* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788184983821
  • Edition : 14
  • Publishing Year : JULY 1982
  • Weight : 50.00 gms
  • Pages : 84
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :VYANKATESH MADGULKAR COMBO SET - 41 BOOKS
  • Discount : SPECIAL OCTOBER DISCOUNT 33/50 PERCENT(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
TIME FLOWS RELENTLESSLY AND SO DOES THE STRUGGLE. IT DOES NOT TAKE A BREAK. IF AT ALL THERE IS ANY CHANGE THEN IT IS IN THE FORM OF HIGH TIDE OR OVERFLOWING. IT IS ALWAYS ON THE SIDE OF WORSENING. WHENEVER THERE ARE MORE MOUTHS TO FEED, A LOT OF PEOPLE AROUND THIS STRUGGLE REACHES TO PEAK. WHENEVER SHARING LAND AND FOOD BECOMES INEVITABLE, RESISTANCE IS UNAVOIDABLE. CONFRONTATION IS AT ITS WORST WHEN SOMEONE TRIES TO INTRUDE OUR CASTE AND OUR SYSTEM AND THEN TRIES TO BREAK THROUGH THE IMPREGNABLE WALLS OF SOCIETY. THOSE WHO ARE REALLY ABLE TO SPEAK, OFTEN BLURT OUT THEIR ANGER AND ANTAGONISM THROUGH WORDS. THOSE WHO ARE NOT ABLE TO SPEAK OUT, REFLECT THEIR LOVE AND HATRED THROUGH ACTIONS, BODY LANGUAGE AND SO ON. ONCE STRUGGLE STARTS, IT TAKES A HIDEOUS FORM. WORDS APPEAR TO BE DEFICIENT. WEAPONS TAKE PLACE OF WORDS THEN. WHENEVER THERE IS A SHORTAGE OF WEAPONS, THEN OFTEN TUSKS AND NAILS ARE USED IN PLACE. STRUGGLE ENVELOPES EVERYTHING.
काळाप्रमाणेच संघर्षही सतत वाहतच असतो. त्याला खंड असा नसतोच. असलीच; तर भरती असते, पूर असतो.जेव्हा-जेव्हा खाणारी तोंडं भरमसाट वाढतात, गर्दी होते, तेव्हा-तेव्हा संघर्ष बळावून उठतो. जेव्हा उपलब्ध अन्नात, भूमीत वाटेकरी निर्माण होतात, तेव्हा संघर्ष उचल खातो.जेव्हा अस्थिरता निर्माण होते, एखादी जात धोक्यात येते, बाहेरून परकं कोणी येतं आणि बंदिस्त टोळीत घुसू पाहतं, तेव्हा संघर्ष उतू जातो. ज्यांना बोलता येतं; ते हा राग, उद्दामपणा, संघर्ष’ शब्दांतून दाखवतात. ज्यांना बोलता येत नाही, त्यांचे राग-लोभ, प्रेम हावभावांतून, स्पर्शातूनच सांगितले जातात. संघर्ष पेटला की, शस्त्रास्त्रं वापरली जातात. ज्यांना शस्त्रास्त्रं माहीतच नसतात, ते सुळे, नखं वापरतात. संघर्ष’ सर्वत्र भरून राहिलेला असतो.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#PRESBYTIS ENTELLUS#HANUMAN LANGUR #VYANKATESH MADGULKAR#MANTARLELE BET#BIG CITY LITTLE BOY#MANUEL KOMROFF#MANHATAN# #व्यंकटेश माडगुळकर#मंतरलेले बेट#बिग सिटी लिटील बॉय#कॉमरॉफ#
Customer Reviews
  • Rating StarShrijeevan Tondale

    संघर्ष. जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक प्राण्याला संघर्ष हा करावाच लागतो. कधी स्वतःच्या अस्तित्वासाठी, तर कधी स्वतःला सिद्ध करण्यासाठी, कधी सत्ता मिळवण्यासाठी, तर कधी मिळालेली सत्ता टिकवून ठेवण्यासाठी, अन्नासाठी, जगण्यासाठी, जगवण्यासाठी संघर्ष हा सर्वत्र आहे. मग तो माणसांच्या जंगलात असो वा प्राण्यांच्या. संघर्ष हा कधीच संपत नाही. सदैव सर्वकाळ संघर्ष प्रवाहित असतो. असेच जंगलातील संघर्षाची कथा सांगणारे एक पुस्तक घेऊन मी आज तुमच्या भेटीला आलो आहे.लेखक व्यंकटेश माडगूळकर लिखित सत्तांतर. या कादंबरीचा पुस्तक परिचय माझ्या ब्लॉग वर नक्की वाचा. ...Read more

  • Rating StarMoin K

    माडगूळकर सरांचं मी वाचलेलं दुसरं पुस्तक सत्तांतर हे होय..सत्तांतर मी २ वेळा वाचलं आणि दोन्ही वेळा काही नवीन अर्थ उमजले/समजले. प्रत्येकानी एकदा तरी वाचावं असं एक छोटेखानी पुस्तक आहे..माकडांचे विश्व आणि त्यांच्यात चालणारा सत्तेसाठी चालणारा संघर्ष हा ा पुस्तकाचा गाभा आहे.माकडांचे निरीक्षण ज्याप्रकारे लेखकांनी केले ते अक्षरशः आपल्याला ते क्षण जगवतात.पुस्तकातील रेखाटलेले माकडाचे चित्र सुद्धा अफलातून आहे. काळाप्रमाणेच संघर्षही सतत वाहतच असतो. त्याला खंड असा नसतोच. असलीच, तर भरती असते, पूर असतो. जेव्हा जेव्हा खाणारी तोंडं भरमसाट वाढतात, गर्दी होते. तेव्हा तेव्हा संघर्ष बळावून उठतो. जेव्हा उपलब्ध अन्नात, भूमीत वाटेकरी निर्माण होतात, तेव्हा संघर्ष उचल खातो. जेव्हा अस्थिरता निर्माण होते, एखादी जात धोक्यात येते, बाहेरून परकं कोणी येतं आणि बंदिस्त टोळीत घुसू पाहतं. तेव्हा संघर्ष उतू जातो..ज्यांना बोलता येतं, ते हा राग, उद्दामपणा, संघर्ष शब्दांतून दाखवतात. ज्यांना बोलता येत नाही, त्यांचे राग-लोभ प्रेम हावभावांतून, स्पर्शातूनच सांगितले जातात...संघर्ष पेटला, की शस्त्रास्त्रं वापरली जातात ज्याना शस्त्रास्त्र माहीतच नसतात, ते सुळे, नख वापरतात. संघर्ष सर्वत्र भरून राहिलेला असतो.. सत्तांतर ही कथा आहे एका मुडा नावाच्या वानराची व त्याच्या टोळीची आणि त्यांच्यामधील होणाऱ्या सत्ता परिवर्तनाची किंवा संघर्षाची ..आपल्या अधिपत्य गाजवण्यासाठी होणाऱ्या धडपडीची.. पुस्तकातील वानराची प्रजाती/जात `हनुमान लंगुर`ही आहे. लेखकांनी अश्या प्रकारे ही कथा आपल्यासमोर ठेवली आहे जी आपल्याला ते दृश्य अगदी आपल्या डोळ्यासमोर दिसतात.पुस्तकामधील वानरांना त्यांच्या स्वभाव शरीर वैशिष्ट्यांनुसारच लेखकांनी नावे दिली आहे.लेखकांनी प्रत्येक वानराचे खूपच चांगल्याप्रकारे वर्णन केले आहे..मुडा,उनाडी, लांडी ,तरणी, थोटी, लाजरी,बोकांडी,काणी, बोथरी, लालबुड्या,मोगा,जाडी इत्यादी वानरांची नावे आपल्या ध्यानात राहतात व आपण त्यांच्या प्रेमात पडतो..या छोट्याशा पुस्तकामध्ये आपण रमून जातो व पुढे काय होते याची सारखी उत्सुकता आपल्याला राहते.हे पुस्तक वाचत असताना काही प्रसंग,वर्णन वाचत असताना मनाला एकंदरीत दुःख होतो उदा :- बोथरी रान कुत्र्याच्या जबड्यात सापडते तेव्हा,लालबुड्याला सर्प चावतो व तो हाल हाल होऊन मरतो तेव्हा,मुडा लढून हारतो व मरतो तेव्हा,लांडी आपल्या मेलेल्या मुलाला ४ दिवस घेऊन फिरते तेव्हा इत्यादी काही प्रसंगी आपले डोळे आपसूकच ओले होतात..ताकदीच्या जोरावर चालणारा हा सत्तांतराचा खेळ आपल्याला समाजात सुद्धा चालताना दिसतो.फरक फक्त एवढाच की मानवाचा खेळ हा स्वार्थी असून माकडांचा खेळ स्वार्थी नसून आपल्या टोळीला सोबत घेऊन चालणारा आहे.कालचक्राप्रमाणे हा खेळ सुद्धा शेवटपर्यंत चालत राहणारा आहे..आपल्याला आयुष्यातील काही गोष्टीं खरंच किती विचित्र आणि भयानक असतात याची प्रचिती आपल्याला सत्तांतर वाचत असताना येते.. या पुस्तकाबद्दल लिहायला खूप काही आहे पण येथे वाचल्यापेक्षा ते तुम्ही पुस्तकांतच वाचून अनुभवावे... ...Read more

  • Rating StarSachin Patil

    काळाप्रमाणेच संघर्षही सतत वाहतच असतो. त्याला खंड असा नसतोच. असलीच तर भरती असते, पूर असतो. जेव्हा जेव्हा खाणारी तोंडं भरमसाठ वाढतात, गर्दी होते, तेव्हा-तेव्हा संघर्ष बळावून उठतो. जेव्हा उपलब्ध अन्नात, भूमीत वाटेकरी निर्माण होतात, तेव्हा संघर्ष उचल खात. जेव्हा अस्थिरता निर्माण होते, एखादी जात धोक्यात येते, बाहेरून परकं कोणी येतं आणि बंदिस्त टोळीत घुसू पाहतं, तेव्हा संघर्ष उतू जातो. ज्यांना बोलता येतं, ते हा राग, उद्दामपणा, संघर्ष शब्दांतून दाखवतात. ज्यांना बोलता येत नाही त्यांचे रागलोभ, प्रेम हावभावातून, स्पर्शातून सांगितलं जातं. संघर्ष पेटला की शस्त्रास्त्र वापरली जातात. ज्यांना शस्त्रास्त्र माहीतच नसतात, ते सुळे, नखं वापरतात. संघर्ष सर्वत्र भरून राहिलेला असतो.- सत्तांतर ...Read more

  • Rating StarRakeshkumar Ramteke

    हे पुस्तक माडगूळकरांनी गोंदिया जिल्ह्यातील `नागझिरा`अभयारण्यातील माकडाच्या टोळीचे निरिक्षण करून लिहिले आहे.या पुस्तकातील निसर्गाचे वर्णन,जंगलातील विविध विभ्रम,माकडांच्या टोळीचे सूक्ष्म निरिक्षण केवळ अप्रतिम! हे पुस्तक वाचतांना नागझि-याचे जंगल दृगोचर ोते. माझे अत्यंत आवडते पुस्तक. नागझिरा येथे गेलो की सत्तांतर आठवते. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MI GALIB BOLTOY
MI GALIB BOLTOY by SHABBIR ROMANI Rating Star
Arvind deshpande

Mirza Ghalib is the Jewel in the Urdu literature. He is the pioneer in setting new trend in it. Authar Shabbir Romani excellently explained it. Everyone who is not acquainted with urdu literature should go throw it. The socio political and historicalenviorn of that time is skillfully reflected in his poetry and was narrated by author shabbir Romani. ...Read more

NADIMUKH
NADIMUKH by PERUMAL MURUGAN Rating Star
गार्गी म्हात्रे

पेरुमाल मुरुगन ह्या तामिळ लेखकाच " नदीमुख" हे अनुवादित पुस्तक वाचले. मराठी मध्ये दाक्षिणात्य भाषां मधल्या तामिळ भाषेच्या उत्तम साहित्याची वाचन संधी या पुस्तकाच्या निमित्ताने मिळाली. साठच्या दशकात जन्मलेल्या पिढीला वेगाने ,खर तर अती वेगाने बदलत जाणाऱ्ा तंत्रज्ञान व तरुण पिढीची मानसिकता यांचे सुंदर चित्रण या कादंबरी मध्ये करण्यात आले आहे. माणूस किंवा असुर पालक असला की मुलांच्या भविष्याची चिंता त्यामधून उद्भवणारा संघर्ष साध्या सोप्या पण प्रवाही भाषेमधून आपल्या समोर उभा राहातो. कुमारासुराच्या एकसुरु झापडे लावून घेतलेल्या आयुष्यात `नदीमुख` दर्शना नंतर झालेली तगमग व बदल यांचे खूप सुंदर वर्णन शेवटी आलेल आहे. डॉ. मानसी जयंत केळकर यांनी अतिशय प्रवाही भाषेत व उत्कृष्ट समर्पक शब्दात पुस्तक अनुवादित केल्यामुळे कांदबरीची मजा घेता येते. मराठी व्यतिरिक्त अन्य भाषेतील साहित्य वाचनाला उपलब्ध करुन दिल्या बद्दल मेहता पब्लिशिंग हाऊस व डॉ मानसी केळकर यांचे आभार ! ...Read more