- Shrijeevan Tondale
संघर्ष. जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक प्राण्याला संघर्ष हा करावाच लागतो. कधी स्वतःच्या अस्तित्वासाठी, तर कधी स्वतःला सिद्ध करण्यासाठी, कधी सत्ता मिळवण्यासाठी, तर कधी मिळालेली सत्ता टिकवून ठेवण्यासाठी, अन्नासाठी, जगण्यासाठी, जगवण्यासाठी. संघर्ष हा सर्वत्र आहे. मग तो माणसांच्या जंगलात असो वा प्राण्यांच्या. संघर्ष हा कधीच संपत नाही. सदैव सर्वकाळ संघर्ष प्रवाहित असतो. असेच जंगलातील संघर्षाची कथा सांगणारे एक पुस्तक घेऊन मी आज तुमच्या भेटीला आलो आहे.लेखक व्यंकटेश माडगूळकर लिखित सत्तांतर. या कादंबरीचा पुस्तक परिचय माझ्या ब्लॉग वर नक्की वाचा.
- Moin K
माडगूळकर सरांचं मी वाचलेलं दुसरं पुस्तक सत्तांतर हे होय..सत्तांतर मी २ वेळा वाचलं आणि दोन्ही वेळा
काही नवीन अर्थ उमजले/समजले.
प्रत्येकानी एकदा तरी वाचावं असं एक छोटेखानी पुस्तक आहे..माकडांचे विश्व आणि त्यांच्यात चालणारा सत्तेसाठी चालणारा संघर्ष हा या पुस्तकाचा गाभा आहे.माकडांचे निरीक्षण ज्याप्रकारे लेखकांनी केले ते अक्षरशः आपल्याला ते क्षण जगवतात.पुस्तकातील रेखाटलेले माकडाचे चित्र सुद्धा अफलातून आहे.
काळाप्रमाणेच संघर्षही सतत वाहतच असतो. त्याला खंड असा नसतोच. असलीच, तर भरती असते, पूर असतो. जेव्हा जेव्हा खाणारी तोंडं भरमसाट वाढतात, गर्दी होते. तेव्हा तेव्हा संघर्ष बळावून उठतो. जेव्हा उपलब्ध अन्नात, भूमीत वाटेकरी निर्माण होतात, तेव्हा संघर्ष उचल खातो. जेव्हा अस्थिरता निर्माण होते, एखादी जात धोक्यात येते, बाहेरून परकं कोणी येतं आणि बंदिस्त टोळीत घुसू पाहतं. तेव्हा संघर्ष उतू जातो..ज्यांना बोलता येतं, ते हा राग, उद्दामपणा, संघर्ष शब्दांतून दाखवतात. ज्यांना बोलता येत नाही, त्यांचे राग-लोभ प्रेम हावभावांतून, स्पर्शातूनच सांगितले जातात...संघर्ष पेटला, की शस्त्रास्त्रं वापरली जातात ज्याना शस्त्रास्त्र माहीतच नसतात, ते सुळे, नख वापरतात. संघर्ष सर्वत्र भरून राहिलेला असतो..
सत्तांतर ही कथा आहे एका मुडा नावाच्या वानराची व त्याच्या टोळीची आणि त्यांच्यामधील होणाऱ्या सत्ता परिवर्तनाची किंवा संघर्षाची ..आपल्या अधिपत्य गाजवण्यासाठी होणाऱ्या धडपडीची..
पुस्तकातील वानराची प्रजाती/जात `हनुमान लंगुर`ही आहे.
लेखकांनी अश्या प्रकारे ही कथा आपल्यासमोर ठेवली आहे जी आपल्याला ते दृश्य अगदी आपल्या डोळ्यासमोर दिसतात.पुस्तकामधील वानरांना त्यांच्या स्वभाव शरीर वैशिष्ट्यांनुसारच लेखकांनी नावे दिली आहे.लेखकांनी प्रत्येक वानराचे खूपच चांगल्याप्रकारे वर्णन केले आहे..मुडा,उनाडी, लांडी ,तरणी, थोटी, लाजरी,बोकांडी,काणी, बोथरी, लालबुड्या,मोगा,जाडी इत्यादी वानरांची नावे आपल्या ध्यानात राहतात व आपण त्यांच्या प्रेमात पडतो..या छोट्याशा पुस्तकामध्ये आपण रमून जातो व पुढे काय होते याची सारखी उत्सुकता आपल्याला राहते.हे पुस्तक वाचत असताना काही प्रसंग,वर्णन वाचत असताना मनाला एकंदरीत दुःख होतो उदा :- बोथरी रान कुत्र्याच्या जबड्यात सापडते तेव्हा,लालबुड्याला सर्प चावतो व तो हाल हाल होऊन मरतो तेव्हा,मुडा लढून हारतो व मरतो तेव्हा,लांडी आपल्या मेलेल्या मुलाला ४ दिवस घेऊन फिरते तेव्हा इत्यादी काही प्रसंगी आपले डोळे आपसूकच ओले होतात..ताकदीच्या जोरावर चालणारा हा सत्तांतराचा खेळ आपल्याला समाजात सुद्धा चालताना दिसतो.फरक फक्त एवढाच की मानवाचा खेळ हा स्वार्थी असून माकडांचा खेळ स्वार्थी नसून आपल्या टोळीला सोबत घेऊन चालणारा आहे.कालचक्राप्रमाणे हा खेळ सुद्धा शेवटपर्यंत चालत राहणारा आहे..आपल्याला आयुष्यातील काही गोष्टीं खरंच किती विचित्र आणि भयानक असतात याची प्रचिती आपल्याला सत्तांतर वाचत असताना येते..
या पुस्तकाबद्दल लिहायला खूप काही आहे पण येथे वाचल्यापेक्षा ते तुम्ही पुस्तकांतच वाचून अनुभवावे...
- Sachin Patil
काळाप्रमाणेच संघर्षही सतत वाहतच असतो. त्याला खंड असा नसतोच. असलीच तर भरती असते, पूर असतो. जेव्हा जेव्हा खाणारी तोंडं भरमसाठ वाढतात, गर्दी होते, तेव्हा-तेव्हा संघर्ष बळावून उठतो. जेव्हा उपलब्ध अन्नात, भूमीत वाटेकरी निर्माण होतात, तेव्हा संघर्ष उचल खातो. जेव्हा अस्थिरता निर्माण होते, एखादी जात धोक्यात येते, बाहेरून परकं कोणी येतं आणि बंदिस्त टोळीत घुसू पाहतं, तेव्हा संघर्ष उतू जातो.
ज्यांना बोलता येतं, ते हा राग, उद्दामपणा, संघर्ष शब्दांतून दाखवतात. ज्यांना बोलता येत नाही त्यांचे रागलोभ, प्रेम हावभावातून, स्पर्शातून सांगितलं जातं.
संघर्ष पेटला की शस्त्रास्त्र वापरली जातात. ज्यांना शस्त्रास्त्र माहीतच नसतात, ते सुळे, नखं वापरतात.
संघर्ष सर्वत्र भरून राहिलेला असतो.-
सत्तांतर
- Rakeshkumar Ramteke
हे पुस्तक माडगूळकरांनी गोंदिया जिल्ह्यातील `नागझिरा`अभयारण्यातील माकडाच्या टोळीचे निरिक्षण करून लिहिले आहे.या पुस्तकातील निसर्गाचे वर्णन,जंगलातील विविध विभ्रम,माकडांच्या टोळीचे सूक्ष्म निरिक्षण केवळ अप्रतिम! हे पुस्तक वाचतांना नागझि-याचे जंगल दृगोचर होते. माझे अत्यंत आवडते पुस्तक. नागझिरा येथे गेलो की सत्तांतर आठवते.
- Sandip R Chavan
सत्तांतर हे व्यकंटेश माडगूळकर यांचं माकडांच्या टोळीमधील सत्तासंघर्षावर आणि त्यांच्या टोळीयुद्धावर आधारलेले छोटेखानी पुस्तक आहे.
टोळीप्रमुख (हुप्प्या) होऊन सत्ता मिळवण्यासाठी आणि मिळालेल्या सत्तेतून उपभोग घेण्यासाठी ही माकडं कोणत्या थराला जातात याचे वर्णन या पुस्तकात आहे.
साम, दाम, दंड, भेद ही नीती वापरून प्रसंगी लहानलहान माकडांना मारून सत्ता मिळवली जाते... लेखक या गोष्टीकडे जंगलमधील प्राणिजीवन यादृष्टीने पाहतात... परंतु मानवाचा पूर्वज माकड होता असे म्हंटले जाते... सध्या त्याचीच प्रचिती येत आहे.
- Moin K
सत्तांतर ही कथा आहे एका #मुडा नावाच्या वानराची व त्याच्या टोळीची आणि त्यांच्यामधील होणाऱ्या सत्ता परिवर्तनाची .. पुस्तकातील वानराची प्रजाती/जात `हनुमान लंगुर`ही आहे..
लेखकांनी अश्या प्रकारे ही कथा आपल्यासमोर ठेवली आहे की आपल्याला ते दृश्य अगदी आपल्या डोळ्यासमोरच दिसतात..पुस्तकामधील वानरांना त्यांच्या स्वभाव शरीर वैशिष्ट्यांनुसारच लेखकांनी नावे दिली आहे...लेखकांनी प्रत्येक वानराचे खूपच चांगल्याप्रकारे वर्णन दिले आहेत..मुडा,उनाडी, लांडी ,तरणी, थोटी, लाजरी,बोकांडी,काणी, बोथरी, लालबुड्या,मोगा,जाडी इत्यादी वानरांची नावे आपल्या ध्यानात राहतात ..या छोट्याशा पुस्तकामध्ये आपण रमून जातो व पुढे काय होते याची आपल्याला उत्सुकता राहते...पुस्तक वाचत असताना काही प्रसंग,वर्णन वाचत असताना मनाला दुःख होते उदाहरण बोथरी रान कुत्र्याच्या जबड्यात सापडते तेव्हा,लालबुड्याला सर्प चावतो व तो हाल हाल होऊन मरतो तेव्हा,मुडा लढून हारतो व मरतो तेव्हा,लांडी आपल्या मेलेल्या मुलाला ४ दिवस घेऊन फिरते तेव्हा इत्यादी..🙏
एकदा नक्कीच वाचा !!🙏
- Anil Patil
अतिशय सुंदर पुस्तक, माडगूळकरांचं निरीक्षण जबरदस्त आहे
- Mayur Sarkale
व्यंकटेश माडगूळकर हे फार `पट्टीचे` कथालेखक म्हणून प्रसिद्ध आहेत.त्यांच्या कथा वाचताना आणि आपल्या डोळ्यासमोर घडताना त्यांची प्रतिभा आणि वरील वाक्य सतत जाणवत राहते.
माडगूळकरांनी त्यांच्या एकंदरीत लेखन प्रपंचात २०० हून अधिक कथा लिहिल्या, याव्यतिरिक्त ८ कादंबऱ्या देखील त्यांच्या नावावर आहेत, त्यापैकीच एक म्हणजे "सत्तांतर" होय.आपल्याला कादंबरी म्हणल्यावरती ३००-४०० पानांचा आराखडा - गठ्ठा समोर येतो. सत्तांतर ही केवळ ६३ पानांमध्ये घडते. मराठी साहित्य क्षेत्रात आणि त्यातला त्यात कादंबरीच्या प्रांतात अशी कादंबरी माझ्यामते फक्त पाश्चिमात्य साहित्यात पाहायला मिळेल. (असावी. उदा. अँनिमल फार्म -जाँर्ज ओरवेल). सत्तांतर ला साहित्य अकादमीचा पारितोषिक तर आहेच पण त्याहून या पुस्तकाच्या धाटणीचा ( आताच्या भाषेत प्लॉट ) चं अधिक कौतुक केलं गेलं होतं. मला ह्या धाटणीचा निवडीपेक्षा माडगूळकरांच्या विषयनिवडीच, धाडसाचं कौतुक वाटतं.
सत्तांतर ही संपूर्ण कथा माणसाच्या पूर्वजांमध्ये माकडांमध्ये घडते. सत्तांतर मधील वानरांची जात ही `हनुमान लंगुर` ही आहे. समाजामध्ये संघर्ष हा सतत पेटता असतो फक्त त्याला थोडीफार वाऱ्याची झुळूक लागली की मग तो उफाळून उग्रता दाखवतो, ४ हात भाजवतो, डोळ्यांत भीती निर्माण करतो आणि प्रसंगी तर जीव ही चाखून,चाटून -पुसून खातो. लेखक कथेतील वानरांच्या टोळ्यांना, त्यांच्या प्रमुखांना त्यांच्या शरीरवैशिष्टानुसार नावे देखील देतात त्यामुळे कथेतील रंजगता सतत आपल्याला धरून ठेवते.
समाज आणि जगणं म्हणलं की संघर्ष हा आलाच आणि त्यातल्या त्यात त्यामध्ये साम्राज्यवादाची झळ असेल,भूमिका असेल,उद्देश असेल तर मग हे सत्तांतर अटळच आहे.
संघर्ष करून एखादा स्वतःचा असा प्रदेश तयार करतो, आपली स्वतःची माणसं तयार करतो,आपली ताकत वाढवण्यासाठी तो हवे ते करतो हे सर्व कोणी ना कोणी पाहत असत त्याला हे सर्व आवडत असतं इथपर्यंत हिथपर्यंत ठीक पण त्याला हेच सर्व जेव्हा हवंहवंसं वाटू लागतं तेव्हा घडतं "
"सत्तांतर"
सत्तांतर म्हणजे सत्तेमधला बदल. दुसऱ्याची उलथवून आपली उभी करणं म्हणजे सत्तांतर.
लेखकाच्या बाकी ७ कादंबऱ्याना प्रस्तावना नाही. सत्तांतरला आहे कारण त्यावर लेखकाची अप्रतिम छाप पडलेली आहे. सत्तांतर मागे लेखकाचा खरा कस जाणवतो. प्रस्तावनेमध्ये त्यांनी विषयाची पार्श्वभूमी ही अगदी १८३६ पासून मांडली आहे. सत्तांतरसाठीचे विविध शास्त्रज्ञांनी लिहून ठेवलेली संदर्भ, त्यांची निरीक्षण आणि "लंगूर्स ऑफ अबू" या ग्रंथाचा त्यांना झालेला उपयोग असं बरंच त्यांनी लिहिलेलं आहे. माडगूळकरांची स्वतः ची काही महिन्यांची अभयारण्यातली निरीक्षण,छायाचित्र ही सत्तांतर मधून,त्या निवेदनामधून अक्षरशः बोलतात,उभी राहतात समोरासमोर.
मला वाटत पुस्तकाची प्रस्तावना एक पूर्ण वेगळी कथा आणि पुस्तकातली कथा अश्या वेगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे प्रस्तावणेच वेगळं भाष्य करायचं प्रयत्न केला.
एका बैठकीत संपूर्ण होईल आणि आपण अजब आणि जंगलामध्ये फिरून आलो की काय ? असा अनुभव आपल्यालाही येईल अशी अपेक्षा.