* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: CHICKEN SOUP FOR THE MOTHERS SOUL
  • Availability : Available
  • Translators : SUPRIYA VAKIL
  • ISBN : 9788184980615
  • Edition : 3
  • Publishing Year : SEPTEMBER 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 256
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :CHICKEN SOUP SERIES COMBO OFFER-61 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
WHETHER YOU HAVE A CHILD OF YOUR OWN, OR ARE A MOTHER BY WAY OF MARRIAGE OR ADOPTION, YOU KNOW THAT NO OTHER EXPERIENCE AWAKENS YOUR FULL CAPACITY TO LOVE AND BE LOVED LIKE BEING A MOTHER. CONTINUING THE CHICKEN SOUP TRADITION, THIS LONGAWAITED VOLUME CELEBRATES THE INNUMERABLE JOYS AND CHALLENGES OF MOTHERHOOD. FROM RELISHING A BABY`S FIRST STEPS, TO WORRYING AS HE VENTURES OUT ON HIS OWN, FROM WATCHING WITH PRIDE AS YOUR CHILD BLOSSOMS, TO BEING HER MOST ARDENT SUPPORTER AS SHE FACES HARDSHIP, NO OTHER VOCATION IS ALL AT ONCE SO CHALLENGING YET SO REWARDING. WRITTEN BY MOTHERS GRANDMOTHERS, DAUGHTERS, SONS AND HUSBANDS, EACH STORY REVEALS TRUELIFE LESSONS THAT WILL MAKE YOU LAUGH, SHED A FEW TEARS, AND OFFER YOU COMFORT AND ENCOURAGEMENT.
पृथ्वीतलावरच्या आपल्या पहिल्यावहिल्या श्वासापासून आपल्या सोबत असणारी व्यक्ती म्हणजे आई... आणि त्यानंतर आयुष्यानं कशीही वळणं घेतली तरी सदैव त्याच भूमिकेत आपली प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सोबत करणारी व्यक्ती म्हणजेही आईच. आई या विलक्षण शब्दाभोवती गुंफलेल्या या कथा स्थळ, काळ साऱ्या भेदांपलीकडे जाऊन आईच्या त्याच वात्सल्याचा स्पर्श घडवतात. फक्त आणि फक्त प्रेम, माया, आस्था, जिव्हाळा, जपणूक या आणि अशाच भावभावनांचे रेशीमधागे गुंफणाया या कथा, साध्या साध्या प्रसंगातून अतिशय लोभस भावनेचं दर्शन घडवत आपल्याला आपल्या आईची आठवण करून देतात.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #CHICKENSOUP #USHAMAHAJAN #JACK CANFIELD #MARKVICTORHANSEN #PRADNYAOAK #SUPRIYAVAKIL#SHYAMALGHARPURE
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL 31-07-2019

    ‘आई’च्या गोष्टी... ‘आई’ ही आपल्या पहिल्या श्वासापासून आपल्या सोबत असणारी व्यक्ती असते. ‘आई’ म्हटलं की प्रेम, माया, वात्सल्य, आत्मियता, अशा सगळ्या उबदार भावभावना मनात जाग्या होतात. आई म्हटलं की एक निर्धास्त ‘फिल’ असतं, ज्या ठिकाणी आपण नि:संकोचपणे खुल होऊ शकतो. या नात्यात कधी औपचारिक, परतफेडीचा किंवा व्यवहारी विचार नसतो. तिथं फक्त प्रेम हीच भावना असते. त्यामुळे आई व मुलं यांच्यात ‘युनिक’ नातं असतं. आपण आपल्या आईशी काहीही ‘शेअर’ करू शकतो, तिचा सल्ला घेऊ शकतो, तिच्याकडे हट्ट करू शकतो, मनातलं बोलून दाखवू शकतो. असं हे खूप स्पेशल नातं असतं आणि खूप खासही. आई व मुलं यांच्या या खास नात्यावर आधारलेलं एक पुस्तक मी नुकतंच वाचलं. ‘चिकन सूप फॉर द मदर्स सोल’ या पुस्तकाचा सुप्रिया वकील यांनी अतिशय सुंदर व भावपूर्ण अनुवाद केला आहे. असं म्हणतात, की देव एकाच वेळी सर्वत्र राहू शकत नाही, म्हणून त्यानं आई निर्माण केली. या पुस्तकातही आपल्याला जगभरातल्या अशा अनेक आया भेटतात, ज्यांनी त्यांच्या मुलांच्या जीवनाला अर्थ प्राप्त करून दिला आहे. स्वत:च्या उदाहरणाने त्यांच्यासमोर आदर्श ठेवला आहे आणि कितीही संकटातून वाट काढत हसतमुखानं संसार करताना मुलांना या सुंदर नात्याचे उबदार पांघरूण लपेटले आहे. या पुस्तकात आजीच्या मायेच्या सुंदर गोष्टी आहेत. तसंच, आई होण्याचा सुंदर अनुभव, आयुष्यातले काही विशेष क्षण, काही चमत्कार वाटावेत, असे प्रसंगही आहेत. काही मुलांनी आपल्या आईबद्दल व्यक्त केलेल्या भावनाही आहेत. या साध्याशा गोष्टींतून मायेच्या या नात्याचं अतिशय लोभस दर्शन घडतं. या गोष्टी वाचताना आपण त्यात हरवून जातो आणि प्रेमाच्या या सुखद भावनेत चिंब भिजतो. – शिवानी वकील ...Read more

  • Rating StarYashashri Rahalkar

    सगळीच पुस्तके अप्रतिम आहेत चिकन सूप ची 👍

  • Rating StarShashikant Pandit

    चिकन सूप सगळ्या सिरीज खूप छान आहेत ...नक्की वाचाव्यात अश्या

  • Rating StarSandhya Joshi

    साडीच्या दुकानात गेल्यावर किंवा ज्वेलरीच्या दुकानात गेल्यानंतर सैरभर होतं ना मन...हे घेऊ का ते घेऊ म्हणून....माझं असचं होतं पुस्काच्या खजिन्यात शिरल्यावर.....आज वाचनालयात गेल्यावर हे मनात आलं....म्हणून तूम्हांला विचारावसं वाटतयं....पुस्तक निवडताना कुल्या निकषावर निवडता तुम्ही ??? पुस्तकाचे नांव पुस्तकाचे लेखक की पुस्तकाची प्रसिद्धी.... या सगळ्यात खर तर अनेक चांगली पुस्तके आपल्याकडून दुर्लक्षिली जातात.ब-याच वेळा आपण आपली आवड जोपासतो पण नंतर या आवडीतच बदलही होऊ शकतो ना.....आता हेच पहा ना " चिकन सूप फाँर द मदर्स सोल " काहीच माहित नाही या पुस्तकाविषयी पण मागील काही अनुवाद वाचताना याचे संदर्भ येऊन गेले म्हणून उचलून आणलयं नावाकडे दुर्लक्ष करुन...😆😆😆 ...बघते वाचून..."आई" च्या संदर्भात आहे....मूळात आईच" वैश्विक" असल्यामुळे जगाच्या कानाकोप-यातील आईच्या भावना सारख्याच असतील....या विश्वासाने हातात घेते आहे. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BACKSTAGE
BACKSTAGE by MONTEK SINGH AHLUWALIA Rating Star
महाराष्ट्र टाईम्स.. ६.९.२०२६

भारताच्या आर्थिक सुधारणांवर अनेक पुस्तके आजवर प्रसिद्ध झाली आहेत. काहींमध्ये आकडेवारीचे जंजाळ असते, काही धोरणांचे विश्लेषण करतात, तर काही विशिष्ट नेत्यांची जाहिरातबाजी करतात. मात्र माँटेकसिंग अहलुवालिया यांचे `बॅकस्टेज : भारताच्या उच्च वाढीच्या र्षांमागची कहाणी` हे पुस्तक या सगळ्यांपेक्षा वेगळे ठरते. कारण हे पुस्तक भारताच्या आर्थिक परिवर्तनाची कथा बाहेरून पाहणाऱ्या अभ्यासकाने नव्हे, तर त्या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी उभ्या असलेल्या व्यक्तीने सांगितलेली आहे. जी. बी. देशमुख यांनी मूळ इंग्रजी पुस्तकाचा केलेला मराठी अनुवाद सरस उतरला आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच माँटेकसिंग एक गोष्ट स्पष्ट करतात, ती म्हणजे, हे पुस्तक आत्मकथन नाही. आत्मप्रौढी मिरवण्यासाठी नव्हे, तर भारताच्या आर्थिक सुधारणांचा प्रवास समजावून सांगण्यासाठी अहलुवालिया हे पुस्तक लिहितात. विषयाच्या अनुषंगाने पुस्तकात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील संदर्भ येतात, पण ते आर्थिक आणि राजकीय घडामोडी समजावून सांगण्यापुरतेच. सिकंदराबादमधील मध्यमवर्गीय वातावरणातून सुरू झालेला त्यांचा प्रवास दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ऑक्सफर्ड, जागतिक बँक, अर्थ मंत्रालय, योजना आयोग आणि अखेर देशाच्या सर्वोच्च आर्थिक धोरणनिर्मितीच्या केंद्रापर्यंत पोहोचतो. हा प्रवास वाचताना स्वतंत्र भारताच्या आर्थिक विचारसरणीचा विकासक्रम उलगडत जातो. पुस्तकाचे केंद्रस्थान अर्थातच १९९१च्या आर्थिक संकटाचे आहे. त्यावेळी देशाकडे काही आठवड्यांच्या आयातीपुरताही डॉलर शिल्लक नव्हता. सोन्याचा साठा गहाण ठेवण्याची वेळ आली होती आणि आर्थिक दिवाळखोरीची शक्यता प्रत्यक्ष समोर उभी होती. अशावेळी सरकारने घेतलेले निर्णय, त्यामागील तणाव, राजकीय अनिश्चितता आणि प्रशासकीय संघर्ष यांचे वर्णन पुस्तकात अत्यंत जिवंतपणे आले आहे. नाणेनिधी किंवा जागतिक बँकेच्या दबावामुळे या सुधारणा झाल्याची धारणा माँटेकसिंग ठामपणे नाकारतात. हे पुस्तक आर्थिक सुधारणांना कोणत्याही प्रकारच्या विचारधारेच्या चष्म्यातून पाहत नाही. लेखक ना मुक्त बाजाराचे अंधसमर्थन करतात, ना राज्यनियंत्रित व्यवस्थेचे. त्यांचा दृष्टिकोन व्यवहारवादी आहे. भारतासारख्या लोकशाही देशात सुधारणा एका झटक्यात होत नाहीत; त्या राजकीय वास्तवाशी जुळवून घेत हळूहळू पुढे सरकतात, हे ते वारंवार. अधोरेखित करतात. पुस्तकात अनेक ठिकाणी `सुधारणा` हा आर्थिक नव्हे, तर राजकीय प्रक्रियेचाही विषय आहे, हे प्रकर्षाने जाणवते. अहलुवालिया या पुस्तकात अनेक व्यक्ती, अधिकारी, अर्थतज्ज्ञ आणि राजकीय नेत्यांच्या योगदानाचा उल्लेख करतात. नरसिंह राव, मनमोहन सिंग, पी. चिदंबरम, यशवंत सिन्हा, जसवंत सिंह यांच्यापासून ते विविध सनदी अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांची भूमिका ते प्रामाणिकपणे नोंदवतात. योजना आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम करताना अहलुवालिया यांनी जवळून अनुभवलेला काळ येथे उभा राहतो. सन २००४ ते २०११ या काळातील उच्च आर्थिक वाढ, दारिद्रयनिर्मूलनातील प्रगती, पायाभूत सुविधांमध्ये झालेली वाढ आणि ग्रामीण विकासाच्या कार्यक्रमांचे मूल्यमापन ते करतात. विशेषतः भारताने सलग अनेक वर्षे सात ते आठ टक्क्यांच्या दरम्यान वाढ नोंदवली, ती केवळ जागतिक परिस्थितीचा. परिणाम नव्हती; १९९० नंतरच्या सुधारणांनी घातलेल्या पायावर उभे राहून ती शक्य झाली, हा त्यांचा युक्तिवाद पटण्याजोगा वाटतो. मात्र पुस्तकाचे खरे सामर्थ्य यशोगाथेत नाही, तर आत्मपरीक्षणात आहे. यूपीए-२ दरम्यान निर्माण झालेली निर्णयप्रक्रियेतील अडचण, गुंतवणुकीतील वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक मंदी, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे निर्माण झालेले वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक थेट भाष्य करतात. अनुवादक जी. बी. देशमुख यांनी मूळ पुस्तकातील आर्थिक संकल्पना सहज आणि प्रवाही मराठीत मांडल्या आहेत. यात कृत्रिमता जाणवत नाही. आर्थिक विषयावरील पुस्तक असूनही भाषा जड वाटत नाही. आर्थिक सुधारणांच्या व्यापक सामाजिक परिणामांचा स्वतंत्र आणि सविस्तर ऊहापोह येथे अपेक्षेपेक्षा कमी आढळतो. मात्र, हे पुस्तक ज्या उद्देशाने लिहिले गेले आहे त्या उद्देशात ते अत्यंत यशस्वी ठरते. `बॅकस्टेज` हे केवळ पुस्तक नाही; ते भारताच्या आर्थिक परिवर्तनाचा प्रत्यक्षदर्शी दस्तऐवज आहे. १९९१ नंतर भारताने घेतलेल्या वळणाचा अर्थ समजून घ्यायचा असेल, उच्च वाढीच्या वर्षामागील वास्तविक कथा जाणून घ्यायची असेल आणि धोरणनिर्मितीच्या पडद्यामागे काय घडत असते याचा मागोवा घ्यायचा असेल, तर हे पुस्तक अभ्यासणे आवश्यक ठरते. भारतीय अर्थव्यवस्थेच्या आर्थिक सुधारणांचा इतिहास आणि त्यांचे परिणाम समजून घेण्यासाठी हे पुस्तक एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ म्हणून ओळखले जाऊ शकते. मराठीत उपलब्ध असलेला हा अनुवाद त्या दृष्टीने विशेष स्वागतार्ह आहे. ...Read more

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
Dinesh

This is a different planet. This is a different world. And this is a truly different book. I loved it. You should also buy it and read it. I’m sure you will love it too. Hachyukisunaski is a fantastic Book.