* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SCHINDLERS LIST
  • Availability : Available
  • Translators : SANJAY DABKE
  • ISBN : 9788184980899
  • Edition : 3
  • Publishing Year : NOVEMBER 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 296
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : MEMOIR
Quantity
Buying Options:
  • Print Books:
A STUNNING NOVEL BASED ON THE TRUE STORY OF HOW GERMAN WAR PROFITEER AND PRISON CAMP DIREKTOR OSKAR SCHINDLER CAME TO SAVE MORE JEWS FROM THE GAS CHAMBERS THAN ANY OTHER, SINGLE PERSON DURING WORLD WAR II. IN THIS MILESTONE OF HOLOCAUST LITERATURE, THOMAS KENEALLY USES THE ACTUAL TESTIMONY OF THE SCHINDLERJUDEN - SCHINDLER`S JEWS - TO BRILLIANTLY PORTRAY THE COURAGE AND CUNNING OF A GOOD MAN IN THE MIDST OF UNSPEAKABLE EVIL. "A MASTERFUL ACCOUNT OF THE GROWTH OF THE HUMAN SOUL."-LOS ANGELES TIMES BOOK REVIEW "AN EXTRAORDINARY TALE...NO SUMMARY CAN ADEQUATELY CONVEY THE STRATAGEMS AND REVERSES AND SUDDEN TWISTS OF FORTUNE. A NOTABLE ACHIEVEMENT." -THE NEW YORK REVIEW OF BOOKS THOMAS KENEALLY, NOVELIST, PLAYWRIGHT, AND PRODUCER, IS THE AUTHOR OF NUMEROUS CRITICALLY ACCLAIMED NOVELS, INCLUDING THE CHANT OF JIMMIE BLACKSMITH, THE PLAYMAKER, A FAMILY MADNESS, AND WOMAN OF THE INNER SEA.
१९३९ ते १९४५ एका विकृत राजवटीच्या हट्टापायी सगळं जग वेठीला धरलं गेलं होतं. युरोपची भूमी बेचिराख होत होती.ज्यूंचा वंश नष्ट करायची प्रतिज्ञा नाझी भस्मासुराने केली होती.त्या आगीत सगळ्यात जास्त होरपळून निघालेला देश म्हणजे पोलंड. नाझींनी उघडलेल्या ३२० छळछावण्यांपैकी ३०० पोलंडमध्ये होत्या.त्या सगळ्या देशाचाच तुरुंग झाला होता. या दुस-या महायुद्धाच्या कालखंडात माणसामधल्या सैतानी वृत्तीने कळस गाठला होता. पण त्याच बरोबर खूप ठिकाणी देव, माणसांच्या रूपात संकटात सापडलेल्यांच्या मदतीला धावून जात होता.शिंडलर्स लिस्ट ही अशाच एका देवमाणसाची कथा आहे, ज्यानं स्वत: जर्मन असून, स्वत:चं सर्वस्व पणाला लावून १२०० ज्यूंचे प्राण वाचवले. लिओपोल्ड पेफरबर्ग हा ऑस्कर शिंडलरने वाचवलेल्या ज्यूंपैकी एक. ही जगावेगळी कथा लोकांसमोर आणण्यासाठी त्यानं अतोनात कष्ट केले. थॉमस केनेलीसारख्या सिद्धहस्त प्रतिभावंताने ही कथा १९८३ साली लिहिली.जगभरात तिला प्रतिष्ठेच्या बुकर पुरस्कारासकट अनेक मानसन्मान लाभले.विस्मृतीच्या पडद्याआड गेलेल्या ऑस्कर शिंडलरचं नाव या कलाकृतीमुळे दुसऱ्या महायुद्धाच्या इतिहासात चिरंतन झालं.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #SCHINDLERSLIST #SCHINDLERSLIST #शिंडलर्सलिस्ट #MEMOIRTRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SANJAYDABKE #THOMASKENEALLY "
Customer Reviews
  • Rating StarLeshpal Javalge

    WW 2 मध्ये ऑस्कर शिंडलर सारखी पण माणसं जर्मनी मध्ये शिल्लक होती 👌👌👌

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 28-01-2019

    ऑस्कर शिंडलर या उद्योजकाने हजारांहून अधिक ज्यू लोकांना आपल्याकडे कामगार म्हणून नेमलं आणि त्यांना कसं मृत्यूच्या विळख्यातून सोडवलं याची ही कहाणी आहे. कामगारांची नावे जाहीर करणारी शिंडलर्स लिस्ट ही तेव्हा जणू जीवनदायिनी होती. युद्धातल्या कथा या कायमच हदयद्रावक असतात, पण दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्गनं या पलीकडे जात विचारप्रवर्तक आणि रूपकांचा उत्तम वापर असलेली ही अजोड कलाकृती साकारली आहे. लिअम नीसन, राल्फ फिनेस, बेन किंग्स्ले यांच्या अभिनयाप्रमाणेच हा चित्रपट परिणामकारक वाटतो तो जॉन विल्यम्सच्या अर्थपूर्ण संगीतामुळे. प्रत्येकानं आवर्जून पाहावा असा हा वंशभेद, क्रौर्य, माणुसकी आणि आयुष्यांची गोष्ट सांगणारा चित्रपट आहे. शेवटी शिंडलर म्हणतो त्याप्रमाणे, ‘व्हूएव्हर सेव्हज वन लाइफ, सेव्ह द वर्ल्ड एन्टायर’, खरंतर माणूस ही एकच ओळख किती महत्त्वाची आहे, हे या कलाकृतीतून व्यक्त होतं. – मुक्ता बाम ...Read more

  • Rating StarPradeep Phadke

    छान पुस्तक

  • Rating StarDAINIK AIKYA SATARA 31 -01 -2010

    शिंडलर्स लिस्ट जागतिक कीर्तीचा बुकर पुरस्कारीत कादंबरी… जर्मनीची सत्ता हिटलरने हस्तगत केल्यावर त्याने आपल्या हुकूमशाही राजवटीत ज्यू धर्मियांचा पूर्णपणे वंशसंहार करायची प्रतिज्ञा केली होती. त्याच्या आदेशानुसार जर्मनी आणि पोलंडमधील लाखो ज्यूंना प्रारभी छळ छावण्यात डांबण्यात आले. त्या छावण्यांना कॉन्स्ट्रेशन कॅम्प असा शब्दही जगात रूढ झाला. १९३९ ते १९४५ या सहा वर्षांच्या काळात हिटलरच्या नाझी अधिकारी आणि सैन्याने कोवळ्या बालकांसह लाखो ज्यूंची कत्तल केली. त्यांना छळ छावण्यात ठार मारून जाळण्यातही आले. पोलंड काबीज केल्यावर हिटलरच्या नाझी अधिकाऱ्यांनी त्या देशातल्या साऱ्या लहान मोठ्या वृद्ध ज्यूंना ‘घेटो’त म्हणजे पुनर्वसन शिबिरात सक्तीने डांबले. घेटोत त्यांच्यासाठी राहण्याची आणि जेवण्याची योग्य व्यवस्था नव्हती. घेटोतल्या ज्यूंचे जीणे जनावरांसारखे होते. घेटोत जाणे म्हणजे मृत्यूचा आदेश अशी दहशतच ज्यू धर्मियात निर्माण झाली होती. या अत्यंत विकृत, किळसवाण्या आणि माणुसकीला चूड लावणाऱ्या त्या छळ छावण्यांचे, होलोकॉस्टचे प्रभावी चित्रण थॉमस केनेली या साहित्यिकाने ‘शिंडलर्स लिस्ट’ या कादंबरीत केले आहे. ही साहित्यकृती कादंबरी असली तरी शिंडलर ज्युडेन नावाच्या व्यसनी, बदफ़ैली पण मनात माणुसकीचा नंदादीप तेवत असलेल्या जर्मन उद्योजकाची सत्यकथा आहे. आपले नशीब घडवण्यासाठी ऑस्कर शिंडलर पोलंडमधल्या क्रॅकोव्हमध्ये त्यांनी शिंडलरने वाचवलेल्या लिओपाल्ड पेफरबर्ग यांच्या साहाय्याने शिंडलरने दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अत्यंत प्रयत्नपूर्वक नाझींच्या मृत्यूच्या छावणीतून १२०० ज्यूंचे प्राण वाचवले. युद्धाच्या काळात या ज्यूंना वाचवणे हेच त्याचे एकमेव ध्येय होते. १९८३ मध्ये केनेली यांची ही कादंबरी प्रसिद्ध झाली आणि तिला जागतिक कीर्तीचा बुकर पुरस्कार मिळाला. याच कादंबरीच्या कथानकावर जागतिक कीर्तीचे दिग्दर्शक स्टिव्हन स्पिलबर्ग यांनी १९९३ मध्ये ‘शिंडलर्स लिस्ट’ हा चित्रपट निर्माण केला, तो जगभर प्रचंड गाजला. या चित्रपटाला सात ऑस्कर पुरस्कार मिळाले. शिंडलरच्या मानवतेला वंदन करणाऱ्या केनेली यांच्या जागतिक कीर्तीच्या या कादंबरीचा मराठी अनुवाद अत्यंत प्रभावीपणे संजय दाबके यांनी केला आहे. मराठीत शिंडलरची ही कथा प्रथमच प्रसिद्ध होत आहे. शिंडलर क्रॅकोव्हला गेला तेव्हा त्याने ज्यूंची ससेहोलपट आणि त्यांचा संहार पाहिला. चैनीसाठी वाट्टेल तशी उधळपट्टी करणारा, अनेक लफडी करणारा शिंडलर या मृत्युकांडाने पूर्णपणे हादरून गेला. नाझींच्या छळ छावणीतून जमेल तेवढ्या ज्यूंना वाचवायसाठी त्याने प्रसंगी आपले प्राणही संकटात घातले. क्रॅकोव्हमधल्या नाझी अधिकाऱ्यांना दारू, लाच देऊन त्याने अंकित केले होते. या शहरात त्याने अनॅमल भांडी तयार करणारा कारखाना सुरू केला. या कारखान्यासाठी ज्यू हे सर्वांत स्वस्त आणि सहज मिळणारे मजूर असल्याचे त्याने नाझी अधिकाऱ्यांना पटवून दिले. या कारखान्यात कामाला असलेल्या ज्यूंची त्याने काळजी घेतली. आजारी ज्यूंवर चांगले औषधोपचार केले. आपल्या कारखान्यातल्या ज्यू मजुरांना तो मानवतेने वागवित असे. तुम्ही जगाल, असा दिलासाही देत असे. ज्यूंच्या छळामुळे तो सतत व्यथित असे. पण, शिंडलर जर्मन सैन्याला आवश्यक त्या साहित्याचा पुरवठा करीत असल्याने आणि त्याचे वरिष्ठ नाझी अधिकाऱ्यांशी घनिष्ठ संबंध असल्यामुळे, क्रॅकोव्हमधल्या घेटोतल्या अधिकाऱ्यांचे त्याच्यापुढे काही चालत नसे. जेव्हा काही अधिकाऱ्यांनी त्याचा काटा काढायचा प्रयत्न केला तेव्हा त्याने वरिष्ठ नाझींशी संपर्क साधून आपली सुटकाही करून घेतली होती. क्रॅकोव्हमधला त्याचा हा कारखाना व्यवस्थित सुरू होता. पण जर्मनीची दुसऱ्या महायुद्धात पिछेहाट सुरू झाली, तेव्हा बहुतांश घेटोतील ज्यूंना ठार मारायचे आदेश बर्लिनहून आले होते. त्यातच क्रॅकोव्हमधील हा कारखाना हलवायचे आदेश आले. शिंडलरने आपला कारखाना ब्रिनालिंटझ् येथे नेण्याचा निर्णय घेतला. त्याने संपूर्ण कारखाना आणि कारखान्यातले मजूर नव्या गावात नेले. या कारखान्यात दारूगोळ्याशी संबंधित साहित्याची निर्मिती होत असे. प्रत्यक्षात मात्र पराभवाच्या छायेत असलेल्या जर्मनीला शिंडलरच्या कारखान्यातल्या या साहित्याचा काहीही उपयोग झाला नाही. सात महिने तो जर्मन लष्करी अधिकाऱ्यांना फसवत राहिला. एकाही पैशाचे उत्पादन या कारखान्यात झाले नाही. लवकरच युद्ध संपेल आणि हे ज्यू स्वतंत्र होतील, अशी त्याला खात्री होती. दुसऱ्या महायुद्धात जर्मनीला पराभव झाल्यावर शिंडलरचा हा कॅम्प रशियन सैन्याने ताब्यात घेतला. त्या आधी शिंडलरने वाचवलेल्या सर्व ज्यू मजुरांना तुम्ही आता स्वतंत्र झाला आहात, असे सांगून टाकले. हे सारे ज्यू जिवंत राहिले ते शिंडलरच्या मानवतावादी आणि धोकादायक ठरलेल्या कृतीमुळेच! त्याने स्वतःच जर्मनीच्या भीषण नरसंहाराचा निषेध केला. त्याची आपल्याला शरम वाटते, असे सांगितले. यापुढे माणुसकीने वागा, कायदा हातात घेऊ नका, या साऱ्या दिव्यातून पार पडण्यासाठी मला गैरमार्गांचा, भ्रष्टाचाराचा उपयोग करावा लागला, त्याला माझा नाइलाज होता. तुम्ही सगळ्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत मला साथ दिली याबद्दल मी तुमचा अत्यंत आभारी आहे, अशा भावपूर्ण शब्दात शिंडलरने आपल्या या सहकाऱ्यांचा निरोप घेतला. युद्ध संपल्यावर एक काळचा धनाढ्य शिंडलर दिवाळखोर झाला. तो बर्लिनला गेला. तेथून उद्योगासाठी अर्जेंटिनाला गेला. तेथेही त्याला नशिबाने साथ दिली नाही. तेथून तो परत बर्लिनला आला. पण, आपला देवदूत असलेल्या शिंडलरला त्याने वाचवलेले ज्यू मात्र विसरले नव्हते. त्याच्यामुळेच आपण जिवंत राहिलो, हे ऋण ते कधीही विसरले नाहीत. क्रॅकोव्हमधल्या घेटोचा प्रमुख आणि हजारो ज्यूंचा नरसंहार करणाऱ्या अ‍ॅमॉन गॉथला, त्याचा साथीदार लिओपाल्डला फाशी दिली गेली. शिंडलर नशीब काढण्यासाठी अर्जेंटिनाला गेला, तेव्हा ज्यूंच्या संघटनेने त्याला १५ हजार डॉलर्सची मदत केली. शिंडलर हे ज्यूंचे प्राणदाते आहेत, ते देवदूत आहेत असे पत्रही या संघटनेने शिंडलरला दिले होते. अर्जेंटिनाहून पुन्हा जर्मनीत परतल्यावर इस्त्राईलची राजधानी तेलअव्हिहमध्ये तिथल्या नगरपरिषदेने शिंडलरचा सत्कार केला. इस्त्राईल सरकारने, ‘राइटीअस पर्सन’ म्हणजे अतिशय उच्च नीतिमूल्ये पाळणारा माणूस, या सन्मानाने त्याचा गौरव केला. त्याच्या सत्काराच्या बातम्या जर्मन वृत्तपत्र झळकल्या आणि १९६६ मध्ये जर्मन सरकारतर्फे शिंडलरला सन्मानचिन्ह देण्यात आले. नंतर त्याला २०० मार्क्सचे दरमहा निवृत्ती वेतनही सुरू करण्यात आले. त्याची पत्नी एमिली मात्र शेवटपर्यंत अर्जेंटिनातच राहिली. तिला आपल्या पतीच्या मानवतावादी कार्याचा अभिमान वाटत होता. १९७२ मध्ये शिंडलर न्यूयॉर्कला गेला आणि त्याने वाचवलेल्या तिघा ज्यूंनी शिंडलरच्या नावाने हिब्रू विद्यापीठाला एक पूर्ण मजला बांधून दिला. ९ ऑक्टोबर १९७४ रोजी शिंडलरचे निधन झाले. त्याने आपल्या मृत्युपत्रात माझ्या देहाचे दफन इस्त्राईलमधले पवित्र शहर जेरुसलेममध्ये करण्यात यावे, अशी अंतिम इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार ती पूर्ण करण्यात आली. ऑस्कर शिंडलर गेला तेव्हा जगातल्या सर्व ज्यूंनी त्याला श्रद्धांजली वाहिली. ही सत्यकथा अत्यंत प्रवाहीपणे थॉमस केनेली यांनी कथन केली आहे. तर संजय दाबके यांनी मूळ इंग्रजी भाषेतून अनुवाद करताना तो प्रवाहीपणा कुठेही खंडित होऊ नये याची दक्षता घेतली आहे. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MI GALIB BOLTOY
MI GALIB BOLTOY by SHABBIR ROMANI Rating Star
Arvind deshpande

Mirza Ghalib is the Jewel in the Urdu literature. He is the pioneer in setting new trend in it. Authar Shabbir Romani excellently explained it. Everyone who is not acquainted with urdu literature should go throw it. The socio political and historicalenviorn of that time is skillfully reflected in his poetry and was narrated by author shabbir Romani. ...Read more

NADIMUKH
NADIMUKH by PERUMAL MURUGAN Rating Star
गार्गी म्हात्रे

पेरुमाल मुरुगन ह्या तामिळ लेखकाच " नदीमुख" हे अनुवादित पुस्तक वाचले. मराठी मध्ये दाक्षिणात्य भाषां मधल्या तामिळ भाषेच्या उत्तम साहित्याची वाचन संधी या पुस्तकाच्या निमित्ताने मिळाली. साठच्या दशकात जन्मलेल्या पिढीला वेगाने ,खर तर अती वेगाने बदलत जाणाऱ्ा तंत्रज्ञान व तरुण पिढीची मानसिकता यांचे सुंदर चित्रण या कादंबरी मध्ये करण्यात आले आहे. माणूस किंवा असुर पालक असला की मुलांच्या भविष्याची चिंता त्यामधून उद्भवणारा संघर्ष साध्या सोप्या पण प्रवाही भाषेमधून आपल्या समोर उभा राहातो. कुमारासुराच्या एकसुरु झापडे लावून घेतलेल्या आयुष्यात `नदीमुख` दर्शना नंतर झालेली तगमग व बदल यांचे खूप सुंदर वर्णन शेवटी आलेल आहे. डॉ. मानसी जयंत केळकर यांनी अतिशय प्रवाही भाषेत व उत्कृष्ट समर्पक शब्दात पुस्तक अनुवादित केल्यामुळे कांदबरीची मजा घेता येते. मराठी व्यतिरिक्त अन्य भाषेतील साहित्य वाचनाला उपलब्ध करुन दिल्या बद्दल मेहता पब्लिशिंग हाऊस व डॉ मानसी केळकर यांचे आभार ! ...Read more