* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: PRUTHVIVAR MANUS UPRACH!
 • Availability : Available
 • ISBN : 9788177662818
 • Edition : 22
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 96
 • Language : MARATHI
 • Category : SCIENCE FICTION
 • Available in Combos :SURESHCHANDRA NADKARNI COMBO OFFER - 4 BOOKS
Quantity
GOD ARE LITERALLY THE ASTRONAUTS IN THE SPACESHIPS. THOUSANDS OF YEARS BACK THEY REACHED THE EARTH, CREATED A NEW SPECIES AND NAMED IT `HUMAN BEING.` AFTER THAT THEY STARTED MODIFYING THIS PROCESS BY REAPPEARING ON THE EARTH AFTER EVERY 37 THOUSAND YEARS. DURING EVERY VISIT, THEY TAKE AWAY THE EVILS AND LEAVE BACK THE GOOD ONES. ERIC VON DANICANE WAS A SCIENTIST WHO HAD SACRIFICED HIMSELF FOR FINDING THE GODS. HE STRUGGLED HARD, HE ROAMED THROUGH VARIOUS NATIONS, HE WENT THROUGH THE GULLIES AND ALLEYS ALL OVER THE WORLD TO FIND ABOUT THE EXISTENCE OF GOD. IN THIS ATTEMPT THE MULTI - MILLIONAIRE ERIC LOST ALL HIS PROPERTY. WHEN HE PUBLISHED HIS WORK BASED ON THE SEARCH OF GOD, HE AGAIN WAS BECAME INTO A MULTIMILLIONAIRE. STILL, HE COULD NOT FIND OUT THE PERFECT SOLUTION REVEALING THE SECRET OF FORMATION OF HUMAN BEING. DR. SURESHCHANDRA NADKARNI HAS BEEN A PROFESSOR OF ZOOLOGY IN WADIA COLLEGE AND PUNE UNIVERSITY. HE HAS PRESENTED BEFORE US THE ATTEMPTS OF ERIC VON DANICANE IN A VERY ILLUSTRATIVE AND ENTERTAINING MANNER.
देव हे खरे तर अंतराळातील प्रवासी. हजारो वर्षांपूर्वी ते एकदा पृथ्वीवर आले अन त्यांनी एक नवा जीव निर्माण केला. त्याचं नाव `माणूस!` तेव्हापासून हे अंतराळ प्रवासी चांगला माणूस घडविण्यासाठी धडपडत आहेत. दर सदतीस हजार वर्षांनी ते पृथ्वीवर येतात, चांगल्यांना ठेवतात आणि निकृष्टांना नष्ट करतात. एरिक व्हॉन डेनिकेन या झपाटलेल्या संशोधकाने पंचवीस वर्ष प्रयत्न केला आणि लाख मैलांपेक्षा अधिक भ्रमंती करून त्यांच्या वास्तवयाचा मागोवा घेतला. या प्रयत्नात कोट्याधीश व्हॉन डेनिकेन कफल्लक झाला. पण त्याने आपल्या संशोधनावर ग्रंथ प्रसिद्ध केले अन तो पुन्हा कोट्याधीश बनला. परंतु या खटाटोपात मानवाच्या निर्मितीचं रहस्य मात्र उलगडलं नाही. वाडिया महाविद्यालयात आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुमारे चाळीस वर्षे प्राणिशास्त्राचे अध्यापन करणारे उर्दू शायर, क्रीडासमीक्षक अशा विविध नात्यांनी परिचित असलेले प्राध्यापक डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी यांनी व्हॉन डेनिकेनच्या अफाट संशोधनाचा मागोवा घेत मानवाच्या अनैसर्गिक निर्मितीबद्दल मांडलेल्या कल्पना! - त्याची ही रसपूर्ण, विचारांना चालना देणारी कहाणी.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #PRITHVIVARMANUSUPRACH #PRITHVIVARMANUSUPRACH #पृथ्वीवरमाणूसउपराच #SCIENCEFICTIONMARATHI #SURESHCHANDRANADKARNI #सुरेशचंद्रनाडकर्णी "
Customer Reviews
 • Rating StarRahul Suryavanshi

  पृथ्वीवर माणूस उपराच! डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी लिखित. हे पुस्तक प्रत्येकाने जीवनात एकदा तरी वाचावे. देव हे खरे तर अंतराळातील प्रवासी. हजारो वर्षांपूर्वी ते एकदा पृथ्वीवर आले अन त्यांनी एक नवा जीव निर्माण केला. त्याचं नाव `माणूस!` तेव्हापासून हे अंताळ प्रवासी चांगला माणूस घडविण्यासाठी धडपडत आहेत. दर सदतीस हजार वर्षांनी ते पृथ्वीवर येतात, चांगल्यांना ठेवतात आणि निकृष्टांना नष्ट करतात. एरिक व्हॉन डेनिकेन या झपाटलेल्या संशोधकाने पंचवीस वर्ष प्रयत्न केला आणि लाख मैलांपेक्षा अधिक भ्रमंती करून त्यांच्या वास्तवयाचा मागोवा घेतला. या प्रयत्नात कोट्याधीश व्हॉन डेनिकेन कफल्लक झाला. पण त्याने आपल्या संशोधनावर ग्रंथ प्रसिद्ध केले अन तो पुन्हा कोट्याधीश बनला. परंतु या खटाटोपात मानवाच्या निर्मितीचं रहस्य मात्र उलगडलं नाही ...Read more

 • Rating StarAnand Pandare

  तर मुलभूत प्रश्न असा की, पृथ्वीवर माणूस अवतरला कसा?? ह्या प्रश्नाचं उत्तर दोन प्रकारात मिळतं.. पहिलं म्हणजे धर्मात आणि दुसरं म्हणजे विज्ञानात !!! जर धर्माच्या उत्तराचा विचार केला तर त्यात एकवाक्यता दिसत नाही,याचं कारण पृथ्वीवर अस्तित्वात असलेले वेगवेळे धर्म... त्यांचे वेगवेगळे देव... आणि त्या देवांनी माणसाला जन्माला घातलेल्या वेगवेगळ्या पद्धती व कारणं... परंतु विज्ञानाच्या उत्तरात मात्र अखंड पृथ्वीवर एकवाक्यता दिसते याचं कारण विज्ञान सिद्धता, पुरावे, आणि स्पष्टीकरणाच्या आधारावर उत्तर स्विकारते... आणि त्याच आधारावर जर भविष्यात दुसरे अधिक योग्य उत्तर मिळाले तर आनंदाने, खुल्या दिलाने त्याचा स्विकार करते. परंतु धर्मात हा लवचिकपणा नाही आणि तो येणारही नाही. असो... सध्या विज्ञान मनुष्य जन्मासाठी डार्विनच्या सिध्दांताला पुरस्कृत करतयं... थोडक्यात, माकडा पासून माणूस जन्माला आला असं विज्ञान म्हणतयं... परंतु अजुनही काही बुद्धीवंत एक वेगळीच वाट दाखवत आहेत, त्याचंच विश्लेषण ह्या पुस्तकात केले आहे. तर यांच म्हणणं असं की, माणूस ह्या पृथ्वीवरचा नैसर्गीक प्राणी नाहीच मुळी !!! परग्रहावरच्या प्रगत सजीवांनी (मनुष्य सदृश्य म्हणा हवं तरं..) कैक वर्षांपूर्वी पृथ्वीवर येऊन, संकर घडवून, मनुष्य प्राणी तयार करुन इथे सोडला.. आणि मग तो स्वतःच्या क्रियाशील मेंदूच्या जोरावर आजतागायत प्रगत होत गेला... हि थेअरी लेखकाने खूप साऱ्या उदाहरणासहित पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. (उदा. पिरॅमिड व त्याची भूमितीय रचना आणि खूप काही... ते तुम्ही वाचूनच पहा) तर, वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करणार्‍यांसाठी हे एक रंजक पुस्तक आहे हे मात्र नक्की !!! जोतिष्या पुढे हात दाखवून आपलं भविष्य जाणून घेण्यापेक्षा एकूण मनुष्य जन्माचा भूतकाळ शोधणं हे अधिक महत्त्वाचं आणि मजेशीर वाटतयं... तुम्हाला काय वाटतयं ??? ...आनंद पंदारे. ...Read more

 • Rating StarA. M Patil

  डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णींचे पृथ्वीवर माणूस उपराच हे पुस्तक खुप दिवसांपूर्वी वाचले होते.आज पुन्हा काही गोष्टींचा विचार करताना पुस्तकाची आठवण झाली म्हणून पुन्हा वाचले.पुस्तक वाचल्यानंतर खुप प्रश्न पडतात अनेक ठिकाणी विचार येतो की खरंच माणूस हे निसर्गाचेसावत्र अपत्य तर नाही ना? नाडकर्णीं च्या किंवा एरिक च्या विचारांशी किती जण सहमत असतील? ज्यांनी हे पुस्तक वाचलंय त्यांच काय मत आहे ते मला जाणुन घ्यायला आवडेल. एरीक व्हॉन डॅनिकेन या स्विस संशोधकाच्या संशोधनाप्रमाणे माणूस हा पृथ्वीवरचा नसुन खुप पूर्वी या पृथ्वीवर उडत्या तबकड्या मधुन extra-terrestrials (ज्यांना आपण एलिअन्स किंवा देव म्हणताे)हे पृथ्वीवर आले.कदाचीत त्यांच्यातल्या मतभेदांमुळे काही इथे राहिले आणि काही परत गेले. कदाचित त्यांनी जेनेटीक्स इंजिनीअरींग सारखे तंत्र वापरुन मानव निर्माण केला. परंतु आपण अभ्यास करतो त्या विकास सिद्धान्ताप्रमाणे ड्रायोपिथेकस (Dryopithecus) या सस्तन प्राण्याच्या तीन उपजाती (Species) निर्माण झाल्या. त्यांत ड्रायोपिथेकस पंजाबाय (D. punjabi) पासून गोरिला‚ ड्रायोपिथेकस जर्मनाय (D. germani) पासून चिंपांझी आणि ड्रायोपिथेकस डार्विनाय (D. drawini) पासून मानव निर्माण झाला.मग या मानवाच्या मध्यंतरीच्या बदलत्या स्थित्यंतर-अवस्थांचे पुरावे जगात कुठेही चुकूनसुद्धा आढळत नाहीत असे का? मधला बराचसा काळ पूर्णपणे गायब झाल्यासारखे वाटते.मानवाचा भूतकाळ जर दहा लक्ष वर्षांचा मानला‚ तर त्यांपैकी जेमतेम सात हजार वर्षांचा इतिहास अन् तो देखील अत्यंत विस्कळीत स्वरूपात उपलब्ध आहे. एक लाख मैलांपेक्षाही अधिक प्रवास एरिक व्हॉन डॅनिकेन यांनी केला आणि आपल्या संशोधनाद्वारे अनेक धक्कादायक गोष्टी उजेडात आणल्या तुर्कस्तानातील इस्तंबूल येथील तोपकापी नावाच्या जुन्या राजवाड्यात सापडलेले जगाचे 20 नकाशे पिरी रीस याच्याकडे होते, इन्का चे समांतर रस्ते त्यावर असलेल्या खुणा जणू काय ती त्या अंतराळातील अतिमानवासाठी असलेली धावपट्टीच,अॅन्डीज पर्वतातील पिस्को या डोंगरावर सुमारे आठशे वीस फूट उंचीचा प्रचंड त्रिशूळ कोरण्यात आला आहे हे तर हवाई अड्डे असावेत असे एरिक म्हणतो. आजच्या प्रगत काळातील स्थापत्यशास्त्राला अशक्य अशा रचना, इजिप्तमधील पिरॅमिडस आणि स्त्रीचे डोके असणारी व सिंहाचे शरीर असलेली अतिभव्य पाषाणमूर्ती स्फिन्क्स,पिरॅमिडच्या गाभ्यामध्ये असलेली किरणोत्सर्गी योजना, या सर्व आणि अशा कितीतरी गोष्टी विचारवंतांना नेहमीच बुचकळ्यात पाडतात.अनेक पुरातत्त्ववेत्त्यांनी अनेक वर्ष संशोधन करूनसुद्धा त्यातुन समाधानकारक उत्तरे मिळत नाहीतच हे सर्व वाचल्यानंतर खुप आश्चर्य वाटते. कदाचित या सगळ्या गोष्टींचा शोध घेण्यात माणूस कमी पडला असेलही पण इतिहासातील न उलगडलेल्या या रहस्यमय गोष्टी वाचल्यानंतर मलातरी पुस्तकाचे नाव अगदी योग्य वाटते की पृथ्वीवर माणूस उपराच! नक्की वाचा. ...Read more

 • Rating StarAKASH JADHAV - INSIDE MARATHI BOOKS

  जवळपास सर्वच धर्मग्रंथांमध्ये देव हे स्वर्गातुन विमानाने पृथ्वीवर येतात असे संदर्भ आहेत. त्याचबरोबर त्यांच्याकडे संहारक शस्त्रे देखील होती. याचाच अर्थ देवांकडे प्रगत तंत्रज्ञान असणार. आज मानवाला उपलब्ध असलेलं तंत्रज्ञान आणि पुराणांमध्ये वर्णलेली तंतर बऱ्यापैकी मेळ खातात. लवकरच मानव इतर ग्रहांवर वस्ती करण्यास सक्षम होईल आणि परग्रहवासीयांच्या शोधात तर मानव आहेच. समजा मानवाने येत्या ५० वर्षात एखाद परग्रहीय जीवन शोधलं आणि तेथे तो स्पेसशिप घेऊन पोचला आणि ते परग्रहीय जीव आपल्यापेक्षा अप्रगत असले तर ते त्या घटनेचं वर्णन – “आकाशातुन विमान घेऊन येणारे देव ज्यांच्याकडे अफाट शक्ती आहे” असच करतील. पृथ्वीवर माणूस उपराच हे मराठीत लिहिलेलं, ऐतिहासिक घटनांना एका वेगळ्या दृष्टीने बघण्यास प्रवृत्त करणार बंडखोर पुस्तक. एरीक डेनिकेन यांच्याकडून प्रेरणा घेऊन सुरेशचंद्र नाडकर्णी यांनी हे पुस्तक लिहिलं त्याबद्दल त्यांच कौतुक करावं तितकं कमीच. पुस्तकाच्या नावातील “उपरा” शब्द इथे “बाहेरील” किंवा सरळ सरळ “परग्रहीय” म्हणून घेऊ शकतो. लेखक प्राचीन काळातील घटनांना वेगळ्या दृष्टीने मांडतो जस कि १६व्या शतकातील पिरि रिस चे नकाशांमध्ये उत्तर-दक्षिण अमेरिकेचा भाग खूपच लांबलचक रेखाटण्यात आला आहे. जेव्हा कैरो शहर मध्यबिंदू धरून अडीचशे मैल उंचीवरील उपग्रहातून पृथ्वीचे छायाचित्र काढले ते पिरि रिस च्या नकाशांशी तंतोतंत जुळले. त्या छायाचित्रात अमेरिकेचा आकार लांबलचक आढळून येतो. आता प्रश्न आहे की १६व्या शतकात पृथ्वीपासून अडीचशे मैल उंचीवरून हा नकाशा बनवणे शक्य नसताना हा नकाशा कसा बनवला गेला? तसेच इंका संस्कृतीचे रस्ते उंचीवरून बघितल्यास आपल्याला विमानांसाठी रनवे असल्याचा भास होतो. असे एक ना अनेक संदर्भ आपल्याला विचार करायला भाग पाडतात. खरंच मानवी उत्पती आपल्याला माहित असलेल्या परिघाच्या बाहेरील आणि न उलघडलेलं गूढ आहे. ...Read more

 • Read more reviews
Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DHUMARE
DHUMARE by MADHAVI DESAI Rating Star
Prasad Salunkhe

धुमारे - माधवी देसाई म्हणतात ना `don`t judge a book by its cover` तसं काहीसं या पुस्तकाबाबत झालं. पुस्तक घेऊन फार दिवस झाले पण वाचायचा योग काही येत नव्हता. एक तर छोटं पुस्तक आहे नंतर वाचून काढू असं करत ते मागे राहिलं. आणि दुसरं म्हणजे त्याचं ओकंबों मुखपृष्ठ. ते पाहून उगाच गैरसमज होतो की काहीतरी उदासीभरं आहे हे प्रकरण. त्यात माधवी देसाईंचं `नाच गं घुमां` आधी वाचलेलं त्याचा ठसा मनावर निश्चित होता, त्या वातावरणात काही पूर्वग्रह किंवा अपेक्षा ठेवून मला हे पुस्तक हाती घ्यायचं नव्हतं. नंतर एकदोन ठिकाणी लोकांना या पुस्तकाबद्दल भरभरून बोलतांना, लिहितांना पाहिलं आणि चूक माझ्या लक्षात आली. मग पुढच्या एक दिवसात हे पुस्तक वाचून काढलं. `धूमारे` या पुस्तकात गोयच्या भूमीवर लिहिलेले पंधरा लेख आहेत. गोवा म्हणजे फेसाळती बियर, उघडेबागडे फोरेनर्स एवढंच मर्यादित नाहीये याची आपल्याला नव्याने जाणीव हे पुस्तक करून देतं. आपण गोव्याच्या अंतरंगात माधवी ताईंचं बोट धरून शिरतो. त्यांच्या संवेदनशील नजरेने इथला निसर्ग, इथली माणसं आपण पाहतो. हे सरधोपट प्रवासवर्णन असं नाहीये. एखाद्या ठिकाणी आपण बराच काळ राहिलो तर त्या भूमीशी त्या वास्तूंशी आपले बंध तयार होतात, तिथे आपली मूळं आपसूक रुजतात, तिथल्या झाडापेडांशी आपलं हितगूज सुरू होतं. आपुलकीची जी माणसं भेटतात आपण त्यांना आणि ती आपल्याला अंतर्बाह्य ओळखत असतात, त्या डोळ्यात स्नेह असतो, आपलं एक पान त्या डोळ्यात दडलेलं असतं, नुसतं डोळ्यात पाहून आपण स्वतःला वाचू शकतो. गाईडच्या भूमिकेत एखादी वास्तू, निसर्ग, तारीखवार इतिहास सांगणं वेगळं आणि आपल्या मनातील या साऱ्या सभोवतालाविषयीचे प्रामाणिक भाव व्यक्त करणं वेगळं. १९९० साली म्हणजे जवळपास तीस वर्षांनी माधवी ताई त्यांच्या बांदोडा या गावी परतल्या. जागा तीच पण वयाच्या १६ व्या वर्षी पाहिलेलं गोवा आणि साठीत समजलेलं गोवा या दोन्ही गोष्टी त्यांनी कुतुहलाने तोलून पहिल्या, आणि मांडल्याही. गोवा म्हणजे विविध संस्कृतीची सरमिसळ. त्याचे समाजावर झालेले बरेवाईट परिणाम या पुस्तकात मांडले आहेत. परकीय राजवट असून आणि आता स्वतंत्र घटक राज्य असून जपलेल्या चालीरीती, समाजात परकीय राजवटीमुळे आलेला एक मोकळेपणा सारं त्यांच्या लेखणीतून झरझर उतरतं. त्यांचं लिखाण समुद्राच्या पाण्यासारखं नितळ, ओघवत्या शैलीचं, गजाली गप्पांच्या लाटाच जणू. म्हणून पुस्तक एकदा वाचायला घेतलं की खाली ठेववत नाही. देवचार, कोपेल, पायलट, तळी, पालखी, फुलराणी लेखांच्या नुसत्या नावावर नजर फिरवली तरी काहीतरी वेगळेपणा असणार लेखात हे कळतं. गमतीची बाब म्हणजे सलमान, संजय दत्त, चंकी पांडे, दिव्या भारती विषयी त्याकाळी भाबड्या लोकांना असलेलं आकर्षण, गजालीत सिनेमा, राजकारण, दाऊद इब्राहिम हे आलेले विषय, तिथल्या लोकांची त्यावर गमतीदार टिपण्णी हे सारं वाचायला मस्त वाटतं. डोना पॉला ची प्रतिक्षा त्यांनी आपल्या शब्दात मांडली आहे. गोवन स्त्रियांमधला काळानुरूप झालेला बदल काही ठिकाणी त्या अधोरेखित करतात. पूर्वीचं गावपण कसं मागे पडत गेलं हे त्या सांगतात, तरी जे काही शिल्लक आहे ते निराशाजनक निश्चित नाही अन्यथा त्यांच्या जीवनाच्या अंतिम टप्प्यातील विश्वासाने विसवायचं ठिकाण म्हणून त्यांनी हे गाव निवडलं नसतं. इथल्या भाषेतली मौजेची गोलाई आणि माधुर्य माधवी ताई न टिपतात तर नवल. पुस्तक वाचून झालं तरी काय बरं ते गाणं होतं म्हणून पानं पुन्हा चाळली जातात आणि गुणगुणायचा प्रयत्न होतो. ... आलयली डोलयली पंटी पालयली सांग गे बाये, तुका कोणे चोरून वेल्यान गो बाये ... आंव तुजो सदाच मोग करतलो गे बाये आणि तुका हाव केन्नाच विसरचो ना गे बाये - प्रसाद साळुंखे ...Read more

THE GUNS OF NAVARONE
THE GUNS OF NAVARONE by ALISTAIR MACLEAN Rating Star
Mahesh S

दुसऱ्या महायुद्धात ‘खेरोस’ या छोट्या बेटावर १२०० ब्रिटिश सैनिक अडवून पडले होते. हे बेट तुर्कस्तानच्या जवळ होते. त्यांना सोडवायला जाणाऱ्या बोटींना नॅव्हारन बेटावरील महाकाय तोफांचा अडथळा होता. त्या तोफा त्यांच्या समोरच्या समुद्रातील कोणतेही जहाज सहज बुवू शकत होत्या. नॅव्हारनवर एक भक्कम किल्ला होता. तिथे जर्मन व इटालियन सैन्य होते. अशा या तोफा नष्ट करायला मूठभर माणसांची तुकडी बेटाच्या मागच्या कड्यावरून चढून वर पोचली. खेरोस बेटावरील सैनिकांना सोडविण्यास येणारे ब्रिटिश आरमार, तोफांचे त्यावर धरले जाणारे नेम आणि त्या नष्ट करण्यासाठी पुढे सरकलेली ती मूठभर घातपात्यांची तुकडी यांच्यात शर्यत लागली. शेवटी कोण जिंकले? ...Read more