* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: OUT OF IRAN
  • Availability : Available
  • Translators : VIDULA TOKEKAR
  • ISBN : 9788184980745
  • Edition : 2
  • Publishing Year : OCTOBER 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 296
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : MEMOIR
Quantity
Buying Options:
  • Print Books:
BORN INTO THE WEALTHY, WESTERNIZED ELITE OF THE SHAH`S IRAN, SOUSAN AZADI GREW UP IN LUXURY. IN HER PRIVILEGED CIRCLES THE THUNDER OF APPROACHING REVOLUTION WAS EASY TO IGNORE. THEN THE SHAH FELL AND IN THE TERRIFYING NEW FUNDAMENTALIST REGIME OF AYATOLLAH KHOMEINI SOUSAN AND HER FRIENDS WERE BRANDED TAGHOUTI, DEVIL`S FOLLOWERS. THEY WERE HUNTED, THEIR CHILDREN BRAINWASHED, THEIR PROPERTY CONFISCATED. ALON WITH HER SON AFTER THE DEATH OF HER HUSBAND, SOUSAN BECAME AN EASY TARGET. SHE WAS FLUNG INTO JAIL, WHERE SHE WITNESSED TERRIBLE SUFFERING INFLICTED IN THE NAME OF `IMMODEST BEHAVIOUR` AND `INDECENCY`. ONLY WHEN SHE CAUGHT THE EYE OF A MULLAH, WHO CLEARLY EXPECTED SEXUAL FAVOURS IN RETURN, DID SHE ESCAPE. BUT REAL FREEDOM STILL LAY BEYOND THE SNOW-CAPPED ZAGROS MOUNTAINS, IN TURKEY - A HAZARDOUS ROUTE FOR A WOMAN AND CHILD TO TAKE. OUT OF IRAN GRIPS AND INVOLVES THE READER AS IT RECOUNTS ONE WOMAN`S COURAGEOUS STRUGGLE FOR SURVIVAL IN FANATICAL WAR-TORN IRAN.
शाहच्या इराणमध्ये, श्रीमंत, पाश्चात्याळलेल्या उच्चभ्रू कुटुंबात जन्मलेली सुझान अगदी संपन्नतेत वाढली. तिच्या विशेष वर्तुळामुळे, येणाऱ्या क्रांतीच्या पडघमांकडे दुर्लक्ष होणं अगदी साहजिक होतं. मग शाहचा पाडाव झाला. मग अयातुल्लाह खोमेनीच्या दडपणाऱ्या, नव्या मूलतत्त्ववादी राजवटीत सुझान आणि तिच्या मित्रमंडळींवर `ताघौती` – सैतानाचे अनुयायी – असा शिक्का बसला. लोक त्यांच्या मागावर राहिले. त्यांच्या मुलांचा बुद्धिभेद केला गेला. त्यांची मालमत्ता जप्त झाली. पतीच्या मृत्यूनंतर, मुलाबरोबर एकटी राहत असलेली सुझान हे फारच `सोपं` सावज होतं. तिला उचलून तुरुंगात टाकलं गेलं. तिथे तिनं `उठवळ वागणं` आणि `असभ्यपणा` यांच्या नावाखाली विलक्षण छळवाद सोसला. एका मुल्लाची नजर तिच्यावर पडल्यानंतर त्यानं सुटकेच्या बदल्यात स्पष्टपणे शरीरसुखाची अपेक्षा व्यक्त केली. नंतर तिची सुटका झाली. पण खरं स्वातंत्र्य हिमाच्छादित झाग्रोस पर्वताच्या पलीकडे तुर्कस्तानात होतं. जिथे पोहोचण्याचा मार्ग एक स्त्री व तिच्या लहानग्यासाठी अत्यंत खडतर होता. धर्मवेड्या, युद्धभग्न इराणमधील एका स्त्रीचा जगण्यासाठीचा धीरोदात्त लढा, `इराणमधून सुटका` वाचकांना खिळवून, गुंतवून टाकतो.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #IRANMADHUNSUTAKA #OUTOFIRAN #इराणमधूनसुटका #MEMOIRTRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #VIDULATOKEKAR #ANGELAFERRANTE #SOUSANAZADI "
Customer Reviews
  • Rating StarPranav Patil

    इराण मधून सुटका - सुझान आझादी , अँजेला फेरान्ते अनुवाद - विदुला टोकेकर (पुस्तक परिचय - प्रणव पाटील) इराण मधून सुटका हे पुस्तक म्हणजे गाजलेल्या `आउट आॕफ इराण ` या प्रसिध्द पुस्तकाचा अनुवाद आहे. या पुस्तकाचं मुखपृष्ठच इतकं सुंदर आे की हे पुस्तक हातात घेऊन सहज चाळता चाळता वाचायला लागलो . खरं तरं काही पुस्तकं अशी असतात की त्यात आपण येवढं गुंतून जातो की एखादा thriller चित्रपट पहावा इतक्या वेगाने कथा त्यात पळत असते. इराण मधून सुटका हे असंच पुस्तकं आहे. सुझान आझादी च्या आयुष्यावर बेतलेलं हे पुस्तक तीच्या लहानपणीच्या आठवणीने सुरु होतं. इराण मधे एका श्रीमंत कुटुंबात जन्मलेली सुझान तत्कालीन इराणमधल्या जमिनदारी प्रथे बद्दल आणि तीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सुरुवातीला सांगते. पुढे ती शाळेत असताना तीची आई आजारी पडून दगावते आणि तीचं आयुष्य वेगळ्याच वळणावर जातं. शिक्षणासाठी तीला अमेरिकेत तीच्या मामाकडे पाठवण्यात येतं पुढे कॉलेज मधे खास काही कामगिरी न केल्यामुळे तीची रवानगी पुन्हा इराण ला होते. तत्कालीन शहा पहलवी या राजाच्या राजेशाहीतल्या इराणचं वर्णन तीच्या आठवणींमधे येतं. नुकतंच इराणला तेल सापडलेलं असतं आणि त्या पैशाच्या ओघामधे अनेक बांधकाम व्यवसायीक कुटुंब प्रचंड श्रीमंत झालेली असतात त्यातलंचं सुझानचे कुटुंबीय. यातच एका अतिश्रीमंत बांधकाम व्यवसायीकाशी सुझानचं लग्न होतं. लग्ना नंतर सुझानने या अतिश्रीमंतीत तीने केलेली पैशाची उधळपट्टी ,तत्कालीन इराणी कुटुंब व्यवस्था,समाज याचं सविस्तर वर्णन येतं. काही दिवसातच सुझान ला एक लहान मुलगा होतो पण तीचा पती कॕन्सर मुळे दगावतो आणि पुन्हा एकदा सुझानच्या आयुष्यात वेगळं वळण येतं. परंतु नव-याची मागे असणारी गडगंज संपत्ती या सगळ्याला आधार ठरते आणि सुझान परत एकदा सुखासीन आयुष्याकडे वळते. याच काळात इराण मधे सतत होणारी शहाच्या राजवटीच्या विरोधातली अंदोलने इराणचं राजकीय क्षेत्र ढवळून काढत असतात. पॕरिस मधला खोमेनी आणि त्याचा वाढत चाललेला प्रभाव यातून इराण मधे अखेर क्रांती होते आणि राजेशाही संपुष्टात येऊन इस्लामी शासन व्यवस्था लागू होते. यात सगळ्यात शहाच्या राजवटीतले नवश्रीमंत क्रांती नंतर बळी पडू लागतात. सुझानला मात्र हे तात्पुरतं आहे असं वाटतं पण सगळीकडे हळूहळू परिस्थिती इतकी बिघडते की सुझानलाही या काळात काही दिवस तुरुंगाची हवा खावी लागते आणि तीचे डोळे उघडतात. देशभर धर्मवेड्या क्रांती नंतर स्त्रीयांचं आयुष्य पूर्णपणे बदलून जातं. कधीकाळी कमी कपड्यांमधे फिरणा-या स्त्रीयांची जागा बुरखा आणि चादोर घेतलेल्या महिला घेतात. या सगळ्यातून पळून देशाबाहेर जायचं सुझान ठरवते परंतु तीच्यासाठी आपल्या लहान मुलाला घेऊन निसटणं ही सोपी गोष्ट नव्हती. या सगळ्या निसटण्याच्या थरार नाट्याचे तीने लिहून ठेवलेले अनुभव वाचताना आपणही तीच आहोत इतका जिवंतपणा आहे. या सगळ्यातून निसटून जाऊन पुढे सुझान आणि तीच्या नातेवाईकांचं काय होतं हे वाचण्यासारखंच आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK MATRUBHOOMI 3-1-10

    इराणमधून सुटका’ हे सुझान आझादी आणि अँजेला पेâरान्ते यांचे स्वानुभवावर आधारित अनुभवकथन. विदुला टोकेकर यांनी केलेला हा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केला आहे. इराणमधील सामाजिक, धार्मिक संस्कृतीचा परामर्श या पुस्तकात घेतला आहे. शाहच्या इरणमध्ये श्रीमंत, पाश्चात्य संस्कृतीचा पगडा असलेल्या उच्चभ्रू कुटुंबात सुझानचा जन्म झाला. शाहचा पाडाव झाला. त्यानंतर आलेल्या खोमेनीच्या राजवटीने सुझान आणि तिच्या कुटुंबिय, आप्तेष्टांवर सैतानाचे अनुयायी असा शिक्का मारला. त्यांची मालमत्ता जप्त झाली. पतीचा मृत्यू आणि त्यानंतर मुलांमध्ये केलेला बुद्धीभेद यामुळे समाजाला सुझान हे सोपे सावज झाले होते. तिला तुरुंगात डांबण्यात आले. तिच्या वर्तनावर आक्षेप घेऊन तिचा छळ करण्यात आला. हा सगळा छळ तिने धीरोदत्तपणे सहन केला आणि इराणमधून सुटका हे आत्मकथन लिहिले. हे आत्मकथन वाचकांना गुंगवून ठेवते. झपाटून टाकते. सुझान आझादी यांचे जीवन अनेक चढ-उतारांनी बनलेले आहे. गर्भश्रीमंत माता-पित्यांच्या पोटी जन्माला आलेल्या सुझान यांचा विवाहही अशाच गर्भश्रीमंत व्यक्तीबरोबर झाला. त्यांचे वैवाहिक आयुष्य अत्यल्प ठरले. पतीच्या निधनानंतर सारसरच्या मंडळींचा जाचहाट त्यांना सहन करावा लागला. अर्थात, आर्थिक संपन्नतेच्या बाबतीत त्यांना वैâद होईपर्यंत कोणतीच विवंचना त्यांना भासली नाही. मात्र त्यानंतर इराण सोडून त्यांना परदेशात अत्यंत सामान्य जीवन जगावे लागले. एकेकाळी हजारो-लाखो डॉलर्स मुक्तहस्ते उधळणाऱ्या आझादींवर मुलासोबत सामान्य जीवन जगण्याची वेळ आली. लेखिकेने हे सर्व चढ-उतार आयातुल्ला फोमिनी यांच्या दहशतवादी राजवटीचे चित्र, नोकरशाहीची दादागिरी, भ्रष्टाचार यांचे वर्णन वास्तवदर्शी केले आहे. कथानकात वाचक अक्षरशः गुंग होऊन जातो आणि आझादीच्या जीवनपटात गुंतून जातो. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BACKSTAGE
BACKSTAGE by MONTEK SINGH AHLUWALIA Rating Star
महाराष्ट्र टाईम्स.. ६.९.२०२६

भारताच्या आर्थिक सुधारणांवर अनेक पुस्तके आजवर प्रसिद्ध झाली आहेत. काहींमध्ये आकडेवारीचे जंजाळ असते, काही धोरणांचे विश्लेषण करतात, तर काही विशिष्ट नेत्यांची जाहिरातबाजी करतात. मात्र माँटेकसिंग अहलुवालिया यांचे `बॅकस्टेज : भारताच्या उच्च वाढीच्या र्षांमागची कहाणी` हे पुस्तक या सगळ्यांपेक्षा वेगळे ठरते. कारण हे पुस्तक भारताच्या आर्थिक परिवर्तनाची कथा बाहेरून पाहणाऱ्या अभ्यासकाने नव्हे, तर त्या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी उभ्या असलेल्या व्यक्तीने सांगितलेली आहे. जी. बी. देशमुख यांनी मूळ इंग्रजी पुस्तकाचा केलेला मराठी अनुवाद सरस उतरला आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच माँटेकसिंग एक गोष्ट स्पष्ट करतात, ती म्हणजे, हे पुस्तक आत्मकथन नाही. आत्मप्रौढी मिरवण्यासाठी नव्हे, तर भारताच्या आर्थिक सुधारणांचा प्रवास समजावून सांगण्यासाठी अहलुवालिया हे पुस्तक लिहितात. विषयाच्या अनुषंगाने पुस्तकात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील संदर्भ येतात, पण ते आर्थिक आणि राजकीय घडामोडी समजावून सांगण्यापुरतेच. सिकंदराबादमधील मध्यमवर्गीय वातावरणातून सुरू झालेला त्यांचा प्रवास दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ऑक्सफर्ड, जागतिक बँक, अर्थ मंत्रालय, योजना आयोग आणि अखेर देशाच्या सर्वोच्च आर्थिक धोरणनिर्मितीच्या केंद्रापर्यंत पोहोचतो. हा प्रवास वाचताना स्वतंत्र भारताच्या आर्थिक विचारसरणीचा विकासक्रम उलगडत जातो. पुस्तकाचे केंद्रस्थान अर्थातच १९९१च्या आर्थिक संकटाचे आहे. त्यावेळी देशाकडे काही आठवड्यांच्या आयातीपुरताही डॉलर शिल्लक नव्हता. सोन्याचा साठा गहाण ठेवण्याची वेळ आली होती आणि आर्थिक दिवाळखोरीची शक्यता प्रत्यक्ष समोर उभी होती. अशावेळी सरकारने घेतलेले निर्णय, त्यामागील तणाव, राजकीय अनिश्चितता आणि प्रशासकीय संघर्ष यांचे वर्णन पुस्तकात अत्यंत जिवंतपणे आले आहे. नाणेनिधी किंवा जागतिक बँकेच्या दबावामुळे या सुधारणा झाल्याची धारणा माँटेकसिंग ठामपणे नाकारतात. हे पुस्तक आर्थिक सुधारणांना कोणत्याही प्रकारच्या विचारधारेच्या चष्म्यातून पाहत नाही. लेखक ना मुक्त बाजाराचे अंधसमर्थन करतात, ना राज्यनियंत्रित व्यवस्थेचे. त्यांचा दृष्टिकोन व्यवहारवादी आहे. भारतासारख्या लोकशाही देशात सुधारणा एका झटक्यात होत नाहीत; त्या राजकीय वास्तवाशी जुळवून घेत हळूहळू पुढे सरकतात, हे ते वारंवार. अधोरेखित करतात. पुस्तकात अनेक ठिकाणी `सुधारणा` हा आर्थिक नव्हे, तर राजकीय प्रक्रियेचाही विषय आहे, हे प्रकर्षाने जाणवते. अहलुवालिया या पुस्तकात अनेक व्यक्ती, अधिकारी, अर्थतज्ज्ञ आणि राजकीय नेत्यांच्या योगदानाचा उल्लेख करतात. नरसिंह राव, मनमोहन सिंग, पी. चिदंबरम, यशवंत सिन्हा, जसवंत सिंह यांच्यापासून ते विविध सनदी अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांची भूमिका ते प्रामाणिकपणे नोंदवतात. योजना आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम करताना अहलुवालिया यांनी जवळून अनुभवलेला काळ येथे उभा राहतो. सन २००४ ते २०११ या काळातील उच्च आर्थिक वाढ, दारिद्रयनिर्मूलनातील प्रगती, पायाभूत सुविधांमध्ये झालेली वाढ आणि ग्रामीण विकासाच्या कार्यक्रमांचे मूल्यमापन ते करतात. विशेषतः भारताने सलग अनेक वर्षे सात ते आठ टक्क्यांच्या दरम्यान वाढ नोंदवली, ती केवळ जागतिक परिस्थितीचा. परिणाम नव्हती; १९९० नंतरच्या सुधारणांनी घातलेल्या पायावर उभे राहून ती शक्य झाली, हा त्यांचा युक्तिवाद पटण्याजोगा वाटतो. मात्र पुस्तकाचे खरे सामर्थ्य यशोगाथेत नाही, तर आत्मपरीक्षणात आहे. यूपीए-२ दरम्यान निर्माण झालेली निर्णयप्रक्रियेतील अडचण, गुंतवणुकीतील वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक मंदी, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे निर्माण झालेले वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक थेट भाष्य करतात. अनुवादक जी. बी. देशमुख यांनी मूळ पुस्तकातील आर्थिक संकल्पना सहज आणि प्रवाही मराठीत मांडल्या आहेत. यात कृत्रिमता जाणवत नाही. आर्थिक विषयावरील पुस्तक असूनही भाषा जड वाटत नाही. आर्थिक सुधारणांच्या व्यापक सामाजिक परिणामांचा स्वतंत्र आणि सविस्तर ऊहापोह येथे अपेक्षेपेक्षा कमी आढळतो. मात्र, हे पुस्तक ज्या उद्देशाने लिहिले गेले आहे त्या उद्देशात ते अत्यंत यशस्वी ठरते. `बॅकस्टेज` हे केवळ पुस्तक नाही; ते भारताच्या आर्थिक परिवर्तनाचा प्रत्यक्षदर्शी दस्तऐवज आहे. १९९१ नंतर भारताने घेतलेल्या वळणाचा अर्थ समजून घ्यायचा असेल, उच्च वाढीच्या वर्षामागील वास्तविक कथा जाणून घ्यायची असेल आणि धोरणनिर्मितीच्या पडद्यामागे काय घडत असते याचा मागोवा घ्यायचा असेल, तर हे पुस्तक अभ्यासणे आवश्यक ठरते. भारतीय अर्थव्यवस्थेच्या आर्थिक सुधारणांचा इतिहास आणि त्यांचे परिणाम समजून घेण्यासाठी हे पुस्तक एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ म्हणून ओळखले जाऊ शकते. मराठीत उपलब्ध असलेला हा अनुवाद त्या दृष्टीने विशेष स्वागतार्ह आहे. ...Read more

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
Dinesh

This is a different planet. This is a different world. And this is a truly different book. I loved it. You should also buy it and read it. I’m sure you will love it too. Hachyukisunaski is a fantastic Book.