* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
TRANSLATED BY MRINALINI GADKARI. THIS LIFE IS A HARMONIOUS BRAID WOVEN TOGETHER WITH THE BEAUTIFUL FEELINGS OF HUMAN BEINGS. NATURE IS ALWAYS IN ACCORDANCE WITH IT. RAVINDRANATH`S LITERATURE HOLDS A SPECIAL PLACE FOR HUMAN BEINGS AND NATURE. IN HIS STORIES, NATURE IS NOT THERE FOR THE SAKE OF BEING. IT IS THERE AS A SEPARATE CHARACTER. IT PLAYS IMPORTANT ROLE WITH THE MOOD SWINGS OF HUMAN BEINGS. ITS CHANGING NATURE REFLECTS THE CHANGING OF MOODS. THESE STORIES WHERE EQUAL WEIGHTAGE IS GIVEN TO MAN AND NATURE SHOWS RAVINDRANATH`S QUALITIES AS A WORLD FAMOUS POET, OF A SPECIAL, DIVINE HUMAN BEING.
माणूस आहे म्हणूनच या जगात भावनांचा सुंदर गोफ विणला जातो, आणि त्याला साथ असते निसर्गाची. रवीन्द्रनाथांच्या जीवनात ‘माणूस’ आणि ‘निसर्ग’ यांना असाधारण स्थान आहे. त्यांच्या कथेत निसर्ग हा फक्त वर्णनाकरिता येत नाही, तर भावभावनांच्या खेळात महत्त्वाची भूमिका बजावतो. निसर्गाची बदलणारी रूपं माणसाच्या बदलणाऱ्या भावनांच्या प्रतिमा असतात. निसर्ग आणि माणूस यांच्या संयोगातूनफुललेली विश्वकवीची कथा तो महामानव होता हे नकळत सांगून जाते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#RAVINDRANATHTAGORE#MEDHATASKAR #POSTMASTER #MRUNALINIGADKARI #AMITAGOSAVI #NILIMABHAVE #NASHTANEED #GEETANJALI # BAUTHAKURANEERHAAT #KABULIVALAANI ITARKATHA #MEHTAPUBLISHINGHOUSE #TRANSLATEDBOOK #MARATHIBOOKS
Customer Reviews
  • Rating StarPRABHAT 13-02-2008

    स्त्रीची विविध रुपे ... विश्वकवी म्हणून रवींद्रनाथ टागोरांना ओळखलं जातं. परंतु आशिया खंडात नोबेल पारितोषिकाने सन्मानिक झालेल्या टागोरांची एवढीच ओळख नव्हती. ते तत्त्वज्ञ, विचारवंत, निबंधकार, प्रबंधकार, चित्रकार, गीतकार, संगीतकार, नाटककार, कादंबरीकार णि कथाकारही होते. ‘माणूस’ आणि ‘निसर्ग’ हे त्यांचे आवडते विषय असल्याचे जाणवते. माणसामध्ये पुन्हा स्त्री आणि पुरुष हे भिन्नच त्यात स्त्रीच्या जीवनाची कहाणी काही वेगळीच. मुलगी, आई, पत्नी, प्रियसी, विधवा अशी स्त्रीची विविध रुपे असतात. काळानुसार ती आपल्यावर पडलेली भूमिका निभावत असतात. स्त्रीच्या या विविध रुपांचे कांगोरे टागोरांनी आपल्या ‘पोस्टमास्तर आणि इतर कथा’ या कथासंग्रहात उलगडून दाखविले आहे. या कथासंग्रहाचा अनुवाद मृणालिनी गडकरी यांनी केला असून, मेहता प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. गावात आलेल्या पोस्टमास्तरची सेवा करणारी आणि त्याने गाव सोडताना आपल्याला बरोबर न्यावे, अशी मनोमन अपेक्षा करणारी अनाथ रतन, आपल्या जावेच्या मुलावर प्रेम करणारी विधवा कादंबिनी, दीराने केलेल्या खुनाचा गुन्हा स्वत:च्या अंगावर घेणारी चंदरा, लिहिण्या-वाचण्यातील निर्भेळ आनंद घेणारी चिमुरडी उमा, नवऱ्याला कमीपणा नको म्हणून स्वत:च्या प्रतिभेला मुरड घालणारी निर्झरणी, प्रियकराला दिलेला शब्द पाळण्यासाठी चितेवरून उठून येणारी महामाया अशी विविध रूपे आणि भूमिकांतील स्त्रिया रवींद्रनाथांच्या या कथासंग्रहात आहेत. वाचकांशी सहज संवाद साधत कथा सांगण्याची रवींद्रनाथ टागोरांची खास शैली. त्याचा प्रत्यय हा कथासंग्रह वाचताना येतो. त्यांच्या मनात स्त्रीचे असलेले आदरणीय स्थान हेही अनुभवायला मिळते. एकीकडे दुर्लक्षित असलेल्या या नायिका केवळ परिस्थितीच्या गुलाम आहेत, असे नाही तर त्यांच्यातील प्रत्येकीच्या अंगी काहींना काही विशेष गुण आहे. परिस्थितीचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी, सबल होण्यासाठी त्यांची धडपड चालू असल्याचेही जाणवते. स्वातंत्र्यपूर्व काळात रवींद्रनाथांच्या कथांमधून उलगडलेल्या या स्त्री जीवनाच्या विविध छटा आजही तशाच पहायला मिळतात. त्यामुळे या कथांना काळाचे बंधन जाणवत नाही. रवींद्रनाथांच्या कथांचा मराठी अनुवाद करताना मृणालिनी गडकरी यांनी कथांचा सहजपणा, ओघवतेपणा आणि संवाद साधण्याची शैली या बाबींना धक्का लागणार नाही, याची खबरदारी घेतली आहे. त्यामुळे अनुवादातही कथाचा ताजेपणा जाणवतो. वाचकाला भुरळ घालण्यात त्या यशस्वी होतात. ...Read more

  • Rating StarTARUN BHARAT 15-06-2008

    अनंत मनोहर रवींद्रनाथजी म्हणजे गीतांजली, शांतिनिकेतन म्हणजे रवीबाबू आणि काबुलीवाला कथा म्हणजे तेच. गांधीजी आवर्जून भेटायला गेले होते ते टागोरजींना. पण रवींद्रनाथ यांनी, काबुलीवाला प्रमाणे अन्यही खूप कथा लिहिल्या, गीतांजली नंतरही कविता केल्या, हे आपलयाला माहित नसते. टागोरजींचा काबुलीवाला याच्या पाठोपाठ वाचकांसमोर ``पोस्टमास्तर आणि इतर कथा`` हा मृणालिनी गडकरी यांचा भाषांतरित संग्रह आला आहे. रवींद्रनाथ एका एकत्र कुटुंबात वाढले. त्यांची आई, वहिनी, पत्नी या प्रेमळ स्वभावाच्या होत्या. जमीनदारीचा पसारा सांभाळताना त्यांचा जनसामान्यांशी संबंध येई. भारतीय स्त्री कष्टाळू, त्यागी, सोशिक किती आहे ते त्यांनी पाहिले होते.त्यांच्या मनात भारतीय स्त्रीची एक मनोज्ञ मूर्ती साकार झाली होती. तिचे दु:ख, तिच्या व्यथाभरल्या कहाण्या, तिचे कर्तुत्व, व्यक्तिमत्व, त्यागमयी जीवन, पतिपरायणता यांचे चित्रण रवीबाबूंच्या साहित्यात अनेकदा आले आहे. बंगाली विधवेचे जीवन आपल्याकडील गतधवेच्या आयुष्याप्रमाणे अति करुणामय असे. एवूâण त्या काळातील स्त्री हा समाजव्यवस्थेचा एक शापित घटक असे. तिची बुध्दी, शक्ती, समज, कलाप्रियता, तिची ज्ञानलालसा यांना काही किंमत नव्हती. टागोरजींच्या अनेक कथांचा केंद्रबिंदू तत्कालीन स्त्री व तिचे जीवन हा असतो त्याचे हे रहस्य आहे. ते स्त्रीचा कधीही अधिक्षेप करीत नसत. स्त्रीची प्रतिष्ठा जपणारी अशी त्यांची कथा असे. बंगाली स्त्री वेळप्रसंग आल्यास आत्मसन्मानासाठी समाजाविरुध्द बंड करुन उठत असते. तशी ती कणखर होती. रवींद्रनाथांच्या स्त्री व्यक्तीरेखा सबल आहेत. त्यातील काही उघडउघड बंड करतात. तर काही उघड बंड करीत नसल्या तरी त्या मूकपणे प्रस्थापितांना वैचारिक धक्के देतातच. त्यातून समाज पुढे सरतो. त्यात ता स्त्रियांचा स्वार्थ नसतो. त्यांच्या कृतीमागे प्रबल भावोत्कटतेपेक्षा डोळस विचार असतो आणि समाजगाड्याला चालना मिळावी ही प्रबळ इच्छा असते. रवींद्रनाथ कविहृदयी खरे परंतु ते वास्तवसन्मुख आहेत. त्याचं चटकन उदाहरण द्यायचं तर ते ``वही``कथेचं देता येईल. या कथेतील छोटी उमा तिचे मनोगत तिच्या वहीमध्ये लिहून ठेवायची. तिच्या सासरच्या लोकांना उमा लिहित्येय ही गोष्ट सहन होण्यासारखी नव्हती. तीला हा हिशेब समजण्यासारखा नव्हता, तिच्या हातातून वही काढली गेली. ``गर्वहरण`` मधली निर्झरिणी ही लेखिका आणि तिचा नवरा दोघेही एका कथास्पर्धेत भाग घेतात. तिला पारितोषिक मिळते पण ती शहाणी व समजूतदार असते. ती स्वत:ची वही स्वत:च फाडून टाकते. ती आपल्या संसाराला जपण्यासाठी हा निर्णय घेते. पहिला नंबर आलेली अनिला तिला आत्मभान येताच घर सोडून निघून जाते. कारण नवऱ्याचं वागणं तिला असह्य झालेलं असतं. ``पत्नीच पत्र`` मधील मृणाल कुरूप बिंदूला आसरा देते. अन्यायापासून ती बिंदूचे रक्षण करू पाहते. शेवटी बिंदूने आत्मघात करून घेतला. मृणालच्या मनात हे असं का ? हा प्रश्न अनुत्तरित राहिला. घर सोडण्याचा मृणालने कठोर निर्णय घेतला. घर सोडले, आपण हा निर्णय का घेतला हे तिने पतीला पत्राने कळवले. कधीकधी परिस्थिती एवढी प्रतिकूल ठरते की कळत असून या बुद्धिवान नायिकांना प्रतिकूल वास्तव स्वीकारावं लागतं. त्या अगतिक होतात. पण त्या आपलं असमाधान नोंदवून ठेवतात. कधीतरी समाजपुरुषाला स्त्रियांच्या या असंतोषाची दखल घ्यावीच लागते. सगळ्याच कथा अशा आहेत असं नाही. समाप्ती ही कथा विलक्षण ताकदीची, हळूवार अशी आहे. रवींद्रनाथांच्या कथांचे नायक म्हणजे तळागाळातील माणसं, अशिक्षित - सुशिक्षित, नाना स्वभावाची माणसं. उलापूर या अरिष्ट खेड्यातील अनाथ, निरक्षर रतन. सहृदय पोस्टमास्तरांच्या आसऱ्यामुळे त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे मनात स्वप्न उमलू लागलेली रतन. पण पोस्टमास्तर बदली होत नाही म्हणून नोकरी सोडून निघून गेले आणि शिकण्याचं, माणूस होऊन जगण्याचं तिचं स्वप्न तुटून गेलं. अशा विविधरंगी पंधरा कथांचा हा गुच्छ. मृणालिनी गडकरी आणि मेहता प्रकाशन यांच्यामुळे मराठी वाचकाला रवींद्रनाथ ठाकूर यांच्या कथा उपलब्ध झाल्या. पूर्वी मामा वरेरकर, अशोक शहाणे, थोडेफार पु. ल. देशपांडे अशा मूठभर मराठी लोकांनी थोडेफार अनुवाद केले होते. आता साहित्य अकादमी आणि मेहतांसारखे प्रकाशक यांनी अनुवादांचे जग विस्तृत केले आहे. आपण अनुवाद आवर्जून वाचायला हवेत. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
Vaishali Dhande, Amravati.

Their is no doubt that G.B.Deshmukh`s writings are very well but when you come across the characters in this book which you had heard from the author himself then the reading felt like you are also part of that story.... the author deserves many cngratulations for this wonderful book "Durdamya ". Amazingly written balancing humor as well as seriousness... It also taught importance of learning the language of the state you work in otherwise Amravati will also have one Udhampur in it. ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
सि.एम. भागडे, नागपूर.

"दुर्दम्य" पूर्ण वाचुन झालं. लेखकाने एकनाथन साहेबांविषयी खुप छान लिहिलं आहे. ते माझे पहीले एसी होते. नवीन निरीक्षक असतांना, त्यांना व्हरांड्यात बसलेले पाहुन, लपुन छपुन रेंज ची डाक देऊन मी पळून जात असे. तेव्हा दर्शन घेऊन प्रत्यक्ष भेटलो असतो तर बे झाले असते, असं आता वाटते. ...Read more