* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: RUCHIRA BHAG -2
  • Availability : Available
  • ISBN : 9788177666977
  • Edition : 23
  • Publishing Year : SEPTEMBER 1985
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 356
  • Language : MARATHI
  • Category : COOKERY, FOOD & DRINK
  • Available in Combos :RECIPES COMBO SET - 4 BOOKS
    RUCHIRA COMBO SET - 2 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE READERS HAVE ACCEPTED THIS PAIR FOR SO LONG NOW, RUCHIRA AND MEHTA PUBLISHING HOUSE. IT IS A RACE WHERE THE PUBLISHER IS SERVING AND THE READERS ARE ENJOYING, FINISHING. WE ARE HAPPY THAT NEITHER THE PUBLISHER NOR THE READERS ARE GETTING TIRED. THERE HAVE BEEN TREMENDOUS SALE OF THIS BOOK WITH ITS MANY EDITIONS. WE ARE PRESENTING THE SECOND PART OF RUCHIRA, WHICH IS BETTER THAN THE FIRST, BUT WE AS PUBLISHER ARE UNDER TREMENDOUS PRESSURE. WE KNOW THAT THE READERS ARE VERY CHOOSY. AND SECONDLY, THEY ARE GOING TO COMPARE THIS PART WITH THE FIRST PART, IT IS BUT NATURAL.
`रुचिरा` या पुस्तकावर प्रसिद्ध झालेल्या एका अभिप्रायामध्ये श्रीमती कमलाबाईंचे वर्णन ` सव्वा लाख सुनांची सासू` असे केलेले होते आणि ते सार्थही आहे. १,२५,००० पेक्षा अधिक प्रतींचा विक्रमी खप झालेल्या या एकमेव मराठी ग्रंथाच्या लेखिका यांनी खरोखरीच सव्वा लाख महिलांना सुगरण बनवलेले आहे, हे आता प्रकट सत्य आहे. कमलाबाईंचे बालपण दांडेकर घराण्यात कुंडलसारख्या खेडेगावात गेले. त्यांचे शिक्षण जेमतेम प्राथमिक इयत्ता चौथीपर्यंत झाले. विवाह होऊन त्या सांगलीच्या ओगले यांच्या घरात आल्या. आपल्या पाककलानिपुण सासूबाईकडून त्यांनी पाककलेचे धडे घेण्यास सुरुवात केली. नवनवीन पदार्थ शिकवावेत, एखादा पदार्थ बिघडला, मनाजोगता झाला नाही, तर खंत करत न बसता पुन्हापुन्हा तो अधिक चांगल्या रीतीने करून पाहावा, अशी वृत्ती कमलाबाईनी बाळगली पाककलेच्या आवडीबरोबरच त्यांना इतर कला अवगत होत्या. त्यामुळे चवदार पदार्थाना रंगतदार सजावटीची आणि कलात्मक मांडणीची जोड मिळाली.

No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #MARATHI RECIPE BOOK #KAMALABAIOGALE
Customer Reviews
  • Rating StarRama Khatavkar

    या दोनही पुस्तकांचा परिचय द्यायची खरंतर काही गरजच नाहीये. छापिल स्वरुपात आहेत, म्हणून पुस्तकं म्हणायचं, नाही तर स्वयंपाकघरात प्रयोग करणार्या प्रत्येकाला आपली आई, आजी, किंवा जवळचं कुणीतरी आधाराचं असल्यासारखं वाटतं, ही पुस्तकं घरात असली की. २८ ्या वर आवृत्या निघाल्यात. कै. कमलाबाईंची प्रस्तावना पण खूप छान आहे. त्यांनी आपल्या सासूबाईंकडून हे सगळं शिकून घेतलं. प्रत्येक पदार्थ स्वतः बनवून, चविष्ट आणि आरोग्यपूर्ण होण्यासाठी त्यात बदल करून प्रमाणं ठरवून, मगच पुस्तकात समाविष्ट केला आहे. विशेषतः पहिला भाग जास्त उपयोगी वाटतो. रोजच्या वापरातले खास मराठी वळणाचे पदार्थ , यात साध्या भाताच्या प्रकारांपासून वरण, आमट्या, भाज्या, असं सगळं आहे. जसं सांगीतलंय, अगदी तसंच करत गेलं , तर हमखास यशाची खात्रीच. स्वयंपाकघरात वावरण्याची सवय नसलेल्या नवविवाहितांना याचा उपयोग होतोच, पण अनुभवी सुगरणींना देखील यात दरवेळी काहीतरी नवीन सापडतेच. अगदी स्वयंपाकघराची नव्याने ओळख झालेल्या पुरुषांनाही यांचा आधार वाटेल. साठवणीचे पदार्थ, मधल्या वेळचे पदार्थ, मुरांबे, लोणची, अन्य प्रादेशिक पदार्थ , पक्वान्ने, उपासाचे पदार्थ असे वेगवेगळे विभाग यात आहेत. भाषा साधी, सोपी, सहज कळेल अशी. मापासाठी वाटी आणि चमचा ही व्यावहारिक साधनेच आहेत. त्यामुळे दीड इंच आलं, किंवा इतके ग्रॕम रवा,असला काटेकोरपणा नाही. हे पुस्तक मी फाटेपर्यंत वापरलं, नंतर बाईंडिंग करुन वापरलं. माझ्या आईला पण यातले खूप संदर्भ उपयोगी पडले. आता माझ्या सुनांना पण कमलाबाईंचा आधार आहे. बाजारात पाककलेची असंख्य पुस्तके उपलब्ध आहेत, पण यासम हेच. ...Read more

  • Rating StarDR SUSHAMA POUDWAL, LOKSATTA CHATURANG 14-1-2017

    ‘रुचिरा’सारख्या पुस्तकांनी विक्रीचे उच्चांक गाठत सर्वाधिक खपाचे विक्रम मोडले आहेत. या पुस्तकांच्या प्रस्तावनांपासून पदार्थांचे नाव, जिनसांची यादी, वजनं-मापं, कृतींच्या पद्धती, भांड्यांचे उल्लेख, वापरलेली भाषा यांमधून आहाराविषयाचे आचार-विचार समजतात. दशाचा, प्रांताचा सांस्कृतिक इतिहास उलगडत जातो. तत्कालीन समजाचे खानपान, राहणीमान यावरून देशकालपरिस्थितीवर प्रकाशझोत टाकला जातो. पाककृती देताना लेखक कळत-नकळत स्वत:ला व्यक्त करतात. ते ज्या काळात आणि वातावरणात राहतात, त्या काळाचे आणि समाजाचे प्रतिबिंब या लिखाणात वेगवेगळ्या तऱ्हांनी डोकावते. या साहित्याचा स्वत:चा असा वेगळा आकृतिबंध आहे. हा आकृतिबंध वेगवेगळ्या कोनांमधून समजून घेणं खूप गमतीचं आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book