RAJSHREE NAWARE

About Author


RAJSHREE NAVARE IS A CELEBRITY IN THE FIELD OF MICROWAVE COOKING. FAMOUS WRITER SHRI. RAJSHREE WAS BORN IN SHIVAJI PARK, MUMBAI, THE DAUGHTER OF ACHYUT BARVE AND MANGALA BARVE, AUTHOR OF ANNAPURNA. HE DID HIS SCHOOLING AT CANOSA CONVENT, MAHIM. HE GRADUATED FROM PODDAR COLLEGE, MATUNGA. HIS MOTHER INTRODUCED HIM TO COOKING AT A VERY YOUNG AGE.

राजश्री नवरे या मायक्रोवेव्ह कुकिंग या क्षेत्रातील ख्यातनाम व्यक्ती आहेत. प्रसिद्ध लेखक श्री. अच्युत बर्वे आणि अन्नपूर्णा च्या लेखिका मंगला बर्वे यांच्या कन्या राजश्री यांचा जन्म शिवाजी पार्क, मुंबई येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण कॅनोसा कॉन्व्हेंट , माहीम येथे झाले. पोद्दार कॉलेज, माटुंगा येथून त्यांनी पदवी संपादन केली. खूप लहान वयातच त्यांच्या आईने पाककलेशी त्यांचा परिचय करून दिला. त्यांनी मात्र लग्नानंतरच यात रुची दाखवली. आखाती देशात बराच काळ वास्तव्य आणि इतर अनेक देशांत भ्रमंती यामुळे स्वयंपाकाची अत्याधुनिक साधने वापरून खाद्यपदार्थ बनवण्याचा त्यांना अनुभव मिळाला. हळूहळू मायक्रोवेव्ह कुकिंग हा त्यांचा अत्यंत आवडीचा छंद बनला. अनेक प्रसिद्ध शेफ्सकडून त्यांनी पाककलेचे धडे घेतले. शिवाय आई आणि सासूबाईंकडूनही त्यांना मोलाचे मार्गदर्शन मिळाले. २००० साली भारतात अत्यंत नवीन असलेल्या मायक्रोवेव्ह कुकिंगची प्रात्यक्षिके दाखवणाऱ्या काही मोजक्या व्यक्तींपैकी त्या एक होत्या. अनेक नामांकित कंपन्यांसाठीही त्यांनी प्रात्यक्षिके केली. त्यांची सूचना देण्याची शैली आणि मायक्रोवेव्हमध्ये करता येतील अशा पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थांच्या सोप्या कृती लोकांना इतक्या भावल्या, की दोन वर्षांच्या आतच त्यांनी पन्नासहून अधिक ठिकाणी प्रात्यक्षिके केली. भारतीय आणि परदेशी पदार्थ शिकवण्याचे वर्ग त्या चालवतात. मुंबईतील अनेक पाककृती स्पर्धांच्या परीक्षक म्हणून त्यांनी काम केले आहे. २००५ साली गोदरेज वं पनीच्या मायक्रोवेव्ह ओव्हन्सबरोबर दिल्या जाणाऱ्या पुस्तकाचे संकलन आणि संपादन करण्याची संधी त्यांना मिळाली. नियतकालिके आणि वर्तमानपत्रांमधून त्यांचे अनेक लेख प्रसिद्ध झाले आहेत. रेडिओवरही मायक्रोवेव्ह कुकिंग या विषयावरील त्यांचे कार्यक्रम प्रसारित झाले आहेत.
Sort by
Search by Discount
Show per page
Items 1 to 1 of 1 total
48 %
OFF
SWAYAMPAK GHARATIL NAVA MITRA : MICR... Rating Star
Add To Cart INR 120 INR 62

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
नरेंद्र तायडे, अमरावती

*दुर्दम्य* पुस्तक आज हाती घेतलं, शेवट कधी झाला कळलंच नाही. अक्षरशः डोळे पाणावले कधी गदगद हसुन तर कधी गहिवरून *खरंच* दहा करोडात एक होता एकनाथन अप्रतिम शब्दप्रपंचाने घडले व्यक्तीदर्शन... ...... नरेंद्र तायडे, अमरावती

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
मिना हरीश सहारे, नागपूर.

कुठल्याही पुस्तकावर अभिप्राय देण्याची माझी ही पहिलीच वेळ असली तरी `दुर्दम्य` पुस्तक मनाला भिडल्यामुळे त्यावर लिहीणे मला आवश्यक वाटले. मी पण चरित्रनायक एकनाथनच्या विभागात सेवा दिली आहे. आमच्या सारख्यांना एकनाथन एक कडक तानाशाह ऑफिसर होता इतकंच माित होतं. पण लेखकाच्या नजरेतून जेव्हा त्याचे चरित्र वाचले तेव्हा तो खरा काय होता हे समजले. चरित्र वाचताना पूर्ण होई पर्यंत उत्सुकता कायम होती. कार्यालयीन जीवनातला कालखंड डोळ्यासमोर जिवंत होतो. वाचकाला खिळवून ठेवण्याचं कसब लेखकाच्या लिखाणात आहे.एकनाथन सारख्या विक्षिप्त, हेकेखोर व्यक्तीचा व लेखकाचा नक्कीच काहीतरी ऋणानुबंध असला पाहिजे. निवृती नंतरफिरून तीनदा लेखकाच्याच शहरात येणे हा योगायोग वाटत नाही. कथानकातील काही भागातील प्रसंग व घटना मजेशीर, गमतीदार वाटतात. कथेचा शेवट मनाला भिडून जातो. एका करारी, खंबीर माणसाचा अंत वाचताना मन भरून आले. पुस्तक पूर्ण केल्यावर शेवटी एक विचार आला की त्याचं मरण सुखदच झाले असे म्हणावे लागेल कारण एकाकीपणा जरी त्यांनी स्वतः निवडला होता तरी मृत्यूच्या बाबतीत भाग्याने त्यांची साथ दिली होती. त्यांच्या सारखे ताठ कणा व दुर्दम्य व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तिला परावलंबी, असहाय आयुष्य कधीच रूचलं नसतं आणि त्या नंतर आलेल्या करोना काळात त्यांचे काय हाल झाले असते त्याची कल्पनाच न केलेली बरी. कथानक वाचकाच्या मनाला भिडले यातच लेखकाचे यश आहे. पुढील लिखाणा करता शुभेच्छा. बाकी माझ्याकडून पुस्तकाचा दर्जा - खूप छान, बढिया आणि सुपर्ब... ...Read more