* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SUDHA MURTHY IS FROM THE NORTH KARNATAKA. PEOPLE HERE HAVE A TYPICAL PERSONALITY. THEY ALL CARRY THE CULTURE WITHIN THEMSELVES. ALL THE STORIES COLLECTED HERE RESEMBLE THE JASMINE GARLAND, EACH FLOWER CARRYING THE FRAGRANCE AND INTERWOVEN IN THE KARNATAKI THREAD. THE TENDEREST PART OF THE AUTHOR`S MIND COMES INTO LIGHT THROUGH THE WAY SHE HAS PICTURED THE UNCOMMON ASPECTS OF THE COMMON PEOPLE. SHE HAS ALSO BATHED IT IN LIGHT HUMOUR.
सुधा मूर्ती यांचं नर्मविनोदी शैलीतलं वैशिष्ट्यपूर्ण पुस्तक मराठीत! उत्तर कर्नाटकातल्या या सर्व माणसांना स्वत:चं असं खास व्यक्तित्व आहे. तसेच ते सगळे इथल्या वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीचा भागही आहेत. यातील सर्व कथा म्हणजे टपोया, सुगंधी मोगयाच्या फुलांचा गजरा, अस्सल कर्नाटकी गोफात गुंफलेला! या ‘सर्वसाधारण’ माणसांमध्ये जाणवणारं ‘असामान्यत्व’ लेखिकेच्या स्वभावातली ऋजुता अधोरेखित करतं.

No Records Found
No Records Found
Keywords
#SAMANYARALLI #ASAMANYA #SUDHA #MURTY #UMA #KULKARNI #BANDLE #BINDAPPA #CUNDOCTOR #BHIMANNA #ANGADI #JAYANNA #CHATUR #CHAMAVVA #SANDHISADHU #SEEMA #DABBAWALI #NALINI #सामान्यांतले #असामान्य #कथासंग्रह #उमा #कुलकर्णी #बंडल #बिंदप्पा #कंडक्टर #भीमण्णा #अंगडि #जयण्णा #चतुर #चामव्वा #संधिसाधू #सीमा #डब्बावाली #नलिनी
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    माणसाच्या स्वभावाचे विविध पैलू... ‘सामान्यातले असामान्य’ या सुधा मूर्तीलिखित कथासंग्रहात उत्तर कर्नाटकातल्या पार्श्वभूमीवरच्या कथा आहेत. कथांमधील व्यक्तींमध्ये अस्सल कर्नाटकी गुणधर्म असलेले कथांचे नायक-नायिका या कोणी असामान्य नाहीत. पण प्रत्येक माणसत काहीतरी चांगले-असामान्य असते. याच असामान्यत्वाचा शोध लेखिका घेते. असे करताना कधी विनोदी शैलीत व्यक्तिचित्रण केले आहे. उमा कुलकर्णींनी या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे. लेखिकेने प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे उ. कर्नाटकी संस्कृतीचा व भाषेचा थाटच वेगळा आहे. प्रादेशिक वैशिष्ट्य आहे. येथील माणसं वरवर ओबडधोबड वाटली तरी पारदर्शी आहेत. बोलण्यात, वागण्यात रोखठोकपणा जाणवला तरी भावनाशीलता व मृदुताही आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने प्रत्येक व्यक्तीचे स्वभाववैशिष्ट्य अधोरेखित होते. ‘बंडल बिंदप्पा’ या नावातच त्याच्या स्वभावाची कल्पना येते. वरवर जाणवणारा उद्धटपणा, पण आतून फणसासारखा गोड रसाळपणा हे कर्नाटकी वैशिष्ट्य बंडल बिंदप्पामध्ये पुरेपूर भरलंय. बिंदप्पाला बंडल या उपाधीची तमा नाही, राईचा पर्वत करणं हा त्याचा स्वभावधर्म. याचा फटका कित्येकांना बसूनही तो कोणाच्या क्रोधाचा बळी ठरत नाही. कारण त्याचं पराकोटीचं कन्नड प्रेम. कंडक्टर भीमण्णा एक अजब वल्ली. स्वत:च्या संसारापासून अलिप्त, सामान्य परिस्थितीतही सदा आनंदी असणारा भीमण्णा दिलदार आहे. त्यामुळे नोकरी गमवावी लागली तरी मूळ स्वभाव जात नाही. ‘जीवन म्हणजे मूळ कडुनिंबाचं मिश्रण. माझ्यासारख्याचं जीवन म्हणजे रंग नसलेलं चित्र. प्रत्येकाने आपापल्या मर्जीप्रमाणे रंग भरायचे. किरकिरता जीवनाचा कुठलाही रुट सोडून पळून जात नाही.’ हे भीमण्णाचं तत्त्वज्ञान. अंगडी जयण्णा हा सामान्य पण दिलदार माणूस. अंगडी म्हणजे दुकान लहानपणापासून व्यापाराची आवड असणारा जयण्णा दुकान चालवतो. पण अव्यवहारीपणामुळे बुडितखाती जातो. अखेर आजोबा मळा विकून कर्जफेड करतात. याच्याविरुद्ध आहे चंतुर चामव्व. सामान्य रूप, सामान्य शिक्षण, सामान्य परिस्थितीतील चामव्वा व्यवहाराला चतुर व स्वार्थी. पैसा हेच सर्वस्व मानणारी चामव्वा सतत फायद्या-तोट्याचाच विचार करताना दिसते. प्रेम, ममता या शब्दांशी तिचा काहीही संबंध नाही. वरवर गोड बोलणारी चामव्वा आतून कडवटपणाने युक्त आहे. म्हणूनच कोंडीत पकडून श्रीमंत सासर पटकवते; इतकेच नव्हे तर दागिने, तिजोरी लंपास करते. संसाराच्या आर्थिक नाड्या हातात घेण्यात यशस्वी ठरते. असूया. तिचं नाव अनसक्का. ही स्त्री अत्यंत मत्सरी. कधीही कुणाच्याही चांगल्या गुणांचे कौतुक न करणारी वृत्ती. म्हणूनच वैभवात असूनही असमाधानी, अतृप्त. पण तिचा हा अवगुण झाकला जातो तो तिच्या एका गुणामुळे. कुणाच्याही, कुठल्याही अडचणीला धावून जाऊन मदत करण्याचा मोठेपणा तिच्यात आहे. मुळात शहाणी असून स्वाभावाला चांगले वळण न लागल्याने स्वभावात आलेला विचित्रपणा आहे. गंगा एक सुंदर, कलाकुसर निपुण, वाचनाची आवड असणारी सुशिक्षित स्त्री. आपल्यातील या गुणांचा गर्व असलेली गंगा कुणात मिसळत नाही. इतरांवर टीका करणे, त्यांच्यातले न्यून शोधून तिरस्कार करणे, चेष्टा करणे हा स्वभावच बनून गेला. लग्नासाठी प्रत्येक मुलात काही तरी खोड काढण्याच्या सवयीमुळे अखेर लग्नापासून वंचित रहावे लागले. त्याचे पर्यवसान रागीटपणा, चिडचिड यात होते. स्त्रीला तडजोड करावी लागेल हे तिला वेळेवर न उमजल्याने आयुष्याची फरफट अटळ ठरते. अक्कमा स्वभावत:च परोपकारी. गावातल्या कोणासाठीही कोणत्याही प्रसंगी तिला वडीलकीच्या नात्याने बोलावले जाते. कोणत्याही अडचणीतून खंबीरपणे मार्ग काढू शकणारी अक्कमा निरपेक्ष वृ्तीने लोकांसाठी झटते. पण लोक तिला गृहीत धरतात. कोणत्याही स्वरूपात त्याची परतफेड करण्याचे भानही ठेवत नाहीत. ‘कोणी किती कृतज्ञता ठेवायची हे प्रत्येकाला त्याच्या आईनं जेवढं, जसं शिकवलं असेल त्यावर अवलंबून असतं. ती सगळ्यांना जगणारी गोष्ट नाही.’ हे अक्कमाचं तत्त्वज्ञान तिला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतं. बण्णभट्ट व पार्वती या विजोड जोडप्याचं वर्णन लेखिका नर्मविनोदी शैलीत करते. ‘नॉट मेड फॉर इच अदर’ अशी स्पर्धा आयोजित केली तर पहिला पुरस्कार मिळेल, पार्वती अत्यंत देखणी, हौशी, लिहा-वाचायची आवड, सिनेमाची आवड, स्वच्छतेची आवड असणारी, नटणारी चैत्रगौरीसारखी स्त्री. याउलट बण्णभट्ट तेलकट चेहरा, पुढे आलेलं पोट, जुनकट कपडे, पान खाऊन लाल झालेले, पुढे आलेले दात असं ध्यान. दोघांचे स्वभावही विरुद्ध रसिक पार्वतीला स्वप्नातला राजकुमार भेटलाच नाही. तिच्या इच्छा-आकांक्षा त्याला उमजल्याच नाहीत. तो अलिप्तसाच राहिला. पण पार्वतीच्या मृत्यूनंतर अगदी लवकरच बण्णभट्टही गेला. मनात तिच्याविषयी ओढ असूनही स्वभाववैशिष्ट्यामुळे त्याच्या भावना अव्यक्त राहिल्या. पण तिचं जाणं मात्र तो सहन करू शकला नाही. काही काही व्यक्ती अत्यंत स्वार्थी असतात. त्यांच्यामध्ये हा अवगुण वारशाने येत असावा. आई-वडिलांच्या शिकवणीमुळेच स्वत:वरची जबाबदारी टाळणे, स्वत:चं सुख, धन यापुढे पती, पुत्र यांचं प्रेमही दुय्यम ठरतं. सावित्री ही अशीच एक स्त्री. पराकोटीचा स्वार्थीपणा हेच त्यांचं असामान्यत्व! भागव्वा कणखर व्यक्तिमत्त्वाची, अपार आत्मविश्वास असणारी धाडसी, कोणत्याही परिस्थितीत मनाचं संतुलन ढळू न देता निर्णय घेऊ शकणारी स्त्री. बेताच्या परिस्थितीमुळे शिक्षण नाही आणि म्हणूनच बालपणीच लग्नबंधनात अडकलेली भागव्वा परिस्थितीला शरण जात नाही. तिचा नवरा रामण्णा स्वभावाने गरीब असल्याने जमिनीवर दिराचा कब्जा असतो. भागव्वा न घाबरता दिराकडे वाटणी मागते. कर्नाटकातल्या कडेकोट बंदोबस्तात, पुरुषप्रधान समाजाच्या बालेकिल्ल्याला या घटनेने प्रचंड धक्का बसतो. दिराच्या शिव्या, धमक्यांना भीक न घालता किडूकमिडूक विकून ती कोर्टात जाते. केस जिंकून जमीन ताब्यात घेते, संसार सांभाळते. प्रचंड मानसिक बळ, लीडरशिप हे तिचे अंगभूत गुण. सौदामिनीची कथाच वेगळी. सर्वसाधारण रूपाची दामिनी हुशार, धीट, चांगल्या स्वभावाची मुलगी. मध्यमवर्गीय कुटुंबात दामिनी पदवीधर होऊन बँकेत नोकरी करते. नशिबानं देखणा, डॉक्टर नवरा मिळतो. उत्कर्ष होऊन वैभव प्राप्त होतं. मग नातेवाईकांची, लोकांची, गरजूंची रीघ लागते मदतीसाठी. असं असूनही तिच्या मनात खंत आहे. दानधर्म केला तर तो काळा पैसा, केलेलं पाप फेडण्यासाठी देतात ही भावना. नाही दिले पैसे तर पेपरातून टीकास्त्र. लोकांची ही वृत्ती तिला व्यथित करते. फणीवेणी व नागवेणी या जुळ्या बहिणी. फणी चुणचुणीत, बुद्धिमान, सर्व विषयांत पहिला नंबर. म्हणून ‘फस्र्ट रँक फणी’. तर नागू सावळी, काटकुळी, सर्वसामान्य. त्यामुळे दोघींची नकळत तुलना होईल. दोघींमुळे स्नेह नव्हता. नागू अबोल. ती सामान्य स्थळी पडली पण सासरी कौतुक होतं. उलट फणीचं रूप, गुण, बुद्धिमत्ता हे अवगुण ठरले. नवरा अतिबुद्धिमान, गर्विष्ठ म्हणून फणीला दुय्यम मानून तिची अवहेलना होत राहिली. फणीची ‘ईर्षा’ नाहीशी होऊन तिचं मन कोमेजून जातं. पीएच. डी. करायची इच्छा अपूर्ण राहते. करिअर नाही, स्वत:चं अस्तित्वच उरत नाही. गुणी फणीच्या नशिबी असं जिणं येतं. शीनप्पा-सीताबाई हे मेड फॉर इच अदर जोडपं. दोघांनाही पैसा हेच सर्वस्व. त्यांच्या जीवनाची मूल्येच वेगळी. दोघंही गर्भश्रीमंत त्यामुळे फक्त बरोबरीच्या लोकांशीच संबंध ठेवणे, त्यांचे आदरातिथ्य करणे ही वृत्ती. गरिबांच्या वेदना, दु:खाशी त्यांचा काहीच संबंध नाही. पण कधी कधी काळाचा महिमा अगाध असतो. सून व मुलगी यांच्या उधळपट्टीमुळे, स्वार्थी वृत्तीमुळे संपत्तीस ओहोटी लागते आणि काळाच्या प्रवाहात सारे सामान्य होऊन जाते. सरसक्का सुंदर आहे पण बेताचं शिक्षण, बेताची परिस्थिती यामुळे रेड्यासारख्या श्रीपादशी विवाह होतो. श्रीमंत घराणं पण श्रीपाद अवगुणी, बाहेरख्याली असल्याने रोगग्रस्त असतो. फसवणूक झालेली सरसक्का वर्षभरातच विधवा होते आणि अपशकुनी म्हणून अवमानित होते. पण कोणाचं भाग्य कसं पालटेल ते कल्पनेच्या पलीकडचं असतं. तिचे कुटुंब बद्रीकेदारला यात्रेला जाते. तिथं लक्ष्मणझुल्यावर योगयोगाने सरसक्का व दीर श्रीहरी नदीत फेकले जातात. त्यांचा पत्ता लागत नाही पण ते सुदैवाने वाचतात. दूर निघून जाऊन विवाह करतात, सुखी होतात. जीवण्णा एक गर्भश्रीमंत माणूस, पण त्याच्या बाह्यरूपावरून व चिकट स्वभावावरून याची कल्पना येणेही कठीण. भिक्षुकासारखे कपडे, जेवणातही काटकसर. त्याच्या या स्वभावामुळे मुलगा व मुलगी दुरावले पण अर्धांगवायू व परावलंबित याने चिकट जीवण्णाला चांगलाच धडा शिकला. अंबक्का सर्वसामान्य पण सुगरण, स्वयंपाकघरात रमणारी गृहिणी. तिचा सुशिक्षित पती यामुळे कंटाळलेला पण तिच्या आजारपणामुळे तिचं महत्त्व पटतं. ताराबाईला भांडण अतिशय प्रिय. त्यासाठी तिला कोणत्याही प्रसंगाची गरज वाटत नाही. भांडण समोर आलं की तिचं व्यक्तिमत्त्व वेगळं होतं. उत्साह द्विगुणित होतो. समोरच्याला हिणवण्यात, नामोहरम करण्यात तिचा हात कुणीही धरणार नाही पण भांडण संपल्यावर मन शांत होऊन त्याचा मागमूसही राहत नाही. अशा शब्दात लेखिका तिचं वर्णन करते. सीमा संधिसाधू, चतुर आहे. कुणी डोनेशन मागायला आलं तर सरळ सासूच्या हातात अधिकार आहेत म्हणून सुटका करून घेते. डब्बावाली नलिनी एक अजब व्यक्तिमत्त्व. कार्याला जायला जमलं नाही तर रिकामा डबा पाठवून देऊन कोणाकडून मागवते. वरकरणी हे विचित्र वायतं पण तिचं मन निर्मळ आहे, हेतू उदात्त आहे, डबा आणणाऱ्याशी बोलता येतं. स्वत: डबा पोचवायला, परत करायला जाते तेव्हा त्यांच्याशी बोलून त्यांची दु:खं हलकी करता येतात. सांत्वन करता येतं. मन मोकळं होतं, हा चांगला हेतू त्यामागे असतो. याची किती जणांना जाणीव असते? माणसामध्ये असलेले गुण-अवगुण हेरून ते शब्दबद्ध करताना लेखिकेने कुठेही वाईट हेतू किंवा अढी ठेवलेली नाही. माणसाच्या स्वभावाचे हे विविध पैलू उलगडणे एवढाच हेतू. माणूस कोणत्याही प्रांतातला, प्रदेशातला असो, त्याची भाषा, संस्कृती यात वेगळेपणा असो पण माणूस म्हणून तो अंतर्बाह्य फार वेगळा नसतो. त्याच्यामधील सत्-असत्, स्वार्थ, परोपकार, कठोरपणा, मृदुता, प्रेम, स्नेह, त्वेष, मत्सर, हेवा हे सारेच सर्वांच्या ठायी असतेच. अशा विविध गुणावगुणांनी युक्त माणसावर आपण प्रेम करतो. त्याच्यामधल्या अवगुणाकडे सहानुभूतीने पाहून त्याला जवळ करतो. मग त्यातच माणुसकीचं दर्शन घडतं. लेखिकेच्या अशा उदार दृष्टिकोनातून हे साध्य झालेलं दिसतं. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

PRATIKSHA
PRATIKSHA by RANJEET DESAI Rating Star
Mahesh Muley

अतिशय सुंदर पुस्तक, आयुष्य जगताना खूप काही हरवले आहे वाटते पण हे पुस्तक नव्याने जगायला आणि आहे ती परिस्थिती स्वीकारायला वाटा शोधायला नवीन प्रेरणा देते, सध्या समाजाची स्थिती बदलली असताना स्त्रियांना आणि त्यांच्या भावनांचा विचार करण्यासाठी नैतिकता जागेकरण्याला हे रणजीत देसाई लिखित पुस्तक खूपच महत्त्वाचे ठरेल... ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
विजय भास्कर, अमरावती

*दुर्दम्य : दहा कोटीत एक असा अजब ऑफिसर* *प्रामाणिकपणाचा दर्प, माणुसकीचा स्पर्श आणि एकाकी आयुष्याची कहाणी. काही माणसं आपल्या आयुष्यात येतात, आपल्या कामाचा आणि जगण्याचा ठसा उमटवतात; पण त्यांना एका शब्दात चांगलं किंवा वाईट ठरवणं कठीण अतं. त्यांच्या स्वभावातील विरोधाभासच त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवतात. ‘दुर्दम्य – अजब ऑफिसरची गजब गोष्ट’ हे जी. बी. देशमुख यांचं पुस्तक अशाच एका विलक्षण व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देतं. केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात सुमारे पंचवीस वर्षे सहकारी म्हणून अनुभवलेले सी. व्ही. कृष्णन एकनाथानन, म्हणजेच एकनाथन, यांचं व्यक्तिचित्र लेखकाने कोणताही कृत्रिम मुलामा न देता रेखाटलं आहे. त्यांच्या कठोर शिस्तीमागची तत्त्वनिष्ठा, विचित्र वाटणाऱ्या सवयींमागची भूमिका आणि एकाकीपणाच्या आड दडलेली माणुसकी उलगडत जाते. त्यामुळे हे केवळ एका अधिकाऱ्याचं चरित्र राहत नाही; ते माणसाला समजून घेण्याचा प्रयत्न ठरतं. *पहिली भेट : हात मागे घेतला!* ४ जुलै १९८८. चंद्रपूरहून अमरावतीला बदली होऊन आलेल्या लेखकाची एकनाथन यांच्याशी पहिली भेट. उंच, धिप्पाड आणि गंभीर व्यक्तिमत्त्वाच्या या अधिकाऱ्यांसमोर लेखकाने हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत एवढंच म्हटलं— “So you are reporting today. Okay.” या कोरड्या प्रतिसादातून त्यांच्या स्वभावाची पहिली झलक दिसते. मात्र, पुढे लेखकाने दिलेल्या टंकलेखनाच्या कामाची अचूकता पाहून आणि तो मेजर पी. के. बापट यांच्याकडे काम करून आल्याचं समजल्यावर एकनाथन म्हणाले— “Only a military man can carve out such workers. I am impressed.” कडक शिस्तीचा आग्रह धरणारा हा अधिकारी गुणवत्तेची दखल घ्यायलाही तितकाच तत्पर होता. पहिल्या भेटीत हात मागे घेणारा माणूस कामातील गुणवत्तेसमोर मात्र मनमोकळेपणाने दाद देतो. इथूनच या व्यक्तिमत्त्वातील विरोधाभासांची रंजक ओळख सुरू होते. *दोन रुपये चाळीस पैशांतून दिसलेलं तत्त्वज्ञान* एका व्यापाऱ्याकडून चुकून दोन रुपये चाळीस पैसे जास्त घेतले गेल्याचं लक्षात आल्यानंतर एकनाथन यांनी ती रक्कम परत करण्यासाठी स्वतःचे शंभर रुपये खर्च करून माणूस पाठवला. रक्कम छोटी होती; पण हिशेबातील तत्त्व मोठं होतं. त्यांच्या दृष्टीने पैशाची किंमत त्याच्या रकमेवर नव्हे, तर तो योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचण्याच्या प्रामाणिकपणावर ठरत होती. नियम पाळताना ते कोणतीही तडजोड करत नसत. मात्र, कर्मचाऱ्याचा न्याय्य लाभ असेल, तर त्याला मंजुरी देण्यासही ते मागेपुढे पाहत नसत. नियमभंग करणाऱ्यांसाठी कठोर आणि हक्कासाठी पात्र असणाऱ्यांसाठी तत्पर, ही त्यांच्या कार्यपद्धतीची दोन टोकं होती. त्यांची वक्तशीरपणाची कल्पनाही विलक्षण होती. उशिरा येणं चुकीचं; पण वेळेच्या खूप आधी येणंसुद्धा शिस्तीच्या चौकटीबाहेरचं! “Before time is also not the right time.” या भूमिकेतून त्यांच्या नियमप्रियतेचा अतिरेक जाणवतो; पण त्याच वेळी प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःची एक काटेकोर चौकट असणारा माणूसही दिसतो. *शिस्तीच्या पोलादी चौकटीमागचा माणूस* एकनाथन यांची शिस्त कधी कधी इतरांना विक्षिप्तपणाच्या जवळ जाणारी वाटे. स्फोटक कारखान्यातील सुरक्षानियमांचं काटेकोर पालन असो किंवा बंदुकीच्या हाताळणीतील खबरदारी, नियम म्हणजे केवळ कागदावरचे शब्द नव्हेत, अशी त्यांची धारणा होती. पण या कठोरतेला दुसरी बाजूही होती. कार्यालयातील शिपाई पत्नी-मुलांसह त्यांच्या वातानुकूलित दालनात झोपलेला आढळला. अशा वेळी कारवाई होईल, अशी अपेक्षा असताना एकनाथन यांनी त्याला विचारलं, “तुम हमारे चेंबर मे सोता?” या प्रश्नात नियम मोडल्याची जाणीव होतीच; पण त्याहून आधी दुसऱ्या माणसाच्या परिस्थितीची जाणीव होती. त्यांच्या स्वभावातली ही माणुसकी मोठ्या भाषणांतून नव्हे, तर अशा छोट्या प्रसंगांतून व्यक्त होते. म्हणूनच त्यांचं व्यक्तिचित्र एकरेषीय होत नाही. *एकटेपणाचा स्वीकार की त्याची किंमत?* एकनाथन यांनी अविवाहित राहणं, मोजक्याच वस्तूंमध्ये आयुष्य घालवणं, दूरचित्रवाणी-रेडिओपासून दूर राहणं आणि सामाजिक समारंभ टाळणं पसंत केलं. स्वतःच्या अवकाशाबाबत ते अत्यंत आग्रही होते. नातेसंबंधांच्या गर्दीपेक्षा एकांत त्यांना अधिक जवळचा वाटत होता. मात्र, आयुष्याच्या उत्तरार्धात आजारपणाने त्यांची शारीरिक स्वायत्तता हिरावून घेण्यास सुरुवात केली. कर्करोगावरील उपचारांसाठी केरळला गेल्यानंतर भावाच्या घरी राहणंही त्यांना अवघड वाटलं. आपल्यामुळे भावाच्या कुटुंबाला गैरसोय होऊ नये, या विचाराने त्यांनी हॉटेलमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. स्वाभिमान आणि स्वावलंबन यांची ही भूमिका समजण्यासारखी असली, तरी तिची किंमत एकटेपणाच्या रूपाने मोजावी लागते. लेखकाने दिलेल्या वडिलांच्या जुन्या पलंगावर अखेरच्या काळात त्यांना आधार मिळाला, हा तपशील मनाला स्पर्शून जातो. आयुष्यभर व्यवहारात काटेकोर राहिलेल्या एकनाथन यांनी त्या पलंगाचा स्वीकार केला. काही नाती शब्दांनी नव्हे, तर अशा साध्या कृतींनी व्यक्त होतात. २०१९ मध्ये मोठ्या शस्त्रक्रियेनंतर त्यांनी लेखकाला म्हटलं— “Is this life, Deshmukh? I have to struggle for reaching even upto toilet.” आणि त्यानंतरची त्यांची विनंती अधिक बोलकी होती— “Try to come more frequently. I know it is a long distance. But I need to talk to someone like you with whom I can interact.” जगापासून अंतर राखणाऱ्या माणसालाही अखेरीस संवादाची गरज भासते. दुसऱ्या दिवशी त्यांचं निधन झालं. आयुष्यभर स्वावलंबनाचा आग्रह धरणाऱ्या या माणसाच्या शेवटच्या शब्दांत मात्र सोबत हवी असल्याची साधी, मानवी ओढ होती. *दहा कोटीत एक हीच खरी ओळख* एकनाथन यांच्यात दोष नव्हते, असं लेखक सांगत नाही. त्यांच्या कठोरतेचा अतिरेक, सामाजिक अलिप्तता आणि विचित्र वाटणाऱ्या सवयी लपवण्याचाही प्रयत्न करत नाही. यामुळेच हे व्यक्तिचित्र अधिक विश्वासार्ह बनतं. एखाद्या माणसाचं मोठेपण सिद्ध करण्यासाठी त्याला निर्दोष ठरवण्याची गरज नसते. निवृत्तीपूर्वी एकनाथन यांनी लेखकाला विचारलं होतं, आपण गेल्यानंतर लोक आपल्याला चांगलं म्हणतील की वाईट? त्यावर लेखकाने दिलेलं उत्तर या पुस्तकाच्या शीर्षकाचा अर्थ उलगडतं— “I won`t tell people as to whether he was a good man or bad man, but whenever such reference comes I would certainly say that he was a man one in ten crore!” ‘दहा कोटीत एक’ ही उपाधी म्हणजे एखाद्या माणसाला देवत्व देणं नव्हे. ती त्याच्या असामान्य व्यक्तिमत्त्वाची, तत्त्वांशी असलेल्या निष्ठेची आणि सहज वर्गीकरणात न मावणाऱ्या स्वभावाची नोंद आहे. एकनाथन यांचं व्यक्तिमत्त्व समजून घेताना ‘अंतरंगीचे आभाळ : एक काव्यवर्तुळ’ या काव्य संग्रहातील ‘माणसातले सुंदर गुण’ ही कविता आठवते. “संकट येता कुणाचा हात पुढे सरतो; नाव न विचारता माणूस माणसाला धरतो.” एकनाथन यांच्या आजारपणात लेखकाने केलेली मदत आणि चंदूभाऊ पवार यांनी दाखवलेली माणुसकी या ओळींना जगण्याचा संदर्भ देतात. माणुसकी नेहमी गोड शब्दांतूनच व्यक्त होते असं नाही. कधी ती एखाद्याच्या हक्कासाठी ठामपणे उभी राहते, कधी चुकीच्या गोष्टीला विरोध करते, तर कधी आजारी माणसाच्या एकटेपणात त्याला संवादाची सोबत देते. एकनाथन यांच्यातील गुण आणि मर्यादा दोन्ही समजून घेताना ही कविता माणसाकडे पाहण्याची एक खिडकी उघडते. कारण माणसातले सुंदर गुण गाजावाजा करून येत नाहीत; ते एखाद्या कृतीतून, एखाद्या स्पर्शातून किंवा दुसऱ्याच्या दुःखापाशी थांबण्यातून प्रकट होतात. कवितेच्या शेवटच्या ओळींत म्हटल्याप्रमाणे— “माणूस जपता माणूस— अंतरी उघडे आभाळ.” कदाचित एकनाथन यांच्या आयुष्याकडे पाहण्याची हीच एक दृष्टी असू शकते. त्यांच्या सगळ्या स्वभाववैशिष्ट्यांशी सहमत न होताही त्यांच्यातील माणूस समजून घेणं, हीच या पुस्तकाची आणि त्यातून मिळणाऱ्या अनुभवाची खरी कमाई आहे. जी. बी. देशमुख यांनी आठवणींच्या आधारे उभं केलेलं हे व्यक्तिचित्र वाचकाला एका प्रश्नासमोर उभं करतं—माणसाला त्याच्या गुणदोषांच्या बेरजेतून समजून घ्यायचं, की त्याच्या संपूर्ण जगण्याच्या संदर्भात? ‘दुर्दम्य’ हे पुस्तक एका अजब अधिकाऱ्याची गजब गोष्ट सांगतं; पण त्याचबरोबर शिस्त, स्वाभिमान, माणुसकी आणि एकटेपणा यांच्या सीमारेषांवरही विचार करायला लावतं. काही माणसं आपल्याला आवडतात म्हणून लक्षात राहत नाहीत; ती आपल्याला विचार करायला भाग पाडतात म्हणून लक्षात राहतात. एकनाथन हे त्यापैकीच एक. माणसाला समजून घेण्याची, त्याच्या गुणदोषांसह त्याच्याकडे पाहण्याची आणि माणुसकीच्या अर्थाचा नव्याने शोध घेण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकाने ‘दुर्दम्य – अजब ऑफिसरची गजब गोष्ट’ हे पुस्तक अवश्य वाचावं. कारण काही पुस्तकं केवळ एका व्यक्तीची ओळख करून देत नाहीत; ती आपल्याला माणसांकडे पाहण्याची नवी दृष्टी देतात. हे पुस्तक त्यापैकीच एक. ..... विजय भास्कर , अमरावती ...Read more