचित कविता’ हा १९९३ मध्ये प्रकाशित झालेला कवतासंग्रह मृणालिनी गडकरी यांनी अनुवादित केला आहे. पुस्तकाच्या मुखपृष्ठावरूनच घराच्या चौकटीत बंधनात असलेली स्त्री हा कवितांचा विषय असल्याचे ध्यानात येते. स्त्री-सौख्य या कवितेत पुरुषाची स्त्रीशी ओळख झाल्यापासून तिचा उपभोग घेईपर्यंत प्रवास किती झपाट्याने होतो आणि प्रत्येक स्त्रीकडे उपभोग्य विषय म्हणूनच पाहिले जाते याविषयी संताप आहे. चाकोरी या कवितेत मर्यादांची चाकोरी सोडून पळून जाण्याची उर्मी येते. हातापायात बेडी असली तरी मनाला मात्र कुणी बेडी घालू शकत नाही याचे समाधान सोन्याची बेडीमध्ये आहे. ‘अभिमान’, ‘शरीरशास्त्र’, ‘स्वाद’, ‘पाणीच पाणी’, ‘प्रफुल्लचं घर’ अशा कवितांमधून तिचे अस्वस्थ मन, फाळणीचे विदारक वास्तव व्यक्त होते. यांतील कवितांमध्ये संताप, विरोध जसा आहे तसा स्त्रियांच्या सोशिकपणावरही ती हल्ला चढवते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
श्रीपाद ब्रह्मे

नुकतंच असंच वेगानं वाचून संपवलेलं दुसरं पुस्तक म्हणजे सुनंदा अमरापूरकर यांचं ‘खुलभर दुधाची कहाणी’. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या त्या पत्नी. अर्थात ही काही त्यांची एकमेव ओळख नव्हे. एक चांगल्या अभिनेत्री, उत्तम अनुवादक म्हणूनही त्या ्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘खुलभर दुधाची कहाणी’ या आत्मचरित्रवजा लेखनातून त्यांच्या जगण्याचा व्यापक पट अतिशय प्रांजळपणे उलगडला आहे. मला हे पुस्तक विशेष भावण्याचं कारण म्हणजे त्यात आलेलं नगरचं वर्णन. मी स्वत: नगरला फार प्रदीर्घ काळ राहिलो नसलो, तरी ते शेवटी माझ्या जिल्ह्याचं गाव. आणि वयाच्या १३ ते २२ अशा महत्त्वाच्या कुमार व तरुण वयातला माझा तिथला रहिवास असल्यानं नगरच्या आठवणी विसरणं शक्य नाही. सुनंदाताई माझ्या आईच्या वयाच्या. त्यामुळं त्यांच्या लहानपणच्या आठवणी जवळपास माझ्या जन्माच्या २०-२५ वर्षं आधीच्या. असं असलं तरी मी त्या वर्णनाशी, त्या काळातल्या नगरशीही रिलेट होऊ शकलो, याचं कारण मुळात गेल्या शतकात बदलांचा वेग अतिशय संथ होता. नगरसारख्या निम्नशहरी भागात तर तो आणखी संथ होता. त्यामुळं एकूण समाजजीवनात १९६० ते १९९० या तीस वर्षांत तपशिलातले फरक सोडले, तर फार मोठा बदल झाला नव्हता. सुनंदाताई माहेरच्या करमरकर. त्यांचं आजोळ‌ सातारा असलं, तरी त्या जन्मापासून नगरमध्येच लहानाच्या मोठ्या झालेल्या. अगदी पक्क्या ‘नगरी’ म्हणाव्यात अशा. ( आजही त्या स्वत:ला अभिमानानं ‘नगरकर’च म्हणवून घेतात.) सुनंदाताईंचे वडील त्या दहा वर्षांच्या असतानाच गेले. त्यांना मामांचा आधार होता, पण आईनंच लहानाचं मोठं केलं. तेव्हाचं त्यांचं निम्न मध्यमवर्गीय जगणं, नगरमधले वाडे, तिथलं समाजजीवन, तिथल्या शाळा, शिक्षक, नगरमधील दुकानं, दवाखाने, तिथल्या गल्ल्या, बाजार हे सगळं सगळं सुनंदाताई अतिशय तपशीलवार उभं करतात. नगरसारख्या मध्यम शहरात वाढलेल्या महाराष्ट्रातील कुठल्याही शहरातील त्या काळातील व्यक्तीला अतिशय सहज रिलेट होईल, असं त्यांचं हे जगणं होतं. त्यात सुनंदाताईंचं लेखन अतिशय सहज, सोपं आणि प्रांजळ असल्यामुळं ते आपल्याला अगदी भिडतं. एका प्रख्यात अभिनेत्याची पत्नी असल्यानं त्यांचं जीवन इतर सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा वेगळं झालं असेल, अशी आपली अपेक्षा असते. सुनंदाताईंच्या लेखनातून या ‘वेगळ्या जीवना’ची काही तरी झलक मिळेल, अशीही आपली एक भूमिका तयार झालेली असते. सदाशिव अमरापूरकरांसारख्या मनस्वी अभिनेत्याशी लग्न झाल्यानंतर सुनंदाताईंचं जगणं बदललंही; मात्र ते वेगळ्या पद्धतीनं. सदाशिव अमरापूरकर ऊर्फ नगरकरांचा लाडका बंडू त्यांना नगरमध्ये शाळेपासून कसा भेटला, नंतर कॉलेजमध्ये दोघांनी एकाच ग्रुपमधील नाटकं कशी सादर केली, त्यात अगदी नकळतपणे त्यांचं प्रेम कसं जमलं आणि नंतर नगर सोडून त्या पतीच्या कारकिर्दीसाठी मुंबईत कशा आल्या हा सर्व नाट्यमय प्रवास सुनंदाताई अतिशय तन्मयतेनं मांडतात. अमरापूरकर मंडळींच्या घराविषयीचे तपशील त्यात येतात. अमरापूरकरांचे वडील दत्तोपंत हे नगरमधलं मोठं प्रस्थ. श्रीमंत घराणं. मोठा वाडा, नोकरचाकर वगैरे. त्या तुलनेत सुनंदाताईंची माहेरची परिस्थिती जेमतेम म्हणावी अशी. अशा परिस्थितीत हे लग्न झालं आणि त्या अमरापूरकरांची सून झाल्या, इथपर्यंत पुस्तकाचा निम्मा प्रवास (मध्यंतरच) होतो. पुढल्या दोनशे पानांत आपल्याला खऱ्या अर्थानं सदाशिव अमरापूरकर हे काय व्यक्तिमत्त्व होतं, हे उलगडत जातं. अमरापूरकरांनी शेवटपर्यंत त्यांची मध्यमवर्गीय राहणी व मध्यमवर्गीय मूल्यं सोडली नाहीत. ‘अर्धसत्य’सारख्या सिनेमामुळं एका रात्रीतून ते भारतभरात प्रसिद्ध झाले. या एका ओळखीमुळं अमरापूरकरांचं जीवन पूर्ण बदलून गेलं. तोपर्यंत असलेली आर्थिक ओढगस्तीही संपली. हिंदी चित्रपटसृष्टीत अगदी स्वप्नवत अशा रीतीनं ते मोठे स्टार झाले. एकापाठोपाठ एक खलनायकी भूमिका त्यांच्याकडं येऊ लागल्या. पैसा येऊ लागला. अशा परिस्थितीत एक मध्यमवर्गीय कुटुंब या सगळ्या धबधब्याला कसं तोंड देतं आणि आपली मूल्यं कायम जपत राहतं, हे सुनंदाताईंनी फार हृद्यपणे लिहिलं आहे. सुनंदाताईंनी अनेक वर्षं एलआयसीत नोकरी केली. पतीचं अस्थिर क्षेत्र असल्यानं त्यांनी सुरुवातीला नोकरी केलीच; पण नवरा हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार व्हिलन झाल्यावरही त्यांनी ही नोकरी सोडली नाही. त्यांच्या तिन्ही मुलींवर त्यांनी उत्तम संस्कार केले. एका सिनेमाच्या प्रीमियरनंतर हे सगळे कुटुंबीय कसे घरी जाऊन पिठलं-भाकरीचं जेवण तयार करून जेवले हे त्यांनी एका प्रसंगात अतिशय खेळकरपणे सांगितलं आहे. अमरापूरकरांचं नाटकवेड, भौतिक सुखांविषयीची काहीशी विरक्त वृत्ती, त्यांचा मित्रांचा गोतावळा, अनेक माणसांचा घरात राबता असा एकूण ‘देशस्थी’ कारभार यावर सुनंदाताई कधी गमतीत, तर कधी काहीसं वैतागून टिप्पणी करतात. अर्थात त्यांचं सदाशिव अमरापूरकरांवर अतिशय प्रेम होतं आणि त्यांनी हे शेवटपर्यंत उत्तम निभावलं. अशा आत्मचरित्रांत अनेकदा ‘आहे मनोहर तरी... गमते उदास’ असा सूर लागण्याचा धोका असतो. सुनंदाताईंच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे, एखादा अपवाद वगळता, त्यांच्या या संपूर्ण पुस्तकात असा रडवा सूर कधीही लागलेला नाही. आपल्याला जे काही मिळालं, ते आपणच निवडलं आहे आणि त्यामुळं त्याविषयी तक्रार करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, अशी एक भूमिका त्यांनी घेतलेली दिसते. त्यांच्या या पुस्तकातून विसाव्या शतकातील मध्यमवर्गीय ब्राह्मण घरातील एका तरुणीच्या आशा-आकांक्षांचा, आयुष्यानं दिलेल्या आश्चर्याच्या धक्क्यांचा आणि त्याला सामोरं जाण्यातील धीट दिलदारपणाचा लोभस प्रवास दिसतो. आपली मध्यमवर्गीय मूल्यं जपत, प्रामाणिकपणे व उमेदीनं आयुष्य जगणाऱ्या अनेक महिलांना या पुस्तकात आपल्या जगण्याचं प्रतिबिंब सापडेल. तेच या ‘खुलभर दुधाच्या कहाणी’चं यश आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
प्रभाकर गावंडे, अमरावती

मी विकत घेऊन वाचले आहे हे पुस्तकं, चांगले आहे, नवीन माहिती वाचायला मिळाली.