AVINASH BHOME

About Author

Birth Date : 15/10/1950
Death Date : 15/07/2019


NA

भोमे यांनी सकाळ, तरुण भारत यांसारख्या मराठी, तसेच इतर प्रमुख इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये विविध विषयांवर स्तंभलेखन, तसेच पत्रलेखन केले आहे. आजवर त्यांचे इंग्रजी व मराठी मिळून १००० पेक्षा जास्त लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्यांचे शालेय शिक्षण पुण्यातील भारत हायस्वूÂलमधून झाले, तर बी.एम.सी.सी. कॉलेजमधून त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. ते सन १९७०मध्ये बी.कॉम.च्या परीक्षेत पुणे विद्यापीठामध्ये सहाव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. या यशाबद्दल त्यांना पुढील शिक्षणासाठी नॅशनल स्कॉलरशिपही मिळाली, परंतु कौटुंबिक जबाबदाNयांमुळे त्यांनी १९७०मध्ये बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्यास सुरुवात केली. त्यांनी २००० साली स्वेच्छानिवृत्ती घेतली. या तीस वर्षांच्या काळात त्यांनी बँकेची विविध पदे व जबाबदाNया यशस्वीरीत्या सांभाळल्या. बालसंगोपनाबद्दल पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी ते तुम्ही अन् तुमची मुले या विषयावर विविध शाळांमधून मोफत व्याख्याने देतात. त्यांचे सुसंवाद सहकार्याशी हे पुस्तक प्रसिद्ध असून त्यात व्यंगचित्रांच्या साहय्याने मॅनेजमेंट अँड ह्यूमन रिलेशन हा अवघड व गुंतागुंतीचा विषय सोप्या पद्धतीने विशद करण्यात आला आहे. त्यांनी जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांच्या यू सेड इट! या कॉमन मॅनच्या व्यंगचित्रसंग्रहाचेही भाषांतर केले आहे. व्यवस्थापन, अकाउंट्स, बँिंकग अँड फायनान्स यांसारख्या विषयांवर व्याख्याने देण्यासाठी त्यांना बँकांची ट्रेनिंग कॉलेजेस व विविध मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट्समधून आमंत्रित केले जाते. २००६ सालापासून ते विडंबन गीतांचा कार्यक्रमही सादर करत आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 2 of 2 total
KASA BOLALAAT! PART 1 TO 7 Rating Star
Add To Cart INR 665
TUMHI AANI TUMACHI MULA Rating Star
Add To Cart INR 160

Latest Reviews

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
कौशिक लेले

मराठी पुस्तकांमध्ये सध्या इतर भाषांतून अनुवादित झालेली पुस्तके सुद्धा मोठ्या संख्येने दिसतात. एखादा सरस अनुवाद वाचताना आपल्या डोक्यात सुद्धा आपल्या आवडीच्या परभाषेतल्या पुस्तकांची यादी तयार होते. ही पुस्तकं सुद्धा मराठीत आली तर काय मजा येईल असं वाटतं भाषा हा ज्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे त्यांची इच्छा एक पुढचं पाऊल टाकेल. आपणही स्वतः असा अनुवाद केला तर ? आपल्यालाही दोन्ही भाषा चांगल्या येत आहेत मग अनुवाद का करू नये ? हे पिल्लू डोक्यात शिरेलच. असा अनुवाद करायचा स्वतः काही प्रयत्न केला की लक्षात येईल की हे किती किचकट काम आहे. चांगला अनुवाद करायचा असेल तर सराव लागेल. अभ्यास लागेल. त्याची काही तंत्र मंत्र शिकून घ्यावी लागतील. एखाद्या चांगल्या जाणकार व्यक्तीचं, अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शनही मिळायला हवं. जर तुमच्याही मनात अशा भावना आल्या असतील तर लीना सोहोनी यांचं “अनुवादाकडून अनुसर्जनाकडे” हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. लीना सोहोनी हे नाव मराठीत अनुवादिका म्हणून प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत त्यांनी अनुवाद केलेली पन्नासच्यावर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा अनुभव व अधिकार वेगळा सांगायला नको. त्यांचे हे पुस्तक "अनुवादातून अनुसर्जनाकडे" पुस्तकाचा पहिला भागात लीना सोहोनी यांनी आपल्या अनुवादाच्या प्रवासाचं सिंहावलोकन केलं आहे. त्यांनी अनुवादाची सुरुवात कशी केली, त्यात प्रगती कशी झाली हे लिहिलं आहे. अनुवादामुळे प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर, सुधा मूर्ती, किरण बेदी यांच्याशी जुळलेले संबंध आणि त्यांच्या भेटीची वर्णनं आहेत. ह्या प्रवासात “मेहता पब्लिशिंग हाऊस” या प्रकाशन संस्थेचा भरभक्कम पाठिंबा त्यांना मिळाला. सुनील मेहता आणि अनिल मेहता यांच्याबरोबरच्या आठवणी सुद्धा पुस्तकात आहेत. पुढच्या भागात अनुवाद या विषयाची एखाद्या शास्त्रीय शोधनिबंधाप्रमाणे माहिती दिलेली आहे. यात अनुवाद प्रक्रियेकडे अतिशय बारकाईने बघितलं आहे. ...Read more

MAHASAMRAT ZANZAVAT
MAHASAMRAT ZANZAVAT by VISHWAS PATIL Rating Star
मिलिंद रोहोकले

फारच छान आहे