* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: SLUMDOG MILLIONAIRE
 • Availability : Available
 • Translators : VANDANA ATRE
 • ISBN : 9788184980233
 • Edition : 2
 • Publishing Year : APRIL 2009
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 270
 • Language : Translated From ENGLISH to MARATHI
 • Category : FICTION
Quantity
Buying Options:
 • Ebooks:
 • Print Books:
A FORMER TIFFIN BOY FROM M:RMBAI, RAM MOHAMMCD THOMAS, HAS JUST GOT TWELVE QUESTION` CORRECT ON A TV QUIZ SHOW TO WIN A COOL ONE BILLION RUPEES. BUT HE IS BRUTALLY SLUNG IN A PRISON CELL ON SUSPICION OF CHEATING. BECAUSE HOW CAN A KID FROM THE SLUMS KNOW WHO SHAKESPEARE WAS, UNLESS HE HAS BEEN _LIING A FASTPNE? IN THE ORDER OF THE QUESTIONS ON THE SHOW, RAM TELLS US WHICH AMAZING ADVENTURES IN HIS STREET-KID LIFE TAUGHT HIM THE ANSWERS. FROM ORPHANAGES TO BROTHELS, GANGSTERS TO BEGGAR-MASTERS, AND INTO THE HOMES OF BOLLYWOOD`S RICH AND FAMOUS, SLUMDOG MILLIONAIRE IS BRIMMING WITH THE CHAOTIC COMEDY, HEART-STOPPING TRAGEDY, AND TEAR-INDUCING JOYFULNESS OF MODERN INDIA. "THIS BRILLIANT STORY, AS COLOSSAL, VIBRANT AND CHAOTIC AS INDIA ITSELF...IS NOT TO BE MISSED` OBSERVER,` A LIVELY FIRST NOVEL. . . INDIA IS EQUALLY CHAOTIC AND ENCHANTING` SUNDAY TIMES.
मुंबईतील एक कफल्लक वेटर तुरुंगामध्ये का गेला आहे? कारणे आहेत : अ. त्याने गि-हाइकाला ठोसा मारला आहे. ब. त्याने खूप व्हिस्की घेतली आहे. क. त्याने गल्ल्यामधून पैसे चोरले आहेत. ड. जगातील सगळ्यांत मोठ्या रकमेचा ‘क्विझ शो’ त्याने जिंकला आहे. ‘हु विल विन ए बिलियन’ या क्विझ शोमधील बाराही प्रश्नांची उत्तरे अचूक दिल्यानंतर राम महम्मद थॉमस याला अटक करण्यात आली आहे. कधीही शाळेचे तोंडही न बघितलेला किंवा वृत्तपत्र हातातही न धरणारा एक दरिद्री, अनाथ मुलगा सूर्यमालेतील सर्वांत लहान ग्रहाचे किंवा शेक्सपिअरच्या नाटकाचे नाव लबाडी केल्याखेरीज सांगूच शकत नाही. क्विझ शोचे चित्रीकरण पुन्हा बघताना तो आपण कसे जिंकलो याचे वर्णन करू लागतो आणि वाचकाला घेऊन जातो त्याच्या आयुष्याच्या अद्भुत सफरीवर! कचराकुंडीवर सुरू झालेल्या त्याच्या आयुष्यात कधी त्याची गाठ पडते सुरक्षेचे अती वेड असलेल्या ऑस्ट्रेलियन कर्नलशी, तर कधी तो ‘ताजमहाल’चा गाईड म्हणून काम करतो. रामची जीवनेच्छा चिवट आहे! रस्त्यावरील जीवन जगताना मिळालेल्या शहाणपणातून, क्षुल्लक गोष्टींच्या भांडारातून तो क्विझमधील प्रश्नांची उत्तरे देत लाखो प्रेक्षकांना अक्षरश: स्तंभित करतोच; पण आयुष्याच्या कोड्याचीही उत्तरे मिळवतो. आधुनिक भारताच्या सामाजिक पाश्र्वभूमीवरील ही कथा सुष्ट आणि दुष्ट यांच्यामधील संघर्षाचे दर्शन घडवतेच; पण जगण्याखेरीज दुसरा पर्यायच नसलेल्या मुलापुढे आयुष्य काय वाढून ठेवते तेही प्रभावीपणे दाखवते...
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #SLUMDOGMILLIONAIRE #SLUMDOGMILLIONAIRE #स्लमडॉगमिलेनिअर #FICTION #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #VANDANAATRE #वंदनाअत्रे #VIKASSWARUP
Customer Reviews
 • Rating StarEknath Marathe

  स्लमडॉग मिलेनिअर ईबुक वाचायला लागलेला वेळ, साधारण 4.45 मिनिटे या पुस्तकावर बेतलेला सिनेमा तुफान चालला होता व ऑस्कर ची बाहुली सुद्धा या सिनेमाला मिळाल्याचे आठवते. मी सिनेमा बघितला नव्हता म्हणून ईबुक हातात येताच वाचायला घेतले. प्रश्न मंजुषा स्पर्धे 100 करोड एक साधा वेटर जिंकतो. त्याला ते बक्षीस न देण्यासाठी स्पर्धेचे आयोजक आकाश पाताळ एक करतात. शाळा महाविद्यालयात कधीही न गेलेला, अडाणी 18 वर्षाचा तरुण, एका पेक्षा एक काठिण्य पातळी असलेले 12 प्रश्न , बरोबर उत्तरे देवून 100 कोटी जिंकतो , हे मान्य करायला कंपनी तयार नाही. ती त्याला खोट्या आरोपात अडकवते. एक वकील त्याला लॉक अप मधून बाहेर काढते. तिने विचारलेल्या प्रश्नोत्तरात, त्या 12 प्रश्नांची उत्तरे त्या तरुणाला कशी माहीत होती याची रोमहर्षक कहाणी उलगडत जाते ! प्रत्येक प्रश्नाची उकल वेगळ्या प्रवासात व शहरात उलगडत जाते. एकदा वाचायला घेतले की हे पुस्तक खाली ठेवता येत नाही ! वंदना अत्रे यांनी केलेला मराठी अनुवाद सुद्धा अगदी ओघवता व रसाळ आहे. ...Read more

 • Rating StarDAINIK LOKSATTA 18-04-2009

  लकी कॉइन! प्रिय राम महमन थॉमस, आपली भेट होऊन बरोबर एक वर्ष झाले. तू विकास स्वरूप यांचा नायक. ‘क्यू अ‍ॅण्ड ए’ या कादंबरीतील. थोडी अधिक ओळखीची खूण इतरांना सांगायची तर डॅनी इतरांना सांगायची तर डॅनी बोएलच्या ‘स्लमडॉग’मधील जमाल. शंभर कोटी रूपये बक्षीस अलेले क्वीझ आश्चर्यकारकरित्या जिंकून ‘मिलिओनेर’ झालेला एक अशिक्षित वेटर. आपली पहिल्यांदा गाठ पडली त्या दिवशी दुपारी मी नुकतीच हॉस्पिटलमधून घरी परतले होते. केमोथेरेपीची दुसरी सायकल संपवून. समेर होते मेहता पब्लिशिंग हाऊसकडून आलेले कुरिअर आणि त्यातील ‘क्यू अ‍ॅण्ड ए’कादंबरीत राजश्री देशमुखांची छोटी चिठ्ठी. सहज काही पाने चाळली तेव्हा वाचायला मिळाली ती तुझ्या हाती ‘लकी कॉइन’ येते, ती घटना. तुझ्या आयुष्यातील अनेक घटनांच्या वेळी तू ते नाणे हवेत भिरकावतोस अन् वाट बघतोस- छापा की काटा, यापैकी छापा पडण्याची. ते वाचताना मी स्वत:शीच हसले. कशासाठी? मीही त्यावेळी वाट बघत होते.- उंच उडालेले नाणे खाली येण्याची. छापा : कदाचित मी जगेन. काटा : कदाचित...! या कादंबरीची पाने होती ३०४ एवढ्या पानांचा अनुवाद संपविण्याइतके आयुष्य हाताशी असेल ना माझ्या? क्षणभर विषण्ण होऊन कादंबरी दूर ठेवून दिली तेव्हा डॉक्टरांच्या रिपोर्टमधील दोन शब्द डोळ्यांसमोर आले. ‘कॅन्सर : स्टेज फोर’. अनुवाद सुरू केला ती पहाट आजही आठवते. कारण इतरांसाठी ती नव्या दिवसाची ताजी पहाट होती; पण माझ्यासाठी संपत आलेली ती वेदनादायी उत्तररात्र होती. केमोच्या साइड इफेक्टस्च्या वेदना...एखाद्या विषारी नागाने डंख मारावा तशा बघता बघता पायाच्या नखापासून या पायदुखीच्या वेदना सुरू व्हायच्या. चरकात टाकून पिळल्या जाणाऱ्या उसाला होत असतील तशा. कण्हून, शेकून, पाय दाबून, बांधून ठेवून कंटाळले अन् त्या वेदनांकडे दुर्लक्ष करण्यासाठी म्हणून खुर्चीत बसले. धारवीच्या उकिरड्यावर वाढणाऱ्या राम महमद थॉमससाठी. धारावीच्या झोपडीतून उचलून पोलीस ठाण्यावरील टीचभर खोलीत उलटतपासणीसाठी डांबून ठेवलेला राम महमद थॉमस. पहिल्या प्रकरणाची १२-१३ पाने लिहून झाली तेव्हा जाणवले. वेदनांनी दोन्ही पाय अक्षरश: बधीर झाले होते. जणू कमरेखालचे शरीरच नाहीय् असे वाटावे इतके बधीर. मग मीही तुझ्यासारखेच माझ्या खिशातून माझे खोटे-खोटे लकी कॉइन काढून उडवले अन् वर भिरकावत म्हटले- छापा : मी माझ्या पायावर आत्ता उभी राहून समोरच्या सहा पायऱ्या उतरणार. काटा : कदाचित...! नाणे खाली आले तेव्हा मी माझ्या पायावर उभी होते. पण तुडूंब भरलेल्या डोळ्यांना खालचे काहीच दिसत नव्हते. तुला खरंच सांगते, या अनुभवानंतर मी ठरवले- राम महमद थॉमसची ही कमालीची उत्कंठावर्धक कहाणी मी अधाशासारखी दोन रात्रीत वाचून नाही संपवणार. कारण माझ्यासाठी तो एक वेदनाशामक उपचार होता. या वेदना जेव्हा माझ्या शरीराबरोबर मनावरही कब्जा करू बघायच्या, त्या प्रत्येक वेळी राम, तुझी सोबत मला झाली. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये डाव्या हाताला सलाईन लावलेले असायचे आणि उजव्या हाताने मी लिहित असायची तुझी गोष्ट. कथेत परिस्थिती जेव्हा तुटण्याइतकी ताणली जायची, तेव्हा वाटायचे- हा खिशातून ‘लकी कॉईन’ का नाही काढत उत्तरासाठी? किती सोप्पे आहे ते...! पण असे म्हणताना मनोमन मला हेही ठाऊक होते की, प्रत्यक्ष आयुष्यात गोष्टी इतक्या सोप्या नसतात. अन् स्वत:ला हवे आहे- अगदी तीव्रतेने हवे आहे ते मिळवण्यासाठी फार फार झगडावे लागते. हे या अनुवादामुळे तुझ्याबरोबर मीही पुन्हा शिकत होते. तुला तुझे प्रेम हवे होते. आग्र्यात हरवलेले. विपरीत परिस्थितीवर मात करून ते मिळवल्याचे समाधानही तुला मिळवायचे होते. मला माझे आयुष्य हवे होते- तेही विपरीत परिस्थितीशी लढून मिळवायचे होते आणि या लढाईत विजयाचे अचूक दान पदरात टाकणारी ‘लकी कॉइन’ नावाची गोष्ट कधीच नसते. कोणाकडेच नसते. ते कॉइन आपल्याच मनात असते. कधीमधी फारच पराभूत वाटायला लागले तर उमेद देणारे. छापा : मी जगेन. काटा : कदाचित...! तू तुझ्या क्विझमध्ये दुसऱ्याच प्रश्नावर अडखळलास, तेव्हा माझ्या पोटात एकदम भीती अगदी दाटून आली. कारण एव्हाना मी माझ्याही नकळत तुझ्या विजयाचा आणि कॅन्सरशी सुरू असलेल्या लढाईतील माझ्या विजयाचा कोठेतरी परस्परसंबंध जोडत होते. तू विकास स्वरूप यांचा मानसपुत्र आहेस आणि तुझी संघर्षकथा काल्पनिक आहे, हे साफ विसरूनच गेले होते जणू. तुझी कहाणी वास्तव नव्हती. पण माझे आयुष्यही पुस्तकांच्या पानांपुरते नव्हते. ते समोर दिसत होते. किती ठरले आहे, ते ठाऊक नव्हते आणि त्यात माझ्या असण्या-नसण्यामुळे होणारे परिणामही समोर दिसत होते. तुझ्या ‘क्विझ’मध्ये तुला हेल्पलाइन होत्या. मला? पण या वळणावरही तुझे-माझे नाते तुटले नाही... मदतीचा एक अत्यंत आश्वासक, स्नेहशील हात यावेळी भीष्मराज बाम सरांच्या रूपाने माझ्यापुढे आला आणि बघता बघता कॅन्सरशी माझी लढाई ही दु:सह प्रवास न ठरता तो एक कुतूहलाचा अनुभव होऊ लागला. बाम सरांनी मला प्राणायामाचे महत्त्व सांगून तो शिकवला. आपल्याला अखंड प्रकाश व प्राणशक्ती देणाऱ्या सूर्याची उपासना करायला शिकवली आणि त्याबरोबर चित्रणाचं तंत्र शिकवलं. मनाने नेमका कशाचा ध्यास घ्यायला हवा, कशावर एकाग्र व्हायला हवे, भूतकाळातील वेदनादायी, अवमानाच्या आठवणींना दूर ठेवून फक्त उत्तम तेच कसे स्मरायचे, या उत्तमाचीच आराधना कशी करायची, हे त्यांनी शिकविले. खरे म्हणजे ते जीवनशिक्षणच होते. आतापर्यंत न मिळालेले, पण जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर अत्यंत अनिवार्य असे. या शिक्षणाचा प्रत्यक्ष उपयोग करून त्याचे कॅन्सरवर होणारे परिणाम बघताना शिक्षणाच्या प्रत्येक पहाटेच्या सत्रात मला जगण्याचे आश्वासन मिळत गेले. खरे तर बाम सरांच्या मदतीने मीच मला ते आश्वासन देत गेले. आणि या आश्वासनानंतर मात्र राम, तुझ्या हरण्या-जिंकण्याच्या काल्पनिक कहाणीकडे मी तटस्थपणे अनुवादक म्हणून बघू लागले. तू हरणार की जिंकणार याची उरली फक्त निखळ उत्सुकता! कहाणीच्या शेवटच्या वळणावर ‘क्विझ’चा अँकर प्रेमकुमारचा सूड उगवण्यासाठी त्याच्यावर रोखलेल रिव्हॉल्व्हर अखेरच्या क्षणी फेकून स्फुंदून स्फुंदून रडताना तुला बघितले अन् मी चकितच झाले. जीवघेण्या अशा परिस्थितीच्या टकमक टोकावर नेऊन उभे करून आपली परीक्षा बघणाऱ्या भूतकाळाला विसरून, मागे टाकूनच पुढे जायचे असते, हे तुलाही ठाऊक होते? कोठे मिळाले तुला हे शिक्षण? परिस्थितीकडून की जीवनसंघर्षात भेटलेल्या तर्हेतर्हेच्या माणसांकडून? खरे म्हणजे तुझ्या कहाणीतील तो एक अत्यंत रोमांचक क्षण. पण मला त्या क्षणी तुझ्या जय-पराजयापेक्षा तुझ्यातील एक समंजस, शहाणा राम महमद थॉमस दिसला- जो कल्पनेपेक्षा खूप वेगळा होता... अस्सल अन् जवळचाही. ‘लकी कॉइन’ नावाची तकलादू कुबडी समुद्रात भिरकावून देणारा. स्वत:च्या प्रयत्नांवर विश्वास ठेवणारा. मीही माझे ‘लकी कॉइन’ कधीच माझ्या जवळच्या गोदेच्या पात्रात भिरकावून दिले आहे, हे तुला मला सांगायचे होते... ...Read more

 • Rating StarDAINIK SAMANA 10-05-2009

  प्रवाही अनुवाद... ‘स्लमडॉग मिलेनिअर’ या चित्रपटानं इतिहास घडवला, तो जाणकारांना ज्ञात आहेत. हा चित्रपट ज्या ‘क्यू अ‍ॅण्ड ए’ या कादंबरीवर आधारित आहे त्या कादंबरीचा अनुवाद वंदना अत्रे यांनी ‘स्लमडॉग मिलेनिअर’ या नावानं केला आहे. मूळ लेखक विकास स्वरूप. ुण्याच्या मेहता पब्लिशिंग हाऊसनं त्याचं प्रकाशन केलंय. एका साध्या हॉटेलातील वेअर ‘हू विल विन अ बिलिअन’ या क्विझ शोमध्ये अवघड प्रश्नांची अचूक उत्तरं देत शंभर कोटी जिंकतो. हे सारं स्वप्नवत. ज्या मुलानं शाळेचं तोंड पाहिलेलं नाही, ज्याचा शिक्षणाशी काडीमात्र संबंध आलेला नाही, जो आजवरचं जीवन बेवारसपणे जगलाय, रोज उगवणाऱ्या दिवसाचं ‘आव्हान’ घेत जो जीवनाशी भांडलाय, ध्येयहीन जीवन जगणारा एक अतिसामान्य मुलगा क्विझ शोमधील सारे प्रश्न सोडवतो; ही एक अविश्वसनीय, विलक्षण घटना. हा विजेता म्हणजे लावारिस राम मोहम्मद थॉमस अशा विचित्र नावाचा! या राम मोहम्मद थॉमसची ही जीवनकहाणी. पण ही काही सामान्य माणसाच्या असामान्य कर्तृत्वाची प्रातिनिधिक कथा होत नाही. पण ती होते सत-असत्, दृष्ट-सुष्ट, संस्कार-संस्कारहीन, तत्त्वशील-तत्त्वशून्य, पाप-पुण्याच्या संघर्षाची. त्यातून अधोरेखित होणारा संदेश फार मोलाचा. सुदैव, नशीब यावर हवाला ठेवण्यापेक्षा स्वकर्तृत्वावर विश्वास असायला हवा. विकास स्वरूप नायकाच्या तोंडून आपला संदेश देताना म्हणतात, ‘नशीब आपल्यामधूनच आकार घेतं...’ ज्याचं त्याचं नशीब हे ज्यानं त्यानं स्वत:च घडवायला हवं. ही कहाणी फ्लॅशबॅक पद्धतीनं सांगितली आहे. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराशी त्याच्या आयुष्यातील घटनांचा संबंध येतो. म्हणूनच तो आत्मविश्वासपूर्वक साऱ्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो. झोपडपट्टीचं विदारक जिणं, शिवाय त्यांच्याकडे पाहण्याचा साऱ्या यंत्रणेचा, व्यवस्थेचा पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन यातून प्रकर्षानं जाणवतो. नायकाच्या नावाचं रहस्य. त्याच्या तिन्ही धर्मियांनी दाखवलेला अधिकार हा मानवी जीवनावरचं धर्माचं असणारं प्राबल्य स्पष्ट करतो. रामच्या आयुष्यातील एकेक घटना त्याला ‘जीवन’ म्हणजे काय हे शिकवणारी. त्यातून त्याला मिळणारे धडे, ज्ञान हे शाळा-विद्यालयातील अभ्यासक्रमापेक्षा भिन्न आणि अनमोलही! तो म्हणतो, ‘तुमच्या स्वप्नांची ताकद फक्त तुमच्या मनापुरती असते. या स्वप्नांना पैशाचं पाठबळ असेल तर इतरांच्या मनावर पण तुम्ही प्रभाव टाकू शकता.’ सभोवतालचं वास्तव सांगताना तो म्हणतो, ‘कळकट-तुटक्या, गळक्या झोपड्यांतून राहणाऱ्या लोकांसाठी आयुष्य हा शाप असतो... गर्दीनं गजबजलेल्या चाळीत राहणारी माणसं आयुष्य फक्त ढकलत असतात.’ पण हे तत्त्वज्ञान सांगताना नायक कुठंही आव आणत नाही की मुखवटे पांघरून दांभिकपणा करत नाही. त्याचं निवेदन थेट कुठचीही भीडमुर्वत न ठेवता केलेलं आणि स्वच्छ, प्रामाणिक, पारदर्शी आहे. त्यातील शेवटचा ट्विस्टही बोलका, मार्मिक आहे. उदा. ‘युद्ध ही फार गंभीर गोष्ट आहे. ती प्राण घेते.’ तर प्रेमासारख्या नाजूक अनुभवाविषयी तो म्हणतो, ‘प्रेम असे एका क्षणात होत नसते, ते अलगद तुमच्या आयुष्यात प्रवेश करते आणि आयुष्यातील प्रत्येक क्षण तजेलदार, रंगीत बनवते आणि तुमच्या स्वप्नांना व्यापून उरते.’ कालौघात लेखक उपमाही समर्पक, प्रभावी योजतो. उदा. हातातील गोट्या फरशीवर सांडाव्या तसे ते स्वर खोलीभर विखुरले. ‘किंवा व्यक्तिमत्त्व स्पष्ट करताना झाडावर एखादं पानही चुकीच्या जागी उगवलेलं लाजवंतीला आवडत नाही.’ असं लाजवंतीचं वर्णन करतो. सुभाषितात्मक वाक्यही अनुभवातून आलेली आहेत. उदा. ‘जेव्हा तुम्ही स्वत:च आतून खचलेले असता तेव्हा इतरांना धीर देणे फार अवघड असते.’ किंवा ‘स्वप्न जेवढे मोठे, तेवढा अपेक्षाभंगही मोठा.’ मात्र हा अनुवाद वाचकांच्या अपेक्षा पूर्ण करणारा आहे. मूळ मराठीत पुस्तक लिहिल्यासारखा अनुवाद प्रवाही आणि प्रभावी झालाय. ...Read more

Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more