SERDAR OZKAN

About Author

Birth Date : 24/08/1975


SERDAR OZKAN ATTENDED MIDDLE AND HIGH SCHOOL AT ROBERT COLLEGE IN ISTANBUL. HE COMPLETED HIS UNIVERSITY EDUCATION IN THE USA WHERE HE EARNED HIS BA IN BUSINESS ADMINISTRATION AND PSYCHOLOGY AT LEHIGH UNIVERSITY. SERDAR ÖZKAN HAS BEEN A FULL-TIME NOVELIST SINCE 2002, DEDICATED TO WRITING NOVELS THAT UNRAVEL THE DEEPER MEANING OF LIFES JOURNEY.

सेरदार ऑझ्कान यांचा जन्म १९७५ मध्ये झाला. त्यांनी इस्तंबूल इथे माध्यमिक शिक्षण घेतलं. तिथेच रॉबर्ट कॉलेजमध्ये त्यांनी उच्च शिक्षण पूर्ण केलं. यूएसए मधील लेहिघ युनिव्हर्सिटी इथे त्यांनी व्यवसाय व्यवस्थापन आणि मानसशास्त्र या विषयांत पदवी प्राप्त केली. साधारण २००२ पासून त्यांनी स्वतःला लेखनाला वाहून घेतलं आहे. जीवनार्थाचा सखोल अर्थ त्यांच्या लेखनातून उलगडतो. ‘द मिसिंग रोझ’ ही त्यांची पहिलीच कादंबरी जगभरातील ४४ भाषांत अनुवादित’ आणि ६५ देशांत प्रकाशित झाली आहे. कॅनडा ते जपान, ब्राझील ते चीन अशा वेगवेगळ्या संस्कृतीच्या वाचकांनी तिचं मनापासून स्वागत केलं आहे. कित्येक देशांत तिने लोकप्रियतेचे उच्चांक गाठले आहेत. टर्की इथे अनेक आठवडे सर्वाधिक खपाच्या पुस्तकांच्या यादीत ८४ आठवडे ‘मिसिंग रोझ’ पहिल्या क्रमांकावर होती. टर्कीमध्ये २०१० मध्ये सर्वाधिक वाचलेलं पुस्तक म्हणून तिचा बोलबाला होता. वर्ल्ड प्रेसच्या क्रमवारीत सुद्धा ‘मिसिंग रोझ’ कादंबरीचं अतोनात कौतुक करण्यात आलं. पाउलो कोएल्हो यांच्या ‘अल्केमिस्ट’ आणि रिचर्ड बाच यांच्या ‘जोनाथन लिव्हिंगस्टन सीगल’ या सतत गौरवस्थानी असणाऱ्या साहित्याच्या बरोबरीने या कादंबरीने स्थान पटकावलं आहे. जागतिक क्रमवारीत उच्च स्थानी असणाऱ्या डच प्रेस-अगेनतरच्या ‘सेंट-एक्झुपेरिज लिट्ल प्रिन्स’शी देखील ‘मिसिंग रोझ’ची तुलना करण्यात आली आहे. फिन्लंडच्या हेल्सिन्की सानोमत या लोकप्रिय वृत्तपत्राने ‘मिसिंग रोझ’ पुस्तकाला ‘टर्कीच्या लिट्ल प्रिन्स’चा दर्जा बहाल केला आहे.
Sort by
Search by Discount
Show per page
Items 1 to 6 of 6 total
33 %
OFF
AMAR HRUDAY Rating Star
Add To Cart INR 350 INR 234
33 %
OFF
OCTOBER RAINS Rating Star
Add To Cart INR 250 INR 168
33 %
OFF
RUMI ANANDGHAN Rating Star
Add To Cart INR 240 INR 161
26 %
OFF
SERDAR OZKAN COMBO SET - 5 BOOKS Rating Star
Add To Cart INR 1310 INR 975
48 %
OFF
THE MISSING ROSE Rating Star
Add To Cart INR 220 INR 114
33 %
OFF
UJALE JAGNYACHA DEEP Rating Star
Add To Cart INR 250 INR 168

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
मिना हरीश सहारे, नागपूर.

कुठल्याही पुस्तकावर अभिप्राय देण्याची माझी ही पहिलीच वेळ असली तरी `दुर्दम्य` पुस्तक मनाला भिडल्यामुळे त्यावर लिहीणे मला आवश्यक वाटले. मी पण चरित्रनायक एकनाथनच्या विभागात सेवा दिली आहे. आमच्या सारख्यांना एकनाथन एक कडक तानाशाह ऑफिसर होता इतकंच माित होतं. पण लेखकाच्या नजरेतून जेव्हा त्याचे चरित्र वाचले तेव्हा तो खरा काय होता हे समजले. चरित्र वाचताना पूर्ण होई पर्यंत उत्सुकता कायम होती. कार्यालयीन जीवनातला कालखंड डोळ्यासमोर जिवंत होतो. वाचकाला खिळवून ठेवण्याचं कसब लेखकाच्या लिखाणात आहे.एकनाथन सारख्या विक्षिप्त, हेकेखोर व्यक्तीचा व लेखकाचा नक्कीच काहीतरी ऋणानुबंध असला पाहिजे. निवृती नंतरफिरून तीनदा लेखकाच्याच शहरात येणे हा योगायोग वाटत नाही. कथानकातील काही भागातील प्रसंग व घटना मजेशीर, गमतीदार वाटतात. कथेचा शेवट मनाला भिडून जातो. एका करारी, खंबीर माणसाचा अंत वाचताना मन भरून आले. पुस्तक पूर्ण केल्यावर शेवटी एक विचार आला की त्याचं मरण सुखदच झाले असे म्हणावे लागेल कारण एकाकीपणा जरी त्यांनी स्वतः निवडला होता तरी मृत्यूच्या बाबतीत भाग्याने त्यांची साथ दिली होती. त्यांच्या सारखे ताठ कणा व दुर्दम्य व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तिला परावलंबी, असहाय आयुष्य कधीच रूचलं नसतं आणि त्या नंतर आलेल्या करोना काळात त्यांचे काय हाल झाले असते त्याची कल्पनाच न केलेली बरी. कथानक वाचकाच्या मनाला भिडले यातच लेखकाचे यश आहे. पुढील लिखाणा करता शुभेच्छा. बाकी माझ्याकडून पुस्तकाचा दर्जा - खूप छान, बढिया आणि सुपर्ब... ...Read more

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
अनिल सहजे, नाशिक.

`कुलामामाच्या देशात’ हे पुस्तक म्हणजे जंगलातील अनुभवकथांचा एक विलक्षण रम्य प्रवास आहे. रवींद्र वानखडे यांच्या वनाधिकारी म्हणूनच्या प्रत्यक्ष अनुभवातून या कथा जन्माला येतात. प्रत्यक्षात घडलेल्या या कथा इतक्या रंगतदार आहेत की त्या काल्पनिक वाटाव्यात, अी त्यांची गंमत आहे. वानखडे यांच्या अनुभवांमधील कथाबीज अचूकपणे हेरून जी. बी. देशमुख यांनी त्यांना आपल्या रसाळ आणि खुमासदार शैलीत शब्दरूप दिले आहे. देशमुखांची शैली इतकी प्रवाही आणि ओघवती आहे की वाचक कथांमध्ये अक्षरशः गुंगून जातो. एकदा पुस्तक हातात घेतल्यानंतर ते पूर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेवावेसे वाटत नाही. वन हे सामान्य माणसासाठी तसे अपरिचितच क्षेत्र. जंगलातील जीवन, तेथील नियम-कायदे आणि जंगली श्वापदांचे विश्व याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. वानखडे-देशमुख द्वयी केवळ या अनोख्या जगाची ओळख करून देत नाहीत, तर त्याविषयी वाचकाच्या मनात विलक्षण कुतूहलही निर्माण करतात. ‘खुश रहेना मेरे यार’ आणि ‘महाकाय आकांत’ या दोन क्रमशः कथा तर विशेषतः चटका लावून जातात. त्या केवळ थरारक आणि अविश्वसनीय वाटाव्या अशा अनुभवांनी भारलेल्या नाहीत, तर जंगली श्वापदांची एक हळवी, माणुसकीच्या जवळ जाणारी बाजूही त्या प्रभावीपणे उलगडून दाखवतात. जी. बी. देशमुखांची खुमासदार, मिश्कील आणि रसाळ लेखनशैली वाचकाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत गुंतवून ठेवते. रवींद्र वानखडे यांच्या प्रत्यक्ष अनुभवांची सत्यता आणि देशमुखांच्या कथनकौशल्याचा सुंदर मिलाफ ‘कुलामामाच्या देशात’ घडवतो. हे पुस्तक केवळ जंगलातील अनुभवकथांचे संकलन राहत नाही, ते वाचकाला जंगलाच्या एका अनोख्या, रोमांचक आणि हळुवार विश्वाची सफर घडवते आणि नकळत सांगून जाते, ‘वनस्य कथा रम्यः!’ ...Read more