* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: RUCHIRA BHAG -1
 • Availability : Available
 • ISBN : 9788177666434
 • Edition : 53
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 376
 • Language : MARATHI
 • Category : COOKERY, FOOD & DRINK
 • Available in Combos :RECIPES COMBO BOOKS
  RUCHIRA COMBO SET OF 2 BOOKS
Quantity
WHEN RUCHIRA WAS PUBLISHED THERE WERE MANY WHO HAD SENT THEIR VIEWS ABOUT THIS BOOK; ONE OF THE BOOK HAD DESCRIBED KAMALABAI AS THE MOTHER INLAW WITH 1,25,000 DAUGTERSINLAW, THIS IS TRUE AS ALREADY SO MANY COPIES OF RUCHIRA HAVE BEEN SOLD. THROUGH THIS BOOK, SHE HAS TURNED THE NEWLY MARRIED GIRLS INTO EXPERT COOKS. THIS IS THE ONLY BOOK WHICH HAVE BEEN SOLD IN LAC. KAMLABAI WAS BORN AND BROUGHT UP IN VILLAGE KUNDAL IN DANDEKAR FAMILY. SHE STUDIED TILL 4TH STANDARD. SHE WAS MARRIED INTO OGALE FAMILY AT SANGLI. SHE STARTED TAKING LESSONS IN COOKERY UNDER THE ABLE GUIDANCE OF HER MOTHERIN LAW. SHE ALWAYS NURTURED THE ATTITUDE TO BE A PERFECTIONIST WHILE LEARNING A NEW DISH. SHE NEVER ALLOWED HER MORALE TO BE DOWN DURING THE PROCESS OF COOKING AND MASTERING A FOOD ITEM. SHE DID NOT JUST CONCENTRATE ON COOKING, SHE GAVE EQUAL IMPORTANCE TO PRESENTING THE ITEM WITH STYLE. HER HUSBAND`S JOB TOOK HER TO MUMBAI WHERE SHE SETTLED DOWN. MUMBAI GAVE A WIDE SCOPE TO HER COOKING SKILLS. SHE PARTICIPATED IN MANY COMPETITIONS AND WON MANY AWARDS FOR BEST DISHES AND BEST PRESENTATION. THIS GAVE HER A BOOST. SHE STARTED COOKERY CLASSES. SHE CONDUCTED CLASSES AT VARIOUS PLACES IN MAHARASTHRA. MANY LADIES WERE BENEFITTED BY HER CLASSES. SHE WAS A GUIDE AT THE S.N.D.T. UNIVERSITY IN MUMBAI. SHE CROSSED THE BOUNDARIES OF THIS NATION, SHE REACHED AUSTRALIA, THERE ALSO SHE CONDUCTED HER CLASSES. SHE WAS FELICITATED AT `ONE ARTIST: ONE EVENING` IN MUMBAI, ALONG WITH OTHER 100 UNIQUE PERSONALITIES. SHE HAS COME INTO DIRECT CONTACT THROUGH RADIO AND TELEVISION WITH MANY HOUSEWIVES. `RUCHIRA` HAS MADE HER FAMILIAR IN EVERY HOUSEHOLD. THE MARATHI PUSTAK PARISHAD HAS FELICITATED HER FOR THE TREMENDOUS SALE OF THIS BOOK. RUCHIRA IS THE HIGHEST PEAK OF HER EXPERIENCE, KNOWLEDGE AND STUDIES.
`रुचिरा` या पुस्तकावर प्रसिद्ध झालेल्या एका अभिप्रायामध्ये श्रीमती कमलाबाईंचे वर्णन ` सव्वा लाख सुनांची सासू` असे केलेले होते आणि ते सार्थही आहे. १,२५,००० पेक्षा अधिक प्रतींचा विक्रमी खप झालेल्या या एकमेव मराठी ग्रंथाच्या लेखिका यांनी खरोखरीच सव्वा लाख महिलांना सुगरण बनवलेले आहे, हे आता प्रकट सत्य आहे. कमलाबाईंचे बालपण दांडेकर घराण्यात कुंडलसारख्या खेडेगावात गेले. त्यांचे शिक्षण जेमतेम प्राथमिक इयत्ता चौथीपर्यंत झाले. विवाह होऊन त्या सांगलीच्या ओगले यांच्या घरात आल्या. आपल्या पाककलानिपुण सासूबाईकडून त्यांनी पाककलेचे धडे घेण्यास सुरुवात केली. नवनवीन पदार्थ शिकवावेत, एखादा पदार्थ बिघडला, मनाजोगता झाला नाही, तर खंत करत न बसता पुन्हापुन्हा तो अधिक चांगल्या रीतीने करून पाहावा, अशी वृत्ती कमलाबाईनी बाळगली पाककलेच्या आवडीबरोबरच त्यांना इतर कला अवगत होत्या. त्यामुळे चवदार पदार्थाना रंगतदार सजावटीची आणि कलात्मक मांडणीची जोड मिळाली.

Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #MARATHI RECIPE BOOK #KAMALABAIOGALE
Customer Reviews
 • Rating StarEKATA - APRIL 2019

  स्वयंपाक घरातील नंदादीप : रुचिरा... जातीच्या सुंदरींना काहीही शोभते. पण मूळच्या सौंदर्याबरोबरच चांगल्या वस्त्रप्रावरणांची आणि अलंकाराची जोड मिळाली तर सौंदर्यात अधिक भर पडते. हे जसं खरं आहे. त्याचप्रमाणे ‘स्वयंपाकघर’ महिलेचं हक्काचं स्थान तेही शास्त्शुद्ध असलं पाहिजे. ‘सगळ्या पदार्थांनी, सोयींनी युक्त असावं.’ ही वाक्य वाचताना मनाशी म्हटलं की देवघराप्रमाणेच स्वयंपाकघराचं स्थान आहे. ही वरील वाक्य ‘रुचिरा’च्या लेखिका कमलाताई ओगले यांच्या प्रस्तावनेतील आहेत. जीवनातील आवश्यक अशा घटकातील महत्त्व जाणून ‘रुचिरा’ हे पुस्तक कमलाताईंनी लिहिलं १९७० पासून २०१४ पर्यंत त्याच्या ४२ आवृत्त्या निघाल्या. लाखो प्रतींच्या खपानंतर आजही त्याला तेवढीच मागणी आहे. सतत प्रती संपतात आणि प्रकाशकांना फोन येतात. पाककला ही नवीन नाही पण वाचनाची आवड असणाऱ्यांना कोरंकरकरीत रुचिरा दिसल्यास पूर्ण वाचून बाजूला ठेवण्याव्यतिरिक्त गत्यंतर नाही. असे वाटते. नुकतेच खूप वर्षांनी हे पुस्तक ग्रंथच म्हणा हवंतर. माझ्या नजरेसमोर आला आणि पूर्ण फडशा पाडून बाजूला ठेवला. चिंतन करावे असाच विषय वाटला. तसं हे पुस्तक आणि कमलाताई ओगले कोणालाच नवीन नाहीत, पण ट्रंकेतील पैठणी किंवा लग्नातील शालू दिसला तर पटकन बाजूला ठेवला जात नाही. ४०-५० वर्षांपूर्वी नव्या सुनांना परदेशी जाणाऱ्या मुला-मुलींना हे पुस्तक म्हणजे वरदान होते. फोडणी कशी करावी? इथपासून मसाल्याची ओळख, भाज्या, कोशिंबिरी-चटण्या, वडे, फराळाचे पदार्थ वाटी चमच्याच्या अंदाजाने तसेच विविध मापाने कसे घ्यायचे हे विस्तारितपणे त्यात लिहिले आहे. सासूबाईंच्या शिकवणीमुळे मार्गदशनामुळे बाराव्या वर्षी लग्न करून आलेल्या कमलाताईंनी स्वयंपाकाच्या विषयात खूप प्रगती केली. हाताला चव असल्याने प्रत्येक पदार्थाची गोडी रुचकर असे. लाखो सुनांनी सासू म्हणून त्यांना गौरविले आहे. चौथी शिकलेल्या कुंडल (किर्लोस्करवाडी) येथून आलेल्या या महिलेने अतोनात प्रगती केली. नवीन सुनांना सुखी स्वयंपाकाचा कानमंत्र दिला आणि कुटुंब सुखी समाधानी झाले. आपले पाककलेतील ज्ञान पुस्तक रूपाने प्रसिद्ध केल्यास आपल्या अनुभवाची शिदोरी सर्वांनाच देता येईल हा विचार करून पुस्तकप्रपंच केला, असं त्यांनी लिहिलंय आणि त्यांच्या एवढ्या आवृत्त्या, लाखोंवर गेलेला खप हे काही त्यावेळी ध्यानी नव्हते. सांगली, बेळगांव, जळगांव, मुंबई, पुणे अशा विविध ठिकाणी पतीच्या बदलीमुळे राहावे लागले. त्यामुळे विविध ठिकाणी त्यांना प्रोत्साहन मिळत होते. मुंबईच्या वनिता समाजमध्ये दरवर्षी बक्षिसे मिळवत त्याच ठिकाणी कार्यकारिणीवर सुद्धा त्यांनी पद गाजविले. सासऱ्यांच्या आग्रहामुळं सांगलीच्या राणीबरोबर बॅडमिंटन ब्रिज खेळण्याची संधी मिळाली. धडाडीचा स्वभाव असल्यामुळे सतत काहीतरी नवीन करावे असा ध्यास होता. महिलांना स्वयंपाकाचे धडे देत क्लासेस घेणे, परदेशात क्लासेस घेणे, व्याख्याने देणे, असे करीत त्यातून मिळालेला पैसा स्वा. सावरकरांच्या निधीला त्या देत असत. टीव्हीवर पहिली मुलाखत देताना कुटुंबात सगळ्यांना वाटत होते त्या काय बोलतील? पहिलीच मुलाखत यशस्वी झाली. ऑस्ट्रेलियातील त्यांचे चिरंजीव श्री. अरुण ओगले व सून रोहिणी ओगले यांच्याकडून त्यांची बरीच माहिती मिळाली. सिडनी येथे त्यांनी महिलांना पाककलेबाबत खूप छान व्याख्यान दिले, की महिला आजही त्यांनी सांगितल्याप्रमाणे पदार्थ तयार करतात. आईच्या हाताला प्रचंड चव होती. त्यामुळे काही केले तरी आम्हा सगळ्यांना ते खूप आवडायचे असे श्री. ओगले सांगतात. पुस्तक प्रपंच करताना सामाजिक भानही त्यांना होते. विविध संस्थांना त्या मदत करीत होत्या. घरातून पती, थोरले चिरंजीव विश्वनाथ आणि दोन्ही सुना त्यांच्या सासूबाई या सगळ्यांचे माझ्या यशात खूप मोठे स्थान आहे. असंही कमलाताईंनी प्रस्तावनेत नमूद केलेले आहे. भाषेचं शुद्धीकरण त्याची व्यवस्था कुटुंबातील प्रत्येकाने केली आहे. हे त्या आग्रहपूर्वक सांगतात. किर्लोस्कर प्रकाशनातर्फे प्रथम बऱ्याच आवृत्त्या प्रकाशित झाल्यानंतर आता बरीच वर्षे पुण्यातील नामवंत अशा ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’कडे ही प्रकाशनाची धुरा आहे आणि आजही यशस्वीरीत्या त्याचे काम आनंदपूर्वक होत आहे. मसाले - फोडणीपासून विविध प्रकारच्या विविध पद्धतीने भाज्या, उसळी, कोशिंबिरी, पोळ्या, वड्या, लाडू यांची प्राथमिक तयारीपासून यात माहिती दिली आहे. महाराष्ट्रीय बंगाली, पंजाबी, कर्नाटकी, कोकणी या सर्व प्रांतांच्या पदार्थांची माहिती दिली आहे. पान वाढताना कसे वाढावे? पदार्थांचे सुशोभिकरण कसे करावे? विडा कसा बांधवा? किती प्रकारची पाने करता येतात. खमंग सुपारी-मसाला सुपारी-मुखशुद्धी ही साधी दिसणारी पण महत्त्वाची गोष्ट याबाबत खुलासेवार माहिती आहे. कृतीची माहिती खुलासेवर दिली आहे. संसार सुखी व्हावा अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. खवय्या असलेल्या नवऱ्याला, मुलांना चांगला स्वयंपाक करून सुखी करण्यासाठी ‘रुचिरा’ हे मार्गदर्शक आहे. ट्विटर, फेसबुक, व्हाट्सअप या सगळ्या आधुनिक तंत्रज्ञानाने लोकांना माहिती मिळते पण ज्ञानेश्वरी, श्यामची आई, गड आला पण सिंह गेला, या ग्रंथाच्या लाखो प्रतींच्या खपांप्रमाणेच हे ‘रुचिरा’ त्याच रांगेत असावे ही वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे. – मनिषा लोणकर ...Read more

 • Rating StarMrs.Meghana shet

  Big guidance to us. With accurate measurements of all ingredients.

 • Rating StarRama Khatavkar

  या दोनही पुस्तकांचा परिचय द्यायची खरंतर काही गरजच नाहीये. छापिल स्वरुपात आहेत, म्हणून पुस्तकं म्हणायचं, नाही तर स्वयंपाकघरात प्रयोग करणार्या प्रत्येकाला आपली आई, आजी, किंवा जवळचं कुणीतरी आधाराचं असल्यासारखं वाटतं, ही पुस्तकं घरात असली की. २८ च्यावर आवृत्या निघाल्यात. कै. कमलाबाईंची प्रस्तावना पण खूप छान आहे. त्यांनी आपल्या सासूबाईंकडून हे सगळं शिकून घेतलं. प्रत्येक पदार्थ स्वतः बनवून, चविष्ट आणि आरोग्यपूर्ण होण्यासाठी त्यात बदल करून प्रमाणं ठरवून, मगच पुस्तकात समाविष्ट केला आहे. विशेषतः पहिला भाग जास्त उपयोगी वाटतो. रोजच्या वापरातले खास मराठी वळणाचे पदार्थ , यात साध्या भाताच्या प्रकारांपासून वरण, आमट्या, भाज्या, असं सगळं आहे. जसं सांगीतलंय, अगदी तसंच करत गेलं , तर हमखास यशाची खात्रीच. स्वयंपाकघरात वावरण्याची सवय नसलेल्या नवविवाहितांना याचा उपयोग होतोच, पण अनुभवी सुगरणींना देखील यात दरवेळी काहीतरी नवीन सापडतेच. साठवणीचे पदार्थ, मधल्या वेळचे पदार्थ, मुरांबे, लोणची, अन्य प्रादेशिक पदार्थ , पक्वान्ने, उपासाचे पदार्थ असे वेगवेगळे विभाग यात आहेत. भाषा साधी, सोपी, सहज कळेल अशी. मापासाठी वाटी आणि चमचा ही व्यावहारिक साधनेच आहेत. त्यामुळे दीड इंच आलं, किंवा इतके ग्रॕम रवा,असला काटेकोरपणा नाही. हे पुस्तक मी फाटेपर्यंत वापरलं, नंतर बाईंडिंग करुन वापरलं. माझ्या आईला पण यातले खूप संदर्भ उपयोगी पडले. आता माझ्या सुनांना पण कमलाबाईंचा आधार आहे. बाजारात पाककलेची असंख्य पुस्तके उपलब्ध आहेत, पण यासम हेच. ...Read more

 • Rating Starआमदार नीलमताई गो-हे

  आमच्या काळी प्रत्येक मुलीला लग्नाचा आहेर म्हणून रुचिरा मिळायचं . अजूनही ते तेवढच लोकप्रिय आहे .

 • Read more reviews
Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SHIVCHATRPATI EK MAGOVA
SHIVCHATRPATI EK MAGOVA by DR.JAYSINGRAO PAWAR Rating Star
Tushar Kute

इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर चिकित्सक पद्धतीने लिहिलेले हे पुस्तक होय. शिवरायांच्या विविध अंगांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकातून केला आहे. शिवछत्रपतींच्या पूर्ण परिवाराची माहिती या पुस्तकात सापडल. त्यांनी तत्कालीन समाज पद्धतीचा विचार करून समाज क्रांतीची बीजे रोवली होती. याचा सविस्तर आढावा डॉ. पवार घेतात. शिवाजी महाराजांसाठी आत्मबलिदान करणारा शिवा काशीद नक्की कोण होता व त्यासंबंधी माहिती नक्की कशी उजेडात आली? शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचे संबंध कसे होते? या प्रश्‍नांच्या उत्तरांचासह संभाजी महाराजांच्या जीवनाचा सारांश या पुस्तकात वाचायला मिळेल. महाराणी सोयराबाई व येसूबाई यांच्या विषयी सारांशरुपी मागोवा डॉ. पवार यांनी घेतला आहे. शिवाय शिवाजी महाराजांचे कुळ कोणते? तसेच जेम्स लेन प्रकरण नक्की काय होते? याची विस्तृत माहिती या पुस्तकातील दोन प्रकरणात मिळते. त्यामुळे शिवचरित्राची आणखी बारकाईने ओळख करून घ्यायची असेल तर कथा-कादंबऱ्या पेक्षा अशाप्रकारे इतिहासकारांच्या दृष्टीतून लिहिलेले साहित्य निश्चितच उपयोगी पडेल. ...Read more

A CALL TO HONOUR
A CALL TO HONOUR by Jaswant Singh Rating Star
Prabhakar Yerolkar

जसवंतसिंगाचे हे आत्मचरीत्र. ते म्हणतात , " सावधगिरीने आणि दबकत दबकत वावरणाऱ्या भारताने मे २००४ नंतर एकदम आत्मविश्वास पुर्वक दमदारपणे वाटचाल सुरू केली . एका नव्या भारताचा उदय झाला होता . त्या भारताचा आवाज मला ऐकू येतो आहे. पुन्हा पुन्हा ऐकू येतो आे ." १९९८ ते २००४ या काळात भाजपाच्या आघाडी सरकारच्या काळात संरक्षण, परराष्ट्र आणि अर्थ खात्याचे मंत्री म्हणून जसवंतसिंग यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावली . नंतर ते राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते होते . याशिवाय ते आँक्सफर्ड आणि वाँरविक विद्यापीठात मानद प्राध्यापक देखील होते . हार्वर्ड विद्यापीठात ते सिनीयर फेलो सुध्दा होते . त्यांचे हे सातवे पुस्तक. माझ्या कडे आले ते माझ्या नियमित स्तंभातुन या तब्बल४९० पानांच्या पुस्तकाची ओळख करून देण्यासाठी . मी या पुस्तकावर मागेच लिहीलेही आहे .आणि मला आठवते, अगदी तासाभरात तो लेख मी लिहुन काढला होता . याबाबतीत माझी एक अत्यंत वाईट खोड अशी की ,पुस्तक पुर्ण न वाचताच जणू काही ते पुस्तक दोन वेळा वाचून मी त्यावर लिहीले आहे, असे माझ्या वाचकांना आणि संपादकांना भासविणे. फक्त ते चाळत चाळत माझा लेख तयार होतो . मात्र आता या लाँकडाऊन मध्ये हे अत्यंत महत्त्वाचे पुस्तक मी वाचावयास घेतले आहे . जसवंतसिंग आज हयात नाहीत. पण त्यांना एकदा विचारले गेले ,आपल्याला वेळ कसा पूरतो ? यावर ते उत्तर देतात , " आपण काम करायचे ठरवलं तर वेळसुध्दा आपल्यासाठी प्रसरण पावत असतो . हे माझे सातवे पुस्तक आहे आणि अजुन बरीच पुस्तके मी लिहीणार असुन त्यातली काही निर्मिती च्या अवस्थेत आहेत . मेहता पब्लिशिंग हाऊसचे हे पुस्तक वाचनीय तर आहेच परंतु एका अशा कालखंडाचा ईतिहास आहे ज्यावर आधारित आजच्या विश्वगुरू आणि आर्थिक महासत्ता बणण्याची स्वप्ने पहाणारा आणि करोनाशी लढण्यासाठी सज्ज असलेल्या भारताची उभारणी झालेली आहे ...Read more