* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SWAYAMPAK GHARATIL NAVA MITRA : MICROWAVE OVEN
  • Availability : Available
  • ISBN : 9788177662580
  • Edition : 11
  • Publishing Year : NOVEMBER 2001
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 104
  • Language : MARATHI
  • Category : COOKERY, FOOD & DRINK
  • Available in Combos :RECIPES COMBO SET - 4 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
MOST OF THE LADIES HAVE TO MANAGE THEIR OFFICE, BUSINESS, AND MANY OTHER THINGS ALONG WITH THEIR HOUSEHOLD DUTIES AND COOKING, THE INEVITABLE PART OF A WOMAN`S LIFE. BECAUSE OF SHORTAGE OF TIME, SHE ALWAYS THINKS OF WAYS TO SAVE HER TIME. SHE HAS TO CONSIDER A LOT OF THINGS WHILE PLANNING HER COOKING. THE TIME, THE LIKINGS OF ALL, THE NUTRITIOUS VALUES OF THE FOOD, THE TASTE, THE AGE GROUP ARE MANY SUCH FACTORS ABOUT WHICH SHE HAS TO THINK. MICROWAVE IS THE WONDERFUL DEVICE TO MAKE COOKING EFFORTLESS. IT IS NO WONDER THAT MANY OF THE WOMEN HAVE ADMITTED THAT MICROWAVE SAVES TIME AND HELPS IN COOKING TASTY AND DELICIOUS DISHES, BUT EVEN THE MEN HAVE ACCEPTED THIS AFTER TRYING IT. THIS BOOK INCLUDES MANY VEGETARIAN AND NON-VEGETARIAN DISHES. THERE ARE SIMPLE FOOD ITEMS WHICH WE COOK EVERY DAY AND THERE ARE SPECIAL FOOD ITEMS FOR SPECIAL PEOPLE, FOR SPECIAL OCCASIONS FROM VARIOUS STATES AND COUNTRIES. THE MAIN FEATURE OF THIS BOOK IS THE AUTHOR HERE EXPLAINS US HOW TO CHOOSE A MICROWAVE, HOW TO USE IT, AND WHAT PRECAUTIONS SHOULD WE FOLLOW WHILE USING IT.
आज बहुसंख्य स्त्रियांना आपल्या नोकरी-उद्योग-व्यवसायाचा व्याप सांभाळतच घरादाराकडे बघावं लागतं. त्यामुळे साहजिकच कमीत कमी वेळात सर्वांना आवडणारे, स्वादिष्ट आणि घरातील सर्व वयोमानाच्या व्यक्तींच्या आरोग्याला पोषक असे पदार्थ कसे बनवता येतील, याचा त्यांना विचार करावा लागतो. यासाठी या दशकात ज्या सुखसोयी त्यांना लाभल्या, त्यांतील `मायक्रोवेव्ह ओव्हन` ही एक महत्त्वाची सोय आहे, असं म्हणायला हरकत नाही. ‘झटपट, स्वादिष्ट व आरोग्यास पोषक जेवण म्हणजेच मायक्रोवेव्ह कुकिंग’ असा निर्वाळा आज स्त्रियांनी तर दिला आहेच, पण स्वत: काहीतरी खास `पकवून` घरातल्यांना ‘खिलवणा-या’ चोखंदळ पुरुषांनाही ‘मायक्रोवेव्ह’ हे वरदान ठरले आहे. या पुस्तकात मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये करायच्या अनेक शाकाहारी व मांसाहारी पाककृती दिलेल्या आहेत. त्यात आपले रोजचे साधे पदार्थ आहेत, तसेच वेगवेगळ्या प्रांतातील, वेगवेगळ्या देशातील खास पदार्थही आहेत. मायक्रोवेव्ह ओव्हन कसा निवडावा, तो वापरताना कोणती काळजी घ्यावी, याविषयी लेखिकेनं दिलेल्या सविस्तर सूचना, हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य ठरावं.

No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #MARATHI RECIPE BOOK #KAMALABAIOGALE #RIMALCHAMGEDE #RAJESHREENAVARE #CAKES #SWAYAPAKGHARATILNAVAMITRA #APARNAPARCHURE
Customer Reviews
  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 21-04-2002

    अन्नपूर्णा या पाकक्रियांच्या पुस्तकामुळे गाजलेल्या मंगला बर्वे यांच्या कन्या राजश्री नवरे यांनीही आईचा वारसा पुढे चालवण्याचा निश्चय करून मायक्रोवेव्ह कुकिंगची माहिती देणारे मायक्रोवेव्ह ओव्हन हे पुस्तक तयार केले आहे. लग्नानंतर यजमानाच्या वेगळ्याच दुनयेत भरपूर हायफाय प्रयोग करता आले; आणि चवीने खाण्यापिण्याची चटक लागली. मायक्रोवेव्ह कुकिंग हे केवळ हायफाय वर्गासाठीच असते, हा भ्रम दूर व्हावा, सर्वसामान्य कुटुंबालाही त्यांचा नानाप्रकारे लाभ होऊ शकतो असे त्यांना वाटते. मायक्रोवेव्हमुळे वेळ वाचतो पदार्थातील अन्नसत्वे कायम राहतात, सुरक्षितता वाटते, विजेची बचत होते. सूप्स, चटण्या, कोशिंबिरी, स्नॅक्स (ढोकळा, सुरळीच्या वड्या, उपमा, पोहे, आम्लेट, पिझ्झा, साबुदाणा खिचडी) भाताचे प्रकार (जिरा राईस, पुलाव, खिचडी पिलाफ मशरूम काबुली चणे पुलाव, चिकन बिर्याणी, अननस भात), भाज्या (मखानी पनीर, मसालेदार भेंडी, जालफ्रेजी, भोपळी मिरचीचे कायरस, वालाचे बिरडे, सुखे आलू, आलूगोभी) सार, डाळ, कढी गोड पदार्थ, (बासुंदी, मोदक, गाजर हलवा, स्पाँज पुडिंग, क्रीमी कॅरमल, ड्रायफूट खीर) वगैरे प्रकारच्या डिशेस करण्याची माहितीही या पुस्तकात आहे. त्यामुळे मायक्रोवेव्ह ओव्हन घरी असावा प्रत्येक सुगरणीला वाटेल. ...Read more

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    पाककृतींचे अनोखे संग्रह… ‘स्वयंपाकघरातील नवा मित्र - मायक्रोवेव्ह ओव्हन’ हे राजश्री नवरे यांचे आगळेवेगळे पुस्तक ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’ ने नुकतेच प्रकाशित केले. ‘मायक्रोवेव्ह ओव्हन’ मध्ये करायच्या अगदी रोजच्या साध्या पाककृतींपासून वेगवेगळ्या प्रांतांील व देशांतील खास पाककृतींची माहिती तर यात आहेच, शिवाय ‘मायक्रोवेव्ह ओव्हन’ कसा निवडावा, इथपासून तो वापरताना घ्यावयाची काळजी व त्याच्या निरनिराळ्या पद्धतीने करावयाचा वापर, याचे सचित्र विश्लेषण लेखिकेने या पुस्तकातून केले आहे. जयश्री नवरे यांच्या आई व सिद्धहस्त पाककलातज्ज्ञ मंगला बर्वे यांच्या प्रेरणेने त्यांनी लिहिलेले हे पुस्तक गृहिणींना मोलाचे सहकार्य करणारे आहे. मायक्रोवेव्ह कुकिंगचा वारसा व अनुभव, वेगवेगळ्या देशांमध्ये फिरल्यामुळे तेथील नवनवीन पाककृतींचा झालेला परिचय या सर्वांचा लेखिकेने या पुस्तकासाठी उपयोग करून घेतला आहे. पुस्तकाचा हेतू ‘हाय-फाय’ पदार्थ हा भ्रम व त्याची भीती दूर व्हावी, हाच असल्याचे दिसते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
श्रीपाद ब्रह्मे

नुकतंच असंच वेगानं वाचून संपवलेलं दुसरं पुस्तक म्हणजे सुनंदा अमरापूरकर यांचं ‘खुलभर दुधाची कहाणी’. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या त्या पत्नी. अर्थात ही काही त्यांची एकमेव ओळख नव्हे. एक चांगल्या अभिनेत्री, उत्तम अनुवादक म्हणूनही त्या ्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘खुलभर दुधाची कहाणी’ या आत्मचरित्रवजा लेखनातून त्यांच्या जगण्याचा व्यापक पट अतिशय प्रांजळपणे उलगडला आहे. मला हे पुस्तक विशेष भावण्याचं कारण म्हणजे त्यात आलेलं नगरचं वर्णन. मी स्वत: नगरला फार प्रदीर्घ काळ राहिलो नसलो, तरी ते शेवटी माझ्या जिल्ह्याचं गाव. आणि वयाच्या १३ ते २२ अशा महत्त्वाच्या कुमार व तरुण वयातला माझा तिथला रहिवास असल्यानं नगरच्या आठवणी विसरणं शक्य नाही. सुनंदाताई माझ्या आईच्या वयाच्या. त्यामुळं त्यांच्या लहानपणच्या आठवणी जवळपास माझ्या जन्माच्या २०-२५ वर्षं आधीच्या. असं असलं तरी मी त्या वर्णनाशी, त्या काळातल्या नगरशीही रिलेट होऊ शकलो, याचं कारण मुळात गेल्या शतकात बदलांचा वेग अतिशय संथ होता. नगरसारख्या निम्नशहरी भागात तर तो आणखी संथ होता. त्यामुळं एकूण समाजजीवनात १९६० ते १९९० या तीस वर्षांत तपशिलातले फरक सोडले, तर फार मोठा बदल झाला नव्हता. सुनंदाताई माहेरच्या करमरकर. त्यांचं आजोळ‌ सातारा असलं, तरी त्या जन्मापासून नगरमध्येच लहानाच्या मोठ्या झालेल्या. अगदी पक्क्या ‘नगरी’ म्हणाव्यात अशा. ( आजही त्या स्वत:ला अभिमानानं ‘नगरकर’च म्हणवून घेतात.) सुनंदाताईंचे वडील त्या दहा वर्षांच्या असतानाच गेले. त्यांना मामांचा आधार होता, पण आईनंच लहानाचं मोठं केलं. तेव्हाचं त्यांचं निम्न मध्यमवर्गीय जगणं, नगरमधले वाडे, तिथलं समाजजीवन, तिथल्या शाळा, शिक्षक, नगरमधील दुकानं, दवाखाने, तिथल्या गल्ल्या, बाजार हे सगळं सगळं सुनंदाताई अतिशय तपशीलवार उभं करतात. नगरसारख्या मध्यम शहरात वाढलेल्या महाराष्ट्रातील कुठल्याही शहरातील त्या काळातील व्यक्तीला अतिशय सहज रिलेट होईल, असं त्यांचं हे जगणं होतं. त्यात सुनंदाताईंचं लेखन अतिशय सहज, सोपं आणि प्रांजळ असल्यामुळं ते आपल्याला अगदी भिडतं. एका प्रख्यात अभिनेत्याची पत्नी असल्यानं त्यांचं जीवन इतर सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा वेगळं झालं असेल, अशी आपली अपेक्षा असते. सुनंदाताईंच्या लेखनातून या ‘वेगळ्या जीवना’ची काही तरी झलक मिळेल, अशीही आपली एक भूमिका तयार झालेली असते. सदाशिव अमरापूरकरांसारख्या मनस्वी अभिनेत्याशी लग्न झाल्यानंतर सुनंदाताईंचं जगणं बदललंही; मात्र ते वेगळ्या पद्धतीनं. सदाशिव अमरापूरकर ऊर्फ नगरकरांचा लाडका बंडू त्यांना नगरमध्ये शाळेपासून कसा भेटला, नंतर कॉलेजमध्ये दोघांनी एकाच ग्रुपमधील नाटकं कशी सादर केली, त्यात अगदी नकळतपणे त्यांचं प्रेम कसं जमलं आणि नंतर नगर सोडून त्या पतीच्या कारकिर्दीसाठी मुंबईत कशा आल्या हा सर्व नाट्यमय प्रवास सुनंदाताई अतिशय तन्मयतेनं मांडतात. अमरापूरकर मंडळींच्या घराविषयीचे तपशील त्यात येतात. अमरापूरकरांचे वडील दत्तोपंत हे नगरमधलं मोठं प्रस्थ. श्रीमंत घराणं. मोठा वाडा, नोकरचाकर वगैरे. त्या तुलनेत सुनंदाताईंची माहेरची परिस्थिती जेमतेम म्हणावी अशी. अशा परिस्थितीत हे लग्न झालं आणि त्या अमरापूरकरांची सून झाल्या, इथपर्यंत पुस्तकाचा निम्मा प्रवास (मध्यंतरच) होतो. पुढल्या दोनशे पानांत आपल्याला खऱ्या अर्थानं सदाशिव अमरापूरकर हे काय व्यक्तिमत्त्व होतं, हे उलगडत जातं. अमरापूरकरांनी शेवटपर्यंत त्यांची मध्यमवर्गीय राहणी व मध्यमवर्गीय मूल्यं सोडली नाहीत. ‘अर्धसत्य’सारख्या सिनेमामुळं एका रात्रीतून ते भारतभरात प्रसिद्ध झाले. या एका ओळखीमुळं अमरापूरकरांचं जीवन पूर्ण बदलून गेलं. तोपर्यंत असलेली आर्थिक ओढगस्तीही संपली. हिंदी चित्रपटसृष्टीत अगदी स्वप्नवत अशा रीतीनं ते मोठे स्टार झाले. एकापाठोपाठ एक खलनायकी भूमिका त्यांच्याकडं येऊ लागल्या. पैसा येऊ लागला. अशा परिस्थितीत एक मध्यमवर्गीय कुटुंब या सगळ्या धबधब्याला कसं तोंड देतं आणि आपली मूल्यं कायम जपत राहतं, हे सुनंदाताईंनी फार हृद्यपणे लिहिलं आहे. सुनंदाताईंनी अनेक वर्षं एलआयसीत नोकरी केली. पतीचं अस्थिर क्षेत्र असल्यानं त्यांनी सुरुवातीला नोकरी केलीच; पण नवरा हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार व्हिलन झाल्यावरही त्यांनी ही नोकरी सोडली नाही. त्यांच्या तिन्ही मुलींवर त्यांनी उत्तम संस्कार केले. एका सिनेमाच्या प्रीमियरनंतर हे सगळे कुटुंबीय कसे घरी जाऊन पिठलं-भाकरीचं जेवण तयार करून जेवले हे त्यांनी एका प्रसंगात अतिशय खेळकरपणे सांगितलं आहे. अमरापूरकरांचं नाटकवेड, भौतिक सुखांविषयीची काहीशी विरक्त वृत्ती, त्यांचा मित्रांचा गोतावळा, अनेक माणसांचा घरात राबता असा एकूण ‘देशस्थी’ कारभार यावर सुनंदाताई कधी गमतीत, तर कधी काहीसं वैतागून टिप्पणी करतात. अर्थात त्यांचं सदाशिव अमरापूरकरांवर अतिशय प्रेम होतं आणि त्यांनी हे शेवटपर्यंत उत्तम निभावलं. अशा आत्मचरित्रांत अनेकदा ‘आहे मनोहर तरी... गमते उदास’ असा सूर लागण्याचा धोका असतो. सुनंदाताईंच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे, एखादा अपवाद वगळता, त्यांच्या या संपूर्ण पुस्तकात असा रडवा सूर कधीही लागलेला नाही. आपल्याला जे काही मिळालं, ते आपणच निवडलं आहे आणि त्यामुळं त्याविषयी तक्रार करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, अशी एक भूमिका त्यांनी घेतलेली दिसते. त्यांच्या या पुस्तकातून विसाव्या शतकातील मध्यमवर्गीय ब्राह्मण घरातील एका तरुणीच्या आशा-आकांक्षांचा, आयुष्यानं दिलेल्या आश्चर्याच्या धक्क्यांचा आणि त्याला सामोरं जाण्यातील धीट दिलदारपणाचा लोभस प्रवास दिसतो. आपली मध्यमवर्गीय मूल्यं जपत, प्रामाणिकपणे व उमेदीनं आयुष्य जगणाऱ्या अनेक महिलांना या पुस्तकात आपल्या जगण्याचं प्रतिबिंब सापडेल. तेच या ‘खुलभर दुधाच्या कहाणी’चं यश आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
प्रभाकर गावंडे, अमरावती

मी विकत घेऊन वाचले आहे हे पुस्तकं, चांगले आहे, नवीन माहिती वाचायला मिळाली.